रविवार, २५ मे, २०२५

" मल्लिनाथी- जागते रहो !":

################# 😂 " मल्लिनाथी !":😂 👍" राजकारणाचा चिखल !":👌 "सध्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता लोकसेवक म्हणून पक्षीय राजकारणात मिळविण्यासाठी, CET वा NEET प्रमाणे केंद्रीय प्रवेश परीक्षा घेतली जावी आणि त्यामध्ये नीतिमत्ता, विश्वासार्हता, निष्ठा, निस्वार्थता आणि जनहितकारक सेवावृत्ती यांची तपासणी केली जावी. कुठल्याही शैक्षणिक कोर्सकरता अथवा शासकीय, खाजगी नोकरी करता जर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर समाजाचे, देशाचे भवितव्य घडवण्याची निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आपण देणार, त्यांचे चारित्र्य बावनकशी असलेच पाहिजे. तेच जाणण्यासाठी अशा केंद्रीय प्रवेश परीक्षेची अत्यावश्यकता आहे. तरच कदाचित राजकारणाला योग्य ते वळण मिळून विकास व प्रगती साधली जाईल. After all one must remember: "When Character is Lost, Everything is Lost !" ################# 🤢" मल्लिनाथी- जागते रहो !":🤢 🤣 "केवळ राजकारणाचाच नव्हे, तर समाजाच्या नीतिमत्तेचाच चिखल झाल्याच्या घटना सातत्याने आपल्यासमोर घडत असताना, भौतिक विकासाचे ढोल पिटणे काय कामाचे? फक्त आहे रे वाले आणि त्यांची वाढती प्रगती पाहून उपयोग काय, जर नाही रे वाल्यांच्या पीडा कष्ट आपण कमी करू शकलेलो नाहीत. केवळ अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची झाली अशा वल्गना करून उपयोग नाही. कारण लोकसंख्या विचारात घेता दरडोई उत्पन्न इतर देशांच्या तुलनेत किती आहे? ते महत्त्वाचे नव्हे कां? तसेच प्रत्येक देशाची लोकसंख्या आकारमान आणि त्यांचा अर्थव्यवस्थेचा आकार या तुलनेत देखील आपण कुठे आहोत हा विचार व्हायला हवा का नको? वर्तमानपत्रातील वेगवेगळ्या बातम्या बघा: गलथान कारभार, जिकडे तिकडे भ्रष्टाचार, दिरंगाई किंवा एकंदरच व्यवस्थेचे दुर्लक्ष त्याचबरोबर गुन्हेगारी घोटाळे अशाच बातम्या येत असतात. उदाहरण म्हणून दैनिक वृत्तपत्रातील मथळे हे पहा: # कुपोषणाची समस्या कायम ! # ई बस संबंधित एसटीची कारवाईस टाळाटाळ # आपत्तींचा फटका सर्वाधिक # अकरावी परीक्षेच्या प्रवेशाच्या प्रक्रियेत उडालेला गोंधळ आणि लाखो विद्यार्थी पालकांना सोसावा लागलेला त्रास मनस्ताप # विक्रोळी उड्डाणपुलाची 'दिशा'भूल: त्या पायी चालकांना झालेली रखडपट्टी # तिसरी भाषा रद्दबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रश्न: घोषणा स्वागतार्ह, पण शासन निर्णय कधी ? # रांजणगाव जवळ आढळले अर्धवट जळालेले तीन मृतदेह # पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा खड्ड्यांसाठी पोर्टल उघडण्याची वेळ # गरजूंसाठी एक कोटी मोफत भोजन थाळ्या ! # शहर स्वच्छतेची जबाबदारी कोणाची ? शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांवर वणवण करायची वेळ कोणी घर देता का घर ? # कमावण्याच्या नादात 25 लाख गमावले # महिलेचे मंगळसूत्र खेचले # आरवलीत वाहतुकीची दैना . .... एक ताजी बातमी: # पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण मेट्रो एक्वा लाईनचे वरळी स्थानक पाण्यात... इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देखील दुसऱ्या कुठल्याच बातम्या नसतात. अपघात गुन्हेगार गोंधळ घोटाळे अशाच चिंताजनक बातम्यांची लाईन रांग लागलेली असते. हे कशाचे लक्षण आहे ? शिवाय दररोजच्या व्यावहारिक जीवनात कायदा न पाळता, वाटेल तशी वागणूक करणारे आणि त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा बडगा नसणारे असे प्रसंग बहुतेक कुठल्या ना कुठल्या तरी शहरात कायम घडत असतात. व्यवस्थेचे हे अपयश नव्हे कां? कोणत्याही व्यवस्थेचे नियम हे ती व्यवस्था सर्वांच्या हिताच्या दृष्टीने सुलभतेने कार्यरत राहावी यासाठी असतात. जर नियम पाळले गेले नाही तर काही दंड आकारला जाण्याची ही व्यवस्था असू शकते. सुबुद्ध सुसंस्कृत नागरिकांनी त्या व्यवस्थेच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. पण सध्या हम करे सो कायदा अशा तऱ्हेची प्रवृत्ती असलेली माणसेच जर समाजात अधिकाधिक निर्माण होत असली तर कोण काय करणार? अराजकाचे हे पहिले पाऊल असू शकते. कधी नव्हे इतकी सांस्कृतिक खालावलेली परिस्थिती अधिकच रसातळाला जात असलेली दिसताना,जागे व्हा ! सज्जन सुसंस्कृत समाज जेव्हा निर्माण होईल तेव्हाच खरे, चौथी अर्थव्यवस्थेचा जय जय कार व्यर्थ आहे, स्वतःचीच आत्मवंचना करणे आहे !":🤣

गुरुवार, २२ मे, २०२५

" 29 मे रोजी होणाऱ्या राहु व केतूच्या राश्यंतराचे परिणाम !"

"राहू व केतूच्या पाप कर्तरी योगाचे परिणाम !:" राहू व केतू हे दोन अत्यंत अनिष्ट ग्रह आहेत, त्यांच्या एका बाजूला जर सर्व ग्रह पत्रिकेत असतील तर कालसर्पयोग होतो आणि त्याचे त्या व्यक्तीला त्रासदायक परिणाम होतात हे आपणास ज्ञात आहे. कोरोना काळातही अशा राहू केतूच्या अनिष्ट योगामुळे सबंध जगावर संकट कोसळल्याचे आपण अनुभवले आहे. असे हे राहू केतू मूळ पत्रिकेत कुठे आहेत, हे पाहून, सध्याच्या राहू केतूच्या पाप कर्तरी योगात कोणती दोन स्थानं येतात, त्याचे निदर्शन व काय परिणाम संभवू शकतात त्याचा खुलासा ह्या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे. "राहू व केतू हे दोन पापग्रह दर दीड वर्षांनी राशी बदल करतात, ते उलटे मागच्या राशीत जातात. जसे आता राहू मीन राशीत व कन्या राशीत आहे. ते 29 मे25 रोजी अनुक्रमे कुंभ व सिंह राशीत प्रवेश करतील. अशा वेळेला मकर लग्नाच्या मूळ पत्रिकेमध्ये ज्यांच्या द्वादश स्थानात म्हणजे धनु राशीत केतू व षष्ठ स्थानात राहू मिथुुन राशीत असेल तर, त्या व्यक्तीच्या पत्रिकेत लग्नस्थान आणि सप्तम स्थान हे राहू व केतू यांच्या पापकर्तरी योगात येतील. ही दोन अत्यंत महत्त्वाची स्थाने आहेत, लग्नस्थान म्हणजे स्वतः, शरीरारोग्य मानसिक स्थिती तर लग्नस्थान म्हणजे जोडीदाराचे स्थान, वैवाहिक सौख्य भागीदारी विषयक फळे. साहजिकच या पापकर्तरी योगामुळे स्वतः त्या व्यक्तीला आणि त्याच्या जोडीदाराला त्रासदायक काळ, नुकसानकारक अशी फळे मिळण्याची शक्यता असू शकते. जन्मलग्न पत्रिकेमध्ये जर केतू आणि राहू यांच्या अनुक्रमे पुढच्या आणि मागच्या घरां मध्ये जर धनु आणि मिथुुन रास असेल ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू किंवा केतू हे तूळ आणि मेष राशीत असतील तर अशा पत्रिकांमध्ये सध्याच्या परिस्थितीत राहू केतूचा पापकर्तरी योग होऊ शकतो आणि त्याचे त्या त्या स्थानांबद्दल अनिष्ट परिणाम मिळू शकतात. अर्थात त्यामुळे जी दोन स्थाने ह्या अनिष्ट पापकर्तरी कुयोगात पत्रिकेमध्ये जन्म लग्न कोणते आहे, त्यानुसार त्या स्थानांचे कारकत्व असलेल्या गोष्टींची फळे क्लेशकारक संभवतील. तेव्हा प्रत्येकाने आपल्या जन्मलग्न पत्रिका तपासून पहाव्यात आणि जन्मलग्न कुंडली मध्ये राहू आणि केतू हे वरील प्रमाणे कुठे आहेत का? ते पहावे आणि तसे जर नसेल तर चिंता करायची कारण नाही. यावरून असे लक्षात येईल, जन्मलग्न पत्रिकेला हा असा अनिष्ट योग राहू केतूचा होऊ शकतो. मात्र ती बाधीत दोन स्थाने प्रत्येक जन्मलग्नाला वेगवेगळी असणार आहेत. धन्यवाद सुधाकर नातू

मंगळवार, २० मे, २०२५

"मुक्तसंवा-'कावाकामि' :काय वाचले काय मिळाले !":

😄 "मुक्तसंवा-'कावाकामि' :काय वाचले काय मिळाले !":😄 आता 'कावाकामि' इथे कुठलाही कावा नाही आणि त्याचा अर्थ एवढाच काय वाचलं आणि काय मिळालं हा आहे. आज सहज 'आपलेसे' हे पुस्तक वाचत असताना लेखक डॉक्टर अनिल अवचट, मला अचानक काही सुचलं आणि वाटलं की आता हे आपण व्यक्त करावं. आता व्यक्त करत लिहून करावं का बोलून करावं मग सगळ्यात सोपा उपाय सुचला तो म्हणजे बोलून करावं. बोलण्यामुळे आपल्याला जास्त वेगाने विचार व्यक्त करता येतात. त्या उलट वाचलेलं लिहिताना किंवा सुचलेलं लिहिताना आपल्याला दोन-तीन वेगवेगळ्या प्रक्रिया करायला लागताा. साहजिकच त्यासाठी वेळही जास्त जातो आणि दुसरं असं की जरी मी लिहीत असलो तरी ते केवळ बोलून ऑडिओ टू टेक्स्ट अशाच प्रकारचं मी लिहू शकतो. हाताने लिहिण्याची सवय गेलेलीच आहे. त्यामुळे वाटलं की आपण सरळ जे वाटलं सुचलं ते लिहून न काढता बोलत जावं आणि तेच मी आता करतोय. काय वाचलं आणि कसं सुचलं तर पहिलं सांगतो. 'आपलेसे' हे डॉक्टर अनिल पुस्तक जे आहे ते जवळजवळ वीस बावीस अशी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची कार्यकर्तृत्वे, ज्यांचं अगदी विभिन्न क्षेत्रात आहे. काही माहितीचे आहेत काही बिलकुल माहितीचे पण नाहीत. पण माणूस म्हणून ते कशी आहेत, ते मांडणार आहे अतिशय साध्या सोप्या भाषेतलं पुस्तक मी वाचतोय आता हे वाचताना मला लक्षात आलं की, वाचनालयांचा आणि माझा संबंध गेली 40 वर्ष वेगवेगळ्या वाचनालयामध्ये येत गेलाय. प्रथम पारस लायब्ररी, त्यानंतर दादर सार्वजनिक वाचनालयाची लायब्ररी आणि आता गेल्या दोन वर्षात वसंत वाचनालय हे जवळजवळ 66 का 67 वर्ष जुना असलेलं प्रसिद्ध वाचनालय, तिथे मी सभासद म्हणून सुरुवात करून केवळ दोनच वर्ष झाली, पण मला लक्षात आलं की आधीच्या दोन लायब्ररीज् मधून मला जे काही मिळालं नाही किंवा मिळालं त्यापेक्षा कितीतरी वेगळं मन समृद्ध करणार, जाणीवा समृद्ध करणारं असं खूप खूप काही या वसंत वाचनालयामधून मला मिळून गेलं. आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या दोन अडीच वर्षात मी मासिक आणि पुस्तक मिळून 175 साहित्यकृती वाचू शकलो. आपलेसे हे माझं 175व साजरा करणार पुस्तक आहे ! या कालखंडात मी कितीतरी विविध प्रकारचं असं वाचन केलं अर्थात त्यामध्ये मला शक्यतोवर व्यक्तिचित्रात्मक आत्मवृत्त असलेली व ललित लेख व कुतुहूल वाढवणारी नवीन माहिती देणारी अशीच साहित्य संपदा आवडते. किती वेगवेगळी माणसं किती वेगवेगळी त्यांची कार्यक्षेत्र आणि जीवनातले बरे वाईट उंच सखल सुखदुःख व्यक्त करणारे प्रसंग आणि अनुभव ! यावरून माणूस म्हणून जगताना आयुष्य किती अनाकलनी असतं, ते समजलं. जे काही वाचलं त्यातून मला जे काही मिळालं, त्यावरून मला सुचलं की माणसाचा आयुष्य हे वेगवेगळ्या कप्प्यांध्ये विभागलेलं असतं. कुणाचं बाल्य तर कुणाचं तारुण्य तर कुणाचं प्रॉडक्ट व वृद्धापकाळ चांगला किंवा वाईट असा असू शकतो. प्रत्येक काळाचा वेगळा कप्पा असतो एखादा कप्पा कुणाची परीक्षा पाहणारा, तर एखाद्याचा कप्पा असा असतो की ज्यामध्ये त्याला खूप खूप काही करावसं वाटतं. तो जो कप्पा असतो तो खरोखर अगदी वेगळा असतो आनंद देणारा असतो. त्याहून आपल्याला काही काळ असा येतो की काय करावं कसं करावं, संकटे बघणारा असतो. तर काळे गोरे, चांगले वाईट असे हे कप्पे आयुष्य घडवत जातात. आता सध्याचा माझा ज्येष्ठ नागरिकत्व अनुभवणारा उत्तरा आयुष्यातला काळ मागील काळापेक्षा कितीतरी सकस अनुभव देणारा कुतुल जागृत करून नवनवीन योगदान वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्रीच्या रूपाने या हृदयीचे त्या हृदयी करणारा लाभला आहे याची जाणीव झाली. डाॅ अनिल अवचटांचे आपलेसे हे पुस्तक वाचताना वेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे जीवन त्यांचे योगदान वेग अनुभवायला मिळाले डॉक्टर सरोजिनी वैद्य या मराठीच्या प्राध्यापिका त्यांची मराठी साहित्याची सखोल संशोधन करणारी प्रवृत्ती त्यासाठी वाटेल तितकी धडपड बटाटोप करणारी जीवनशैली. तर सत्यकथेचे संपादक असलेले राम पटवर्धन चोखंदळ वृत्तीने निरक्षर विवेक करत प्रत्येक साहित्याचे विश्लेषण करून उत्तम उत्तम अशी निवड करणारे व्यक्तिमत्व. तर त्या उलट दत्ता सराफ हे मनमोकळ्या स्वभावाचे नवनवीन काहीतरी देण्याच्या दिशेने लेखकांना प्रोत्साहन देणारे संपादक. त्यांनी मला सुप्रसिद्ध नाटककार साहित्यिक प्राध्यापक असं कानिटकरांची मुलाखत घेण्याची संधी दिली होती नाशिकला जाऊन मी त्यांच्या बंगल्यामध्ये मुलाखत घेतली होती, वर आधारित माझा लेख आवर्जून यावेळी तरुणाई मध्ये विलक्षण आवडत्या 'मनोहर' साप्ताहिकात छापली होती. तर असे ते दत्ता सरााफ.! त्या उलट निळूभाऊ म्हणजे आपले निळू फुले, येथे काळी माळी म्हणून नोकरी करणारे जातिवंत कलाकार. नेहमी चुरगळलेल्या अशा पोशाखामध्ये असणारे हे व्यक्तिमत्व परिणामकारक अभिनयाच्या बाबतीत किंवा इंग्रजी चित्रपटांच्या बाबतीत दर्दी होते, हे वाचून देखील मला थक्क व्हायला झालं. तर अशा तऱ्हेची वेगळ्या क्षेत्रातली अगदी भिन्न असे अनुभव असणारी माणसं आपल्याला अशा तऱ्हेची पुस्तकं वाचून अनुभवायला मिळतात. आपल्याला काही त्यातून शिकायला मिळतं की, आपण देखील कसं व्हावं वा कसं होऊ नये आणि म्हणूनच मला वाटतं की वाचनासारखा आनंद नाही, अनुभव देणारा नाही म्हणून मी आज या सहज अशा मुक्तसंवादात 'कावाकामि' या शीर्षकाखाली काही लिहिलं, त्यामधून तुम्हाला काय मिळालं मला माहित नाही. पण मला ते द्यावसं वाटलं ते मी इथे दिलं, ते गोड मानून घ्या ! धन्यवाद श्री सुधाकर नातू ##@############ 😀 "वाचाल, तरच वाचाल !":😀 "काय वाचले आणि काय जाणवले !": # महाराष्ट्र टाइम्सची संवाद पुरवणी नेहमीच वाचनीय असते. त्यातील 'वाघांच्या कुटुंबातला माणूस' हा श्री सुनील करकरे यांचा लेख भारतीय व्याघ्र संरक्षणातील महत्त्वाचे नांव असलेले वाल्मीक खापर यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचा विशाल पट आपल्याला थक्क करतो. रणथंभोर मधील वाघांच्या कुटुंबाचा भाग होऊन आयुष्याच्या अखेरपर्यंत व्याघ्र संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या ह्या असामान्य वन्यजीव कार्यकर्त्याचे हे हृदयस्पर्शी स्मरण आपल्या मनात घर करून जाते. # तंबी दुराई यांची 'दीड दमडी' -'गैरसमज दूर व्हावे म्हणून' एक कॉलमी स्फूट खरोखर चटका लावणारे आणि डोळ्यात अंजन घालणारे ठरावे ! 'बार' आणि तेथे चालणारे उपद्रव तसेच जुगाराचे अड्डे आणि एकंदरच व्यवस्थेतील देवाणघेवाण जिला भ्रष्टाचार असे पॉलिटिकली करेक्ट नांव दिले जाते त्यासंबंधी वास्तवाचे रोचक बोच बोचणारे दर्शन ही 'दीड दमडी' आपल्याला देऊन जाते आणि अंतर्मुख करते. # त्याच 'तंबी दुराई' अर्थात श्रीकांत भोजेवार यांचा 'सामना' तेव्हा आणि आता" लेख हा बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा आणि पन्नास वर्षांपूर्वी घडूून गेलेला दुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील 'सामना' या कालातीत चित्रपटाची ओळख 'तेव्हा आणि आता' ह्यांचा अतूट संबंध खुबीने मांडतो. 'सत्ता आणि मत्ता' यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते आज पन्नास वर्षे उलटूनही तसेच राहिले आहे आणि म्हणूनच सामना चित्रपटातील मास्तर आणि हिंदुराव यांच्यातला संघर्ष आजही नव्याने थैमान घालत असल्याचे आपल्याला दिसून येते. चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे दिग्दर्शक जब्बार पटेल आणि द्रष्टे लेखक विजय तेंडुलकर या त्रिकुटाचे असे एकत्र येणे हे 'सामना' विलक्षण प्रभावी आणि परिणामकारक होण्याचे कारण होते हेही आपल्याला या लेखावरून समजून येते. धन्यवाद श्री सुधाकर नातू ####@@########

सोमवार, १९ मे, २०२५

" स्वर गंगेच्या काठावरती मधुर स्वरांची मैफिल !":

स्वरगंगेच्या काठावरती मधुर स्वरांची मैफिल !": 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 😄 " स्मरणरंजनातील एका अद्भुत मैफिलीचा स्वरानंद !": 😄 "अभिवाचन क्रमांक 361 !": 💐"रानारानात गेली बाई शीळ' हे कविवर्य ना.घ. देशपांडे यांचे अजरामर भावगीत श्री जी एन जोशी यांनी स्वरबद्ध करत गायिले होते. त्या गीताचे 'HMV' ने रेकॉर्डिंग जेव्हा केले, तेव्हा श्री जोशी हे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. त्यावेळी केवळ एवढेच हे एक गाणे नव्हे तर त्यांची 14 गाणी रेकॉर्डिंग करण्यात आली ! बदल म्हणून, सोशल मीडियावरील सर्फिंग करताना स्वतः जी एन जोशी, गायक बबनराव नावाडीकर संगीतकार गायक गजानन वाटवे आणि गायिका मालती पांडे यांच्याबरोबरच्या मैफिलीचा पुढील लिंक उघडून स्मरणरंजनरुपी स्वरानंद... जरूर घ्या...💐 https://youtu.be/RU1TlDYZqjA?si=ECk_hAi-PIzAuVgk या पुस्तकाच्या वाचनामुळे मला वेगवेगळ्या गायक गायिकांच्या गीतांच्या लिंक्स युट्युब वरून संग्रहित करण्याचा छंद लागला आपणही पुढीलंच लिंक्स अविस्मरणीय मैफिलीचा आनंद घ्या .... रमला कुठे ग कान्हा https://youtu.be/dYMLbWpuU1Y?si=w_P1g-e7k7VWXD-Q विसरशील तू खास मला https://youtu.be/DE3mcHqMItQ?si=CtPo9H6uwa1NWZd3 बोल सख्या मधु बोल https://youtu.be/iIoAHhNS49w?si=c6J8jSz_OjAuBUd8 ओटी भरा ग ओटी भरा https://youtu.be/8j8SL-j8cCg?si=be6B6uruekQ4oPOD घरधनी गेला दर्यापार https://youtu.be/6qtGlu-XkMc?si=Q-6eLedlssYWjJdx नको चंद्र फुलांचे पसारे https://youtu.be/P6_kL2wjmTU?si=k3h6WqHAYspTQ_Sm नको रे कृष्णा रंग फेकू https://youtu.be/hPYsXEorEss?si=fwnekNbbG7PaGUvy मेरा सुंदर सपना टूट गया https://youtu.be/XfAagdgVkDc?si=Yb9KT164KXEc0jE6 अंबुवा की डोरी पे कोयल डोले https://youtu.be/0R0q_ToubQs?si=FXtDcWa3ED0n-MGC जब दिल ही टूट गया https://youtu.be/7lZLePeN7BA?si=YyKVUvFnLbwrlzRj धन्यवाद श्री सुधाकर नातू अजूनी रुसून आहे https://youtu.be/6WH71_fX40o?si=ynezQ7AtK_hSzms3 डोळे हे जुलमी गडे https://youtu.be/yHxi1VtjyoE?si=mE8FNrdmKKFbT6vV देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान https://youtu.be/N_AfVACsjgM?si=nUEw6NKK-mQ-_vxx हरवले ते गवसले का -ललिता देऊळकर फडके भाग एक https://youtu.be/lzdMNixup5M?si=hmGyCj4Q6CAguGha

बुधवार, १४ मे, २०२५

" डीडी वरील नक्षत्रांच्या दिवसांचे घबाड

" डीडी वरील नक्षत्रांच्या दिवसांचे घबाड !": श्री अरुण काकतकर लिखित घबाड हे पुस्तक आपल्याला 1972 साली दूरदर्शनची सुरुवात 2 ऑक्टोबर रोजी झाली. तेव्हापासूनचे आनंददायी रोमहर्षक नक्षत्रांचे दिवस उलगडून दाखवणार हे पुस्तक खरोखर संग्राह्य व वाचनीय आहे. ही अविस्मरणीय स्मरणयात्रा तुम्हाला अनेकानेक आवडत्या आणि मनमंजुषेेत स्थिरावलेल्या कार्यक्रमांची मालिका जशी उभी करते तसेच तत्संबंधी साहित्य नृत्य क्रीडा करमणूक अशा क्षेत्रातल्या दिग्गजांची देखील जवळून आठवण करून देते. पुस्तकातलं वाचलेले वेचक वेधक असे काही विचार व ऐवज मी लवकरच आपल्याबरोबर शेअर करणार आहेच. पण इतक्या दिग्गजांच्या मांदियाळीवरून मला वाटले की आपण स्मृतीआड गेलेल्या सेलिब्रिटींची जन्मतारीख आणि मृत्यू याची तपासणी करून ती सादर करावी. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे गुगल केले की सारे काही तुमच्यापुढे अवतरते. तसाच हा प्रयत्न. उत्साहात पहिल्यांदी गोळा केलेली ही नोंद तुम्हाला त्या त्या व्यक्तीच्या असामान्य योगदानाची त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवण करून देईल असे वाटते. स्मरणरंजनाचा हा आनंद तुम्ही जरूर घ्या. प्रारंभ अर्थातच हयात असलेल्या लेखकापासून.. अरुण काकतकर दूरदर्शन निर्माता बालचित्रवाणी प्रमुख जन्मतारीख 24/4/1947 ---------------- Ram shevalkar dob 2/3/1931 death 3/5/2009 भक्ती बर्वे १० सप्टेंबर १९४८ - १२ फेब्रुवारी २००१ जितेंद्र अभिषेकी yob 1929-7/11/1998 बा.भ.बोरकर ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४ वि वा शिरवाडकर- मुळ नाव- गजानन रंगनाथ शिरवाडकर २७ फेब्रुवारी १९१२- १० मार्च १९९९ शिवाजी सावंत ऑगस्ट ३१, १९४० - सप्टेंबर १८, २००२ सुहासिनी मुळगावकर जन्मतारीख ?- मृत्यू 14/91989 किशोरी अमोंणकर 10एप्रिल 1932- 3 एप्रिल 2017 रामदास कामत १८ फेब्रुवारी १९३१ - ८ जानेवारी 2022 विक्रम गोखले14 नोव्हेंबर 1945 - 26 नोव्हेंबर 2022 माणिक वर्मा 16 May 1926-November 10, 1996 दीनानाथ मंगेशकर यांचे खरे आडनाव हर्डीकर होते पण वडील मंगेशी च्या देवळामध्ये अभिषेकी असल्यामुळे मंगेश कर आडनाव पडलेडिसेंबर 29 डिसेंबर 1900 - 24 एप्रिल 1942 लता मंगेशकर २८ सप्टेंबर १९२९- ६ फेब्रुवारी २०२२ सुरेश भट 15 एप्रिल 1932 - 14 मार्च 2003 ( चूक भूल द्यावी घ्यावी) हे लिहीत असताना मला आठवले की मी चार-पाच दशकापूर्वी ज्योतिषाचा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा कोणी भेटले वेगवेगळ्या क्षेत्रातले तर त्यांना मी जन्मतारीख विचारून जर स्थळ आणि वेळ समजले तर पत्रिका ही बनवून एका डायरीमध्ये त्या त्या तारखेला त्यांची नोंद घेत असे जसे विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असते तशी ती कळ्या रंगाची डायरी अजूनही माझ्या संग्रहात आहे त्यामध्ये देखील ही अशीच इतरही अनेक कलावंत शास्त्रज्ञ साहित्यिक यांच्या जन्मतारखा व आयात नसले तर मृत्यू देखील नोंदवले होते. इतिहासातील नजीकच्या इतिहासातील पाऊलखुणा म्हणून हा सारा जन्मतारीख मृत्यू आणि ती ती व्यक्ती यांच्या नोंदीचा खजिना अधून मधून नजरेखाली घालत असतो. जसे जमेल तेव्हा तोही आपल्यासमोर खोला करण्याचा मानस आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या या व्यक्तींच्या आठवणीमुळे आपल्यालाही प्रेरणादायी असे आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवावे असा विचार येऊ शकेल. धन्यवाद श्री सुधाकर नातू

सोमवार, १२ मे, २०२५

" एक मनभावन शारदोत्सव विपुलश्री मे 25 चा अंक

😄" एक मनभावन शारदोत्सव":😄 'विपुलश्री' मासिकाचा मे'25 महिन्याचा अंक वाचून मला जो समाधानाचा खजिना आणि जाणीवांच्या महासागराचा स्पर्श झाला, तो खरोखर शब्दात वर्णन करण्यासञ मी समर्थ आहे. ह्या मासिकाच्या वाचनाने भारावून गेलो आहे. दोनच वानगीदाखल 'छाप पडलेले शब्द' म्हणून येथे संपादकीय आणि कथास्पर्धेच्या परीक्षकांचे मनोगत scanned स्वरूपात मांडत आहे. तसेच विपुलश्री मासिकाच्या मे25 च्या अंकाचा रसास्वाद मी येथे मांडत आहे. पहिली गोष्ट मला मान्य करावीशी वाटते ती म्हणजे, आतापर्यंत माझे वाचन किती मर्यादित होते, त्याची मला या मासिकातील कथास्पर्धेच्या संबंधीच्या परीक्षक नीलिमा बोरवणकर यांच्या मनोगतामुळे कळले आहे. आतापर्यंत मी व्यक्तीचित्र किंवा एखादी नवीन माहिती असलेले किंवा किंवा आत्मचरित्र एवढेच माझे वाचन मर्यादित होते परंतु कथा म्हणजे नुसती गोष्ट नव्हे तर अजून बरंच काही असतं असं या निवेदनात म्हटले आहे कथा म्हणजे केवळ गोष्ट नव्हे तर आर्थिक गोष्ट कुणाच्या आयुष्यात घडणार त्या व्यक्तीरेखा हव्यात गोष्ट नक्कीच हवी कथाबीजव पण ज्या व्यक्तींच्या मध्ये ती गोष्ट केव्हा घडला घडते त्यामधील आपसातले संवाद हवेत घटना प्रसंग हवेत आणि कथा म्हणजे या सगळ्याच योग्य मिश्रण हे जे निवेदन माझ्या आतापर्यंतच्या अपेक्षांना पूर्ण छेद देणारे होते मला वाटायचे की कथेमध्ये उगाचच भराभर संवाद आणि बरंच काही पालाळीत लिहिलेलं असतं आणि शेवटी थोडक्यात जे काय घडतंय किंवा घडणार आहे किंवा घडून गेलंय ते थोडक्यात का सांगितलं जात नाही असं मला वाटायचं. पण आता मला पूर्ण कळून चुकलं की, ती चूक होती. या मनात घट्ट बसलेल्या समजूती पायी मी साहित्यातील एका मोठ्या क्षेत्राला मुकलो कारण कथा असलेले मी काही जास्त वाचत नसे. कथा स्पर्धेमध्ये ज्या दिन कथा बक्षीस पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या वाचनाने मला समजून आले की लघुकथा कथा म्हणजे काय तर एक विषय नक्कीच असतो, पण तो विषय कुणाच्या बाबतीत घडतो कसा घडतो आणि परिणती काय होते याचे जे काही रसायन ते म्हणजे लघुकथा. आता या तिन्ही पारितोषक पात्र लघुकथा देखील खरोखर प्रत्येक विषय वेगळा असणाऱ्या आहेत 'युथ इन एशिया' ही कथा इच्छा मरणावरती आहे- लेखक डॉक्टर शुभंकर कुलकर्णी. इच्छामरण अपेक्षणारी या कथेतील नायिका शेवटी कशी त्यापासून दूर जाते आणि जीवन चवीने जगाव यासाठी उद्युक्त होते हा तो धक्का आहे. दुसरी जी पारितोषकपात्र कथा धिंड' आहे लेखिका डॉक्टर स्वरूप भागवत. कथेमध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यासाठी धडपडणारी आंदोलन करणारी जी स्त्री आहे तिच्याच आयुष्यात एका घटनेमुळे केवढी भयानक अशी भूकंपा सारखी घटना घडते कारण एका मुलीवर अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच मुलगा निघतो. तिसरी पारितोषक पात्रकथा निल चित्र आहे लेखक डॉक्टर अभय वळसंकर. एकल ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मनोव्यथा व्यक्त करताना ब्लू फिल्मचा विषय मोठ्या खुबीने हाताळला आहे. वडील आणि मुलगी यांच्या मतभेदांमधील ताणतणाव व्यक्त करता करता, शेवटी प्रत्येकाला आपलं मन असतं आणि त्याप्रमाणे त्याला आपल्या मनाप्रमाणे वागण्याची उभा असते हा मुद्दा मांडला आहे. # डॉक्टर शिरीन वळवडे यांचा तिसरी जी पारितोषक पात्र कथा आहे तिच्यामध्ये एकल ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मनोव्याता व्यक्त करताना ब्लू फिल्म चा विषय मोठ्या खुबीने हाताळला आहे आणि शेवटी प्रत्येकाला आपलं मन असतं आणि त्याप्रमाणे त्याला तेवार्तालाप आपल्याला जगामधल्या चित्र विचित्र सुरत अशी माहिती पेश करतो त्यामध्ये एम एम मधलं एक गाव असा आहे की जिथे कधीच पाऊस पडत नाही. # एक स्त्री म्हणून तिलाही एक स्वतंत्र अस्तित्व असतं हे अधोरेखित करीत स्त्री विकासावरच्या काही स्त्रियांची माहिती देणारं सदर म्हणजे तू चाल पुढे मंगला गोखले यांनी जिद्दी प्रेमाताई पुरव यांच्या आयुष्याची संघर्षमय आणि थरारक अशी कहाणी सादर केली आहे. ती बघून आपल्याला या स्त्रीच्या कर्तृत्वाचं आश्चर्य मिश्रित कौतुक वाटते. # अगदी आगळा वेगळा विषय म्हणजे 'संस्कृत साहित्यातील कवीसंकेत' डॉक्टर लिली जोशी यांचा लेख वाचनीय आहे. देव देवता दैवी शस्त्रे वाहने इत्यादी संबंधित जी माहिती आपल्याला संस्कृत साहित्यातून आणि तेथील कवींच्या रचनांमधून आढळून येते की किती चित्तथरारक आणि रोमहर्षक असते हेच आपल्याला या लेखावरून कळून येत आणि आपल्या देव-देवतांच्या अप्सरांच्या ज्या प्रतिमा आपल्या मनात निर्माण आहेत, त्यामागचं मीमांसा येथे आपल्याला समजून येते. # 'आठवले तसे' या सदरामध्ये डॉक्टर विजया फडणीस यांनी निसटलेले जे आपल्याला हवे असते त्यासंबंधी विविध उदाहरणांवरून उहापोह केला आहे. आपला अपेक्षाभंग आयुष्यामध्ये अनेक वेळा होत असतो हे जरी खरे असले तरी, त्यामधूनही वेगळा असा मार्ग निघतो संधी प्राप्त होते. 💐" Take Risks in your life" If you win, you can lead. If you lose, you can guide !":💐 # Swami Vivekanand. आज संदेशही त्याने येथे दिला आहे. त्यांना स्वतःला अपेक्षित नोकरी न मिळाल्यामुळे त्यांनी त्या अपेक्षाभंगामुळे नाऊमेद न होता, स्वतःचा असा मानसशास्त्रीय कन्सल्टिंग व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये त्यांना कसे यश आले हे सांगितले आहे. परिस्थितीशी जुळवून घ्यावे निराश होऊ नये, हेच खरे. # सगळ्यात कुठली आगळीवेगळी अशी गोष्ट या अंकात असेल तर ती म्हणजे अंध व्यक्तींना चित्र पाहू शकण्याची अशी जी काही किमया आहे ती साध्य करणारे ठिजल्या डोळ्यांना पाहायला शिकवणारा चित्रकार चिंतामणी हसबनीस यांची सुप्रिया जोगदेव यांनी ओळख करून दिली आहे. एकदा रस्त्याने जाताना अनुभव असा आला की, लाल सिग्नल लागला, गाडी थांबवली. समोरून एक अंध मुलगी जात होती त्यावेळेला त्यांना वाटलं 'अरे आपली चित्रे ही दुर्दैवी अंधमंडळी कशी बघू शकतील? त्यांना आपण ते बघता यावं असा प्रयत्न करायला हवा आणि त्याच्या मागे लागून त्यांनी जे पुढे यश मिळवलं ते खरोखर कमालीचं जगावेगळ अद्वितीयच होतं. ब्रेल लिपी शिकून त्यांनी अशी काही प्रदर्शना भरवली की जी अंधमंडळीसुद्धा बघू शकतात. खरोखर एकाच अंकात इतक्या वैविध्यपूर्ण साहित्याचा अनमोल खजिना आपल्याला मिळावा, हा एक भाग्ययोग होय. # खगोल विश्वातील विलक्षण परग्रह याची माहिती लीना दामले यांनी दिली आहे. जेम्स वेब दुर्बिणीमुळे एक आपल्या नेपच्यून असा ग्रह सापडला आहे की जो एका बाजूलाच नेहमी असतो आणि तो त्याच्याच सूर्याच्या अगदी जवळ आहे. एका बाजूला प्रचंड तापमान तर दुसऱ्या बाजूला थंड असा तो परग्रह Cuancoa हा आहे. तो खरोखर आश्चर्यकारक आहे, तू सूर्याभोवती 19 तासात फिरतो त्याचे वस्तुमान आपल्या पृथ्वीच्या 29 पट जास्त आहे. त्या लेखामध्ये असेही समजते की, 128 चंद्रांचा शोध लागला आणि शेवटी आपल्याला लक्षात आलं की शक्तिमान दुर्बिणी मुळे काय नवल घडू शकते. सूर्यमालेतील चंद्रांची संख्या 181 होती ती आता 274 झाली आहे. एवढेच नव्हे तर शनिभोवती देखील 62 चंद्रांचा शोध लागला. आहे ! या विश्वाचे गुढ खरोखर अनाकलनीय आहे आणि विश्व अनंत अथांग आहे हेच यावरून समजायचे. # 'केल्याने देशाटन' या सदरामध्ये नीलिमा बोरवणकर यांनी मध्ये आपल्याला एक वेगळीच माहिती उलगडली आहे. बुद्ध धर्माचा प्रसार जितका बाहेरच्या देशामध्ये झाला आणि तितका आपल्या भारतात झाला नाही थायलंड वेतनाम अशा अनेक देशांमध्ये बौद्ध लोक आहेत. तिथे माहिती कळली की सिद्धार्थ बुद्ध कसा झाला तर गया शहरामधील बोधिवृक्षाच्या खाली तो बसला आणि त्या वृक्षांच्या खाली बसल्यावर त्याला साक्षात्कार होऊन तो बुद्ध धर्म स्थापन करता झाला. त्याचमुळे जगामध्ये शांतीचा प्रसार करण्याचा योग आला. तर याच गयेमध्ये आणि नालंदा विद्यापीठाची स्थापना एक शांत काम पूर्वी झाली आणि जीचे आता पुनर्जीवन होत आहे त्याची माहिती देखील या लेखांमध्ये आपल्याला होते. बौद्ध धर्माचा प्रसार थायलंड कांबोडिया इंडोनेशिया, जपान अशा 18 देशात बुद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बुद्ध जगाला शांतीचा संदेश देतो. नालंदा विद्यापीठाचे कार्य काय हे शोधताना तेथून बुद्ध धर्माचा प्रसार त्यामुळेच कसा झाला त्याची माहिती आहे. मराठी मासिकांची संख्या आता केविलवाणी म्हणावी अशी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच झालेली आहे तीच गोष्ट मराठी माध्यमांच्या शाळांची ही आहे अभिजात मराठी भाषा असा अभिमान बाळगत असताना हे वास्तव पचायला कठीण आहे या पार्श्वभूमीवर विपुल श्री सारखे मासिक गेली 25 वर्षे साहित्य क्षेत्रात सन्मानाने सुरू आहे आणि उत्तर उत्तर एखादा वस्तू पाठ असावा अशा तऱ्हेचे साहित्य त्यातून दिले जाते आहे ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. असा अंक हाती येणे हे माझे भाग्य तसेच हा असा रसास्वाद तुमच्यासमोर उलगडताना मला होणारा आनंद वेगळ्याच प्रतीचा आहे म्हणूनच म्हणतो हा मनभावन शारदोत्सव !" धन्यवाद श्री सुधाकर नातू

गुरुवार, ८ मे, २०२५

😇😗"मागे वळून पाहताना पुढे जाण्यापूर्वी !":😇

😇😗"मागे वळून पाहताना पुढे जाण्यापूर्वी !":😇 दररोज सकाळी उठल्यावर आपण आज काय करायचं यावर काही ना काहीतरी विचार असतो. अर्थात प्रातर्विधी आणि धरण पोषण यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या मात्र बहुदा ठरवल्याप्रमाणे त्या त्यावेळी केल्या जातात अर्थात काहींच्या बाबतीत तेही जमतं असं नाही, जीवनशैली जशी असेल मार्ग चाललेला असतो. दररोज सकाळी उठल्यावर मला देखील एका कागदावर आज काय करायचं हे ठरवायची पद्धत आहे, सवय आहे. परंतु माझ्या लक्षात नेहमी येतं की आज ठरवलेलं काम उद्याही केलं जात नाही, परवाही केलं जात नाही आणि मग आठवड्याच्या अखेर मी जेव्हा रिव्ह्यू घेतो त्यावेळेला लक्षात येतं की अरे आपण हे ठरवलं होतं पण ते झालंच नाही ! म्हणजे ठरवलेले हरवते. मागच्या आठवड्यात मी ठरवलं की बँकेचे महत्त्वाचं काम करायचं परंतु काही केल्या संबंध आठवडा गेला, कामाची रोज ते नोंद केली जात होती, पण ते काही झालं नाही. दुसरं म्हणजे मी ठरवलं होतं की रोज साधारण 4500 पावलं चालायचं. तसं कधी झालं तर दोन किंवा तीन दिवसात झालं, उरलेले चार दिवस ते फिरणं झालं नाही. हे असं नेहमी लक्षात येत मग आपल्याला रुख रुख वाटते, अरेेच्या, आपण ठरवलेलं हरवलं कां? एक साधं उदाहरण आपल्या या कोरोनाच्या काळात प्रत्येकाला साधारण सांगितलं होतं की रोज वाफारे घ्या, सतत हात धुवा, मास्क वापरा हे जे सगळे प्रकार सांगितले होते. ते किती जणांनी सातत्याने केले शंकाच आहे ! हे आपण ठरवतो आणि ते होत नाही याला कारण काय तर ते कारण शोधायची फार मोठी कठीण परिस्थिती आहे. एखाद्या चक्रव्यूहात जावं त्याप्रमाणे आपल्याला ठरवलेलं हरवतं कां, याचं कारण काही समजत नाही. त्याला कारण आपणच असतो, आपला आळस म्हणा आपली दिरंगाई म्हणा आपली अनिच्छा असंच असतं. आता बँकेचं काम तिचं जे लोकेशन आहे ते त्रासदायक असल्यामुळे तिकडे जायला प्रसन्न नाही वाटत म्हणून. फिरण्याचा आळस असाच, कोरोना काळामुळे शक्यतोवर बाहेर जायचं नाही अशीच जी सवय लागलेली त्याच्यामुळे. साधं कशाला आपल्या घरी उपवर वधूंच जेव्हा संशोधन लग्नासाठी केलं जातं तेव्हा किती वेळा तरी ठरवलेली लग्न मोडतात. साखरपुडा झाला पण नंतर काहीतरी घडतं आणि ते ठरवलेलं लग्न मोडतं, असे बऱ्याच वेळेला प्रकार होतात. एवढच काय विवाह केला जातो एक दोन वर्षात तो मोडतो. एक साधं उदाहरण माझ्या आठवणीत आहे माझ्या कंपन्यांमध्ये नोकरीला तो तरुण मुलगा होता. चांगला स्वतंत्र ब्लॉक आणि एकमेकांना अनुरूप आवडलेले प्रेम केलेले असे जोडपे. पण झालं काय या मुलीला स्वयंपाक करायची घरात काहीही काम करायची सवय नव्हती. त्यामुळे काही ना काही रोज बाहेरून मागवले जायचे. यावरून वाद व्हायला लागले आणि यावरूनच त्या दोघांनी घटस्फोट घेतला. शेवटी अनेक उदाहरणं आपल्याला व्यावहारिक जीवनात आढळतात की, आपण ठरवतोय एक आणि होतं मात्र भलतच ! हीच तर जीवनाची गंमत आहे. आपल्याला जे ठरवलंय ते जर व्हायला हवं असेल तर निश्चय हवा, प्रयत्न हवेत आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीची अनुकूलता असावी. परिस्थिती कधी कधी अशी निर्माण होते की तुम्ही ठरवलेलं होतं ते बिघडत. परवाचच एक शेवटी उदाहरण सांगतो. मला पुण्याला जायचं होतं, कुणाच्या गाडीची लिफ्ट, येताना त्याच्याच बरोबर लिफ्ट !, एवढेच काय दोन-तीन दिवसांच्या व्हिजिटमध्ये एक नाटकही बघायचं ठरवलं होतं. पण झालं काय आदल्या दिवशी अचानक घरातीलच एका व्यक्तीची मेडिकल कंडिशन निर्माण झाल्यामुळे, सारा प्रोग्रॅम कॅन्सल करावा लागला व प्रत्येकाला कळवावे लागले ! खरंच तुमच्या हातात काही नसते, त्यामुळे ठरवलेलं हरवतं किंवा तुम्हीच काही ना काहीतरी करून ठरवलेलं करत नाही. अशी अनुभवांची जी साखळी आहे ती आयुष्यामध्ये सातत्याने आपण चाललेली बघतो. आज मला सकाळी हे सारे सुचलं आणि मी एवढं ठरवलंय की, आता दररोज शक्यतोवर सकाळी उठल्यावर आपल्याला जे काही सुचतं ते असं ध्वनिफीतिमध्ये म्हणा लेखांमध्ये म्हणा रूपांतरित करायचं. अर्थात आठ दिवसात आठ ऑडिओ क्लिप्स बनतील याची खात्री नाही, कारण ठरवलेलं नेहमी हरवत, हो की नाही !" धन्यवाद श्री सुधाकर नातू

गुरुवार, १ मे, २०२५

👍" बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍

👍 बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले-भाग 2 !":👍 💐 " द ट्रायल ही जगविख्यात लेखक फ्राॅन्झ काफ्का याची कादंबरी एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडते माणसाला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वतःचे भागदेय ठरविण्याचे स्वातंत्र्य असते कां? प्राचीन काळापासून प्रचलित असलेले नियतीवादी तत्त्वज्ञान आणि आधुनिक जैव रसायनशास्त्र आणि मानसशास्त्र यामधील संशोधक याचे नकारार्थी उत्तर देतात. जीव जन्माला येतो तो त्याच्या इच्छेविरुद्ध आणि मृत्यू सुद्धा पावतो तो त्याच्या इच्छेविरुद्ध. या दोन बिंदूंच्या मधल्या आयुष्यावर त्याचे कुठलेही नियंत्रण नसते. असंवेदनशील असंगत अलिप्त आणि अमानुष व्यवस्थेमध्ये मानवी जगण्याची अपरिहार्य अर्थहीनता आणि अनिश्चितता अधोरेखित करणारी अशी ही अर्थसधन कादंबरी आहे !":💐 '############## 👍 "बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍 💐"आयुष्यात जर समाधान हव असेल तर चातुर्य अजिबात उपयोगी पडत नाही. मर मर मरायचं आणि वरवरचं यश मिळवायचं आणि पुन्हा अतृप्ती ती अतृप्तीच त्यापेक्षा आपण या धावपळीतून. बाजूला झालेलं बरं. कधीतरी हा विचार मनात डोकावला आणि मी स्पर्धेतून बाजूला झालो. माझ्या आयुष्यातून मी स्पर्धा वजा केली आणि मला अगदी वेगळ्या प्रकारचं सुख लाभलं. मनावरचा सगळा भार उतरून ठेवल्यासारखं वाटलं. स्पर्धाहीन अशा समाधानी जीवनाचा हा महेश सावंत धनी झाला होता. मी समाधान मिळविण्यासाठी मात्र महाराजांच्या शाब्दिक प्रवचनाला निघालो होतो. केवढा हा फरक ! त्या क्षणी मी मनानं कुठेतरी निर्णय घेतला. प्रवचन वगैरे सगळे बाह्य उपचार खुंटीला टांगून ठेवायचे. आयुष्याच्या जीवघेण्या स्पर्धेतून अंग हलकेच बाजूला काढून घ्यायचं आणि सार्थ जीवन निसर्गाच्या बरोबर शांतपणे जगायचं. असं स्पर्धा निरपेक्ष जीवन जगणं हीच एक प्रार्थना असेल नि मिळेल ते समाधान हाच देवाचा प्रसाद !":💐 # रवींद्र पिंगे ##############