गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

😭"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नांव !":😭

😭"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नांव !":😭 श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंकाचा रसास्वाद घेणारा संदेश मी बनवला करा परंतु तो प्रसारित करण्यापूर्वी काही वेळ गेला आणि जेव्हा प्रसारित करण्याची वेळ आली तेव्हा तो गायब झाला. वेगवेगळ्या प्रकारे मी तो शोधण्याचा प्रयत्न केला परंतु काही केल्या तो मिळाला नाही. त्यामुळे मला खूप दुःख झालं, रुख रुख वाटू लागली. त्या वेदनेमुळे तशाच तीव्र वेदनेची एक आठवण झाली. हे असं होण म्हणजे बहुदा सोशल मीडियावर जसं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो, तेव्हा त्याच संदर्भातल्या अनेक जाहिराती वा संदेश आपल्यासमोर उलगडत जातात अल्गोरिधमच्या सहाय्याने तसं ! माणसाच्या मनाच्या स्मृतीचे देखील हेच रहस्य असावे. मला आठवलं काय, तर एक अशीच चिंताजनक आठवण, त्या गावची जिथे आमच्या शेजारी ते जोडप राहायचे. त्यांना खूप खूप दिवसांनी मूल झालं, मुलगा झाला खूप आनंद झाला. म्हणून त्यांना वाटलं की, आपलं आई-वडिलांना कळवावं. तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, पण कॉल केला. मुंबईला होते, ते आई वडील अर्थात आजी आजोबा विमानाने ताबडतोब यायला निघाले. ते गावी विमानाने त्या गावी पोहोचेपर्यंत त्या घरात त्या रात्री आनंद होता. पण दुसऱ्या दिवशी पर्यंत काय झालं तर आजी आजोबा येईपर्यंत ते मुल होतं ते दुर्दैवाने दगावलं ! बिचारे आजी आजोबा आले खरे मोठ्या आनंदात आपल्या नातवाचे कौतुक करायला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते त्या सगळ्यांना मग त्या मुलाला मूठ माती कुठे द्यायची, हा शोध घेऊन, की विदीर्ण अंत:करणाने द्यावी लागली ! ही आठवण मला झाली अन् त्या वेळेला त्या सर्वांना जे दुःख वेेदना झाल्या असतील, त्या तुलनेत माझा तो संदेश हरवण्याची गायब होण्याची वेदना काहीच नव्हती हे जाणवले. माझा तो रसास्वादाचा संदेश जरी चुकून डिलीट झाला तरी तो परत मला लिहिताही आला, पण त्यांचे बाळ काही आता कधीच परत येणार नव्हते, हे विसरता येतच नाही ! शेवटी काय? 😭"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नांव !":😭 श्री सुधाकर नातू

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

"सोशल मिडीयावरील माझी लेखणी-1":

'या हृदयीचे त्या हृदयी'करण्यासाठी माझी नेहमी धडपड चाललेली असते त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर मी विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण संदेश प्रसारित करत असतो येथे त्यातीलच पहिला भाग सादर आहे: -------------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-292 !":👌 😊 "आज म.टा. पुरवणी वाचताना निर्माते दिग्दर्शक श्री विधू विनोद चोप्रा यांचे एक वाक्य मनात घर करून गेले. जसा तो त्यांचा 3 E फॉर्म्युला चित्रपटांसाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर संचार करताना विचारात घेण्याजोगा व अंगीकारण्याजोगा आहे असे मला वाटले. तो फॉर्मुला असा की: "Entertain, Educate and Elivate !" 'ह्या हृदयीचे तयार हृदयी' सोशल मीडियावर करताना आपल्याला विचार असावा की, जे जे आपण प्रसारित करू ते ते मनोरंजक वा मार्गदर्शक किंवा मोटिवेशनल अर्थात प्रेरणा देणारे/जाणीवा विस्तारित करणारे असे हवे. हाच धडा ह्या 'थ्री ई' फॉर्मुल्यावरून घ्यावयचा, असे मला वाटून गेले !":😊 एंटरटेन एज्युकेट अँड एलिव्हेट जसे कोणत्याही क्षेत्रात, मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो वा शासकीय किंवा नोकरीसाठी, प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे निवडीसाठी निश्चित अशी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि स्पर्धात्मक परीक्षा असते, त्याप्रमाणे राजकारणात देखील प्रवेश करण्यासाठी अशा तऱ्हेची व्यवस्था ताबडतोब निर्णय करायला हवी. त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागला तरी तो केला पाहिजे. कारण त्यामुळेच परंपरागत सरंजामशाही आणि घराणेशाही यांना आळा बसेल आणि 'कोई भी आव जाव राजकारणात स्वागत तुम्हारा', असा सावळा गोंधळ होणार नाही !":😊 -------- 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍" 'अर्थ'पूर्ण-'शेअर बाजारातील गुंतवणूक, वास्तव की मृगजळ ?":👌 "अभिवाचन क्रमांक 317 !": 💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्‍या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. बाजारात व्यवहार करताना काय काय खबरदार्या घ्याव्या लागतात आणि 'जे घडेल तेच पसंत !- अशी मनोभूमिका कां स्वीकारावी लागते ते श्री उदय पिंगळे ते श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत. प्रत्यक्ष शारीरिक क्षम न करता पैशाने पैसा कसा वाढवावा, हे ज्या शेअर बाजारात साध्य करता येते त्यामधील नवागतांना आणि जुन्या जाणत्यांना देखील हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. ऐका तर मग अभिवाचन !":💐 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍"आहे मनोहर तरी - भाग 27 !":👌 "अभिवाचन क्रमांक 314 !": ---------💐"ह्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई यांनी त्यांच्या सहजीवनातील एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल सूक्ष्म निरीक्षण करत, काही स्पष्ट मते मांडली आहेत. त्याशिवाय स्त्री-पुरुष संबंधांबद्दल देखील काळापुढचा विचार त्यांनी परखडपणे व्यक्त केला आहे. त्यांची विचारस्पष्टता ग्रहणशक्ती आणि कल्पकता यांचे अनोखे मिश्रण या अभिवाचनात झाले आहे. ते तुम्हाला देखील विचारात पाडणारे आहे. वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐 ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा..... https://drive.google.com/file/d/1y-0eM_LmtOCLhR3nImHWne183-fz1kEq/view?usp=drivesdk --------------- 💐"छाप(पड)लेले शब्द !":💐 👍"नमुनेदार घड्याळांचा संग्रह !":👌 😝 "आदिमानवाला प्रथम जेव्हा अग्नीचा शोध लागला आणि नंतर शेतीचा. तेव्हापासून त्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेले. पण खरी प्रगती चाक किंवा चक्र सापडले, त्यानंतर झाली. दररोज सकाळी सूर्य उगवतो, संध्याकाळी मावळतो दिवस आणि रात्र हे गुढ देखील त्याने काळ नावाची काहीतरी सर्वव्यापी गोष्ट आहे या विश्वात हे समजून घेतले. चाक अर्थात चक्राच्या शोधाप्रमाणे यांत्रिक पद्धतीने कालगणना करणारे पहिले घड्याळ तयार केले असेल. त्यापूर्वी सावली कशी बदलत जाते दिवसा आणि संध्याकाळपर्यंत त्याचे गणित योग्य तऱ्हेने करून त्या तऱ्हेने कालगणना करणारी घड्याळ निर्माण झाले. विश्वाच्या आवाढव्य अकरावी कराड फापट पसार यापुढे काळ ही संकल्पना मानवाचीच आहे कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे दिवस-रात्र आणि पृथ्वी भी सूर्याभोवती फिरते म्हणून वर्ष अशातऱ्हेचे कालगणनेचे गणित हे मानवनिर्मित आहे परंतु अंतराळात जाऊन जर विचार केला तर काळ अस्तित्वातच नाही म्हणूनच जेव्हा आकाशामध्ये गरुडभराने घेऊन अंतराळवीर जेव्हा विहार करतात तेव्हा त्यांच्या साठी काळ जणु अस्तित्वातच नसतो. जाता जाता हा विचार मनात येतो की हा विश्वाचा अनंत असा विस्तारलेला अवकाश कोणी निर्माण केला कधी निर्माण केला कसा निर्माण केला आणि तसेच निर्माण होण्यापूर्वी तो निर्माता कुठे होता? सारेच अगम्य व कधीही न उचलणारे गुढ ! सोबतच्या वृत्तात नमुनेदार घड्याळे गोळा करणाऱ्या श्री मनोज नायर यांच्या ह्या छंदांची उद्बोधक माहिती आहे. लंबकासारखे दर तासाला घंटी वाजवणारे भिंतीवरचे घड्याळ तर आपण पाहिलेच आहे. मुंबईचा राजाबाई टावर मनोर्यावरील अजस्त्र घडाळे पाहून, त्यांना घड्याळे गोळा करण्याचा छंद लागला. वेगवेगळ्या स्वरूपातील घड्याळांचे 194 नमुने त्यांनी गोळा केले आहेत आणि सगळ्यात जुने इ.स. 1620 मधील घड्याळ पुण्यामध्ये आहे याचीही कल्पना येऊन आपण थक्क होतो. आता मोबाईलच्या शोधामुळे प्रत्यक्ष मनगटावर घड्याळ लावणे त्यामानाने बंद जरी झाले असले तरी अनेक प्रकारचे कार्ड्स तंत्रज्ञानावरची घड्याळ महागड्या किमतीत सेलिब्रेटीज घेतात, हेही आपल्याला माहिती आहे. तर अशी आहे की नमुनेदार घड्याळांची कथा !:"😜 --------------------- 'Atulaniy', हा फक्त Sumit Atulyam सोसायटी मधील सर्व रहिवाशांचा हा मी स्थापन केलेला खाजगी व्हाट्सअप ग्रुप आहे. रसिकता फुलवत नेणाऱ्या रंगांच्या दुनियेतील साहित्य, नाटक, चित्रपट, tv मालिका ज्योतिष आणि आत्मविकास अशा क्षेत्रातील माझे लेख ध्वनिफिती वा व्हिडिओ येथे सादर केले जातील... त्यामध्ये आतापर्यंत 41 सदस्य सामील झाले आहेत. आपल्याला जर इच्छा असेल, तर पुढील लिंक क्लिक करून या समूहात सामील व्हावे आणि रसिकतेचा आनंद घेत राहावा. धन्यवाद श्री सुधाकर नातू A1603 ------------------ 💐"दिवाळी अंकांची मांदीयाळी-2 !":💐 👍"रसिक वाचकांनी दखल घ्यावा असा दुसरा अंक म्हणजे श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'24 होय. मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासातील संयुक्त मानापमान पुनश्च रंगभूमीवर येत आहे याची आठवण करून देणारे आकर्षक मुखपृष्ठ पाहिल्यानंतर, आतील अनुक्रमणिका तर आपल्याला जाणवून देते की, हा भरगच्च 400 पानांचा अंक आणि किंमतही तशीच मजबूत रुपये 360 असली तरी त्यात काय चीज आहे ! साहित्य- कादंबरी, कथा, प्रवास वर्णन, ललित लेख, व्यक्तीचित्रे ह्याशिवाय क्रीडा, चित्रपट, संगीत टीव्ही मालिका आणि आत्मविकास, उद्योगव्यवसाया अशा वैविध्यपूर्ण मजकुराने हा अंक सजवला आहे. येथे नाही काय? तर वार्षिक राशिभविष्य आणि कविता ! संक्षिप्त रूपात या दिवाळी अंकाला ही दाद देण्याची प्रेरणा मला मिळाली, कारण अंकाच्या वाचनाची सुरुवातच मुळी मी श्री विवेक गोविलकर यांनी लिहिलेला 'इमोशनल इंटेलिजन्स' विषयी प्रदीर्घ अभ्यासपूर्ण लेखापासून केली हे होय. त्या लेखाचा गोषवारा सांगणारी ही नोंद मला विशेष भावली आणि हे असे बोल अमोल लिहावेसे वाटले: 'वैयक्तिक आणि व्यवहारिक जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त IQ म्हणजे 'इंटेलिजन्स कोशंन्ट' किंवा EQ म्हणजे 'इमोशनल कोशंंट'. IQ हा अंक एखाद्याची तर्क आणि विचार करण्याची क्षमता किंवा बुद्धिमत्ता यांचा निर्देशक असतो,तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावना मारून टाकणे नव्हे, तर आपल्या भावना ह्या आपला उद्देश साध्य करण्यासाठी केव्हा मदत करतात आणि केव्हा त्यात अडथळा आणतात हे समजून घेणे होय !:👌 ---------------- 👍"मल्लिनाथी-13 !":👌 😚 "परिस्थिती बदलल्यावर, जेव्हा एखादा उपकारकर्त्याच्याच मार्गात अडचणी आणतो, त्याला विरोध करतो, तेव्हा तो कमालीचा स्वार्थी व असंवेदनशील तर असतोच असतो, पण त्याचे असे वागणे, ही अक्षम्य कृतघ्नता असते !":😚 ---------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-294 !":👌 👍"आतापर्यंत मी शक्यतो संग्रहात नसलेले फोन जर आले, तर ते न घेणे श्रेयस्कर समजत होतो. ते किती अत्यावश्यक आहे ते आता 'डिजिटल अरेस्ट' या प्रकारणाने सगळ्यांची झोप उडाल्यामुळे उमजले. फसव्या अनोळखी एसएमएसद्वारे लिंकस् पाठवून गुन्हे केले जातात, असाही संदेश वाचला. अनोळखी smsही न बघताच डिलीट करणे शहाणपणाचे हेही त्यामुुळे समजले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे 'सायबर क्राईमस्' सारखे भयानक भस्मासूर आपल्यासमोर उभे राहिले आहेत. अशावेळी अक्षरशः सावधानता किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांनाच येत आहे. मुद्दा मात्र वेगळाच आहे, अशी गुन्हेगारी करायला दुसऱ्यांना फसवायला माणसे कां तयार होतात, याचे सखोल संशोधन मानसशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी करावे अशी वेळ आली आहे !":👌

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

"बोल अमोल-276 ते 281 !":

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-276 !":👌 🤣 "महाराष्ट्रातील राजकारणाचा तमाशा बघता महात्मा गांधींच्या तीन माकडांचे अनुकरण करण्याची वेळ आली आहे, नाही कां? 'बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो' !":🤣 ############# 💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-277 !":👌 😚 "राजकारण हे विचारकेंद्री न राहता प्रामुख्याने व्यक्तीकेंद्री, तसेच जनहितकेंद्री न राहता केेवळ सत्ताकेंद्री जेव्हा बनते, तेव्हा भावनांचे बाजार मांडून सत्तेचा खेळ खेळला जातो. विभूतीपूजेची आपली (अनाठायी ?) परंपरा आत्ताची नाही, पूर्वापार आहे. गेली दहा वर्षे तर तिचेच प्रताप: 'राजकारणाला किती हीन पातळीवर नेऊन ठेवले?' हाच दुर्दैवाने प्रश्न उभा करत आहेत !":😚 ###########@ 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-278 !":👌 👍"सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अन्यथा अंगठेबहाद्दार अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल ! म्हणून ध्यानात घ्या: 'गद्दारीचे जसे, तसेच गद्दारीला प्रोत्साहन देणाऱ्यांचे पानिपत होणे, महाराष्ट्रात अत्यावश्यक आहे'! ":👌 ########### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-279 !":👌 💐"परिसाचा स्पर्श झाला की, जसे सोने होते त्याचप्रमाणे मी वाचनालयात पुस्तक बदलायला गेलो आणि ज्या पुस्तकाला हात लावला ते देखील असेच सोन्यासारखे 'अनवट' निघाले. होय नाव देखील 'अनवट' लेखक डॉक्टर अनिल अवचट ! ह्या पुस्तकाचे दुर्दैवाने एक वैशिष्ट्य हे की, पुस्तक डॉक्टर अनिल अवचट यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्याची वेळ आली. नेहमीप्रमाणे वाचकांना गप्पा मारत असल्यासारखा हा आत्मसंवाद नावाप्रमाणे जणु अनवट आहे ! आपणही ते आवर्जून मिळवून जरूर वाचा. हे पुस्तक वाचता वाचता त्यातील ही दोन वाक्य माझ्या मनात रुजून गेली आहेत: " माणूस दुसऱ्या माणसाला अनुभवाइतकी अधिक मोलाची कोणती गोष्ट बरे देऊ शकतो ?" " माणसाला अनुभव सांगितल्याशिवाय चैन पडतं कां ?कारण त्यातूनच तर सगळं साहित्य लिहिलं, सांगितलं गेलंच ना !":💐 ########@#### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-280 !":👌 💐"बचत ही प्रामुख्याने आहे त्या पैशाची भविष्यातील तरतूद असते, तर गुंतवणूक म्हणजे पैशाने अ़धिक पैसा मिळविण्याचा प्रयत्न करणे, होय. बचतीपेक्षा गुंतवणूकीत धोका अधिक असतो. 'ठेविले अनंते, तैसेची रहावे' अशी आपली प्रव्रुत्ती परंपरागत असल्याने, आपण धोका पत्करणे शक्यतो टाळतो. ह्याचमुळे बहुदा आपली अर्थसाक्षरता बाळबोध राहिली असावी. मात्र आताच्या गतीमान स्पर्धात्मक जीवनांत बचत व गुंतवणूक ह्या संकल्पनांचे सर्वंकष ज्ञान मिळवणे अत्यावश्यक बनले आहे. चाकरमानी व्रुत्ती आपला आर्थिक स्तर मर्यादित राखत आहे, ह्याची जाण सर्वांनीच ठेवायला हवी. वैध मार्गांनी व्यवसाय वा धंदा करत, गुंतवणूकीचे महत्व समजून घेत, आपल्या आर्थिक भरभराटीचे नवनवे मार्ग चोखाळावेत. आजच्या जगात पैसा हेच हे जीवनात स्थैर्य आणि सुख समाधान मिळविण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, हे विसरून चालणार नाही !":💐 ############# 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-281 !":👌 😄 "लहानपणी वेगवेगळे खेळ खेळले जायचे. त्यातील, दोघांमधला एक खेळ मला आज आठवला. साध्या कागदावर एक ते दहा असे थोडे अंतर सोडून तीन ओळींमध्ये अंक लिहिलेले असायचे आणि कोपऱ्यामध्ये प्रारंभ बिंदू असायचा. मग त्या दोघांमधील एक जण दुसऱ्याला प्रारंभबिंदूपासून या विविध अंकांकडे रेघा ओढायला सांगायचा. त्या खेळामध्ये कुठलीही रेघ क्रॉस न होता कामा नये, हा नियम असे. शेवटी कुठेही अडथळे न येता प्रारंभबिंदूवर येणं, म्हणजे विजय असे. प्रत्येक डावात अंतिमतः तयार होणाऱ्या आकृत्या खरोखर चित्रविचित्र असायच्या. माणसाचं जीवन देखील असेच नाही कां? फारच थोड्या जणांना कोणतीही अडथळे न येता पुनश्च प्रारंभबिंदूवर येणे शक्य व्हायचे ! ह्या खेळाची आज आठवण व्हायला असे कारण की, माणसाचं जीवन हे असंच गुढ आहे आणि नियती आणि माणूस यांच्या मधला दहा आकड्यांचा खेळ आहे. नियती माणसाला जीवनातील या दहा वळणं देणाऱ्या बिंदूंकडे जायला लावते आणि मग काय होतं ते तुम्ही खेळात पाहिलंच आहे. माणूस, त्याचं जीवन, त्याचे प्रयत्न, नियती आणि फळ यासाठी याहून दुसरे कुठले उदाहरण चपखल ठरू शकेल ? 'ह्याला जीवन ऐसे नांव' हेच खरे !:😄

"बोल अमोल-268 ते 275 !":

👍"बोल, अमोल-268 !":👌 😊 "जसे कोणत्याही क्षेत्रात, मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो वा शासकीय किंवा नोकरीसाठी, प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे निवडीसाठी निश्चित अशी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि स्पर्धात्मक परीक्षा असते, त्याप्रमाणे राजकारणात देखील प्रवेश करण्यासाठी अशा तऱ्हेची व्यवस्था ताबडतोब निर्णय करायला हवी. त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागला तरी तो केला पाहिजे. कारण त्यामुळेच परंपरागत सरंजामशाही आणि घराणेशाही यांना आळा बसेल आणि 'कोई भी आव जाव राजकारणात स्वागत तुम्हारा', असा सावळा गोंधळ होणार नाही !":😊 ############# 👍"बोल, अमोल-269 !":👌 😇 "कुठलाही शब्द हा काही ना काही तरी मनातील भावनांचा उलगडा करणारा असतो. पण मला असे विचार करायला लावण्यासाठी एक कारण घडले ते म्हणजे मी सध्या डॉ. अंजली कीर्तने यांनी लिहिलेल्या 'आठवणींचा पायराव- हे पुस्तक वाचत आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनात विशेषत: साहित्यिक वर्तुळात आलेल्या अनेक दिग्गजांच्या संबंथी अनुभवांच्या आधारावर शब्दभावना अप्रतिमपणे मांडल्या आहेत. साक्षेपी दिग्गजांविषयी संपादक श्री पु भागवत आणि ज्ञानपीठ विजेते प्राध्यापक विंदा करंदीकर यांच्या संबंधित मनाला भिडणारी शब्दशिल्पे मी नुकतीच नुकतीच वाचली. त्यामधील विंदांनी पत्रातून त्यांंच्या 'विरूपिका' या काव्यसंग्रह संबंधी व्यक्त केलेल्या अर्थवाहित्व' ह्या शब्दांने माझे लक्ष वेधले. तसे करताना मला उमजले की, मराठी भाषेत असेच आगळे वेगळे पण अर्थपूर्ण शब्द असतात. त्यातीलच तशाच घाटाने जाणाऱ्या माणसाबद्दल एक अफलातून शब्द मी आठवू लागलो. परंतु काही केल्या तो मनात येईना. 'अ' पासून सुरुवात एवढे फक्त जाणवत होते. विंदांच्या ' 'अर्थवाहित्व' या शब्दाने मला दिशा दाखवली. 'अर्थवाहित्व' म्हणजे असा एक शब्द, जो आपल्या मनात जी अर्थाबद्दल प्रतिमा आहे तिच्याशी अचूक मिळता जुळता असा चपखल शब्द ! अचानक वीज चमकावी तशी मी स्मरणशक्तीला ताण देऊन आठवत असलेला शब्द समोर आला: 'अतरंगी' !":😇 ############ 👍"बोल, अमोल-270 !":👌 😘 " ज्याला स्वतःला खूप जे आवडते आणि चांगल्यापैकी जमते, असे करायला मिळाले तर जो आत्मसमाधानाचा अनुभव येतो, त्यामुुळे त्याच्या शरीरांतर्गत आरोग्यवर्धन करणाऱ्या हार्मोन्सचा स्त्राव होतो, असे मेडिकली सिद्ध झाले आहे. लेखन आणि वाचन हे देखील असेच आनंददायी अनुभव ! माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्तमोत्तम पुस्तके वाचायचा गेल्या दीड वर्षात जो योग मला आला आहे, तो मला खरोखर अचंबित करणारा आहे. मला अशा वाचनातून जे मनभावन क्षण मिळतात, त्यावेळी मला आनंदाश्रू येतात. कारण त्या वाचनातून जीवनातील विविध कडूगोड अशा स्वभावाच्या माणसांचे आणि त्यांच्या जीवनातील चढ-उतार करणाऱ्या प्रसंगांचे, त्या त्या काळातील भवतालाचे स्मरणरंजन करणारे अद्भुत अनुभव वाचणाऱ्याच्या जाणिवा विशाल करतात. सोबतचे सध्या वाचत असलेले डॉ. अंजली कीर्तने लिखित 'आठवणींचा पदरव' पुस्तक हे देखील त्यातलेच ! तुम्हालाही असा अनुभव येतो कां? येत नसला तर घेताही येईल, हे ध्यानात ठेवा !":😘 ##########@# 👍"बोल, अमोल-271 !":👌 😁 "निवडणुकीच्या खेळामधली इच्छुकांची संगीत खुर्चीची धूमधमाल आणि नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या आता संपून, कुणी माघार घ्यायची आणि कुणी नाही, कुणाचा गेम करायचा, ह्या तमाशाची रस्सीखेच, मूक साक्षीदार असलेल्या मतदारांची फुकट करमणूक करणार आहे. मात्र ती पाहता पाहता, 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, या साऱ्यांनी ?' असा टाहो करत 20 नोव्हेंबरला, कुणाला धडा शिकवायचा आणि कुणाला नाही वा या अग्निपरिक्षेत चक्क ड्रॉप घ्यायचा, हे ठरवावे लागणार आहे !":😁 ########### 👍"बोल, अमोल-272 !":👌 💐💐 "प्रत्येकाच्या जीवनात अनेक माणसं येत असतात, त्यांच्याबरोबरच्या संपर्कामुळे व सहवासामुळे आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल स्वभावाबद्दल आपल्या पुरते बरे वाईट समज करून घेत असतो. पण एखादा माणूस खरोखर अंतर्बाह्य कसा आहे, ते समजण्यासाठी माणसं वाचता यायला हवीत. माणसं वाचणं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, आकलन आणि तर्कशुद्ध विश्लेषणक्षमता असावी लागते. केवळ प्रतिभावान लेखकांनाच हे सारे जमते असं मला वाटतं. याकरताच व्यक्तिचित्रात्मक ललित लेखसंग्रह जितके वाचाल, तेवढी माणसांची अनेकानेक इंद्रधनुषी रूपं तुमच्यासमोर साकार होतील. 'गणगोत' हे 'पुलं'च पुस्तक वा डॉ अंजली कीर्तने यांचं 'आठवणीचा पायरव' जर वाचलंत, तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. आज दीपावलीच्या शुभसमयी, तुम्हा सर्वांना 'आगामी वर्ष सुखसमृद्धीचे, शांती समाधानाचे जावो' या शुभेच्छा देताना प्रार्थना करतो की, आपल्याला देखील अशी माणसं वाचायची किमया साधता यावी. त्यामुळे अगम्य अशा जीवनातील आपल्या जाणिवांचा भवताल अधिकाधिक प्रकाशमान होईल !":💐💐 ############ 👍"बोल, अमोल-273 !":👌 💐💐 "दीपावलीच्या संगीत मैफिलींमध्ये आपण सारे मधूर स्वरांनी चिंब चिंब होत आहोत. 'ओंकारापासून प्रारंभ होणारी, आवाजाची दुनियाच खरोखर न्यारी' ! ती आपल्याला मनप्रसन्न करत अनेकानेक मनभावन क्षण देत असते. मराठी भावसंगीताची परंपरा तर खरोखर अलौकिक आहे. त्यातून एखादे प्रेमगीत अशा नजाकतीने सादर केले जाते, की प्रश्न पडतो त्यामधील गायक/गायिका अथवा गीतकार आणि अर्थातच संगीतकार यापैकी श्रेष्ठ कोण? अशासारख्या प्रश्नाचे उत्तर देणे, हे आज सुरू होत असलेल्या 'भारत विरुद्ध न्यूझीलंड' यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात कोण जिंकणार, या प्रश्नासाठी नव्हे कां !":💐💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा.... https://youtu.be/FQHVRiSJvIA?si=SaZyf7J99_NQ7Jnm ############# 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-274 !":👌 💐💐 "पुष्कळदा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीचे नाव आठवायचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या गीताचे शब्द आठवायचा प्रयत्न करतो व एखादा पत्ता अशी आपली आठवणींची चाळण विशेषतः रात्री झोपेत अचानक जाग आल्यावर निर्माण होऊ शकते. मलाही असाच अनुभव आला त्या पहाटे मी एका गीताचे शब्द आणि ते गीत ऐकायला म्हणून युट्युब वर मधुमास हा धुंद झाला हे शब्द टाकून प्रयत्न करत होतो पण मला अभिप्रेत असलेले गीत काही केल्या मिळत नव्हते. अचानक झुंजूमुंजू यांच्या वेळी गगनात गंध आला या ओळी मनपटलावर उमजल्या आणि ताबडतोब श्रीकांत पारगावकरांनी गायलेले 'गगनास गंध आला, मधुमास धुंद झाला!' हे सुमधुर गीत ऐकायला मिळाले ! म्हणूनच ऑनलाइन सर्च हा अल्गोरिदम वर अवलंबून असतो हे जसे खरे, तसेच आपल्या मनात देखील योग्य तो शब्दांचा सिक्वेन्स निर्माण झाला की, आपल्या मनातील प्रश्नांचे उत्तर अचूक येते. पुढील लिंक उघडा ! माणसाचा मेंदू हा सुपर डुपर कॉम्प्युटर आहे, हेच खरे !":💐 https://youtu.be/fLFy5_8WDr4?si=G4SMDkCZcDDJWBqz ############ 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-275 !":👌 😄 "माणसाच्या दोन प्रकारच्या उपजत मूलभूत इच्छा वा आकांक्षा असतात. आपण कोण, आपली वैशिष्ट्ये कोणती ते सिद्ध करायची पहिली उर्मी, तर त्याप्रमाणे व्यक्त होण्याची त्याची दुसरी उर्मी ! सोशल मीडियाच्या अवताराचा प्रारंभ होण्यापूर्वीचा माणूस आणि सोशल मीडिया नंतरचा माणूस, यामध्ये साहजिकच जमीन अस्मानाचा फरक आढळतो. कारण पूर्वी त्याच्या संपर्काच्या कक्षा मर्यादित असल्यामुळे त्याच्या जाणिवांचा भवताल संकुचित असे. परंतु सोशल मीडियाच्या अवतारामुळे क्षणार्धात जगभर व्यक्त होण्याच्या आणि इतरांच्या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्या जाणिवांचे विश्व सातत्याने अधिकाधिक समृद्ध होत असते. यासाठी सोशल मीडियामधील प्रवेश आणि संचार उत्तरोत्तर असाच वृद्धिंगत होत राहील या शंका नाही !":😄

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

"मल्लीनाथी -6 ते

😇"मल्लिनाथी 8 !":😇 😚'केली, ज्यांनी गद्दारी लै भारी ! बसवा,त्यांना त्यांच्या घरोघरी !!' पंचवीस वर्षे बरोबर असलेल्या शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर काय बिघडले असते? ही तर प्रारंभीची गद्दारी! उगाचच उभाठा शिवसेनेबद्दल उर कशाला बडवता? मूळ राष्ट्रवादी पक्ष फोडून Secular नारा देणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती करून बीजेपीने काय वेगळे केले ? पक्ष फोडणे, ही तर भीषण अशी कृती. कारण त्यामध्ये मतदारांचा विश्वासघात केला जातो. तो लोकशाहीचा घोट घेणारा सर्वात भयानक असा गुन्हा ठरावा ! शेवटी शिवसेनेला फोडून शिंदेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री करून काय साधले नामुुष्की आणि पीछेहाट की जी आता अजूनच होत रहाणार हे निश्चितच! ' विनाशकाले विपरीत बुद्धी !' दुसरे काय?":😚

"Mission Moral Revival !":

Mission Moral Revival !": It is really required at this stage of morally and ethically poor people, to seriously and scientifically probe, investigate the reasons, causes for such a moral downfall, generations after generations in the last century. Add to that there is a growing tendency not to follow set rules/laws or systems and 'Hum Kare so, Kayada' mentality is seen ever now and then. Let's find what went wrong during the last century and onwards.. Despite present generations' better economic status, we would get ashamed if we examine what was the Model, honest generation a century ago was and what pathetic we are today. It is just not easy to find the answer. Is it due to 'LPG' factor or any genetic change over all these years , or is it that our priorities, outlook towards the way we should lead life has dramatically changed as economic, scientific advancement went on improving or is it that due to our rapid growth of comforts increased over the last century, there has been our moral degradation? Thus Qs are plenty, I believe this is a crucial Turning Point for all of us, as we walk fast to future years of this century and such a meaningful probe is the most desirable right now. Remember the menace, monster of corruption and craze for easy fast prosperity, due to which all our Noble values are getting eroded. It is hence, high time that the genetic scientists, social thinkers/ reformers, economists come together to probe about the Mission Moral Revival of the coming Generations. Other wise I am afraid anarchy won't be far away. ----------------------------------- "Different Strokes !": "Taking into account the promises made at the Election time, are regularly either forgotten, side tracked, or just not fulfilled in the desired time frame, there must be a monitoring system in place to review their status annually. What we need now, is the results' hungry, development oriented, transparent Governance and for that power crazy, selfish politicians should not have any place in the same. The voters shld hv power to recall the inactive, selfish elected candidates. There is an acute need for the candidates who are self-less, genuinely committed for well being of the country, in the elections. Finally, emotional promotion in the elections should be out and pure developmental plans, with definite time frame must be in !": ----------------------- ----------------------------------------