रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

"बोल अमोल-276 ते 281 !":

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-276 !":👌 🤣 "महाराष्ट्रातील राजकारणाचा तमाशा बघता महात्मा गांधींच्या तीन माकडांचे अनुकरण करण्याची वेळ आली आहे, नाही कां? 'बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो' !":🤣 ############# 💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-277 !":👌 😚 "राजकारण हे विचारकेंद्री न राहता प्रामुख्याने व्यक्तीकेंद्री, तसेच जनहितकेंद्री न राहता केेवळ सत्ताकेंद्री जेव्हा बनते, तेव्हा भावनांचे बाजार मांडून सत्तेचा खेळ खेळला जातो. विभूतीपूजेची आपली (अनाठायी ?) परंपरा आत्ताची नाही, पूर्वापार आहे. गेली दहा वर्षे तर तिचेच प्रताप: 'राजकारणाला किती हीन पातळीवर नेऊन ठेवले?' हाच दुर्दैवाने प्रश्न उभा करत आहेत !":😚 ###########@ 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-278 !":👌 👍"सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अन्यथा अंगठेबहाद्दार अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल ! म्हणून ध्यानात घ्या: 'गद्दारीचे जसे, तसेच गद्दारीला प्रोत्साहन देणाऱ्यांचे पानिपत होणे, महाराष्ट्रात अत्यावश्यक आहे'! ":👌 ########### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-279 !":👌 💐"परिसाचा स्पर्श झाला की, जसे सोने होते त्याचप्रमाणे मी वाचनालयात पुस्तक बदलायला गेलो आणि ज्या पुस्तकाला हात लावला ते देखील असेच सोन्यासारखे 'अनवट' निघाले. होय नाव देखील 'अनवट' लेखक डॉक्टर अनिल अवचट ! ह्या पुस्तकाचे दुर्दैवाने एक वैशिष्ट्य हे की, पुस्तक डॉक्टर अनिल अवचट यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्याची वेळ आली. नेहमीप्रमाणे वाचकांना गप्पा मारत असल्यासारखा हा आत्मसंवाद नावाप्रमाणे जणु अनवट आहे ! आपणही ते आवर्जून मिळवून जरूर वाचा. हे पुस्तक वाचता वाचता त्यातील ही दोन वाक्य माझ्या मनात रुजून गेली आहेत: " माणूस दुसऱ्या माणसाला अनुभवाइतकी अधिक मोलाची कोणती गोष्ट बरे देऊ शकतो ?" " माणसाला अनुभव सांगितल्याशिवाय चैन पडतं कां ?कारण त्यातूनच तर सगळं साहित्य लिहिलं, सांगितलं गेलंच ना !":💐 ########@#### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-280 !":👌 💐"बचत ही प्रामुख्याने आहे त्या पैशाची भविष्यातील तरतूद असते, तर गुंतवणूक म्हणजे पैशाने अ़धिक पैसा मिळविण्याचा प्रयत्न करणे, होय. बचतीपेक्षा गुंतवणूकीत धोका अधिक असतो. 'ठेविले अनंते, तैसेची रहावे' अशी आपली प्रव्रुत्ती परंपरागत असल्याने, आपण धोका पत्करणे शक्यतो टाळतो. ह्याचमुळे बहुदा आपली अर्थसाक्षरता बाळबोध राहिली असावी. मात्र आताच्या गतीमान स्पर्धात्मक जीवनांत बचत व गुंतवणूक ह्या संकल्पनांचे सर्वंकष ज्ञान मिळवणे अत्यावश्यक बनले आहे. चाकरमानी व्रुत्ती आपला आर्थिक स्तर मर्यादित राखत आहे, ह्याची जाण सर्वांनीच ठेवायला हवी. वैध मार्गांनी व्यवसाय वा धंदा करत, गुंतवणूकीचे महत्व समजून घेत, आपल्या आर्थिक भरभराटीचे नवनवे मार्ग चोखाळावेत. आजच्या जगात पैसा हेच हे जीवनात स्थैर्य आणि सुख समाधान मिळविण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, हे विसरून चालणार नाही !":💐 ############# 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-281 !":👌 😄 "लहानपणी वेगवेगळे खेळ खेळले जायचे. त्यातील, दोघांमधला एक खेळ मला आज आठवला. साध्या कागदावर एक ते दहा असे थोडे अंतर सोडून तीन ओळींमध्ये अंक लिहिलेले असायचे आणि कोपऱ्यामध्ये प्रारंभ बिंदू असायचा. मग त्या दोघांमधील एक जण दुसऱ्याला प्रारंभबिंदूपासून या विविध अंकांकडे रेघा ओढायला सांगायचा. त्या खेळामध्ये कुठलीही रेघ क्रॉस न होता कामा नये, हा नियम असे. शेवटी कुठेही अडथळे न येता प्रारंभबिंदूवर येणं, म्हणजे विजय असे. प्रत्येक डावात अंतिमतः तयार होणाऱ्या आकृत्या खरोखर चित्रविचित्र असायच्या. माणसाचं जीवन देखील असेच नाही कां? फारच थोड्या जणांना कोणतीही अडथळे न येता पुनश्च प्रारंभबिंदूवर येणे शक्य व्हायचे ! ह्या खेळाची आज आठवण व्हायला असे कारण की, माणसाचं जीवन हे असंच गुढ आहे आणि नियती आणि माणूस यांच्या मधला दहा आकड्यांचा खेळ आहे. नियती माणसाला जीवनातील या दहा वळणं देणाऱ्या बिंदूंकडे जायला लावते आणि मग काय होतं ते तुम्ही खेळात पाहिलंच आहे. माणूस, त्याचं जीवन, त्याचे प्रयत्न, नियती आणि फळ यासाठी याहून दुसरे कुठले उदाहरण चपखल ठरू शकेल ? 'ह्याला जीवन ऐसे नांव' हेच खरे !:😄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा