गुरुवार, ३० जून, २०२२

# 👍"सत्तेचे गुलाम !":👌

 👍"सत्तेचे गुलाम !":👌

☺️"महाराष्ट्रातील सत्तांतराचे नाट्य व धडे !":👌
👍"बिंब !":👌
☺️"एका चाणाक्ष, पुरोगामी व कर्तबगार, तसेच एका राष्ट्रउद्धारक व पहिल्या फळीच्या मराठी नेत्याचा उघड अपमान असे उदासीन करणारे दृश्य."😢

👍"प्रतिबिंब !:👌
☺️ "राजकारणातील सत्तासंघर्षातील सद्यस्थिती आणि संभाव्य भावनिक विरोधाला बोथट करण्यासाठी ही चाणाक्ष चाल आहे. त्यामुळे एक घराणेशाही संपूष्टात येण्याची शक्यता, हा फायदा ! शिवाय असीम त्यागाचा डांगोरा पिटून, प्रतिमा उजळ करण्याची सुवर्ण संधी, हा बोनस" !!👌💐🎂

☺️ "धडे !":👌
* केवळ वैयक्तीक स्वार्थासाठी, भिन्न विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येणे, हा स्वतःच्या पायावर मारून घेतलेला धोंडा असतो.
*"सत्ता मिळविणं जितकं सोपं असतं, 
त्यापेक्षा ती विहीत जबाबदारीनं संभाळणं महाकर्मकठीण असतं!"
* "उच्च प्रतीची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि नितीमत्ता या निकषावरच नेते निवडले जाणे, हा निकोप लोकशाहीचा पाया असतो. तिथे घराणेशाहीला अजिबात थारा न देणे जेव्हा प्रत्यक्षात येईल तो सुदिन.
* "Always remember and practice, the famous saying by none other than World class Management Gurus' Guru Peter Drucker:
👍"The Theory of Business:
'You must find out clearly, what can happen, due to whatever has happened !"👌

------------------------------------------------------------------
राजकारण हया शब्दांतच त्याचा मतिता़र्थ वा प्रयोजन दडलेले आहे. राज्य करण्यासाठी अर्थात् सत्ता मिळविण्यासाठी करावयाचे कोणतेही, कसेही प्रयत्न म्हणजेच राजकारण होय. असे प्रयत्न अनेकविध असतात: भावनिक आवाहनाचा, विकासाची स्वप्ने दाखवून, विविध आश्वासने देवून, विरोधी गटांवर टीकांची झोड उठवून सत्ता काबीज करण्याचे डाव खेळले जातात. सत्ता कुणाला नको असते? कारण सत्ता म्हणजेच इतरांनी काय करावे, वा काय करू नये, हे ठरविण्याची निर्णयशक्ती मिळविणे असते, आपण ठरवू ते आणि तेच बरोबर हे सर्वांना सांगण्याचा अधिकार म्हणजेच सत्ता !
-------------------------
👍"गेले ते दिन गेले !":😢
स्वातंत्र्यपूर्व राजकारण आणि उत्तरोत्तर विशेषतः एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस राजकारणाचा पोत पूर्ण बदलून गेलेला आपल्याला पहायला मिळाला. केवळ सत्तेसाठी आणि आपल्या स्वतःच्या कुटुंब व निकटवर्तीय गटाच्या संपन्नतेसाठी राजकारण करण्याचा प्रघात सुरु झाला.

या पद्धतीचा माहोल पाहता-पाहता उजाडला. स्वातंत्र्या पूर्वी देश स्वतंत्र व्हावा, म्हणून जी माणसं स्वतःच्या स्वार्थाचा त्याग एवढंच काय पण संसारिक सुखाचाही त्याग करून केवळ देशसेवेसाठी आपले आयुष्य वेचायचे आणि साधी राहणी उच्च विचार अशा जीवनशैलीला, त्याकाळात मानसन्मान होता. कष्ट आणि शक्यतोवर आपला व्यक्तीगत फायदा राजकारणातून न करणे, अशा प्रवृत्तीच्या माणसांची मोठी मांदियाळी त्या वेळेला होती. त्यामुळे लोकोत्तर असे अनेक नेते आपल्याला मिळाले.
-----------------------------
👍"घराणैशाहीचे स्तोम !":😊
# लोकशाहीत एकदा कां कसेही करून बहुमत मिळविणे, हाच सत्ता देणारा मार्ग असतो. मताधिकार न बजावणार्यांचे प्रमाण पाहिले, तर मिळविलेले बहुमत खर्या अर्थाने किती फसवे असते, ते ध्यानांत येईल. ह्याच पार्श्वभूमीवर, व्यक्तिपूजेवर,घराणेशाहीवर आजवर चाललेली सारी व्यवस्था सर्व सामान्याना अपेक्षित फले देण्यास अपुरी वा असमर्थ ठरलेली दिसत आहे.

दुसरे असे की सत्ता ही लोकहितापेक्षा, आपलेच हित व भरभराट कशी करू शकेल, असेच विचार व कृती करणारी मंडळीच राजकारणांत अधिक प्रमाणांत दिसतात, तसेच शिरतात. स्वातंत्र्य मिळविण्याच्या एकमेव ध्येयाने प्रेरीत होवून, स्वार्थ सोडून सर्वस्वाचा त्याग करणारी माणसे कुठे आणि आजचे बहुसंख्य राजकारणी कुठे ! कर्तव्यापेक्षा आपलेच हक्क व फ़ायदे हयांना प्रधान समजणारी माणसेच जर कारभार करत असतील, तर जनतेला अपेक्षित असणारी कामे कशी होणार? सर्वांगीण विकास कसा, केंव्हा साधला जाणार?

# जोपर्यंत घराणेशाही नाहीशी होवून, केवळ गुणवत्ता नैतिकता आणि कार्यक्षमता हयाच निकषांवर व्यक्तींची निवड केली जात नाही; त्याच बरोबर विशिष्ट ध्येये,धोरणे,विचार प्रणाली ह्या व ह्याच पक्षांचा गाभा ठरत नाहीत; मतदानाची टक्केवारी वाढत नाही, तोपर्यंत सत्तेचा आजवरचा हा भूलभूलैया सर्व सामान्यांना हितकारी ठरणे कठीण आहे.
-------------------------
👍 "सत्तेसाठी विमुक्ताफळे !":👌💐
# चंगळवाद, (प्रामुख्याने, प्रगत देशांच्या फायद्यासाठी असणाऱ्या)
खुल्या अर्थव्यवस्थेनंतर सुरू झाला:
पैसा व उपभोगाचे
हे दुष्टचक्र!
---------------------------
# सत्ता शक्तिने,युक्तिने किंवा भक्तिने जशी मिळविता येतें त्याच प्रमाने बुद्धि,विचार वैभवाचे जोरावर आणि मते मिलवुन प्राप्त होतें. शक्तिने जी सत्ता येते तिच्यात बळजबरी असते,भक्तीच्या सत्तेमध्ये प्रेम, तर युक्तिने आलेली सत्ता फसवी ठरू शकते. ह्या उलट बुद्धि आणि विचार वैभवाची सत्ता आदराने चिरंतन होते. मते जरी सत्ता देतात, परंतु ती टीकविणे कठीण असते.

