मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

" लक्षवेधी नोंदी-पण लक्षात कोण घेतो ?":

"पण लक्षात कोण घेतो" माझ्या आठवणी प्रमाणे मुंबईत पूर्वी फक्त बीएसटी वीज पुरवठा करत असे. कित्येक दशके तो भविष्यात अखंडित राहायचा, कधीकाळी एखाद वेळेला जर वीज पुरवठा बंद झाला, तर तो ताबडतोब दुसऱ्या कुठल्याशा जोडणीने पुनश्च सुरू केला जाई आणि दरम्यान जिथे फॉल्ट निर्माण झाला आहे तिथे बेस्टचे खास इमर्जन्सी व्हॅनची टीम जात असे आणि पुरवठा पूर्ववत करत असे जोडणी वगैरे लावून व्यवस्थित परत करत असे. पण अलीकडे बेस्ट व्यतिरिक्त इतरही खाजगी कंपन्या मुंबईला वीज पुरवठा करतात, मात्र जे BESTचे वीज पुरवठ्याचे आता झाले आहे अधून मधून वीज प्रवाह कुठे ना कुठेतरी खंडिता होतच असतो. तसेच अगदी बेस्टबसेेस बद्दल देखील म्हणावे लागेल.खरं म्हणजे कोणे एकेकाळी बेस्ट ही बसच्या बाबतीत सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने सबंध देशांमध्ये सर्वोत्तम होती.पण आउटसोर्सिंगचे खुळ लागले आणि त्यानंतर बेस्टच्या स्वतःच्या बस गाड्या कमी आणि बाहेरून भाड्याने घेतलेल्या जास्त त्यामुळे उत्तरोत्तर दुर्दैवाने अधून मधून बेस्टचे अपघात तर होतातच पण वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे. याला जबाबदार कोण? दिल्लीतील बसेसचे कोणी एकेकाळी असे अपघात होत असत त्या बातम्या मला आठवतात. आता बेस्ट तसेच चालले आहे. आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे नुकताच जवळच्या एका मल्टीस्टोरी वजा सोसायटीमध्ये BESTचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. कारण कुठेतरी फॉल्ट निर्माण झाला होता. नुकतेच तेथे रहिवासी राहायला आले होते आणि त्यामुळे सगळ्यांना वाटले की आता काय करायचे. त्यावेळी नशिबाने कोणी लिफ्ट मध्ये नव्हता हे भाग्यच, समाधानाची गोष्ट जरी ही असली तरी वीज पुरवठा बंद झाला तर घरात जणू काही 'हाऊस अरेस्ट' सारखी अवस्था होणार हे लक्षात यायला लागले. शिवाय पाण्याचा पुरवठाही बंद होऊ शकणार होता. फ्लॅटमध्ये आग जर अशा वेळेला लागली तर काय हाहाकार होईल या विचाराने कोणाचीही झोप उडणारच. अशा अवस्थेमध्ये रहिवासी असताना त्यांना लक्षात आले की आपल्या इथे स्टँड बाय जनरेटर तर नाहीच पण लिफ्ट आणि सार्वजनिक प्रकाश जिथे हवा अशा ठिकाणी देखील वीज पुरवठा पर्यायाने देण्यासाठी कुठलीही व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की याबाबतीत शासकीय नियम काय आहेत असे प्रत्येकाला वाटू लागले. flat खरेदी करताना ही बाब बहुदा सगळ्यांच्याच नजरेआड झाली होती. मग शोधा शोध सुरू झाली की मल्टी स्टोरी मनोर्यांना अशा तऱ्हेची व्यवस्था अत्यावश्यक असते कां, त्यासंबंधीचे कोणते नियम व निर्बंध आहेत. त्याची म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे होते. कारण असा जर नियम असला की ह्या जर सोयी सुविधा ज्या अत्यावश्यक आहेत, त्या बिल्डरने दिल्या नाहीत तर त्याला कंपलीलन सर्टिफिकेट ओसी कसे काय मिळू शकणार असा नियम आहे काः? थोडक्यात या एका साध्या प्रश्नामुळे लक्षात आले की आपण महत्त्वाचा निर्णय घेताना'पण लक्षात कोण घेतो ?' या प्रश्नाला सामोरे गेलो. त्याशिवाय या घटनेने अजून एक बाब रहिवाशांच्या नजरेचा आणून दिली आहे. ती म्हणजे इमारतीमध्ये ज्या लिफ्ट आहेत त्या लहान आकाराच्या आहेत, त्यामधून कोणी आजारी पडला दिवंगत झाला तर स्ट्रेचर जाऊ शकत नाही. आता यासंबंधी देखील जागोजागी उभे राहत असलेला लिफ्टच्या आकारासंबंधी काही नियम आहेत का? हे पाहणे जरुरीचे झालं आता ! धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा