बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

। 👍"शारदोत्सव- मौलिक अमृतमंथन !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

।।आनंद घ्या, आनंद द्या।।

👍"शारदोत्सव- मौलिक अमृतमंथन !":👌

#👍"संसाराचा सारीपाट !":👌

माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृति किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना, मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच कां वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून, मगच आपण वागले तर संसारात गोडी येते. 

आपला संसार सुखाचा करणे आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फले देतो. 

आपले समाधान-असमाधान, हे आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकतो की, परिस्थिती आपल्यावर, ह्यांच्याशी निगडीत असते. 

ऊन-पावसाचा सारा खेळ!

###########################

#👍"तुणतुणे !":👌

"कार्यक्षमता मर्यादित असणारे, 

नेहमी 

'रडीचा डाव खडी' खेळत आपल्या चुकांचे, अपयशाचे खापर दुसर्यांवर फ़ोडण्याचे तुणतुणेच वाजवत रहातात !###########################

#👍"नव्याची नऊ दिवस नवलाई!":👌💐

कोणतीही गोष्ट नवीन असते तेव्हा कुतुहूलापोटी आपल्याला ती आवडू लागते. परंतु रोज तेच तेच झाले की, त्याचा आपल्याला कंटाळा येतो. अर्थात् हा म्हणजे 'लॉ ऑफ डिमिनेशनिशिंग रिटर्न' होय. 

निसर्ग वा नियती आणि मानवाचे आयुष्य यांचाही असाच परस्पर संबंध असावा की काय ! माणसाचा जन्म झाला की, किती कौतुक, आवडीने लाड होतात. परंतु 'लॉ ऑफ डेमिनेशनिशिंग रिटर्न' प्रमाणे निसर्ग वा नियतीला देखील, त्याच त्या गोष्टीचा कंटाळा येत असावा, म्हणून तर माणसाचा त्याग होतो की काय ? ही निसर्गाची किमया वा इच्छा म्हणायचं दुसरं काय ?

किंवा 

मानवजन्म म्हणजे जणु...                                       "नव्याची नऊ दिवस नवलाई !"

###########################

👍"सोशल मीडिया हे एक वरदान !":👌

असे मी जे नेहमी म्हणतो, त्याला आज अजून एक कारण घडले. मोबाईलवर सरफिंग करताना "लिंकड् ईन" मध्ये मला एक विलक्षण जिद्दीची आणि कठीणातली कठीण आव्हाने स्वीकारून, त्यांना धीटाईने सामोरे जाण्याची, एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मुलीची कहाणी वाचायला मिळाली. विलक्षण रोमहर्षक अशी ती कहाणी कुणालाही स्वतःला अंत प्रेरणा देऊन प्रोत्साहित करेल, अशीच होती. 

कुठल्याशा एका रस्त्यावरील अपघातात तिला एक पाय गमवावा लागतो आणि तसे होऊनही ती निराश नाउमेद न होता, जिद्दीने आलेल्या संकटांना सामोरे जात कृत्रिम पाय बसवून हळूहळू आपल्या विस्कटलेल्या आयुष्याची पुनश्च जोमाने घडी कशी बसवते, ती ही कहाणी. एवढेच काय कृत्रिम पाय बसवल्यावर, तिच्या आवडीच्या बॅडमिंटन खेळात दिव्यांगांसाठी असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ती विक्रमी यश मिळवत जाते. एवढेच काय, तर लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही झेप घ्यायची तिची मनीषा आहे !

हे सारे वाचून धन्य धन्य झाल्यासारखे वाटले, उर भरुन येत डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. धडधाकट माणसांचे डोळे उघडणारी, कुणालाही प्रोत्साहित करणारी अशी ही कहाणी, केवळ सोशल मीडियाच्या कृपेनेच मला वाचायला मिळाली.

म्हणूनच मी सुरुवातीचे विधान केले:

👍"सोशल मीडिया हे एक वरदान !":👌###########################

👍"संध्या छाया भिवविती ह्रदया !:💐

☺️ " अगदी प्रामाणिकपणे व पोट तिडकीने आयुष्याची निवृत्ती तसेच वृद्धाश्रमाची अपरिहार्यता अशा तऱ्हेचे अनेक अनुभव सोशल मीडियावर लिहिलेले दिसतात. या संदर्भात खूप वर्षांपूर्वी कुठल्यातरी दिवाळी अंकात किंवा महिन्याच्या अंकात- त्याचे नाव आता आठवत नाही, एक लेख वाचला होता आणि त्यामध्ये 65 वर्ष ही मर्यादा सर्व नागरिकांसाठी शासनाने मुक्रर केली अशी कल्पना होती. त्यामुळे 65 वर्ष झाल्यावर एक इंजेक्शन, मग खेळ खलास ! अशा तऱ्हेची ती कथा होती, तिची आठवण झाली.

अशा तऱ्हेच्या संदेशांमध्ये मांडलेल्या विचारांशी मतभेद होऊ शकतात. माणसाला जीव मागून मिळत नाही, तो कुणीतरी अज्ञात शक्ती देत असते. त्यामुळे त्याची होता होईल तो जपणूक शेवटपर्यंत करत राहणे आणि जे जे आपल्याला भावते, आवडते ते ते करत राहणे हा खरा योग्य मार्ग.

###########################

धन्यवाद

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा