रविवार, २७ एप्रिल, २०२५

" सहज सुचले म्हणून !":

👍 बोल अमोल, !":👍 😄 " दृष्टी तशी सृष्टी !":😄 💐"अंगणी पारिजात हा फुलला !":💐 👍"लहानपणी आम्ही बैठ्या घरामध्ये राहायचो. त्यामुळे समोरच छान अंगण होतं आणि अंगणामध्ये आम्ही पारिजातकाच्या झाडाबरोबरच इतरही फुले झाडे लावली होती. त्यामुळे त्यां अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा सकाळी पडत असे. शिवाय फुलझाडांची रंगीबेरंगी फुलेही अंगणामध्ये डवरलेली असत. पण आता आम्ही उंचावर सोळाव्या मजल्यावर राहतो. साहजिकच आम्हाला प्रस्थापित असे समोर अंगण नाही. परंतु बेडरूम मध्ये समोर दोन तशा 7 मजली इमारती त्यांच्या सभोवती हिरवीगार वृक्षराजी आणि समोरच एका बाजूूला पिवळ्या फुलांनी डवरलेल्या वृक्षांची रांग असलेला सातत्याने माणसे वाहने यांनी प्रवास करत राहणारा रस्ता, हेच आता आमचे 'अंगण' ! 'सोने पे सुहागा' असं म्हणावं असा खिडकीतून डाव्या कोपऱ्याला पाहिलं की बांद्रा रिक्लेमेशनचा निळ्याशार लाटांनी उसळणारा समुद्र ! बेडरूममधूून खिडकीतून अगदी समोरच्या रस्त्यावर काय चाललंय ते बघत राहणे, हा एक विलक्षण मनभावन अनुभव असतो. माणसं चालली कशा करता कोणाकरता, हा इकडे वळला यांच्या मनात काय चाललंय, वाहनातून जाणारे कुठे कशा करता चालले हे आणि असे अनेक प्रश्न मनात जागवत त्या अंगणाकडे बघत राहणं हा एक नवाच छंद अधून मधून मला अनुभवता येतो ! इतके पुरे नाही म्हणून की काय, आमच्या सदनिकेच्या प्रवेशासमोरच असलेला दिवाणखाना आणि त्याच्या समोर एक आगळे वेगळे असे वृक्षराजीने, ज्यामध्ये उंचच उंच नारळाच्या माडांच्या डोलणाऱ्या झावळ्या- एखाद्या हिरोने डोक्यावची केसांची झुलपे मिरवावीत असा समूह ! बाजूला एक छोटेसे हिरवेगार मैदान आणि या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याच्या सभोवती मानवी विकासाच्या उत्तुंग एकमेकाहून उंच असलेल्या टॉवर्सच्या-पत्त्यांच्या बंगल्यांसारख्या इमारती ! हेहीआमचे 'अंगणच'!":👍 ############@##### 👍 बोल 'अमोल' वाचता वाचता वेचलेला,ऐकलेला 'ऐवज'":👍 💐" नुकतेच ललित मासिका तर्फे आणि महाराष्ट्र टाइम्स मधून पॉप्युलर प्रकाशन च्या वतीने वाचकांना आवडणारी मराठी पुस्तके यासंबंधी एक अनमोल सर्वेक्षण केले गेले त्यामध्ये श्री अमोल पालेकर लिखित ऐवज या पुस्तकाचे अग्रक्रमी होते साहजिकच मी वाचनालयातून प्रतीक्षा करून ते पुस्तक मिळवले आणि आता त्याचे वाचन सुरू आहे. यंग मॅम नेक्स्ट स्टोअर अशी प्रतिमा असलेला सुपरस्टार अमोल पालेकर प्रायोगिक रंगभूमीवर तसेच मराठी हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शक आणि अर्थातच अभिनेता म्हणून नावारूपाला आलेला सुपरस्टारच होय आज 80 व्या वर्षी त्याचे हे पुस्तक सादर होत आहे. पण तो केवळ एवढेच नाही तर स्वतःची स्वतंत्र मते विचार आणि दृष्टिकोन असणारा प्रसंगी व्यवस्थेविरुद्ध आपला आवाज उठवणारा असा सजग संवेदनशील निर्भिड कलावंत आहे. विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना अशा अर्पण पत्रिकेद्वारे त्याच्या जीवनातील वेचक वेधक असा हा ऐवज या पुस्तकाद्वारे आपल्यासमोर उलगडला आहे सोबत क्यूआर कोड जागोजागीची छायाचित्रे त्याची कला सृष्टीतील सूची अशा नियोजन पद्धतीने सादर केलेला हा ग्रंथ खरोखर वाचनीय आहे योगायोगाने पुस्तक वाचत असताना युट्युब वर सरफिंग करत होतो आणि मला बीबीसी तर्फे अमोल पालेकर आणि त्याची पत्नी संध्या गोखले यांचा ऐवज पुस्तकाच्या जडणघडणीचा इतिहास आणि त्या मागची भूमिकेचा परामर्च घेणारा चर्चात्मक मुक्त संवाद समोर आला आणि त्याची लिंक पुढे देत आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढील लिंक उघडून जरूर पाहावा.!":💐 https://youtu.be/QMbAPOiuhSE?si=aX_P8ufgopMg9lvr ##########@##### 👍"ताण तणावावर मात करा !":👍 👍"जीवनातील ताणतणावामुळे सध्या मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या झाली आहे. मन चंगा तो कठौती में गंगा असं म्हटलंय ते खोटं नाही आनंदी मन ठेवायचं कसं आणि ती साऱ्यांना जमते असं नाही. मानसिक अनारोग्य याविषयी सोप्या भाषेत आपल्याला माहिती दिली आहे.... त्यासाठी ही लिंक उघडा.....👍 https://youtu.be/Qxmh1quyJhk?si=f-h0IKavpGt83BgC #################

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा