बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

घडविते हात': "संस्कृतीकारणाचे अध्वर्यू":

 "घडविते हात':

"संस्कृतीकारणाचे अध्वर्यू":

महाराष्ट्र टाईम्स मधील "महामुंबईचे षडदर्शन" हे नियमित येणारे सदर मी नेहमी वाचतो. आज दिनांक ३० डिसेंबर'२१ रोजी या सदरामध्ये 'घडविते हात'

"संस्कृतीकारणाचे अध्वर्यू" या शीर्षकाखाली श्री दिनकर गांगल आणि त्यांच्या 'ग्रंथाली' ह्या वाचक चळवळीचा धावता आढावा अरुण जोशी आणि सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी समर्पक शब्दात घेतला आहे. वाचनसंस्कृतीवर प्रेम करणार्यांनी हा लेख मुळापासूनच संपूर्ण वाचण्याजोगा आहे. 

त्यामधील काही अंश मला भावले आणि कदाचित माझ्याशीही त्यांचा वैयक्तिक संबंध असल्यामुळे, मी ते इथे देत आहे:

"माणसे वाचणे, ती जोडणे त्यांच्यातून काही ज्ञान जोखणे त्यांना बोलायला-लिहायला उद्युक्त करणे, त्यासाठी पूर्ण वेळ देणे-दिशा देणे आणि काहीतरी नव्याने सादर करणे हे त्यांचे काम अव्याहत सुरूच आहे. दगडाच्या आत मूर्ती दिसणारा आणि अनावश्यक भाग तासून ती साकारणारा हा शिल्पकार साहित्य-संस्कृतीच्या विश्वात गेली पाच दशके सजगपणे वावरतो आहे. आजही काही सुचले लिहावेसे वाटले की दिनकर गांगल यांचा विचार घ्यावा असे वाटणारे अनेक आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षी तोच उत्साह आणि उत्तम ते जतन करण्याचा व नवं ते घडवण्याचा त्यांचा प्रयत्न वर्धिष्णू आहे."

"ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली यापैकी ८० टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते, यामागे गांगल यांना विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहूल आणि त्या त्या व्यक्तींमध्ये विषयांमध्ये दिसलेला स्पार्क हाच धागा होता."

माझ्या वैयक्तिक जीवनात श्री दिनकर गांगल यांचे म्हणूनच मोठे योगदान आहे त्यांनीच माझ्यातील लेखनगुण आणि रंगभूमी व करमणूक क्षेत्र यावरील माझे प्रेम ध्यानात घेऊन, महाराष्ट्र टाईम्स मध्ये "शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावरून" ह्या रंगभूमीविषयक सदराची संधी त्यांनी मला दिली. तेथूनच 'रंगांच्या दुनिये'तील लेखनाची माझी मुशाफिरी जी सुरू झाली, ती आजतागायत. 

त्यांचे योगदान एवढ्यावरच माझ्यासाठी पुरे होत नाही. कालांतराने पुढे मी विविध क्षेत्रांवर, विशेषत: व्यवस्थापन क्षेत्रातही लेख लिहित होतो आणि कार्पोरेट क्षेत्रातील माझी अनुभवाची शिदोरी त्यांनी अचूक हेरली. "ग्रंथाली" तर्फे मला लिहायला लावले. त्यांना पसंत पडेल इतका मजकूर मला सुधारायला लावला. त्याचेच फलित म्हणजे महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून त्या वर्षी पारितोषक मिळालेले "प्रगतीची क्षितिजे" हे माझे पहिलेवहिले पुस्तक, त्यांनी ग्रंथाली तर्फे प्रसिद्ध केले. 

फेसबुकवरील "रंगांची दुनिया" हा माझा समूह कदाचित याच पायावर उभा राहिला असे म्हणता येईल. सहाजिकच मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.

धन्यवाद

सुधाकर नातू

"एक छोटीसी बात":

"एक छोटीसी बात !":

छोट्या पडद्यावर सहसा जाहिरातींशिवाय कोणताही कार्यक्रम आपल्याला पहायला मिळत नाही. मग तो मालिका, कथाबाह्य कार्यक्रम असो, नाटक, चित्रपट असो वा बातम्या जाहिरातींच्या महापूरात बुडवून टाकणारा असतो ! परंतु, त्या रात्री नवलच घडले. सहज चॅनेल सर्फिंग करताना, "लीडर्स" या शीर्षकाच्या कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतले आणि पहाता पहाता अर्धा तास कसा निघून गेला, ते अक्षरशः कळलेही नाही. श्री निलेश खरे व अमोल पालेकर ह्यांच्या, त्या उद्बोधक मुक्तसंवादात कोणत्याही जाहिरातींचा अडथळा नव्हता.....

मोजक्या शब्दात श्री निलेश खरे यांनी टोकदार प्रश्न व गोटीबंद मुद्दे मांडले आणि त्याला अनुषंगून, तर्कशास्त्राला पटेल, अत्यंत स्पष्टपणे, संयत बुद्धीने मोजक्या, अचूक शब्दात प्रत्येक विषयाचा योग्य तो मागोवा, अमोलजींनी घेतल्याचे जाणवले. कोणत्याही माणसाची विचारधारा व द्रुष्टिकोन, हा तो सभोवताली काय घडतंय, त्याकडे डोळस बुद्धीने पाहणारा आणि कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करणारा ह्यावर अवलंबून असतो. असे बोलणे जसे मनाला पटते, तसाच ते आनंददायी व अनुकरणीय भासते. ती कला अमोल पालेकरांनी निसर्गत: आत्मसात केली आहे, याचा प्रत्यय सातत्याने येत होता.

या मुक्त संवादातून यशस्वी चित्रकार, अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध रंगी आणि विविधरंगी प्रतिमांमधून अमोल पालेकर हा एक श्रेष्ठ,
आदरणीय व अत्यंत बुद्धिमान मनस्वी कलावंत आहे असेही जाणवून गेले.

# 'लीडर' अमोलजींचे निवडक बोल:

# "लहानपणापासून मला चित्रकलेची आवड एसएससी नंतर चित्रकला मला पुढे शिकायची होती आणि त्यासाठी माझ्या आई-वडिलांचा प्रथम विरोध होता कारण चित्रकलेतून मी उपजीविका करू शकणार नाही याची जाणीव मला त्यांनी करून दिली पण मी माझ्या विचाराशी ठाम होतो हे बघून त्यांनी मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले. मला त्यांच्या या संस्कारांचा खरोखर खूप उपयोग झाला. आपण जो निर्णय घ्यायचा, त्याचे परिणाम आपण स्वीकारले पाहिजेत हे माझ्या मनात त्यांनी रुजवले. त्यांच्या या दृष्टिकोनाचे मला आभार मानायला हवेत आणि कौतुक वाटते."

# " सत्तेच्या वा प्रभावी वर्तुळात मला यश मिळाले नाही आणि त्यापासून मी वंचित राहिलो असे म्हणणे चूक आहे. कारण जर एखाद्या गोष्टीची मला अपेक्षाच नसेल, तर ती नाही मिळाली तर मी वंचित कसा असू शकतो? मला कुठल्याही राजकीय वर्तुळात सामील व्हायचे नव्हते, मी अलिप्त होतो. माझी तेथून कोणतीही अपेक्षा नव्हती. म्हणूनच मी डाव्या पासून उजव्या विचारसरणीच्या पर्यंत सर्वांच्या बाबतीत मला जर काही पटले नाही, तर मी माझा विचार स्षष्टपणे मांडत आलो आहे."

# "नाट्यक्षेत्रात मी अपघातानेच आलो. सत्यदेव दुबे यांच्या छबिलदास मधील नाट्य वर्तुळात मी टाईमपास म्हणून जात असे. तेव्हा त्यांच्या नजरेला मी आल्यावर, त्यांनी मला नाटकात काम करशील कां, असे विचारले मी अचंबित झालो. त्यावर त्यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे: 'तू काही मोठा कलावंत आहेस किंवा होशील असे मला वाटले म्हणून मी तुला निवडले नाही, तर तू टाईम, वेळ फुकट घालवतोयस, येथे थोडा वेळ सत्कारणी लागेल, म्हणून तुला निवडले आहे. असा मी नाट्यक्षेत्रात शिरलो."

# "भूमिका" चित्रपटामध्ये मला केशव दळवी हीच भूमिका करावयाची होती आणि तसे मी निर्माते श्याम बेनेगलना सांगितले. खरं म्हणजे "छोटीसी बात" "रजनीगंधा" आणि "चित्तचोर" ह्या माझ्या तीन चित्रपटांच्या यशस्वी रौप्यमहोत्सवांमुळे, मी लोकप्रिय नायक म्हणून यशस्वी झालो होतो. अशावेळी मी केशव दळवी सारखी या चित्रपटातली खलनायकी भूमिका स्वीकारणे तसे धोक्याचे आणि निर्माते श्याम बेनेगलनादेखील मीच त्या भूमिकेला योग्य आहे असे वाटणे, हा सुयोग जुळून आल्यामुळे, माझ्या करियर मधली ही भूमिका मला मिळाली व ती म्हणजे मैलाचा एक दगड आहे असे मला वाटते"

# " चित्रपटाने वा नाटकाने मार्केटमध्ये किती गल्ला जमवला यावरून त्यांचे मोजमाप करणे गुणवत्तेच्या दृष्टीने चूक आहे असे मला वाटते. "थोडासा रुमानी हो जाए" हा अगदी आगळा-वेगळा असा चित्रपट आणि त्यामधील नाना पाटेकर यांची त्याच्या अँग्री यंग मॅन या भूमिकेला विरुद्ध अशी रोमँटिक भूमिका हा जो योग जुळून आला. त्या चित्रपटाने मला स्वतःला जे जे आत्मसमाधान मिळाले, त्याची तुलना चित्रपटाने मिळवलेल्या माफक गल्ल्याशी करता येणार नाही."
.......
............
त्या छोटेखानी कार्यक्रमांतून मी माझ्या मनमंजुषेत वेचलेले अमोलजींचे हे निवडक बोल, हा 'सुखी माणसाचा सदरा' (हे त्यांचेच शब्द) बाळगणारा एक बुद्धिमंत, जातीवंत कलावंत समाजभान असलेली व्यक्ती आहे, हेही जाणवेल. अशी आपल्या पाठीच्या ताठ कण्यावर, विचारधारेच्या मजबूत पायावर ठाम उभी असलेली मंडळी आता दुर्मिळ होत चालली आहेत, हे आपणा सर्वांचे दुर्दैव !

केवळ अर्ध्या तासात चित्रकला, चित्रपट, नाट्यसृष्टी आणि एकंदरच सध्याच्या संक्रमणशील, अस्वस्थ करणार्या माहोलासंबंधी, जो विस्तृत पट ह्या विचारगर्भ कार्यक्रमात मांडला गेला, तो नि:संशय आनंददायी व दुर्मिळ अनुभव होता. त्याबद्दल श्री निलेश खरे आणि अमोल पालेकर ह्यांचे अभिनंदन व धन्यवाद.

ही 'छोटीसी बात', 'चित्त' चोरुन गेली, मनाला 'रजनीगंधा'त भिजवून गेली.

सुधाकर नातू

"Social Media: Funny Game of Views/likes !":

 "Social Media: Funny Game of Views/likes !":

It all starred with my posting on social media:

"फेसबुक किंवा व्हाट्सअप वर आपल्याला मेसेज आला आहे की नाही हे बघण्याची तुमची फ्रिक्वेन्सी काय असते?
माझी पंधरा मिनिटे ते अर्धा तास !"

अ१६
-------------
👍
To which I got few responses like:

R1 " अशी काही ठराविक वेळ नाही. सकाळी-१० ते १५ मिनिटे, दुपारी व संध्याकाळी अंतर जास्त असते.

R2 "😀 मी फेसबुकवरचे संदेश मुख्यतः बातम्यांसाठी आणि विविध विषयावरील माहीतीसाठी बघतो , त्यामुळे ते साधारणतः १/१.३० तासांनी पाहातो. फेसबुकवरचे लेख मात्र मी एक पटकन दृष्टिक्षेप टाकुन वाचतो , त्यावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया विशेषतः आवर्जून वाचतो कारण त्यातुन लेखकाला व प्रतिक्रिया देणार्‍या लोकांना त्या विषयाची किती जाण आहे याचा अंदाज येतो. बहुतेक वेळेला दोघेही गोंधळलेले आणि भरकटलेले असतात.

व्हॉट्स अॅपवर मात्र मी लक्ष ठेऊन असतो कारण माझ्या मुलींचे, नातवंडांचे, मित्रमंडळींचे विविध विषयावरचे संदेश सतत येत असतात. देवाणघेवाण चालुच असते. काही विषयविशेष ग्रुप असले तरी त्यातल्या अनेकांबरोबर स्वतंत्र संवाद, वादविवाद चालुच असतो. नविन माहीती आणि विषय कळतात, त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. लोकांचे विविध विषयावरचे ज्ञान, अभ्यासु वृत्ती पाहुन चकित व्हायला होते. बरेच काही शिकायला मिळते. मेंदु , मन , शरीर ताजेतवाने राहाते 👍🏽👍🏽"
👍
My reaction to these:
"👍Thanks for an honest response. The purpose of this, was to understand where do I stand in the crowd of my contacts. Bottom line is your online social media time spent should have a definite goal & it should be in line with that, well balanced."

But , with yet another one, the interactive dialogue was lengthy & interestingly thought provoking !:

R3:
"It depends what i am doing
mid nothing is being done and just watching TV and phone is next to me then it pops up so you look at. but if working or busy or walking or driving etc then less frequency.

but still today itself i was talking to anjali that i want to see if i can curtail my WA and limit to morning and late evening. During day i will only look into certain groups that i have to respond as i am these days asked questions about travel protocols rt pcr as people are desperately wanting to know from me the procedures.

still i am not like todays youngsters who are on phone all the time (WA FB insta twitter and some more apps they only know).

bottom line may be a new year resolution for me is to curtail WA further (i have a feeling you are going to steal my resolution and write a small write up on this as if yours😎)

in your case, i see no reason to curtail WA or reduce frequency. for you it perfectly alright and i would say you should keep watching WA FB except not get into viewer count and so on. may be your new year resolution could be to curtail to be constantly focused on count of viewers. Great Authors write and not worry who reads!!!!
👍
Me: "can you tell me how to get over my habit of not worrying about the likes/no of views for my inputs on social media?
👍
R3: "Temptation !":
is not easy to remove which is why it is something that you are tempted to do. it is human nature! this is why world has run for better or worse: so nothing wrong in having desire to know the count of viewership.

first bare that in mind that it is usual and it is not a dicease until you turn it into.

if your hands start going automatically every few minutes to check the count and on top getting thrilled or dejected based on count is when you should realize that the desire has turned into a temptation.

A habit is good if you control it than it controls you.
There lies the answer how to overcome it.

Let it be a desire and set that desire for a daily knowledge than each minute desire. continuous desire is temptation.

Technically in order to control that habit a simple set of rule is set a time to check; once in morning and then after 12 hours once in evening. only two times a day. set that rule. in between desire tried to turn into temptation remind your mind to let it remain as a desire and about set time. Do NOT click those buttons or look at counts. best is do not bring up prior writing in front of you except these two times; that way it does not automatically pops up. even if pops up move to a brand new writing or reading.

Next one step to control is difficult for you as i know your nature. you have expectations from others to honor your actions. intellectually understand that others do not owe you anything.

I had informed you last few days before i came about my ultimate theory : the sorrow or sadness in world is 90% due to two things only "expectations and dependency";

Do not keep expectations: what count you get is a thank you to God. you did your writing and your are done! Did Bapu did poems and showed to others? he kept on writing.

Another advantage in this approach of writing and not writing for others to respond is your writing will become intense and not the showy or flowery only. you have an amazing great talent in many areas including one stroke writing then write more than chasing popularity. what are you going to achieve at age you are at by count being 10 or 100.
"Sidhhi peksha prasaidhhi mithi hote tenva manasachi bahuli banate. "
you are getting trapped in the temptation and becoming a puppet than a man who can write beautiful.

This does not mean not care of writing quality or desire to get acknowledgement but let that be a milestone on the road while you travel on road of writing than stopping your car to check what mile it is. set your goal is to achieve a tranquility of writing and getting peace out of that only than chasing mind wondering around counts. one thing keep in mind the count for you is not going to go beyond certain number (may be 25 50 100) it is not going to be 10000 ever. then why to get drowned in shallow water of small counts.

I always say any decision should be made intellectually than emotionally.

In this case, see what i said, acknowledge and accept with your brain and not mind what it is about and mainly intellectually accept and decide your step to take to control it.

Temptation is a function of mind and not brain.

There lies the key. make the process based on intelligence acceptance. if you do that then every time you have urge (mind) your brain will bring you back (if you really adopt it intellectually means understand agree implement with brain).

It will slowly change and you are so great that you may speed up.

Start congratulating when you have Plus day (ie you saw count only twice a day and also not get impacted with the number). start noting down negative days when you do not. make a tally. inspect tally at the end of the day which will automatically tell you what you should do next day in order to get a plus day. 3-4-5 days a week to achieve and then full marks.

What i said is not just true for counts but anything in life!!!"
👍
Me: "I do understand that I cannot compel others to act the way I expect them to act on my inputs. Hence it's futile to even think about number of views, likes. And I wonder how am I perfectly ok with my wife, who is just not bothered about what I do with Social media !-1
However for others, it means I have other yardstick for the responses ! -2

Hence solution is obvious, try that 2 above is equal to 1 !!
I don't know how much time period would lapse for me to achieve 2=1."
👍
R3:
"You are too good and talented
once you decide you do it
so this also you will achieve in short time.

Lottery winning :
unless you buy a ticket your chances of winning is absolute zero.

get it!!!"
👍
Moral of the ongoing story is well said in Bhagvat Geeta !":
"कर्मण्ये वाधिकारास्ते, मा फलेशु कदाच न !"

धन्यवाद
सुधाकर नातू
------------------------

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

"मुंबईचे षडदर्शन":

 "मुंबईचे षड्दर्शन !":

"मुंबईचे षड्दर्शन" ही म.टा. मधील लेखमाला, मी नियमितपणे वाचतो. खास तज्ञांनी लिहीलेल्या प्रत्येक लेखामध्ये, मुंबई, तिच्या नजिकच्या इतिहासावर प्रकाश टाकत, इथे घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण घटनांवर मांडलेली माहिती उत्कंठा पूर्ण आणि उपयुक्त अशीच असते.

काय,काय घडून गेले आणि त्याचे काय परिणाम झाले व पुढे काय होतील अशा पद्धतीचे निरीक्षणही या अभ्यासपूर्ण लेखांमध्ये असते. त्यामुळे लेखकांचे अभिनंदन आणि ही अभिनव संकल्पना वाचकांच्या हितासाठी राबविल्याबद्दल म.टा.चे कौतुक व शुभेच्छा. 

म.टा. २३ डिसेंबरच्या अंकामध्ये विचक्षण आणि साक्षेपी अशी कीर्ती असणाऱ्या, संपादक तत्वाचे अनेक पैलू अंगी असणाऱ्या, 'श्रीपु' अर्थात श्री. पु. भागवतांचे 'सत्यकथा' मासिक व मौज प्रकाशनाच्या रुपाने मराठीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांचे योगदान आहे. 'सत्यकथा' मासिकाच्या संपादनाची मुहूर्तमेढ करून 'श्रीपुं'नी साहित्य विश्वात जे पाऊल टाकले, ते खरोखर वामनावताराप्रमाणे मराठी साहित्यविश्वाला व्यापून गेले. 'सत्यकथे'ने, पुढे नामांकित झालेले अनेकानेक दिग्गज लेखक घडवले ही एक त्या विश्वातील अभिमानास्पद व आनंददायी गोष्ट आहे. तिचा लेखाजोखा साक्षेपी व्रुत्तीने सादर करणारा हा लेख, प्रत्येक मराठी प्रेमीने वाचावा असाच आहे. 

त्या लेखातील वेचक व वेधक गोषवारा असा आहे:

"संपादन एक दृष्टी असते, कथा कवितेतील नव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील निर्मितीला आग्रहाने स्थान देणारी आणि त्याचा पुरस्कार करणारी समीक्षाही प्रकाशित करणे, हे संपादकाचे आद्य कर्तव्य असते. मराठी साहित्यवर निरतिशय प्रेम करणारे, लेखकांच्या जडण-घडणीत स्वतःला झोकून देणारे, नवसाहित्य घडवून आणणारे आणि साहित्यिक बांधिलकीचे व्रत घेऊन जाणारे असे संपादक म्हणजे 'श्रीपु' होय. 

संपादक हा लेखक घडवतो हे मान्य न करता, प्रतिभावान लेखकच संपादकाला नकळत घडवत असतो, असे म्हणणारा विचक्षण व साक्षेपी संपादक म्हणजेच श्री पु भागवत !"

सारांश,

ही 'मुंबईचे षड्दर्शन' लेखमाला म्हणजे जणू काही, मुंबईकरांसाठी उघडलेला तिसरा डोळाच म्हणावा लागेल.

धन्यवाद

सुधाकर नातू

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

"Out of the Box Random Thoughts":


# "What's Life?":

Life is a roller coaster ride. It's only for few days, not going generally, beyond single digit, that u feel that there r no problems on your slate to tackle. All of a sudden, these gooddy, gooddy feelings get shadowed by the entry of an uncertain problem, thus making room for his 'fellow-brothers' to enter the fray.

Then on, you struggle not, for just few days but for months, with an ocean of worries to tackle and swim thru'. But 'Lo', Life being a wheel of fortune, some magic wand appears on the scene and cleans the clouded slate, swiftly and you, then again have a clear blue 'sky' with the bright, shining 'Sun' of hope and joy.

That's, what Life is, for one and All. Amen...

# "Disastrous Moral & Ethical Downfall !":

It is really required at this stage of morally and ethically poor
scenerio, to seriously and scientifically probe, investigate the reasons, causes for such a moral downfall, generations after generations over the years gone by.

Add to that there is a growing tendency not to follow set rules/laws or systems and 'Hum Kare so, Kayada' mentality is seen ever now and then. Meaning of it in nutshell is "हम नही सुधरेंगे !" Let's find what went wrong.

Despite present generations' better economic status, we would get ashamed if we examine & compare what was the Model, honest generation a century ago was and what pathetic we are today. It is just not easy to find the answer.

Is it due to 'LPG' factor or any genetic change over all these years , or is it that our priorities, outlook towards the way we should lead life has dramatically changed as economic, scientific advancement went on improving or is it that due to our rapid growth of comforts increased over the last century, there has been our moral degradation?

Thus Qs are plenty,
I believe this is a crucial Turning Point for all of us, as we walk fast
to future years of this century and such a meaningful probe is
the most desirable right now.

Remember the menace, monster of corruption and craze for easy fast prosperity, due to which all our Noble values are getting eroded. It is hence, high time that the genetic scientists, social thinkers/ reformers, economists come together to probe about the Mission Moral Revival of the coming Generations. Other wise I am afraid anarchy won't be fae away.

Sudhakar Natu

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

"टेलिरंजन ? नव्हे, हे तर चिंताजनक नैतिक अध:पतन !":


 "टेलिरंजन ? नव्हे, हे तर चिंताजनक नैतिक अध:पतन !": 

टीव्हीवरील बहुतेक मालिका प्रथम खूप उत्सुकता वाढवणाऱ्या असतात परंतु त्यांचा कथेचा जीव इवलासा असल्यामुळे त्यानंतर मालिका वाढवण्यासाठी काहीही, कसंही दाखवलं जातं. प्रेक्षक जणु मूर्ख आहेत त्यांना डोकं नाही अशा पद्धतीने मालिका कसेही, काहीही दाखवत पुढे नेली जाते. मी अशावेळेपासून ती भरकटत जाणारी मालिका पहाणे सोडून देतो.

"येऊ कशी मी नांदायला !": नकोच येऊस!:

नव्याने आलेली काही अंशी उत्सुकता निर्माण करणारी अशी ही मालिका, मात्र हा एक हास्यास्पद पोरकटपणा आहे, हे लौकरच जेव्हा मालविका लिव्ह ईन सहचराला अक्षरश:कुत्र्यासारखे साखळीला बांधून फिरवते तेव्हाच लक्षात येते. 

ह्या मालिकेमध्ये परिस्थितीने गरीब असलेली लठ्ठ मुलगी-स्वीटू देखण्या श्रीमंत तरुणा-ओमबरोबर बिनदिक्कत प्रेमाचे चाळे करते आणि हे सगळं तिच्या आईला काही केल्या लक्षातही येत नाही. 

न पटणार्या ह्या जोडीच्या आंधळ्या प्रेमात दोघांचे भेटणे प्रेमाचे चाळे चालूच असलेले दाखवतात. घरातल्या आई वडिलांना किंमत न देणारी आणि ज्याच्याबरोबर लिव इन रिलेशनशिप मध्ये आहे अशा नवऱ्याला कुत्र्यासारखे वागवणारी, नोकराला केव्हाही थोबाडीत देणारी अशी मालविका म्हणजे न पटण्याजोगी व्यक्तिरेखा आहे. तिला कसे शोधून काढता येत नाही की, तिचा भाऊ ओम, स्वीटूबरोबर काय काय उद्योग स्वीटूबरोबर करतोय ते. त्याचप्रमाणे त्यांची जर एवढी गडगंज श्रीमंती आहे तर त्यांचा खरोखर काय उद्योग असतो, हे कळायलाही मार्ग नाही. अशा या कंटाळवाण्या मालिकेने छोट्या पडद्यावर यापुढे नांदूच नये. स्वीटूचे ओमशी लग्न न होता, त्यांच्या उद्योगातील नोकराशी होते, त्यानंतर मी ती मालिका पहाणे

सोडून दिले.

"रंग माझा वेगळा-काळा, काळा !":

ह्या मालिकेमध्ये तर सौंदर्या ही सासू असलेली खलनायिका काळ्या रंगाची पराकोटीची नफरत करते. त्यामुळे काळ्या रंगाच्या सुनेच्या-दीपाच्या मागे ती अक्षरशः हात धुऊन मागे लागते आणि तिचे हाल-हाल होईल इतका त्रास देते. दीपाची सावत्र बहीण श्वेताचा दीपाच्या नवऱ्यावर-डॉ कार्तिकवर डोळा असल्यामुळे, त्यांच्या घरात प्रवेश मिळावा ह्या हेतूने, बिनदिक्कत त्याच्या धाकट्या भावाशी विवाह काय करते. नंतर गर्भवती राहिलेल्या दीपाच्या बाबतीत ती तर नको ते भयानक कृत्य करते. 

तिच्या मध्ये आणि तिचा नवरा कार्तिक यांच्यात दुरावा व्हावा म्हणून कार्तिकला मूलबाळ होणारच नाही अशा तऱ्हेचा खोटा रिपोर्ट तयार करण्यामागे तिचा हात असावा हे काय म्हणायचे? पुढे तर दीपा घर सोडून गेल्यावर मालिका कशीही भरकटत जाते. भरीला भर म्हणून मध्येच एंट्री घेतलेल्या डॉ कार्तिकच्या डॉक्टर मैत्रिणीचे खलनायकी उद्योग वेगळेच. थोडक्यात ह्या मालिकेचा रंगच मुळी काळाकुट्ट. काय साधतं हे असले नकारात्मक चित्रण दाखवून? त्यानंतर मी ही मालिका पहाणेच

सोडून दिले.

"स्वाभिमान?: हा तर गुंडाचा आखाडा !":

"स्वाभिमान" मालिकेमध्ये तर अक्षरशः सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत शैक्षणिक संस्थेमध्ये नाही केला पल्लवीला वर्गातील टारगट मुले त्रास देतात आणि वर्गातच जवळजवळ रात्रभर कोंडून ठेवतात तेवढे पुरे झाले नाही म्हणून की काय त्या मुलांना नंतर काहीच शिक्षा होत नाही तीच मुले काही दिवसानंतर तर याच्या पुढची मजल घाटात स्टोअर रूम मधून काहीतरी पल्लवीला आणायला लावून तिथे अशी व्यवस्था करतात की तिचा पाय लागल्यावर मोठा स्फोट होईल, शॉर्टसर्किटमुळे आग लागेल. तरीही त्या मुलांना त्या भीषण क्रुत्याबद्दल ना पुढे काही जाब विचारला गेला, ना या प्रकरणाचा शोध घेतला गेला. दुसरे असे की आदिती मॅडम आणि त्यांचा मुलगा शांतनु यांच्यामध्ये जे हाडवैर आहे ते तर खरोखर अनाकलनीयच. मुलाची इतकी दुश्मनी आईबद्दल दाखवून काय साध्य होते?

त्यापेक्षाही कमाल म्हणजे पल्लवीचे वडील आदिती मॅडमच्या वरील प्राणघातक हल्ल्याला जबाबदार असल्याचे कळूनही, या मॅडम खटला मागे घेतात आणि त्यांना सोडून देतात. म्हणजे इथे गुन्हे एकामागोमाग घडतात, मात्र त्या आरोपींना शिक्षा होत नाही. शैक्षणिक संस्था आहे की गुंडांचा बाजार असं देखील वाटतं ! इतके पुरे नाही, म्हणून पल्लवीचा मेव्हणा तिच्यावर अतीप्रसंग काय करतो! ह्या तर्‍हेची घ्रुणास्पद गुन्हेगारी क्रुत्ये दाखवून, स्वाभिमान नावाखाली दाखवून काय साधलं जातं ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. ओढून ताणून चंद्रबळ आणत ही मालिका अशीच भरकटत चालली आहे.

आपली भूषणावह परंपरा आपले नीतिमूल्ये आणि एकंदर आपली संस्कृती आपली कुटुंब व्यवस्था याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मराठी मालिका जे जे काही दाखवत आहेत ते तिटकारा उत्पन्न करणारे आणि निश्चितच अयोग्य असे आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक प्रसंग नकारात्मक अशा तर्‍हेची कृत्ये करायची आवड असलेली पात्रे यांचा सुळसुळाट, हेवे दावे, कटकारस्थाने या सगळ्यांमधून टीआरपी मिळवायचा अट्टाहास हे निश्चितच निंदनीय आहे. आपल्या लेखकांना झाले काय आहे?

यापेक्षा आपले जे चांगले साहित्य आहे त्यामधील चांगल्या कथा निवडून किंवा कादंबऱ्यांमधून उत्तम उत्तम असे नाट्यमय मालिका तयार करता येतील याकडे कोणाचेच लक्ष नाही. करमणूकीच्या बुरख्याखाली हा सारा समाजाला रसातळाला नेणारा उद्योग ताबडतोब थांबला पाहिजे, असेच कुणाही समंजस माणसाला वाटेल. त्या करताच ह्या सगळ्या करमणुकीच्या एकंदर प्रयोगांवर सेंन्सारशिप येणे आवश्यक नव्हे कां?

अखेरीस....

ह्या विचार मंथनाला "प्रेक्षकांनी रिमोट वापरावा", असे साळसूद उत्तर नको, उलट प्रेक्षकांना रिमोटला उलट हातच लावायची वेळ येणार नाही, अशा उत्तमोत्तम मालिका बनवल्या जाव्यात.

त्याकरिता.....

"मालिकांचे 'महाभारत':

भरकटत, 'पाणी' टाकून लांबलचक मालिकांना नांवे ठेऊन अक्षरशः उबग आला. ह्या द्रुक् शाव्य माध्यमाचा अधिक चांगला उपयोग व्हायला हवा. म्हणून हे मनोगत:

१ जुन्या चावून चोथा झालेल्या आणि कथानकात काहीही नाविन्य न उरलेल्या मालिका पुढे दाखविल्या जाऊ नयेत.

२ ह्या पुढे तरी शक्यतोवर टी-20 सामन्यांप्रमाणे मर्यादित भागांच्या आणि निश्चित कथानकाचा शेवट असलेल्या मालिकाच दाखविल्या जाव्यात.

३ त्या अनुषंगाने कुठल्याही मालिकेत प्रचलित कायद्यांच्या विपरीत असे काहीही दाखवले जाणार नाही ना, असे यापुढे तरी त्यांच्यावर सेन्सॉर नियंत्रण ठेवले जावे.

४ ज्याप्रमाणे महाभारत मालिकेमध्ये प्रत्येक भागाच्या शेवटी त्या त्या भागातील कलाकारांचा सहभाग असे, त्यांच्या नावाची श्रेयनामावली दाखवली जायची, तीच पद्धत यापुढे मालिकांमध्ये सुरू केली जावी.

याशिवाय

काय?....काय?... काय?...

जे तुम्हाला वाटते ते प्रतिसादात जरूर लिहा.

धन्यवाद

सुधाकर नातू

"The Turning Points in Life.":

 "The Turning Points in Life.":

There are Victory Points, as well as Turning Points in Life. Victory Points are the successful fights against the odds & challenges and mostly are achievable due to out of box thinking & sustained efforts. 

On the other hand, in the course of the journey of Life, one does encounters many a Turning points which ultimately change his path and possibly Future too. This is because TPs have the Power to generate all together different options & probabilities- that can turn out bad or good.  It is interesting at least sometime in Life; one must review his past & to review the VPs & TPs gone by.

Whenever you recall & introspect; while VPs would focus on your wins, most likely the TPs happen to be your losses. It is further exciting to review the TPs & try to imagine the possibilities, if at all, these TPs have not occurred, a different picture of what Life would or could have been would emerge. 

Thus you would get a kaleidoscope of dynamic images of variety of possibilities in your Life resulting into a different position as on Present. 

Answer to the Qn why at all these TPs  come in our Lives, is very difficult & possibly impossible. On the hindsight, TPs are results of few factors, not in our hands-hence uncontrollable; while there could be those culminating from our own Decisions then, on optional choices available. 

These Decisions are mostly dependent on our beliefs & values as well as the way we want to lead Life based on our Character. Such very decisions & actions that appear to be the Most correct, right at that moment of time, mostly in future get viewed as the wrong ones; for short term satisfaction then; we have missed the road to a much better, comfortable future.

In the ultimate analysis, we Should & Must accept these TPS as they were, without any remorse or repentance and get ready to look forward to more such fresher TPs in the unknown Future. 

Honestly & Frankly, this Monologue is only for my own self-expression & self satisfaction & I don’t have the courage to imagine their acceptance/rejection when read.

But I do take the Liberty to mention that these are for Posterity. Thank You.

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

"एक 'वाचलेला' दिवस !':

 "एक वाचलेला दिवस !":

शीर्षक मोठं गमतीशीर आहे, असं तुम्हाला वाटत असेल. 'एक उनाड दिवस' असा मला वाटतंय लेख किंवा 'एक उनाड दिवस' चित्रपट तुम्ही पाहिला असेल. परंतु माझा कालचा दिवस हा एक 'वाचलेला' दिवस होता असं आता मला जाणवतंय.

त्याचं असं झालं, माझ्या लक्षात आलं की मी विशेषकरून मोबाईल हातात धरून सकाळपासून झोपेपर्यंत "तू माझा सांगाती" सारखा मोबाईल मध्ये वेळ घालवत आलेलो आहे. व्हाट्सअप बघ, फेसबूक बघ, ई-मेल बघ अशा तऱ्हेने अधुनमधुन मोबाईलमध्ये डोकवायची माझी सवय घातक आहे हे मला जाणवलं. ठरवलं, आता मोबाईल वापराचा उपास करायचा. परंतु संपूर्ण २४ तास ते मला जमणार नाही, असं वाटल्यामुळे मी ठरवलं की, सकाळपासून सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत मोबाईलला हात लावायचा नाही. माझी वाचनाची सवय त्यावेळी कामाला आली.

पुष्कळ दिवस काहीच वाचलं नव्हतं. रविवारनंतरचे पेपर वाचायचे राहिले होते. त्यामुळे म. टा. आणि लोकसत्ता हातात घेतला आणि वाचनाचा माझा रतीब, मी चालू केला. त्यातूनच मला हा 'वाचलेला' दिवस सापडला ! वेगवेगळ्या तऱ्हेचे मजेशीर अनुभव त्या वाचनातून माझ्यासमोर उभे राहिले.

पहिला लेख होता, तो आपल्या घरातील देवाच्या पूजेच्या मूर्ती किंवा पोथ्या किंवा धार्मिक पुस्तकं तसबिरी इ.इ. यांचं घर बदलताना किंवा बदल्या होताना बऱ्याच वेळेला आपण काही शकत नाही. या समस्येवर प्रकाश पाडणारा तो लेख होता. या समस्येच्या मुळाशी जाऊन कुणी ना कुणीतरी प्रयत्न करतोय याचा तेथे उलगडा होता. पुण्यातील आणि नाशिक मधील संस्था व व्यक्ती यांच्याकडून अशा तर्‍हेचा पुढाकार घेतला गेला आणि त्यातून कितीतरी धार्मिक साहित्य योग्य मार्गाने, कुणाची मनं न दुखवता व्यवस्थापित केले गेले. खरंच किती वेगळा अनुभव होता हा !

तो अनुभव वाचून होतो नाही, तोच नव्या जगाची प्रगती व दिशा दाखवेल असा लेख वाचनात आला आणि तो मनाला अधिकच उभारी देऊन गेला. सध्या ट्विटरवर 'सीईओ' म्हणून पराग अगरवाल या भारतीयाची नेमणूक झाल्याचा तो लेख होता. आज जगामध्ये अग्रगण्य कंपन्यांमध्ये अनेक भारतीय सर्वोच्च पदी आहेत हे आपण पाहतच आहोत. आज जगामध्ये अग्रगण्य कंपन्या आहेत त्यांचे असेच उच्चाधिकारी बहुतांश 'आयआयटी' पदवीधारक आहेत, ही भारताला ललामभूत अशीच गोष्ट आहे. त्यासंबंधीचा त्या लेखातून भारतीयांच्या बुद्धिमत्तेची पताका संपूर्ण जगभर कशी आज योग्य तर्‍हेने फडफडते आहे याचे दर्शन झाले आणि मला खरोखर क्रुतक्रुत्य झाल्या सारखे वाटले.
आज ज्यांना उगाचच नावे ठेवली जातात, त्यांच्याच द्रष्टेपणासारख्या निर्णयामुळेच 'आयआयटी' सारखी संस्था भारतभर योग्य त्या ठिकाणी स्थापली गेली. त्याचेच उत्तम परिणाम, आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आर्थिक साम्राज्याचं आधिपत्य करतोय, हे त्या वाचनातून ध्यानात आलं.

ह्या नंतर चक्क पुराणातली एक गोष्ट वाचायला मिळाली. पराभूत आणि नैराश्याने ग्रासलेल्या आपल्या मुलाला संजयाला, त्याची आई विदुला कशी प्रेरित करते त्याबद्दलची ! ही गोष्ट कृष्ण कुंतीला आणि नंतर ती पांडवांना सांगते. तिचा मतितार्थ हा की, तुम्हीदेखील निराश न होता आपल्यावरील अन्यायासाठी कायम ठाम निश्चयाने उभे रहा, व लढा. त्याचे ते स्फूर्तिदायक चित्र होते. प्रत्येकाने आपला जो धर्म आहे, म्हणजे आपल्या त्या त्या वेळेची जी जीवनाची इतिकर्तव्यता आहे, ती प्राधान्याने पूर्ण करावी, हा विचार मांडणारा लेख अथवा ती गोष्ट खरोखर प्रत्येकालाच मार्गदर्शक आहे. कसे जगावे, आपण जे हातात घेतो किंवा परिस्थितीवश आपल्यासमोरचे कर्तव्य पार पाडणे, ही आपली पहिली आणि एकमेव प्रायोरिटी असायला हवी. हा वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या वाचनातून मिळाला.

एवढंच पुरे नाही, म्हणून मला माझ्या आजोळची, जे कोकणात आहे, त्या कोकणातील शांतूदादाची गोष्ट वाचायला मिळाली. त्यावेळच्या एकंदर परिस्थितीचे, माणसांच्या जीवनशैलीचे त्यांची गरिबी आणि एकंदर परिस्थितीला तोंड देऊन कुटुंबियांना आपल्या परीने योग्य तऱ्हेने न दुखावता आपली प्रगती करणारा, शांतुदादा अखेरीला गावी आपलं घर बांधायचं हे स्वप्न पार पाडायला जातो, तेव्हा ही प्रगतीची कमान कशी उतरत जाते याचं ते हृदयंगम चित्र होतं. माणसाचे जीवन किती अगम्य आणि अतर्क्य असंच असतं ! केव्हां कसे दिवस येतील काहीच सांगता येत नाही. माणूस कोणत्या वेळी कोणता निर्णय घेईल आणि त्यामुळे त्याचे काय काय बरे वाईट परिणाम होतील ते सांगणे, तर्कापलिकडचे असते.

सध्याच्या अस्वस्थ करणार्‍या अशा काळाची जी काही कहाणी आहे तीचे समर्पक विडंबनात्मक दृष्टीने मांडणारा, "दीड दमडी" हा लेख देखील मनाला एका वेगळ्याच जगात घेऊन गेला. आणि त्याच वेळेला एकीकडे अनिश्चित अस्वस्थतेचा माहोल आपल्या सभोवती घोंघावत असताना, शाळेतली एक कविता आठवली:

"सरिता करीते कां कधी खंत,
सरिता करीते कां कधी खंत !"

थोडक्यात सध्याच्या काळात "कुठल्याही तर्हेची खंत बाळगू नये" हाच तो त्या 'दीड दमडी' मधून मला लाभलेला मार्ग होता. अशा तऱ्हेने त्या दिवशीच्या वाचनांतून, अजून दोन-चार गोष्टी सांगता येतील. परंतु त्यांचा मतितार्थ एवढाच की,
"ज्याची चलती आहे, त्याच्या मागे लोक धावत जातात आणि जर तो मागे पडला तर त्याला कचर्यासारखा बाजूला फेकून देतात !"

असं करता करता, केव्हा दुपारचे चार किंवा पाच वाजले कळलच नाही. आणि आपोआपच मला जाछवले की खरंच आपला तो दिवस खरोखर "वाचला" असं मला वाटलं ! लगेच हात सवयीप्रमाणे मोबाईलकडे गेले आणि आमची गाडी मूळ पदावर आली !. पण त्यातून मला जे जे लाभलं ते ते मी तुमच्यापुढे इथे सारांशाने मांडलं.

असाच "वाचलेला" दिवस तुमच्याही जीवनात यावा असं मला वाटतं.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.

रसिक वाचकांसाठी,
अमूल्य संधी !:
💐💐💐💐💐💐💐💐💐
"सुधा"
"डिजिटल दिवाळी अंक-'२१":
"नवलोत्सव"
💐💐💐💐💐💐💐💐💐
शिवाय,
"जुने ते सोने" ही खास अर्थपूर्ण पुरवणी
वर्ष चौथे....

मानधन फक्त रू.१००/-.......
आँनलाईनने......

सर्वात महत्वाचे.......
खास दिवाळी भेट:
"Digital Management Musings"
किंवा डिजिटल "नियतीचा संकेत" ह्यातील तुमच्या पसंतीचा एक उपयुक्त लेखसंग्रह विनामूल्य.....

ताबडतोब......
प्रतिसादात अंकाची मागणी प्रतिसादात
तुमचा ईमेल आयडी
वा whatsapp no. देऊन नोंदवा....