बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

👍"रंगांची दुनिया !":👌: 👍"टेलीरंजन !":👌

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !"💐 👍"टेलीरंजन !":👌 🤣"सन टीव्ही मराठी' या वाहिनीने हल्ली कोणत्यातरी दोन मालिका एकत्र आणून 'महासंगम' हा जो नवीन उपक्रम चालू केलेला आहे, तो प्रेक्षकांना न पटणारा आणि अक्षरशः कहाण्यांचा चोथा करणारा असल्यामुळे, टीआरपी वाढायच्या ऐवजी घसरूनही शकतो हे कुणाच्याच ध्यानात कसे येत नाही ?":🤣 अंकित 😇 "स्टार प्रवाह' वरील 'लग्नाची बेडी' ही मालिका नको इतकी मूर्खासारखी लांबवत नेली जात आहे. सिंधूचे दुसरे लग्न हाच मुळात एक न पटणारा प्रश्न ! त्यात भानगडीचे नाटक विशालच्या लफड्यामधून व येनकेन प्रकारे ते उघड करण्याचा राघवचा अट्टाहास उद्वेगजनक वाटतो. ही मालिका खरं म्हणजे केेव्हाच बंद होणे आवश्यक होते ! खूप झाला हा खेळखंडोबा. तीच गोष्ट याच वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ह्या मालिकेची !":😇 😂"सन टीव्ही मराठी'वरील 'कन्यादान' आणि 'सुंदरी' या दोन मालिका देखील अशाच कारण नसताना कशाही पुढे पुढे नेल्या जात आहेत. या दोन्ही मालिकांमध्ये अधिक भरकटत जाणारी मालिका कोणती, याची खरं म्हणजे स्पर्धाच लावायला हवी ! तोच प्रकार मालिकाबाह्य असे 'झी टीव्ही मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' , 'सोनी टीव्ही मराठी'वरील 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' कार्यक्रमाचा रतीब, अक्षरशः तमाशा वाटत आहे. त्याच मार्गाने 'स्टार प्रवाह'वरील शीर्षकाला सार्थक ठरेेल असा 'होऊन जाऊ दे धिंगाणा' हा देखील पोरकटपणाचा कळसच ! प्रेक्षकांच्या अभिरुचीला किती रसातळाला नेणार, याचा सादरकर्त्यांनी विचार करावा आणि हे सारे ताबडतोब बंद व्हावेत !"😂 👍" अगदी याच्या उलट 'सोनी टीव्ही मराठी' वरील मालिका 'खरंच तिचं काय चुकलं ?' 'श्रेयस आभा आणि कुहू' हा प्रेम त्रिकोण, दमयंती तिचा भाऊ धनंजय, कुहूचा आते भाऊ अंकित हे खलनायकी स्वरूपात व त्यांना सहाय्य करणारा सिक्युरिटी गार्ड, प्रत्येक भागात उत्तरोत्तर उत्कंठा वाढवत नेतात. अधून मधून फोडणी म्हणून श्रेयस आणि आभाच्या वडिलांचे रहस्य त्यात रंगत वाढवत नेते. जवळजवळ शंभराहून अधिक भाग झालेली ही मालिका म्हणे लवकरच बंद होणार आहे अशी बातमी आहे. प्रेक्षकांची आवड आणि त्यावर अवलंबून असलेले 'टीआरपी'चे गणित खरंच मोठे गुढ एवढंच म्हणायचं !":👌 येथे व्यक्त कळलेली मते माझी वैयक्तिक आहेत शेवटी ज्याची त्याने आपली आवड तपासून मत बनवावी ते उत्तम ! धन्यवाद सुधाकर नातू

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

👍बोल, अमोल-ब !":👌

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-38 !":👌 💐"पत्ते, काम फत्ते? ना ना ना !":💐 👍" पत्त्यांच्या डावात जशी अनिश्चितता असते, तसंच जीवनाचं आहे. प्रत्येक डाव पत्त्यामध्ये जसा चांगला येईलच असं नाही. त्याचप्रमाणे जीवनामध्ये देखील चांगल्या वाईट परिस्थितीत बाल्यावस्था, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धापकाळ काढावा लागू शकतो. जे ताट आपल्या वाट्याला आले, ते गोड मानणेच केवळ आपल्या हातात असते !":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-41 !":👌 💐"राग ही आपल्या मनाविरुद्ध घडत असलेल्या गोष्टींची भावनिक प्रतिक्रिया असते, तर संताप हा संचित रागाचा रौद्ररूपी क्रियाशील प्रभाव असतो. त्याचे परिणाम अनिष्ट होतात. अशा वेळी संयम आणि सबुरी हेच शहाणपण !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-40 !":👌 💐"परस्पर संबंधातील माधुर्य कायम राहण्यासाठी एकमेकांच्या दोषांची उजळणी करण्यापेक्षा, त्यांच्या गुणांचे पाठांतर करावं, हे शहाणपण होय !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-39 !":👌 💐"सासू सुनेचे जसे विकोपाचे वाद होतात, तसे सासरा आणि जावयाचे होत नाहीत. याला कारण म्हणजे त्यांची जिव्हाळ्याची व्यक्ति वेगवेगळी असते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-42 !":👌 💐"राजकारण क्रिकेट आणि जीवन यात अनिश्चितता असते, हे जरी खरं असलं तरी त्यात फरक असतो. तो म्हणजे राजकारण व क्रिकेट मधील अनिश्चितता मानवनिर्मित असते, तर जीवनातली अनिश्चितता नैसर्गिक, निसर्ग निर्मित असते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-43 !":👌 💐"काही माणसांना माणसं हवीहवीशी वाटतात, ही माणसांमागून माणसं जोडत जातात आणि माणसं हेच यांचं जीवनसत्व अर्थात् Vitamin असतं ! तर काही माणसं अवलिया असतात, त्यांना अलिप्तता, एकटेपण आवडते अन् 'दुराव्याची लक्ष्मणरेषा' आखून, ती आपल्याच मस्तीत, आपल्याच आभासी दुनियेत रममाण असतात !!":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-44 !":👌 💐"राग अनुराग एकाच नाण्याच्या जणु दोन बाजू, पहिल्यात दुरावा, नकोसेपण तर दुसऱ्यात असोशी, हवे हवेसेपण ! परंतु नवल असे की, दुसऱ्यात जर फसवणुकीची ठेच लागली, तर त्याचे रूपांतर पहिल्यात सत्वर होते !!":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-45 !":👌 💐"परावलंबित्व हे केव्हाही क्लेशकारकच. शारीरिक परावलंबित्व अगतिकता आणि अनुकंपा निर्माण करते, तर आर्थिक परावलंबित्व ओशाळगत आणि गुलामी ओढवून घेते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-51 !":👌 💐"आठवड्यामधला 'बुधवार' अगदी बरोबर मधला वार- इकडे तीन तिकडे तीन असे वार. बुध ग्रहाचे स्वामीत्व बुद्धी दर्शवते. साहजिकच जीवनात देखील बुद्धी समतोल राखूनच निर्णय घ्यावेत असेच सुचवत असणे आवश्यक असते !"💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-46 !":👌 💐"आपल्या कुुवतीपेक्षा ती कितीतरी अधिक आहे असे दाखवणारी हिम्मत, शेवटी एक व्यर्थ गर्व ठरत असते आणि 'गर्वाचे घर नेहमी खाली येते', हे ध्यानात ठेवावे !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-47 !":👌 "Change, what you cannot accept; Accept what you cannot CHANGE !": 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-48 !":👌 👍"Different Strokes !":👌 💐"The Turbulent Journey to the Check post of the Desired Goal is more thrilling & enjoyable than the finally achieved success !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-49 !":👌 💐"गवई आणि वादक प्रभात समयी जसे रियाज करतात, त्याचप्रमाणे मी देखील अनुभवाच्या खजिन्यातून 'अमोल बोलां'ची हिरे माणिके शोधण्याचा प्रयास करत असतो !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-50 !":👌 💐"Celebration म्हणजे अपेक्षापूर्तीचा आनंद साजरा करण्याचा शुभमंगल क्षण ! मंगल प्रभाती दररोज 'बोल अमोल' सादर करण्याचा हा पन्नासावा सुयोग हाही अर्थातच..... Celebration चा मनभावन क्षण !!":💐 II अमंगल प्रघात II 👍"बोल, अमोल-47 !":👌 💐"विचारांशी लढा विचारांनीच देणे, सुसंस्कृत समाजाला अपेक्षित असते. अतिरेकी ठोकशाहीने विरोधी आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे.... 🤣 विनाशकाले विपरीत बुद्धी !":🤣 II अमंगल प्रघात II 👍"बोल, अमोल-48 !":👌 🤣 "आपण करतो ते सदा सर्वदा बरोबरच, असा 'हम करे, सो कायदा' ही मनोवृत्ती डोक्यात भिनली की, चुकांमागून चुका व्हायला वेळ लागत नाही आणि रसातळ फार दूर नसतो !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-52 !":👌 💐"पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हाऊन जाणे कुठे आणि अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंध:कारात धडपडणे कुठे ! दिवस आणि रात्र, सुख आणि दुःख यांचा लपंडाव जीवनात असाच अविरत चालतच रहाणार हे नैसर्गिकच आहे !!":💐 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-53 !":👌 II शहाणपण II 💐"पाप, अर्थात वाईट कृत्य करणाऱ्याला माहित असते की, तो काय करत आहे आणि ते पाप आहे, परंतु तरीही तो पापामागून पाप करत जातो. तो हे विसरतो की, पापाचा घडा केव्हा ना केव्हा तरी भरून जातो अन् त्याचा हिशोब जेव्हा चुकता होतो, तेव्हा पश्चाताप होऊन काहीच उपयोग नसतो !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-54 !":👌 II शहाणपण II 👍"सखोल चौकशी न करता महत्त्वाच्या गोष्टी गृहीत धरून निर्णय घेणे अखेरीस घातक ठरते आणि न भरून जाण्याइतके नुकसान आहे होऊ शकते. म्हणून अष्टावधानी राहणे, हे शहाणपण असते !":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-56 !":👌 💐"श्री दत्ता हलसगीकर ह्यांच्या अविस्मरणीय काव्यपंंक्ती-2 "💐 II ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत II 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-57 !":👌 💐"श्री दत्ता हलसगीकर ह्यांच्या अविस्मरणीय काव्यपंंक्ती-3 "💐 II ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी दोन ओंजळी पाणी द्यावे आपले श्रीमंत ह्रदय त्यांनी रिते करून, भरून घ्यावे II 💐💐💐💐💐💐💐💐 II आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खालीच यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे II 💐💐💐💐💐💐💐💐 😜 "Everything is Fair in Love & War !" P.S. And now in Politics too !":😜 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-58 !":👌 💐"राजकारण म्हणजे राज्य करणे, सत्ता राबवणे ! राजकारण म्हणजे कुणाचेही हित वा अहित करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे !! राजकारण म्हणजे सारीपाटासारखा किंवा साप शिडी सारखा खेळ" !!!:💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-59 !":👌 💐"मत बनवणे म्हणजे केवळ नांवे ठेवणे नाही, तर त्या व्यक्तीचे योगदानही ध्यानात घेऊन, त्यांच्या जमाखर्चाची बाकी नीरक्षीर विवेकाने काढणे होय !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-60 !":👌 💐" भूतकाळातल्या चुका पुन्हा कधीही सुधारता येत नाहीत, त्यांचे दुष्परिणाम आज ना उद्या कधीतरी वेगवेगळ्या प्रकारे भोगायला लागतातच. कर्म सिद्धांत त्याला साक्षी आहे !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-61 !":👌 💐" माणसे आयुष्यात येतात आणि पुन्हा कधी न दिसण्यासाठी कायमची निघूनही जातात. परंतु गेलेल्या माणसाच्या आठवणींची उजळणी, प्रत्येकाच्या मनामनात वेगवेगळ्या प्रकारे करता येते. ह्याला कारण म्हणजे, माणसाला लाभलेली नैसर्गिक स्मरणशक्ती होय. जर तीच नसती तर तर मन कोरडे रिकामे राहिले असते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-62 !":👌 💐"प्रसिद्धी ही एक दुधारी अस्त्र असते. जर ती मिळाली तर तिचा त्रास होतो, खाजगीपणा नष्ट होतो. तर, जर प्रसिद्धी मिळाली नाही, तर एकाकीपणाची पीडा होते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-63 !":👌 💐"कार्यकारण भाव हा नैसर्गिक नियम आहे. 'जसे कराल तसे भराल' विसरून चालत नाही. ज्या पीडा निर्माण होतात, त्या केव्हातरी पूर्वी केलेल्या चुकांचे किंवा इतरांना दिलेल्या त्रासाचे परिणाम असतात, हे कायम ध्यानात ठेवणे गरजेचे असते. हे, जे समजून घेतात ते आलेली वाट्याला आलेली पीडा खुुल्या मनाने सहन करतात, न पेक्षा अशांतता अस्वस्थता, त्रागा याचे धनी होतात !":💐 🤣 "मल्लीनाथी !":🤣 👍"मल्लिनाथी म्हणजे एखाद्या विषयावर विरोधाभासात्मक किंवा विडंबनात्मक उपरोधक टिप्पणी करणे होय. आज पासून मल्लिनाथी या माझ्या जुन्या उपक्रमाचे पुनरुज्जीवन करत आहे !:👌 😇 "व्यावसायिक जीवनात माणसे आपली आर्थिक प्रगती व पदोन्नती व्हावी म्हणून अधूनमधून नोकऱ्या सोडतात. ह्या कंपनीतून दुसर्या (स्पर्धकही) कंपनीत जातात. त्यांना कोणी नांवे ठेवत नाहीत. उलट त्यांच्या धडाडीचे कौतुक करतात. परंतु हेच जर राजकारण्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारली, तर मात्र 'आयाराम गयाराम' अशी नांवे ठेवतात! हे कितपत बरोबर?:😇 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-64 !":👌 🤣 "जर तुमचा वर्तमानकाळ भूषणावह नसेल, तर केवळ भूतकाळातील दैदीप्यमान इतिहासाचे गोडवे गाणे, हा अनुचित दिखावा ठरू शकतो !":🤣 धन्यवाद सुधाकर नातू

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

👍"चलते चलते"- बोल अनमोल!":👌

👍"चलते चलते"- बोल अनमोल!":👌 कधी कधी आपण मोबाईलवर सोशल मीडिया सर्फिंग करताना आपल्याला वेधून घेणारे असे काही संदेश वा लेख अचानक समोर येतात. त्यामुळे एक कल्पना कधी कशी सुचुन जाते त्याचा अनुभव मला आज आला. सध्याच्या काळात पैसा हेच सर्वस्व झालेले असताना पैशामागेच धावणारे असे एक विरुद्ध दांपत्य आणि त्यांचा एकंदर जीवन प्रवासाचा मागोवा ह्या ह्रदय शब्दात घेतलेला पाहून मला वाटून गेले की हे असे ह्या 'हृदयीचे त्या ह्रदयी' करणारे आपण इतरांबरोबर शेअर करावे. कारण त्यामधून संदेश दिला आहे की "आयुष्य भरभरून जगा, आनंद घ्या अन् आनंद द्या" मला सोशल मीडियावर फॉरवर्ड केलेला हा लेख दिसला, तो कोणी लिहिलेला आहे त्याची कल्पना नाही. मात्र ज्या कोणी लिहिला असेल त्या अनामिकाला माझा सलाम !, तुम्हालाही मन भरून आल्यासारखे आणि आपण कसे जगले पाहिजे ते दाखवणारे काहीतरी गवसेल: 😃 "आजचा दिवस भरभरून जगा!.....😃 तो हा लेख जरूर वाचा.... 😃 "आज ही जीओ, जी भर भर के !":😃 *Stop keeping your clothes & shoes for special occasion, Wear them whenever you can...* *Now a days being alive is a special occasion..!* आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा... *सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका,आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे.* # खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिटसाठी गेलो होतो, दोघेही ८०च्या आसपास असावेत, राहणीमान, कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे, फी देतानासुद्धा घासाघीस करायचे, औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे, कसली चैन नाही, कोणी नातेवाईकांच येणं जाणं नाही, कधी चांगलंचुंगलं खाणं नाही की कपडालत्ता नाही. # असते एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो. एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमध्ये प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता, रिकामा होत आला होता. बाबा मला म्हणाले 'डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का?' मी लगेच त्यांना तो देऊन टाकला. कशासाठी पाहिजे असं विचारताच, थोडं गडबडून गेले, पण बायको पटकन बोलून गेली, त्यांना १००० च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजेत. मी अचंबित, निघताना पुन्हा म्हणाले, 'अजून एखादा असेल तरी पुढच्या वेळी द्या मला, यात बसणार नाहीत. !' त्यावेळी माझी व्हिजिट फी दहा रुपये होती, ती देण्यास देखील ते नाखूश असायचे. विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला कीक मारून मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला 'सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होता ते आजोबा सकाळीच गेले.' पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला, "ना खुद खाऊंगा ना खाने दुंगा"असं आयुष्य जगत, कसलाही उपभोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते ! *आपण अमर आहोत, किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमानेच ते गेले.* मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं. तिच्याकडे भरपूर किंमती साड्या होत्या, मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या, परंतु ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित, परंतु या साड्यांमुळे बायको नीता व तीचा नेहमी वाद व्हायचा, 'कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत.? कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते वगैरे वगैरे...' यावर "मला कोण बघणार आहे?" हे तिचे नेहमीचे उत्तर. नंतर जेवढ्या चांगल्या साड्या होत्या, त्या गरजूंना देऊन टाकल्या, बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे. आपल्या वॉर्डरोब मध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट शर्ट पडून असतात, एवढ्या भारी साड्या, शर्ट,पॅन्ट रोज वापरायला कशाला म्हणून तशाच पडून असतात. कधीकधी त्या घालायच्या मुहूर्तही उजाडत नाही आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या, तर त्याची फॅशन आउट डेटेड झालेली असते, त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरू असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच अडगळीत लोळत पडतात. आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते, तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह,प्रेम,आपुलकी आपण आपल्या इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही, मग बरेचदा वेळ निघून जाते. कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते. #संचय वस्तूंचा असो,वा मनातील विचारांचा,त्याचा योग्य विनियोग,वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते,उरते ती फक्त अडगळ...# तेव्हा मित्रांनो... # आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो. त्याच्यावरच आपला अधिकार असतो, म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान वस्तू वा विचार आजच वापरून टाका...त्या अडगळीत जाण्या अगोदर... वा आउट डेटेड होण्याअगोदर...!# 😃 "आज ही जीओ, जी भर भर के !":😃 ###################### हे सारे आपल्यासमोर भरभरून मनापासून देणाऱ्या त्या अनामिकाला पुनश्च सलाम ! धन्यवाद सुधाकर नातू

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 👍"मॅजेस्टिक गप्पा-सुखाचा लपंडाव !":👌

👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 👍"मॅजेस्टिक गप्पा-सुखाचा लपंडाव !":👌 💐"पुण्यामध्ये जशी 'वसंत व्याख्यानमाला' किंवा महाविद्यालयी 'रानडे वक्तृत्व स्पर्धा' विलक्षण लोकप्रिय आहेेत, त्याचप्रमाणे पुण्यातच प्रारंभ झालेली आणि आता मुंबईमध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता दरवर्षी सातत्याने साजरी होणारा 'मॅजेस्टिक गप्पा' हा कार्यक्रम तितकाच रसिकमान्य होत आला आहे. विविध क्षेत्रातील नामवंतांनी येथे हजेरी लावत आपापल्या विचारांची अनुभवांची आणि कार्यकर्तृत्वाची ओळख ह्याच 'गप्पां'मधून करून दिली आहे. त्यामुळे मॅजेस्टिक गप्पांचे ते वर्षातून एकदा येणारे आठवडाभराचे दिवस खरोखर सर्वांनाच हवेहवेसे असतात. मी देखील अगदी आत्तापर्यंत न चुकता पार्ल्याच्या 'मॅजेस्टिक गप्पां'मधील मला आवडत्या क्षेत्रातील सेलिब्रिटींचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला आणि मनोरंजक अनुभव ऐकायला आवर्जून जात असे तसेच सोबत असणाऱ्या पुस्तक प्रदर्शनालाही भेट देणे एखाद्या व्रता सारखे करत असे. माहीम ते ट्रेनने पार्ले आणि कार्यक्रम संपल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रेनने परत घरी ! घर ते माहीम स्टेशन व पार्ला स्टेशन ते लोकमान्य सेवा संघ, जिथे मॅजेस्टिक गप्पा भरल्या जातात असा अर्ध्या पाऊण तासाची तंगडतोड देखील सहजतेने निभावत असे. परंतु आता ते शक्य होत नाही. मग अशा वेळेला वृत्तपत्रातून येणारी त्यासंबंधीची माहिती अगदी आवर्जून वाचतो. सोबतचे 'सुखाचा लपंडाव' या विषयावर दोन दिग्गज डॉक्टरांनी-सर्जन डॉ रविन थत्ते आणि डॉ नंदू मुलमुले यांनी सुखाची व्याख्या आणि सुख कसे मिळवता येते आणि प्रत्येकाला सुख मिळवणे, कसे शक्य आहे, यासंबंधीची सर्वंकष ओळख आपल्या बोलण्यातून परिणामकारक रीतीने रसिकांपुढे मांडली. मेडिकल सायन्स व मानसशास्त्रीय दृष्टिकोनाप्रमाणे व्यावहारिक जीवनातील वास्तवते बद्दल सुख म्हणजे काय ते शोधण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. हे सारे वाचत असताना मला जाणवले एक महत्त्वाचे तत्त्व- सध्या 'घेणे' हे 'देण्या'पेक्षा नको इतके वाढले आहे आणि कदाचित हल्लीच्या असमाधान व अस्वस्थता यांचे कारण हे हावरट्सारखे ओरबाडून घेणे आहे. त्या उलट आपल्यापाशी आहे ते भरभरून 'देणे' घेण्यापेक्षा खूप खूप आवश्यक आहे. कारण त्यातून तुम्ही दुसऱ्याला आनंद देत असता आणि अशावेळी होणारा तुम्हाला मिळणारे समाधान, आनंद हा अद्वितीय असतो. ते अनमोल सुख कसे, हे विशद करणार्या कविवर्य श्री दत्ता हंसनीकर यांच्या गाजलेल्या कवितेच्या पंक्तीच माझ्या नुकताच वाचनात आल्या होत्या: 💐💐💐💐💐💐💐💐 II ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत II II ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी दोन ओंजळी पाणी द्यावे आपले श्रीमंत ह्रदय त्यांनी रिते करून, भरून घ्यावे II II आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खालीच यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे II 💐💐💐💐💐💐💐💐 सुखाचा शोध आपण अविरतच घेत राहणार. लक्षात ठेवायला हवे की, जे घडते ते स्वीकाराला हवे त्याच्याशी जुळवायला हवे. कविवर्य बोरकरांच्या शब्दात 'जे घडले तेच पसंत !' थोडक्यात, जे आपल्यापाशी नाही, त्याचे दुःख करण्यापेक्षा जे आपल्या वाट्याला आले आहे, त्यातच सुख मानणे हेच खरे आत्मसमाधान होय ! 'मॅजेस्टिक गप्पां'च्या रूपाने मनामध्ये जे विचारमंथन झाले, ते येथे मोकळेपणाने मांडले आहे !":💐 धन्यवाद सुधाकर नातू

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

" माता पित्यांचे सौख्य आणि पापग्रह योग

"माता पित्यांचे सौख्य व पापग्रह !": जीवनामध्ये माता-पित्यांचे सौख्य लाभणे ही देखील एक भाग्याची गोष्ट असते. सर्वसाधारणपणे चतुर्थ स्थान आणि दशम स्थान यावरून आई आणि वडील यांच्या संबंधित सौख्य आजमावता येते. त्या अनुषंगाने शनि मंगळ काय अनिष्ट प्रभाव पडतात, त्याचप्रमाणे राहू आणि केतूच्या अशा कोणत्या स्थिती असतात की त्यामुळे मातापित्यांच्या सौख्यात बाधा येते अथवा या पापग्रहांचे अनिष्ट योग पत्रिकेत नसले तर अथवा इतर कुठल्या योगामुळे मातापित्यांचे सौख्य एखाद्याला प्रदीर्घ काळ लाभते, हे अभ्यासण्याचा या लेखात आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवाय आयुष्यामध्ये सहसा नवरा आणि बायको अर्थात आई आणि वडील एकाच दिवशी निधन पावण्याचे उदाहरण दुर्मिळच असते. त्यामुळे या दोघांपैकी कोण अधिक जगणार तेही आजमावण्याचा वेगवेगळ्या उदाहरणांवरून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या आठवणीत फक्त एकच उदाहरण असे झालेले होते की, जेव्हा तेथील वृद्ध पुरुष सकाळी निधन पावला आणि ती बातमी ऐकल्यावर त्याची पत्नी ही निधन पावली ! अर्थात त्यांच्या एकुलत्या एका मुलाला एकाच दिवशी आई-वडिलांना गमावले लागले. परंतु अशी उदाहरणे दुर्मिळच आणि अपवादात्मकच असतात. 1 "वडिलांचे अकाली निधन": # पत्रिकेमध्ये वृषभ लग्न असून केतू चतुर्थात आणि राहू दशमात, माता-पित्यांच्या स्थानात आहेत. शिवाय दशमेश शनि अष्टमात असून भाग्य स्थान राहुल शनीच्या पापकर्तरी योगात व केतूच्या शास्तकार असल्यामुळे अगदी बालपणी वडिलांचे अचानक निधन झाले. 2 "आईचे अकाली निधन !": ह्या पत्रिकेेत मिथुन लग्न असून चतुर्थात राहू बरोबर नेपच्यून आणि दशमान केतू बुध आणि गुरु बरोबर लाभस्थानी मंगळशनीची युती व लग्नस्थानावर शनीची दृष्टी आहे. आईचे या मुलाच्या नवव्या वर्षी निधन. 3 "आई दीर्घायुषी !": # या पत्रिकेत सिंह लग्न असून मंगळाचा राजयोग होतो आणि चतुर्थेेश मंगळ लाभात आहे, तर अष्टमातील स्वगृहीचा गुरु चतुर्थस्थानावर दृष्टी ठेवून आहे. 4 "आई वडिल दोघेही दीर्घायुषी !": # या पत्रिकेत कुंभ लग्न असून शुक्राचा राजयोग होतो, शुक्र चतुर्थात स्वगृही बुधाबरोबर तर दशमेश मंगळ चंद्राच्या अन्य अन्य योगात आणि गुरु बरोबर निचभंग योगात आहे. वडील 85 तर आई 89 वर्षापर्यंत जगले. 5 "वडिल दीर्घायुषी !": # या पत्रिकेत मकर लग्न असून शुक्राचा राजयोग होतो आणि भाग्यात उच्चीचा बुध रवी बरोबर आहे, कुटुंब स्थानातील मंगळ मंगल लाभास्थानातील शनि बरोबर अन्योन्य योगात आहेत. वडील 95 वर्ष इतके दीर्घायुषी होते. येथे केवळ प्रातिनिधीक पत्रिका दिल्या आहेत. अशाच प्रकारची अनेक उदाहरणे आपल्याला अभ्यासातून मिळू शकतील. धन्यवाद श्री सुधाकर नातू

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

👍"दिवाळी अंकांची मांदियाळी- जडणघडण दिवाळी अंक 23 !":👌

👍"दिवाळी अंकांची मांदियाळी- जडणघडण दिवाळी अंक 23 !":👌 💐यावर्षी तसे दिवाळी अंक सुमार दर्जाचेच होते आणि त्यामुळे ते वाचताना जेवढे मनोरंजन अथवा आपल्या जाणिवांमध्ये भर पडावी तेवढी काही पडली नाही. अगदी मोजकेच असे दिवाळी अंक दखल घेण्याजोगे मला सापडले. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. अशा वेळी अचानक "जडणघडण हा दिवाळी अंक23" माझ्या हातात आला आणि त्यामधील विविध स्पर्शी आणि आपल्या जाणिवा अधिकाधिक समृद्ध करणारे असे अनेक लेख माझ्या वाचनात आले. त्यापैकी काही माझ्या नोंदी मी ह्या लेखात मांडत आहे. 💐श्री स्वामीनाथन यांच्यावरचा लेख सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर यांनी लिहिलेला आहे. श्री स्वामीनाथन ह्या भारतात हरितक्रांती यशस्वी करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाला नुकतीच 'भारतरत्न' ही सर्वोच्च पदवी मरणोत्तर मिळाली. ही देखील एक आनंदाची गोष्ट आहे. या शास्त्रज्ञाने खरोखर इतर देशांवर अन्नधान्यासाठी अवलंबून असणारा आपला देश, अथक संशोधन करून संपूर्ण स्वयंपूर्ण तर बनवलाच, पण निर्यातक्षमही आपला देश झाला, हे आपण आज अनुभवत आहोत. साहजिकच या माणसाच्या कर्तृत्वाला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. 💐दुसरा लेख श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी लिहिलेला असून तो मराठा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त लिहिलेला आहे आणि त्या कालखंडाचा जो काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी जो काही लढा झाला स्वामी रामानंद तीर्थ आणि अनेक देशभक्तांच्या मुळे आणि अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे त्याचा लेखाजोखा वाचनीय आहे 💐रेल्वे मंत्री असलेले कोकणातले मधु दंडवते यांनी कोकणवासीयांचे रेल्वेचे स्वप्न यशस्वी केले त्यांच्या आठवणी त्यांचे अमेरिकेतले सुपुत्र श्री उदय दंडवते यांनी येथे पुनश्च बांधले आहे. 💐'आचार्य कुला मधील दिवस' हा श्री विनय हर्डीकर यांचा लेख ही एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो जेव्हा गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुला मान दिला जातो गुरुवंद्य असतो त्या काळातील तशा एकंदर संस्कृतीतील प्राध्यापक नागराजन यांच्या व्यक्तिमत्वाच्या जो प्रभाव पडला आणि त्यांच्या एकंदर जीवन चरित्राचा मागवा श्री हर्डीकर यांनी मनापासून घेतला आहे 💐नंतरचा जो लेख आहे तो मृत्युंजय कार श्री शिवाजी राव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी यांचा असून त्यांनी त्यांच्या एकंदर वाचन प्रवासाचा आढावा घेता घेता श्री शिवाजीराव सावंत आपल्या पतीची कार्य लेेखनकर्तृत्वाची मनोरंजक ओळख त्यांनी करून दिली आहे. 💐 त्यानंतरचा माझा जो विशेष आवडलेला लेख म्हणजे एका जेष्ठ नागरिकांनी जो 90 वर्षाचा आहे त्या श्रीधर महाजन यांचा दोन शहरांची ओळख या लेखांमध्ये त्यांनी पुणे आणि कोल्हापूरचा गेल्या जवळजवळ शतकाचा मागोवा घेत अंतर बाह्य ओळख करून दिली आहे. आ मी स्वतःही ह्या दोन्ही शहरात विशेषत: पुण्याला अनेेकदा जाऊन आल्यामुळे मला देखील त्या सगळ्या माहितीचा आढावा, मला आठवणींना ह्रदयंगम उजाळा देणारा वाटला. 💐हेच कोल्हापूर एकेकाळी कोल्हापूर या नावाने कसे प्रसिद्ध होते आणि या 'कलापूरचे मारेकरी कोण ?' हे त्याच शीर्षकाच्या लेखामध्ये श्री उदय कुलकर्णी यांनी गेल्या जवळजवळ शतकातील कलापूरचा सांस्कृतिक योगदानाचा यथातथ्य परामर्श घेतला आहे. 💐दोन विशेेष स्फूर्तीदायी व्यक्तिमत्त्वांसंबंधीचे लेखही वाचकाचे मन वेधून घेतात त्यातील एक म्हणजे परिसस्पर्श हा डॉक्टर अनिल जोशींचे कर्तृत्व मांडणारा श्री प्रसाद घारेंचा लेख आहे. "नाडी तरंगिणी हे पेटंट मिळविलेलृ उपकरण संशोधन करून त्यांनी कसे विकसित केले आणि त्यामुळे आयुर्वेदाला पुनरुज्जीवन मिळू शकेल अशा तऱ्हेचे कर्तृत्व ते कसे करत आहेत ते सांगणारा हा लेख होय. 💐दुसरा लेख म्हणजे ज्यांना नोबल प्राइज मिळू शकेल अशा डॉक्टर आशुतोष कोतवाल यांचे गेल्या चार दशकातले कर्तृत्व उलगडणारा आहे. विश्वाचा मुलाधार- विश्वनिर्मिती कशी झाली याचे संशोधन शास्त्रज्ञ अनेक वर्ष करत आहेत. त्यातील स्वित्झरलँड मधील जिनिव्हा जवळील सर्न लॅबोरेटरी मध्ये 'देवकणा'चा अर्थात सूक्ष्मातीसूक्ष्म 'मूलकणा'चा जो शोध लागला, त्या प्रयोगामध्ये डॉक्टर कोतवाल स्वतः अथक प्रयत्नशील होते. त्यांचा जो गाढा अभ्यास आणि संशोधनाचा ध्यास तो आज ना उद्या त्यांना नोबेल प्राइज देऊनही जाईल असेच वाटणारा आहे. त्यांच्या मुलाखतीचा हा लेख स्मिता देशपांडे आणि डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहिलेला आहे. 💐या अंकातील 'जनरेशन अल्फा' समजून घेताना" हा अस्मिता जोशी-राजे यांचा लेख खरोखर वाचनीय आहे. त्यामधील काही महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण अशा नोंदी मी येथे मांडत आहे. हल्लीच्या जनरेशनला 'जनरेशन अल्फा' म्हटलं जातं. या अगोदरच्या सात पिढ्या म्हणजे 'ग्रेटेस्ट जनरेशन' जन्म 1900 ते 1927 'सायलेंट जनरेशन' 1928 ते 1945 'बेबी बुमर्स' जन्म 1946 ते 1964 'जनरेशन एक्स' जन्म 1965 ते 1980 'जनरेशन वाय किंवा मिलेनियल्स' 1981 ते 1995 'जनरेशन झेड' 1996 ते 2009 आणि आता जन्म 2010 ते 2025 'जनरेशन अल्फा' ही सज्ञा सर्वात अगोदर समाजशास्त्रज्ञ मार्क मॅट क्रिंडल यांनी वापरली. "मानसिक आरोग्याची लक्षणे !": माझे विचार भावना आणि वर्तन याबद्दल मी जागरुक असणं. त्याची जबाबदारी घेण्याइतका मी सक्षम असणं. समोर आलेल्या लहान मोठ्या आव्हानांचा सामना करणं. इतरांबद्दल सहानुभूतीपूर्वक व्यवहार करणे. तसेच स्वतःच्या भावनांचं समायोजन चांगलं करता येणं. ही आहेत मानसिक आरोग्याची लक्षणे ! 💐याच अंकातील डॉक्टर भूषण केळकर आणि मधुरा केळकर यांचा 'झेन अल्फा आणि तंत्रज्ञानाची आव्हाने' हा लेख ही वाचनीय आहे. त्यातील नोंद घेण्याजोगी जी मला गोष्ट आढळली ती म्हणजे अशी: 'विनोबा भावे यांना जेव्हा विचारलं गेलं की, गांधीवादी असल्यामुळे तुमचा तंत्रज्ञानाला विरोध आहे कां? तेव्हा विनोबांनी जे उत्तर दिले ते खरोखर लक्षणीय होते त्यांनी सांगितले "तंत्रज्ञानाचे तीन प्रकार आहेत- एक 'समय साधक' उदाहरणार्थ विमान गाडी वगैरे दोन 'उत्पादक' म्हणजे यंत्रे इत्यादी तीन 'संहारक'. त्यांनी पुढे म्हटलं 'संहारक' यंत्रे तर नकोतच परंतु उत्पादक' मधील सुद्धा श्रमिकांची जागा बळकवणारी यंत्रेही नकोत !". पण प्रत्यक्षात आपण पाहतो अनेक संहारक तंत्रज्ञानाच्या भयावह अशी युद्धजन्य परिस्थिती ! तसेच उत्पादक यंत्रे देखील श्रमिकांच्या नोकऱ्या घालवू पाहत आहेत, हे दुर्दैव होय. 💐नव्या युगाचा, नवे तंत्रज्ञान आणि इतर घडामोडी व व्यक्तिमत्त्वे यांचा परामर्श घेणारा दिवाळी अंक त्याच्या नांवाप्रमाणेच एकंदर जगाची 'जडणघडण' कशी होत चालली आहे, याचे पारदर्शक चित्र आपल्यासमोर उभा करणारा आहे. म्हणूनच मला तरी आतापर्यंत वाचलेल्या अनेेक दिवाळी अंकांमध्ये हा आगळावेगळा व आदर्श दिवाळी अंक वाटला !":💐 धन्यवाद सुधाकर नातू

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

"नशीबवान माणसे व शुभग्रहयोग !":

"नशीबवान माणसे व शुभग्रहयोग !": माणसाचे मन हे त्याच्या जीवनाचे सारथी असते. कारण त्याच्या प्रभावावर विचार कृती आणि अपेक्षा यांच्या घोडदौडी मधून तो आपल्या जीवनामधील आनंद सुख आणि समाधानाचा शोध घेेत आयुष्याची मार्गक्रमणा करत असतो. चंद्राचा आणि त्याच्या भ्रमणाचा माणसाच्या मनावर किती प्रभाव असतो, हे आपल्याला माहित आहे. साहजिकच भारतीय ज्योतिष, चंद्राच्या विविध अवस्थांवर अभ्यासपूर्ण असे आडाखे मांडण्याचा प्रयत्न करत असते. ह्या पार्श्वभूमीवर नशीबवान माणसांच्या जन्मपत्रिकेमधील जन्मलग्न, लग्न स्वामी त्याचप्रमाणे जन्म चंद्रराशी आणि चंद्रराशी स्वामी यांचे महत्त्व अनन्य असेच आहे. ज्या पत्रिकांमध्ये लग्नस्वामी स्वगृही अथवा उच्चीचा, तसेच चंंद्रराशीस्वामी अथवा उच्चीचा असेल, तर अशा माणसांचे आयुष्य सर्वसाधारणपणे विशेष अडचणी न येता, विविध जीवनावस्थांमध्ये अपेक्षापूर्ती करत सर्वसाधारण समाधानाने जाते, असे आमचे निरीक्षण आहे याच मुद्द्याचा उहापोह विविध उदाहरणांवरून या लेखांमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी काही पत्रिका आणि त्याचे विश्लेषण येथे मांडत आहोत. 1 "यशस्वी समाधानकारक आयुष्य !": या पत्रिकेतील पुरुषाचे सर्वसाधारण आयुष्य मनाजोगत्या गोष्टी घडत, व्यावसायिक सांसारीक उत्तम फळे मिळत चांगले सहस्त्रचंद्रदर्शन बघेपर्यंत गेले आणि मृत्यूही विशेष कुठलाही त्रास न होता झोपेतच झाला. या माणसाच्या पत्रिकेमध्ये कन्या लग्न असून तेथेच उच्चीचा बुध आहे आणि लाभांमध्ये कर्क रास असून, राशी स्वामी चंद्र देखील स्वगृही आहे अशा या सुयोगांमुळे त्याचे आयुष्य योग्य तऱ्हेने गेले. मनाजोगती पत्नी मिळून, कर्तबगार मुला नातवंडांचा 57 वर्षांंचा बहरलेला संसार पाहायला मिळाला. 2 "हुशार तडफदार डॉक्टर !": हा पन्नाशीतला डॉक्टर असून त्याची पत्नीही डॉक्टर आहे. त्याची आई उच्च अधिकारी होती व वडीलही स्वतंत्र व्यावसायिक असे लाभले. दीर्घायुष्यीआई-वडिलांबरोबर त्याचे व्यावसायिक जीवनही यशस्वीपणे पार पाडले जात आहे. मुलेही योग्य शिक्षणात पारंगत आहेत आणि आतापर्यंतचे त्याचे सर्व आयुष्य सुखा समाधानात आणि अपेक्षापूर्तीमध्ये गेलेले आहे. या पत्रिकेमध्ये वृषभ लग्न असून स्वगृहीचा शुक्र आहे तर चतुर्थातील सिंह राशीचा स्वामी रवी उच्चीचा पत्रिकेमध्ये आहे. त्यामुळे त्याचे जीवन हात लावीन तिथे सोने अशा पद्धतीने जात राहिले आहे. 3 "होतकरू गुणवान तरुण !": तिशी मधल्या या स्मार्ट तरुणाचे आई-वडील परदेशात स्थायिक झाल्या नंतर त्याचा जन्म झाला आणि उत्तरोत्तर त्यांची भरभराट होत गेली. दोघेही आपापल्या क्षेत्रात उच्च अधिकारावर तर याचेही पदवीपर्यंत शिक्षण, त्याचप्रमाणे कलाक्षेत्रात यशस्वी पदार्पण करत चांगल्या नोकरीमध्ये हा तरुण प्रगती करत आहे. आतापर्यंत त्याचे आयुष्य सरळ मार्गी आणि सुखवस्तू अवस्थेमध्ये गेले आहे. यापुढेही ते तसेच जाईन असे म्हणता येईल अशी याची पत्रिका आहे. या पत्रिकेत देखील वृषभ लग्न असून तेथेच शुक्र आहे, तर पराक्रमातला चंद्र स्वगृही आहे. जोडीला उच्चीचा रवी मेष राशीत आणि स्वगृहीचा गुरु तूळ राशीत आणि राजयोगकारक शनी हा दशमात कुंभेत स्वगृही अशी याची सर्वांग प्रबळ पत्रिका आहे. उत्तरोत्तर त्याची अशीच प्रगती व भरभराट होत जाईल असे आपण या सगळ्या शुभ्र योगामुळे म्हणू शकतो. 4 "दीर्घायुषी उच्चशिक्षित नटश्रेष्ठ !": मराठी रंगभूमीवर आपल्या नैसर्गिक अभिनयाने पन्नासाहून अधिक वर्षे गाजवणाऱ्या ह्या नट श्रेष्ठाचे हे उदाहरण आहे. या कलावंंताने आपले सारे आयुष्य रंगभूमीची सेवा करण्यात यशस्वीपणे घालवले आणि अनेक भूूषणावह कर्त्रुत्वांचे 'मैलाचे दगड'त्याने पार केले. कृतार्थ आणि समर्थ जीवन लाभलेल्या या देखण्या माणसाची पत्रिका देखील आपल्या निरीक्षणाला पोषक अशीच आहे. धनु लग्न असून स्वगृहीचा मीनेचा गुरु, तर अष्टमातील कर्केचा स्वगृहीचा चंद्र असल्याने स्वतःच्या विचारांशी ठाम आणि योग्य ते निर्णय योग्य वेळी घेण्याची कुवत असलेले त्याचे यशस्वी जीवन आहे. 5 "हौशी चतुरास्त्र गुणांची दीर्घायुषी स्त्री !": अखेरचे उदाहरण देखील अभ्यास करण्याजोगे आहे. वरवर पाहिले तर राशी स्वामी चंद्र जरी स्वगृही पराक्रमात कर्केचा असला तरी, व्रुुषभलग्न स्वामी कोणत्या ताकदीचा आहे हे ताबडतोब कळतच नाही. परंतु सखोल अभ्यास केला तर ध्यानात येते की, लग्नेश शुक्र मेष राशीचा, तर मेष राशीचा स्वामी मंगळ मिथुनेत, तर मिथून राशीचा स्वामी बुध लग्नात. अशा तऱ्हेने स्थान बदलांचा मंगळ, शुक्र आणि बुध यांचा साखळी योग झाल्यामुळे ते जणू स्वगृही असल्यासारखी फळे देतात. या स्त्रीचे आयुष्य देखील सरळ मार्गी आणि योग्य वेळी विवाह होऊन अनुरूप 36 गुण जमणाऱ्या कर्तबगार पुरुषाबरोबर जवळजवळ हीरक महोत्सवी सहजीवनाचा लाभ झालेले होते. शिवाय मुले नातवंडे यांचा कर्तबगार परिवार तिला लाभला. वृद्धापकाळी पती निधनानंतर फक्त काही वर्षेच तिला काढावी लागली, हेच काय ते तिच्या आयुष्याला लागलेले गालबोट. थोडक्यात लग्नस्थान म्हणजे पत्रिकेमधील सर्वात महत्त्वाचे आणि त्याचा राशी स्वामी स्वगृही असणे म्हणजे सुयोगच कारण त्यावरूनच त्या माणसाचे व्यक्तिमत्व शरीरावर योग्य आपल्याला उमजू शकते तीच गोष्ट चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीची आणि त्याच्या स्वामीवरून त्याच्या मनाची स्थिती आणि एकंदर आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला कळू शकते. साहजिकच लग्नस्वामी आणि राशी स्वामी स्वगृही अथवा उच्चीचे असले तर 'सोने पे सुहागा' आणि अशा माणसांचे जीवन समाधानी आणि कृतार्थ होणार असेच आपण म्हणायचे. धन्यवाद सुधाकर नातू

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

"बोल अमोल-3 !":

👍"बोल, अमोल-26 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"काय बरोबर, काय चूक यावर वितंडवाद करण्यापेक्षा, वर्तमानात जे घडतंय त्याच्या परिणामांची प्रतीक्षा करणे, हेच आपल्या हातात असते आणि तेच शहाणपण होय !":👍 👍"बोल, अमोल-27 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"संकट समयी देवाचा धावा करण्यापेक्षा, आपल्या कुवतीवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून संकटांचा सामना प्रयत्नपूर्वक करत राहणे, हे शहाणपण होय !":👌 👍"बोल, अमोल-28 !":👌 💐"शहाणपण देगा देवा !":💐 👍'सेन्सेक्स 1600 चे वर अंकांनी उसळला असे मी वाचले आणि हवेत तरंगायला लागलो. पण मित्राने माझे विमान खाली आणले, तो म्हणाला उसळला नाही तर कोसळला ! हा दृष्टी भ्रमाचा खेेळ की, जे आपण चिंतीतो तसेच आपल्याला दिसायला लागते आणि म्हणूनच तर जग फसते !":👌 👍"बोल, अमोल-29 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"भक्ती तुम्हाला शांती देईल, पण रोजी-रोटी नाही. त्याकरता कष्ट, प्रयत्न, बुद्धी आणि युक्ती यांचा कर्मयोग साधायला हवा. भक्तीयोगा बरोबरच कर्मयोगही, साथीला हवाच हवा !":👌 👍"बोल, अमोल-30 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"ह्या विश्वात 'काहीच स्थिर नसते, सारेच असते गतिमान !' आपणही आभासी स्वप्नांच्या मायाजालात न फसता राखूया, या शब्दांचा मान !":👌 👍"बोल, अमोल-31 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"प्रवाहाबरोबर मागचा पुढचा विचार न करता, प्रवाहपतीतासारखे वाहत जाणे टाळून, सारासार विचार करत प्रवाहा विरुद्ध पोहणे ही नुसती वीरताच नव्हे, तर नवीन दिशा दाखवणारे शहाणपण असते !":👍 👍"बोल, अमोल-32 !":👌 💐"शहाणपण':💐 👍" संज्या छाया' नाटक पाहिल्यानंतर, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने स्वतःला हा प्रश्न नेहमी केला पाहिजे: ' खरंच मी सध्या काय करतो?:👌 👍"बोल, अमोल-33 !":👌 💐"शहाणपण':💐 👍" 'अरे'ला 'कांरे' म्हणणे हा पुरुषार्थ समजणे हा भ्रम आहे, तर 'अरे'ला 'वा'रे म्हणणे यात हितकारक मतितार्थ आहे !":👌 👍"बोल, अमोल-34 !":👌 👍"विचार तर सारे जण करतात, आगळे वेगळे अनुभव सुद्धा अनेकांना येतात, शब्दांची मुळाक्षरे तर सर्वांना सारखीच असतात, 'जे मनी वसे, ते इतरांसाठी द्यावे' अशी इच्छाही पुष्कळांना होऊ शकते, पण तरीही इतके सारे होऊनही, सारेच साक्षर लेखक नसतात; असं काय बरं त्यांच्यापाशी असतं, जे इतरांपाशी नसतं?":👌 👍"बोल, अमोल-35 !":👌 👍"लेेखकाचं लेखन, हे त्याच्या अनुभवांच्या जाणिवांचं 'ह्या हृदयीचे त्या ह्रदयी'चं प्रकटीकरण असतं आणि लिहीलेलं वाचलं जाणं, हा त्याचा सन्मान!!":👌 👍"बोल, अमोल-36 !":👌 👍"शब्द कमी, परंतु अर्थपूर्ण विचार असणारे, बोलणे किंवा लिहिणे कधी व कसे जमायचे?":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-37 !":👌 💐"सारीपाट":💐 👍"उगा उगा, असे नको रुसू, फुका फुका, नको आणू आसू, फटा फटा आणि गाली हासू, संसाराच्या सारीपाटा, नको ग नासू !":👌 👍"बोल, अमोल-38 !":👌 💐"पत्ते, काम फत्ते? ना ना ना !":💐 👍" पत्त्यांच्या डावात जशी अनिश्चितता असते, तसंच जीवनाचं आहे. प्रत्येक डाव पत्त्यांमध्ये जसा चांगला येईलच असं नाही. त्याचप्रमाणे जीवनामध्ये देखील चांगल्या वाईट परिस्थितीत बाल्यावस्था, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धापकाळ काढावा लागू शकतो. जे ताट आपल्या वाट्याला आले, ते गोड मानणेच केवळ आपल्या हातात असते !":👌

"बोल अमोल-2 !"

💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-15 !":👌 💐"पत्र ही माणसाची या 'हृदयीचे त्या हृदयी' करणारी जिव्हाळ्याची सांस्कृतिक परंपरा होती, जी दुर्देवाने. आता लयाला गेली आहे. अशा वेळी सोशल मिडियावरील संदेशाकडे 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-16 !":👌 💐"वैयक्तिक संविधान अर्थात् आचासंंहिता म्हणजे आपण इतरांशी कसं वागावं, ह्याची वैयक्तिक नियमावली, ही आपली अनिवार्य जबाबदारी. 'आपल्यामुळे इतरांना कुठलाही त्रास न होणे, असे सतत वागणे' हा त्यामधील पहिला नियम होय !":💐 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-17 !":👌 💐"हवा हवासा मजकूर, हा एखादा टीपकागद, जशी शाई मुरवून ठेवतो, तसा वाचकाला गुंंतवून ठेवणारा असावा. सोशल मिडीयावर कार्यरत असताना, हा मंत्र नेहमी ध्यानांत ठेवण्याजोगा आहे. त्यामुळे सार्वजनिक वेळेचा, श्रमांचा आणि इंटरनेट डेट्याचा अपव्यय टळू शकेल !":💐 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-18 !":👌 💐"भूतकाळातील मतमतांंरांपेक्षा, वर्तमानात पिछेहाट कां होते आहे, आणि पुनश्च आपले भूषणावह स्थान कसे प्राप्त होईल, ते पहाणे अत्यावश्यक !":💐 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-21,!":👌 💐"संक्रांती" सारख्या गोड गोड बोलण्याच्या सणाला "संक्रांत" म्हणणे हे नवलच, कारण "संक्रांत" म्हणजे नको ती पीडा !": 💐 👍"बोल, अबोल !":👌 💐" संकल्प आणि सिद्धी यात फक्त एक दिवसाचं अंतर ? मकर संक्रांतीच्या दिवशी, 'आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियावर रजा घ्यायची', हा माझा संकल्प आज सिद्ध की हो झाला !":👍 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-23 !":👌 💐"सारीपाट":💐 👍"माणसाच्या जाणीवांचे विश्व विस्तारत सम्रुद्ध होत असते, ते प्रामुख्याने तीन गोष्टींमुळे: एक वाचलेली पुस्तके, दोन आयुष्यात येणारी माणसे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अवघडलेपणाचे प्रसंग! शेवटी जीवन म्हणजे आंबट गोड अनुभवांचा सारीपाटच तर असते!!:👍 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-24 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"जे नापसंत, ते करावे बेदखल.":👌 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-25 !":👌 💐"शहाणपण':💐 👍""टीका करण्यापूर्वी, दुसर्याच्या नजरेतून बघावे, तसेच संभाव्य परिणाम प्रथम आजमाववावे !":👌 👍"बोल, अमोल-26 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"काय बरोबर, काय चूक यावर वितंडवाद करण्यापेक्षा, वर्तमानात जे घडतंय त्याच्या परिणामांची प्रतीक्षा करणे, हेच आपल्या हातात असते आणि तेच शहाणपण होय !":👍 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-27 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"संकट समयी देवाचा धावा करण्यापेक्षा, आपल्या कुवतीवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून संकटांचा सामना प्रयत्नपूर्वक करत राहणे, हे शहाणपण होय !":👌 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-28 !":👌 💐"शहाणपण देगा देवा !":💐 👍'सेन्सेक्स 1600 चे वर अंकांनी उसळला असे मी वाचले आणि हवेत तरंगायला लागलो. पण मित्राने माझे विमान खाली आणले, तो म्हणाला उसळला नाही तर कोसळला ! हा दृष्टी भ्रमाचा खेेळ की, जे आपण चिंतीतो तसेच आपल्याला दिसायला लागते आणि म्हणूनच तर जग फसते !":👌 💐II शुभ प्रभात 👍"बोल, अमोल-29 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"भक्ती तुम्हाला शांती देईल, पण रोजी-रोटी नाही. त्याकरता कष्ट, प्रयत्न, बुद्धी आणि युक्ती यांचा कर्मयोग साधायला हवा. भक्तीयोगा बरोबरच कर्मयोगही, साथीला हवाच हवा !":👌 💐II शुभ प्रभात II💐 👍"बोल, अमोल-30 !":👌 💐"शहाणपण':💐 👍"ह्या विश्वात 'काहीच स्थिर नसते, सारेच असते गतिमान !' आपणही आभासी स्वप्नांच्या मायाजालात न फसता राखूया, या शब्दांचा मान !":👌