"कालाय तस्मै नमः!":
सध्याच्या "कोरोना" महामारीच्या काळात, आपण जनसंपर्क टाळत तर आलो आहोतच, शिवाय नातेवाईकांकडे सगेसोयरे ह्यांच्याकडे जाणं देखील दुरापास्त झालं आहे. माणूस माणसाला पारखा झाला आहे, अर्थात यासाठी आरोग्य राखणं हे महत्वाचं कारण आहे, यात वाद नाही. परंतु त्यामुळे एकमेकांमधला जिव्हाळा, ममता दूर होत चालली आहे, सहसा कोणी कोणाकडे भेटायला सुध्दा जात नाही, तिथे राहायला जाणे तर दूरच राहिले, असं सर्व साधारण वातावरण आहे. अशा वेळेला अचानक आज मला माझ्या लहानपणची आठवण झाली. कां कुणास ठाऊक, म्हातारपणीच माणसाला लहानपणच्या आठवणी स्वच्छ आठवतात, मात्र काल काय टीव्हीवर बघितलं ते हे सांगणं कितीवेळा कठीण जातं. तर त्या वेळेला मी माझ्या मुंबईतल्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे शनीवार वा रविवारी सुट्टीच्या वेळेला अधून मधून रहायला जात असे. बारा-तेरा वर्षाचा असेन मी तेव्हा. तर आठवणारी गोष्ट अशी की, गिरगावातल्या एका चाळीत माझ्या वडिलांचे धाकटे मामा राहत असत. त्यांच्याकडे बसने गेलो आणि दोन दिवस राहिलो. तिथली ती आठवण माझ्या मनात कोरली आहे. ह्या मामांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळेला मामाने मला संध्याकाळी ट्रेन ने चर्नीरोड ते चर्चगेट असे नेले , तेव्हा गाड्यांना आजच्या सारखी गर्दी नसे. नंतर तिकडे मरीन ड्राईव्हवर मी त्यांच्याबरोबर फिरलो, समोर अथांग समुद्र व पाण्यात डुबकी घेणारे सूर्यबिंब. चमचमीत भेळ मामांनी मला खाऊ घातली आणि परत आम्ही त्यांच्या घरी आलो. दुसर्या दिवशी मला बाजूलाच असलेल्या सेंट्रल टॉकीजमध्ये "यूकी वारी सू" हा चित्रपट मामांनी दाखवला. खूप खूप मज्जाच मज्जा झाली माझी ! आता मला ही आठवण, खरंच अत्यंत ह्रद्य व जिव्हाळ्याची वाटते. त्या वेळेला माणसं कशी एकमेकांना धरुन होती, लहान थोरांचे, पै पाहुण्यांचे मनापासून जमेल तसे आदरातिथ्य ती करत असत. खरंच मामा-मामीने माझे जे काही स्वागत व आतिथ्य केले तसे आता दुर्मिळ झाले आहे. स्वतःच्या मुलांकडे जायचं असलं तरी कदाचित आता आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला लागते, असे जिकीरीचे दिवस आहेत. करणार काय?: "कालाय तस्मै नमः" दुसरे काय !
धन्यवाद सुधाकर नातू
ता.क.
माझी ही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी !":
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":
1. माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....
https://moonsungrandson.blogspot.com
लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....
ह्या शिवाय.....
2. I have you tube channel:
moonsun grandson
With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........
https://www.youtube.com/user/SDNatu.
And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा