👍"नियतीचा संकेत":👌:
👍"पुढचे पाऊल":👌
अर्थात संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य":
१नोव्हें’२२ ते ३१ डिसें''२३💐
👍प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य
ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र
ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली
जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही
राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली
क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे
सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के
पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार
निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने
आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत
मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
👍अनुकूल गुण पद्धती:
कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.
माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची
सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक
स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने
दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या
आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय.
👍नशिबाच्या परिक्षा:
पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.
३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर ३० दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी २०२३चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण
दाखवले आहेत. त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती
तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे.
👍अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण
देतो. ते नियम असे आहेत:
रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ
👍"नशिबाची गटवारी":👌
आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे
१.उत्तम पहिला गट: धनु, कन्या व मीन राशी
२.उजवा दुसरा गट: कर्क, सिंह व मेष राशी
३.मध्यम तिसरा गट: व्रुश्चिक व मिथुन राशी.
४.डावा चौथा गट: व्रुषभ व तुळ रास
५.त्रासदायक पाचवा गट: कुंभ आणि मकर रास.
👍"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":👌
सोबत राशीने हाय या संपूर्ण कालखंडातील माहवार अनुकूल गुणांचे कोष्टक दिले आहे प्रत्येक महिन्यामध्ये राशीचा नशीबाचा क्रमांक ही खाली दिलेला आहे वर्ष कालखंडाच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल गुण तसेच क्रमांक नशिबाच्या बाबतीत कुठला ते देखील दिले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच समजू शकेल की आपले नशीब इतरांच्या तुलनेत कसे आहे. या पद्धतीमुळे आपण आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांची सांगड घालून योग्य ते कृती करून आपल्या समाधानाचा मार्ग शोधू शकता तुमचे नशीब तुमच्या हातात असाच जणू काही हा एकंदर मार्ग.
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
मेष: मागच्या वर्षी सातवा नंबर होता आता सहावा आहे म्हणजे प्रगती आहे.
वृषभ: बरोबर उलटं झालंय मागच्या वर्षी आठवा क्रमांक होता बारा राशींमध्ये तो आता नववा झालाय.
मिथुन: राशीची प्रगती आहे कारण गेल्यावर्षी बारा राशींमध्ये त्याचा तळाला 11 वा क्रमांक होता तो आता उडी मारून आठ झाला आहे.
तर कर्क रास नवव्या क्रमांकावरून प्रगती करत चौथ्या क्रमांकावर पोचली आहे.
सिंह: रास दिमाखाने दुसऱ्या क्रमांकावर होती तिची घसरगुंडी होऊन ती पाचव्या नंबरवर स्थिरावणार आहे, म्हणजे दिवस मागच्यापेक्षा आता जरा तेवढे चांगले नाहीत.
कन्या: राशीचे बरोबर उलट झालं आहे कारण तिने मागच्या वर्षी पाच क्रमांक वरून दुसऱ्या क्रमांकावर ह्या वेळेला उडी मारणार आहे म्हणजे त्यांची चांगली प्रगती आहे.
तुळ: जैसे थे तळाला दहाव्या क्रमांकावर कठीण दिवस तसेच पहात राहणार आहे.
वृश्चिक रास मागच्या वर्षी दिमाखात पहिल्या क्रमांकावर होती ती आता घसरून सातव्या क्रमांकावर कटकटी पाहणार आहे.
धनु: त्याउलट अगदी बरोबर मागच्या वर्षी मध्यममार्गी ६ व्या क्रमांकावरून चक्क पहिला क्रमांक मिळवणार आहे.
मकर : रास बिचारी बाराव्या तळाच्या क्रमांकावर यावर्षीही किया मारुन कठीण दिवसांना तोंड देणार आहे.
कुंभ: राशीची जबरदस्त घसरगुंडी होऊन ती तिसर्या नंबरवरून चक्क अकराव्या क्रमांकावर तळाला जाणार आहे.
मीन: रास आहे त्या परिस्थितीत किंचित सुधारणा करत चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी मारणार आहे.
अशा तऱ्हेने राशींचे नशिबाचे आगामी वर्षांतील चढउतार तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.
👍"शनीची साडेसाती":
साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां
तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा
साडेसाती सुरू होते व तुमच्या राशीच्या पुढील
राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती
असते.
उदा:
सध्या मकर राशींत शनी वक्रीआहे, म्हणून आता
धनु, मकर कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत
१७ जानेवाली'२३ रोजी जेव्हा करेल, तेव्हा धनु राशीची साडेसाती
संपेल, मात्र तेव्हा पुन्हा मीन राशीला साडेसाती सुरु होईल.
✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी सुरु
झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
११. कुंभ:
शनीची साडेसाती २४ जानेवारी'२०२० पासून सुरु झाली, ती २३ फेब्रुवारी'२०२८ पर्यंत असेल.
१२ मीन: शनीची साडेसाती २९ एप्रिल'२२ ते १२ जुलै'२२ व नंतर पुन्हा १७ जाने'२३ ते पर्यंत ती राहील.
👍वयोमानानुसार आता मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे, ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.
👍सर्व वाचकांना आगामी दिवाळी तसेच कालखंड सुख शांती व समाधानाचा जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद
सुधाकर नातू
।। शुभम् भवतु ।।
👍राशीनिहाय अनुकुलगुण कोष्टक:'२२/२३ 👌
ज्या इच्छुक वाचकांना हे गोष्ट हवे असेल, त्यांनी
आपले नाव देऊन 9820632655 येथे व्हाट्सअप संदेश करावा.