बुधवार, २ जून, २०२१

"प्राधान्य अचूक, तर प्रगती बिनचूक आणि सुख, समाधान आपसूक !":

 "प्राधान्य अचूक, तर प्रगती बिनचूक आणि सुख, समाधान आपसूक !":


कोरोनाचे महासंकट आल्याला आता वर्ष उलटून गेलं आणि पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाटही आपले भयानक प्रताप दाखवत आहे. ह्यातून सुटका कोण कधी, कशी करणार ह्याचे उत्तर कुणाहीजवळ नाही. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी आपली स्थिती झाली आहे. लहान थोर सर्वांचीच मती आणि आयुष्ये कुंठीत झाली आहेत. 'उद्या'चीच जिथे शाश्वती नाही, तिथे पुढचे भविष्य काय कुणाला ठाऊक नाही. ज्ञात ईतिहासात कदाचित अशी वेळ पूर्वी कधीच आली नसेल.

जीवनात पुष्कळ वेळा निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेताना आपल्या मनाची संभ्रमावस्था होते. अशा वेळेला आपण काय करायचे ते सुचत नाही. हे करू कां, ते करू? शेक्सपियरच्या हॅमलेट नाटकाप्रमाणे "टू बी ऑर नॉट टू बी" अशी मनस्थिती होण्याची बऱ्याच वेळेला वेळ येते आणि त्यामुळे आपण योग्य तो निर्णय नेहमी घेतोच असं नाही.

ज्या वेळेला माणूस विशिष्ट रितीने वागतो, तेव्हा त्याला वाटत असतं की, आपण योग्य निर्णय घेतला आहे. परंतु त्याचे बरे वाईट परिणाम पुढे आपल्यालाच भोगावे लागतात. योग्य वेळी योग्य विचार आणि त्याप्रमाणे कृती करणारी माणसे, नेहमी खूपच कमी असतात. त्यामुळे सहाजिकच जगामध्ये यशस्वी प्रसिद्ध नांव मिळवणारी, अशी खूप कमी माणसं असतात, त्या तुलनेत सर्वसामान्य जीवन जगायला वाट्याला येणारी माणसं जास्त असतात. याचं कारण ही द्विधा मनस्थिती किंवा आपल्याला नक्की कोणत्या वेळी काय करणं गरजेचं आहे हे न कळणं.

१.
"विद्यार्थी दशेत अभ्यास प्राधान्याचा":
उदाहरणार्थ सांगतो, हा मुलगा अतिशय हुशार सर्वसाधारणपणे तो नेहमी चांगले मार्कस् मिळवायचा, वर्गात पहिला यायचा. पण हे सारं एसएससी पर्यंत आणि नंतर महत्वाचे वेळी, अभ्यास सोडून तो भलत्याच गोष्टींत रमला. त्यामुळे त्याला अपेक्षित असा कोर्स करण्याची संधी होती, ती हुकली आणि मामुली कुठलीतरी डिग्री गटागळ्या खात घेऊन, त्याला कुठेतरी मास्तरकी करायची वेळ आली. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय जीवन जगायची त्याच्यावर पाळी आली. त्याच्या क्षमतेपेक्षा जीवनामध्ये त्याला जे फळ मिळालं, ते खूप खूप कमी होतं. सहाजिकच तो नेहमी असमाधानी राहीला.

आता ह्याचं कारण काय, तर विद्यार्थीदशेत तुम्हाला कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं-तर अभ्यासाला, हे कळलं पाहिजे. साधारण तुमची जी काही भवितव्य घडविण्याचे १६ ते २२-२५ वय असते, तेव्हा गमतीजमती, मौजमजा याकडे जास्त लक्ष न देता आपल्या अभ्यासाचा मार्ग आहे त्यामध्ये पूर्ण लक्ष घालून, यश मिळवणे हे तुमचं प्राथमिक ध्येय असलं पाहिजे. परंतु या तरुणाची, या माणसाची चूक झाली आणि तो कॉलेजमध्ये संगत चांगली न मिळाल्याने, अभ्यासावरचं लक्ष उडालं व खेळात इतर नको त्यात भाग घेत राहिला.

याच्या उलट त्याचाच एक मित्र, जो अभ्यासात सर्वसाधारण होता, त्याला ssc ला मध्यम मार्क मिळाले, पण कॉलेजमध्ये गेल्यावर काय झालं कळेना, उत्तम प्रकारे लक्ष देऊन चांगला अभ्यास कर करून आय आय टीला अँडमिट झाला, पुढे तो उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला आणि तिथल्या एका कंपनीत उच्चपदी पोहोचला. शाळेत दोघं एकाच वर्गात, हा पहिला मुलगा खरा त्याच्यापुढे होता, नंतर परंतु मित्र पुढे कां गेला? कारण योग्य त्या वेळी आपली प्राधान्यक्रम कोणता आहे, हे त्याला कळलं.
२.
"व्यावसायिक जीवनात माणसे योग्य रितीने हाताळणे महत्वाचे":
आता करीयर करताना, नोकरीमध्ये अशीच वेळ येते. आपण योग्य वेळी योग्य तऱ्हेने वागत नाही, कितीही झालं तरी बॉस इज ऑलवेज राईट हेच ज्यांना लक्षात येतं, ते यशस्वी होतात. बाँसशी पंगा घेतला, तर लॉंग टर्ममध्ये नुकसानच होणार, हे जर कळले नाही तर तुमची पिछेहाट नक्की. तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं आढळतील, तिथे शिक्षणात उत्तम यश असते, परंतु नोकरीमध्ये त्यांना तेवढं यश मिळत नाही, कां? तर एकीकडे माणसं कशी सांभाळायची हे ज्ञान त्यांना नसते. माणूस वरिष्ठ वा सहकारी असो, किंवा तुमचे
कनिष्ठ असोत, सगळ्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याशी जसं वागायला हवं, तसं जर तुम्ही वागलात तर तुम्ही पुढे जाऊ शकता. पण पुष्कळ वेळा पुष्कळ माणसांना ह्यूमन इंजीनियरिंग म्हणतो, त्याचे अज्ञान असलेली माणसं दुय्यम स्थानावर, पण साधे कुठली तरी साधी डिग्री मिळवलेला एखादा माणूस व्हाईस प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचू शकतो, कां? तर माणसं हाताळण्याचे कौशल्य नोकरीतील जीवनामध्ये महत्त्वाचा असते. तरी जर तुमचा EQ अर्थात Emotional Quotient- भावनिक निर्देशांक चांगला नसेल, तर अपयश मिळणार. त्या उलट मनावर योग्य तो ताबा ठेवून, योग्य वेळी योग्य तऱ्हेने जी माणसं वागतात, जीवनात यशस्वी
होतात.
३.
संसारात तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा जो काही संसाराचा गाडा आहे, त्यात समोर तोडायला एक, तर जोडीदार जोडायला बघतोय, एक पुढे जातोय, तर दुसरा मागे खेचतोय
तर असमाधानी सहजीवन मिळणरंच.
तुम्ही विवाह करता ज्या वेळेला तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे की, माझा विवाह मी जोडीदाराला बरोबर घेऊन यशस्वी करीनच. त्यासाठी काय करायला पाहिजे तर एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे एकमेकांचे गुणदोष योग्य तऱ्हेने पारखून त्याप्रमाणे साथ दिली पाहिजे. काही झालं तरी वादविवाद भांडणं विकोपाला जातील या पद्धतीने न वागणं आवश्यक असते. संसारात एखादा योग्य वागतो, तर दुसरा कुरबुरी आणि काही ना काही तरी गडबड करत संसार दुःखी करतो. अशा तर्‍हेचेच अनेक संसार कुठून भलतीकडेच चाललेले असतात. आपल्या जोडीदाराचे दोष, योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत. एकमेकांना संभाळत गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तरच आणि तरच तुम्ही संसारात यशस्वी व्हाल.
४.
शेवटी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता सांगतो. म्हणजे सबंध जीवनामध्ये टॉप प्रायोरिटी कशाला हवी, तर ती म्हणजे आरोग्याला. तुम्हाला असं लक्षात येईल बहुतेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तरुणपणापासून, बालपणापासून योग्य ते संस्कार अंगिकारत, आयुष्यभर आपले आरोग्य सांभाळत रहाणे अत्यावश्यक आहे. परंतु वास्तवात आपण केव्हाही कसेही वागतो, वाटेल तेवढं कधीही खातो, वाटेल तसे वागतो, प्रसंगी व्यसनाधीन होतो, आणि त्यामुळे सगळ्याच माणसांना दीर्घायुष्य मिळतंच असं नाही. त्यातून दीर्घायुष्य जरी मिळालं तरी निरोगी मिळत नाही. पूर्ण जीवनामध्ये टॉप प्राँयाँरिटी कशाला दिली पाहिजे तर ती शरीर व मनाच्या आरोग्याला.

आज कोरोनाच्या महासंकटाने, एक प्रकारे प्रत्येक माणसाला जाणीव करून दिली की, सगळ्यात महत्त्व तुमच्या निरोगी जगण्याला, आरोग्याला संभाळण्याला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण जागृत होऊन ह्या गोष्टीला सर्वाधिक महत्व देऊ लागला आहे. वाईटात कधी चांगले घडते, ते हेच. निरामय निरोगी रहाणं हा सगळ्यांचा महत्त्वाचा मूलमंत्र बालपणापासून अखेरपर्यंत असला पाहिजे.

ह्या लेखात तुम्हाला जीवनामध्ये जे वेगवेगळे टप्पे असतात, त्या प्रत्येक टप्प्यामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, कोणत्या गोष्टी करायच्या आणि आपलं जीवन यशस्वी कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा लक्षात ठेवा कि तुमचा भवितव्य तुमच्या हातात आहे तुमचं मन, विचारशक्ती तुमच्या जीवनाचा मार्ग रेखाटत रहाणार आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

माझी ही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी !":
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":

1. माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....

2. I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा