"संध्याछाया भिवविती ह्रदया !":
व्रुद्धापकाळ हा अत्यंत कसोटीचा काळ असू शकतो. फारच थोड्यांना निरामय आरोग्य व आर्थिक स्वास्थ्य लाभते. संभाव्य कितीतरी प्रकारच्या अनिष्ठ अवस्थांतून जीवनाची ही संध्याकाळ अनेक अभाग्यांना काढावी लागते.निसर्गचक्र म्हणा अथवा इतर काही म्हणा, वा प्रारब्ध, या साऱ्यावाचून कोणाचीही सुटका नाही. त्या संभाव्य दुर्दैवी अवस्था पहा:
हृदयरोग, कॅन्सर, स्मृतीभ्रंश, अल्झायमर, पार्किन्सन्स अतीतीव्र सांधे वा गुडघेदुखी, कोणत्याही कारणाने घरात खिळळून टाकणारे अपंगत्व व आपले व्यवहार आपल्यालाच न करता येण्याजोगे आजारपण, अंधत्व अथवा ऐकू न येणे वाचा जाणे, कुष्ठरोग, अंगभर पांढरे डाग व रूप विद्रूप होणे, तीव्र अशा प्रकारचा दमा, क्षय व इतर असाध्य रोग.....
या न संपणार्या यादीत कुटुंबामध्ये आपल्या माणसांनी पूर्ण दुर्लक्ष करून, एखाद्याला वृद्धावस्थेत वास्तव्य करावे लागणे आणि तीव्र आर्थिक ओढाताण अशा गोष्टीही सहन करायची वेळ काही अभागी माणसांवर येते, हे विसरून चालणार नाही.
सारांश वृद्धावस्था ही एक अपरिहार्य व सहन करायलाच लागावी अशी ही कसोटी आहे. जीवनाची ही अपरिहार्यता, आपण जेव्हा उमेदीत जगत असतो, तेव्हा विचारात घेतच नाही आणि मनाला येईल तसे आत्मकेंद्री सुखाच्या मृगजळामागे वेड्यासारखे धावून, आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत, प्रकृतीचा कणाकणाने नाश करत राहतो.
वृद्धावस्थेतील वरील सारखी दयनीय स्थिती प्रत्यक्षात आल्यावरच हे असे मागे वळून पहाण्याचे शहाणपण सुचते, हे पण दुर्दैवच. मात्र आपण हे विसरतो की, आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतील चुकांचाच हा परिपाक असतो. ही जाणीव तरुणपणीच व्हायला हवी आणि भावी आयुष्यात येऊ शकणारी त्या अनिष्टतेची संभाव्यता, ह्याकडे डोळसपणे पाहून आपली जीवनशैली वेळीच तरुणपणीच नियंत्रणात ठेवावी, याकरता हे सुचलेले विचार.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
हे आणि असेच.....
अनेक विचारप्रवर्तक, अर्थगर्भ लेख....
लेख वाचण्यासाठी......
माझ्या ब्लॉगची ही लिंक संग्रही ठेवा....
https://moonsungrandson.blogspot.com
लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा