सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-९ !":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-९ !":👌


"जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

आता कालानुसार त्या त्या दिवसाची नोंद एकदा आणि नंतर फेब्रुवारी पासूनच्या दिवसांची नोंद, असा क्रम या लेखमालिकेमध्ये राहणार आहे. तेव्हा ही माहिती आपणास मनोरंजक व माहितीपूर्ण वाटेल अशी आशा आहे.

@ ८ फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
#1897 माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जन्म
# 1907 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालक गुळवलकर गुरुजींचा जन्म
# 1871 डॉक्टर के एम मुंशींचा जन्म
# 1981 कपिल देव ने 431 कसोटी क्रिकेटमध्ये बळी घेण्याचा विश्वविक्रम केला
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# डीएनए म्हणजे डीऑक्सिरीबोन्यूलिक अँसिड
# ऑस्ट्रियाची भाषा जर्मन
# सर्वात प्रथम टीव्ही टेलिकास्ट केलेली बर्लिन मॅरेथॉन 8 फेब्रुवारी 1936
##########################

@ 9 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1874 स्वातंत्र्यवीर कवी गोविंद यांचा जन्म
# 1897 मुंबई गिरणी संघाचे संस्थापक नारायण
# 1951 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना
# 1979 अभिनेते दिग्दर्शक राजा परांजपे यांचे निधन
# 2009 तबलावादक झाकीर हुसेन यांना ग्रँमी पुरस्कार
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# नियमित आहार एकपट खाणे, दुप्पट पाणी पिणे, तिप्पट चालणे, चौपट हसून आनंदी राहणे, शक्यतो शाकाहारी असणे, निर्व्यसनी राहणे, दुसऱ्यांचे भले करता आले नाही तरी, दुसऱ्यांचे निदान वाईट न चिंतणे, यामुळे माणसाला चांगले आरोग्य व शांती लाभते.
##########################

@ "10 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1809 मुंबईचे आधुनिक शिल्पकार नाना शंकर शेठ यांचा जन्म
# 1910 लेखिका दुर्गा भागवत यांचा जन्म
# 1923 किरण संशोधक विल्यम रॉंटजेन यांचा मृत्यू
# 1926 बी ई एस टी च्या बसेस मुंबईत सुरू
# 1949 पुणे विद्यापीठाची स्थापना
# 1982 लेखक नरहर कुरुंदकर यांचा मृत्यू
# 2009 विख्यात गायक भीमसेन जोशींना भारतरत्न पुरस्कार जाहीर
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद
# पोलिओची लस विकसित करणारा संशोधक जोनास साल्के

# कार्बन-डाय-ऑक्साइड ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन दर माणशी ( दशलक्ष टन):
चीन 4.58 अमेरिका 19.78 रशिया
भारत 1.16 जपान 9.78 जर्मनी 10.40
कॅनडा 18.81 दक्षिण कोरिया 10.53 इंग्लंड 9.66

# वर्ष 1800 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी
1930 मध्ये 200 कोटी
1960 मध्ये 300 कोटी
1999 मध्ये 400 कोटी
आता 2010 मध्ये 600 कोटी
##########################

@11 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌

# 1800 छायाचित्र निगेटिव्ह चा प्रथम वापर करणारे हेन्री तालबोट यांचा जन्म
# 1847 संशोधकांचा मुकुटमणी थॉमस एडिसन चा जन्म
# 1942 उद्योगपती जमनालाल बजाज यांचे निधन
# 1850 मराठी शुद्धलेखन चळवळीचे पुरस्कर्ते शंकर हातवळणे यांचा जन्म
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# भारतातील पहिला बोलपट अलामारा 1931 मध्ये प्रसिद्ध प्रकाशित
# श्रीलंकेचा राष्ट्रीय प्राणी: सिंह
# मोबाईलचा उपयोग नुसता टेलिफोन करणे, एस एम एस पाठविणे एवढाच नाही, तर इंटरनेट सेवा कॅमेरा म्हणून फोटो काढून पाठविणे, रोज संस्मरणीय नोंदीचे फोटो एसएमएस द्वारे पाठविणे, दररोजच्या घडामोडी तासा तासाच्या त्या तारखेला ठेवणे, आरोग्य विषयक बीपी शुगर पी आर नोंदी तारीखवार ठेवणे इत्यादी इत्यादी
थोडक्यात ही चिमुकली डबी म्हणजे अनेक सुविधांचा, सेवांचा खजिनाच आहे !
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा