गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

लक्षवेधी नोंदणी भाग 2 जे जसे सुचले ते तसे

दररोज हे पृष्ठ म्हणजे हाताने लिहिण्याचा संकल्प काही केल्या तडीला जात नाही हे आज लक्षात आल्याने पुनश्च तीन-चार दिवसांनी हे काहीतरी लिहायला घेतले आहे. मागील लेखनात रविवारच्याा.म.टा संवाद मधील दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल आणि दोन शहरांबद्दल जे लेख आले, त्या लेखांवर मला माझी प्रतिक्रिया व प्रतिसाद नोंदवायचा होता. पण आता हे असे मध्यंतरी चार किंवा पाच दिवस गेल्यावर त्यावेळी जो ठसा हे सारे वाचल्यावर माझ्या मनावर उमटला होता, तो आता दुर्दैवाने संपूर्ण पुुसला गेला आहे, हे माझ्या आता ध्यानात आले आहे. पुन्हा तो पेपर संवाद पुरवणीचा नजरेखालून जर मी घातला तरच पांढऱ्यावर काळे असे काहीतरी मला लिहिता येईल. नाहीतर 'पाटी कोरीच ठेवावी लागेल. दुसरे असे की ते वर्तमानपत्र कुठेतरी रद्दी जिथे ठेवतो तिथे ठेवला गेला असल्याने तो शोधण्याचाही त्रास घ्यावा लागेल.याचा मतीतार्थ असा की कोणत्याही लेख नाटक चित्रपट वा मालिकांचा रसास्वाद तो अनुभव घेतल्यावर ताबडतोबच तुम्ही नोंदवायला हवा. कुठल्याही माध्यमातून व्यक्त करायला हवा. विशेषतः शब्दरूप लिहिणे तर ताबडतोबच आवश्यक असे मला वाटते, हा धडा या सगळ्या मंथनातून मिळाला आहे. हे असे म्हटण्याचे कारण म्हणजे मटा संवाद व्यतिरिक्त 'बातम्यांच्या झाल्या कथा' हे पत्रकार राजीव साबळे यांचे संस्मरणीय पुस्तक 'इवलेसे रोप' हे सध्या गाजत असलेले नाटक आणि बहुप्रतिक्षित असा 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी' चित्रपट रिलीज झाल्याबरोबर फर्स्ट डे फर्स्ट शोला आम्ही तो बघितला होता, त्या साऱ्याचे प्रतिसादाची नोंद करावी असे मला त्या त्या वेळेला वाटत होते. परंतु तेव्हाचे तेव्हा मी शब्दबद्ध न केल्यामुळे आता हे केवळ अशक्य आहे असे मला त्यामुळे वाटत आहे एक फायदा असा झाला आहे की त्यामुळे मला एक नववर्षासाठी तो म्हणजे: 'जे जे मला जेव्हा जेव्हा भावतं मनापासून व्यक्त व्हावं असं वाटतं तेथे तेव्हाच्या तेव्हा शब्दरूपात व्यक्त करायला हवे हा' तो संकल्प अर्थात लक्षवेधी नोंदणी सारखा तोही संकल्प संक्रांतीच्या वेळी कटलेले पतंग जसे हेलकावे खात भरकटतात तसाच कुठेतरी अंतर्धान पावण्याची शक्यता आहे. एक फायदा एवढाच झाला तो म्हणजे असा लक्षवेधी दोन्ही लिहिताना जे जसे सुचले तेथे पानावर अखंडित लिहिण्याचा मनसोबा माझा सिद्ध झाला. आता हे जे काही लिहिले ते क्वालिटी कंटेंटच्या दृष्टीने कितपत अर्थपूर्ण आहे हे वाचकांनीच ठरवायला हवे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर पान दीड पान आज मी हाताने लिहिण्याचा व्यायाम पूर्ण केला हे नक्की. हे लिहिता लिहिता वर नमूद केलेल्या लेख चित्रपट नाटक यावर मला ध्वनिफीती बनवणे शक्य होईल. कारण विचार करून लिहिण्यापेक्षा आठवण आठवण बोलणे अधिक सोपे व गतिमान असते असा माझा तरी अनुभव आहे. तोपर्यंत आता प्रतीक्षा करा.... पाहूया या तरी हा बेत तरी तडीला जातो, केव्हा कसा ते! हे लिहिलेले मी नीट वाचता यावे म्हणून ऑडिओ मध्ये ध्वनिमुद्रित केले आहे आणि ते तुम्ही आता निश्चित वाचू शकता धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा