गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

" सोशल मीडिया वरचे माझे योगदान भाग एक":

तुम्हीच तुमच्या जीवनातील प्रगतीचे शिल्पकार !" प्रत्येकाला जीवनामध्ये आपण यश मिळवावे आपली मला जोगती प्रगती व्हावी असे वाटत असते परंतु त्यासाठी परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात त्यामुळे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे असतो ते या व्हिडिओत उलगडून दाखवले आहे.... https://youtu.be/btZZHsUexkw?si=ymrwq4gQKj2nIEF2 "अबीर गुलाल" कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती. मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण! हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते. त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले व गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. भ. बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही व इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी जीवनचित्रे आहेत. तो तो काळ, ती ती माणसे व तेव्हांचा समाज आपल्यापुढे पुनश्च जीवंत होतो आणि आपले भावविश्व अधिकच सम्रुद्ध होते. ही किमया मधुभाईंच्या सिद्धहस्त लेखणीची आहे. खरोखर कर्णिकांचे सूक्ष्म निरीक्षण, मनाचा निखळ ठाव घेणारी, माणसे जोडणारी आपुलकी त्यांच्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्यातून प्रकट होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक खरोखर आनंददायी अनुभव भासला. ज्यांनी कोणी हे पुस्तक अजून वाचले नसेल त्यांनी जरूर वाचावे. माझ्या वाचनात तसं म्हटलं तर हे पुस्तक खूपच उशिराने आले हेही खरे! मला भावलेल्या पुस्तकांची अशीच ओळख आपणास नियमितपणे करून देण्याच्या नववर्षाच्या माझ्या संकल्पाची ही सुरुवात आहे. 💐"Different Strokes !":💐 Well balanced IQ and EQ are the 2 important factors in nurturing professional, as well as personal relationships. EQ HAS 3 LEVELS: 1. mastery of inner self, 2. Perception of others, 3. Skill of Interactions with others. Our Responses to any situation are of 2 types: Rational and emotional responses and they are results of our IQ AND EQ. The IQ comprises of Technical skills, Knowledge, Intelligence and formal Education; and EQ focuses on Empathy, Motivation, Self-Control. The Companies survive only if they put their customers first, than themselves. For that their interfaces must have balanced IQ and EQ LEVELS. IT IS therefore, IMPERATIVE TO MAKE LIFE STRESS FREE AND TRULY ENJOYABLE, TO IMPROVE THESE TWO factors CONTINUOUSLY. 😀 "माझ्या ब्लाँगची रूपरेषा !:"😀 💐 "आजपर्यंत 550 हून अधिक लेख...! माझ्या हया ब्लाँगचे पुढील चार भाग आहेत: १ रंगांची दुनिया: साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि मालिका, सोशल मिडीया अशा सांस्क्रुतिक जगताचा परामर्ष. २ स्पंदने: विविध विषयांवरील विचारमंथन:बिंब///प्रतिबिंब ३ प्रगतीची क्षितीजे: व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापनशास्त्रविषयखक अनुभवी बोल. ४ पुढचे पाऊल: उद्याची चाहूल घेणारे ज्योतिषशास्त्राची उपयुक्त ओळख. ह्या विभागांचे प्रकाशन कालबद्ध वेळापत्रकानुसार मी करत आहे. मधून मधून पुढील लिंक उघडून माझे लेख आपण जरूर वाचावेत ही विनंती... माझ्या ब्लाँगसाठी आपणा सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाची अपेक्षा आहे. pl go to the link: http//moonsungrandson.blogspot.com धन्यवाद. श्री. सुधाकर नातू माहिम, मुंबई १६ "अनोखा शारदोत्सव- भावलेल्या लक्षवेधी नोंदी !": "मराठी साहित्यशारदेत मासिक मनोरंजन अनेक उत्तम उत्तम नियतकालिके निघत आली आहेत सत्यकथा हा अंक काळी स्वतःचंच युग निर्माण करून अंतर्धान पावला त्याचीच पुनरावृत्ती या भानू काळे याने निर्माण केलेल्या अंतर्नाद या अंकाने जवळ 25 वर्षे आपले गारुड उलगडलें दुर्दैवाने हाही प्रयोग बंद करायला लागला त्या काळातील सर्वोत्तम असे निवडक साहित्य खतरनाक दिवाळी अंक 2020 प्रसिद्ध झाले त्यातील त्यातील लेखांचा कवितांचा हा भावलेला रुचलेला रसास्वाद..." पुढील लिंक उघडून पहा..... https://youtu.be/71dH-kjxqqU?si=FpG5pSD7iz_XPhE0 //// // published "सोशल मीडिया- आपल्या जीवनाचे एक अत्यावश्यक अविभाज्य अंग !": "इंटरनेट आणि टेलीकम्युनिकेशन यांचा मिलाफ झाल्यापासून अक्षरशः क्रांती झाली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला संपर्क साधता येतो. फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप अशा अनेक रूपात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनले आहे. अन्न वस्त्र निवारा याबरोबर सोशल मीडिया ही एक जीवनावश्यक चीज बनली आहे ! त्याचाच हा लेखाजोखा.... ही लिंक उघडून पहा..... https://youtu.be/4UQrdpajVrU?si=YZPmhWNhfafzqK_D "संक्रांती" सारख्या गोड गोड बोलण्याच्या सणाला "संक्रांत" म्हणणे हे नवलच, कारण "संक्रांत" म्हणजे नको असलेली त्रासदायक गोष्ट! 💐"मुक्तसंवाद-छत्तीस गुणी जोडीची गोडी !":💐 😀 "संसाराच्या रथाची पती आणि पत्नी ही दोन समान चाके असतात. त्यांच्यामध्ये सामंजस्य व समतोल हवा, तरच संसाराचा प्रवास आनंददायी सुखकर आणि उत्कर्षकारक होतो. आपल्या पतीच्या गुणांना छंदाला पूर्ण वाव देऊन, त्याला प्रगतीचे नवनवे मार्ग खुले करणाऱ्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! ह्या विडीओत एकमेकां पूर्ण साथ संगत करत आपल्या संसारात आनंद निर्माण करणाऱ्या आणि प्रगतीची वाटचाल आपल्या प्रतीला खुली करून देणाऱ्या निवडक जोडप्यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. आज संक्रांतीच्या दिवशी 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला !', असे आपल्या कुटुंबीयांना सांगताना हे लक्षात ठेवायला हवे की, संसाराचा पाया, ही नवरा बायकोची जोडीच असते. आपल्यालाही जाणवेल की, संसारात त्यांच्यांत गुळपिठासारखे नाते असले, तरच कुटुंब आणि समाज हा सुख शांती समाधान मिळवू शकेल.....😀 हा व्हिडिओ पाहण्यासाठी.... पुढील लिंक उघडा....... https://youtu.be/fyy4z6Q-jtw?si=qmnTiT3m0VZgNqfz

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा