बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

"सोशल मिडीयावरील माझी लेखणी-1":

'या हृदयीचे त्या हृदयी'करण्यासाठी माझी नेहमी धडपड चाललेली असते त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर मी विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण संदेश प्रसारित करत असतो येथे त्यातीलच पहिला भाग सादर आहे: -------------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-292 !":👌 😊 "आज म.टा. पुरवणी वाचताना निर्माते दिग्दर्शक श्री विधू विनोद चोप्रा यांचे एक वाक्य मनात घर करून गेले. जसा तो त्यांचा 3 E फॉर्म्युला चित्रपटांसाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर संचार करताना विचारात घेण्याजोगा व अंगीकारण्याजोगा आहे असे मला वाटले. तो फॉर्मुला असा की: "Entertain, Educate and Elivate !" 'ह्या हृदयीचे तयार हृदयी' सोशल मीडियावर करताना आपल्याला विचार असावा की, जे जे आपण प्रसारित करू ते ते मनोरंजक वा मार्गदर्शक किंवा मोटिवेशनल अर्थात प्रेरणा देणारे/जाणीवा विस्तारित करणारे असे हवे. हाच धडा ह्या 'थ्री ई' फॉर्मुल्यावरून घ्यावयचा, असे मला वाटून गेले !":😊 एंटरटेन एज्युकेट अँड एलिव्हेट जसे कोणत्याही क्षेत्रात, मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो वा शासकीय किंवा नोकरीसाठी, प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे निवडीसाठी निश्चित अशी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि स्पर्धात्मक परीक्षा असते, त्याप्रमाणे राजकारणात देखील प्रवेश करण्यासाठी अशा तऱ्हेची व्यवस्था ताबडतोब निर्णय करायला हवी. त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागला तरी तो केला पाहिजे. कारण त्यामुळेच परंपरागत सरंजामशाही आणि घराणेशाही यांना आळा बसेल आणि 'कोई भी आव जाव राजकारणात स्वागत तुम्हारा', असा सावळा गोंधळ होणार नाही !":😊 -------- 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍" 'अर्थ'पूर्ण-'शेअर बाजारातील गुंतवणूक, वास्तव की मृगजळ ?":👌 "अभिवाचन क्रमांक 317 !": 💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्‍या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. बाजारात व्यवहार करताना काय काय खबरदार्या घ्याव्या लागतात आणि 'जे घडेल तेच पसंत !- अशी मनोभूमिका कां स्वीकारावी लागते ते श्री उदय पिंगळे ते श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत. प्रत्यक्ष शारीरिक क्षम न करता पैशाने पैसा कसा वाढवावा, हे ज्या शेअर बाजारात साध्य करता येते त्यामधील नवागतांना आणि जुन्या जाणत्यांना देखील हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. ऐका तर मग अभिवाचन !":💐 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍"आहे मनोहर तरी - भाग 27 !":👌 "अभिवाचन क्रमांक 314 !": ---------💐"ह्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई यांनी त्यांच्या सहजीवनातील एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल सूक्ष्म निरीक्षण करत, काही स्पष्ट मते मांडली आहेत. त्याशिवाय स्त्री-पुरुष संबंधांबद्दल देखील काळापुढचा विचार त्यांनी परखडपणे व्यक्त केला आहे. त्यांची विचारस्पष्टता ग्रहणशक्ती आणि कल्पकता यांचे अनोखे मिश्रण या अभिवाचनात झाले आहे. ते तुम्हाला देखील विचारात पाडणारे आहे. वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐 ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा..... https://drive.google.com/file/d/1y-0eM_LmtOCLhR3nImHWne183-fz1kEq/view?usp=drivesdk --------------- 💐"छाप(पड)लेले शब्द !":💐 👍"नमुनेदार घड्याळांचा संग्रह !":👌 😝 "आदिमानवाला प्रथम जेव्हा अग्नीचा शोध लागला आणि नंतर शेतीचा. तेव्हापासून त्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेले. पण खरी प्रगती चाक किंवा चक्र सापडले, त्यानंतर झाली. दररोज सकाळी सूर्य उगवतो, संध्याकाळी मावळतो दिवस आणि रात्र हे गुढ देखील त्याने काळ नावाची काहीतरी सर्वव्यापी गोष्ट आहे या विश्वात हे समजून घेतले. चाक अर्थात चक्राच्या शोधाप्रमाणे यांत्रिक पद्धतीने कालगणना करणारे पहिले घड्याळ तयार केले असेल. त्यापूर्वी सावली कशी बदलत जाते दिवसा आणि संध्याकाळपर्यंत त्याचे गणित योग्य तऱ्हेने करून त्या तऱ्हेने कालगणना करणारी घड्याळ निर्माण झाले. विश्वाच्या आवाढव्य अकरावी कराड फापट पसार यापुढे काळ ही संकल्पना मानवाचीच आहे कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे दिवस-रात्र आणि पृथ्वी भी सूर्याभोवती फिरते म्हणून वर्ष अशातऱ्हेचे कालगणनेचे गणित हे मानवनिर्मित आहे परंतु अंतराळात जाऊन जर विचार केला तर काळ अस्तित्वातच नाही म्हणूनच जेव्हा आकाशामध्ये गरुडभराने घेऊन अंतराळवीर जेव्हा विहार करतात तेव्हा त्यांच्या साठी काळ जणु अस्तित्वातच नसतो. जाता जाता हा विचार मनात येतो की हा विश्वाचा अनंत असा विस्तारलेला अवकाश कोणी निर्माण केला कधी निर्माण केला कसा निर्माण केला आणि तसेच निर्माण होण्यापूर्वी तो निर्माता कुठे होता? सारेच अगम्य व कधीही न उचलणारे गुढ ! सोबतच्या वृत्तात नमुनेदार घड्याळे गोळा करणाऱ्या श्री मनोज नायर यांच्या ह्या छंदांची उद्बोधक माहिती आहे. लंबकासारखे दर तासाला घंटी वाजवणारे भिंतीवरचे घड्याळ तर आपण पाहिलेच आहे. मुंबईचा राजाबाई टावर मनोर्यावरील अजस्त्र घडाळे पाहून, त्यांना घड्याळे गोळा करण्याचा छंद लागला. वेगवेगळ्या स्वरूपातील घड्याळांचे 194 नमुने त्यांनी गोळा केले आहेत आणि सगळ्यात जुने इ.स. 1620 मधील घड्याळ पुण्यामध्ये आहे याचीही कल्पना येऊन आपण थक्क होतो. आता मोबाईलच्या शोधामुळे प्रत्यक्ष मनगटावर घड्याळ लावणे त्यामानाने बंद जरी झाले असले तरी अनेक प्रकारचे कार्ड्स तंत्रज्ञानावरची घड्याळ महागड्या किमतीत सेलिब्रेटीज घेतात, हेही आपल्याला माहिती आहे. तर अशी आहे की नमुनेदार घड्याळांची कथा !:"😜 --------------------- 'Atulaniy', हा फक्त Sumit Atulyam सोसायटी मधील सर्व रहिवाशांचा हा मी स्थापन केलेला खाजगी व्हाट्सअप ग्रुप आहे. रसिकता फुलवत नेणाऱ्या रंगांच्या दुनियेतील साहित्य, नाटक, चित्रपट, tv मालिका ज्योतिष आणि आत्मविकास अशा क्षेत्रातील माझे लेख ध्वनिफिती वा व्हिडिओ येथे सादर केले जातील... त्यामध्ये आतापर्यंत 41 सदस्य सामील झाले आहेत. आपल्याला जर इच्छा असेल, तर पुढील लिंक क्लिक करून या समूहात सामील व्हावे आणि रसिकतेचा आनंद घेत राहावा. धन्यवाद श्री सुधाकर नातू A1603 ------------------ 💐"दिवाळी अंकांची मांदीयाळी-2 !":💐 👍"रसिक वाचकांनी दखल घ्यावा असा दुसरा अंक म्हणजे श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'24 होय. मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासातील संयुक्त मानापमान पुनश्च रंगभूमीवर येत आहे याची आठवण करून देणारे आकर्षक मुखपृष्ठ पाहिल्यानंतर, आतील अनुक्रमणिका तर आपल्याला जाणवून देते की, हा भरगच्च 400 पानांचा अंक आणि किंमतही तशीच मजबूत रुपये 360 असली तरी त्यात काय चीज आहे ! साहित्य- कादंबरी, कथा, प्रवास वर्णन, ललित लेख, व्यक्तीचित्रे ह्याशिवाय क्रीडा, चित्रपट, संगीत टीव्ही मालिका आणि आत्मविकास, उद्योगव्यवसाया अशा वैविध्यपूर्ण मजकुराने हा अंक सजवला आहे. येथे नाही काय? तर वार्षिक राशिभविष्य आणि कविता ! संक्षिप्त रूपात या दिवाळी अंकाला ही दाद देण्याची प्रेरणा मला मिळाली, कारण अंकाच्या वाचनाची सुरुवातच मुळी मी श्री विवेक गोविलकर यांनी लिहिलेला 'इमोशनल इंटेलिजन्स' विषयी प्रदीर्घ अभ्यासपूर्ण लेखापासून केली हे होय. त्या लेखाचा गोषवारा सांगणारी ही नोंद मला विशेष भावली आणि हे असे बोल अमोल लिहावेसे वाटले: 'वैयक्तिक आणि व्यवहारिक जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त IQ म्हणजे 'इंटेलिजन्स कोशंन्ट' किंवा EQ म्हणजे 'इमोशनल कोशंंट'. IQ हा अंक एखाद्याची तर्क आणि विचार करण्याची क्षमता किंवा बुद्धिमत्ता यांचा निर्देशक असतो,तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावना मारून टाकणे नव्हे, तर आपल्या भावना ह्या आपला उद्देश साध्य करण्यासाठी केव्हा मदत करतात आणि केव्हा त्यात अडथळा आणतात हे समजून घेणे होय !:👌 ---------------- 👍"मल्लिनाथी-13 !":👌 😚 "परिस्थिती बदलल्यावर, जेव्हा एखादा उपकारकर्त्याच्याच मार्गात अडचणी आणतो, त्याला विरोध करतो, तेव्हा तो कमालीचा स्वार्थी व असंवेदनशील तर असतोच असतो, पण त्याचे असे वागणे, ही अक्षम्य कृतघ्नता असते !":😚 ---------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-294 !":👌 👍"आतापर्यंत मी शक्यतो संग्रहात नसलेले फोन जर आले, तर ते न घेणे श्रेयस्कर समजत होतो. ते किती अत्यावश्यक आहे ते आता 'डिजिटल अरेस्ट' या प्रकारणाने सगळ्यांची झोप उडाल्यामुळे उमजले. फसव्या अनोळखी एसएमएसद्वारे लिंकस् पाठवून गुन्हे केले जातात, असाही संदेश वाचला. अनोळखी smsही न बघताच डिलीट करणे शहाणपणाचे हेही त्यामुुळे समजले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे 'सायबर क्राईमस्' सारखे भयानक भस्मासूर आपल्यासमोर उभे राहिले आहेत. अशावेळी अक्षरशः सावधानता किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांनाच येत आहे. मुद्दा मात्र वेगळाच आहे, अशी गुन्हेगारी करायला दुसऱ्यांना फसवायला माणसे कां तयार होतात, याचे सखोल संशोधन मानसशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी करावे अशी वेळ आली आहे !":👌

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा