रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
"बोल अमोल-268 ते 275 !":
👍"बोल, अमोल-268 !":👌
😊 "जसे कोणत्याही क्षेत्रात, मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो वा शासकीय किंवा नोकरीसाठी, प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे निवडीसाठी निश्चित अशी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि स्पर्धात्मक परीक्षा असते, त्याप्रमाणे राजकारणात देखील प्रवेश करण्यासाठी अशा तऱ्हेची व्यवस्था ताबडतोब निर्णय करायला हवी. त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागला तरी तो केला पाहिजे. कारण त्यामुळेच परंपरागत सरंजामशाही आणि घराणेशाही यांना आळा बसेल आणि 'कोई भी आव जाव राजकारणात स्वागत तुम्हारा', असा सावळा गोंधळ होणार नाही !":😊
#############
👍"बोल, अमोल-269 !":👌
😇 "कुठलाही शब्द हा काही ना काही तरी मनातील भावनांचा उलगडा करणारा असतो. पण मला असे विचार करायला लावण्यासाठी एक कारण घडले ते म्हणजे मी सध्या डॉ. अंजली कीर्तने यांनी लिहिलेल्या 'आठवणींचा पायराव- हे पुस्तक वाचत आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनात विशेषत: साहित्यिक वर्तुळात आलेल्या अनेक दिग्गजांच्या संबंथी अनुभवांच्या आधारावर शब्दभावना अप्रतिमपणे मांडल्या आहेत. साक्षेपी दिग्गजांविषयी संपादक श्री पु भागवत आणि
ज्ञानपीठ विजेते प्राध्यापक विंदा करंदीकर
यांच्या संबंधित मनाला भिडणारी शब्दशिल्पे मी नुकतीच नुकतीच वाचली. त्यामधील विंदांनी पत्रातून त्यांंच्या 'विरूपिका' या काव्यसंग्रह संबंधी
व्यक्त केलेल्या अर्थवाहित्व' ह्या शब्दांने माझे लक्ष वेधले.
तसे करताना मला उमजले की, मराठी भाषेत असेच आगळे वेगळे पण अर्थपूर्ण शब्द असतात. त्यातीलच तशाच घाटाने जाणाऱ्या माणसाबद्दल एक अफलातून शब्द मी आठवू लागलो. परंतु काही केल्या तो मनात येईना. 'अ' पासून सुरुवात एवढे फक्त जाणवत होते. विंदांच्या '
'अर्थवाहित्व' या शब्दाने मला दिशा दाखवली. 'अर्थवाहित्व' म्हणजे असा एक शब्द, जो आपल्या मनात जी अर्थाबद्दल प्रतिमा आहे तिच्याशी अचूक मिळता जुळता असा चपखल शब्द ! अचानक वीज चमकावी तशी मी स्मरणशक्तीला ताण देऊन आठवत असलेला शब्द समोर आला:
'अतरंगी' !":😇
############
👍"बोल, अमोल-270 !":👌
😘 " ज्याला स्वतःला खूप जे आवडते आणि चांगल्यापैकी जमते, असे करायला मिळाले तर जो आत्मसमाधानाचा अनुभव येतो, त्यामुुळे त्याच्या शरीरांतर्गत आरोग्यवर्धन करणाऱ्या हार्मोन्सचा स्त्राव होतो, असे मेडिकली सिद्ध झाले आहे.
लेखन आणि वाचन हे देखील असेच आनंददायी अनुभव ! माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्तमोत्तम पुस्तके वाचायचा गेल्या दीड वर्षात जो योग मला आला आहे, तो मला खरोखर अचंबित करणारा आहे. मला अशा वाचनातून जे मनभावन क्षण मिळतात, त्यावेळी मला आनंदाश्रू येतात. कारण त्या वाचनातून जीवनातील विविध कडूगोड अशा स्वभावाच्या माणसांचे आणि त्यांच्या जीवनातील चढ-उतार करणाऱ्या प्रसंगांचे,
त्या त्या काळातील भवतालाचे स्मरणरंजन करणारे अद्भुत अनुभव वाचणाऱ्याच्या जाणिवा विशाल करतात.
सोबतचे सध्या वाचत असलेले
डॉ. अंजली कीर्तने लिखित 'आठवणींचा पदरव' पुस्तक हे देखील त्यातलेच ! तुम्हालाही असा अनुभव येतो कां? येत नसला तर घेताही येईल, हे ध्यानात ठेवा !":😘
##########@#
👍"बोल, अमोल-271 !":👌
😁 "निवडणुकीच्या खेळामधली इच्छुकांची संगीत खुर्चीची धूमधमाल आणि नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या आता संपून,
कुणी माघार घ्यायची आणि कुणी नाही, कुणाचा गेम करायचा, ह्या तमाशाची रस्सीखेच, मूक साक्षीदार असलेल्या मतदारांची फुकट करमणूक करणार आहे. मात्र ती पाहता पाहता, 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, या साऱ्यांनी ?' असा टाहो करत 20 नोव्हेंबरला, कुणाला धडा शिकवायचा आणि कुणाला नाही वा या अग्निपरिक्षेत चक्क ड्रॉप घ्यायचा, हे ठरवावे
लागणार आहे !":😁
###########
👍"बोल, अमोल-272 !":👌
💐💐 "प्रत्येकाच्या जीवनात अनेक माणसं येत असतात, त्यांच्याबरोबरच्या संपर्कामुळे व सहवासामुळे आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल स्वभावाबद्दल आपल्या पुरते बरे वाईट समज करून घेत असतो. पण एखादा माणूस खरोखर अंतर्बाह्य कसा आहे, ते समजण्यासाठी माणसं वाचता यायला हवीत.
माणसं वाचणं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, आकलन आणि तर्कशुद्ध विश्लेषणक्षमता असावी लागते.
केवळ प्रतिभावान लेखकांनाच हे सारे जमते असं मला वाटतं. याकरताच व्यक्तिचित्रात्मक ललित लेखसंग्रह जितके वाचाल, तेवढी माणसांची अनेकानेक इंद्रधनुषी रूपं तुमच्यासमोर साकार होतील. 'गणगोत' हे 'पुलं'च पुस्तक वा डॉ अंजली कीर्तने यांचं 'आठवणीचा पायरव' जर वाचलंत, तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल.
आज दीपावलीच्या शुभसमयी, तुम्हा सर्वांना 'आगामी वर्ष सुखसमृद्धीचे, शांती समाधानाचे जावो' या शुभेच्छा देताना प्रार्थना करतो की, आपल्याला देखील अशी माणसं वाचायची किमया साधता यावी. त्यामुळे अगम्य अशा जीवनातील आपल्या जाणिवांचा भवताल अधिकाधिक
प्रकाशमान होईल !":💐💐
############
👍"बोल, अमोल-273 !":👌
💐💐 "दीपावलीच्या संगीत मैफिलींमध्ये आपण सारे मधूर स्वरांनी चिंब चिंब होत आहोत. 'ओंकारापासून प्रारंभ होणारी, आवाजाची दुनियाच खरोखर न्यारी' ! ती आपल्याला मनप्रसन्न करत अनेकानेक मनभावन क्षण देत असते.
मराठी भावसंगीताची परंपरा तर खरोखर अलौकिक आहे. त्यातून एखादे प्रेमगीत अशा नजाकतीने सादर केले जाते, की प्रश्न पडतो त्यामधील गायक/गायिका अथवा गीतकार आणि अर्थातच संगीतकार यापैकी श्रेष्ठ कोण? अशासारख्या प्रश्नाचे उत्तर देणे, हे आज सुरू होत असलेल्या 'भारत विरुद्ध न्यूझीलंड' यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात कोण जिंकणार, या प्रश्नासाठी नव्हे कां !":💐💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा....
https://youtu.be/FQHVRiSJvIA?si=SaZyf7J99_NQ7Jnm
#############
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-274 !":👌
💐💐 "पुष्कळदा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीचे नाव आठवायचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या गीताचे शब्द आठवायचा प्रयत्न करतो व एखादा पत्ता अशी आपली आठवणींची चाळण विशेषतः रात्री झोपेत अचानक जाग आल्यावर निर्माण होऊ शकते. मलाही असाच अनुभव आला त्या पहाटे मी एका गीताचे शब्द आणि ते गीत ऐकायला म्हणून युट्युब वर मधुमास हा धुंद झाला हे शब्द टाकून प्रयत्न करत होतो पण मला अभिप्रेत असलेले गीत काही केल्या मिळत नव्हते. अचानक झुंजूमुंजू यांच्या वेळी गगनात गंध आला या ओळी मनपटलावर उमजल्या आणि ताबडतोब श्रीकांत पारगावकरांनी गायलेले
'गगनास गंध आला, मधुमास धुंद झाला!' हे सुमधुर गीत ऐकायला मिळाले !
म्हणूनच ऑनलाइन सर्च हा अल्गोरिदम वर अवलंबून असतो हे जसे खरे, तसेच आपल्या मनात देखील योग्य तो शब्दांचा सिक्वेन्स निर्माण झाला की, आपल्या मनातील प्रश्नांचे उत्तर अचूक येते. पुढील लिंक उघडा ! माणसाचा मेंदू हा सुपर डुपर कॉम्प्युटर आहे, हेच खरे !":💐
https://youtu.be/fLFy5_8WDr4?si=G4SMDkCZcDDJWBqz
############
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-275 !":👌
😄 "माणसाच्या दोन प्रकारच्या उपजत मूलभूत इच्छा वा आकांक्षा असतात. आपण कोण, आपली वैशिष्ट्ये कोणती ते सिद्ध करायची पहिली उर्मी, तर त्याप्रमाणे व्यक्त होण्याची त्याची दुसरी उर्मी ! सोशल मीडियाच्या अवताराचा प्रारंभ होण्यापूर्वीचा माणूस आणि सोशल मीडिया नंतरचा माणूस, यामध्ये साहजिकच जमीन अस्मानाचा फरक आढळतो.
कारण पूर्वी त्याच्या संपर्काच्या कक्षा मर्यादित असल्यामुळे त्याच्या जाणिवांचा भवताल संकुचित असे. परंतु सोशल मीडियाच्या अवतारामुळे क्षणार्धात जगभर व्यक्त होण्याच्या आणि इतरांच्या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्या जाणिवांचे विश्व सातत्याने अधिकाधिक समृद्ध होत असते. यासाठी सोशल मीडियामधील प्रवेश आणि संचार उत्तरोत्तर असाच वृद्धिंगत होत राहील या शंका नाही !":😄
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा