शुक्रवार, ४ जून, २०२१

"विचारांचे अम्रुतमंथन":

 "विचारांचे अम्रुतमंथन":


/// "गोत्र आणि स्री पुरुष समानता !":
गोत्र म्हणजे काय या विषयावर एक चांगली ऑडिओ क्लिप मी ऐकली. माणसाच्या मुलाचा मुलगा त्यापासून त्याच्या वंशाची सुरूवात, अशा संकल्पनेवर गोत्र बांधलेले असते. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपासून म्हणजेच महत्त्वाच्या आठ ऋषींपासून मानववंश पुढे पुढे कसे जात राहिले, यासंबंधीची माहिती गोत्र या विषयावर तेथे दिली होती.

त्या वेळेला हे लक्षात आले की गोत्राचा उल्लेख फक्त पुरुषाच्या बाबतीत कायम विविध वेळी म्हणजे विवाह समारंभ, मुंज, विविध प्रकारच्या पूजा अशा वेळी केला जातो. फक्त मातुल घराण्याच्या गोत्राचा उल्लेख केवळ कन्यादानाच्या वेळेलाच केला जातो. हे असं कां? स्त्री ही खरं म्हटलं तर पुरुषापेक्षा मानववंश पुढे जावा म्हणून झटणारी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते, किंबहुना कांकणभर जास्तच योगदान तिचे यामध्ये असते. पुरुषाचे योगदान केवळ बीजारोपण करण्यापुरतेच असते आणि नंतर ती पुढची सारी उस्तवार करण्याची जबाबदारी स्त्रीवर नैसर्गिकरित्या येते, हे सर्वांना ठाऊक आहे. नऊ महिने प्रसववेदना सहन करून अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून वापस येऊन बाळ अंत पण अशा तऱ्हेने नवनिर्मिती बाळ निर्माण होत असते. शिवाय त्यानंतर चे संगोपन देखील स्त्रीच करत असते.

ह्याशिवाय संसाराचा गाडा कायम आयुष्यभर शक्यतो घरातील सगळी कामे स्त्रियाच करत असतात. हे असं पूर्वापार चालू असून सुद्धा आजतागायत स्त्रीच्या बाजूचा विचार केला नाही. मातुल घराण्यातल्या गोत्राचा उल्लेख नंतर कधीच कां येत नाही, हे प्रश्न माझ्या मनात ही ऑडिओ क्लिप ऐकल्यावर निर्माण झाले. स्त्री पुरुष समानता यावर कितीही कंठशोष केला, तरी खरोखर पुरुषप्रधान अशा या व्यवस्थेमध्ये स्त्रीला जे दुय्यम स्थान दिले आहे, ते पूर्णतः अनैसर्गिक आणा अयोग्य असे आहे. सहाजिकच यापुढे तरी स्त्रीला योग्य ते स्थान कसे देता येईल, कौटुंबिक व्यवस्थेमध्ये दोन्ही बाजूच्या गोत्रांचा विचार करून सांगड कशी घालता येईल, याचा विचार व्हावा. त्याप्रमाणे मार्ग शोधला जावा असंच मला यानिमित्ताने वाटलं.
जे वाटलं ते इथे मांडलं !

/// "उमलते बोल":
"उमलते बोल":
# ऐहिक संपत्तीपेक्षा उत्तम शरीरसंपदा
लाखमोलाची.
# निर्व्यसनीपणा हा मनोनिग्रहचा दर्शक असतो. # सत्संगतीमुळे आपणही चांगल्या विचारांच्या वातावरणात राहतो.
# उत्साह व आनंद म्हणजे जीवनातले खरे मित्र. # परिस्थिती व वेळ पाहून वागणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
# बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यानुरूप आपण बदलावे.
# स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची हुशारी हवी.
# प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती त्याच वेळी
करावी.

/// 👍👍👍
"नवनिर्मितीची किमया":
परफॉर्मिंग आर्ट अर्थात नवनिर्मितीचा आविष्कार हा नृत्य नाट्य चित्रपट वा चित्र, संगीत लेखन कुठल्याही स्वरूपात असो, ते व्यक्त करणारा, एक अभिजात प्रतिभावंत असतो आणि त्याला ती निर्मिती करताना विलक्षण आनंद होत असतो. परंतु ती नवनिर्मिती जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवली जाते, आणि रसिकांची त्याला दाद मिळते, तेव्हाच त्या निर्मितीची एकंदर पूर्तता, सार्थकता होत असते.........

/// "सोशल मिडियावरील संदेश":
माझ्यापुरते बोलायचे झाले तर, मी voice to text app वापरून माझे लेखन करतो. नंतर व्यावहारिक सुलभता म्हणून आपण contents द्वारे substance देत आहोत, ह्याला प्राधान्य असणे गरजेचे ह्या द्रुष्टीने त्याचा फक्त आढावा घेतो, भाषेची शुद्धता वा व्याकरण हे मुद्दे गौण आहेत असे मानून त्याकडे दुर्लक्ष करतो. सहाजिकच माझ्या भाषेत शुद्धलेखन विषयक चुका असू शकतात आणि त्यांवरील प्रतिसादापेक्षा, माझ्या संदेशातील substance संबंधीत दाद अथवा फिर्याद मी अपेक्षितो.
👌👌
आता सोशल मिडियावरील पुढे ढकललेला एक उपयुक्त संदेश:

/// 👍👍 "सन फ्लॉवर थिअरी" :
जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां?
नाही.
तर काय घडते त्यावेळी?
ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर! एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !! निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे ! तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !!

/// "परिक्षा व प्रतिक्षा !":

"परीक्षे"चा खराखुरा निकाल वेगळा,
आणि अंदाज वेगळा!

"निकाल" अजून लागलेला नाही,
म्हणून कुणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे
जसे होऊ नये,

तसेच निराश होऊन देखील कुणी
पाणी पाणी करू नये!

घोडामैदान जवळच आहे.
वाट बघायची.
शेवटी,
कुणाची तरी वाट लागायची आहेच!

/// "संधी गमावली की घालवली?":
काल रात्री, मुंबई इंडियन्सच्या बिनबाद ४५
धांवसंख्येवरून, जेव्हा त्यांचा डाव १५० धांवातच गडगडला, तेव्हाच निराशेची झुळूक मनात अवतरली होती.

नंतर चेन्नई, चक्क ७० धावा आणि एकच बाद, असा धावफलक पाहिल्यावर तर, आता मुंबईचा
पराभव निश्चितच, असे वाटून सामना बघणे बंदच करून मी झोपी गेलो.

आज सकाळी उठल्यावर, वर्तमानपत्रात मुंबई इंडियन्सचा एका धावेने विजय, हे वाचून थक्क झालो, एक सुखद धक्काही बसला. परंतु त्याच बरोबर आपण एका रोमहर्षक, आशा निराशेचे हिंदोळे असणारे एक झंझावाती वादळ पाहण्यास मुकलो याची खंत वाटली, रुखरुख वाटली.

पण वेळ गेलेली होती. मी संधी गमावली नव्हती, तर घालवली होती.

त्यातून मिळालेला धडा असा की,
"धोका पत्करला तर व तरच, संधी मिळण्याची शक्यता निर्माण होते" हा!
(My fb post of 13th May'19)

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम अंतर्मुख करणारे......
अनेक लेख वाचण्यासाठी..........
ही लिंक उघडा.......

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले.......
तर लिंक संग्रही ठेवा...... शेअरही करा.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा