मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५
" सोशल मीडियावरील माझी मुशाफिरी- भाग 11 !":
😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇
😭 # आता 'काहीही हं हं 'नाही,
तर
'इडियट बॉक्स'चे नांव
सार्थक करण्याची अहमहीका !":
# 'घरोघरी मातीच्या चुली'
' मुलगी पसंत आहे'
' नवीन जन्मेन मी'....
सारख्या पोरखेळ करत लांबत
जाणाऱ्या अनेक मालिका !
# 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्'
आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल'
प्रमाणे
प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार
हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम....
# रोज सगळीकडे त्याच त्याच,
कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या....
# प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ...
अन्
निखळ करमणुकीचे मृगजळ !
# आता दर्शकांनी
कीव करावी,
की दया दाखवावी,
करमणुकीचा बाजार उठवणाऱ्याची !":😭
# बहुजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये आदर्श हे कोणत्यातरी ते उभे राहत आहेत याचा सगळ्यांनी विचार करायला हवा दुर्दैव हे की याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही अंधकारमय समाज रास नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल असेच सध्या दिसते शेवटी हेच खरे
What goes up goes down !"
1
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 326 !":👌
💐 " ओंकार हा विश्वातील पहिला स्वर !
त्यामधून निर्माण झालेलीआवाजाची दुनियाच न्यारी ! मानवाने मानवाला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी कुठली असेल तर ते म्हणजे गीत संगीत कसे ते समजण्यासाठी पुढील लिंक उघडा
2
💐II " नवीन वर्षाचा नवा संकल्प-6 II💐
👍" शारदोत्सव!":👌
'नटखट नट-खट मोहन जोशी':
एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी!
--–👌--------------👌--------------👌---------
'नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली.
अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द व कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते.
गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया न जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ न बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी न डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे.
अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. अ.भा.नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर थक्क करणारी आहे. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत.
ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो.
कुठेही कंटाळा न येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी
व-त्यांचे शुभचिंतन.
3
😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇
😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल.
विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे:
झोपण्यात गेलेला वेळ
सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे,
सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत.
एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो.
त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !"
आता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे
हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील
# "अलिप्तपण दे रे राम,
मजविण तू मज दे रे राम !"
# " मनी आणावे ते होते,
विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄
4
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍 " मुक्तसंवाद- कल्पनांची दखल उपक्रमांची उकल !":👌
"अभिवाचन क्रमांक 340 !":
😝 " माणसाला बुद्धी बरोबर जर अजून एक शक्ती दिली असेल, तर ती म्हणजे कल्पना करण्याची ! केवळ निवांतपणे आपणच आपल्याशी संवाद साधावा लागतो. श्री सुधाकर नातू हे 'वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री !' या रूपात सोशल मीडियावर अनेक उपक्रम गेली काही वर्षे सादर करत आहेत. त्यांच्या ह्या अभिवाचनात, त्यांना अनेकांनी कल्पना कशा सुचत गेल्या आणि त्यातून 'छाप पडलेले शब्द' सारख्या उपक्रमाचा प्रारंभ कसा झाला ते उघडले आहे.
'वाचता वाचता वेचलेले' असे 'छाप पडलेले शब्द' आपल्यालाही अधून मधून विचार प्रवृत्त करून व्यक्त व्हायला लावू शकतात !":😝
ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते.
त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर थोड्याशा व्यत्ययानंतर लवकरच !
आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे.
आमच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा !"🥵
5
💐II मंगल प्रभात II💐
👍" बोल अमोल 330 !":👌
😀 " जगात जे घडतं त्यामागे काही ना काही कारण असतं यासाठी कार्यकारण भाव प्रत्येक वेळेला शोधला पाहिजे छातीत कफ होतो त्याचं कारण या माणसाला रात्री दूध हळद पिताना फ्रीजमधून दूध काढल्यावर त्याच्यावरची साय खाण्याची सवय होती दिवसेंदिवस या सवयीमुळे त्याला कफ झाला हा शोध त्याला त्याने जेव्हा कार्यकारण भाव यावर विचार केला तेव्हा समजले तसे करणे सोडून दिल्यावर त्याचा कफ हळूहळू कमी होत नाहीसाही झाला लक्षात ठेवा काहीही आपोआप घडत नाही कारण शोधा उपाय काढा !":😀
वाकडे, तिडके,
इकडे, तिकडे.
उघडे, बोडके,
इकडे, तिकडे.
थापाडे, खोटार्डे,
इकडे, तिकडे,
खादाडे, माजोर्डे,
इकडे, तिकडे.
सब घोडे, बाराटक्के,
इकडे, तिकडे चोहीकडे!!
करावी, कशी निवड?
कुणाला, आहे सवड!!":😀
6
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-90 !":👌
💐 " गीत संगीताची स्वरबहार म्हणजे माणसाच्या आयुष्यातील जणू पारिजातकाच्या फुलांचा सडाच सुरेल संगीताचे वरदान सुनील स्वराचे वरदान ज्यांना लाभते ते खरंच भाग्यवान बाकी तुम्हा आम्हा सारखे बाथरूम सिंगरच !
पुढील लिंकस् उघडून....
3 सुरेल गाणी ऐका.......
1 गाना आये ना आये गाना चाहिए...
2 तू कहे अगर, जीवनभर .....
3 झूम झूम कर नाचो आज....
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
/==
7
👍 "छाप डलेले शब्द !":👍
💐"कर्तृत्ववान माणसांचे व मुंबईचे जीवाभावाचे नाते !":💐
😀 "सोबतच्या वृत्तात आत्मसंवाद करणारे श्री सुहास पेडणेकर हे प्रथम रुईयाचे प्राचार्य आणि नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत एवढीच फक्त माहिती मला होती पण या मुक्त संवादामुळे आत्मसंवादामुळे त्यांची कोकणातील खेड्यात असलेली शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि तेथून मुंबईत येऊन त्यांनी स्वतःच्या गुणांवर व कष्टांवर की गरुड भरारी घेतली हे समजून मन भरून आले
गुणवत्ता त्या जोडीला जर जिद्दीने कष्ट घ्यायची तयारी असेल तर ही मुंबापुरी तुम्हाला कोणतीही स्वप्न साकार करायची संधी देते हेच या साऱ्या निवेदनावरून उमजले. कुणालाही विलक्षण प्रेरणादायी वाटणारी ही कहाणी खरोखर कौतुकास्पदच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन.
जाता जाता माझ्याही रुईया आणि त्यांच्या परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या कारण आम्ही सारी भावंडे रिया कॉलेजचेच विद्यार्थी आणि मी तर जवळच असलेल्या किंग जॉर्ज मध्ये जोडीला माझे वडील रुईया कॉलेजच्या स्थापनेपासून ते रजिस्टर होऊन निवृत्त होईपर्यंत रुहयामध्येच खरंच हे राम नारायण रुईया कॉलेज आणि मुंबईत येऊन विविध क्षेत्रात कीर्तिमान होणाऱ्या व्यक्तींचे यांचे नाते खरंच जीवाभावाचे आहे!":😀
कर्तृत्ववान गुणी व्यक्तिमत्त्वे !":💐
विख्यात पत्रकार श्री दिनकर गांगल यांच्या सोबतच्या महाराष्ट्र टाइम्समधील
लेखांत बाळासाहेब सांडू यांनी चेंबूर मध्ये केलेले समाजोपयोगी कार्य आणि व्यावसायिक योगदान वाचून मन भरून आले. सध्या खा खा सुटलेल्या या जगात अशी माणसे दुर्मिळ म्हणायची. एक मात्र मनामध्ये किंतु निर्माण झाला आणि वाईटही वाटले यासाठी की, आपल्यामध्ये ही अशी अनेक माणसे आपापल्या परीने आपल्या क्षेत्रामध्ये हितकारक आणि दखल घ्यावी अशी कार्य करून गेलेली असतात. त्यांची आठवण मात्र सार्वजनिक रित्या समाजाला ही अशी ती आदर्शवत
माणसे निवर्तल्यावरच होते, ही ती रुख रुख. सगळीकडे घोटाळे, गुन्हेगारी भ्रष्टाचार अप्पलपोटेपणा सायबर क्राईम अशा तऱ्हेचीच त्रासदायक वृत्ते सार्वजनिक विविध मीडियावरून नजरेस येत असताना, ही अशी आपल्यातल्या असलेल्या पूर्वी चांगले काम करून गेलेल्या माणसांची देखील ओळख माध्यमांनी करून दिली पाहिजे. विशेषत: वर्तमानपत्रांनी त्याची योग्य ती दखल घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करावेत. आजच्या काळाची ती गरज आहे,असे मला या वृत्तामुळे वाटले जे वाटले ते पारदर्शकपणे मांडले.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
"रंगारंग रंंगदर्शन
https://drive.google.com/file/d/17xWTJqNbxe-0G4ovx17SGu-Ihfuc3Alz/view?usp=drivesdk
सोबतच्या वृत्तात आत्मसंवाद करणारे श्री सुहास पेडणेकर हे प्रथम रुईयाचे प्राचार्य आणि नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत एवढीच फक्त माहिती मला होती पण या मुक्त संवादामुळे आत्मसंवादामुळे त्यांची कोकणातील खेड्यात असलेली शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि तेथून मुंबईत येऊन त्यांनी स्वतःच्या गुणांवर व कष्टांवर की गरुड भरारी घेतली हे समजून मन भरून आले
गुणवत्ता त्या जोडीला जर जिद्दीने कष्ट घ्यायची तयारी असेल तर ही मुंबापुरी तुम्हाला कोणतीही स्वप्न साकार करायची संधी देते हेच या साऱ्या निवेदनावरून उमजले. कुणालाही विलक्षण प्रेरणादायी वाटणारी ही कहाणी खरोखर कौतुकास्पदच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन.
जाता जाता माझ्याही रुईया आणि त्यांच्या परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या कारण आम्ही सारी भावंडे रिया कॉलेजचेच विद्यार्थी आणि मी तर जवळच असलेल्या किंग जॉर्ज मध्ये जोडीला माझे वडील रुईया कॉलेजच्या स्थापनेपासून ते रजिस्टर होऊन निवृत्त होईपर्यंत रुहयामध्येच खरंच हे राम नारायण रुईया कॉलेज आणि मुंबईत येऊन विविध क्षेत्रात कीर्तिमान होणाऱ्या व्यक्तींचे यांचे नाते खरंच जीवाभावाचे आहे
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५
" बिंब प्रतिबिंब- सोशल मीडियावरील जुगलबंदी !":
मला व्हाट्सअप वर एक मेसेज आला. मी सहसा असे रााजकीय मेसेज वाचतो आणि भविष्य डिलीट करून टाकतो. पण मला काय वाटले कुणास ठाऊक हा मेसेज आपण या तऱ्हेची पोस्ट किंवा मेसेजेस आपल्याकडे जो पाठवतो, त्याला हा पाठवून बघूया. यांना आपण ए आणि बी असे समजूया. त्याप्रमाणे मी ए चा मेसेज बी ला पाठवून दिला आणि काही उत्तर येते का बघत राहिलो. तर त्यानंतर छोटी मोठी जी जुगलबंदी झाली, ती या लेखात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला या विषयावर जास्त काही माहिती नाही, कळतही नाही. पण दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्तींच्या विचारांची ही देवाणघेवाण आपण एका लेखात मांडावी अशी कल्पना आली आणि मी हा प्रयत्न केला. पहा, वाचा आणि ठरवा ही idea कशी वाटते, ते !,,,
A: China unveils worlds first offshore oil production vessel with carbon capture on board.
Meanwhile we are busy with the Kumbh Mela, temple convention in Tirupati & forced to buy unnecessary F35.
👆🏽👆🏽👆🏽👆🏽 B ला पाठवला...
B: "आपल्याला ह्या क्षेत्राची माहिती दिसत नाही.*
*आपल्याला भारताचे तेल आणि गॅस संबंधीचे प्रकल्प तसेच या क्षेत्रात होत असलेले प्रयत्न माहिती दिसत नाहीत. भारताची उर्जेची गरज प्रचंड आहे. ती ह्या तेलाने भरुन निघणारी नाही. म्हणुनच आपल्या सरकारने पॅरिस करारावर सह्या केल्या आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. आपण २०३० साठी ठरवलेले उद्दीष्ट आणि परिषदेला दिलेले आश्वासन २०२४ सालीच पुरे केले आहे. यापुढे जाऊन आपण सौरऊर्जा, अणुऊर्जा आणि हैड्रोजन गॅस इंधनावर विशेष लक्ष केंद्रित करुन त्यावर खास संशोधन करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सरकारने अनेक शिक्षणसंस्था आणि खाजगी कंपन्यांना अनुदान दिले आहे. या महीन्यात आपली हैड्रोजनवर चालणारी गाडी लवकरच धावणार आहे. बस आधीच धावली आहे आणि तीच्या पुढील चाचण्या घेतल्या जात आहेत. आपण या क्षेत्रात जगात खुपच पुढे आहोत. खरेतर ही संशोधने अनेक दशकांपूर्वीच सुरु व्हायला पाहिजे होती. चीन खडबडून जागा होऊन धावत होता तर आपण भ्रष्टाचारात गुंतुन झोपलो होतो. हे सर्वच क्षेत्रात घडले.*
Also...
B *आपली सनातनी हिंदू सांस्कृतीक विरासत, आपला वारसा, आपली राष्ट्रीय ओळख पूर्नस्थापित करणे अत्यावश्यक आहे. सर्वांगीण विकासावर भर देताना याकडे पण लक्ष ठेवणे ही राष्ट्राचीच नाही तर जगाची गरज आहे. जगाला जिहादी इस्लामीक विचारसरणीला तोंड देऊन नेस्तनाबूत करायचे असेल तर हे करावेच लागेल. म्हणुनच जगातुन विविध धर्मांच्या लाखो लोकांनी महाकुंभ मेळ्याला आस्थेने हजेरी लावली. जय श्रीराम!*
👆🏽👆🏽👆🏽👆🏽 A ला पाठवला...
A: "विचारांचे आणि माहितीचे स्वागत आहे.
बलाढ्य बनण्याचे विचार, कृती आणि प्रगती ही जुळायला हवी. कोणा 2 टाकल्याचे ते काम नसावे & राष्ट्रीय थिंक tank हवी.
अति जलद, निस्वार्थ आणि फोकस्ड प्रगती करावी लागेल.
अनेक ज्ञानी, गुणी, कर्तबगार, न आवडणाऱ्या & वेगळ्या विचारसरणीच्या मंडळींना देखील हाताशी घेऊन प्रकल्प राबवावे लागतील.
नाहीतर इतर देशांच्या वेगवान सायन्स & टेक (STEM) प्रकल्पांचे आपण परत गुलाम बनुं.
/_/ 👆🏽👆🏽👆🏽👆🏽 B ला पाठवला...
=// 🙋♂️ *मी मागे अनेकवेळा म्हटल्याप्रमाणे हे विचार अज्ञानावर आणि अनभिज्ञतेवर आधारित आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. देशाला बल्याढ्य आणि विकसीत बनविण्यासाठी अनेक आघाड्यांवर सतत लक्ष केंद्रित करुन योजनाबद्ध रितीने काम चालु आहे. यावेळचे बजेट बारकाईने वाचले आणि त्याची नीती आयोगाच्या कार्यक्रमांशी सांगड घातली तर बरेच काही स्पष्ट होईल. सरकार कसे चालते आणि निर्णय कसे आणि कोण घेते याची आपल्याला माहीती नसली की आपण दोन व्यक्ती सरकार चालवतात अशी बेभान वक्तव्ये करायला लागतो. प्रत्येक मंत्रालयाचे एक मोठे सचिवालय असते. त्यात अनेक उच्च शिक्षित, कार्यकुशल, विद्वान नोकरशहा असतात. तसेच प्रत्येक मंत्रालयासाठी संसदीय समित्या असतात, ज्यात सर्व पक्षीय खासदार असतात. त्या समित्यांमध्ये त्या त्या मंत्रालयाच्या संबंधित सर्व विषयांवर साधकबाधक चर्चा सतत होतात. तसेच या प्रत्येक मंत्रालयांसाठी कॅबिनेटच्या कमिट्या असतात. सर्व निर्णय बहुतेक यांच्या अहलावर होतात. पंतप्रधान आणि त्यांचे कार्यालय त्यावर शिक्कामोर्तब करते. क्वचित प्रसंगी पंतप्रधान आपला निर्णय घेतात. तो त्यांचा संविधानीक अधिकार आहे. पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या अनेक कमिट्या पंतप्रधानांच्या कार्यालयात असतात. त्यात भारतातले अनेक ज्ञानी, उच्चशिक्षित, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते असे विविध विचारसरणीचे लोक सामिल असतात. अर्थात मोदी सरकारच्या राज्यात देशविघातक, गजवा-ए-हिंद इस्लामीक राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट असलेले, भारताची अधोगती चिंतणारे आणि सनातन हिंदु विरोधी अशा मंडळींना स्थान असणार नाही हे समजायला फार विचार करावा लागणार नाही. मनमोहनसिंग यांच्या युपीएच्या राज्यात अतिमहान विदेशी सोनिया गांधी यांनी एक असंविधानीक "NAC" नॅशनल ऍडव्हायजरी कौन्सिल स्थापन केले होते. त्यात जयराम रमेश, हर्ष मंदेर यासारखे डाव्या विचारसरणीचे चीन धार्जिणे भारत विरोधक ठासुन भरले होते. ही सर्व मंडळी मनमोहनसिंग यांच्या अपरोक्ष महत्वाचे निर्णय घेत होते, जे भारत विरोधी होते. आणि हे आपले महान अकार्यक्षम पंतप्रधान मूग गिळून उघड्या डोळ्यांनी पहात खुर्चीला चिकटून बसले होते. देवानेच यातुन देशाची सुटका केली. यापुढे देश परत कधीही गुलाम होणार नाही. जय भारत, जय श्रीराम!*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 आलेला प्रतिसाद:
B: "
B: "*F35 ची कहाणी आणि पार्श्वभूमी आपण समजुन घेणे आणि अभ्यासणे गरजेचे आहे. याची सुरुवात १९८० च्या दशकातली आहे. वेळ मिळेल तेव्हा सांगीन. देशविघातक काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या धोकादायक प्रचारावर आपली मते बनवु नयेत. याबाबत स्वतः संशोधन करावे. स्वतः माहीती गोळा करावी. सातत्याने या विषयाचा मागोवा घ्यावा. हा विषय सर्वोच्च न्यायालयात पण आधी गाजला आहे आणि त्यावेळी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेले माहीती आणि पुरावे धक्कादायक होते. सुरवात ऐकल्यावर न्यायालयाने ते सार्वजनिक न करता बंद लिफाफ्यात देण्याचा आदेश दिला होता. नंतर त्यातले पुरावे वाचल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ती काँग्रेसची याचिका फेटाळली होती आणि प्रकरण बंद केले होते.*
Also...
B: "*हे आंतरराष्ट्रीय स्कॅम समजुन घ्या.*
*हे एक धोकादायक कारस्थान आहे, एक घोटाळा आहे. यावर भारताला अतिसावधान राहाणे गरजेचे आहे. देशातले आंतरीक देशविघातक अमेरिकेला यात मदत करत आहेत.*
ही लिंक उघडा..
https://youtu.be/bX1T6zCnx6I?si=9ZKLI91dGf_m8S93
A:"वास्तवाचा विचार समोर आला की आपल्याला असे हिर्मुसल्यासे आणि आक्रमक का व्हावे से वाटते?
श्रेष्ठ व्यक्ती कधीही सत्यास सामोरे जाऊ शकतो.
ह्याला आलेला प्रतिसाद
B:
😂🙆🏼♂️🤷🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️
*आज कोणीही हिरमुसलेला नाही की आक्रमक झालेला नाही. सर्व योजनेप्रमाणे बिनदिक्कत चालु आहे. आज देश खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीला आपल्या हितांचे रक्षण करुन सामोरा जातो आहे. जय भारत!*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
_// A:"असा आक्रमक प्रतिसादच-@ स्वताची ओळख देतो. असो !
✈️✈️✈️
शोले सिनेमा सारखे गावे....
यह भक्ति,
हम नहीं छोड़ेंगे,
छोड़ेंगे सदसद विचार मगर,
तेरी भक्ति नहीं छोड़ेंगे।
-------
या साऱ्यावर माझा प्रतिसाद: @ असे प्रतिसाद देणारी व्यक्ती अर्थातच (अंध)भक्त असणार यात शंका नसावी !"
ही जुगलबंदी येथेच थांबवतो
श्री सुधाकर नातू
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५
" मल्लीनाथी -टेलीरंजन !":
😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇
😭 # आता 'काहीही हं हं 'नाही,
तर
'इडियट बॉक्स'चे नांव
सार्थक करण्याची अहमहीका !":
# 'घरोघरी मातीच्या चुली'
' मुलगी पसंत आहे'
' नवीन जन्मेन मी'....
सारख्या पोरखेळ करत लांबत
जाणाऱ्या अनेक मालिका !
# 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्'
आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल'
प्रमाणे
प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार
हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम....
# रोज सगळीकडे त्याच त्याच,
कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या....
# प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ...
अन्
निखळ करमणुकीचे मृगजळ !
# आता दर्शकांनी
कीव करावी,
की दया दाखवावी,
करमणुकीचा बाजार उठवणाऱ्याची !":😭
# बहुजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये आदर्श हे कोणत्यातरी ते उभे राहत आहेत याचा सगळ्यांनी विचार करायला हवा दुर्दैव हे की याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही अंधकारमय समाज रास नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल असेच सध्या दिसते शेवटी हेच खरे
What goes up goes down !"
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
" सोशल मीडियावरील माजी मुसाफिर भाग 10 !":
💐"अनुकूल गुणांनुसार '24/'25 साठी
राशि निहाय गटवारी !":💐
संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: व्रुषभ, कन्या व मकर
राशी.
२.उजवा दुसरा गट: धनु कन्या राशी
राशी.
३.मध्यम तिसरा गट: कुंंभ व मेष राशी.
४.डावा चौथा गट: सिंह मिथुन व कर्क
५.त्रासदायक पाचवा गट: व्रुश्चिक व मीन राशी.
💐"Think Tank !":💐
Haste makes waste;
Listen, See thru' then Act;
Don't react but respond;
Beauty lies in the eyes' of the beholder; Think, not to Sink.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 326 !":👍
💐" प्रत्येकाच्या कर्तृत्वाला
मर्यादा असतात.
जो आपल्या मर्यादा जाणतो,
त्यालाच अधिक समाधान
मिळण्याची शक्यता असते !":💐
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍"मुुक्तसंंवाद-'समाधानाची सप्तपदी":👍
"अभिवाचन क्रमांक 339 !":
😀 "कसोटी पहाणार्या स्पर्धात्मक वेगवान जीवनशैली आज अपरिहार्य होत असताना, आपण समाधान व मनःशांती कशी मिळवावयाची ते सुलभ उपाय उलगडणारा हा विडीओ पहायला विसरू नका..
ही लिंक ताबडतोब उघडा.......
https://youtu.be/g_OqskZbfxg
विडीओ नक्की आवडेलच......
लिंक म्हणून शेअरही करा..........😀
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍 कथाकथन-अंनोखी समस्यापूर्ती !":👌
"अभिवाचन क्रमांक 339 !":
😝 "ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते.
त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर थोड्याशा व्यत्ययानंतर लवकरच !
आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे.
आमच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा !"🥵
अशी ही सोय व असा हा शोध !":💐
"स्मार्ट फोनमध्ये बोललेले लगेच शब्दात रुपांतर करण्याची सोय आहे. मी विस्रुत लेखन ह्याच पद्धतीने करत होतो. वेळ जसा वाचतो, तसंच मनातले बरोब्बर कागदावर अवतरते आणि तेही तत्परतेने !
माझ्या सवयीचा अतिरेक होऊन मी अनेक videos audios बनवणे व बोलून लेखांमागूश लेख लिहीण्यात अतोनात माझ्या आवाजाचा वापर केला. त्याचा विचित्र दुष्परिणाम माझा आवाज, जवळ जवळ बोलताच न येण्याइतका बसण्यात झाला.
ती चूक मी टाळणे नितांत आवश्यक आहे. अशा वेळी मला "बोलणे ते मजकूर" ही सोय वापरता येणे अशक्य व अयोग्य आहे. तेव्हा एक असा अनोखा शोध लागावा की, मला स्फूर्ती आल्यावर मनातले बोल जणु एखाद्या प्रगत Blue tooth द्वारे मोबाईल स्क्रीनवर मजकूर रूपाने अवतारावे ! कधीकधी मला झोपेतही पहाटे नवनव्या कल्पना व विचार सुचतात, त्यावेळी तर असा शोध म्हणजे
"सोनेपे सुहागा !"
"गरज, ही शोधांची जननी असते", त्यामुळे कुणास ठाऊक असा शोध कधी ना कधी लागेलही !":👌
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 326 !":👍
😀 " कर्म की भाग्य महत्त्वाचं ?":😀
कल्पनेपलिकडची शब्दशिल्पे!":
मानव निर्मित दगड विटा सिमेंटची शिल्पे पहाणे, अथवा निसर्ग निर्मित स्रुष्टीशिल्पे अवलोकणे असो, त्यासाठी प्रवासपर्यटनाचा प्रयास करायला लागतो; परंतु प्रतिभावान माणसाने कल्पिलेली शब्दशिल्पे मनांत रुजविण्यासाठी ध्रुवबाळासारखे अढळजागी बसणे पुरेसे असते.
एवढेच पुरे नाही म्हणून की काय, आधीच्या त्या दोन शिल्पांची हुबेहुब अनुभूती ही शब्दशिल्पे तर देऊ शकतातच,
त्याशिवाय विश्वरूप जीवनानुभवांचे रंगबेरंगी इंद्रधनुष्य देखील आपल्यासमोर पेश करु शकतात !":😀
😬 "Different Strokes !":😬
"The Secret of Two 'Lives'!":
There are Two 'Lives' for every one; the first is after the birth and the second is after the death. How long and how you ''LIVE'' in the memory of others, after your death, is your second 'Life after the death which shearly depends on what you did in your 'factual First Life'.
If you struggle, toil, sacrifice
for the welbeing of the society, for the beneficial advancement of the human World, in the factual first Life, then only you get and live year after year in the Second Life. Ordinary, common mortals hence, have virtually no 'Second Life' after the death but Idols / Icons live in the memory of the World for ever !":😁
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 324 !":👍
💐 "असा 'हा' रोजचा "जमा'खर्च"!:💐
दररोजचा "जमा'खर्च", रूपयांत मांडायचे दिवस पहाता पहाता सरून जातात अन् निव्रुत्तीनंतर दररोजचा "जमा'खर्च" हा, रोज काय 'पाहिले', काय 'वाचले', काय 'ऐकले' वा 'बोलले', ह्यासोबतच (काही भाग्यवंतांसाठी) काय लिहीले असा बनत, त्या 'उलाढाली'मधून आपण काय 'मिळविले, काय 'घालवले' तसेच आपण इतरांना काय 'दिले' असा बनून जातो. हे असे, ज्यांना लौकर भान येते, ते अन् तेच खरोखर धन्य होत!":😀
काळाच्या तात्कालिक गरजेप्रमाणे, काळाच्या ओघात, नेहमीच समर्थ पर्याय निर्माण होत असतात. Nobody is indispensable. अमूकच व्यक्ती पर्याय होईल, ह्याची कुणालाच कधीही खात्री देता येत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो. भाबडी आशा बाळगण्याखेरीज, आपण काहीही करू शकत नाही. जे जे जसे जसे घडत रहाते, त्याचाच परीपाक उद्या घडत असतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालू रहाणे हा निसर्गनियम आहे. अखेरीस, सुयोग्य परिस्थितीच अपेक्षित पर्याय पुढे आणते !":😀
💐," मल्लिनाथी !":💐
वाकडे, तिडके,
इकडे, तिकडे.
उघडे, बोडके,
इकडे, तिकडे.
थापाडे, खोटार्डे,
इकडे, तिकडे,
खादाडे, माजोर्डे,
इकडे, तिकडे.
सब घोडे, बाराटक्के,
इकडे, तिकडे चोहीकडे!!
करावी, कशी निवड?
कुणाला, आहे सवड!!":😀
😀 "आत्मसमाधानाचे रहस्य":😀
👍 "जे आपल्याला आवडते, जे आपण चांगले करू शकतो, ते करायला मिळणे हे भाग्यच. अशा भाग्यामुळे, जे आत्मसमाधान लाभते ते अद्भुतरम्यच!
"पसंद अपनी अपनी" प्रमाणे ज्याने त्याने वरीलप्रमाणे आत्मपरीक्षण करून
आपआपला मार्ग निवडावा, म्हणजे श्रेयस व प्रेयस एका समयीच लाभते. !": 👌
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-89 !":👌
💐 " जवळजवळ महिन्याभराने स्वरानंद हा उपक्रम पुन्हा प्रारंभ करत आहे. त्यासाठी निमित्तही यथोचित अशा मंगलमय निवडक प्रार्थनांच्या रूपाने येथे सादर करत आहे. माणसाच्या शरीराला आहार जसा पोषक, तसाच आत्म्याला प्रार्थना अत्यावश्यक !
पुढील लिंकस् उघडून त्या ऐका....
1 सर्वात्मका सर्वेश्वरा......
https://youtu.be/L36_XB7x3IU?si=K_8pI61X4rHGZEg2
2 करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....
https://youtu.be/Wbv8wJagKEg?si=t1S9o8y_xKh9yebu
3 गगन सदन तेजोमय......
https://youtu.be/TiexOdP5ZzQ?si=OtN7HF-49EqmCU6V
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
💐" वैयक्तिक ज्योतिष सल्ला !":💐
1 विशेषतः विवाह जुळवताना वा विवाह विषयक सल्ला, मी अधिक प्रामुख्याने देऊ इच्छितो.
2 त्या व्यतिरिक्त जीवनामध्ये आगामी काळ कसा जाऊ शकतो आणि तुमच्या सध्याच्या वैयक्तिक समस्यांंविषयी पत्रिकेवरुन मार्गदर्शन करु शकतो.
" जीवन व्यवस्थापन सल्ला !":
माझ्या 32 वर्षांच्या कॉर्पोरेट मॅनेजमेंटच्या अनुभवावरून आणि विजिटिंग मॅनेजमेंट फॅकल्टी तसेच सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून असलेल्या वीस वर्षांच्या पार्श्वभूमीवर तुमच्या आयुष्याचे व्यवस्थापन कसे करायचे हा अभिनव उपक्रम आपल्या फायद्याचा ठरू शकतो.
आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याला योग्य दिशा दाखविण्यासाठी
मी प्रदीर्घ संशोधनातून निर्माण केलेले Job Satisafaction Index & Life Achievement Index या अभिनव कल्पना द्वारे प्रगती करत सुख समाधान कसे मिळवायचे याविषयीचा सल्ला
विशेष उपयोगी पडू शकेल असे मला वाटते.
इच्छुकानी मला येथे वा fb messenger वर तुमचे नाव गाव कोणत्या प्रकारचा सल्ला हवा आहे, ते कळवणे अपेक्षित आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू.
"तुम्हीच तुमच्या जीवनातील प्रगतीचे शिल्पकार !"
प्रत्येकाला जीवनामध्ये आपण यश मिळवावे आपली मना जोगती प्रगती व्हावी असे वाटत असते परंतु त्यासाठी परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात त्यामुळे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे बनू असतो ते
उलगडून दाखवले आहे....
https://youtu.be/btZZHsUexkw?si=ymrwq4gQKj2nIEF2
सादर वंदन
मी सुधाकर नातू सुमित अतुल्यम् A1603 विंग मध्ये माझा मुलगा श्री समीर नातू याच्या सदनिकेत A1603 येथे वास्तव्य करत आहे.
मी खास नव्याने स्थापन केलेल्या आपल्या
'Atulaniy', हा फक्त Sumit Atulyam सोसायटी मधील सर्व रहिवाशांचा हा व्हाट्सअप ग्रुप आहे.
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!...
एकाच वेळी श्री सुधाकर नातूंचे अनेकांना संदेश पाठविण्याच्या सोयीसाठी प्रामुख्याने हा समूह एक व्हॅल्यू इंजीनियरिंग अशा स्वरूपात निर्माण केला आहे.
मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या सोयीसाठी,
माझी थोडक्यात ओळख पुढे देत आहे:
One Man Communication Industry !":
Mr. Sudhakar Natu ":
# 'प्रगतीची क्षितीजे' ह्या महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक...
# रंगांची दुनिया-फेसबुकवरील समुह: संस्थापक व Admin 2 years +
1 moonsun grandson blog:
565 articles
2 मुक्तसंवाद channel on you tube:
147 videos
3 आकाशातील पाळणे whatsapp अभिवाचन मंच: 314
4 स्वरानंद: 77
5 बोल अमोल: 285
6 छाप (पड)लेले शब्द: 71 +
7 माझी कथा: आठवड्यात 2/3
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!...
Moonsun Grandson !":
"One Man Communication Industry !":
Mr. Sudhakar Natu ":
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!...
एकाच वेळी माझे अनेकांना संदेश पाठविण्याच्या सोयीसाठी प्रामुख्याने हा समूह एक व्हॅल्यू इंजीनियरिंग अशा स्वरूपात निर्माण केला आहे.
माझ्या संदेशांवरती आपल्या प्रतिसादआपण माझ्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावेत अशी विनंती आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
9820632655
💐"दैनंदिनीतील पाऊलखुणा भाग 1 !":💐
"अभिवाचन क्रमांक 338 !":
😀 "दिवस येतात दिवस जातात, आपण आपला जीवनक्रम तसाच पुढे ढकलत असतो. अशावेळी दररोज काय घडले याची नोंद जर कोणी घेत असला तर त्याचे कौतुकच करायला हवे. या अभिवाचनामध्ये देखील असेच दैनंदिनीतील पाऊलखुणांची मार्गदर्शन करणारी नोंद आपल्यालाही अंतर्मुुख करेल हे निश्चित....😀
पहाण्यासाठी ही लिंक उघडा..
https://youtu.be/qyw4WUVVaW4?si=yUBwPm-Po3NAPEqQ
.
💐II नववर्षाचा नवा संकल्प-4 II💐
👍 कथाकथन-अंनोखी समस्यापूर्ती !":👌
😝 "ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते.
त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर प्रतिसादात आज दुपारी चार पर्यंत तुम्ही द्यायचे आहे.
आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे.
आमचा प्रतिसाद आपल्याला त्यानंतर येथेच मिळेल !"🥵
भावलेल्या पुस्तकाचा रसास्वाद !":👌
1."अबीर गुलाल":
कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती.
मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण!
हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते.
त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले व गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. भ. बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही व इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी जीवनचित्रे आहेत. तो तो काळ, ती ती माणसे व तेव्हांचा समाज आपल्यापुढे पुनश्च जीवंत होतो आणि आपले भावविश्व अधिकच सम्रुद्ध होते. ही किमया मधुभाईंच्या सिद्धहस्त लेखणीची आहे.
खरोखर कर्णिकांचे सूक्ष्म निरीक्षण, मनाचा निखळ ठाव घेणारी, माणसे जोडणारी आपुलकी त्यांच्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्यातून प्रकट होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक खरोखर आनंददायी अनुभव भासला. ज्यांनी कोणी हे पुस्तक अजून वाचले नसेल त्यांनी जरूर वाचावे. माझ्या वाचनात तसं म्हटलं तर हे पुस्तक खूपच उशिराने आले हेही खरे!
मला भावलेल्या पुस्तकांची अशीच ओळख आपणास नियमितपणे करून देण्याच्या नववर्षाच्या माझ्या संकल्पाची ही सुरुवात आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५
" सोशल मीडियावरील माजी मुजाफेरी भाग 9 !"::
1
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 325 !":👌
😀 " कर्म की भाग्य महत्त्वाचं ?":😀
2
💐II " नवीन वर्षाचा नवा संकल्प-6 II💐
👍" शारदोत्सव!":👌
'नटखट नट-खट मोहन जोशी':
एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी!
--–👌--------------👌--------------👌---------
'नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली.
अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द व कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते.
गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया न जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ न बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी न डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे.
अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. अ.भा.नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर थक्क करणारी आहे. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत.
ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो.
कुठेही कंटाळा न येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी
व-त्यांचे शुभचिंतन.
3
😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇
😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल.
विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे:
झोपण्यात गेलेला वेळ
सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे,
सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत.
एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो.
त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !"
आता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे
हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील
# "अलिप्तपण दे रे राम,
मजविण तू मज दे रे राम !"
# " मनी आणावे ते होते,
विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄
4
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍 कथाकथन-अंनोखी समस्यापूर्ती !":👌
"अभिवाचन क्रमांक 338 !":
😝 "ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते.
त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर थोड्याशा व्यत्ययानंतर लवकरच !
आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे.
आमच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा !"🥵
5
💐II मंगल प्रभात II💐
👍"मल्लिनाथी !":👌
😀 "वाकडे, तिडके,
इकडे, तिकडे.
उघडे, बोडके,
इकडे, तिकडे.
थापाडे, खोटार्डे,
इकडे, तिकडे,
खादाडे, माजोर्डे,
इकडे, तिकडे.
सब घोडे, बाराटक्के,
इकडे, तिकडे चोहीकडे!!
करावी, कशी निवड?
कुणाला, आहे सवड!!":😀
6
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-89 !":👌
💐 " जवळजवळ महिन्याभराने स्वरानंद हा उपक्रम पुन्हा प्रारंभ करत आहे. त्यासाठी निमित्तही यथोचित अशा मंगलमय निवडक प्रार्थनांच्या रूपाने येथे सादर करत आहे. माणसाच्या शरीराला आहार जसा पोषक, तसाच आत्म्याला प्रार्थना अत्यावश्यक !
पुढील लिंकस् उघडून त्या ऐका....
1 सर्वात्मका सर्वेश्वरा......
https://youtu.be/L36_XB7x3IU?si=K_8pI61X4rHGZEg2
2 करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....
https://youtu.be/Wbv8wJagKEg?si=t1S9o8y_xKh9yebu
3 गगन सदन तेजोमय......
https://youtu.be/TiexOdP5ZzQ?si=OtN7HF-49EqmCU6V
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇
😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल.
विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे:
झोपण्यात गेलेला वेळ
सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे,
सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत.
एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो.
त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !":😄
जाता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे
हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील
# "अलिप्तपण दे रे राम,
मजविण तू मज दे रे राम !"
# " मनी आणावे ते होते,
विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄
शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५
' अनुभवाचे बोल-1 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍" अनुभवाचे बोल-1 !":👌
😄 "आतापर्यंत 'बोल अमोल' या स्वरूपात मी 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत असे. मध्यंतरी त्याच्यामध्ये अधून मधून खंड पडत गेला. तसे कदाचित माझ्या इतरही काही उपक्रमांचे झाले हेही खरे. आज अचानक नव्या रूपात आपण पुनश्च 'अनुभवाचे बोल' चा प्रारंभ करावा असे वाटण्याचे कारणही तसेच होते.
थोडक्यात जे घडले ते असे- मी पुष्कळ दिवसांनी पुन्हा लोकाग्रहास्तव वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे उत्साहाने सुरू केले आणि त्यात मला चांगल्यापैकी यशही येत गेले. अशा वेळेला अचानक असे काही घडले की ज्यामुळे मला एक प्रकारचे डिप्रेशन आले. ज्योतिष सल्ल्याचे मी प्रत्येकी मानधन 500 रुपये घेत असे आणि सविस्तर पत्रिका बनवून त्याचे विश्लेषण करणे यात माझा अक्षरशः दोन-तीन तासांचा वेळ जात असे. नुकतीच जेव्हा घरामध्ये पत्नीने ब्युटी पार्लर सेवा देणाऱ्या स्त्रीला बोलावले, साधारण तासभरानंतर ती गेली. नंतर मी पत्नीला विचारले की किती मानधन दिले? उत्तर रु 2000, हे ऐकले आणि मला एक प्रकारचा कमीपणा आल्यासारखे आणि माझे ज्ञान परिश्रम आणि अनुभव ह्यांना किंमत नाही असे वाटून निराश व्हायला झाले. त्या अनुभवावरती मी माझा एक मुक्तसंवादही रेकॉर्ड केला. ज्ञान अनुभव श्रम आणि वेळ या गोष्टींचा विचार करता दोन सेवांमध्ये इतका फरक असावा इतका विरोधाभास असावा याचा मला विषाद वाटला. हे डिप्रेशन किंवा नैराश्याचे पर्व दोन-तीन दिवस चालले.
अचानक मला 'तू भेटशी नव्याने' च्या धरतीवर 'मीच मला नव्याने भेटून गेलो' ! काल पहाटे (मी आधी सांगितले आहे की, अमृत काळात पहाटे मला जे सुचते ते 'बोल अंमोल !') मला साक्षात्कार झाला आणि मी अक्षरशः बॅक टू द वॉल सारखा डिप्रेशन मधून मोटिवेशनच्या प्रांगणात कधी उडी घेतली ते कळलेच नाही !
मला जाणवले मी गेल्या पाच सहा वर्षात 'वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री !' या रूपाने जे करत आहे, ते म्हणजे खरोखर काय ? तर नव्याने उमजले...
'World Class Management Guru Peter Drucker' Famous Sayings:
"In business you must answer these 2 questions;
1 What is the 'Theory of Business ? and
2 What Business you are in?"^
This made me to bounce back from Depression to Self Motivation because I introspected and felt:
'Whatever I have been doing as 'One Man Communication Industry', through my various 'Idea based Products ' ever since my my son give me a Smartphone !* surely and certainly, I am in the Business of Transforming & Developing Paeople to become competent progressive Good Human Beings ! &
I am in the Business of imbibing Hope and Self Confidence into the People !
There cannot be any doubt that this is a Noble Mission and Profession.
So this then has been my journey from Depression to Self Motivation & and now I am bound to do justice to the same.
All the Best & Continue to be a part of My Noble Mission !
*PS
For those who are interested to understand how this Transformation came about, please do click following Link & Do see the relevant Video from my YouTube channel:
'moonsun grandson'
https://youtu.be/zU1brIETOj4?si=G0FMA6n3O2-XFJcn
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)