बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५
" जाता जाता सहज सुचलं, म्हणून भाग 2!":
1
"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे":
(नोईडामधील twin tower उध्वस्त, ह्या घटनेमुळे,
माझ्या ब्लॉगवरील ९ जुलै २०१८ रोजीच्या ह्या लेखाची आज आठवण येत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या व आर्थिक विकासाच्या गरजा एका बाजूला आणि दुसर्या बाजूला नागरी सेवा सुविधा, पर्यावरणावरचा ताण ह्यांचा गांभीर्याने विचार करून सुवर्णमध्य काढला पाहिजे, त्यासाठी आता तरी जागे व्हा !)
सध्या टोलेजंग इमारती बांधण्याच्या हव्यासामुळे जमीन खचून शेजारच्या कुटुंबांवर कष्टाने घेतलेली घरे सोडण्याची वेळ येत आहे. तसेच अचानक लागणार्या आगींमुळे वित्तहानी व जीवितहानी असे धोके निर्माण होत आहेत. नागरी सेवा सुविधा व वहातूकव्यवस्थेचे बोजवारे उडत आहेत. मुंबई सारख्या बेटावर अशा संभाव्य धोक्याचा विचार न करता, नियोजनशून्य धोरणांपायी ह्या चांगल्या शहराची दुरावस्था होताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. म्हणूनच......
"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे", हे आग्रहाने मांडणारा माझ्या ब्लॉगवरील हा लेख आहेे.
मुंबई शहरातील नागरी सेवा सुविधांचा किती बट्टयाबोळ झाला आहे त्याचे दर्शन वर्तमानपत्रातील तक्रारींच्या पाढ्यांवरून ध्यानांत येईल. काही उदाहरणे:
➡पाण्याची पाईपलाईन फुटलेली व अतोनात पाणी वाया चाललेले
➡रस्तोरस्तीचे खड्डे,
➡रस्तेदुरूस्थीचा ठेकेदार गायब आणि खडी, रेतीचा ढीग रस्त्यावर पडलेला
➡रेल्वेस्टेशनखाली अंधार
➡टोल फ्री क्रमांक बिनकामाचा
➡रस्त्याचा दुभाजक वाईट अवस्थेत, अपघाताचा धोका
➡कचरापेटी नादुरुस्त, कचर्याचे ढीग तसेच पडलेले
➡केबलवायरचे मोठे जाळे रस्त्यावर पडलेले, अपघाताचा धोका
➡गटार तुंबलेले किंवा गटाराचे झाकण गायब ➡स्टेशनात छप्पर नाही, किंवा स्टेशनांत अस्वच्छता, शौचालये वाईट स्थितीत ➡बसस्टापवर छप्पर नाही किंवा गर्दुचल्यांचा मुक्काम
➡मुलांना खेळायला मोकळ्या जागा नाहीत
➡बागांमध्ये स्वच्छता नाही, झोपाळे आदि मोडकळीस आलेले
➡लोकलगाड्या म्हणजे दररोजचे यमदूत ➡रस्तोरस्ती गल्लीबोळांमध्ये दोनही बाजूंना वहानांचे पार्कींग आणि त्यामुळे ट्रँफिक जँम, वेळेचा इंधनाचा अपव्यय
➡शहरामध्ये स्वच्छताग्रुहांची कमतरता, आहेत ती नीट देखभाली अभावी गलीच्छ. इ.इ. इ.इ. ………
हया तर्हेच्या तक्रारी मारूतीच्या शेपटाएवढ्या लांबच लांब असूनही कोणतीही लक्षणीय सुधारणा नाही आणि एके काळी शांत सुंदर असलेली ही मुंबापुरी आज झोपडपट्यांनी वेढलेली, अजस्त्र लोकसंख्येच्या आणि जीवघेण्या प्रदुषणापायी गुदमरत चाललेली एक बकाल नगरी झालेली सगळे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. अशी दारुण अवस्था शहराची असताना गगनचुंबी उंचच उंच मनोरे झोपडपट्टी निर्मुलन अथवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास अशा गोंडस नावाखाली, तिचे लौकरांत लौकर, नरकपुरींत रूपांतर केले जात आहे. म्हणूनच आज सुंदर मुंबई, हरित मुंबई ही घोषणा इतिहासजमा जमा झालेली आहे. म्हणूनच आता घोषणा हवी:
नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!
मुंबईत उंच मनोर्यांच्या इमारती बांधत रहाण्याच्या हव्यासामुळे, आधीच नागरी सुविधांचा बट्टयाबोळ आणि बजबजपुरी झालेल्या शहराची काय भयानक अवस्था होईल ह्याचा कोणी विचारच करत नाहीये. ह्या गदारोळांत मूळचे भूमीपुत्र विस्थापीत होऊन पहाता पहाता त्यांचा मागमूस रहाणार नाही, ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुनर्विकासाचे गाजर दाखवून अर्धवट अवस्थेतील इमारतींमधील मूळचे कितीतरी नागरिक ना घर, ना घरभाडे अशा दारुण स्थितीत जवळ जवळ देशोधडीला लागून पस्तावत आहेत.
त्यांच्या दु:खाला, वेदनांना तुलना नाही. 70 ते 100 वर्षांहून जुन्या चाळी, इमारतींबद्दल पुनर्विकासाची आवश्यकता समजता येऊ शकतो. परंतु सार्याच नागरी सेवा सुविधांची दारुण विदारक अवस्था, आताच कडेलोट झालेली मुंबईची लोकसंख्या आणि प्रदुषणाचा पडलेला विळखा ह्यांचा विचार करता कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त सात (ते बारा ) मजल्यापर्यंतच नव्या इमारती बांधल्या जाणे योग्य ठरेल.
70/80 वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या चाळींच्या पुनर्विकासाचे एक वेळ समजू शकतो. परंतु आता ही लाट केवळ ३०/४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचेही पुनर्विकासाचे लोण आले आहे. ह्याचा अर्थ ह्या इमारती योग्य ती काळजी व सामूग्री वापरुन बनविल्या गेल्या नव्हत्या. अशा कमकुवत कामाकडे संबधीतांनी, यंत्रणांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. आता उत्तुंग मनोरे न बांधता अशा इमारतींचे मजबूतीकरणच करणे हाच उपाय शहाणपणाचा आहे.
पण त्याकडे दुर्लक्ष केले जावून मुंबईची धुळधाण लावण्याचा उद्योग चालूच राहील, हे भावी पिढ्ढ्यांचे दुर्दैवच ठरणार आहे. 30 ते 40 टक्के झोपडपट्टयांनी वेढलेल्या मुंबई शहराची अशी लाज वाटावी अशी भयानक अवस्था कोणी केली? कां, कशी झाली आणि त्या करता जे जबाबदार असतील त्यांच्या अशा अक्षम्य अपराधांबद्दल काहीही न करता, झोपडपट्टी निर्मुलन योजना असे गोंडस नांव देऊन आंधळेपणाने उंच मनोर्यांमागून मनोरे बांधणे हे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणेच नव्हे, तर शहराला खड्यांत गाडणे नव्हे कां? झोपडपट्ट्यांना वर्षांमागुन वर्षे अधिक्रुत करत रहाणे हा सत्तेचा दुरुपयोगच नव्हे कां?
एक विनवणी निश्चित, जरा फक्त स्वत:कडेच न पहाता, भावी पिढ्यांसाठी आपण खेळण्यातल्या सारखी कुरकुर करणार्या खुळखुळ्यासारख्या शहराचा वारसा क्रुपया सोडून जावू नका.
बाबांनो,
‘नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!!
सुधाकर नातू
--------------
2
पर्यावरण ऱ्हासासाठी प्रयत्न करणाऱ्या चिपळूण येथील श्री प्रमोद जोशी यांचे विचार सोशल मीडियावर नजरेत आले ते असे
पर्यावरण रक्षणासाठी माझ्याकडून केल्या जाणाऱ्या काही कृती
पर्यावरण रक्षण करणे, प्रदुषण कमी करणे, उर्जा वाचविणे यासाठी आपण काही करु शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारला तर त्याचे उत्तर हो असे आहे. आपण छोट्या मोठ्या कृतींतुन ही गोष्ट करु शकतो. पर्यावरण रक्षणासाठी माझ्याकडून केल्या जाणाऱ्या काही छोट्या कृतींचा उल्लेख येथे करत आहे. यातून मला मानसिक समाधान मिळते. वृक्ष लागवडीच्या कृतींमध्ये सहभाग, यामध्ये रोपे पुरविणे आणि प्रत्यक्ष वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतो.
