शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-८ !":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-८ !":👌

"जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

आता कालानुसार त्या त्या दिवसाची नोंद एकदा आणि नंतर फेब्रुवारी पासूनच्या दिवसांची नोंद, असा क्रम या लेखमालिकेमध्ये राहणार आहे. तेव्हा आजच्या दिवसापासून ती पद्धत सुरू केली आहे. ही माहिती आपणास मनोरंजक व माहितीपूर्ण वाटेल अशी आशा आहे.

@ 1 ऑक्टोबर 💐

☺️ 'दिनविशेष":👌

#1847 तत्त्ववेत्या डॉक्टर अँनी बेझंट यांचा जन्म #1854 व्हिक्टोरिया राणीचे चित्र असलेले पहिले टपाल तिकीट भारतात प्रसिद्ध
#1905 लेखिका मालतीबाई बेडेकरांचा जन्म
#1910 झेंडू फार्मासिटिकल कंपनीची स्थापना #1919 गीत रामायणकार ग दि माडगूळकरांचा जन्म
#1908 सर्वांना परवडेल अशी टी मॉडेल फोर्ड मोटर कंपनीने बाजारात आणली
#1931 नाट्यछटा वाघमारे प्रकाराचे जनक शंकर गर्गे यांचे निधन
#1982 ठाणे महानगरपालिकेची स्थापना
#1995 एबी बिर्ला उद्योग समूहाचे प्रमुख आदित्य बिर्ला यांचे निधन
#2004 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तुळजापूरकर यांचे निधन
##########################

👍'विशेष नोंद':👌

#TCP- ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल
# हवेचा वेग तपासणारे उपकरण अँनेमोमीटर
राष्ट्रकुल स्पर्धा दर चार वर्षांनी भरवल्या
जातात
##########################

@ 2 ऑक्टोबर 💐

☺️'दिनविशेष':👌

#1869 महात्मा गांधींचा जन्म
#1904 भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांचा चा जन्म
#1906 चित्रकार राजा रविवर्माचे निधन
#1912 छायाचित्रकार केकी मूस यांचा जन्म
#1953 आकाशवाणीचे पुणे केंद्र सुरू
#1972 मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणाची सुरुवात
#1982 केंद्रीय अर्थमंत्री रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर सी डी देशमुख यांचे निधन
##########################

@ 3 ऑक्टोबर 💐

☺️'दिनविशेष':👌

#जागतिक प्राणी आणि वनस्पती नैसर्गिक वस्ती स्थान दिन
#1867 शिवण यंत्राचे संशोधक ईलियस हाँव
यांचे निधन
#1903 हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते रामानंद तीर्थ यांचा जन्म
#1947 वैज्ञानिक नोबल विजेते मॅक्स प्लॅंक यांचे निधन
#1952 इंग्लंडची पहिली अणुचाचणी यशस्वी
#1957 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'ची स्थापना #1990 पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकीकरण
##########################

👍'विशेष नोंद':👌
#निकारागुवाची राजधानी मनाग्वा
# एफ एम ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजीचा जनक एडविन आर्मस्ट्रॉंग
##########################

@4 आँक्टोबर 💐

☺️'दिनविशेष':👌

#राष्ट्रीय एकात्मता दिन
#जागतिक सुरक्षा दिन
#1914 गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म #1921 संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे निधन #1935 अरुण सरनाईक यांचा जन्म
#1957 रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिकचे यशस्वी प्रक्षेपण
#1989 दलाई लामांना शांततेचे नोबल पारितोषक #2001 भारतातील पहिल्या मानसोपचार तज्ञ मालतीबाई रानडे यांचे निधन
##########################

👍'विशेष नोंद':👌
#दामोदर नदी म्हणजे 'सॉरी ऑफ बंगाल' म्हणून ओळखली जाते
#पहिला समाजसेवेचा भारतरत्न पुरस्कार महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिला गेला
#लँड ऑफ गोल्डन पॅगोडाज् मायना मार (ब्रह्मदेश) #1945 मध्ये यु एन ओ ची स्थापना झाली.
##########################
धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-७ !":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-७ !":👌


@ २ फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌

# 1394 संत नरहरी सोनार समाधीस्थ
# 1884 ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर केतकर यांचा जन्म
# 1907 मूलद्रव्यांच्या परमाणु भाराचा संशोधक दिमित्री मेंडेलीफ यांचा मृत्यू
# 1917 समाजसेवक अण्णासाहेब पटवर्धन यांचा मृत्यू
# 1949 प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ची स्थापना
# 1970 तर्कज्ञ डॉक्टर बर्ट्ररँन्ड रसेल यांचा मृत्यू
# 1987 कथा कादंबरीकार ललित लेखक
डॉक्टर अ वा वर्टी यांचा मृत्यू
##########################

@ 3 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1885 'सोलापूर समाचार'चा जन्म
# 1839 उद्योजक जमशेदजी टाटांचा जन्म
# 1860 डॉक्टर हाफकिन यांनी प्लेगची लस शोधली
# 1895 पहिली विद्युत रेल्वे व्ही टी ते कुर्ला अशी सुरू
# 1896 रशियाने लुना 9 हे चंद्रयान चंद्रावर उतरवले
# 1989 साहित्य समीक्षक रा शं वाळींबे यांचे निधन
##########################

👍विशेष नोंद !👌

# आपल्या इच्छेप्रमाणे, प्लॅन प्रमाणे इतर सगळे वागतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे असते, असा अनुभव अधून मधून येतो. त्याबाबतीत
अपेक्षाभंगामुळे आपले नुकसान होते, मनस्ताप होऊन प्रकृतीवर गैर परिणाम होतो.

इतरांच्या इच्छेनुसार कृती अनेकदा त्रासदायक व महागात पडते याचा प्रत्यय येतो. दोन्ही बाजूने शेवटी आपल्याला त्रास होतो. यावर उपाय शोधूनही सापडत नाही. 'कालाय तस्मै नमः !' व 'व्यक्ति तशा प्रकृती' (नव्हे विकृती ?) असे म्हणून गप्प बसणे, हेच उत्तम.

जे जे होईल त्याला सामोरे जाणे, हाच खरा मार्ग. कठीण वाटणाऱ्या गोष्टींचाही केव्हा तरी अंत होतो आणि सर्वसाधारण सुसह्य असे वातावरण परिस्थिती केव्हातरी निर्माण होतेच होते. हा विश्वास ठेवावा, तिचा इंतजार करण्यासाठी धीर धरायला हवा, असेच आपल्याला अनुभवांती उमगते.
##########################

@ ४ फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌

# 1670 कोंडाणा किल्ला घेताना तानाजी मालुसरे यांचा मृत्यू
# 1844 शोधणारा क्लाईड टॉमबाँ यांचा जन्म
# 1848 श्री लंका स्वतंत्र झाला
# 1961 पहिले विमानवाहू जहाज विक्रांत नौदलात दाखल
# 1971 कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन
##########################

👍विशेष नोंद !👌
# बांगलादेशचे राष्ट्रीय फळ फणस
# टाईपराईटर चा संशोधक: क्रिस्तोफर शोल्स

# अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा विचार करून अपेक्षा ठेवा. त्या पूर्ण न झाल्यास समजूतदारपणा दर्शवा. कधीकधी आपल्या मनाप्रमाणे होत नाही, सगळेच आपल्या मनासारखे होईल हा हट्ट नको. आपल्या उपेक्षेचे कारण आपल्या अपेक्षा असतात, म्हणून योग्य त्या अपेक्षाच ठेवाव्यात.
##########################

@ ५ फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1840 टायरचे निर्माते डनलॉप यांचा जन्म
# 1840 मॅक्झिम बंदुकीचा निर्माता सर हिरँम मॅक्झिन यांचा जन्म
# 1665 मुंबई बेट पोर्तुगीजांकडून इंग्रजांच्या हवाली
# 1952 स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक
# 1953 रशियाचा हुकूमशाह स्टँलीनचा मृत्यू
##########################

@६ फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1892 अनिमियावर उच्चार शोधणाऱ्या विल्यम मर्फी यांचा जन्म
# 1932 मराठीतील पहिला बोलपट 'अयोध्येचा राजा' कृष्णा टॉकीज मध्ये प्रदर्शित
# 1931 पंडित मोतीलाल नेहरूंचा मृत्यू
# 1911 अमेरिकेचे चाळीसावे
राष्ट्राध्यक्ष, रेनॉल्ड रिगन यांचा जन्म
# 1939 बडोद्याचे राजे सयाजीराव शिंदे यांचे निधन # 1959 केरळ कोर्टात पहिल्या स्त्री न्यायाधीश म्हणून सुश्री चांडी यांची नियुक्ती
# 1964 पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह कैराँ यांची हत्या
# 1994 जागतिक मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना
# 2001 काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन
##########################

@ ७ फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
#1812 इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्सचा जन्म
# 1834 पिरीओडिक टेबलचा संशोधक मेंडेलीफ यांचा जन्म
# 1848 पुणे नगर वाचन मंदिराची स्थापना
# 1884 माझा प्रवास हा 1857 च्या उठावाची माहिती देणारा विष्णुपंत गोडसे लिखित ग्रंथ पूर्ण
# 1915 आर्यन चित्रपटगृह बापूसाहेब पाठक यांनी सुरू केले
# 1965 'तो मी नव्हेच !' नाटकाद्वारे रंगभूमीवर फिरता रंगमंच सुरू झाला
# 1984 ब्रुस मँकेंडन्सीस, चॅलेंजर अंतराळ यानातून अंतराळात स्वतंत्र संचार करणारे वीर ठरले
# 1999 जॉर्डनचे राजे हुसेन यांचा मृत्यू
##########################

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

👍" आनंद घ्या, आनंद द्या !":👌💐: ☺️" शब्दांच्या पलीकडले !":👌💐

 👍"रंगांची दुनिया !":👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

👍" आनंद घ्या, आनंद द्या !":👌💐

👍"शारदोत्सव !":💐

☺️" शब्दांच्या पलीकडले !":👌💐

👍"सत्य खरोखर काय आहे, ते ज्याचे त्याला माहीत असते. मुखवट्यांच्या आड, ते एकमेकांपासून लपविण्याचा खेळखंडोबा मात्र नेहमीच चालतो !"😊

👍"प्रत्येकापाशी देण्याजोगे असे काही ना काही असतेच, असते. जे देण्यामुळे आपल्याला आनंद होतो, ते नेहमी देत रहावे !":☺️

👍"स्वप्न केव्हां व कां पडतात? 

स्वप्न खरी होतात कां? हो असेल, तर केव्हां?

स्वप्नांचे कोणते प्रकार असतात ?"💐

👍"सोशल मिडीया: वापराची स्पष्टता !":👌

# आलेला विडीओ कोणत्या विषयावर आहे ते समजून घेऊन मगच मी तो उघडतो. विषय दिला नाही, तर मी, तो विडीओ न बघताच डिलीट करतो. बहुतेक वेळा आलेले तसेच पुढे पाठवले जाते, असे माझे निरीक्षण आहे.

# मी येणारे मेसेजेस वा विडीओ, फोटो केवळ असाधारण असल्यास, त्यांच्यामुळे उपयुक्तता वाढणार असली तरच ते फाँरवर्ड करतो. नाहीतर डिलीट करतो.

# माझे सर्व मेसेजेस मी स्वत:च शक्यतो विचारपूर्वक लिहीलेले असतात. ते निर्माण करण्यात मला विलक्षण आनंद होतो. Such activity satisfies my creative urge. हे माझ्याकरता प्रेयस, व माझ्या ब्लॉगवर लिहीणे, ही त्यापुढची पायरी झाली, ती माझे श्रेयस ! सहाजिकच पुष्कळदा मला वेळ अपुरा पडतो. 

# "सोमी" वरील एका प्रतिसादामुळे मला विचार करायला हे नवे साधन मिळाले आणि सोशल मिडीया, मी कसा वापरतो त्याची स्पष्टता लिहीत गेलो. पैलवान जसा जोर बैठकांची कसरत करतो, तद्वतच माझा असा शब्दसंचार, ही माझ्या लेखन कौशल्याला अधिकाधिक सक्षम करण्याची जणु तालीम असते!

👍थोडक्यात ही माझी सोशल मिडीया वापराची आचारसंहीता तयार झाली. ज्याची त्याची तशी असेल अशी अपेक्षा ठेवतो.😊

👍"केवळ मजकूराचा संदेश "सोमि" वर सहसा वाचला जात नाही, असे समजू नये. मोजक्या शब्दांतील शाश्वत विचारांची दखल घेतली जातेच जाते."👌

👍"कुरीयर सर्विस देणारे घरी येऊन आपले टपाल घेऊन जातात. तशीच सेवा पोस्टाने देणे सुरू करणे गरजेचे आहे. पोसटमन टपाल वाटतात, तेव्हा ते जे टपाल पाठवू इचछीतात, त्यांचेकडून ते घेऊ शकतात. पोसटांत तसे फोन घेऊन ते विभागवार पोस्टमनना ते टपाल वितरणाला जातात, तेव्हा देता येतील. मनुष्यबळ न वाढवता हे काम होऊ शकेल व पोस्टाचे उत्पन्न वाढेल. नागरिकांची सोय होईल. 

हया सुचनेचा उपयोग करुन ती सोयीनुसार अंगिकारावी.👌

अखेरीस....

👍"घडतंय, ते ते बिघडतंय!":😢

# एखादा दिवस असा येतो की एका पाठोपाठ गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गांवी जाणार तर धो धो पाऊस सुरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलींडर रिकामा झाला व नवीन लावला तर गँस लिक होत होता. 

# मेकँनिक आला व वाँल्व लिक होत आहे, हा सिलींडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हां कुठे नवीन सिलींडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले! त्याचा मेकँनिक येतो कधी, ती वाट पहावी लागली. विसावा म्हणून चहा गरम करायला घेतला, तर ओव्हनचा नन्ना.काही कामाचे कागद छापायला गेलो, तर कार्ट्रिजची शाई सपलेली. 

# अखेर कुणाला तरी फोन करावा, तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम,,,..जे जे घडतंय, ते ते बिघडतंय !"😢😢

धन्यवाद

सुधाकर नातू

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

👍💐"अक्षरांच्या वाटेवर !":👌💐


👍खरोखर मनभावन क्षण ! 💐

👍💐"अक्षरांच्या वाटेवर !":👌💐

छोट्या पडद्यावर सर्फिंग करताना कधी कधी अचानक एखादा अक्षरशः खेळवून टाकणारा कार्यक्रम पाहायचा योग येतो. माझे काल तसेच झाले. सह्याद्री वाहिनीवर *अक्षरांच्या वाटेवर*या कार्यक्रमात डॉ समीरा गुजर जोशी यांनी डॉक्टर बाळ कोंडके ह्या विख्यात शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक यांच्याशी ज्या गप्पा मारल्या, तो कार्यक्रम होय. 

👍त्या चर्चेमधून, ज्यामध्ये मुलाखतकर्तीने, मुलाखत ज्यांची आहे त्यांना जास्तीत जास्त बोलण्यास वाव दिल्यामुळे आणि स्वतः बाळ फोंडके यांची विवेकी, तर्कनिष्ट अशी विचारशैली असल्यामुळे आपल्या मनासमोर वेगवेगळ्या प्रकारचा साहित्यिक विशेषतः विज्ञानविषयक पट उलगडला गेला, तो स्तिमीत करणारा होता. त्यांच्या बोलण्यातून ज्या काही मोजक्याच गोष्टी घर करून गेल्या आणि आगळ्यावेगळ्या वाटल्या त्या अशाः

👍इंजीनियरिंग आणि मेडिकल या दोन पर्यायांमधून पूर्ण वाव असताना देखील, त्यांनी सायन्सला- फिजिक्सला जाण्याचे कां ठरवले, ती आठवण खरोखर कुणालाही प्रेरणादायी ठरावीः

मादाम क्युरी या दोन वेळा नोबल पारितोषिक विजेत्या थोर शास्त्रज्ञ स्त्रीचे चरित्र त्यांच्या वाचनात त्यावेळी तरुणपणी आले आणि त्यांना जाणवले की, संशोधक हा नेहमी नवनवीन काहीना काही तरी करत असतो, रोज तेच तेच काम न करता अथक प्रयत्नाने एखाद्या समस्येची उकल करत असतो. त्या उलट डॉक्टर काय किंवा इंजिनियर काय रोज तेच तेच काम करणार, त्यामध्ये प्रयोगशीलता नसणार. म्हणून फोंडके सरांनी फिजिक्स घेऊन एमएससी आणि पुढे उच्च शिक्षण घेतले. हा विचार आजच्या तरुणांनी खरंच करायला हवा असाच आहे. कारण जो तो इंजिनीयर, डॉक्टर नाही तर हल्ली कॉम्प्युटर सायन्स अथवा चार्टर्ड अकाउंटंट याच मार्गाकडे जात असतो.

👍दुसरा जो मुद्दा त्यांंनी मांडला, तोही अगदी वेगळा होता. साहित्य कुठे अन् शास्त्र कुठे, परंतु या दोन्ही गोष्टींचा मिलाफ त्यांच्या एकंदर जीवनात अप्रतिमपणे झाला. त्यामुळे त्यांनी अनेक विज्ञान कथा आणि BARC सारख्या महत्त्वाच्या संस्थांमधून देशाला उपयुक्त असे कार्य केले आहे. साहित्य कशाकरता? या प्रश्नाचं त्यांनी जे उत्तर दिलं तेही विचारात घेण्याजोगं ! 

सरांनी सांगितलं की, साहित्याचे दोनच उद्देश असू शकतातः एक म्हणजे प्रबोधन आणि दुसरं म्हणजे मनोरंजन. लेखकाने ठरवावं आपला मार्ग कुठला ते. त्यांचा मार्ग प्रबोधनाचा आणि लोकांमध्ये नवजागृतीचा असाच असल्यामुळे त्यांनी अनेक रहस्यमय विज्ञानकथा लिहिल्या आहेत. त्यातील निवडक कथांचाही छान उल्लेख त्या उदबोधक गप्पांमधून झाला.

👍साधारण तासाभराचा तो कार्यक्रम कसा व केव्हा संपला हे कळलेही नाही. यातच त्या कार्यक्रमाचे यश म्हणावे लागेल. छोट्या पडद्यावर अशीच अवचित भेट अधून मधून होत गेली, त्यातून जर काही आगळेवेगळे विचार मिळत गेले, तर ते क्षण हे खरोखर मनभावन क्षणच होय. कालच्या या कार्यक्रमातून माझ्या मनःपटलावर जे काही टीपकागदासारखे विचार टिपले गेले, ते इथे मी उलगडले इतकेच. 

धन्यवाद 

सुधाकर नातू

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-6 !":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-6 !":👌

@ 27 जानेवारी💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1901 तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचा जन्म
# ब्लू स्टार मोहीम राबवणारे जनरल अरुण कुमार वैद्य यांचा जन्म
# 1926 स्कॉटलंडचे जॉन बेअर्ड लोगी यांनी सार्वजनिक रूपात टीव्हीचे प्रदर्शन केले
#1997 वेंकटेश्वरा हॅचरीचे संस्थापक डॉक्टर बी व्ही राव यांचे निधन,,

👍विशेष नोंद 💐
👍म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही अत्यंत बेभरवशाची असते. त्यांच्याबद्दल विशेष माहिती न घेता आपण खूप मोठी रक्कम, रिटर्न्सची खात्री नसतानाही गुंतवतो. जेव्हा मार्केट इंडेक्स खूप वर असते तेव्हा जर गुंतवणूक केली तर, नंतर तो जेव्हा गडगडत इंडेक्स खाली येतो, तेव्हा आपण गुंतवलेल्या रकमेचे मूल्य खूपच कमी होऊन आपण लॉस मध्ये जाऊ शकतो.
👍आपण धड ते पैसे काढूनही घेऊ शकत नाही व त्यावर आपणास काही चांगला परतावाही मिळत नाही. अशा दुहेरी नुकसानीचा अनुभव अधूनमधून प्रत्येकाला येतो. त्यामुळे नीट विचार करून आपली गरज काय आहे, केव्हा आपल्याला किती पैसे लागतील ते समजून, नंतरच कुठल्याही स्कीममध्ये पैसे गुंतवावे. हा मला ह्या कटू अनुभवावरून धडा शिकवून गेला.
👍शेअर बाजाराची देखील तशीच अवस्था आहे. त्यामुळे शक्यतोवर या शेअर बाजारच्या मार्गाला न जाणे चांगले असेही मला आज वाटले.
#################################

@ 28 जानेवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1851 बिठूर येथे पेशवाई बुडवणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाचा मृत्यू
# 1865 पंजाबचे सेनानी लाला लजपतराय यांचा जन्म
# 1895 आचार्य शंकरराव देव यांचा जन्म
# 1900 पहिले सरसेनापती जनरल करी अप्पांचा जन्म
# 1925 अणुविज्ञान शास्त्र राजा रमणांचा जन्म
# 1937 गायिका सुमन कल्याणपुर यांचा जन्म
# 1961 एचएमटी घड्याळात च्या कारखान्याची बंगळूर येथे स्थापना
# 1984 निर्माते दिग्दर्शक सोहराब मोदींचे निधन

👍विशेष नोंद 👌
👍डॉक्टरांच्या विविध तपासण्या ऑपरेशन आणि हॉस्पिटल यांना काही माणसं कमालीचे घाबरतात. व्यावहारिक जीवनात संसारी कुटुंबप्रमुख माणसाला न शोभणारी ही वृत्ती आहे. नैसर्गिक जीवनात असे चढउतारांचे, कसोटीचे प्रसंग कायमच येत राहणार हे सत्य न स्वीकारण्याचा व नेहमीच सारे आलबेल, सरळमार्गी जीवन व वातावरणच हवे अशी अवस्था अपेक्षा धरण्याचे फळ आहे.
👍निदान पुरुषाला तरी अशी भित्री व्रुत्ती शोभत नाही. या वृत्तीचा संपूर्ण त्या करून जो प्रसंग येईल, त्याला धीटाईने स्थितप्रज्ञ वृत्तीने सामोरे जायला हवे. कोणत्याही प्रसंगात आपण खंबीर राहिले पाहिजे आणि आपल्यातल्या त्रुटी वेगळ्या केल्या पाहिजेत आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे हा आजचा आत्मपरीक्षणाचा धडा आहे.
#################################

@ 29 जानेवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
1274 संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथांचा जन्म
# 1968 लोकनायक मा श्री अणे यांचे निधन
# 1953 संगीतनाटक अकादमीची स्थापना
################################

@ 30 जानेवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1927 अभिनेता श्री रमेश देव ह्यांचा जन्म
################################

@ 31 जानेवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1793 सवाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाईंचे निधन
# 1931 गीतकार गंगाधर महांबरे यांचा जन्म
# 1963 मोर पक्षी राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित
# 1948 हृदय रोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांचा जन्म
# 1994 निर्माते दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांचे निधन
# 2004 व्हायोलिन वादक पंडित जोग यांचे निधन
#################################

@ 1 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1689 संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद
# 1844 ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी पहिला खंड प्रसिद्ध एक
# 1894 महामहो उपाध्याय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा जन्म
# 1912 गीतकार राजा बढे यांचा जन्म
# 1959 रोहिणी मासिकाच्या शुभमंगल मेळ्याची सुरुवात
# 1964 यूटीआय ची स्थापना
# 1966 नट बापूराव मानेंचे निधन
# 1995 नाटककार दिग्दर्शक मो ग रागणेकरांचे निधन
# 2003 कोलंबिया अंतराळ यांनाचा स्फोट आणि कल्पना चावलासह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू

👍विशेष नोंद 💐
👍ज्याचं त्याचं आभाळ. तसेच ज्याचं त्याचं नशीब. प्रत्येकाची आयुष्यरेषा किती असावी हेही त्याच्या नशिबावर अवलंबून असते. रोहिणी मासिकाचे संस्थापक संपादक वसंतराव काणेंना 90 वर्षांचे प्रदीर्घ कृतार्थ आयुष्य लाभले. त्यांच्या निधनाची बातमी माझ्या कानावर आली आणि विलक्षण दूरदृष्टी असलेला शिस्तप्रिय संपादक समाजसेवक आपल्यातून निघून गेला याचे कमालीचे दुःख झाले.
👍रोहिणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक संसार फुलवले. याबद्दल महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरचे अनेकजण त्याबद्दल कृतार्थच राहतील. मी अभ्यासक ज्योतिषी म्हणून त्यांचा कायमचा ऋणी आहे. कारण त्यांनीच मला 1977 च्या रोहिणी दिवाळी अंकामध्ये, वार्षिक राशिभविष्य लिहिण्याची आणि नंतर ज्योतिषावर लेखमाला-नियतीचा संकेत ही लिहिण्याची संधी त्यांनीच दिली.
##################################

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
चुकभूल द्यावी, घ्यावी.

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

☺️।।आनंद घ्या, आनंद द्या।।😊 ☺️"विमुक्ताफळे !":😊

 👍👍👍👍💐💐

👍"रंगांची दुनिया":👌

☺️।।आनंद घ्या, आनंद द्या।।😊

☺️"विमुक्ताफळे !":😊

👍दारुण अपयशासारखेच अतोनात यश पचवणे कठीण असते. अहंकार, मग्रुरी आणि गर्व ह्यांचा कैफ डोक्यात भिनून पहाता मिळवलेले सारे गमावते.

👍सातत्याने आपला दिनक्रम, काग्रता ठेवून वेळेवर पाळला, की तो आपल्या नैसर्गिक बाँडी क्लाँकबरोबर जुळतो. आपले आरोग्य त्यामुळे सुधारते.

👍टीका करणे ही देखील उपयुक्त निर्मितीच नव्हे कां? कारण टीका करताना साधक बाधक दोन्हीचा विचार करून वास्तवतेचे पारदर्शी चित्र उभे केले जाते. जशी गरज, ही शोधाची अर्थात नवनिर्मितीची जननी, त्याचप्रमाणे टीका ही प्रगतीच्या बदलाची जननी असते. टीका खुल्या दिलाने स्विकारणारेच सुधारणेचे नवनवे मार्ग खुले करू शकतात. दुर्दैवाने टीका पचविणारे दुर्मिळ असतात. म्हणूनच जैसे थे अथवा पिछेहाट अपरिहार्य असते. उगाच नाही, संत तुकाराम म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी"!

👍आश्वासित निर्मिती जर झाली नाही 

तर टीका होणे अपरिहार्य नव्हे कां? अशक्य आश्वासने देणे सोपं असते पण त्यांची पूर्तता करणे कठीण असते!

आणि....

अखेरीस.....

👍सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणारे पुष्कळसे अनिष्टच घडत असल्याने त्यावरील प्रतिसाद हा टीकात्मक भासणे, सहाजिकच! त्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या समजल्या तर आनंदच होईल.

धन्यवाद

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

। 👍"शारदोत्सव- मौलिक अमृतमंथन !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

।।आनंद घ्या, आनंद द्या।।

👍"शारदोत्सव- मौलिक अमृतमंथन !":👌

#👍"संसाराचा सारीपाट !":👌

माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृति किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना, मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच कां वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून, मगच आपण वागले तर संसारात गोडी येते. 

आपला संसार सुखाचा करणे आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फले देतो. 

आपले समाधान-असमाधान, हे आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकतो की, परिस्थिती आपल्यावर, ह्यांच्याशी निगडीत असते. 

ऊन-पावसाचा सारा खेळ!

###########################

#👍"तुणतुणे !":👌

"कार्यक्षमता मर्यादित असणारे, 

नेहमी 

'रडीचा डाव खडी' खेळत आपल्या चुकांचे, अपयशाचे खापर दुसर्यांवर फ़ोडण्याचे तुणतुणेच वाजवत रहातात !###########################

#👍"नव्याची नऊ दिवस नवलाई!":👌💐

कोणतीही गोष्ट नवीन असते तेव्हा कुतुहूलापोटी आपल्याला ती आवडू लागते. परंतु रोज तेच तेच झाले की, त्याचा आपल्याला कंटाळा येतो. अर्थात् हा म्हणजे 'लॉ ऑफ डिमिनेशनिशिंग रिटर्न' होय. 

निसर्ग वा नियती आणि मानवाचे आयुष्य यांचाही असाच परस्पर संबंध असावा की काय ! माणसाचा जन्म झाला की, किती कौतुक, आवडीने लाड होतात. परंतु 'लॉ ऑफ डेमिनेशनिशिंग रिटर्न' प्रमाणे निसर्ग वा नियतीला देखील, त्याच त्या गोष्टीचा कंटाळा येत असावा, म्हणून तर माणसाचा त्याग होतो की काय ? ही निसर्गाची किमया वा इच्छा म्हणायचं दुसरं काय ?

किंवा 

मानवजन्म म्हणजे जणु...                                       "नव्याची नऊ दिवस नवलाई !"

###########################

👍"सोशल मीडिया हे एक वरदान !":👌

असे मी जे नेहमी म्हणतो, त्याला आज अजून एक कारण घडले. मोबाईलवर सरफिंग करताना "लिंकड् ईन" मध्ये मला एक विलक्षण जिद्दीची आणि कठीणातली कठीण आव्हाने स्वीकारून, त्यांना धीटाईने सामोरे जाण्याची, एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मुलीची कहाणी वाचायला मिळाली. विलक्षण रोमहर्षक अशी ती कहाणी कुणालाही स्वतःला अंत प्रेरणा देऊन प्रोत्साहित करेल, अशीच होती. 

कुठल्याशा एका रस्त्यावरील अपघातात तिला एक पाय गमवावा लागतो आणि तसे होऊनही ती निराश नाउमेद न होता, जिद्दीने आलेल्या संकटांना सामोरे जात कृत्रिम पाय बसवून हळूहळू आपल्या विस्कटलेल्या आयुष्याची पुनश्च जोमाने घडी कशी बसवते, ती ही कहाणी. एवढेच काय कृत्रिम पाय बसवल्यावर, तिच्या आवडीच्या बॅडमिंटन खेळात दिव्यांगांसाठी असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ती विक्रमी यश मिळवत जाते. एवढेच काय, तर लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही झेप घ्यायची तिची मनीषा आहे !

हे सारे वाचून धन्य धन्य झाल्यासारखे वाटले, उर भरुन येत डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. धडधाकट माणसांचे डोळे उघडणारी, कुणालाही प्रोत्साहित करणारी अशी ही कहाणी, केवळ सोशल मीडियाच्या कृपेनेच मला वाचायला मिळाली.

म्हणूनच मी सुरुवातीचे विधान केले:

👍"सोशल मीडिया हे एक वरदान !":👌###########################

👍"संध्या छाया भिवविती ह्रदया !:💐

☺️ " अगदी प्रामाणिकपणे व पोट तिडकीने आयुष्याची निवृत्ती तसेच वृद्धाश्रमाची अपरिहार्यता अशा तऱ्हेचे अनेक अनुभव सोशल मीडियावर लिहिलेले दिसतात. या संदर्भात खूप वर्षांपूर्वी कुठल्यातरी दिवाळी अंकात किंवा महिन्याच्या अंकात- त्याचे नाव आता आठवत नाही, एक लेख वाचला होता आणि त्यामध्ये 65 वर्ष ही मर्यादा सर्व नागरिकांसाठी शासनाने मुक्रर केली अशी कल्पना होती. त्यामुळे 65 वर्ष झाल्यावर एक इंजेक्शन, मग खेळ खलास ! अशा तऱ्हेची ती कथा होती, तिची आठवण झाली.

अशा तऱ्हेच्या संदेशांमध्ये मांडलेल्या विचारांशी मतभेद होऊ शकतात. माणसाला जीव मागून मिळत नाही, तो कुणीतरी अज्ञात शक्ती देत असते. त्यामुळे त्याची होता होईल तो जपणूक शेवटपर्यंत करत राहणे आणि जे जे आपल्याला भावते, आवडते ते ते करत राहणे हा खरा योग्य मार्ग.

###########################

धन्यवाद

सुधाकर नातू

रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-५ !":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-५ !":👌


@ 23 जानेवारी

☺️ 'दिनविशेष":👌
# 1927 बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म
# 1897 नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म
# 1901 राणी व्हिक्टोरियाचे निधन
# 1919 राम गणेश गडकरी नाटककार यांचे निधन # 1989 दैनिक सामना दैनिकाचा प्रारंभ
# महाराष्ट्र छात्र सेना दिन म्हणून 23 जानेवारी हा दिन पाळला जातो
# 1565 विजयनगरच्या साम्राज्याचा अंत
#####################################

@ 24 जानेवारी

☺️"दिनविशेष":👌
# शारीरिक शिक्षण दिन
# शब्दभ्रमकार रामदास पाध्येंचा जन्म
# 1826 देशातले पहिले बॅरिस्टर गजेंद्रनाथ टागोर यांचा जन्म
# 1857 कलकत्ता विद्यापीठाची स्थापना
# 1923 अभिनेत्री हंसा वाडकरचा जन्म
1924 कवी मे पुरेगे यांचा जन्म
# 1966 पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींचा शपथविधी
# 1965 ब्रिटनचे माजी पंतप्रधान विंचन चर्चिल यांचे निधन
# 1966 होमी भाभा अणु विज्ञानाचे शिल्पकार यांचे निधन
# 1973 अमेरिका आणि व्हिएतनांमध्ये दोन दशकांचे युद्ध समाप्त
#####################################

@ 25 जानेवारी

☺️"दिनविशेष":👌
# 1874 विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंध माला सुरू झाली
# 1954 मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन
# 1915 न्यूयॉर्कमध्ये सर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोन वरून संभाषण केले
# 1982 विनोबा भावे यांना भारतरत्न
# 1991 माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भारतरत्न
# 2001 लता मंगेशकर व सनई वादक बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न
# 25 जानेवारी सुरेश खरे नाटककार यांचा जन्म
#####################################

@ 26 जानेवारी

☺️"दिनविशेष":👌
#1950 स्वतंत्र भारत प्रजासत्ताक झाल्याचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी जाहीर केले # 1627 शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईलचा जन्म
# 1876 मुंबई कलकत्ता रेल्वे मार्ग खुला
# 1965 हिंदी राष्ट्रभाषा म्हणून जाहीर झाले
# 1957 मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांचा जन्म
# 2001 भूज येथे भयंकर भूकंप

💐"विशेष नोंदी":👌
👍रविवारी बँक हॉलिडेच्या सुट्टीच्या दिवशी, बहुशः दिवसभर घरी राहायची वेळ येते. अशावेळी काय करावे हे सुचत नाही. म्हातारपणी अनेक मंडळी असे दिवसेंदिवस घरीच कुठेही बाहेर न जाता जीवन कंठतात तरी कसे, हा प्रश्न पडला. अशी मंडळी काहीच प्रॉडक्टिव्ह करत नाहीत व शरीर मनाला चालना देण्याच्या कामात प्रयत्न होत नाही हे उमजले.
👍खरं म्हणजे, एखादा विशेष ध्यास लागणे व लावून घेणे फार चांगलं. आपला आवडता विषय वा काम यांत सतत गुंतून राहिलेलं मन आणि त्यामुळे होणारा अद्भुत आनंद हा एक त्रिवेणी संगमच असतो. असा त्रिवेणी संगम घडायला असा मोकळा सुट्टीचा वार फारच उत्तम नाही कां?
👍यावर्षीचा संकल्प म्हणून हा असा दिनविशेष नोंद घेणे सुरू करण्याचा उपक्रमही अशाच तर्हेचा आनंद देऊ शकतो देत असतो, हे आज कळले.
###########################
धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

☺️"दैनंदिनीतील पाऊलखुणा ४!":😊

 ☺️"दैनंदिनीतील पाऊलखुणा ४!":😊


@ 20 जानेवारी:
----------

💐दिनविशेष
--------
१८६१ पहिल्या स्त्री कादंबरीकार काशीबाई कानिटकर यांचा जन्म
1898 संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा जन्म
1988 फाळणीचे विरोधक खान अब्दुल गफारखान यांचे निधन

👍विशेष नोंद:
---------
👍लोकसत्ता दिवाळी अंकातील "महाराष्ट्र टाइम्स 50 वर्षे" हा विविध राजकीय व्यक्तिमत्वांच्या जडणघडणीवरील लेखमाला वाचली.
शरद पवार, विखे पाटील, मोहिते पाटील आणि जॉर्ज फर्नांडिस इत्यादींची त्यात माहिती परिणामकारक होती.
👍'ओम भीम नमः'सायंकाळी दिवे लागणीनंतर म्हणण्याचा लक्ष्मीचा मंत्र.
👍नुसती वाचाळता व्यर्थ आहे, प्रत्यक्ष अशी ठोस कृती हवी.
👍वसंतदादा पाटील, तात्यासाहेब कोरे आदि दिग्गजांचे सहकार विकास क्षेत्रातले कॉन्ट्रीब्युशन थक्क करणारे. नंतर अनेक नेते स्वतःचा कुटुंबाचाही भरघोस विकासाचे राजकारण सहकार चळवळीतून करून कसे घेत आले आहेत, तेही या लेखमालेतून उमजले. दुर्दैवाने स्वार्थाचे अर्थकारण हीच या पन्नास वर्षांची उपलब्धी !
👍आम्ही ५ हा मंगेश तेंडुलकरांचा आपल्या तीन बंधू व भगिनींवरील आत्मचिंतनात्मक लेखही, प्रत्येक व्यक्तीचे गुणदोषांसकट ताशीव चित्र उभे करून गेला.
👍'व्हॉट गोज अप, गोज डाउन !' हे तत्त्वच साऱ्या व्यक्तींच्या जीवन कहाणीतून दिसते.
वाचनात अद्भुत आनंद लाभतो, नवीन माहिती मिळते, नवीन जाणिवा जागृत होतात आणि विचारांच्या कक्षा अशा वाचनाने रूंदावतात.
##########################

@ 21 जानेवारी:
-----------

💐दिनविशेष:
---------
1894 कवी माधव जुलियन यांचा जन्म
1924 कॉम्रेड लेण्यांचा मृत्यू
1924 कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा जन्म
1957 अभिनेत्री रिमा लागू चा जन्म
2003 राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्याला शिक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय

👍विशेष नोंद:
---------
👍ठरवून, सांगूनही कुणी कधी आपल्याला दिलेल्या वेळेवर भेटावयास येत नाही. त्यामुळे मनस्ताप वाढतो, कधी कधी एखादे काम वेळेवर होत नाही. काही अडचणी येतात, अडथळे येतात, समोरची व्यक्ती चेंगटपणा करते, त्यामुळे आपल्या मनाचा मनस्ताप वाढतो.
👍प्रवासात कधी कधी सतत वटवट करून वादळ वा गाणी लावून, माणसे डोक्याला ताण देतात. आपल्या मनातला राग आपल्याला मनातच गिळावा लागतो.
👍गोष्टी पुष्कळदा आपल्या हातात नसतात. त्या जशा जेव्हा घडावयाच्या, तेव्हाच घडत असतात हे चिरंतन सत्य ध्यानात घेऊन, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात असते.
👍म्युच्युअल फंडामध्ये नको त्या समयी गुंतवणूक केल्यामुळे नुकसान होते. गुंतवणीच्या वेळी एजंट पुरेशी माहिती व गायडन्स देतातच असे नाही. आपण आंधळेपणाने पैसे गुंतवतो आणि बऱ्याच वेळेला पदरी निराशा, नुकसान येते. म्हणून कोणताही निर्णय सारासार साधक बाधक विचार करून, मगच घ्यावा हेच कटू सत्य अशा अनुभवातून स्वीकारावे. दुसरे काय?
##########################

@22 जानेवारी

💐दिनविशेष
1666 शहाजहानचे निधन
1682 श्री रामदास स्वामींचे निधन
1885 फरगुशन कॉलेजचा प्रारंभ
1909 संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव उ थांत यांचा मृत्यू 1972 स्वामी रामानंद तीर्थ यांचा मृत्यू

👍विशेष नोंदी
👍रक्ताची माहिती:
1896 रॉकी याने रक्तदाबाचे मोजण्याचे यंत्र काढले बनवले
1901 ए बी ओ या रक्तगटांचा शोध लागला डॉक्टर काल लँड्स नायडर यांनी हा शोध लावला
1902 मध्ये एबी रक्तगटाचा शोध लागला
1939 रक्तगटाचा शोध लागला
1941 ब्लड बँक सुरू झाली
*डॉक्टर आनंद नाडकर्णींचा लेख वाचनात आला. अमेरिकी रेड क्रॉसने रक्तगटाची बँक सुरू केली.

👍'यूएसए अनकंडिशनल सेल्फ एक्सेप्टन्स': आपण जसे आहोत तसे गुणदोषांसकट स्वतःला स्वीकारणे म्हणजेच आत्मभान येणे होय.
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

👍"छोटीशी चूक, मनात धाकधूक !":😢

 👍"छोटीशी चूक, मनात धाकधूक !":😢

साध्या साध्या गोष्टी आपण कधीकधी चुकीने करतो आणि आपल्याला पुष्कळदा मोठा त्रास किंवा नुकसान अथवा एखादा अपघात होऊ शकतो. त्याचे परिणाम पुष्कळ दिवस किंवा काही आठवडे सुद्धा भोगावे लागतात. अशा प्रकारचा अनुभव नुकताच मला आला.

दुपारी चहा पिताना गरम गरम चहा कप बशी मध्ये समोर टीव्ही बघत असताना, बिस्किट चहामध्ये बुडवून खायची प्रक्रिया करताना, कपबशी हिंदकळली कारण एकाच वेळेला अनेक गोष्टी मी करत होतो आणि त्यातून आराम खुर्ची बसलो होतो. त्यामुळे तो गरम गरम चहा माझ्या अंगावर पडला आणि नंतर लक्षात आलं की पोटावर चांगलंच भाजलं होतं. छोटीशीच गोष्ट पण त्यामुळे भाजण्यासारखी त्रासदायक क्लेशकारक दाहक अशी मला जणू शिक्षा मिळाली होतं. काय होत, क्षणात काहीतरी नुकसान होतं अपघात होतो चुका होतात, पण त्याचे परिणाम मात्र पुष्कळ दिवस भोगायला लागतात हे ध्यानात आलं.

असाच दुसरा अनुभव नुकताच मला येऊन गेला होता एका बँकेच्या ऑनलाइन इंटरनेट सेवेमध्ये मी अनेक वेळेला लॉगिन करायचा प्रयत्न करूनही काही केल्या ते जमत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या कस्टमर केअर आणि इंटरनेट बँकिंग यांच्या आणि माझ्यामध्ये अनेक ईमेल ची देवाण-घेवाण झाली. काही केल्या मला माझा पासवर्ड जो काही होता तो बदलताही येत नव्हता आणि काही केल्या मला लॉगिन करता येत नव्हतं.

हे असं का होतं, होत ते कोणाच्याच लक्षात त्यावेळेला आलं नाही. इंटरनेट बँकिंग वाले असो किंवा मलाही असो. मी आपला बँकेच्या टेक्निकल सेवा कशी खराब आहेत, हेच सांगत राहिलो आणि अखेरीस मला सांगण्यात आलं की ऑनलाईन तुम्हाला आता जमत नसेल तर बँकेच्या ब्रांच मध्ये जाऊन मँनडेट फॉर्म भरा आणि तो पाठवा. त्यावरून परत वाद झाले, ज्येष्ठ नागरिक असताना ऑनलाईन सेवा असताना, हे फॉर्म भरण्याची भानगड कशाला हवी? ऑनलाइन रजिस्टर मोबाईल वरून एकदा रिक्वेस्ट केली की, जे काही नवीन मँनडेट असेल ती ईमेल रजिस्टर्ड मोबाईलवर कां पाठवता येऊ नये, अशी मला शंका आली.

पण अखेरीस करता काय, प्रश्न सोडवण्यासाठी बँकेत गेलो. तिथल्या माणसाने अतिशय उत्तम सेवा दिली आणि त्याने नंतर शोधून काढले की मी जे काही इनपुट्स द्यायचे होते, त्यामध्ये जे काही आकडे होते त्या आकड्यांमध्ये बारीकशी चूक केली होती. जे काही पाच-सहाकडे होते त्यामध्ये शून्य कुठेतरी मध्ये होते ते मी टाकायला विसरलो होतो. ते त्याने बरोबर बँकेच्या सिस्टीम वरून ओळखले. कारण तशी सेवा देखील तिथे होती आणि मी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते.. नंतर त्याने मला ती माझी लॉगिनची प्रक्रिया पूर्ण करून गेली पूर्ण करून दिली.

म्हणजे याबाबतीत झाले काय, तर माझीच छोटीशी नजर चूक आणि त्यामुळे एवढे सगळे १५ दिवस आटापिटा उगाचच झाला, इतरांनाही आणि मलाही. पण प्रश्न मात्र, ती चूक ध्यानात आल्याबरोबर पटकन सुटला !

धन्यवाद
सुधाकर नातू