☺️"दैनंदिनीतील पाऊलखुणा ४!":😊
@ 20 जानेवारी:
----------
💐दिनविशेष
--------
१८६१ पहिल्या स्त्री कादंबरीकार काशीबाई कानिटकर यांचा जन्म
1898 संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा जन्म
1988 फाळणीचे विरोधक खान अब्दुल गफारखान यांचे निधन
👍विशेष नोंद:
---------
👍लोकसत्ता दिवाळी अंकातील "महाराष्ट्र टाइम्स 50 वर्षे" हा विविध राजकीय व्यक्तिमत्वांच्या जडणघडणीवरील लेखमाला वाचली.
शरद पवार, विखे पाटील, मोहिते पाटील आणि जॉर्ज फर्नांडिस इत्यादींची त्यात माहिती परिणामकारक होती.
👍'ओम भीम नमः'सायंकाळी दिवे लागणीनंतर म्हणण्याचा लक्ष्मीचा मंत्र.
👍नुसती वाचाळता व्यर्थ आहे, प्रत्यक्ष अशी ठोस कृती हवी.
👍वसंतदादा पाटील, तात्यासाहेब कोरे आदि दिग्गजांचे सहकार विकास क्षेत्रातले कॉन्ट्रीब्युशन थक्क करणारे. नंतर अनेक नेते स्वतःचा कुटुंबाचाही भरघोस विकासाचे राजकारण सहकार चळवळीतून करून कसे घेत आले आहेत, तेही या लेखमालेतून उमजले. दुर्दैवाने स्वार्थाचे अर्थकारण हीच या पन्नास वर्षांची उपलब्धी !
👍आम्ही ५ हा मंगेश तेंडुलकरांचा आपल्या तीन बंधू व भगिनींवरील आत्मचिंतनात्मक लेखही, प्रत्येक व्यक्तीचे गुणदोषांसकट ताशीव चित्र उभे करून गेला.
👍'व्हॉट गोज अप, गोज डाउन !' हे तत्त्वच साऱ्या व्यक्तींच्या जीवन कहाणीतून दिसते.
वाचनात अद्भुत आनंद लाभतो, नवीन माहिती मिळते, नवीन जाणिवा जागृत होतात आणि विचारांच्या कक्षा अशा वाचनाने रूंदावतात.
##########################
@ 21 जानेवारी:
-----------
💐दिनविशेष:
---------
1894 कवी माधव जुलियन यांचा जन्म
1924 कॉम्रेड लेण्यांचा मृत्यू
1924 कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा जन्म
1957 अभिनेत्री रिमा लागू चा जन्म
2003 राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्याला शिक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय
👍विशेष नोंद:
---------
👍ठरवून, सांगूनही कुणी कधी आपल्याला दिलेल्या वेळेवर भेटावयास येत नाही. त्यामुळे मनस्ताप वाढतो, कधी कधी एखादे काम वेळेवर होत नाही. काही अडचणी येतात, अडथळे येतात, समोरची व्यक्ती चेंगटपणा करते, त्यामुळे आपल्या मनाचा मनस्ताप वाढतो.
👍प्रवासात कधी कधी सतत वटवट करून वादळ वा गाणी लावून, माणसे डोक्याला ताण देतात. आपल्या मनातला राग आपल्याला मनातच गिळावा लागतो.
👍गोष्टी पुष्कळदा आपल्या हातात नसतात. त्या जशा जेव्हा घडावयाच्या, तेव्हाच घडत असतात हे चिरंतन सत्य ध्यानात घेऊन, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात असते.
👍म्युच्युअल फंडामध्ये नको त्या समयी गुंतवणूक केल्यामुळे नुकसान होते. गुंतवणीच्या वेळी एजंट पुरेशी माहिती व गायडन्स देतातच असे नाही. आपण आंधळेपणाने पैसे गुंतवतो आणि बऱ्याच वेळेला पदरी निराशा, नुकसान येते. म्हणून कोणताही निर्णय सारासार साधक बाधक विचार करून, मगच घ्यावा हेच कटू सत्य अशा अनुभवातून स्वीकारावे. दुसरे काय?
##########################
@22 जानेवारी
💐दिनविशेष
1666 शहाजहानचे निधन
1682 श्री रामदास स्वामींचे निधन
1885 फरगुशन कॉलेजचा प्रारंभ
1909 संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव उ थांत यांचा मृत्यू 1972 स्वामी रामानंद तीर्थ यांचा मृत्यू
👍विशेष नोंदी
👍रक्ताची माहिती:
1896 रॉकी याने रक्तदाबाचे मोजण्याचे यंत्र काढले बनवले
1901 ए बी ओ या रक्तगटांचा शोध लागला डॉक्टर काल लँड्स नायडर यांनी हा शोध लावला
1902 मध्ये एबी रक्तगटाचा शोध लागला
1939 रक्तगटाचा शोध लागला
1941 ब्लड बँक सुरू झाली
*डॉक्टर आनंद नाडकर्णींचा लेख वाचनात आला. अमेरिकी रेड क्रॉसने रक्तगटाची बँक सुरू केली.
👍'यूएसए अनकंडिशनल सेल्फ एक्सेप्टन्स': आपण जसे आहोत तसे गुणदोषांसकट स्वतःला स्वीकारणे म्हणजेच आत्मभान येणे होय.
##########################
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा