"घरच्या घरी ज्योतिष"
"नियतीचा संकेत १ :
जन्मपत्रिकेची ओळख":
"प्रास्ताविक":
उद्या काय होणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच असते. येणारा काळ आपल्याला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जाणण्यासाठी राशिभविष्य पुष्कळजण वाचतातच. ज्योतिषामधील विविध ग्रह व त्यांचे योग, त्यांच्या महादशा, राशी, स्थाने, जन्मपत्रिका आणि विविध नियमांचा इ.इ. मुलभूत माहितीची, सोप्या समजेल अशा भाषेंत ही क्रमवार लेखमाला, माझ्या चार दशकांच्या ज्योतिषज्ञानाच्या अभ्यास व अनुभवावर आधारित, मी आता दर आठवड्याला लिहीणार आहे. 'ह्या ह्रदयीचे, त्या ह्रदयी' करण्याचा, हा प्रयत्न तुम्हाला आवडेल व मार्गदर्शक ठरेल, ह्याची मला खात्री आहे.
"जन्मलग्नपत्रिकेचा फलादेश":
जन्मलग्नपत्रिका तपासताना, प्रत्येक ग्रह कोणत्या स्थानांत व राशीमध्ये आहे ते पहावे लागते. पुढील कोष्टकावरून त्या अनुषंगाने पत्रिकेचा दर्जा आणि फलादेश देण्यास मदत होते. ग्रह कोणत्या स्थानी आहेत आणि त्यांचे एकमेकांशी कसे शुभाशुभ योग होतात, तेही फलादेश निश्चित करताना अभ्यासावे लागते.
प्रथम, जन्मपत्रिकेच्या प्रत्येक स्थानाशी फलादेश पहाताना कोणत्या गोष्टी संबंधित असतात ते पाहू:
:'पत्रिकेतील स्थानसंबंधित गोष्टी":
स्थान-नाम स्थानसंबंधित गोष्टी
१. लग्न: व्यक्तिमत्व शरिरसौष्ठव डोके
२. धन: संपत्ती कुटुंब घसा उजवा डोळा
३. पराक्रम: प्रवास, भावंडे उजवा कान हात
४. सुख: स्थावर मन माता बाहू फुफुसे
५. पंचम : संतती विद्या प्रेम पोट यक्रुत
६. षष्ठ: शत्रु नोकरी रोग पोट मोठे आतडे
७. सप्तम: जोडीदार विवाहसुख जननेंद्रिये
८. अष्टम: म्रुत्यु नुकसान गर्भाशय
९. नवम: भाग्य परदेशगमन मांड्या
१०. दशम: धंदा पिता ह्रदय गुढगे
११. एकादश: लाभ डावा कान पिंढर्या
१२. व्यय: मोक्ष खर्च अध्यात्म पावले
------ ------ ------ ------ ------ -----
आता प्रत्यक्ष पत्रिकेचा सखोल अभ्यास करण्यासाठी, राशीनिहाय ग्रहस्थिती पाहू:
:'राशीनिहाय ग्रहांची स्थिती':
राशी स्वामी उच्चीचा नीचीचा
१. मेष मंगळ रवि शनी
२. व्रुषभ शुक्र चंद्र ------
३. मिथून बुध ------ ------
४. कर्क चंद्र गुरू मंगळ
५. सिंह रवि ------ ------
६. कन्या बुध बुध शुक्र
७. तुळा शुक्र शनी रवि
८. व्रुश्चिक मंगळ ------ चंद्र
९. धनु गुरु ------ ------
१०. मकर शनी मंगळ गुरू
११. कुंभ शनी ------ -----
१२. मीन गुरु शुक्र बुध
------ ------ ------ ------ ------ -----
ह्यानंतर पत्रिकेचे प्रत्येक स्थान त्यामध्ये उपस्थित ग्रह व ते कोणत्या राशीत आहेत ते तपासून त्यांची वरील कोष्टकानुसार काय स्थिती आहे ते पहावे. ह्याचबरोबर ग्रहांमधील योग कोणते आहेत ते पहावे:
'विविध ग्रहयोग':
स्वग्रुही: जर ग्रह स्वत:च्या राशीत असेल तर हा योग तो ज्या स्थानांत असेल त्याचे संबंधित शुभफळ देतो. जर ग्रह उच्च राशीत असेल तर तो विशेष शुभफळ देतो आणि ग्रह जर त्याच्या नीचराशीत असेल तर अशुभ मानला जातो.
युती: दोन किंवा अधिक ग्रह एकाच स्थानी वा एकाच राशीत.
केंद्रयोग: एकमेकांच्या पासून ९० अंशांत किंवा चौथ्या स्थानांतील ग्रह हा योग करतात.
त्रिकोण: एकमेकांपासून पाचव्या वा नवव्या स्थानी वा १२० अंशात, ग्रह हा नवपंचम शुभ योग करतात. पत्रिकेतील रवि व गुरुचा हा योग अत्यंत शुभ असतो.
लाभ: एकमेकांपासून तिसर्या वा अकराव्या स्थानांतील ग्रह हा योग करतात.
व्यय: एकमेकांच्या दुसर्या वा बाराव्या स्थानी जर ग्रह असतील तर हा योग होतो.
षडाष्टक: एकमेकांपासून सहाव्या वा आठव्या स्थानांतील ग्रह हा त्रासदायक योग करतात.
राजयोग: पत्रिकेत एकुण चार चौकोनस्थाने तर आठ त्रिकोणस्थाने असतात. ह्या चार चौकोनापैकी एका स्थानाचा व पाचव्या अथवा नवव्या स्थानाचा स्वामी जर एकच ग्रह असेल तर अशा पत्रिकेत तो ग्रह राजयोग. हा विशेष शुभयोग करतो असे मानतात. सहाजिकच सखोल अभ्यास केला तर हे ध्यानात येईल की एकुण पुढील फक्त सहा जन्मलग्नाच्या पत्रिका त्या त्या ग्रहाचा राजयोग करतात:
मकर व कुंभलग्न: शुक्राचा राजयोग
सिंह व कर्कलग्न: मंगळाचा राजयोग
व्रुषभ व तुळलग्न: शनीचा राजयोग.
हे ध्यानात येईल की चंद्र व रवि फक्त एकाच राशीचे मालक असल्याने, व बुध मिथुन व कन्या ह्या केंद्रयोगातील राशींचा स्वामी असल्याने त्या ग्रहांचे राजयोग नाहीत.
"ग्रहांची शुभस्थाने":
महत्त्वाचे सहा ग्रह एखाद्या स्थानापासून कोठे असले, तर शुभ मानले जातात त्याची माहीती:
रवि: ३ ६ १० व ११व्या स्थानी शुभ
मंगळ: ३, ६ ११वा चांगला
बुध: २ ४ ६ ८ १० ११ वा शुभ
गुरू: २ ५ ७ ९ ११ वा उत्तम
शुक्र: १ २ ३ ४ ५ ८ ९ ११ व १२वा चांगला
शनी: ३ ६ ११वा शुभ
ह्या बरोबरच पंचांगामध्ये प्रत्येक ग्रह इतरांबरोबर मित्र वा शत्रु अथवा सम असतो त्याचाही उपयोग पत्रिकेचा अभ्यास करताना होतो.
"ग्रहांच्या महादशा":
चंद्र ज्या राशीत किती अंश कला विकला, आहे ते अभ्यासून त्या व्यक्तीच्या जीवनात येणार्या ग्रहांच्या महादशांचा क्रम काढता येतो. अशा सर्वांगीण निरीक्षणांची अनुभवावरून चिकीत्सा करून ज्योतिषी फलादेश वर्तवतो.
सारांश,
ह्या लेखांत पत्रिका कशी पहायची ते विस्ताराने मांडले आहे. अनेकानेक पत्रिका तयार करुन त्यांचे विश्लेषण करत अनुभव मिळवता येतो. गणिताचे, तर्काचे ज्ञान अभ्यासू चिकीत्सक व्रुत्ती आणि काही अंशी अंतर्स्फुर्ती ह्या गुणांचा जोतिषासंबंधी सल्ला देताना उपयोग होत असतो.
ह्या प्रारंभिक लेखाच्या शेवटी,
You tube वरील माझ्या चँनेलची ओळख करून देतो:
You tube वर search मध्ये माझ्या चँनेलचे हे नांव लिहाः
moonsungrandson
तेथे आगामी वर्षाच्या संपूर्ण राशीभविष्याचे उपयुक्त विडीओज् पहा.
चँनेल subscribe करा..
माझ्या ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com
शेअरही करा....
धन्यवाद.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा