सोमवार, ७ जून, २०२१

"मुकेपणाचे बोल-१ !": "तुमचे आरोग्य, तुमच्याच हातात":

 "मुकेपणाचे बोल-१ !": "तुमचे आरोग्य, तुमच्याच हातात":


जेव्हा आपण एकटेच असतो आणि आपल्याच चिंतनात, मननात मग्न असतो, त्या वेळेला आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचू शकतात आणि त्या कल्पनांचा पाठपुरावा जर केला तर आपल्याला उत्साही राहायला मदत होते, असा निदान माझा तरी अनुभव आहे. मलाही कधी मधी अशाच नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या मी वेगवेगळ्या मार्गाने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत असतो.

आज चिंतन करत असताना मला लक्षात आले की, आपण आरोग्यासंबंधी काहीतरी विचार करावा आणि तेव्हां जे विचार सुचले, ते पुढे मांडत आहे. जसे जमेल तेव्हा, अशा प्रकारचा विचार मांडणारा उपक्रम करावा, ही कल्पनाही आज मनात आली आहे. आपणच आपल्याशी संवाद साधत असल्यामुळे, या संकल्पनेला मी "मुकेपणाचे बोल" असे समर्पक नाव देत आहे. त्या प्रमाणे आजचा हा एक मूलभूत विचार- "तुमचे आरोग्य तुमच्या हातात" असा आहे.

"कोरोना"च्या महामारीचा एक फायदा असा झाला की, प्रत्येकाला आपले आरोग्य सांभाळायची बुद्धी व प्रेरणा प्राधान्याने निर्माण झाली. आपले आरोग्य आपल्याच हातात आहे, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा माणूस त्या दृष्टीने आपले आरोग्य निकोप, निरोगी कसे राहील यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते ते करू लागतो. ज्या वेळेला आपण जे जे करत आहोत त्यातून आपल्या आरोग्याची सक्षमता आपण वाढवत आहोत, असा आत्मविश्वास जेव्हा त्या माणसाला निर्माण होईल त्या वेळेला आपोआपच त्याचे आरोग्य सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. हा मोठा धडा या महामारीने आपणा सर्वांना दिलेला आहे.

आहार-विहार योग्य तऱ्हेने योग्य वेळी नियमीतपणे करणे जसे महत्त्वाचे, त्याचप्रमाणे आपले आचार आणि विचार, उच्चार विवेकाने केले तर मानसिक स्वास्थ्य देखील योग्य त्या पद्धतीने आपण नियंत्रणात ठेवू शकतो. असं कुठेतरी वाचलं की "प्रतिकारशक्ती अर्थातच रोगप्रतिकारशक्ती ही मुख्यतः तुमच्या मनस्वास्थ व समाधान यावर पुष्कळ अवलंबून असते." योग्य तो समतोल आहार, त्याच प्रमाणे आवश्यक असे व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक स्वास्थ्य समाधान राखलं तर आपोआपच तुमची योग्य दराने ईम्युनिटी वाढत राहील आणि तुम्ही निरामय निरोगी आनंदी जीवन जगू शकाल.

आज हा जो विचार माझ्या मनात आला, तो इथे मांडला. शेवटी आपला "हात जगन्नाथ" किंवा "तुमचे आरोग्य तुमच्याच हातात" हाच मंत्र आपण नेहमी पाळायला हवा.

सुधाकर नातू

ता.क. १
जे जे चांगले सुचते ते ते इतरांप्रती पोहोचवावे या केवळ निरपेक्ष हेतूने मी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुम्हाला अशा तर्‍हेचे संदेश मिळावेत अशी जर इच्छा असेल, तर प्रतिसादात होकार जरूर कळवावा, ही विनंती.

ता.क. २
माझी ही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी !":
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":

1. माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....

2. I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........
👍👍👍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा