" पहिल्यात पहिले: माहितीचा खजिना-२":
चिरंतन स्मृतीचा हा ठेवा:
ज्या दिग्गजांनी कोणीही आधी न चोखाळलेल्या मार्गावरून प्रथम पदार्पण करून आपल्या गेल्या दोन शतकांचा इतिहास बदलला अशा असामान्य माणसांची ही दुसरी मालिका ह्या लेखात सादर करताना मला मनापासून आनंद व समाधान वाटत आहे. कारण ह्या डिजिटल माध्यमाद्वारे त्या थोरांची चिरंतन स्मृती जागवली जाणार आहे. जसजशी माहिती मिळाली, तसतशी ती नोंद कागदांवर ठेवली. ही मालिका श्रेष्ठ कनिष्ठ, वा कालमानानुसार नाही, ह्याची जशी जाण ठेवावी, तद्वतच तसेच ती परिपूर्ण नाही. त्यामध्ये अनेक अज्ञात नामवंत समाविष्ट नाहीत आणि हा एक प्रातिनिधीक प्रयत्न आहे:
१ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १८८८-१९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती व थोर तत्वज्ञ
तत्त्वज्ञ,
२ उदय शंकर १९००-१९७७: पहिले जागतिक कीर्तीचे नर्तक
३ धुंडिराज गोविंद फाळके १८७०-१९४४: पहिले भारतीय चित्रपटनिर्माते व ज़नक
४ विष्णूपंत छत्रे १८४०-१९४६: उत्तम अश्वशिक्षक व भारतीय सर्कसचे जनक
५ पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर १८६७-१९६८: प्राचीन वेदाभ्यास प्रथम मराठीत आणला.
६ दादासाहेब खापर्डे १८५४-१९३८: पहिले मराठी नाट्यसंमेलन अध्यक्ष
७ डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे १८७२-१९४८: भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक
८ सेनापती पां.म. बापट १८८०-१९६७: मुळशीचा सत्याग्रह अन्यायाचा प्रतिकार लढाऊ स्वातंत्र्य सैनिक
९ डॉ. रघुनाथ माशेलकर: १९४३- : DG CSIR जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ
१० फ्लाईंग आँफिसर गुंजून सक्सेना १९७५- : पहिली महिला वैमानिक
११ सत्यजित रे १९२१-१९९२: जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते दिग्दर्शक-पथेर पांचाली
१२ डॉ. सरोजिनी नायडू १८७९-१९४९: पहिल्या महिला राज्यपाल
१३ शिवराम म परांजपे १८६४-१९२९: काळ व्रुत्तपत्राचे संपादक, जनजागृती करणारे देशभक्त पत्रकार
१४ पहिले फिल्ड मार्शल सँम माणेकशा: १९१४-२००८ : पाकिस्तान बरोबरचे बांगला देशचे १९७१ चे युध्द जिंकले.
१५ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९०१-१९९४: मराठी विश्वकोश निर्मितीसंस्थेचे संस्थापक पहिले संचालक
१६ शेर्पा तेनसिंग १९१४-१९८६: अत्युच्च हिमशिखर एव्हरेस्ट विजेता-१९५३
१७ धनंजयराव गाडगीळ १९०१-१९७१: ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, सहकार चळवळीचे प्रणेते
१८ आचार्य विनोबा भावे १८८५-१९८३: क्रांतिकारी भूदान चळवळीचे प्रणेते व आधुनिक रुषि
१९ शंकर काशिनाथ गर्गे १८८९-१९३१: प्रभावी नाट्यछटाकार
२० खान-पाणंदीकर १९२७-पहिला आंतरधर्मिय विवाह
२१ शं. बा. दिक्षीत १८५३-१८९८: प्रथम सोप्या मराठीतून विज्ञान प्रसार करणारे
२२ गोपाळ विनायक १८८१-१९६४: पहिले नकलाकार
२३ डॉ. रा.भा.भांडारकर १९१७ मध्ये भारतीय प्राच्यविद्या संस्था स्थापली.
२४ कपिल देव १९५९- :१९८३ पहिला भारतीय विश्वचषक विजेता अष्टपैलू कर्णधार
२५ डॉ. प्रमोद सेठी १९२७- :अपंगांना वरदान ठरणार्या जयपूर फूटचे जनक
२६ डॉ. सलिम अलि १८९५-१९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ व नँचरल हिस्टरी सोसायटीचे अध्वर्यू
२७ रघुनाथ क्रु फडके १८८४-१९७२: अग्रगण्य शिल्पकार-चौपाटीवर लोकमान्य टिळक पुतळा व मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बनविला.
२८ डॉ महेंद्रलाल सरकार १८३३-१९०४: होमिओपॅथीचे पहिले भारतीय प्रवर्तक
२९ साधु वासवानी १८७९-१९६६: तत्त्वज्ञ संत
३० केरूनाना छत्रे १८२४-१८८४: सूर्यावरील डाग व हवामान संशोधन
३१ डॉ विष्णू म घाटगे १९०८-१९९१: भारतीय विमान निर्मितीची मूहूर्तमेढ
३२ कर्नल जिम काँर्बेट १८७५-१९५५: वन्यपशुंचा सखा, अभयारण्य जनक
३३ भाई श्रीपाद अम्रुत डांगे १८९९-१९९१: भारतीय साम्यवादी चळवळीचे जनक
३४ बच्छेंद्री पाल १९५४- : एव्हरेस्ट शिखर विजेती पहिली भारतीय महिला
३५ डॉ होमी भाभा १९०९-१९६६: विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ, परमाणु उर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ
३६ पी.टी उषा: १९६४- आंतरराष्ट्रीय कीर्तीची पहिली भारतीय महिला धांवपट
३७ डॉ भीमराव आंबेडकर १८९१-१९५६: भारतीय घटनेचे शिल्पकार
३८ डॉ. व्हर्गिस कुरियन १९२१- : सहकारी चळवळीतून अमूल दूधाचा महापूर
३९ डॉ विजयालक्ष्मी पंडित १९००-१९९०: लंडनमध्ये पहिल्या महिला हायकमिशनर व युनोच्या अध्यक्ष
४० डॉ चिंतामणी देशमुख १८९६-१९९२: पहिले रिझर्व्ह बँक गव्हर्नर
४१ कल्पना चावला १९६१- :पहिली भारतीय महिला अंतरराळयात्री
४२ डॉ एपीजे अब्दुल कलाम १९३१-२०१५ : राष्ट्रपती व संरक्षण विकास व मिसाईल मँन
४३ कुमार गंधर्व १९२४-१९९२: कीर्तीमंत गुणवंत गायक
४४ स्वामी विवेकानंद १८६३-१९०२: राष्ट्रीयत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञ विचारवंत
४५ राखाल बँनर्जी १८८६-१९३०: मोहनजो दारो ऊत्खनन
४६ पं. महादेवशास्त्री जोशी १९०६-१९९२: भारतीय संस्कृती कोशाचे अनेक खंडांचे जनक
४७ विश्वनाथन आनंद १९६९- : पहिला अग्रगण्य बुद्धीबळपटू ग्रँड मास्टर
४८ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक १८५६-१९२०: भारतीय असंतोषाचे जनक व अग्रगण्य राष्ट्रीय नेते, गणितज्ञ व तत्वज्ञ-गीतारहस्य ग्रंथकार
४९ एकनाथजी रानडे १९१४-१९८२: कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद ह्यांचे स्मारक निर्मिती
५० सुश्मिता सेन १९७५- : विश्वसुंदरी
५१ गानकोकिळा लता मंगेशकर १९२९- : भारतरत्न, विक्रमी मधूर गीत गायिका
५२ स्वामी रामानंद तीर्थ १९०३-१९७३: हैद्राबाद मुक्तीसंग्राम प्रणेते
५३ लक्ष्मणराव का. किर्लोस्कर १८६९-१९५६: पहिले यशस्वी मराठी उद्योजक
५४ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर १८८३-१९६६: क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक, कवि नाटककार समाज सुधारक, वैज्ञानिक द्रुष्टिचे द्रष्टे
५५ मिर्झा गालीब १७९७-१८६९: गझल शायर सम्राट
५६ अमर्त्य सेन १९३३- : नोबेल पुरस्कार विजेते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ
५७ लक्ष्मीबाई टिळक १८६८-१९३६: कवि रे. टिळकांची पत्नी, स्मृतीचित्रे हे आत्मचरित्र
५८ प्रभात फिल्म कंपनी १९२९-१९५३: कुंकू शेजारी असे एकाहून एक सरस दिशादर्शक चित्रपटांची निर्मिती संस्था
५९ श्रीनिवास रामानुजन् १८८७-१९२०: अद्वितीय गणितज्ञ
६० मानवेंद्रनाथ राँय १८८९-१९५४: असामान्य तत्वचिंतक राजकारणी
६१ महर्षि धोंडो केशव कर्वे १८५८-१९६२: महिला शिक्षणाचा पाया घालणारे शतायुषी
६२ महात्मा गांधी १८६९-१९४८: अहिंसा सत्याग्रह ह्या अनोख्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता
६३ मदर तेरेसा १९१०-१९९७: नोबेल पुरस्कार विजेती समाजसेविका संत
( वरील नोंदीमधील, चुकभूल द्यावी घ्यावी)
अंगभूत गुणवत्ता, दूरद्रुष्टी आणि ईप्सित ध्येयासक्ती ह्या जोडीला जिद्द आणि प्रामाणिक अहर्निश कष्ट घेणारी व्यक्ती, सामान्यातून असामान्यत्व मिळवते. सामान्य अनंत असतात, त्यांच्यामधूनच अशा पथदर्शी अद्वितीय योगदान देणारी मंडळी निर्माण होत असते. समाजाचे आणि देशाचे पुनरूत्थान ही महान दिग्गजांची मांदियाळी करत असते. आज आपण प्रगतीचे नवनवीन मानदंड पार करून पुढे पुढे जात आहोत. आपण त्यांचे शतश: रुणी आहोत, त्यांच्यापुढे नतमस्तक होणार आहोत. असा अनमोल ठेवा मला गवसला हे माझे भाग्य ह्या लेखाच्या रुपाने तुमच्या ओंजळीत टाकत आहे.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा