शनिवार, ४ जानेवारी, २०२५

" सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग 7

सोशल मीडिया हा माहिती देणारी तसेच आपल्या जाणीवा विस्तारित करणारी अशी अवाढव्य महासागर आहे तसेच माणसांच्या कल्पनांना नवा आकार देणारा असा मंच आहे असे मी मानतो साहजिकच सोशल मीडियावर सर्फिंग करणे हा एक आनंददायी मनोरंजक अनुभव असतो येथे तसाच प्रयत्न केला आहे त्यातील प्रेरणादायी तसेच माहितीपूर्ण पोस्टिंग केव्हा संदेश संग्रहित करण्याचा तुम्हालाही हा प्रयत्न आवडेल अशी आवडेल अशी आशा आहे 1 हा संदेश व्हाट्सअप वर मी पाहिला तो वाचा आणि बघा जपान आज दुसऱ्या महायुद्धात भेटीला खाऊ नये जगामध्ये अग्रेसर का आहे ते: In Japan, there are no welfare programs like free cooking gas, free electricity, free ration, etc. Their motto is: Work for what you need or live without it. Possibly, these are the five best statements you will ever read, and they should also be implemented in India: 1. You cannot make the poor rich by making the rich poor. 2. Whatever one person receives without working for it, another person has to work for it and does not get rewarded for their effort. 3. No government in the world can give anything to its citizens for free unless it takes it from another citizen first. 4. You cannot multiply wealth by dividing it! 5. When half the people receive something for free, they will never work for it, and the other half who work to provide for the free benefits will feel demotivated because their efforts benefit those who do not work. This is the beginning of the end for any prosperous nation. Good citizens must put a stop to this madness. ###÷################# 2 फेसबुक वरील श्री चंद्रकांत पंडित यांनी प्रसारित केलेला संदेश आपल्याला एका विस्मृतीत गेलेल्या पण श्रेष्ठ संगीतकाराविषयी विस्तारित माहिती देईल वेगळ्या विषयावरील वेगळेपण आपल्याला साहजिकच अनुभवायला येईल वाचा तर मग हा त्यांचा संदेश: मा.एन. दत्ता यांची यांची आज पुण्यतिथी. दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचा जन्म मुंबई १२ डिसेंबर १९२७ , मा.एन. दत्ता हे हिंदी/मराठी चित्रपटांना संगीत देणारे एक मराठी संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी ते वयाचे एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आपल्या पित्याच्या मूळ गावी-गोव्यातल्या अरोबा येथे रहायला आले. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील निधन पावले आणि त्यांचा सांभाळ आई, मामा आणि आजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. त्यांच्या पूर्वजांच्या अरोबा येथील घराच्या जवळ एक खूप जुना विशाल पिंपळाचा वृक्ष होता. त्या झाडाच्या आसपास दर गुरुवारी लोक जमा होत आणिअभंगांची आणि गीतांची मैफल भरे. छोटा दत्ता या गीतांमध्ये रमून जायचा. तेथेच तो हार्मोनियम वाजवायला शिकला. त्याकाळात कोल्हापूरहून आणि रत्‍नागिरीहून फिरत फिरत येणाऱ्या नाटक मंडळीशी संबंध आला. त्यांच्या नाटकांतली गाणी ऐकायला आणि गायक नटांचा अभिनय पहायला मिळाला. ती गाणी ऐकून दत्ताने आपल्या मामालकडे गाणे शिकायचा हट्ट केला. मामाने उत्तरादाखल छडी दाखवली. दत्ताने बंड केले. एका रात्री तो चुपचाप घरातून पळाला आणि मुंबईत आला. आल्याआल्या त्याने बी.आर देवधर यांच्या संगीत वर्गात नाव घातले. त्यानंतर जिथून जमेल तेथून संगीताचे ज्ञान मिळवायला सुरुवात केली. फिरताफिरता एन. दत्ता हे मास्टर गुलाम हैदर यांना भेटले आणि त्यांच्या ऑर्केस्ट्रात सामील झाले. गुलाम हैदर यांचे वादनकौशल्य त्यांनी हळूहळू आत्मसात केले. त्याच सुमारास दत्तांना त्यांचे चंद्रकांत भोसले भेटले. भोसले त्यावेळी शंकर जयकिशन यांच्या वाद्यवृंदात काम करीत. दत्ताही त्यांच्या गटात सामील झाले. ते गातही असत आणि वाजवतही असत. अचानक दत्तांचा संपर्क एस.डी बर्मन (सचिनदेव बर्मन) यांच्याशी आला. दत्तांचे गाणे य़कून बर्मदा खूश झाले. आणी गाण्याचे संगीतही दत्तांचेच आहे हे समजल्यावर त्यांनी दत्तांना आपले साहाय्यक म्हणून घेतले. दत्तांना समजले की ईतकी वर्षे आपण ज्या संगीताचा मागे भटकत होतो, त्या संगीत महासागराच्या काठाशी आपण पोचलो आहोत. यानंतर द्त्तांनी संगीताच्या या महासागरात डुबक्या घेऊन घेऊन आकंठ स्नान केले. पाच वर्षाच्या काळात एन. दत्ता यांनी बुझदिल (१९५१), सजा (१९५१), बाजी (१९५१), बहार (१९५१), जाल (१९५२), जीवन ज्योति (१९५३) यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी सचिनदेवांचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. बाजी आणि जालचे शीर्षक संगीत पूर्णपणे एन. दत्तांचे होते. एन. दत्तांच्या संगीतात गोव्याच्या संगीताचा बाज असलेले पाश्चिमात्य संगीत, ॲकाॅर्डियनचे मध्यम मध्यम सूर, ऑर्गन व कास्टानेट्स (लाकडी टाळां)च्या आवाजांचा मिलाफ आणि व्हायोलीनची धून यांचा मनसोक्त वापर असे. संगीतकार सी. रामचंद्र आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालचे गुरू ॲॅंथनी गोनसालव्हिस हे एन. दत्तांचे चांगले मित्र होते. ॲॅंथनी गोनसालव्हिस यांनी एन. दत्तांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी संगीत नियोजनाचे काम केले. त्यांच्याच नावाचा उल्लेख असलेले 'अमर अकबर ॲंथनी' चित्रपटातले 'माय नेम इज ॲंथनी गोनसाल्हिस' हे गाणे रचलेले होते. ॲॅंथनी गोनसालव्हिस यांच्या खेरीज एन. दत्तांना त्यांचे गोवेकर मित्र चिक चाॅकलेट, जो गोम्स व जाॅन गोम्स, फ्रँक फर्नांड, सबॅस्टियन आणि दत्ताराम यांनी संगीतसृष्टीत स्थिरावण्यास मदत केली. मा.एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. 🙏 Chandrakant Pandit Facebook

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा