शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

"ह्रदयसंवाद-३": "Achievement Motivation":


 "ह्रदयसंवाद-३":
"Achievement Motivation":

"असाही रियाज":
जे गायक-वादक असतात किंवा जे तसे होऊ पाहतात, त्यांच्या बाबतीत असे सांगितले जाते की, ते दररोज पहाटे वा सकाळी उठल्यावर चांगला दोन-तीन तास रियाज अर्थात सराव करत असतात. कदाचित हे असे माझ्या बाबतीत वेगळ्या प्रकारे होत असावे. मला सकाळी नेहमी नवीन काही ना काहीतरी सुचत असते आणि ते जर तेव्हाच नोंदले गेले नाही तर, पुढे विसरूनही जाते, म्हणूनच आज कल्पना सुचली की, आपणही तसा हा जे स्फूरतं ते शब्दात लिहिण्याचा रियाज करावा.

इथे smart phone च्या आधुनिक तंत्रज्ञानाची मला गंमत वाटते. ती अशी की, त्याच्या सहाय्याने मी देखील एक प्रकारे मला जे वाटतं ते बोलून रियाज वा सराव करत आहे आणि ते इथे आपोआप लिहिण्याच्या स्वरूपात नोंदवले जात आहे! हा एक वेगळाच आनंद मला हे सारे करत असताना आता मिळत आहे ही झाली पार्श्वभूमी.

"काळ, काम, वेग!":
पण आज काय सुचलं ते असं, काळ हा पुढे जातच असतो आपण काय केलं तरी काही केलं नाही तरी काळ हा पुढे जातच असतो. जर आपण काहीच न करता काळ गेला, तर आपल्याला पश्चाताप होतो. मग अशा वेळेला वाटतं, आपण काहीतरी उपयुक्त योगदान देणारं, असं काम करायला हवं होतं. तशी ठरवलेली कामं पुष्कळ असतात, पण कां कुणास ठाऊक, त्यांना हातच घातला जात नाही. ही मनाची एक प्रकारे कुठली ना कुठली तरी विचित्र अवस्था असते, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोक्रास्तीनेशन असं काहीतरी म्हटलं जातं. करायचं असूनही ठरवूनही, आपण काहीच करत नाही, अशी ती मनाची कसनुशी अवस्था असते आणि मला वाटतं ती सर्वांच्याच आयुष्यात नेहमीच अधून मधून अनुभवाला येत असते.

त्यावर मात कशी केली जाऊ शकते, हा एक मोठा प्रश्न आहे. जर तुम्हाला उपजत अंतःप्रेरणेमुळे काही काम करायची सवय असेल, ज्याला आपण अचीवमेंट मोटीव्हेशन असे म्हणतो, ते जर तुम्हाला साध्य झाले, तर तुम्ही अशी प्रोक्रास्तीनेशनची अवस्था टाळू शकता.

"अचीवमेंट मोटिवेशन":
आता अचीवमेंट मोटिवेशन म्हणजे काय?
एखादे (आपल्याला आवडणारे?) काम पूर्ण करण्याचा जो आनंद असतो, तो मिळवण्याची प्रेरणा म्हणजे अचिव्हमेंट मोटिवेशन असं मला वाटतं. माझी पुष्कळशी जी काही कामे झाली आहेत अथवा काही भरीव असं मी कधीही केलेलं असेल, तर त्यामागे हे अदृश्य अशी शक्ती असणारं अचीवमेंट मोटिवेशन असावं, असं मला वाटतं.

"शून्यातून विश्व उभे!":
"स्मार्ट फोन ते ब्लॉग ते विडीओ चँनेल!":

मला नेहमी काही ना काही योगदान देणारं, आपण करत राहावं असं वाटत असतं. त्यादृष्टीने मी जेव्हा निवांत असतो, तेव्हा मी आता काय वेगळं करू शकतो ह्याचा विचार करतो. यासंबंधी माझा अनुभव सांगतो. तीन वर्षापूर्वी माझ्या मुलाने मला अगदी आग्रह करून स्मार्टफोन बक्षिस म्हणून दिला. खरं म्हणजे मी तो वापरण्या विरुद्ध होतो मला तो वापरताच येणार नाही असे वाटत होते.

परंतु झाले उलटेच! फोन हातात आल्यावर मलाच वाटायला लागले, बघुयात खरं! हे काय नुसते
फोन करणे किंवा एसेमेस करणे एवढाच त्याचा उपयोग नाही, तर त्याहूनही खूप काही करता येऊ शकते, असा मलाच बघता बघता शोध लागला.

पहाता पहाता मी व्यक्त होण्यासाठी, प्रथम सोशल मीडियावर माझे विचार इंग्रजीतून व्यक्त करू लागलो. मग कुतूहल व आव्हान असे समजून मराठीतून लिहायला शिकलो. त्याची पुढची पायरी म्हणजे लेख लिहून नंतर मी चक्क माझा ब्लॉग काढला. लिंक:

http//moonsungrandson.blogspot.com

काही दिवसांनी त्यात समाधान न मानता, माझा "सुधा" दिवाळी अंक काढला. काही दिवसांनी, ते पुरे नाही म्हणून, आता वेगळं काय करायचं या विचारात असताना, युट्युब वर माझा moonsun grandson व्हिडिओ चॅनेल काढला......
आणि आता ह्या दोन्ही योगदानांचा प्रसार अधिकाधिक सर्वदूर करण्याचा अविरत उद्योग करण्याची मी धडपड करतो आहे. शून्यातून विश्व कसे उभे राहू शकते, तर हे असे!

"Out of box thinking"
ही जी काही माझी वाटचाल झाली ती केवळ आणि केवळ माझ्या अंतःप्रेरणेने मध्ये असलेल्या एका विशिष्ट विचारांमुळे: आपण काही ना काही तरी प्रॉडक्टिव केले पाहिजे हा तो विचार. मनाला जेव्हा असमाधान वाटते, तेव्हा तळमळीने काही अगदी out of box करावे असे मला आपोआप वाटत रहाते. कदाचित अचीवमेंट मोटिवेशन म्हणजे असेच काहीतरी असावे.

अर्थात ही कदाचित एखाद्याच्या अंतःप्रेरणा अथवा मूलभूत अशा प्रत्येकाच्या स्वभावाचा नैसर्गिक भाग असू शकते. परंतु आपणही प्रयत्न करून बघू शकता. आपण आहे त्या परिस्थितीत अस्वस्थ आहोत आणि ते कां आहोत ह्याचा शोध घ्या. आपल्याला काय आवडतं, काय करता येतं, याचा विचार करून त्यापासून मिळणारे समाधान व आनंद मिळवण्याची अशी ईर्ष्या तुम्ही मनात निर्माण करायचा प्रयत्न करा. अशामुळे, तुम्हाला हे अचीवमेंट मोटिवेशनसारखे आनंददायी प्रगतीकडे, पूर्णत्वाच्या शोधाकडे नेणारे, प्रभावी साधन गवसूं शकेल.

करा तर प्रयत्न माझ्यासारखा....

सुधाकर नातू

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

"पुढचे पाऊल-1" राशीभविष्य: १ मेष ते 6. कन्या: १नोव्हे.19 ते ३१ डिसें'20:

"पुढचे पाऊल-1"अर्थात राशीभविष्य:
१.   मेष ते 6. कन्या:
१नोव्हे.19 ते ३१ डिसें'20:
लेखक श्रीसुधाकर नातू

प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविलात्यामुळेआपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो,ती आपली जन्मरास मानली जातेचंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतोत्यामुळे आपलीजन्मरास ठरवितानाजन्मतारिख महिना वर्ष  जन्मवेळ माहीत असावी लागतेचंद्रावर आधारित भारतीय ज्योतिषअधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठतसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. 
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा  घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा  केलेली क्रुतीह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असतेपरिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असतेह्या सर्व घडामोडींमागेआपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असतेमानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणिप्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहेआपल्याशरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असतेसहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय  क्रुतीवर प्रभाव पाडत असतेहेओघाने आलेह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्यआहे.
अनुकूल गुण पद्धती:
कालचक्र अव्याहत फिरत असतेमाणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतातहा क्रम प्रत्येकालाअनुभवाला येतोउद्याचा दिवसआजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतोउद्याचे पुढचेपाऊल कसे असेलयेणारा काळ कसा असेलअनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दरवर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.
माणूस उंच वा बुटका आहेजाडा किंवा बारिक आहेतो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशीकाही कल्पना येत नाहीती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यकअसतेजसे उंची सेंटी मीटरवजनासाठी किलोग्रामआर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवतायेतेह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातीलहे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजेराशीभविष्य होय.
नशिबाच्या परिक्षेची टक्केवारी:
पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचाअनुक्रम दाखवला आहे.
३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण१८० आणि फेब्रुवारी २०१९ चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत तेअनुकूल गुणत्या त्या महिन्याला शेकडा किती टक्के आहेत हे प्रत्येक राशीच्या शेवटी दाखवलेले आहेत्यामुळे प्रत्येकमहिन्यात आपले नशिब किती टक्के गुण मिळवतेहे समजू शकेल आणि त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोलराखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे.
अनुकूल गुणांच्या पद्धतीनियम 
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोतप्रत्येक राशीला सहाप्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येकमाहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतोते नियम असे आहेत:
रवि,१०  ११ वा शुभ
मंगळ, ११ वा शुभ
बुध,,,,१०  ११ वा शुभ
गुरू,,, ११ वा शुभ
शुक्र,,,,,,,११ व१२ वा शुभ
शनी, ११ वा शुभ
================================================================
 नोव्हेंबर'१९ ते ३१ डिसेंबर'२०कालखंडातील प्रमुख ग्रह बदल:
नोव्हेंबर 2019 रोजी सर्व ग्रह असे होतेरवी-तुळा,मंगळ-कन्याबुधगुरु  शुक्र-वृश्चिक तर शनि केतु धनुमध्येराहू-मिथुनहर्षल-मेष नेपच्युन-कुंभ प्लुटो-धनु.
त्यानंतर प्रत्येक ग्रहाचे राशि प्रवेश याप्रमाणे आहेत:
रवी१६ नोव्हेंबर-व्रुश्चिक१६ डिसेंबर-धनु
१४ जानेवारी-मकर १३ फेब्रुवारी-कुंभ
१४ मार्च-मीन, 13 एप्रिल मेष १४ मे वृषभ,
14 
जूनमिथुन--16 जुलैकर्क-16 ऑगस्टसिंह-16 सप्टेंबरकन्या-17 ऑक्टोबर,
16 
नोव्हेंबर-वृश्चिक आणि 15-डिसेंबर धनु.
मंगळ:१० नोव्हेंबर तुळा२५ डिसेंबर व्रुश्चिक. फेब्रुवारी-धनु२२ मार्च-मकर मे-कुंभ,
18 
जून-मीन, 16 ऑगस्ट-मेष,
ऑक्टोबर-मीनमध्ये वक्री, 24 डिसेंबर-मेष.
बुध नोव्हेंबर-तुळा डिसेंबर-व्रुश्चिक२५ डिसेंबर-धनु १३ जानेवारी-मकर३० जानेवारी-कुंभ एप्रिल-मीन 24 एप्रिल-मेषवृषभ 24-मेमिथून- ऑगस्टकर्क-17 ऑगस्टसिंह-2 सप्टेंबरकन्या-22 सप्टेंबरतुळ -28 नोव्हेंबरवृश्चिक-17 डिसेंबर,
गुरू नोव्हेंबर-धनुनंतर तो धनु राशीतून
29 
मार्च रोजी मकर राशीतपुन्हा 29 जून रोजी वक्री होऊन धनु राशीत आणि 20 नोव्हेंबरला मकर राशीत जाईल.
शुक्र१६ नोव्हेंबर-व्रुश्चिक१५ डिसेंबर-मकर
 जानेवारी'२०-कुंभ फेब्रुवारी-मीन २८ फेब्रुवारी-मेष, 22 मार्च-वृषभजुलै-मिथुन
31 
ऑगस्ट-कर्क, 27 सप्टेंबर-सिंह,
23 
ऑक्टोबर-कन्या, 16 नोव्हेंबर,
16 
डिसेंबर'२०-वृश्चिक
शनि:२४ जानेवारी-मकरनंतर तो संपूर्ण वर्ष मकर राशीत.
राहू: 19 सप्टेंबर-वृषभकेतु१९ सप्टेंबर-वृश्चिक.१०हर्षलसंपूर्ण वर्षभर मेष राशीत११नेपच्यूनसंपूर्ण वर्षभर कुंभ राशीत १२प्लुटो: 15 जून वक्री-धनुमध्येनंतर  मार्च-मकर
नशिबाची गटवारी":
आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेतते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊनत्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहेतशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
.उत्तम पहिला गटव्रुश्चिकमीन  सिंह राशी.
.उजवा दुसरा गटकुंभमेष राशी.
.मध्यम तिसरा गटव्रुषभ  मकर मिथून राशी.
.डावा चौथा गटकन्या तूळ राशी
.त्रासदायक पाचवा गटकर्क  धनु राशी

"
राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
मागील  यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करताराशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
१मेष रासमागील वर्षीच्या ११व्या क्रमांकावरून प्रगती करत  वा क्रमांक मिळवून उजव्या गटात प्रवेश केला आहे.
.व्रुषभ राशीने थोडीशी घसरत ५व्या स्थानावरून  व्या क्रमांक मिळवून समतोल साधेल
.मिथून राशीच्या नशिबी मागील  व्या स्थानावरुन थोडे कमी होत  व्या क्रमांक आहे.
कर्क राशीचे नशीब बिघडून मागच्या दुसर्या स्थानावरून चक्क तळाच्या गटात ११ व्या क्रमांकावर राहील
 सिंह मंडळी नशीबवान असून मागच्या  क्रमांकावरून ते  क्रमांक अशी भाग्यवान उडी घेतील
 कन्या रास दहाव्या स्थानावरून किंचीत पुढे सरकत आता  स्थानी जाईल.
 तुळा राशीने मागच्या वर्षी विक्रमी गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला होतापण आता फेरे उलटे होउन ते १० व्या क्रमांकावर ढकलले जातील.
 व्रुश्चिक रास अक्षरशकमाल करून मागच्या बाराव्या स्थानावरुन चक्क नशिब फळफळवत  ल्या सर्वोत्तम स्थानी विराजमान होई
 धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे आता ५व्या क्रमांकावरुन कटकटी वाढविणार्या तळाच्या १२ व्या स्थानी फेकली जाईल.
१० मकर राशीचे नशीब ठीक नसेल कारण मागच्या सुखदायी  थे स्थान सोडावे लागून  क्रमांक मिळवेल.
११ कुंभ राशीच्या नशीबात थोडी घसरण आहेतिसर्या स्थानावरुन चौथ्या क्रमांक आहे.
१२  मीन रास खरोखर नशीबवान आहे मागच्या सहाव्या स्थानावरुन पहिल्या गटात दुसरा क्रमांक मिळवेल
=============================================
१.    मेष:
मेष रास मंगळाची रास आहे रवी येथे उच्चीचा होतो त्यामुळे तुम्ही शीघ्रकोपी महत्त्वाकांक्षी असतात उद्योग करत राहणे हा तुमचा स्थायीभाव असतो येथे शनी नीचेचा होत असल्याने शनीच्या साडेसातीचा तुम्हाला जास्त असतो वय वर्ष 28 नंतर सर्वसाधारणपणे तुमचा भाग्यदय येतो विवाह हे दृष्टीने तुला राशि तुमचे चांगले धागेदोरे बोलतात सिंह धनू राशीच्या व्यक्ती तुमचा संसार गोडीचा होऊ शकतो कारण त्यांच्याशी नवपंचम योग होतो मात्र मृत्यू षडाष्टक आतील कन्या रास मात्र तुम्हाला त्याकरता पूर्ण वर्ज्य असते.
मेष राशीने मागील ११व्या क्रमांकावरून येणाऱ्या कालखंडात ५व्या क्रमांकावर उडी मारली आहेतेव्हाच्या ८३८ गुणांमध्ये घसघशीत वाढ होऊन आता १०६३ अनुकूल गण मिळवत शुभ नशिबाचा आनंद अनुभवणार आहात.
मागील वर्षी त्रासदायक असलेल्या गुरुचे आठव्या व्रुश्चिक राशीतले भ्रमण मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा होतीमनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण जात होते.  मात्र आता आमुलाग्र बदल होऊन गुरु बहुतांश वर्षी भाग्यांत धनु राशीत असेलतो विस्कळित घडी पुष्कळ अंशी सावरू शकेलस्थावर विषयक समस्या दूर होऊन स्थैर्य भरभराट होईलकाही भाग्यवंतांना प्रमोशन वा पुरस्कार मिळू शकेल.
पूर्वार्धातील राहू केतुचे अनुक्रमे तिसर्या  नवव्या स्थानातले भ्रमणअडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देईलविवाहोत्सुकांना मनाप्रमाणे जोडीदार मिळून आयुष्यात सुख समाधान मिळू शकेलअनुकूल संधी मिळूननोकरी व्यवसायात वरिष्ठ खुष वा स्पर्धेत आघाडी होऊ शकतेआर्थिक घडी हवी तशी बसेलप्रवास मनाजोगते , दौरे वा पर्यटनाचे मनसुबे मार्गी लागतीलविद्यार्थ्यां योग्य परिश्रम घेऊन अपेक्षित यश मिळवतीलजीवनशैलीत सुखासिनतेमुळे डायबेटीस सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावीमहिलावर्गाला घरातील खेळीमेळीच्या वातावरणात मनाला उभारी येईलअनुकूल गुणांचा विचार करता हे महिने नशीबाच्या रखरखीत उन्हाळ्यात ओअँसीस भासतीलएकंदर अंधारातून प्रकाशाचे कवडसे शोधत यशदायी मार्गक्रमणा करणार आहातचिंता नको.
                                
व्रुषभ:
क्रुत्तिका नक्षत्राचे तीनपूर्ण रोहिणी  म्रुगाचे दोन चरण ह्यांनी ही शुक्राची रास बनली आहेचंद्र इथे उच्चीचा होतो  कुणीही ग्रह नीचीचा नाहीत्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही आनंदी असून उद्योग मग्नता हे तुमचे वैशिष्ट्य आहेरसिकता विलासी व्रुत्ती  खिलाडूपणा असतोनेहमी नीटनेटके  प्रसंगानुसार व्यवस्थित रहाणे पसंत करताआळस नसतोतारुण्यात अडचणींवर मात करून तुम्ही स्वबळावर जीवनात स्थैर्य  प्रगती साधताम्रुत्युषडाष्टकातील धनु राशीविवाहासाठी वर्ज्य आणि व्रुश्चिक ह्या मंगळाच्या राशीबरोबर तसेच नवपंचम योग साधणार्या कन्या मकर राशीच्या जोडीदारांबरोबर संसार सुख समाधानाचा होऊ शकतो. 
वृषभ राशी ला या वर्षी चांगले गुण मिळाले आहेत त्यामुळे त्यांचा पाचवा क्रमांक आलेला आहे मागच्या वर्षी तो तळाला होतासहाजिकच यावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे
वृषभ राशी ला चा मागील वर्षी पाचवा क्रमांक होतात्यात थोडी घसरण होऊन सहावे स्थान मिळत आहेअनुकूल गुण ७२ ने कमी होऊन १०४० झाले आहेतयावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे
ह्या कालखंडात बहुतांश काळ गुरु तुमच्या षडाष्टकात धनुमध्ये असणार आहेमात्र शनी मकर राशीत नवपंचमात असल्यानेगुरुचा ताप तुम्हाला विचलित करू शकणार नाहीव्यावसायिक जीवनात तुम्हाला अनेक संधी मिळतीलविवाहोत्सुक मंडळींची स्वप्ने पुरी होण्यासाठी वर्ष अखेरचा काळच अनुकूल आहेविद्यार्थ्यांना या वर्षी चांगले गुण मिळतील
तुमच्या कष्टाळू वृत्तीचा अतिरेक मात्र तुम्ही करू नकात्यामुळे हितशत्रुंची नाराजी ओढवून घ्यावी  नुकसान सोसावे लागेलकोणती गोष्ट किती मर्यादेपर्यंत ताणायचे याचा विचार कराआता आर्थिक बाजू सुधारणार असल्याने मागील देणी देऊ शकालनवीन महत्त्वाच्या खरेदी बद्दल निर्णय लांबणीवर टाकाप्रवास थोडेफार अडखळत काही अडचणी येत पूर्ण होतीसंसारात नातेवाईकांबरोबर मतभेदमात्र संतती विषयक काही चांगली बातमी मिळू शकेलजोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यास्वतःला शारीरिकस्वास्थ्य जपावे लागेलविशेषतः पोटदुखीमानसिक शांती मिळणे अवघड दिसतेथोडक्यात तारेवरची कसरत करत विवेकबुद्धीने प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल.
# 3.मिथून:
मिथुन रास हि विचारही बुद्धिमान बुद्धाची रास आहेस्त्री-पुरुषाचे युगुल असे बोधचिन्ह असल्याने स्त्रीची कोमलता  तर पुरुषाचा अहंकार असे द्विस्वभावी रूप तुमच्या राशीचे असतेकोणताही ग्रह येथे उच्चीचा वा नीचीचा होत नाहीआपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही कुणालाच कधी जाणवू देत नाहीबोलघेवडेपणा मिश्किल थट्टा तुम्हाला आवडतेतूळ  कुंभ या नवपंचम योगातल्या राशीचे जोडीदार तुमच्याशी संसार चांगला करतातमात्र वृश्चिक ही बुधाचा शत्रू असलेल्या आणि तुमच्या षडाष्टकात असलेल्या मंगळाची रास तुम्हाला विवाह साठी टाळावी लागतेम्रुगाचे दोन चरण रोहिणी पूर्ण  पुनर्वसु नक्षत्राचे तीन चरण मिळून ही राशी बनते.
मिथुन राशीला मागील वर्षी अनुकूल गुण आता ८७८ इतके गुण कमी  सातवा क्रमांक होताआता शुभस्थानी येणाऱ्या गुरुमुळे त्यात १२५ गुण वाढले तरी संपूर्ण राशीचक्रात आठवे स्थान मिळणार आहेएकंदर स्पर्धेत पिछेहाट असा विचित्र अनुभव वाट्याला आला आहे.
राहू तुमच्या राशीत पुष्कळ काळ  केतू गुरुबरोबरच असल्याने त्याची शुभफळे मिळण्यात अडचणी आहेतत्यामुळे अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतीलनोकरी-व्यवसायात वरिष्ठांची खप्पामर्जी होईल  बाजारामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे तुमच्या नफ्यात घट होऊन तोटा सहन करावा लागू शकतोम्हणून अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतीलविद्यार्थी वर्गाला मात्र मनाजोगते यश मिळेलस्पर्धात्मक परीक्षांमध्ये मात्र जास्त अपेक्षा ठेवू नयेविवाहोत्सुकांना हा कालखंड अनुकूल आहे,  गुरू धनु राशीत म्हणजे तुमच्या सप्तमस्थानात असल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सुधारावे.  प्रवासामध्ये कुणावर नाहक विश्वास टाकू नका., आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहेतसेच छोटे-मोठे अपघात होऊ शकतातकाळजी घ्या.  संततीचे बाबतीत शुभवार्तासारांश संमिश्र काळ भविष्यात येणार आहेसंयम  सहनशक्ती वाढवणे हेच गरजेचे आहे.
  कर्क:
कर्क रास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान कल्पक  प्रतिभा माणसांची राशी आहेमंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतोसंसारात तुम्हाला खूप गोडी असतेतुम्हाला माणसे हवीहवीशी असतातप्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकतेकवी-लेखक कलावंतांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असतेविवाह करता मृत्यू षडाष्टकातील कुंभ रास वर्ज्यतर मीन  वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभ फळे संसारात देतातपुनर्वसु चा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण  अनिष्ट आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते.
कर्क राशीचे नशीब दुसर्या स्थानावरून तळाच्या ११ व्या स्थानी फेकले गेले आहेतुळा राशीची सर्वात हलाखीची स्थिती जशीत्या खालोखाल तुमची ५८८ गुण कमी होऊन ते १४४७ वरून केवळ ८५९  इतके झाल्यामुळे तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये पिछेहाट आणि काय नको ते होणार आहे.
निराशाजनक संपूर्ण कालखंड अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देत तुम्ही नोकरी व्यवसायात आपले खुप नुकसान होण्याचा धोका आहेयावर्षी गुरु तुमच्या षडाष्टकात योगात असल्यामुळेनोकरीमध्ये डिमोशननको त्या विभागात वा जागी बदलीसहकार्यांकडून अपमान वरिष्ठांची बोलणी असे प्रसंग येतील.
मात्र कुठलाही घाईघाईने निर्णय घेण्याची चूक करू नका  तब्येतीस जपावे लागेलसंसारामध्ये जोडीदाराच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेलविद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळणे कठीण आहेतसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये त्यांचा अपेक्षाभंग होउ शकेल.
महिलांना आणि कुटुंबामध्ये नको त्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेलएकंदरच अस्वस्थ वातावरण राहणे,  मंगल कार्य रद्द होण्याची शक्यता अशा कटकटी आहेतथोडक्यातयंदा कोणत्याच जास्त अपेक्षा नकोतआहे ती स्थिती अधिक खालावत जाणार नाही ह्याची चिंता करत काळ काढावयाचा आहेअथक परिश्रमश्रद्धासंयम ठेवला तरच तुम्ही तग धरु शकाल.
 सिंह
वनराज सिंहाची ही राससर्वांवर अधिकार गाजवते कुणाकडे हार जाणे तुम्हाला आवडत नाहीआपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतोएक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य असतेमात्र तुम्ही दीर्घोद्योगी निश्चय  महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकतानवपंचम योगातील मेष  धनु राशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरताततर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाहीपूर्ण बघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनतेजीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य  भरभराट अनुभवास येते.
सिंह मंडळी कर्कराशीच्या उलटा अनुभव मागचे   वे स्थान ते आता चक्क उंच उडी मारून तिसरेतुमच्या नशीबाची भरधाव वेगाने प्रगती होत मागच्या ८७० अनुकूल गुणांवरुनयंदा १३०२ गुणांवर गरूडभरारी घेणार आहातकारण शुभफलदायी गुरु तुमच्या नवपंचम योगात पुढच्या वर्षअखेरीपर्यंत आहे आणि शनी तर पूर्ण वर्षभर षष्ठस्थानातून शुभ फळे देण्यास समर्थ आहे.
कालचक्राचा महिमा अगाध असतो.  योग्य  अचूक आर्थिक निर्णय यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईलस्थावर विषयक प्रश्न मनासारखे सुटतील.  नोकरी व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळून गुणांचे चीज करता येईलवरिष्ठ खुष तर सहकारी मदतगार अशी उत्साह वाढवणारी स्थिती रहावीहवी तिथे बदलीप्रमोशन  उत्तम पगारवाढ अशी अनुकूल स्थिती असेल.
विवाहोत्सुकांना हे वर्ष गोड बातमी देईलसंसारात जोडीदाराकडून प्रोत्साहन आणि वडीलधार्यांकडून चांगले कौतुक होऊ शकेलसंतती विषयक प्रगतीच्या वार्ता येतीलमनःशांती मिळाल्यामुळे तब्बेत सुधारेलप्रवास मनाजोगते होऊ शकतातकाही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योगविद्यार्थीवर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतीलमजेत अन् आनंदात आता तुम्हाला वाटचाल करायची आहेआगे बढते रहो!
6. कन्या:
अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसे संशयी  आतल्या गाठीची असतात अकाउंट्स ऑडिट वकिली पेशात उत्तम यश मिळवतात ही बुद्धाची रास असून बुद्ध येथे उच्चीचा होतो मात्र शुक्र येथे नीतीचा होतो शैक्षणिक यश वाद-विवादात तुम्ही छाप पाडतात मात्र तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असतात त्यामुळे कपाळावर कायमच्या असे हे माणसांचे स्वरूप असते निर्भेळ सुख मिळवणे तुम्हाला कठीण होते विवाह हे दृष्टीने मृत्यू षडाष्टक आतील मेष रास टाळावी तर बुद्ध  मकर हे नवपंचम रात्रीतले जोडीदार तुमच्या बरोबर संसार आनंदाचा करू शकतात उत्तरा नक्षत्रातील पूर्ण हस्त  चित्रा नक्षत्राचे दोन चरण यांनी कन्या रास बनते.
कन्या राशीने ह्या वेळेला दहाव्या क्रमांकावरून एक पायरी वर चढून नववे स्थान मिळवले आहेअनुकूल गुणांतही एकशे दहा गुण वाढून यंदा तुम्हाला 964 गुण मिळाले आहेतपरंतु हे अनुकूल गुण तितके समाधानकारक नाहीतएकंदर परिस्थिती प्रतिकूल असेच राहणार आहेतुमच्या मनासारख्या गोष्टी घडतीलअशा भ्रमात राहू नकाकारण महत्त्वाचे असे गुरु आणि शनि हे ग्रह तुमच्या सहाय्यास नाहीतउलट शनी हा तुमच्या बुद्धीच्या स्थानात पंचमस्थानात असल्यामुळे तुमचे निर्णय घेताना चल-बिचल होऊन खूप वेळा नुकसान होईल.
ग्रहमान प्रतिकूल असले की घराचे वासेही कसे फिरतातत्याचा अनुभव या वर्षी घ्यायचा आहेनोकरी-व्यवसायात पिछेहाट   विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हालआर्थिक ओढाताण तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यांत अडथळे निर्माण करेलविद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची धास्ती वाटू शकेलअधिक नेटाने अभ्यास करायला हवाघरातील वडीलधारी तुमच्या चिंता वाढवतीलमनस्ताप वाढवतीलप्रवासात तसेच नवीन गुंतवणूकीत नाहीतर फसवणूक होऊ शकेलतुमच्या संशयी स्वभावामुळे अडचणीचे तसेच गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतीलविवाहोत्सुकांना आँक्टोबर२० नंतरच शुभकाळम्हणून घाईगर्दी नकोसगळेच फासे उलटे पडत आहेत असे म्हणायची वेळ आलीतरी धीर सोडू नकाकेवळ श्रद्धा संयम आणि सबुरी या जोरावर दिवस काढायचे आहेत.

लेखक श्रीसुधाकर नातू