सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
" आशिया कप विजयानंतरचे कवित्व-बिंब/ प्रतिबिंब":
महाराष्ट्र टाइम्स मधील वाचकाचे हे पत्र बोलके आहे. ह्या स्पर्धेनंतर क्रीडाबाह्य जे काही कवित्व होत गेले ते बघता केवळ पाकिस्तान विरुद्ध नव्हे तर आशिया कप वरच बहिष्कार घालायला हवा होता असे वाटू शकते. त्यामुळे आपल्या देशाचे नुकसान झाले नसते, ऑपरेशन सिंदूरच्या गरजेचे व वास्तवतेचे दर्शन झाले असते.
एकाच नाण्याला दुसरी बाजू असते याची जाण ठेवली तर चांगलेच.
सोशल मीडियावर याच विषयावर रंगलेली ही जुगलबंदी जरूर वाचा
B:
😂 *आज देशविघातक आणि भारतद्वेषी कोण हे सहज स्पष्ट उघड झाले. सोशल मीडियावर सतत कार्यरत असलेल्या राजकिय, समाजसेवी, विचारवंत, सर्व विषयांचे जाणकार टीकाकार यांनी भारतीय टीमच्या विजयाचा जयजयकार केला नाही. टाळ्या वाजवल्या नाहीत. उत्सव साजरा केला नाही. त्यात भाग घेतला नाही. अद्वितीय टीमचे अभिनंदन केले नाही. ही भारताची टीम होती आणि त्यांनी जिहादी विरोधकांचा एकदा नाही तर तीनदा निर्णायक पराभव केला. भारताच्या तरुणाईने मैदान मारले, गाजवले.*
*परंतु देशद्रोही चूप बसले. भारताचा विजय त्यांना पचला नाही, आवडला नाही. आता देशविघातक कोण हा प्रश्न विचारला जाणार नाही.* 😂
*जय भारत !*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
A:
मुळात या आशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताने खेळणे हे नजीकच्या पाकच्या दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्णतया चुकीचेच होते हे विसरून चालणार नाही. खरे देशद्रोही कृत्य कोणी केले हे सांगणे न लगे
B:
: 🙋♂️😂😂😂😂😂😂
*यातल्या अर्ध्या विधानाशी मी सहमत आहे. भारत सरकारने आशिया कप मधे खेळायला नको होते असे तत्व म्हणुन मला आजही वाटते. परंतु शांतपणे विचार करता हे ध्यानात येते की ही समस्या एका स्पर्धेची नाही तर यापुढे विविध खेळांच्या ज्या आतंरराष्ट्रीय स्पर्धां होणार आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. येत्या काळात हॉकीच्या स्पर्धा आहेत. त्यात पाकिस्तान असणार आहे. मग त्यात भारताने खेळायचे की नाही, हा प्रश्न दूरगामी परिणाम करणारा आहे. आपण खेळता कामा नये ही तात्विक भूमिका झाली. परंतु काल जे घडले, ज्या तर्हेने पाकिस्तानची बेइज्जती झाली, ते पहाता हा चांगला पर्याय आहे असे वाटते. याने आपले खेळाडु जागतिक मंचावर बाजुला पडणार नाहीत. परंतु त्याचा भारतीय टीमचे अभिनंदन न करण्याशी सुतराम नाही. ते कृत्य देशद्रोहीच आहे.* ज्यांना हे चुकीचे वाटत असेल त्यांनी तसा ओरडा करत रहावा. त्याने काहीही फरक पडणार नाही. तसेच पाकिस्तानशी खेळणे म्हणजे देश तोडणे नाही की आतंकवादी कृत्ये करणे नाही. भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा द्वेष करणे, भारताचे वाईट चिंतीणे, भारताचे तुकडे करण्याची भाषा करणे, भारताच्या परदेशी शत्रूंशी हातमिळवणी करणे याला देशद्रोह म्हणतात. ते कोण करत आहेत ते देशभक्त भारतीयांना आता चांगले कळले आहे. देश त्यांना माफ करणार नाही. तसे बघितले तर भारताने चीन बरोबर व्यापारी वाटाघाटी करता कामा नये. पण भारत त्या करत आहे. भारताने चीनमधे SCO परिषदेत भाग घेतला. भारताने याआधी पण या परिषदेत भाग सातत्याने घेतला आहे. ब्रिक्स सारखाच हा एक आंतरराष्ट्रीय मंच आहे. त्याचा अर्थ भारत चीन जवळ जात आहे असे कोणाला वाटत असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय परराष्ट्रनीती काय असते ते समजत नाही. येत्या नजिकच्या काळात सीमेवर भारत चीन झडपा झाल्या तर आश्चर्य वाटुन नये. आपल्या सीमेवरील परिस्थिती नाजूक आहे. आजचा भारत मियां नेहरुंचा नांगी टाकणारा भारत नाही याची चीनला आधीपासून गलवान संघर्षापासुन जाणीव झाली आहे आणि ऑपरेशन सिंदुर दरम्यान निव्वळ एका तासात पाकिस्तान आणि अमेरिकेला जो मार पडला, त्यानंतर चीन थोडी सावध भूमिका घेतो आहे. भारतीय सैन्याबरोबर लढण्याची त्यांची कुवत नाही आणि हिम्मत पण नाही. परंतु शेवटी तो विषारी साप आहे हे भारताला चांगले माहीत आहे.
येणारा काळ कठीण आहे, देशभक्त भारतीय बाहेरी आणि देशांतर्गत शत्रूंशी लढण्यास सज्ज झाले आहेत. भारताला देशातल्या देशविघातकांपासुनच जास्त धोका आहे. त्यांचा एक प्रतिनिधी सोनम वांगचुक गजाआड गेला आहे. आता इतरही जातील. यापुढे सरकार ते सहन करणार नाही. लोकशाही आणि घटना यांच्या आड चाललेले हे थोतांड आहे.
*जय भारत, जय श्रीराम!*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
A
: या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध
खेळणे म्हणजे पैशासाठी केलेले एक दुक्रुत्य होते.
आपण म्हणू तीच पूर्व दिशा किंवा आपले तेच नेहमी खरे अशी वृत्ती असणे म्हणजे एक प्रकारे हुकूमशाहीच होय. या परिघाच्या बाहेर येऊन समतोल सजग दृष्टीने कोणत्याही गोष्टीकडे पाहणे गरजेचे असते.
नोबडी इज राईट ऑल द टाईम.
जे वर जाते ते केव्हा ना केव्हा खाली येऊ लागते..
बिगिनिंग ऑफ द एंड चालू झाले आहे
B:
🙋♂️😂 आपल्याकडे, आपल्या क्रिकेट संस्थांकडे भरपूर पैसे आहेत. मतभिन्नता असणे यात काहीच चूक नाही. पण भारताचे वाईट चिंतीणे याला काय म्हणतात? भारत संपावा अशी इच्छा बाळगणे याला काय म्हणतात ते सांगायला नको.
*आपल्याकडे नेहमी बोलले जाते की "शुभ बोल रे नाऱ्या!*
*जय भारत, जय श्रीराम !*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
A:
येथे उल्लेख केलेले विशिष्ट आपले तेच म्हणणे खरे म्हणणारे म्हणजे भारत नव्हे. त्यामुळे सोईस्कर गैरसमज करून घेणे चुकीचे.
B:
🙋♂️😂😂😂😂😂😂😂
*भारतद्वेषी या निमित्ताने उघड्यावर आले हे निश्चित. यांची आता सनातनी सुसंस्कृत सामर्थ्यवान भारतात गय केली जाणार नाही.*
A:
येथे भारत द्वेषाचा प्रश्न येतच नाही. एकांगी विचारधारा सोडून देणे हिताचे
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
"बोल अमोल !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-241 !":👌
😙 "कोणी विचारल्याशिवाय आपले काय काय भले होते आहे, हे स्वतःहून कधीही सांगू नये. कारण हल्ली माणसांच्या प्रवृत्ती असुयेने बऱ्याच वेळेला भरलेल्या असतात. त्यामुळे तुमचे चांगले होते याचे जसे त्यांना काहीच महत्त्व नसते, तसेच ते तसे होते आहे याचे त्यांना मनातून वाईटच वाटते, हे ध्यानात घ्यावे !"
😙"सजग समंजसपणाची त्रिसूत्री":
"विचारी व्हा व्यक्त व्हा मुक्त व्हा":
ह्या संकल्पनेचा कल्पनाविस्तार
तिचा अर्थ आणि मर्म उलगडून सांगण्यासाठी मी आपल्या मार्गदर्शनासाठी मांडत आहे.
त्याशिवाय उदाहरण देत दुसरा भागही आपल्यासमोर सादर करत आहे.
प्रथम सोपे म्हणून ध्वनिफीत बनवली, तिचाच पुढे व्हिडिओ बनवला आणि त्याशिवाय 'ऑडिओ टू टेक्स्ट'ही प्रणाली वापरून त्याचे शब्दरूपही तयार करू शकलो. जे मला माझ्या ब्लॉगवर टाकता येईल.
सजग शहाणपणाचे हे देखील एक लक्षण आहे की, आपण विचार करून आव्हान स्वीकारत संकल्पनेचा असा माध्यमांतराद्वारे विस्तार करू शकतो.
पहिल्या भागासाठी पुढील लिंक उघडा....
https://youtu.be/3UhVtNmluHE?si=eKkKm-7heLtpxZhd
"Different Strokes!":
## "Game of Politics !":
Most of the observations one makes, are based on the perceptions of the situation at a given point in time. Human perceptions are amalgam of information available from media and other sources, beliefs, experience of self, others and so on....
Ultimately in a political game of Power, such public perceptions only decide the outcome. Rationality at least in Indian Politics unfortunately, gets a back seat, compared to emotionality, though prudence demands otherwise. In such a case, the outcomes and hence possibly, progress and development possibly could have been much better.
In any case, it's wise that one should therefore, refrain himself from participating in social media, in this complex area of politics.
## Most of the observations one makes, are based on the perception of the situation at a given point in time. Human perceptions are amalgam of information available from media and other sources, beliefs, experience of self, others and so on....Ultimately in a political game of Power, such public perceptions only decide the outcome. Rationality at least in Indian Politics unfortunately, gets a back seat, compared to emotionality, though prudence demands otherwise. In such a case, the outcomes and hence possibly, progress and development possibly could have been much better. In any case, it's wise that one should therefore, refrain himself from participating in social media, in this complex area of politics.
## True and meaningful observation is not about what happens around but about what you think of your impressions of it within.
## Opportunity is like dew on leaf; more you try to grab it before it goes away.
## Everyone is harping about Economic and Material Development; but what about Ethical and Moral Development? If it is in place, then all other developments would follow and percolate equally, down the line.
## Spend at least some time every day in thinking within; it's an excellent exercise for your mind & intelligence.
## There is a definite Peak of achievement for every one; he cannot go beyond that. Trouble is each one's peak is different. All the stress is the by product of comparison arising out of such differences in Peaks.
When most of the films turn out to be flops, why those associated with it, can't' judge before, what common cinegoers judge, afterwards?
##
रविवार, २१ सप्टेंबर, २०२५
" सोशल मीडियावरील मुशाफिरी बिंब प्रतिबिंब
[21/9, 10:08 AM] Gupte Dilip Sr Ctzn: *ट्रम्पचा 'व्हिसा बॉम्ब' म्हणजे भारतासाठी लॉटरीच !*
अमेरिकेचा माथेफिरू राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याने बहुधा अमेरिकेला गाळात घालून भारताला संपन्न बनवण्याचा विडाच उचलला असावा ! लांबचा विचार न करता तात्पुरती सोय बघण्याच्या त्याच्या सवयीमुळे 'टॅरिफ बॉम्ब' मागोमाग आज त्याने 'H1 B' व्हिसा इच्छुकांना दर वर्षी १,००,००० डॉलर (म्हणजे ८८ लाख रुपये) एवढी फी अमेरिकन सरकारला द्यावी लागेल असा फतवा काढून भारतीयांवर 'व्हिसा बॉम्ब' भिरकावला आहे. पण अमेरिकेत स्थायिक झालेले एक व्यावसायिक आणि लेखक आदित्य सत्संगी यांनी ट्रम्प यांचा हा फतवा म्हणजे स्वतःच्या पायावर मारलेली कुऱ्हाड असून उलट भारताला लागलेली ही 'लॉटरी'च आहे असा दावा केला आहे.
अमेरिकेवरील दुष्परिणाम
आदित्य सत्संगी हे मूळचे सोलापूरचे असून काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे नागरिक बनले आहेत. रामायण, महाभारत, भागवत, भारतीय तत्वज्ञान वगैरे विषयांवर आजपर्यंत त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
'अल्टरनेट मीडिया' चॅनेलवर बोलताना त्यांनी ट्रम्पच्या ताज्या घोषणेचे अमेरिकेच्या अर्थकारणावर होणारे दुष्परिणाम सांगितले. अमेरिकेत गेल्यावर्षी 'H1 B' व्हिसावर गेलेल्या भारतीयांचं प्रमाण सर्वात जास्त- म्हणजे ७२% एवढं होतं. त्याखालोखाल चिन्यांची संख्या ११% एवढी होती. मात्र चिनी तरुण भारतीयांसारखे कष्टाळू आणि विश्वासार्ह नसतात. तंत्रज्ञान चोरून ते ते गुपचूप चीनला पाठवतात. भारतीय तरुण तसं करत नाहीत. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचा विश्वास भारतीयांवर जास्त असतो. कदाचित म्हणूनच सर्व अव्वल अमेरिकन कंपन्यांचे 'सीइओ' आज सहसा भारतीय आहेत. मात्र तो सुंदर पिचई असो, सत्या नाडेला असो, नील मोहन असो, नाहीतर शांतनू नारायण असो; अमेरिकन लोक भारतीयांचा 'टेक कुली' (Tech Coolie) असा तुच्छ उल्लेख करतात. कारण भारतीय तरुण आपल्या डिग्र्या, बुद्धी आणि कौशल्य घेऊन अमेरिकेत जातात आणि दुसऱ्यासाठी हमाली काम करत बसतात. स्वतःसाठी ते काहीच करत नाहीत. मिळणाऱ्या पैशामुळे आणि सोयीसुविधांमुळे या तुच्छतेकडे आणि दुय्यम नागरिकत्वाकडे ते कानाडोळा करतात. पण मोदींनी त्यांना पूर्वीच बजावून ठेवलं होतं, की 'परदेशी भारतीयांनो, तुमचा एक पाय मायभूमीत असुदे, नाहीतर एकदिवस तुमची 'न घर का न घाटका' परिस्थिती होऊ शकेल !'
ती वेळ आता आली आहे.
भारताकडे पुनरागमन
'H1 B' व्हिसा ३ वर्षांसाठी असतो आणि त्याची मुदत आणखी ३ वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते. 'ग्रीन कार्ड'साठी अर्ज करून वर्षानुवर्षे या व्हिसाचं नूतनीकरण करत वाट बघावी लागते. अमेरिकेतील तरुण भारतीयांचा पगार वर्षाला सरासरी ६०,००० डॉलर एवढा असतो आणि हळूहळू तो वाढत जातो. त्यामुळे दरवर्षी १,००,००० डॉलर सरकारला केवळ या व्हिसासाठी मोजणं ९०% भारतीयांसाठी किंवा त्यांच्या कंपन्यांसाठी सुद्धा अशक्यप्राय गोष्ट आहे. हे भारतीय तरुण भारतात परत येतील, एव्हढंच नव्हे, तर त्यांच्या अमेरिकन कंपन्याही 'ऍपल' प्रमाणे भारतात स्थलांतरित होतील. आणि हा प्रश्न केवळ 'आयटी' मधल्या भारतीयांचा नसून पेशाने डॉक्टर आणि संशोधक असणाऱ्या भारतीयांचा सुद्धा आहे. हे सगळे परत आले तर अमेरिकेत वैद्यकीय आणि संशोधकीय समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. येताना हे लोक आपली घरे विकतील. त्यामुळे 'रिअल इस्टेट' क्षेत्र कोसळून पडेल. याव्यतिरिक्त या लोकांमुळे तिथे अस्तित्वात असणाऱ्या इन्शुरन्स कंपन्या, हॉटेले, मॉल्स वगैरे गोष्टीही भराभर बंद होण्याची शक्यता निर्माण होईल. परिणामी, अमेरिका म्हणजे केवळ प्लम्बर, इलेक्ट्रिशियन आणि सुतार यांचं वास्तव्य असलेला एक दरिद्री देश म्हणून उरेल.
भारताला लॉटरी
या येणाऱ्या लोंढ्याचा भारताला मात्र प्रचंड लाभ होईल. इथे येऊनही आयटीवाले अमेरिकेएवढंच कमावतील. त्यांच्या मागोमाग येणाऱ्या कंपन्या इथे नवे रोजगार निर्माण करतील. बंगळूर किंवा पुण्यासारखी कित्येक 'आयटी हब्ज' भारतात निर्माण होतील. खेडोपाडी डॉक्टर आणि पेशंटचं जे अत्यल्प प्रमाण आहे, ते खूपच सुधारेल. बुद्धिमान संशोधकांची भारताला कायम जाणवणारी उणीव नष्ट होईल आणि भारताच्या तिजोरीमध्ये दरवर्षी अंदाजे ३५० बिलियन डॉलर एवढी भर पडेल.
एकंदरीत कावळ्याच्या शापाचा गोमातेवर परिणाम होत नाही, त्याप्रमाणे ट्रम्पच्या शिव्याशापांचाही भारतमातेवर परिणाम होणार नाही. उलट या फतव्यामुळे भारताला संपन्नता आणि समृद्धीचं वरदान मिळण्याची शक्यताच अधिक आहे !
- हर्षद सरपोतदार
[21/9, 10:29 AM] Sudhakar Natu: चर्चेत असलेले संकट हे भारतासाठी संधीच आहे असे मी माझ्या संदेशात नमूदच केले आहे.
मात्र या लेखातील स्वप्नरंजन कितपत प्रत्यक्षात येईल अशी शंका वाटण्याजोगी सध्याची वास्तवाची परिस्थिती आहे.
सर्वंकष पसरलेला भ्रष्टाचार विशेषत: प्रशासकीय गलथांपणा, हलगर्जी विकास योजना प्रत्यक्षात आणण्यामध्ये होणारा विलंब याकडे दुर्लक्ष कसे करून चालेल?
हिंजेवाडी व बंगलोर मधील रस्ते
वाहतूक व इतर व्यवस्थेची जी दयनीय अवस्था झाली आहे. ही दोन केवळ वानगी दाखल उदाहरणे.
उशिरा का होईना आपल्या धोरणकर्त्यांना शहाणपण सुचले, तर चांगलेच !
ता.क.
आकाशातील पाळणे या अभिवाचन मंचावर नुकतीच प्रकाशित केलेली 'डॉलरचे अवमूल्यन' ही ध्वनिफीत जरूर ऐकावी
[21/9, 10:37 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋♂️😂 *भारतासाठी ही एक सूवर्णसंधीच आहे. आज आपल्या देशातल्या, काँग्रेस धार्जिण्या, देशविघातक, मोदी आणि भारतद्वेषींनी भारतसरकारची विदेशनीती, व्यापारनीती, उत्पादनक्षेत्र नीती यावर टीका टिप्पणी चालवली आहे. स्पष्टच बोलायचे तर या लोकांना या क्षेत्रांचा गंधही नाही, जगात सद्ध्या काय चालले आहे ते त्यांना माहीत नाही पण हे लोक सर्वंच बाबतीत तज्ञ आहेत.असो. अमेरिका पप्पु टप्पुला हाताशी धरून भारताला तोडण्याचे अटोकाट प्रयत्न येत्या काळात करेल. आर्थिक आघाडीवर जे युरोपीय देशांना कधी जमले नाही ते डिडॉलरायझेशनचे काम भारताने मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यामुळे इतर अनेक देश खडबडून जागे होऊन त्याचे अनुकरण करण्यास सज्ज झाले आहेत. थोडक्यात जगात एका मोठ्या संघर्षाला तोंड फुटले आहे. नाटो संघटना तुटायला, विखरायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात आपले हितसंबंध जपण्यासाठी युरोपीय देश भारत आणि चीनशी जोडायला पावले उचलतील. ब्रिटनने अमेरिकेला न जुमानता भारताबरोबर FTA केले आहे. जपानने पण ते पूर्णत्वास नेले आहे. अमेरिकेची ही मोठी डोकेदुखी आहे. आता तर त्यांची भारतात बरोबर सैनिकी संघर्षाची तयारी चालली आहे. म्यानमार, बांगलादेश, नेपाळ आणि भारताच्या पूर्व सीमेवर त्यांना ख्रिश्चन देश बनवायचा आहे. ही योजना गेले २०/२५ वर्षा पासुन आकार घेत आहे. अमेरिकेने परवा बांगलादेशांत आपल्या फौजा उतरवल्या आहेत. भारताला ही सरळ सरळ धमकी आणि चेतावणी आहे. नेपाळमध्ये अलिकडे घडवुन आणलेल्या दंगली त्याचाच भाग आहेत. परंतु तीथे भारताने फासा पलटवला आहे. भारत धार्जिण्या राजघराण्याच्या आणि सैन्याच्या मदतीनी भारताने आपली पंतप्रधान तीथे स्थापीत केली आहे. एव्हढेच नाही तर सैन्य अभ्यासाच्या नावाखाली भारत सरकारने आपले सैन्य म्यानमारमधे उतरवले आहे. परिस्थिती बिकट आहे. परंतु अमेरिकेला पराभुत होऊन नामुष्कीने येथुन बाहेर जावे लागेल हे निश्चित. याआधी ते व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानातुन पळाले आहेत. सर्व जग याकडे आशेने बघते आहे. याच काळात सर्व इस्लामिक देश, जे काल कतारमधे एकवटले होते ते भारतावर हल्ला पण करु शकतील. अमेरिका त्यांना यासाठी उद्युक्त करेल. जरा थांबा बघा येत्या काळात काय काय घडेल ते. भारतासाठी आणि विकसनशील देशांसाठी हा काळ निश्चित कठीण आहे. जय भारत, जय श्रीराम!*
[21/9, 10:44 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋♂️ *हा भ्रष्टाचार ही काँग्रेसच्या ६०/७० वर्षाच्या देशविघातक कारभाराची देणगी आहे. तो समाजात इतका मुरला आहे की त्यासाठी काही पिढ्या जाव्या लागतील. परंतु पंतप्रधान, केंद्रीय सरकार पातळीवर मनमोहनसिंगांच्या काळात झालेला भ्रष्टाचार साफ बंद झाला आहे. गेल्या दहा वर्षांत एकही प्रकरण न्यायप्रविष्ट झाले नाही आणि सर्वोच्च न्यायालयात टीकले नाही. भ्रष्टाचारी विरोधक आणि त्यांच्या परीवारांचा खात्मा होणे गरजेचे आहे. त्यांची सुरुवात झाली आहे.*
[21/9, 10:47 AM] Sudhakar Natu: जगातील प्रथम व दुसऱ्या क्रमांकाची लोकशाही असलेल्या देशांमध्ये या अशा प्रकारचे पराकोटीचे वितुष्ट निर्माण होणे, त्याबरोबरच शेजारी जवळजवळ सर्वच राष्ट्रांशी आपले संबंध बिघडलेले असणे, ही आपल्या परराष्ट्र धोरणाची घोडचूकच नव्हे कां?
[21/9, 11:03 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋♂️ *अमेरिकेत "लोकशाही" आहे ही एक अज्ञानी समजुत आहे. अमेरिका हा एक निर्वासितांनी बनलेला, संस्कृतीहीन, आतंकवादी आणि साम्राज्यवादी देश आहे. तीथले राजकारण अनुकरणीय नाही. आजतागायत आपल्या शस्त्रबळावर, पैशाच्या ताकदीवर दादागिरी करुन त्यांनी जगाच्या व्यापारावर डॉलरची अधीसत्ता स्थापन केली आहे. त्याला आजतागायत अनेक युरोपीय देशांनी विफल आव्हाने देऊन पाहीली. "युरोपीयन युनियन" ची निर्मिती त्यातुनच झाली. "ब्रिक्सची" स्थापना पण यातुनच झाली. या संघर्षाची जाणीव होऊन एकामागून एक देश आज ब्रिक्स मधे सामिल होत आहेत. ही अमेरिकेसाठी मोठीच डोकेदुखी आहे. गेल्या अनेक दशकांची जागतिक लढाई खनिजतेलासाठी, त्याच्या वर्चस्वासाठी होती. आता ती लढाई "रेअर अर्थ खनिजांकडे" वळली आहे. चिंता नसावी, भारत या संघर्षाचे नेतृत्व नक्की समर्थपणे करेल. याची परिणती अमेरिका तुटण्यात, विखुरण्यात होईल. अमेरिकेत त्याची सुरुवात झाली आहे याची खुणगाठ बांधावी. जय भारत!*
[21/9, 11:30 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋♂️ *आपले अमेरिकेबरोबरचे संबंध कधीच चांगले नव्हते. आणि ते होणार पण नाहीत कारण आपली उद्दिष्टे वेगळी आहेत. पूर्वी आपण त्यांच्यापुढे नेहमीच नमते घेतल्याने त्यांचे आपल्या विरोधातले चाळे बिनदिक्कत चालु होते. आपण त्यांच्या तालावर नाचत होतो. इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्धाच्या वेळी अमेरिकेत निक्सन अध्यक्ष असताना उठवलेला आवाज हा त्याला एकमेव अपवाद होता. असो. आपल्या शेजारच्या देशांमधल्या जनतेबरोबर आपले संबंध बिघडलेले नाहीत. आणि येत्या काळात त्या देशांच्या सरकारांबरोबर ते सामान्य होतील. आज अमेरिकेने उभरत्या आणि त्यांना आव्हान देऊ शकणाऱ्या भारतासारख्या विकसनशील देशाविरुद्ध जंगजंग पछाडुन, या देशांमध्ये अराजकता निर्माण करुन आपली प्यादी तिथे बसवुन युद्ध छेडले आहे. परंतु यातुन त्यांचा पराभव निश्चित आहे. मालदीव आणि श्रीलंकेतुन भारताने त्यांना आणि चीनला आधीच हाकलले आहे. इतरत्रही तेच घडेल. आजचा भारत सामरिकदृष्ट्या त्यांना पुरून उरेल. भारताच्या नेत्रुत्वाखाली संपूर्ण आफ्रिका आणि ग्लोबल साऊथ म्हणजेच दक्षिणपूर्व देश एकवटतील आणि अमेरिका व चीनशी सामना करतील. रशियाला भारताची बाजू घ्यावीच लागेल. आपणच काय, कोणीही इतक्या सर्व आघाड्यांवर एकाचवेळी लढु शकत नाही. त्यामुळे भारत सरकारची तारेवरची कसरत चालु आहे. मोदींचे क्वाड मिटींगला न जाता SCO साठी चीनला भेट देणे हा त्याचाच भाग आहे. आजचे आपले परराष्ट्रीय धोरण "राष्ट्रीय हीताचे" आहे. आपण कुठल्याही कळपात नाही. आपले एकाचवेळी इराण आणि इझ्राएल बरोबर चांगले संबंध आहेत. आपण रशिया आणि युक्रेन बरोबर संवाद साधुन आहोत. असो. समोरासमोर कधी बसलो तर हे सविस्तर सांगीन. आजचे आपले परराष्ट्रीय धोरण नेहरुंच्या "Non Aligned Movement" सारखे डागाळलेले नाही. जय भारत!*
[21/9, 12:36 PM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋♂️ *जपान हे अमेरिकेचे नाईलाजाने आजही एक मांडलिक राज्य आहे. दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमा, नागासाकी या आतंकवादी घटनांनंतर जपानला अमेरिकेचे प्रभुत्व स्विकारावे लागले. अमेरिकेचे आजघडीला जपानमधे लष्करी तळ आहेत. तीथे त्यांची तैनाती फौज आहे. अमेरिका आणि जपानचे आर्थिक संबंध गुंतागुंतीचे आहेत. गेली काही दशके तो गळफास काढुन टाकण्याचा जपान आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु अमेरिका त्यात अडचणी निर्माण करत आहे. जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांनी मोदींशी मैत्री करुन भारताच्या माध्यमातून जगातल्या इतर विकसनशील देशांशी व्यावसायिक आणि सामरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा खुन झाला. कोणी केला? अमेरिकेच्या इशाऱ्याने नविन पंतप्रधान लादला गेला पण त्याला जनतेनी स्विकारला नाही. म्हणुन शिगेरु इशिबा पंतप्रधान झाले. परंतु त्यांनी आणखीन एक पुढचे पाऊल उचलले. त्यांनी त्वरीत भारत भेट करुन भारताबरोबर अनेक करार केले जे अमेरिकेला पटण्यासारखे नव्हते. अर्थात व्हायचे तेच झाले. त्यांना पण पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागले. जपानसारख्या सुसंस्कृत, आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या देशांत ही राजकीय अस्थिरता का असावी? ती कोण निर्माण करत असेल? याचा गांभीर्याने विचार करावा. हे महाराष्ट्रातील टपोरे क्षुल्लक राजकारण नाही.*
सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५
सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग तीन
सोशल मीडियावर सर्फिंग करणे आणि त्यातून आपल्यालाा
भावणारे रुचणारे असे काही संदेश वेचणं ही देखील एक कला आहे.
मी देखील अधून मधून हा उद्योग करत असतो त्यामधून गवसलेले हे दोन संदेश तुमच्याही जााणीवा विस्तारित करतील व अंतर्मुख करून जातील अशी आशा आहे...
1
*ट्रीप खूप लहान आहे*...
......*समजून घ्यारे मित्रांनो*
🥰😂🥰😂🥰😂😆🤣😁😄
# Policy driven by votes rather than merit is Penny wise Pound foolish .
# Beggaring ourselves by unsustainable inflation thru idiotic policies and rent seeking state.
Three monkeys policy.
China laughs while India stutters.
🥰😂🥰😂🥰😂😆🤣😁😄
एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगांनी मार लागला...परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही.,
तो माणूस गप्प बसल्यावर, त्या बाईने त्याला विचारले की तिने त्याच्यावर बॅग मारली, तेव्हा त्याने तक्रार का केली नाही ??
त्या माणसाने हसून उत्तर दिले:
"एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही, कारण "आपला 'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे....कारण मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे"..!
या उत्तराने महिलेला खूप त्रास झाला....तिने त्या पुरुषाची माफी मागितली आणि तिला वाटले की *ट्रिप खूप लहान आहे..!* हे शब्द सोन्याने लिहावेत..!
आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ इतका कमी आहे, की निरुपयोगी युक्तिवाद, मत्सर, इतरांना क्षमा न करणे, असंतोष आणि वाईट वृत्तीने काळोख करणे हा वेळ आणि शक्तीचा हास्यास्पद अपव्यय आहे..!
तुमचे हृदय कोणीतरी तोडले आहे का ?? शांत राहणे.,.
*ट्रिप खूप लहान आहे..!*
कोणी तुमचा विश्वासघात केला, धमकावले, फसवले किंवा तुमचा अपमान केला ??
आराम करा - तणावग्रस्त होऊ नका.,
*ट्रिप खूप लहान आहे..!*
कोणी विनाकारण तुमचा अपमान केला का ??वाईट बोलले का? शांत राहणे... दुर्लक्ष करा...
*ट्रिप खूप लहान आहे..!*
तुम्हाला 'न आवडलेली' टिप्पणी कोणी केली आहे का ?? शांत राहणे...दुर्लक्ष करा...क्षमा करा, त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा आणि विनाकारण त्यांच्यावर प्रेम करा.,.
*ट्रिप खूप लहान आहे..!*
काहींनी आपल्यासमोर कितीही समस्या आणल्या, त्याचा विचार केला, लक्षात ठेवला तरच ती समस्या निर्माण होते की आमचा *'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे..!*
*आमच्या सहलीची लांबी कोणालाच माहीत नाही... उद्या कोणी पाहिला नाही तो कधी थांबेल हे कोणालाच माहीत नाही..!*
आपली एकत्र सहल खूप लहान आहे....चला मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाचे कौतुक करूया...त्यांचा आदर करा... आपण आदरणीय, दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील होऊ या....कारण आम्ही कृतज्ञता आणि आनंदाने भरून जाऊ, *आपली एकत्र सहल खूप लहान आहे..!*
तुमचे हास्य सगळ्यांसोबत शेअर करा....तुमचे जीवन सुंदर व आनंदी बनण्यासाठी....... तुम्हाला हवा तसा तुमचा मार्ग निवडा....कारण...आपला ग्रुप जरी मोठा झाला असला तरी *आपली सहल खूप छोटी आहे..* कुणाला कुठल्या स्टाॅपवर कधी उतरायचं आहे हे आपल्या स्वतःला देखील माहिती नाही !!
🙏🌹🌹🙏
2
*आशा भोसले*
*वाढदिवस जन्म :८ सप्टेंबर,१९३३*
आशाताई ९२ वर्षांच्या झाल्या असे म्हटले की मनाला पटतच नाही कारण त्यांचा चिरतरुण आवाज आजही त्यांना सोबत करतो आहे.
आशा भोसले यांचा जन्म *सांगलीला* मंगेशकर कुटुंबात झाला. त्यांना गाण्याचा वारसा वडील मास्टर दीनानाथांचा मिळाला. लता मंगेशकर,मीना मंगेशकर-खडीकर,उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर या भावंडांची साथ मिळाली आणि सगळ्यांतून आशाताई घडत गेल्या.
त्यांची मराठी गाणी ऐकताना त्या मागचे परिश्रम आणि सर्वोत्तम तेच देण्याची भावना देखील लक्षात येते. प्रत्येक माणसाचा स्वतःच्या मनाशी संवाद सुरु असतो. कधी हा संवाद मनाला व्याकुळ करतो तर कधी अधीर तर कधी उदास तर कधी आनंदी. त्या आशयानुरूप वेगवेगळ्या गीतकारांची त्यांनी गायलेली काही गाणी आठवली.
मुंबईचा जावई मधले *आज कुणीतरी यावे* गाणे ऐकताना तारुण्य सुलभ भावना प्रकट करणारी तरुणी लगेच डोळ्यापुढे येते.
*सहज सख्या एकटाच येई सांजवेळी* हे सूर्यकांत खांडेकरांचे गाणे म्हणून भावी आयुष्याचे चित्र रेखाटणारी तरुणी डोळ्यापुढे येते.
लग्न झाल्यावर पतीला आपले भाव व्यक्त करताना ती म्हणते,*गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले जन्मजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले.*
मुलीची सासरी पाठवणी करताना *ओटीत घातली मुलगी विहीणबाई* म्हणताना त्यातल्या शब्दांनी आईची व्याकुळता जाणवत रहाते.
लग्नानंतरच्या नव्या नवतीच्या मंतरलेल्या दिवसात *मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे* ऐकताना आपल्या अंगावर देखील शिरशिरी येते.
युद्धात परागंदा झालेल्या नवऱ्याची असोशीने वाट पाहणारी सुवासिनी चित्रपटातली पत्नी,जेंव्हा *जिवलगा कधी रे येशील तू म्हणते* तेंव्हा तिची कासाविशी आपल्याला देखील अस्वस्थ करते.
संसारात तृप्त झाल्यामुळे ती म्हणते, *सुख आले माझ्या दारी ,मग काय उणे त्या संसारी*
बाळासाठी साऱ्या आयुष्याची कुरवंडी करायला तयार असणारी मोलकरीण चित्रपटातली आई, *देव जरी मज कधी भेटला* हे गाणे म्हणते तेंव्हा तिची ममता लक्षात येते.
*भरजरी ग पिताम्बर दिला फाडून* ही अंगाई गाणारी शामची आई आठवते.
*मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ? तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का !* असं कवी सुधीर मोघे लिहितात त्या वेळी त्याचा उत्कट अर्थ आर्तपणे गाऊन आशाताईंनीच आपल्यापर्यन्त पोचवला आहे.
कधी कधी मन देखील आपल्याशी अबोला धरत. आपल्या विचारांना थोपवून ठेवत अशावेळी कवी सौमित्र म्हणतात *माझिया मना जरा थांबना* त्यातुन त्यांना मनाला उद्देशून काय म्हणायचं आहे ते आशाताईंच्या आवाजातच ऐकायला पाहिजे.
*ऋतू हिरवा अल्बम* हा आठ गाण्यांचा अल्बम न ऐकलेली व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही.त्यातली सगळीच गाणी खूपच लोकप्रिय आहेत .
१)सांज ये गोकुळी २) भोगले जे दुःख त्याला ३) ऋतू हिरवा ४) जय शारदे वागेश्वरी ५) घन राणी ६) झिनी झिनी वाजे बिन ७) फुलले रे क्षण माझे ८) माझिया मना जरा थांबना
ही तर मराठी गाण्यांमधली नुसती वरवरची झलक आहे लिहायच म्हटल तर अजून कितीतरी बाकी आहे.
आता थोडंसं हिंदी गाण्यांबद्दल, त्यांची सगळीच गाणी ऐकताना आपणही लगेच ती गुणगुणायला लागतो, ही त्या आवाजाची जादू म्हणावी लागेल. त्या पैकी काही गाणी
निगाहे मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है)रोशन
झुमका गिरा रे (मेरा साया) मदन मोहन
छोड दो आचल जमाना क्या कहेगा (पेइंग गेस्ट) एस.डी.बर्मन
दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण)आर.डी.बर्मन
पिया तू अब तो आजा (कारवॉं)आर.डी.बर्मन
ओ.पी.नय्यर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातून आशा भोसले यांचा मदभरा आवाज ऐकू आला.
चैन से हमको कभी (प्राण जाये पर वचन ना जाये)ओ.पी.नय्यर
वो हसीन दर्द दे दो (हम साया) ओ.पी.नय्यर
आओ हुजूर तुमको(किस्मत)ओ.पी.नय्यर
जाइये आप कहॉं (मेरे सनम) ओ.पी.नय्यर
१९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन ऑंखोंकी मस्ती सारखी शब्द रचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
*मिराज ए गझल*
गुलाम अली आणि अशा भोसले यांचा मिराज ए गझल या अल्बमने जगभरातल्या गझलप्रेमींना अक्षरश: गुंगवून टाकले होते.आजही या गझल्स प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातल्या काही
दर्द जब तेरी आता है तो गिला किससे करू
दिल धडकने का सबब याद आया
रात जो तुने दीप बुझाये मेरे थे
सलोना सा सजन है
हैरतों के सिलसिले
आशा भोसले यांना १८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांना पुरस्कार मिळाला.१९७९ मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी यापुढे पार्श्वगायनाच्या पुरस्कारासाठी आपला विचार करु नये, अशी विनंती केली. आशा भोसले यांना २००१ मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होत.
आशा भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रसाद जोग.सांगली. ९४२२०४११५०
"स्वरानंद-अ !":
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-113 !":👌
💐 " पुढील लिंक्स उघडून ही तीन नादमधुर गाणी ऐका...
1 "रत्नदीप विझले नगरात, आता जागे व्हा यदुनाथ
https://youtu.be/PP3JOVxLjEA?si=31qZIh-dXh3CtDv3
2 " कबीराचे विणतो शेले कौसल्याचा राम बाई
https://youtu.be/MTrNm5y5M24?si=AuFd_JhTvbayg-H-
3 "सांग तू माझा होशील कां..
https://youtu.be/XIwyJgojLF0?si=2fa0TOJFtV9UYLjR
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
----------@####
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-114 !":👌
💐 " पुढील लिंक्स उघडून ही तीन नादमधुर गाणी ऐका...
1 "जिंदगीभर नाही भुलेंगे वो बरसात की रात...
https://www.facebook.com/share/v/1C8PU9M1Xx/
2 " आंसू भरी ये जीवन की राहें...
https://www.facebook.com/share/v/15kNDbEtqW/
3 " आपकी नजरोने समझा....
https://www.facebook.com/share/v/1NoSHfNPZC/
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
--------------
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-115 !":👌
💐 " दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद ही हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील अभेद्य अशी त्रिमूर्ती होती. त्यांच्या आन 1952 दिलीपकुमार,
आवारा1951 राज कपूर, C.I.D 1956 देव आनंद
चित्रपटातील ही तीन नादमधुर गाणी ....
पुुढील लिंक्स उघडून ऐका...
1" दिल में छुपा के प्यार....
https://youtu.be/SJ4D-2PVOtQ?si=jH6ZBweAnVCcZNoU
2 " दम भर जो के उधर मुंह फेरे..... https://youtu.be/joqzrQtb5u8?si=UZwXUy2LQwfbwfSf
3 " ऑखो ही ऑखो मे इशारा हो गया....
https://youtu.be/GgFTij0wCcs?si=9mSb1jR8ZISAgO8O
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
--------------
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-118 ! ":👌
💐 " नाद मधुर संगीत असलेली 3 गीते ऐका...
1 " श्रावणात घननिळा बरसला ...
https://www.facebook.com/share/v/1FQNNMNFJe/
2 " रुणुझुणु रुणुझुणु ये भ्रमरा....
https://www.facebook.com/share/v/1FCS2Spo2y/
3 " काल मी रघुनंदन पाहिले....
https://youtu.be/-LehYO9H7xA?si=f-sj-mmivjLSIyWM
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
----------------
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-119 ":👌
💐 " नाद मधुर संगीत असलेली चित्रपटातली गाणी ऐका.. त्यापुढील लिंक्स उघडून...
1 "ये कौन आया मेरे दिले....
https://www.facebook.com/share/v/19Wh8uRHKg/
2 " अफसाना लिख रही हू
https://youtu.be/D7XJy4bSNRY?si=QnRbpKrNy5exYkeI
3 " थंडी हवा ये, लहरा के आए...https://youtu.be/P6r3srBQz0k?si=kGVuEAdsC1n-5bng
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५
"मल्लीनाथी...!"::
'दुतोंड्या' मतलबी राजकारणी !":
माणूस कसा बदलतो बघा...
सत्तेवर असले की आरक्षण देऊ शकत नाही म्हणणार...
आणि सत्तेवर नसले की म्हणणार मराठ्यांना आरक्षण द्या
आणि सरकार विरोधी वातावरण तापवणार... लोकांना भडकवणार...
रद्दीत 2010 सालचा पेपर सापडला, त्यातली ही बातमी बघा.
त्यात शरद पवार म्हणताहेत की कायद्याने मराठा आरक्षण शक्यच नाही...
... त्यासाठी...
ही लिंक उघडा....
.https://drive.google.com/file/d/1DJ_oBrGfI7hrjooCkand149q-hOize5p/view?usp=drivesdk
-----------
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
" तूळ ते मीन राशीचे एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 संपूर्ण राशिभविष्य
७ तुळा: आनंदाचे डोही आनंदतरंग!:
चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती पूर्ण व विशाखा नक्षत्राचे तीन चरण यांनी बंधारे तुला रास शुक्राची असून शनि येथे उच्चीचा व रवि नीचीचा होतो, त्यामुळे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास तितकासा जाणवत नाही. तराजू हे बोधचिन्ह विवेकबुद्धी व सारासार विचार करून विवेकाने कोणताही निर्णय घेण्याची वृत्ती तुमची असते. टापटीप छान दिसण्याची हौस व मौज-मजा तुम्हाला आवडते. वयाच्या तिशीनंतर उत्तम प्रगती होते. नाट्य-चित्रपट व प्रसिद्धी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळते. विवाहाचे दृष्टीने मेष राशीबरोबर, तुमचे चांगले सूत जुळतंय तर मिथुन या नवपंचम राशीचे जोडीदार आनंदी समाधानी संसार दर्शवितात. मात्र मीन रास अष्टका मृत्यू षडाष्टक योगामुळे तुम्हाला वर्ज्य असते.
तुळा राशीने गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानी 1279 अनुकूल गुण मिळवले होते.
आता त्यात चांगली उत्साहवर्धक वाढ होऊन 1455 गुणांसाठी सर्व बारा राशींमध्ये सर्वोत्तम असा पहिला क्रमांक मिळवणार आहे. जणू हात लावेल तिथे सोनं अशा तऱ्हेचे घवघवीत यश तुम्हाला मिळू शकेल व नवनव्या संधी प्राप्त होतील.
नशीब फळफळणार आहे उत्साह वाढणार आहे प्रयत्नांना यश येणार आहे. सहाजिकच यावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, हे वर्ष गोड बातमी देणारे आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना आणि परदेशगमनाची संधी तुम्ही हस्तगत करू शकाल. तसेच अधिकार पद मिळू शकेल, तर व्यवसायात आर्थिक भरभराट होईल. विवाहोत्सुकांना अनुरूप जोडीदार निवडण्यात यश मिळेल. विद्यार्थी परीक्षांमध्ये आघाडीवर राहून त्यांचे कौतुक होईल. आर्थिक गुंतवणूक हुशारीने कराल. स्थावर विषयक समस्या दूर होतील. पुढील भवितव्यासाठी योग्य ते निर्णय आत्ताच दूरदृष्टीने घेऊन मजबूत पाया घालू शकणारे हे वर्ष आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही पहिला क्रमांक मिळवला असल्याने आगामी कालखंडात तुम्ही मिळालेल्या संधीचे सोने करा. माझे शुभ आशीर्वाद तुम्हाला आहेत.
प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल.
जिंदगी एक सफर, है सुहाना !
########
८ व्रुश्चिक: अंधे जहाँके, अंधे रास्ते, जाए तो जाए कहाँ!:
सगळ्यात गुढ व आपल्या मनातील खळबळ इतरांना जाणवून देणारी ही मंगळाची रास, शक्यतो एकला चालो रे अशा वृत्तीची असते. चंद्र नीचीचा होतो. अतिरेकी अरेरावी तुमचा घात करू शकते. महत्त्वाकांक्षी, आपलाच अधिकार गाजवण्याच्या ईर्षैमुळे तुम्ही सुरक्षा क्षेत्रात व इंजिनीअरिंगमध्ये यश मिळवता. मात्र जीवनात वैफल्याचा धोका अधिक असतो, कारण तुमची सहनशक्ती मर्यादित असते. विवाहाचेदृष्टीने मिथुन रास मृत्यूषडाष्टक योगामुळे वर्ज्य. वृश्चिक राशीची माणसे वृश्चिक राशी बरोबरच विवाहाचे दृष्टीने योग्य ठरतात. येथे कोणतेही ग्रह उच्चीचे होत नाहीत. विशाखा एक चरण पूर्ण अनुराधा व जेष्ठा नक्षत्र यांनी ही रास बनते.
व्रुश्चिक राशीला मागील वर्षी 11 व्या स्थानी 770 गुण तुम्हाला मिळाले होते.
या आगामी वर्षी किंचित सुधारणा होऊन तुमचा 10 वा क्रमांक व 857 अनुकूल गुण मिळतील. चढ उतार करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचे असून, अधून मधून अपेक्षाभंगाचे चटके व विरोधकांच्या कारवाया वाढतील.
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत दिवस काढायचे आहेत कालचक्राचा महिमा अगाध व तर के असतो वाढत्या जबाबदाऱ्या आजारपण व चुकलेले आर्थिक निर्णय यामुळे आर्थिक बाजू सावरता ना तुमची दमछाक होईल नोकरी व्यवसायात कामात मन न लागणे नको ते काम नको त्या ठिकाणी बदली अशी प्रतिकूल स्थिती असेल ंसारात जोडीदाराशी मतभेद वडीलधार्या तब्येतीची काळजी संतती विषयक समस्या यांनी आगामी वर्ष कसोटी पाहणारे आहे मनःशांती झाल्यामुळे डोकेदुखी पोटदुखी प्रवासात विलंब होऊ शकतात विद्यार्थीवर्गाला प्रयत्न अधिक वाढवायला लागतील तरी अपेक्षा पूर्ण होतील याची खात्री नाही थोडक्यात रखरखीत वाळवंटात तळपत्या उन्हात तुम्हाला वाटचाल करायचे आहे.
मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल. विवाहोत्सुकांना विलंब, समजूतीचे घोटाळे अशी प्रतिकूल स्थिती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज वा स्पर्धेत दमछाक होऊ शकते. प्रवास काळजीपूर्वक करावेत, दौरे वा पर्यटनाचे मनसुबे लाबणीवर टाकावे लागतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम अधिक घेऊनही अपेक्षित यश लपंडाव खेळेल. पोटदुखी वा डोकेदुखी सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील अशांत वातावरणात मनाला मुरड घालावी लागेल. अनुकूल गुणांचा विचार करता हे महिने नशीबाच्या रखरखीत उन्हाळ्यात ओअँसीस भासतील. एकंदर अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधत मार्गक्रमणा करायची तयारी ठेवा.
###########
९. धनु:
ही गुरूची रास असून येथे कोणताही ग्रह उच्चीचा व नीचीचा होत नाही. मूळ पूर्वाषाढा ही नक्षत्रे पूर्ण व उत्तराषाढा चा एक चरण यांनीही राशी बनते. मूळ नक्षत्री जन्म असेल तर त्याची शांती करावी लागते. सोशिकता चांगुलपणा व कष्टाळू वृत्ती यामुळे अडचणीतून मार्ग काढून तुम्ही पस्तिशीनंतर जीवनात स्थैर्य मिळवता. मेष व सिंह राशीचे जोडीदार संसारात नवपंचम योगामुळे उत्तम साथ देतात. तर शुक्राची रास मृत्यू षडाष्टका मुळे चालत नाही.
धनु राशीची 4 स्थानी मिळालेल्या
मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. काय कारण यंदा सातव्या क्रमांकावर घसरण होऊन 903 गुण मिळणार आहेत.
मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न वाढवायला लागतील त्यामुळे समाधानाचा मार्ग मिळेल.
अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची खप्पामर्जी होईल व बाजारामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे तुमच्या नफ्यात घट होऊन तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाला प्रयत्न वाढवावे लागतील, तेव्हा कुठे कसेबसे यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मात्र जास्त अपेक्षा ठेवू नये. विवाहोत्सुकांना हा कालखंड प्रतिकूल आहे, त्यातल्या त्यात पर्यंत काही काळ गुरू व्रुषभ राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात असल्यामुळे त्या काळात कदाचित अपेक्षापूर्ती होऊ शकेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे, तसेच छोटे-मोठे अपघात होऊ शकतात. संसारामध्ये अभिमन्यूसारखी चक्रव्यूहात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. जोडीदार नाराज असेल आणि संततीचे बाबतीत आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सारांश कठीण काळ लौकरच जाणार आहे, हे मनात घोकत कष्ट व सहन शक्ती वाढवणे, हेच गरजेचे आहे.
#########
१०. मकर: चली, चलीरे पतंग मेरी चलीरे...होके बादलोंके पार....
उत्तराषाढा नक्षत्राचे तीन चरण पूर्ण श्रवण व धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून ही रास बनते. मकर रास ही शनिची रास असल्याने तुम्हाला, त्याच्या साडेसातीचा खास असा त्रास होत नाही. तिथे मंगळ उच्चीचा तर गुरु निश्चित होतो. ध्येय गाठेपर्यंत चिवटपणा, त्याला कष्टाची जोड यामुळे नोकरी-व्यवसायात धीम्या गतीने तुमची प्रगती होते. आपली फुशारकी तुम्ही मारत नाही. कर्तबगार थंड डोक्याने काम करणारी ही माणसे असतात. सिंह रास मृत्यू षडाष्टक योगामुळे विवाहासाठी अयोग्य. तर नव पंचमातील व्रुषभ व कन्या जोडीदार संसारात गोडी आणतात.
मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने मागील वर्षी 3 रे स्थानी 1235 गुण मिळवून पहिल्या गटात वर्ष चांगले गेले होते. सुदैवाने आताही नशिबाला तुमच्यावर कृपा करावयाची आहे त्यामुळे आगामी वर्षी दुसरा क्रमांक पटकावून 47 गुण मिळवणारा आहात, यामुळे नशीब अधिक फळफळलेले दिसेल. तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये काय करू आणि काय नको असा उत्साह निर्माण होऊ शकतो. संपूर्ण कालखंड प्रगतीपथावर नेणारा असेल. अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देऊन तुम्ही नोकरी व्यवसायात आपली प्रगती कराल. यावर्षी गुरु तुमच्या नवपंचम योगात असल्यामुळे, नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायात चांगली भरभराट होऊ शकते. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग आहेत. मात्र कुठलाही अतिरेक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळणार आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते आघाडीवर राहतील. महिलांना आणि कुटुंबामध्ये नवीन पाहुणे येणे, त्यांचा पाहुणचार करणे आणि एकंदरच खेळीमेळीचे वातावरण राहणे, मंगल कार्य होण्याची शक्यता अशी शुभ फळे आहेत. थोडक्यात, संयम ठेवला तर आनंद सौख्य मिळणार आगे बढो!
#######
=
११.कुंभ:
मातीचा घडा असे कुंभ राशीचे चिन्ह आहे. ज्ञानाचा माहितीचा जणू सागर असे तुमचे स्वरूप असते. काहीशा अबोल पण हुशार माणसांची ही रास शनीने आपली मानली आहे. येथे कोणताही ग्रह उच्चीचा वा नीचीचा होत नाही. कुंभ व्यक्तीनाही साडेसातीचा तेवढा त्रास होत नाही. संसाराबाबतीत आपण उदास असता व एकंदर निरीच्छ. संशोधन अभ्यास वृत्ती व ज्ञानलालसा ही तुमची खास वैशिष्ट्ये. कर्क रास मृत्यू षडाष्टकामुळे विवाहासाठी टाळावी. मिथुन व तुला राशीचे जोडीदार तुमच्याशी कसेबसे जुळवून घेतात.
कुंभ राशी मागील वर्षी 6 व्या स्थानी नशीब आजमावत तारेवरची कसरत करत तोल सांभाळत होती. यंदा 1054 गुण मिळून 5 व्या क्रमांकावर उजव्या दुसऱ्या गटात आला आहात. आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग करत, अडचणी संकटांवर मात करत समाधानाचा मार्ग शोधत कामाला लागायचे आहे. परिस्थितीवर नियंत्रण अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा. परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकणाऱ्या पाचव्या क्रमांकावर आपली जागा निश्चित केली आहे. सहाजिकच यावर्षीही तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे, फक्त त्यासाठी तुम्हाला प्रयत्न अधिक करावे लागतील जागरूकता ठेवावी लागेल आणि विरोधकांच्या कारवायांवर मात करावी लागेल त्यासाठी सहकाऱ्यांचे मदतीची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, हे वर्ष गोड बातमी देणारे आहे. नोकरी धंद्यामध्ये तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे आर्थिक भरभराट संभवते. काही भाग्यवंतांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकेल. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. मात्र काही काळ पुन्हा षडाष्टक योगात जात असल्यामुळे तुम्हाला सावधानतेने निर्णय घ्या असे सांगतो. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल.