जुन्या वापरता येणार्या वस्तू दुरूस्त करून वापरण्याकडे कल आहे. घरातील गळणारे पाण्याचे नळ वेळच्यावेळी रिपेअर करतो. घरी येणाऱ्या लोकांना तांब्याभांड्यातून पाणी प्यायला देतो. (वैयक्तिक मत) यातुन लागेल तेवढ्याच पाण्याचा वापर होतो उरलेले वाया जात नाही. दसर्याच्या दिवशी आपट्याच्या झाडांची पाने सोने म्हणून देत नाही. शुभेच्छा तोंडी देतो. गरज नसेल त्या खोलीतला लाईट आठवणीने बंद करतो. मी स्वतः अनेक वर्षे फटाके वाजविणे बंद केले. फटाक्यांपासुन होणार्या हवेचे, आवाजाचे प्रदुषण, होणारे धोके ( आग लागणे वगैरे) याविषयीची जमेल तेवढी जन-जाग्रुती करत असतो. घरी तसेच कंपनीमध्ये पाठकोऱ्या कागदांचा वापर करतो. कागद तयार करायला झाडांची कत्तल केली जाते ही भावना. बाजारात जाताना कापडी पिशवी जवळ बाळगतो. त्यामुळे भाजीवाल्याकडुन वगैरे प्लास्टिकची पिशवी घेणे नाकारतो. आता काही वस्तू आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीतून मिळतात उदाहरणार्थ किराणा च्या लागणाऱ्या वस्तू वगैरे.अशा पिशव्या नुसत्या पाण्याने स्वच्छ होतात त्यांचा मी पुनर्वापर करतो. बाजारातून आपण ज्या वस्तू विकत आणतो त्यामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या बऱ्याचशा लहान मोठ्या वस्तू येत असतात त्या प्लास्टिकच्या वस्तू रिसायकल करणे गरजेचे आहे म्हणजेच त्याचा पुनर्वापर जर केला गेला तर शहरातल्या कचऱ्याच्या नियोजनावर येणारा जो ताण असेल तो कमी होईल. त्यासाठी बारीक सारीक वस्तू म्हणजेच औषधांच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, त्यांची बूचं, भांडी घासण्यासाठी आपण काथ्या वापरतो त्याच्या बाहेरील पुठ्ठा किंवा प्लास्टिक, प्लास्टिकचे खराब झालेले डबे, त्याची झाकणे,चमचे use and throw pens, प्लास्टिकच्या बॉटल्स, ग्लास अशा कितीतरी वस्तू आपण कचऱ्यामध्ये फेकून देत असतो तसं न करता एका पिशवीमध्ये त्या साठवून ठेवून जर आपण भंगारवाल्याला परत केल्या तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला एक मोठी पिशवी घेऊन ती गॅलरीत वगैरे ठेवून द्यायची. आठ दहा दिवसांनी ज्या काही वस्तू साठतील त्या प्लास्टिकच्या वस्तू पुनर्वापराकरता देऊ शकतो. मी असे करतो. जुने सेल ( wall clock, रिमोट, गॅस गीझर इत्यादींचे) ,काही metal scrap, कपड्यांचे, चपलांचे तसेच इतर काही वस्तूंचे रीकामे बॉक्स,वेगवेगळ्या प्रकारची पत्रके, दुकानदारांकडुन मिळणारी बीले वगैरे एका पिशवीत साठवून ती recycling साठी देतो. भंगार गोळा करणारी माणसे एकप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी मदतच करतात या भावनेने मी अनेकदा या साठविलेल्या वस्तू recycling साठी मोफतच देतो. हल्ली बर्याच शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू (पाण्याच्या बॉटल्स वगैरे टाकण्यासाठी) पिंजरे उभारलेले असतात त्याचा वापर आपण करू शकतो. आपणही अनेकजण पर्यावरणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काही कृती करत असाल तर एकमेकांना share करा त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. आपली प्रत्येक कृती पर्यावरणीय राहील, संसाधनांचा अपव्यय होणार नाही असे वागण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपली वसुंधरा प्रदूषित होणार नाही याची काळजी घेउया.
संसाधनांची बचत आणि पर्यावरणाची जाण
मनापासून घेऊया वसुंधरा रक्षणाची आण
Nature is a beautiful creation
Save it everyone by devotion
प्रमोद य. जोशी चिपळूण ☘️☘️🌹🌷🍁🍁
--------☆--
3
👍"बोल, अमोल-272 !":👌
💐💐 "प्रत्येकाच्या जीवनात अनेक माणसं येत असतात, त्यांच्याबरोबरच्या संपर्कामुळे व सहवासामुळे आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल स्वभावाबद्दल आपल्या पुरते बरे वाईट समज करून घेत असतो. पण एखादा माणूस खरोखर अंतर्बाह्य कसा आहे, ते समजण्यासाठी माणसं वाचता यायला हवीत.
माणसं वाचणं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, आकलन आणि तर्कशुद्ध विश्लेषणक्षमता असावी लागते.
केवळ प्रतिभावान लेखकांनाच हे सारे जमते असं मला वाटतं. याकरताच व्यक्तिचित्रात्मक ललित लेखसंग्रह जितके वाचाल, तेवढी माणसांची अनेकानेक इंद्रधनुषी रूपं तुमच्यासमोर साकार होतील. 'गणगोत' हे 'पुलं'च पुस्तक वा डॉ अंजली कीर्तने यांचं 'आठवणीचा पायरव' जर वाचलंत, तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल.
आपल्याला देखील अशी माणसं वाचायची किमया साधता यावी. त्यामुळे अगम्य अशा जीवनातील आपल्या जाणिवांचा भवताल अधिकाधिक
प्रकाशमान होईल !":💐💐
----------
5
"सजग संमजसपणाची त्रिसूत्री":
"विचारी व्यक्त व्हा मुक्त व्हा !":
या मुक्त संवादात आपले मनःपूर्वक स्वागत मला सर्वसाधारणपणे अमृत काळात म्हणजे पहाटे तीन ते साडेतीनच्या आसपास अचानक कधीकधी जाग येते आणि कुठून करते कुणास ठाऊक माझ्या मनात कल्पना विचार व्यक्त होत असतात पुष्कळदा त्या नंतर झोपते ना विसरण्याचे कारण थांबतोय अमृता काळी पहाटे विचार सुचला जे बोल अमोल या माझ्या नेहमीच्या उपक्रमात यथातच्य वाटतील असे होते ते म्हणजे
सजग संमजसपणाची त्रिसूत्री
विचारी व्यक्त व्हा मुक्त व्हा
मी सोशल मीडियावर प्रकाशित केल्यावर नंतर मला हा संवाद साधताना असे सुचले की ज्यांना आपण ग्रुपला हे पाठवले आहे त्यांना जणू एखाद्या मराठीच्या परीक्षेमध्ये कल्पनाविस्तार करा असा प्रश्न येतो त्याप्रमाणे मुक्त व्हा याचा कल्पनाविस्तार करा अशी देखील मी संदेशांची मालिका त्या त्या ग्रुप वर टाकली आणि मला सुचले की आता हे आव्हान मी पण स्वीकारले पाहिजे पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे विचारी व्हा सर्वसाधारणपणे आपल्या जीवनात वाचनांमधून बघण्यामधून ज्ञानेंद्रियांच्या विविध प्रक्रिया मधून आपल्यासमोर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळे प्रसंग अनुभव दातेसंबंध व्यावसायिक संबंध असे विविध प्रकारचे असे जाणीवांचे परिप्रेक्ष विस्तारित होत असते सर्वसाधारणपणे आपोआपच काही माणसांच्या मनात त्याच्या बऱ्या वाईट कल्पना विचार निर्माण होऊ शकतात तर पहिला मुद्दा जो आहे पहिले सूत्र ते म्हणजे तुम्ही अशा तऱ्हेच्या या साऱ्या जीवनात अनुभवावर हार करा धीरक्षर विवेकाने विचार करा काय बरोबर काय चूक कोणतं योग्य कोणता अयोग्य कोणतं केव्हा योग्य इत्यादी इत्यादी बऱ्याच वेळेला तुमच्या मनाविरुद्ध देखील ते घडू शकत असेल त्या तऱ्हेचे तुम्हाला मनात विचार येत असतील अशा तऱ्हेच नातेसंबंध किंवा व्यावसायिक संबंधात होऊ शकतो अशा वेळेला जर तुम्ही व्यक्त नाही झाला जे जे वाटतं ते सुसूत्रपणे ताबडतो त्या त्या व्यक्तीला तुम्ही व्यक्त केलं तर तुमच्या मनात त्याच्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक असा परिणाम होणार नाही जर सकारात्मक अशा सूचना असल्या तर देखील त्यासमोरच्या व्यक्तीचा किंवा जे काही पुढे त्यामधून घडणारे त्याचं प्रगतीकरणच होईल त्यामुळे तुम्ही आपल्या मनात न ठेवता जर कोणाचे बोलणं नकोच वाटत असेल, तर हे असं मुक्तपणे संवाद स्वतःची साधत व्यक्त व्हा म्हणजे तुम्हाला कुठल्याही तऱ्हेनं त्रास होणार नाही !"
मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५
" पुढचं पाऊल एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 से संक्षिप्त राशिभविष्य, !'
💐"पुढचं पाऊल 1 !":💐
लेखक: श्री सुधाकर नातू
💐"मी श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सर्वप्रथम एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 या कालखंडाचे एकमेवद्वितीय असे 'तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार' होऊ शकतात, ते दर्शविणारे अनुकूल गुणांनुसार प्रयत्न आणि अपेक्षा यांच्या समतोलाने आपणच आपल्या जीवनाची दिशा समाधानकारक कशी करू शकता, ते दर्शविणारे संक्षिप्त वार्षिक राशिभविष्य सादर करत आहे....💐
प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव
पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
अनुकूल गुण पद्धती:
कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.
माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय.
ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
नशिबाच्या परिक्षेचा निकाल:
प्रथम या परीक्षेमध्ये पाच गटांमध्ये राशींची परिस्थिती काय आहे नशिबाची ते दर्शवले आहे. नंतर दिलेले दोन्ही तक्ते माहवार राशीनिहाय गुणांची चिकित्सक अशी स्थिती दर्शवली आहे ती नीट समजून घ्या.
पहिल्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शेवटच्या स्तंभामध्ये यावर्षीचे गुण नंतर मागच्या वर्षीचे गुण कमी का जास्त आणि मागच्या वर्षीचा क्रमांक दाखवला आहे तर दुसऱ्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीची पाच गटातील प्रत्येक महिन्याला गटवारी दाखवली आहे आणि शेवटच्या तीन तक्त्यांमध्ये यावर्षीचा क्रमांक मागच्या वर्षीचा क्रमांक आणि किती फरक झाला ते दाखवले आहे.
३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी 2025 चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत. ते अनुकूल गुण, त्या त्या महिन्याला किती गुण आहेत हे प्रत्येक राशीसाठी दाखवलेले आहेत. तसेेच प्रत्येक महिन्यात आपले नशिब कोणत्या गटात आहे, हे समजू शकेल आणि त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे.
अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत:
रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ
"नशिबाची गटवारी":
आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: तुुळ मकर व वृषभ
राशी.
२.उजवा दुसरा गट: कन्या कुंभ व ळसिंह राशी
राशी.
३.मध्यम तिसरा गट: मिथून धनु व
वृश्चिक राशी.
४.डावा चौथा गट: मीन व कर्क
५.त्रासदायक पाचवा गट: मेष राशी.
शनीची साडेसाती:
साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या कुंभ राशींत शनी आहे, म्हणून आता मकर, कुंभ व मीन राशींना साडेसाती आहे. शनी मीन राशीत जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा मकर राशीची साडेसाती संपेल, तर मेष राशीची सुरू होईल.
# 14 मे रोजी गुरू मिथुनेत, 18 ऑक्टोबर कर्क आणि 5 डिसेंबर वक्री परत मिथुन येतो.
# 29 मार्च रोजी शनी कुंभेतून मीन राशीत जाईल आणि त्यामुळे मकर राशीची साडेसाती 29 मार्च 2025 ला संपेल. पण मेष राशीची साडेसाती सुरू होते.
तर कुंभ राशीची साडेसाती 23 फेब्रुवारी 2018 आणि मीन राशीची साडेसाती सात एप्रिल 2030 ला संपेल.
"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
१मेष रास 7 क्र. वरून चक्क तळाच्या 12 क्रमांकावर आली आहे. तुमचे एकूण गुण 1078 वरून 668 झाले आहेत साहजिकच 410 इतक्या गुणांचा जबरदस्त फटका तुम्हाला बसला आहे. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा खुुप खुप कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न मात्र प्रचंड वाढवायला लागतील तरच थोडीफार गाडी सुधारेल.
२.व्रुषभ राशी गेल्या वर्षी 1 ल्या सर्वोत्तम शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली होती. 1343 सर्वोच्च गुणसंख्येेवरून थोडी उडी घेऊन यंदा 1427 गुण मिळणार आहेत. तरीही यावर्षी तिसरा क्रमांक आहे. प्रगतीची गाडी तशीच अपेक्षेप्रमाणे चालत प्रयत्नांना यश येणार आहे.
३.मिथून राशीच्या नशिबी मागील वर्षी 9 व्या स्थानी जाण्याची वेळ आली होती आणि 845 गुण मिळाले होते. तेव्हा स्थिती कठीण होती मात्र यंदा 874 गुण मिळून 8 क्रमांकावर समतोल साधणाऱ्या अवस्थेचा लाभ होणार आहे. कुछ खट्टा कुछ मीठा असे यावर्षीचे थोडक्यात फळ आहे.
४. कर्क राशीचे नशीब फारसे बदलणार नाही कारण मागच्या वर्षी 8 क्र.वरून घसरगुंडी होऊन अकरावा क्रमांक मिळाला आहे. गुण थोडेसे कमी होऊन 835 मिळाले आहेत. सहाजिकच तुमच्या परिस्थिती मध्ये मागच्या वर्षी पेक्षा अधिक परीक्षा पाहणारी असणार आहे.
५ सिंह मंडळी मागील वर्षीच्या 8 क्रमांकावरून किंचित पुढे वर घसरून 6 व क्रमांक व अनुकूल गुण 971 झाल्यामुळे साहजिकच हे वर्ष थोडीशी मनाला उभारी देऊन जाईल.
६ कन्या राशीने मागील वर्षी 5 व्या स्थानी अनुकूल गुण 1108 मिळवले होते. मात्र यावर्षी परिस्थिती थोडी आलबेल अशी राहील व 4 क्रमांक व 1086 अनुकूल गुण आहेत, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा, समाधान त्यामुळे वाढ होईल.
७ तुळा राशीने गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानी 1279 अनुकूल गुण मिळवले होते.
आता त्यात चांगली उत्साहवर्धक वाढ होऊन 1455 गुणांसाठी सर्व बारा राशींमध्ये सर्वोत्तम असा पहिला क्रमांक मिळवणार आहे. जणू हात लावेल तिथे सोनं अशा तऱ्हेचे घवघवीत यश तुम्हाला मिळू शकेल व नवनव्या संधी प्राप्त होतील.
८ व्रुश्चिक राशीला मागील वर्षी 11 व्या स्थानी 770 गुण तुम्हाला मिळाले होते.
या आगामी वर्षी किंचित सुधारणा होऊन तुमचा 9 वा क्रमांक व 857 अनुकूल गुण मिळतील. चढ उतार करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचे असून, अधून मधून अपेक्षाभंगाचे चटके व विरोधकांच्या कारवाया वाढतील.
९ धनु राशीची 4 स्थानी मिळालेल्या
1265 वरील मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. काय कारण यंदा सातव्या क्रमांकावर घसरण होऊन 903 गुण मिळणार आहेत. अपेक्षा मर्यादित ठेवून प्रयत्न अधिकाधिक वाढवावे लागतील आणि जे पदरी पडेल ते स्वीकारावे लागेल.
१० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने मागील वर्षी 3 रे स्थानी 1235 गुण मिळवून पहिल्या गटात वर्ष चांगले गेले होते. सुदैवाने आताही नशिबाला तुमच्यावर कृपा करावयाची आहे त्यामुळे आगामी वर्षी दुसरा क्रमांक पटकावून 1247 गुण मिळवणारा आहात. अडचणी नसलेले आणि नवनवीन संधी प्राप्त करून देणारे नशिबाचे निरभ्र असे आकाश तुमच्या वाट्याला आले आहे. या संधीचा फायदा घ्या व आपला प्रगती विकासाचा वारू असाच दौडत रहा.
११ कुंभ राशी मागील वर्षी 6 व्या स्थानी नशीब आजमावत तारेवरची कसरत करत तोल सांभाळत होती. यंदा 1054 गुण मिळून 5 व्या क्रमांकावर उजव्या दुसऱ्या गटात आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग करत, अडचणी संकटांवर मात करत समाधानाचा मार्ग शोधत उत्साहाने कामाला लागून अपेक्षापूर्ती साधाल.
१२ मीन राशीच्या वाट्याला मागील वर्षी 718 गुण मिळून तळ गाठला होता व कष्टकारक दिवस अनुभवले होते. आता किंचित गुण वाढत 869 गुणांवर नवव्या क्रमांकावर तुम्ही स्थानापन्न होणार आहात. अर्थातच होते तशाच परीक्षा पाहणाऱ्या अपेक्षाभंग करणाऱ्या प्रसंगांना तोंड देत राहायचे आहे.
II शुभम् भवतु II
धन्यवाद
लेखक: श्री सुधाकर नातू
रविवार, १७ ऑगस्ट, २०२५
" सोशल मीडियावरील मुशाफिरी
मोबाईलवर सोशल मीडिया सर्विंग करताना गवसलेले काही मौलिक
विचार व माहिती
1
"Humans of Marathwada!":
बी. रघुनाथ: निजामशाहीच्या सावलीत लिहिलेला मराठी मनाचा अस्वस्थ श्वास
मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील सातोना या गावात २५ ऑगस्ट १९१३ रोजी जन्मलेला एक तरुण—घरची परवड नाही, जबाबदाऱ्या प्रचंड; पण मनात शब्दांची कळा आणि आजूबाजूच्या जगाचा जिवंत वेध—हीच ओळख पुढे “बी. रघुनाथ” म्हणून मराठी वाङ्मयात अढळ झाली. हैदराबादला मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले, पुढे परिस्थितीमुळे नोकरी—१९३२ पासून परभणीच्या बांधकाम खात्यात कारकून; दैनंदिन कारकुनीच्या चौकटीत अडकलेला हा कवी कागदावर मात्र संपूर्ण समाजशास्त्र रेखाटत राहिला.
त्या काळाची राजवट—निजामशाही; सरंजामी सत्तेची कडवट पकड, धार्मिक-सामाजिक तणाव, आणि सामान्य माणसाची घुसमट—रघुनाथांनी हाच अनुभव कवितेत, कथेत, कादंबरीत साठवला. फुलारी या टोपणनावाने ‘राजहंस’मध्ये पहिली कविता प्रसिद्ध झाली; नंतर “बी. रघुनाथ” या नावाने ते मराठीच्या आधुनिक प्रवाहात वेगळी वाट काढू लागले. “व्यक्ती सभोवतालाची उपज असते”—ही जाणीव त्यांच्या लेखनाचा कणा आहे; पात्रांमधून मराठवाड्याचं सामाजिक-राजकीय वास्तव त्यांच्या पानोपानी उभं राहतं.
काव्य, कथा, कादंबरी—तिन्ही आघाड्यांवर समृद्ध वारसा: काव्यसंग्रह “आलाप आणि विलाप”(1941) आणि “पुन्हा नभाच्या लाल कडा”(1955, मरणोत्तर). कथासंग्रह “साकी”(1940), “फकिराची कांबळी”(1948), “छागल”(1951), “आकाश”(1955, मरणोत्तर), “काळीराधा”(1956, मरणोत्तर). कादंबऱ्या “ओ॓”(1936), “हिरवे गुलाब”(1943), “बाबू दडके”(1944), “उत्पात”(1945), “म्हणे लढाई संपली”(1946), “जगाला कळले पाहिजे”(1949), “आडगावचे चौधरी”(1954, मरणोत्तर)—प्रकारांची ही वाटचाल त्यांच्या लेखणीची बहुढंगी ताकद दाखवते. ललित-निबंध “अलकेचा प्रवासी”(1945) त्यांचा संवेदनशील, आत्ममग्न आवाज जपतो.
कार्यालयीन टेबलापाशी बसूनही मन अखंड हालचालीत—सामाजिक विषमता, आर्थिक अडथळे, आणि माणसांच्या आशा-आकांक्षांचा धगधगता कोलाज त्यांनी शब्दात बंदिस्त केला. ७ सप्टेंबर १९५३ रोजी कार्यालयातच हृदयक्रिया बंद पडून अनुपम प्रतिभेचा हा आवाज अकस्मात थांबला; पण १९३०–१९५३ या २३ वर्षांत १५ पुस्तकांचा साठा मराठी वाङ्मयाला अपूर्व अशी देणगी देऊन गेला. मराठी विश्वकोशाची नोंद सांगते—निजामी राजवटीतील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय घडामोडींचा कलात्मक शोध इतक्या सुसंगतपणे घेणारा लेखक विरळच, आणि म्हणूनच बी. रघुनाथांची अस्वस्थ अभिव्यक्ती आपल्या साहित्यातील अद्वितीय ठेवा ठरते.
#BRaghunath #बी_रघुनाथ
#HumansOfMaharashtra #MarathiSahitya #HyderabadState #Marathwada #Kavya #Katha #Kadanbari #NizamEra #BirthAnniversary
------------
2
"A Boon in Disguise!":
"To my mind, the retirement time is a Boon in Disguise. You have an option of, doing what you like, what you can do the best and what you love to do, as and when you wish to do. For that, you must have clarity of your own strengths and weaknesses, as also your likes or dislikes.
Its the best period for one, to look within, talk to self. You can and you should attempt to create your own Identity, whichever you wish to. The philosophy should be, the money is not all but the relationships are.
The strategy should be, to utilise available time for definite productive purpose. All you need to remember is, you are now a free bird and the sky is wide open !":
------------------------
3
"मधाचा अलौकिक मधुरिमा !":
📒 तुम्हाला माहित आहे का की मधाचा एक चमचा एखाद्या व्यक्तीला २४ तास जिवंत ठेवण्यासाठी पुरेसा असतो?
📒 तुम्हाला माहित आहे का की जगातील पहिल्या नाण्यांपैकी एकावर मधमाशीचे चिन्ह होते?
📒 तुम्हाला माहित आहे का की मधात जिवंत एंजाइम असतात?
📒 तुम्हाला माहित आहे का की मध धातूच्या चमच्याच्या संपर्कात आल्यावर हे एंजाइम मरतात?
▪️ मध खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लाकडी चमचा; जर तुम्हाला तो सापडत नसेल तर प्लास्टिकचा चमचा वापरा.
📒 तुम्हाला माहित आहे का की मधात एक पदार्थ असतो जो मेंदूला चांगले कार्य करण्यास मदत करतो?
📒 तुम्हाला माहित आहे का की मध हा पृथ्वीवरील अशा काही पदार्थांपैकी एक आहे जो स्वतःहून मानवी जीवन टिकवू शकतो?
📒 तुम्हाला माहित आहे का की मधमाश्यांनी आफ्रिकेतील लोकांना उपासमारीपासून वाचवले?
📒 तुम्हाला माहित आहे का की मधमाश्यांद्वारे उत्पादित होणारे प्रोपोलिस हे सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविकांपैकी एक आहे?
📒 तुम्हाला माहित आहे का की मधाची कालबाह्यता तारीख नसते?
📒 तुम्हाला माहित आहे का की जगातील महान सम्राटांचे मृतदेह सोनेरी शवपेट्यांमध्ये पुरले जात होते आणि नंतर कुजण्यापासून रोखण्यासाठी मधाने झाकले जात होते?
📒 तुम्हाला माहित आहे का की "हनिमून" हा शब्द लग्नानंतर प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी नवविवाहित जोडप्याच्या मध सेवन करण्याच्या परंपरेतून आला आहे?
📒 तुम्हाला माहित आहे का की मधमाशी ४० दिवसांपेक्षा कमी काळ जगते, किमान १००० फुलांना भेट देते आणि एक चमचेपेक्षा कमी मध तयार करते, परंतु मधमाशीसाठी, ते संपूर्ण आयुष्यभराचे काम आहे?
धन्यवाद, मौल्यवान °मधमाशी°..! 🐝
------------
4
https://www.facebook.com/share/19QGxCLdpF/
// अफलातून अलौकिक अविस्मरणीय अशी ही संघर्षाची कहाणी एकमेव द्वितीय//
मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५
" वाचता वाचता वेचलेले भावलेले!"
👍"वाचता वाचता, वेेचलेले !":👍
🤣 "हम कभी भी नही सुधरेंगे !":🤣
👍" लंडनचे सौंदर्य केवळ भव्य इमारतीमुळे किंवा फेमस नदीच्या दोन्ही काठावरील रमणीय लँडस्केपिंगमुळे नाही तर शिस्त, नियोजन, सार्वजनिक सहभाग आणि जबाबदार वर्तन यातून साकारलेले आहे. ब्रिटिशांनी जे सुंदर शहर वसवले ते तितक्याच चिकाटीने टिकवले. भारतात लंडन सारखे शहर उभे करणे अशक्य नाही. पण त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती, लोकशिक्षण, नागरी जबाबदारी, प्रदूषणमुक्ती नियोजनबद्ध वाहतूक, बॅनरमुक्त सार्वजनिक स्थळे आणि नागरिकांचा सकारात्मक सहभाग अशी पावले तातडीने उचलायला हवीत. त्याचप्रमाणे राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक दबाव या दोन बाबी कायमस्वरूपी बंद केल्या पाहिजेत. मुंबईचे लंडन होणे हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले आहे, पण ते प्रत्यक्ष आणायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने शिस्त, जबाबदारी, सौजन्य आणि संवेदनशीलतेने योगदान दिले पाहिजे. लंडन केवळ इमारतींचे, अभियांत्रिकी शहर नसून मानसिकतेचे शहर आहे आणि लंडनची मानसिकता आपल्यात रुजवली तर मुंबईचे लंडन हे स्वप्न सत्यात उतरेल !":👍
# महादेव पंडित
2
एकूणच मानवी जीवनात तीर्थक्षेत्रांची भाषा ही सर्वकालिक महत्त्वाची मानली गेली आहे प्रवास आणि अध्यात्मिक विकास यांचा जवळचा संबंध सर्वच धर्मांनी अधोरेखित केला आहे तीर्थक्षेत्राकडे केलेला प्रवास म्हणजेच रूपकार्थाने आदर्श कडे केलेला प्रवास असे आदर्श हेच खचलेल्या पिचलेल्या समाजाला अर्थपूर्ण असे काही प्रदान करतात डोके टेकायला हवे कोणाचे तरी पाय माणसाला लागतातच आणि समाजात पराकोटीची आसामानता असूनही काही काळासाठी तरी एका पातळीवर आणणाऱ्या स्वप्नभूमीच्या दिशेने वाटेने जायला प्रवृत्त करणाऱ्या तीर्थयात्रा उपयुक्तच राहतील आणि दीर्घकाळ टिकतील वारीचेही तसेच आहे जुन्या परंपरेत कालानुरूप परिवर्तन म्हणजे व्हावे यासाठी प्रयत्न करत राहणे हे योग्यच असते पण परिवर्तनाची सुरुवात ही आपले मनापासून व्हावी लागते आणि त्या आपलेपणाची पायरी त्या समाजाचा गुणधर्मसकट स्वीकार ही असते आधी स्वीकार आणि मग परिवर्तनाचे प्रयत्न हीच प्रगतीच्या प्रवासाची दिशा असते पंढरपूरचे वास्तवयी आपल्याला आधी स्वीकारावे लागेल हा माझ्यापुरता मी काढलेला निष्कर्ष होता
# भानु काळे
3
"हा अप्रामाणिकपणा येतो कुठून ?
आपण पूर्वी अप्रमानिक होतो आणि आजही अपरामाने का होत असे म्हणायचे का? गेल्या 50 वर्षात आपण पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध झालो असो पण अधिक अप्रामाणिक होत आहोत का
ह्या पार्श्वभूमीवर जपानची एक गोष्ट आठवते. तिथे सुनामी आली असताना एका सुपर मार्केट मधला वीज प्रवाह अचानक खंडित झाला. सगळीकडे काढून झाला ग्राहकांनी घेतलेल्या मालाची मिले करण्याची यंत्रणाही ठप्प झाली अशावेळी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना आपापला माल घेऊन तसेच बाहेर पडण्याचा मोह झाला नाही त्या सर्वांनी आपापला माल दुकानातच ठेवला एवढेच नव्हे तर ज्या रॅक मधून त्याने घेतला होता त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो परत जागच्या जागी ठेवला त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत? हा अप्रामाणिकपणा कुठून येतो पिढ्यानुपिढ्या दारिद्र्यातून निर्माण झालेली मानसिकता असेल का? यामागे काही भौगोलिक ऐतिहासिक कारणे आहेत का ती आपल्या रक्तातच आहे का याला काही जनुकीय किंवा वार्षिक कारणे असतील का
# भानू काळे
4
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हेही लक्षात घेतले पाहिजे की स्वातंत्र्य हे मुख्यतः व्यक्तिगत असे मूल्य असते तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुख्यतः एक सामाजिक मूल्य आहे ते मानवाच्या समाज म्हणून होत असलेल्या उत्क्रांतीच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यावर विकसित झाले आहे तसे ते तुलनेने नवे ही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ व्यक्तिगत पातळीवर नावे तर एकूण सर्व समाजाच्या पातळीवरील स्वीकृत मूल्य असावे लागते प्रत्येकाचा अंतरनात वेगळा आहे याची जाणीव एकूण समाजात रुजल्याशिवाय आणि सगळ्यांचे अंतरनात सामावून घेण्याइतके समाज मन विशाल झाल्याशिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रस्थापित होत नाही
# भानु काळे
5
"मैत्र जीवाचे, सूत्र आपुलकीचे !":👍
💐 " मैत्री ही मोठी विलक्षण गोष्ट आहे घरांमध्ये जसं वार खेळत राहत एका दिशेने येतं घरात असणाऱ्यांना चुकावत दुसऱ्या दिशेने बाहेर जात अशी खेळती हवा मैत्रीत असते जगाचा अनुभव घ्यावा मैत्रीच्या दरवाजातून मोकळेपणाने वाहू द्यावा पुन्हा बाहेरचं जग पाहू लागावं मैत्री अशी निरंतर वाहती असते त्यात विश्वास असतो कौतुक असतं खरे पणाने केलेली टीका असते रसग्रहण असतं खेळत्या वाहत्या हवेत मुळीच प्रदूषण नसावं अशी मैत्री असते !":💐
# नीला भागवत
6
मी कलाकार म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणूनही जगताना, एका आस्वादकाच्या भूमिकेतूनच जगलो. तुम्हाला जगण्यातल्या निरनिराळ्या पैलू मध्ये रुची हवी, कुतुहूूल हवं. मला जुन्या हिंदी गाण्यांची आवड आहे. मी 60 /70 च्या दशकातील हिंदी गाणी कितीही वेळा ऐकू शकतो. मला क्रिकेटमध्ये त्यातही कसोटी मध्ये- आयपीएलची माझी जरा खुन्नस आहे, अतिशय रुची आहे. मी क्रिकेटवर खेळाडूंवर भरपूर लिहिलंही आहे. मी नवनव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अलीकडेच मी सोशल मीडियावर माझं अकाउंट सुरू केलं आहे. खरं तर मला त्यातलं तांत्रिक फारच काही कळत नाही. मात्र अलीकडच्या काळात जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रभावी साधन आहे या शंका नाही. त्यामुळे मी आता तेही करून पाहतो आहे.
एकूण आयुष्याकडे आस्वादकाच्या दृष्टीतून पाहिलं आणि तसंच रसरशीतपणे जगलं तर एकूण माणसाचं जगणं आनंददायी होऊ शकेल, असं मला वाटतं !":💐अःरऔःङऐःङःङे
# लोकप्रिय हरहुन्नरी अभिनेते श्री दिलीप प्रभावळकर
7
😇 " ही प्रगती की अधोगती ?":😇
🤣 " डॉक्टर विजय ढवळे यांचे 'कॅनडियन भेळ' हे माहितीपूर्ण व मनोज्ञ पुस्तक वाचत होतो. सहज लक्ष गेलं म्हणून समजलं ते पुस्तक 2008 साली प्रसिद्ध झाला होतं खाली किंमत बघितली दहा डॉलर किंवा रुपये 300 !
याचा अर्थ 2008 साली एका डॉलरची किंमत तीस रुपये होती. ताबडतोब आजचा दर बघितला तर एक डॉलर बरोबर 87.48 रुपये असा आढळला ! थोडी स्मरणशक्तीला चालना दिली आणि ध्यानात आले की गणिताच्या विनिमयाच्या उदाहरणात डॉलरची किंमत साडेसात रुपये अशी काही दशकांपूर्वी होती !
त्याचा अर्थ रुपयाचे किती चिंताजनक अवमूल्यन होत राहिले आणि तेवढेच डॉलरचे मूल्य मात्र कायम वाढतेच !!
सातत्याने विकासाचा ढोल वाजवला जात असताना, ही प्रगती म्हणावयाची की अधोगती ?
मी काही अर्थतज्ञ नाही हे ज्याचे त्याने ठरवावे !:😇
"
" माझ्या यूट्यूब वरील मुक्त संवाद चॅनेलवरचे व्हिडिओ
👍"आत्मसंवाद-मागे वळून पाहताना पुढे जाण्यासाठी !":👍
💐 "नवीन वर्ष आलं की आपण संकल्प करतो पण ते संकल्प लवकरच आठ पंधरा दिवसात हवेत विरून जातात. तसंच रोज सकाळी उठल्यावर आज काय करायचं याचाही आपण मनाशी आराखडा तयार करतो पण तोही अचानक काही ना काही कारणामुळे प्रत्यक्षात येत नाही. अशा तऱ्हेने ठरवलेलं हरवणं याचा अनुभव आपल्याला नेहमी येत असतो आणि याचं कारण म्हणजे आपली चालढकल करण्याची वृत्ती आणि आळस , ज्याला इंग्रजी मध्ये Procrastination म्हणतात ती अवस्था. त्याचाच उहापोह या मनमोकळ्या आत्मसंवादात श्री सुधाकर नातू यांनी केलेला आहे.
पहा तर मग हा व्हिडिओ !":💐
पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐https://youtu.be/gknTlIgwpM4?si=2wS8xoXtFlEPvNC0
-----######----,#@#
https://youtu.be/l41ub7P8zBY?si=CXW1KXeOi55DaUiQ
--##--
https://youtu.be/XnyVzCjKaok?si=9ypfoRd7QIOl8LIo
-----##
😄 "An Inspiring Saga of Self Motivation of A Sr Citizen.":😄
😀 "A Day of Turn Around..This Video is prepared by me Single Handedly. See what New Learning can do: Inspiring Achievements of Self Motivation of A Sr Citizen... Don't miss to watch this Video ":😀
For that open this lik......
https://youtu.be/1JYzsb70SXo?si=nGelSCg5jTvzlrO8
#####÷##÷
😀 "मुक्तसंवाद-सांगा आता कसं जगायचं, असं की तसं":😄
😇 " भ्रष्टाचाराच्या वाढत्या कथा, सायबर क्राईमस्, आर्थिक घोटाळे, खंडणी अपहरण खून व बलात्कार आदि अनेक घटना यांनीच हल्ली कोणत्याही माध्यमातून बातम्या आपल्यासमोर येतात. त्यात भर म्हणून अचानक पुण्यामध्ये विचित्र रोग उद्भभवल्याची बातमी ! अशावेळी कोरोना काळातील आठवणी जाग्या झाल्या आणि 'आता जगायचं कसं, असं की तसं ?' हा प्रश्न या व्हिडिओतून समोर आला !":😇
त्यासाठी पुढील लिंक उघडा....
https://youtu.be/GAVQcw2-11c?si=c9rF0BCkWbcdgKnZ
#########
🤣 "नावडती ती होई, आवडती !":😄
काय ते जाणण्यासाठी...
पुढील लिंक उघडा....
https://www.facebook.com/share/v/16xkRcFfaB/
युक्तीची किमया अपेक्षित यश कसे आणू शकते, ते ह्या मार्गदर्शक विडीओत, महाभारतातली उदाहरणे उलगडून दाखवतात.....
हे जणु पुरातन Value Engineering!"....
https://youtu.be/KGLaHvF01d8?si=cr3ssIQctEil_mhH
------###
https://youtu.be/1JYzsb70SXo?si=nGelSCg5jTvzlrO8
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
https://youtu.be/RkWRUE27_uI?si=CKqapl7cfkSrn5uMhttps://youtu.be/Gu6Gzt3DRzM?si=qfZB-xo9aFGxND-R
👍"मुक्तसंवाद- 'वाचता वाचता वेचलेले भावलेले !":👍
💐"वाचनासारखा आनंद नाही वाचनामुळे आपल्या जाणीवा विस्तारित होतात आणि आपल्याला नवी दृष्टी मिळते. महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणी मधून जे काही मनाला भिडलेले भावलेले गवसले त्या निवडक "छाप पडलेल्या शब्दां"ची ह्या व्हिडिओत ओळख करून दिली आहे !":💐
व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐
https://youtu.be/DHPgLqDxUsg?si=ov_-TpquEXSw0RHF
रविवार, १० ऑगस्ट, २०२५
" सहज जाता जाता सुचलं म्हणून !":
👍"सहज जाता जाता, सुचलं म्हणून !":👌
💐 "कोणती कल्पना कधी सुचेल ते काही कळत नाही.
पण आज मला ही शीर्षकातली कल्पना सुचली, ती वर्तमानपत्रातील नाटकांच्या जाहिराती बघून ! हल्ली मराठी चित्रपटांपेक्षा मराठी नाटकं अधिक जोमाने चालू आहेत. मराठी चित्रपट कधीही पाहायला गेलं, तर चित्रपटगृह जवळजवळ रिकामाच असलेलं दिसतं, तशी नाटकांची आज परिस्थिती नाही हे समाधानाची बाब आहे.
वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये म्हणा किंवा रविवारच्या अंकात म्हणा पानंपान नाटकांच्या जाहिरातींनी भरलेली असतात. तिथे चित्रपटांची जाहिरात नसतेच जवळजवळ. कदाचित आर्थिक कारणामुळे चित्रपटांची जाहिरात करणं परवडतही नसेल.
आज सहज पुरवणीतलं पान पाहिलं तर बऱ्याच नाटकांची जाहिराती समोर दिसत होत्या. सहज नीट निरीक्षण करून पाहिलं तर त्यातील कोणती नाटकं मी बघितले आहेत हा हिशोब केला, तर लक्षात आलं की पुढील सात नाटकं आम्ही बघितली आहेत आणि जवळजवळ त्यातील प्रत्येक नाटक हे पुढे अत्यंत लोकप्रिय झालं आहे आणि धडाक्याने चालत आहे. ती नाटकं अशी असेन मी नसेन मी
जर तर ची गोष्ट
The दमयंती दामले
आमने सामने
दोन वाजून 22 मिनिटानी
ही नवीन नाटकं आणि जुनी पुरुष आणि ऑल द बेस्ट
नवीन नाटक जरी लोकप्रिय होत असली, तरी जुन्या नाटकांचेही पुन्हा प्रयोग सुरू आहेत हे अजून दोन बातम्यांनी त्याच पुरवणी मधून समजले. एक म्हणजे सतीश आळेकर यांचं 'महापूर' हे एकेकाळी पुरुषोत्तम करंडक आणि पुण्यामध्ये प्रचंड गाजलेलं नाटक व विजय तेंडुलकर लिखित, सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेलं 'सखाराम बाईंडर' ही नाटक पुनश्च रंगभूमीवर येत आहे.
थोडक्यात मराठी माणसाला
मनापासून जिव्हाळ्याचं असलेलं मर्मबंधातलं स्थान मराठी नाटकांनी घेतलं तर आहेच आणि त्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत हे आज जाणवलं.
तीच ही...
"जाता जाता सुचलं म्हणून नोंद !":💐
----------
2
😄 "जाता जाता सहज सुचलं म्हणून !":😄
😀 "हे माझे मुक्त विचार सादर करत आहे, त्यामध्ये मला आलेले अनुभव आणि त्या अनुभवांवरती माझी जी काही निरीक्षणं आहेत, ती येथे व्यक्त करणार आहे. अगदी मनमोकळा मनापासून प्रामाणिकपणे केलेला हा आत्मसंवाद आहे !
काय झालं, आत्तापर्यंत मी शॉवरखाली कधीही आंघोळ करत नसे आणि त्याला कारणही असे: बरेच वेळेला काय व्हायचं बाहेरून आल्यावर मी हातपाय धुवायला म्हणून नळाखाली ती तोटी उघडायचो, तर त्या वेळेला मला तिथून पाणी न येता शॉवर मधून पाणी यायचं. कारण कोणीतरी ती शॉवरची जी काही क्लिप आहे ती बंद केलेली नव्हती. माझे चांगले कपडे त्यामुळे ओले व्हायचे आणि ते बदलायचा त्रास झाला. त्यामुळे तेव्हापासून मला शॉवर म्हणजे नको बाबा, असं वाटत आलं आणि अक्षरश: कोणाचा विश्वासही बसणार नाही, मी आयुष्यभर कधी शाॅवरखाली आंघोळच केली नाही.
नुकतीच अशी गंमत झाली. मी माझ्या पत्नीला विचारलं की असं कां होतं? तर तिने मला प्रात्यक्षिक दाखवलं आणि त्यामुळे मला कळलं की शाॅवर कसा वापरायचा ! आता हा खरोखर मूर्खपणा म्हणा बालीशपणा म्हणा, काहीही म्हणा पण झालंय खरं. तेव्हापासून मी अगदी मनसोक्तपणे बरोबर शॉवर चालू करतो. त्यावेळेला योग्य तऱ्हेच गरम पाणी पाहिजे तर तेही मला मिळतं. नॉर्मली मी गरम पाण्याने आंघोळ करतो, गिझर चालू करायचा जी काही नेहमीचा नळ आहे तोही योग्य लेवलला चालू करायचा. जेवढं काही टेंपरेचर आपल्याला पाहिजे ते पहायचं अन् मग ती जी काही शॉवरची टोपी आहे ती खेचायची की नळाखालील पाणी बंद होतं आणि शाॅवर मधून ते चालू होतं.
त्यामुळे होतं काय की, वरून सतत पाणी येतं आणि आपल्या अंगावर आपण ते कुठेही कसंही घेऊ शकतो. त्यामुळे आंघोळ करायला गंमत तर वाटतेच पण ज्याला आपण सिमलेस म्हणतो एफर्टलेस म्हणतो तशी आंघोळ होऊ शकते. कारण आपले दोन्ही हात रिकामे असतात, आपण आपला सगळं शरीर गोल फिरून कुठेही ते पाणी आपल्याला पडायला पाहिजे तिथे आपण घेऊ शकतो. त्या दिवसापासून मला आंघोळ करणे ही गंमत वाटायला लागली आहे !
पूर्वी नाही तर काय व्हायचं खाली बसायचं आता वयोमानाप्रमाणे एखादं स्टूल घ्यायचं बादलीतील पाणी योग्य टेंपरेचरला येतय ना ते पाहायचं आणि मग तांब्याने उचलायचा, पाणी आपल्याला जिथे पाहिजे अंगावर तिथे टाकायचं. मग खसखस अंग चोळायचं. म्हणजे ह्यामध्ये श्रम जातात, सगळ्या ठिकाणी पाणी जाईल ह्याची खात्री नाही. कारण पाठीवर आपल्याला इतके सहजासहजी पाणी सगळीकडे टाकता येत नाही पोहोचत नाही.समजा ते गेलं तरी हाताने अंग चोळता वगैरे येत नाही. डाउनलोड शॉवरची धार तेच काम जिथे पाहिजे तिथे टाकता येते. त्यामुळे मला तेव्हापासून समजलं, साध्या साध्या गोष्टी असतात पण आपण त्या टाळत असतो. कुठल्यातरी अनामिक अशा अनुभवामुळे-भीतीमुळे आपण हे असं शॉवरचं प्रकरण मी टाळत आलो. किती मोठी चूक केली, किती मोठ्या आनंदाला, सुखासमाधानाला मी मुकलो असं मला त्या वेळेला वाटून गेलं.
पण तेव्हापासून मी न चुकता कधी केव्हाही कुठे गेलो तर शांवरनेच गरम पाण्याने योग्य त्या टेंपरेचरचे पाण्याने आंघोळ करतो, प्रसन्न वाटतं, समाधानही वाटतं आणि त्यामानाने लवकरही आंघोळ होते आपल्याला पाहिजे तितकं आपण पाण्यात डुंबूही शकतो. अशी ती गंमत, मला आज अनुभवातसाठी सांगावीशी वाटली. कदाचित प्रत्येकालाही कुठला ना कुठला तरी असाच अनुभव येतच असतो. चूक भूल द्यावी घ्यावी, कुठे मर्यादा ओलांडली गेली असली तर क्षमस्व. पण एक मुक्तसंवाद म्हणून हा गोड मानून घ्या !":😀 धन्यवाद
-----------
3
सहज जाता जाता सुचलं म्हणून !":
" कोंडमारा करणारी रस्ते वाहतूक !"
मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्याने प्रवास करणे हे किती दयनीय आणि त्रासदायक झाले आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मडगार्ड टू मडगार्ड अशा तऱ्हेने गाड्या एकमेकांना भिडलेल्या, त्यात टू व्हीलर, थ्री व्हीलर यांची भाऊगर्दी आणि बेशिस्तीने चालणारे पादचारी, अशा अवस्थेत कोणत्याही चालकाने गाडी कशी चालवायची, हा एक खरोखर गहन प्रश्न आहे.
रस्त्यात पडलेले खड्डे, कुठल्याही गल्लीबोळात दोन्ही बाजूला पार्किंग केलेली वाहने आणि कुठेही कुठल्याही दिशेने मनमानीपणे वेळ पडली तर सिग्नल तोडून जाणारे दुचाकीस्वार, त्याशिवाय 'हीट & रन' च्या वाढत्या केसेस यामुळे सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे हे सत्य आहे. दुर्दैवाने कोणत्याही प्रकारची ठोस कृती केली जात नाही आणि 'जाने दो चालसे कल्चर' वर्षानुवर्षे चालू आहे.
पूर्वी ज्या प्रवासाला पंधरा मिनिटे लागायची, त्याला आता रस्त्याने जी काही कोंडी होते त्यामुळे कधी कधी पाऊण तास एक तास ही लागू शकतो. गंभीर आजारी माणूस असला, तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना काय ताण-तणाव निर्माण होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी.
सोबतच्या वृत्तामध्ये वाहने वाढली आणि एकंदर धोरण कोलमडले याचे वृत्त आहे. जी मुंबई शहराची अवस्था त्याहून कदाचित अधिक त्रासदायक इतर शहरांच्याही रस्ते वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा ! याला विकास म्हणायचे? याला नियोजन म्हणायचे ? दुर्दैव असे की कुणालाच त्याचे काहीही वाटत नाही.
जिथे फूटपाथ वर फेरीवाले नाहीत, तिथेही फुटपाथवरून न चालता रस्त्यावरून चालणारे नागरिक, तसेच सिग्नल जिथे आहे तिथेच खरं म्हणजे रस्ता क्रॉस करणे अत्यावश्यक आहे. परंतु आपल्या इथे कोणीही कुठेही केव्हाही रस्ता क्रॉस करतो. त्यामुळे वाहन चालकाची त्रेधातिरपीट न झाली तरच नवल ! प्रगत देशात किती काटेखोरपणे सारे कायदे पाळले जातात आणि नागरीकही शिस्तीने वागून त्यांना साथ कशी देतात ते आता वेगळी सांगायची गरज नाही.
सुरुवात प्रथम नागरिकांपासून सुरू झाली पाहिजे, त्याचप्रमाणे टू व्हीलर चालवणारे यांनी अधिक जबाबदारीने आणि शिस्त पाळून प्रवास केला पाहिजे. चार चाकीवाला कुठे चुकला, सिग्नल मोडला व इतर काही, तर त्याला जशी दंडाची शिक्षा होते, त्याचप्रमाणे शिस्त न पाळणाऱ्या पादचार्यांवरही आणि टू व्हीलर वाल्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
नागरिकशास्त्र फक्त शाळेत विकून नंतर विसरले जाते हे देखील एक दुर्दैवच. साहजिकच घरातून बाहेर पडलेला सुखरूप घरी येईल की नाही याची चिंता सर्वांनाच होत असते. ही परिस्थिती खरोखर आणीबाणीची आहे. वेळीच त्यावर काही ना काहीतरी ठोस कृती केलीच पाहिजे. वेळ पडल्यास जसे 'घरगुती गॅस' वर पुरवठ्याबद्दल नियंत्रण आहे, त्याचप्रमाणे नव्या वाहनांची परवानगी देतानाही नियंत्रण ठेवले गेले तरच काही सुधारणा होण्याची आशा आहे.
मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५
लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा भाग 2 !":!":😭
😭 "लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा !":😭
👍"प्रत्येक सुजाण नागरिकाने जागल्याची भूमिका घेत अशाच दुरावस्थेच्या नोंदी नजरेत आणून द्याव्यात आणि सुधारणेसाठी आग्रह धरावा !":👍
# पादचाऱ्यांची रोखली वाट
बेकायदा फेरीवाल्यांकडून पदपथ गिळंकृत
दुकानाच्या वाढीव बांधकामांचाही फटका
# मिठी नदी -गाळात'च
76% कामानंतर पावसाळ्यामुळे कामे थांबली
# रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच
पनवेल वसई मार्गाबाबत अठरा वर्षे प्रशासन सुस्तच
# पत्रकारिता अभ्यासाला घरघर
तीन भाव विद्यालय वगळता मराठी अभ्यासक्रम बंद
# दिवा कळव्याचे दुर्लक्षित दुखणे
इदिवा परिसरात पाच लाख
लोकसंख्येच्या राहण्याची प्रवासाची
कागदावर काहीच योजना नाही
सगळीच अनागोंदी
# बर मार्गावर पाच तास मेगाब्लॉक
नंतर चार तास बिघाड
# नाशिक मार्गावर कंत्राटाचे "खड्डे"
महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामातील
खांदेपालठामुळे आठ महिन्याचा विलंब
#########
# बडोद्यात पूल कोसळून 11 जणांचा मृत्यू
सहा वाहने नदीत, नऊ जण जखमी
# लिफ्ट मध्ये अडकलेल्या श्रमिकाची पंधरा तासांनी सुटका
इमारतीच्या 21व्या मजल्यावरील घटना
महावितरणच्या वीज कर्मचारी संपाचा फटका
नको रे मनोरे मनोरे नको रे
नमस्कार आणून.घन
वष
# मासिक पाळीची शंका;
विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी
शहापूरमधील घटना
मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा
# व्हाट्सअप वरील शेरेबाजी म्हणजे रॅगिंगच
विद्यापीठ अनुदान आयोगाने केले स्पष्ट
# निकाल टांगणीला
महाविद्यालय-विद्यापीठाच्या वादात
5000 विद्यार्थ्यांना मनस्ताप
###########
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
या साऱ्या वरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने
"इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले होते.
पण दररोजचे पेपर अशाच बातम्यांनी कायमचे भरलेले असल्यामुळे मला असे वाटू लागते आहे की आपण आठवड्यातून निदान एक दिवस तरी वर्तमानपत्र न वाचण्याचा उपक्रम करावा तीच गोष्ट न्यूज चॅनल्स जे आहेत त्यांचाही असाच एक दिवसाचा न पाहण्याचा उपक्रम सुरू करावा इतकी परिस्थिती उदय जनक होत चालली आहे आणि तिच्यात सुधारण्याला बिलकुल वाव नाही आणि ती खंत दररोज वृद्धिंगत होत जावी अशाच बातम्या सातत्याने येत असतात गुन्हेगारी घोटाळे किंवा राजकारणाचे प्रताप व्यवस्थेचा प्रशासनाचा गलथांपणा अलगर्जी आणि त्यामुळे होणारे सर्वसामान्यांचे नुकसान अशाच तारेच्या बातम्यांचा मारा आपल्यावर होत असतो त्यामुळे खरोखर वर्तमानपत्र पाहावे का वाचावे का तसेच इंडियन बॉक्स वरील न्यूज चॅनेल बघावे का असा प्रश्न मनात निर्माण झालेला आहे आपल्याला काय वाटतं
.
अशा बातम्यांची ही जंत्रीच पहा...
# हक्काच्या पैशांसाठी हेलपाटे
2215 निवृत्त बेस कर्मचारी
ग्रॅच्युइटी अन्य देण्यापासून वंचित
# वस्तीगृह अभावी विद्यापीठाला राम राम
कलीना फोर्ट मध्ये मुलांसाठी
अवघ्या दोन इमारतींमध्येच नेवासाची सोय
,# पीएम गतिशक्तीचा कारभार धीमा
पावसात अपूर्ण कामामुळे प्रवाशांचा त्रास वाढला
# अल्पवयीन विद्यार्थ्यांशी शिक्षिकेचे अश्लील चाळे
# गुप्तधनाच्या आमिषाने 39 लाख रुपये लाठले
# आठ वर्षीय मुलाला मेणबत्तीचे चटके
शिकवणीच्या शिक्षिकेचे कृत्य
# वांगणी जवळ रुळाला तडा
रेल्वे कोलमडली नोकरदारांची तारांबळ
# पुण्यात माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना
समाजकंटकांचा त्रास
# रुपया भुई सपाट दिवसभरात 52 पैसे कोसळला
# सरकारी कंत्राटासाठी सहा कोटी
मंत्र्यांचे ओएसडी असल्याचे बसवत गंडा
हाती सोपवला बनावट शासन निर्णय
# हरिद्वार चेंगराचेंगरी नऊ जणांचा मृत्यू
# पालकांना दत्तक परीक्षा
देशभरात प्रतीक्षा यादी तीस हजारांवर
# बोर्डिंग साठी वृक्ष छाटणी
लोअर परेल मध्ये 13 झाडांवर कुऱ्हाड गुन्हा दाखल
# सायबर फसवणुकीचे रॅकेट उघड चेष्टाला 66 लाखांचा गंडा 11 जण अटकेत वेगवेगळ्या कंपन्यांची सहा हजार सिमकार्ड हस्तगत
# मावस भावाकडून लैंगिक अत्याचार
# भरतीसाठी बनावट गुणपत्रिका पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
# अमेरिकी नागरिकांना फसवणारी टोळी उघड कोट्यवधींची लूट मुंबई पुण्यातून तीन आरोपींना अटक
# पार्किंग मधून बेकायदा वसुली मशिद बंदर स्थानकात दोन ठिकाणी प्रकार उघड पैसे उकळणाऱ्यांवर दोन गुन्हे दाखल पॅन पार्क असल्याचे दाखवून फसवणूक
# उत्पन्न सव्वा कोटी खर्च पाच कोटी मनोरेलची देखभाल ठरतोय
आतबट्ट्याचा व्यवहार
# ठाण्यात मराठी शाळा संकटात सात वर्षात 18 शाळांना टाळे
# रुग्णवाहिकेत महिलेवर सामूहिक बलात्कार
# शाळेची इमारत कोसळून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू राजस्थान मध्ये दुर्घटना 28 जखमी
# पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने वीस लाखांची लूट
# खाजगी नोकरीवर पाणी 12 लाख ही बुडाले
सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
तिघांविरुद्ध भांडुप मध्ये गुन्हा दाखल
# ग्रेट चा विळखा बंदी असतानाही कृपया पद्धतीने साठेबाजी विक्री
# मुंबई विमानतळावरून 14 कोटीचा गांजा जप्त
# देशाची प्रतीक्षा मुंबईत एक लाख 81 हजार विद्यार्थी अकरावी परीक्षेपासून दूर
# " स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण लष्करी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
# क्लास मधील बाकावरून वाद दहावीच्या विद्यार्थ्यांची हत्या नाशिक मधील धक्कादायक प्रकार
# फटका टोळीमुळे तरुणाला गमवावा लागला पाय अल्पवयीन चोराला इराणी वस्तूतून वस्तीतून अटक
# ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार ताडदेव अंधेरी घाटकोपर छापा मुंबई गणेश शाखेची धडक कारवाई
# कस्टम अधीक्षक लाच प्रकरणी अटकेत दहा लाखांची लाज घेताना प
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)