###########
१२. मीन:
दोन विरुद्ध दिशेला धावणारे मासे असे तुमचे बोधचिन्ह आहे ही गुरूची रास असल्याने साधी सरळ माणसं धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात चंचलता व धरसोड वृत्ती तुमचे नुकसान करू शकते शुक्र येथे उच्चीचा तर बुध्दीची चाहो तो सहसा तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही व्यावहारिक जीवनात ठेचा खात खात पुढे जावे लागते तूळ राशीचे जोडीदार मृत्यू षडाष्टक or मुळे मीन व्यक्तींना चालत नाही कर्क व कन्या रास विवाह हे दृष्टीने नवपंचम योग होत असल्याने चांगल्या असतात.
मीन राशीच्या वाट्याला मागील वर्षी 718 गुण मिळून तळ गाठला होता व कष्टकारक दिवस अनुभवले होते. आता किंचित गुण वाढत 869 गुणांवर नवव्या क्रमांकावर तुम्ही स्थानापन्न होणार आहात. अर्थातच होते तशाच परीक्षा पाहणाऱ्या अपेक्षाभंग करणाऱ्या प्रसंगांना तोंड देत राहायचे आहे.
ग्रहमान प्रतिकूल असले की घराचे वासेही कसे फिरतात, त्याचा अनुभव या वर्षी घ्यायचा आहे. नोकरी-व्यवसायात प्रतिकुल घटना व विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक ओढाताण तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यांत अडथळे निर्माण करेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची धास्ती वाटू शकेल अधिक नेटाने अभ्यास करायला हवा. घरातील वडीलधारी तुमच्याशी वाद घालून मनस्ताप वाढवतील. प्रवास तसेच नवीन गुंतवणूक सांभाळून करा नाहीतर फसवणूक होऊ शकेल. तुमच्या संशयी स्वभावामुळे अडचणीचे तसेच गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. विवाहोत्सुकांना विलंब स्विकारावा लागेल, घाई गर्दी नको. सगळेच फासे उलटे पडत आहेत असे म्हणायची वेळ आली, तरी धीर सोडू नका, केवळ श्रद्धा संयम आणि सबुरी या जोरावर दिवस काढायचे आहे.
#######
सारांश,
सर्वच राशींचा एकत्रित विचार करता मागील वर्षी बारा हजार 67 गुण मिळाले होते त्यात केवळ 313 गुणांची वाढ होऊन या वर्षी 12380 झाले आहेत याचाच अर्थ येरे मागल्या मागच्या वर्षी सारखेच हेही वर्ष जाईल असे मानावयाला हवे.
सर्व लोकांना विशेषतः या भविष्याच्या वाचकांना आगामी वर्ष सुख समाधानाचे शांतीचे जावो ही सदिच्छा व्यक्त करून हे ग्रह बदलानुसार अनुकूल गुणांवर आधारित जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असे संपूर्ण राशी भविष्य पूर्ण करतो.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
Mb 9820632655
II शुभम भवतु II
पुढचं पाऊल- 1 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 चे संपूर्ण राशिभविष्य
💐"पुढचं पाऊल ! ":💐
अर्थात
"ग्रहबदलानुसार अनुकूूल गुणांवर राशीनिहाय एकमेवाद्वितीय संपूर्ण वार्षिक राशीभविष्य":
1 नोव्हेंबर '25 ते 31 डिसेंबर '26
"जीवनात समाधान मिळविण्यासाठी आपल्या राशीच्या अनुकूल गुणांप्रमाणे अपेक्षा आणि प्रयत्न यांचा समतोल राखा !":💐
💐"पुढचं पाऊल 2 ":💐
"अनुकूूल गुणांवर राशीनिहाय एकमेवाद्वितीय संपूर्ण वार्षिक राशीभविष्य":
1 नोव्हेंबर '25 ते 31 डिसेंबर '26
१. मेष: सुख दु:खा, समे क्रुत्वा, मेष रास मंगळाची रास आहे रवी येथे उच्चीचा होतो. सतत उद्योग करत राहणे हा तुमचा स्थायीभाव असतो. येथे शनी नीचीचा होत असल्याने शनीच्या साडेसातीचा तुम्हाला जास्त असतो. वय वर्ष 28 नंतर सर्वसाधारणपणे तुमचा भाग्योदय येतो. विवाह हे दृष्टीने तुला राशी तुमचे चांगले धागेदोरे जुुळतात, सिंह धनू राशीच्या व्यक्ती तुमचा संसार गोडीचा होऊ शकतो,कारण त्यांच्याशी नवपंचम योग होतो. मात्र मृत्यू षडाष्टकातील कन्या रास मात्र तुम्हाला त्याकरता पूर्ण वर्ज्य असते.
१मेष रास 7 क्र. वरून चक्क तळाच्या 12 क्रमांकावर आली आहे. तुमचे एकूण गुण 1078 वरून 668 झाले आहेत. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा खुुप खुप कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न मात्र प्रचंड वाढवायला लागतील.
तळाच्या राशीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला आले आहे. एखाद्या अभिमन्यू सारखी चक्रव्यूहात सापडलेली स्थिती असू शकेल
त्या दृष्टीने संयम बाळगा, अपेक्षा ठेवू नका.
परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे मनस्थिती ठीक राहणार नाही. निर्णय वेळेत न घेणे वा चुकणे असा अनुभव घ्याल. नशिबाचे खेळ अव्याहत चालतात. त्याचाच क्लेशदायक अनुभव तुम्हाला यावर्षी घ्यायचा आहे. काळ कठीण आहे, रात्र वैऱ्याची आहे. तुम्हाला सुख शांती मिळवताना खूप धडपड करावी लागेल, तर दुःख तुम्हाला नेहमीच आपलंसं करेल अशी परिस्थिती आहे. प्रवास अडचणीचे तब्येतीची विशेष काळजी घ्या. प्रवासामध्ये अपघाताचा धोका. अचानक मनाविरुद्ध नुकसान करणारे वादाचे प्रसंग तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. नोकरीधंद्यात प्रयत्नांचे फळ मनाप्रमाणे मिळणारे नाही तर व्यवसायात आडाखे चुकल्यामुळे एखादा मोठा नुकसानीचा फटका बसू शकतो. विवाहोत्सुकांना विलंब फसगत गैरसमज असे अनुभव येऊ शकतात. संसारात एकमेकांशी वाद विवाद अपेक्षाभंग पाहुण्यांची उगाचच वर्दळ यामुळे त्रस्त रहा तब्येतीची वेळीच काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न करावेत अपेक्षा कमी ठेवाव्यात. एक लक्षात ठेवा कठीण काळ भविष्यात केव्हा तरी जाणारच आहे तोपर्यंत प्रयत्न कष्ट हाच मंत्र आपल्याला जपायला हवा.
################
२. व्रुषभ: मज काय कमी, सुख आले माझ्या दारी!:
क्रुत्तिका नक्षत्राचे तीन, पूर्ण रोहिणी व म्रुगाचे दोन चरण ह्यांनी ही शुक्राची रास बनली आहे. चंद्र इथे उच्चीचा होतो व कुणीही ग्रह नीचीचा नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही आनंदी असून उद्योग मग्नता हे तुमचे वैशिष्ट्य आहे. रसिकता विलासी व्रुत्ती व खिलाडूपणा असतो. नेहमी नीटनेटके व प्रसंगानुसार व्यवस्थित रहाणे पसंत करता. आळस नसतो, तारुण्यात अडचणींवर मात करून तुम्ही स्वबळावर जीवनात स्थैर्य व प्रगती साधता. म्रुत्युषडाष्टकातील धनु राशी, विवाहासाठी वर्ज्य आणि व्रुश्चिक ह्या मंगळाच्या राशीबरोबर तसेच नवपंचम योग साधणार्या कन्या मकर राशीच्या जोडीदारांबरोबर संसार सुख समाधानाचा होऊ शकतो.
व्रुषभ राशी गेल्या वर्षी 1 ल्या सर्वोत्तम शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली होती. 1343 सर्वोच्च गुणसंख्येेवरून थोडी उडी घेऊन यंदा 1427 गुण मिळणार आहेत. तरीही यावर्षी तिसरा क्रमांक आहे. प्रगतीची गाडी तशीच अपेक्षेप्रमाणे चालत प्रयत्नांना यश येणार आहे.
यंंदाही पहिल्या गटात नशीब चांगले राहणार आहे. अडचणी दूर होऊन परिस्थिती मधले मळभ निघून जाऊन निरभ्र असे आकाश तुमच्या वाट्याला आले आहे. या संधीचा फायदा घ्या.
ह्या कालखंडात उत्साहवर्धक घटना घडतील. जवळजवळ संपूर्ण कालखंड विशेष चढ-उतार न होता प्रगतीपथावर नेणारा असेल. लाभातील शनी तुमचा उत्साह वाढवेल व येणाऱ्या अडचणी व विरोध यांच्याशी यशस्वी मुकाबला करू शकाल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित बदली बढती व तुम्हाला आवडते काम मिळू शकेल. व्यवसायामध्ये शुभवार्ता आहे. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ घालू शकाल आणि आपल्या कुटुंबीयांना उर्जितावस्थेत नेऊ शकाल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासाचा ताण आला तरी शेवटी त्यात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळी खुश होतील अशी परिस्थिती आहे. अपत्यप्राप्तीची इच्छा असणाऱ्या दांपत्याची मनोकामना यंदा पुरी होईल. नोकरी-व्यवसायात आतापर्यंत जे अपमान सहन केले, कष्ट घेतले त्याचे आता चीज होईल. व्यवसायात तुमचे आडाखे योग्य ठरून आर्थिक घडी नीट बसू शकेल. स्थावर विषयक निर्णय व कृती वर्षाच्या मध्यंतरी करणे उत्तम असेल. घरामध्ये वडीलधाऱ्यांचा सल्ला घेत राहा,
प्रवास वेळेवर होतील आणि त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक व्यवहारात मात्र थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही तुम्हाला प्रोत्साहन राहील. एकंदर तथ्यांश हा की, उत्साहाचा अतिरेक करू नका प्रकृती सांभाळून नवीन योजना आखा.
एकंदर काय परिस्थिती तुम्हाला अनुकूल आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपली प्रगती करून घ्या. Best luck!
3 मिथून: "मन मनास उमगत नाही, आधार कसा हा शोधू?":
मिथुन रास हि विचारही बुद्धिमान बुद्धाची रास आहे. स्त्री-पुरुषाचे युगुल असे बोधचिन्ह असल्याने स्त्रीची कोमलता व तर पुरुषाचा अहंकार असे द्विस्वभावी रूप तुमच्या राशीचे असते. कोणताही ग्रह येथे उच्चीचा वा नीचीचा होत नाही. आपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही कुणालाच कधी जाणवू देत नाही. बोलघेवडेपणा मिश्किल थट्टा तुम्हाला आवडते. तूळ व कुंभ या नवपंचम योगातल्या राशीचे जोडीदार तुमच्याशी संसार चांगला करतात, मात्र वृश्चिक ही बुधाचा शत्रू असलेल्या आणि तुमच्या षडाष्टकात असलेल्या मंगळाची रास तुम्हाला विवाह साठी टाळावी लागते. म्रुगाचे दोन चरण रोहिणी पूर्ण व पुनर्वसु नक्षत्राचे तीन चरण मिळून ही राशी बनते.
मिथून राशीच्या नशिबी मागील वर्षी 9 व्या स्थानी जाण्याची वेळ आली होती आणि 845 गुण मिळाले होते. तेव्हा स्थिती कठीण होती मात्र यंदा 874 गुण मिळून 8 क्रमांकावर समतोल साधणाऱ्या अवस्थेचा लाभ होणार आहे.
मागच्या वर्षी पेक्षा हे वर्ष किंचीत कमी कष्टकारक जाईल. थोडीशी कुठेतरी रुख रुख राहील.
प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. मागच्या वर्षीची मृगजळासारखी परिस्थिती संपली आणि आता खरोखर वाळवंट सुरू झाले आहे अपेक्षा कमी ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. नोकरीधंद्यात त्रासाचे अडचणीचे असे प्रसंग येतील व्यवसायामध्ये अपेक्षापूर्तीचा शक्यता नाही तिथे पक्षपातीचा तुम्हाला मानसिक त्रास होईल. जोडीदाराच्या प्रकृती संबंधित नवीन काळजा निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये विस्मरण किंवा ऑप्शनला टाकलेला भाग येणे, असे अनुभव यावे. प्रवास संभाळून करावेत, त्यामध्ये विलंब व वाद-विवाद संभवतो.
'वक्त ने क्या किया क्या हसी सितम'अशी तुमची यावरची परिस्थिती झालेली आहे शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरे !
##########
4 कर्क रास: कठीण समय येता, कोण कामास येतो?:
कर्क रास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान कल्पक व प्रतिभा माणसांची राशी आहे. मंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो. संसारात तुम्हाला खूप गोडी असते. तुम्हाला माणसे हवीहवीशी असतात. प्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकते. कवी-लेखक कलावंतांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असते. विवाह करता मृत्यू षडाष्टकातील कुंभ रास वर्ज्य, तर मीन व वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभ फळे संसारात देतात. पुनर्वसु चा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण व अनिष्ट आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते.
कर्क राशीचे नशीब फारसे बदलणार नाही कारण मागच्या वर्षी 8 क्र.वरून घसरगुंडी होऊन अकरावा क्रमांक मिळाला आहे. गुण थोडेसे कमी होऊन 835 मिळाले आहेत.
एकंदर काळ हा प्रतिकूल आहे, हे विसरून चालणार नाही. मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा पाहील. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल. त्यातले त्यात, आगामी वर्षी फेब्रुवारी एप्रिल सप्टेंबर काळ विस्कळित घडी काही अंशी सावरू शकेल. अडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देतील. विवाहोत्सुकांना विलंब, समजूतीचे घोटाळे अशी प्रतिकूल स्थिती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज वा स्पर्धेत दमछाक होऊ शकते. प्रवास काळजीपूर्वक करावेत, दौरे वा पर्यटनाचे मनसुबे लाबणीवर टाकावे लागतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम अधिक घेऊनही अपेक्षित यश लपंडाव खेळेल. पोटदुखी वा डोकेदुखी सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील अशांत वातावरणात मनाला मुरड घालावी लागेल. एकंदर अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधत मार्गक्रमणा करायची तयारी ठेवा.
##########
५ सिंह:
वनराज सिंहाची ही रास, सर्वांवर अधिकार गाजवते कुणाकडे हार जाणे तुम्हाला आवडत नाही. आपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतो. एक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य असते. मात्र तुम्ही दीर्घोद्योगी निश्चय व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकता. नवपंचम योगातील मेष व धनु राशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरतात, तर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाही, पूर्ण बघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनते. जीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य व भरभराट अनुभवास येते.
सिंह मंडळी मागील वर्षीच्या 8 क्रमांकावरून किंचित पुढे वर घसरून 6 व क्रमांक व अनुकूल गुण 971 झाल्यामुळे साहजिकच हे वर्ष थोडीशी मनाला उभारी देऊन जाईल.
मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा पाहील. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल. योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे विस्कळीत घडी काही अंशी सावरू शकेल. अडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देतील. जवळजवळ संपूर्ण कालखंड विशेष चढ-उतार न होता प्रगतीपथावर नेणारा असेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित आवडते काम मिळू शकेल. व्यवसायामध्ये शुभवार्ता आहे. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ घालू शकाल आणि आपल्या कुटुंबीयांना उर्जितावस्थेत नेऊ शकाल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासाचा ताण आला तरी शेवटी त्यात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळींना अधिक प्रयत्न करावे लागतील नीट चौकशी करून निर्णय घेतला तर चांगले. प्रवास वेळेवर होतील आणि त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक व्यवहारात मात्र थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही तुम्हाला प्रोत्साहन राहील. एकंदर तथ्यांश हा की, उत्साहाचा अतिरेक करू नका प्रकृती सांभाळून नवीन योजना आखा.
थोडक्यात समतोल राखत संयम ठेवावा असे तुमचे नशीब आहे.
#########
६. कन्या:
अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसे संशयी व आतल्या गाठीची असतात अकाउंट्स ऑडिट वकिली पेशात उत्तम यश मिळवतात ही बुद्धाची रास असून बुद्ध येथे उच्चीचा होतो मात्र शुक्र येथे नीतीचा होतो शैक्षणिक यश वाद-विवादात तुम्ही छाप पाडतात मात्र तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असतात त्यामुळे कपाळावर कायमच्या असे हे माणसांचे स्वरूप असते निर्भेळ सुख मिळवणे तुम्हाला कठीण होते विवाह हे दृष्टीने मृत्यू षडाष्टक आतील मेष रास टाळावी तर बुद्ध व मकर हे नवपंचम रात्रीतले जोडीदार तुमच्या बरोबर संसार आनंदाचा करू शकतात उत्तरा नक्षत्रातील पूर्ण हस्त व चित्रा नक्षत्राचे दोन चरण यांनी कन्या रास बनते.
कन्या राशीसाठी यावर्षी परिस्थिती थोडी आलबेल अशी राहील व मागच्या वर्षीचा पाचव्या क्रमांकावरून आता 4 क्रमांक व 1086 अनुकूल गुण आहेत, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा, समाधान त्यामुळे वाढ होईल.
मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही.
काय करू आणि काय नको असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र एकंदर कालखंड प्रगतीपथावरच ठेवणारा असेल. अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देऊन तुम्ही नोकरी व्यवसायात आपली प्रगती कराल. यावर्षी नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायात चांगली भरभराट होऊ शकते. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग आहेत. मात्र कुठलाही अतिरेक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळणार आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते आघाडीवर राहतील. महिलांना आणि कुटुंबामध्ये नवीन पाहुणे येणे, त्यांचा पाहुणचार करणे आणि एकंदरच खेळीमेळीचे वातावरण राहणे, मंगल कार्य होण्याची शक्यता अशी शुभ फळे आहेत. थोडक्यात, संयम ठेवला तर आनंद सौख्य मिळणार आगे बढो !
########
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)