सत्तेचा माज चांगला नव्हे, त्याच्यामुळे केंव्हा होत्याचे नव्हते, होईल काही सांगता येत नाही. हा सत्तेचा खेळ घरीं, दारी आणि सर्वत्र नेहमी चाललेला दिसतो.
--------------------------
# 'कोंबडं कितीही झाकलं, तरी सूर्य ऊगवायचा थांबत नाही'. पदोपदी थापा व बाता मारून सत्य, कितीही लपवायचा प्रयत्न केला, तरी केव्हां ना केव्हा, सत्य सूर्यप्रकाशासारखे प्रत्यक्षात येतेच, येते.
तशीच, आपली (नसलेली) कुवत, कार्यक्षमता, छाती फुगवून, कितीही वाढवलेली दाखवली, तरी ती केव्हां, ना केव्हा, आपली जागा इतरांना दाखवतेच, दाखवते. अशा वेळी, अपेक्षित 'सुशासन' हे एक म्रुगजळच ठरते.
---------------------------
👍"राजकारणासाठी नवकल्पना !"👌
# राजकारणात प्रवेश मिळविण्यासाठी इतर स्पर्धा परिक्षांसारखीच CET असावी. घराणेशाहीपेक्षा गुणवत्ता, कामं करण्याची हातोटी, कामं सोपे करुन समाजाभिमुख निर्णय ठामपणे घेण्याची क्षमता, यावर cet उत्तीर्ण इच्छुकांच्या लेखी मुलाखती घेऊन लोकसेवक पात्रता प्रमाणपत्र दिले जावे. केवळ ह्या प्रमाणपत्र धारकांनाच निवडणूक लढविता यावी.
# निवृत्तीचं वय निश्चितच असावं. "सत्तापद किती वेळा एका व्यक्ति कडे ठेवायचे याचे निकष ठरवले जावेत.
युएसएचे अध्यक्ष पद दोन वेळा प्राप्त करता येते, तसेच भारतातसुद्धा पद प्राप्त करण्यास कालमर्यादा घातली पाहिजे.
भारताचे प्रमुख नेते होते, त्यांनी हे संकेत निर्माण केले पाहिजे होते. जसे युएसए चे पहिले अध्यक्ष यांनी हा संकेत विहित केला आहे.
#पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार महापौर नगराध्यक्ष सरपंच ही पदे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्यत्व पण किती वेळा प्राप्त करायचे याचे निकष निश्चित केले पाहिजेत. फक्त दोन वा तीन वेळा भुषविता यावीत.
तसेच शासकीय महामंडळे व पक्षातील पदे ही काल मर्यादित केली पाहिजेत.
# अपत्य मर्यादा ही स्था स्व सं सदस्य यांना लागू आहे, त्यांच्याप्रमाणेच विधानमंडळ व संसद सदस्य यांना लागू करावी.

परंतु भारतात कायदे केल्या शिवाय काही सुधारणा होत नाहीत, त्यामुळे राजकारणात लोकसेवकाचे सर्वंकष निकष कोणते असावेत ते मुक्रर करून, त्यासंबंधी योग्य ते कायदे करावेत.

सारांश राजकारण व साधनशुचिता, तसेच निव्रुत्तीचे निकष अशा अनेक विषयांवर राष्ट्रीय महाचर्चेची व त्यानुसार आदर्श आचारसंहिता व सुविहीत कायदे त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी व्हायला हवी.

शेवटी..
लक्षात ठेवा:
'' सर्वांना आजचा दिवस,
कालच्यापेक्षा चांगला होता,
असे उद्या वाटायला हवें !

धन्यवाद
सुधाकर नातू


बुधवार, २९ जून, २०२२

# 👍"टेलिरंजन-'आवडती होई नावडती !":😢

 👍"टेलिरंजन-'आवडती होई नावडती' !":😢

👍टीव्हीवरील मालिकांबद्दल खूप टीका आणि नांवे ठेवून झालेली आहेत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आणि त्याप्रमाणे जो तो टीव्हीवरील कार्यक्रम पाहात असतो. मराठी साहित्यात अनेक उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या एवढेच काय नाटके असूनही दुर्दैवाने, त्यांचे रूपांतर मालिकांमध्ये सहसा होताना दिसत नाही. त्यामुळे ठराविक साच्याच्या मालिका आपल्याला पाहाव्या लागतात.😢

😊 बहुदा असा अनुभव येतो की, सुरुवातीला खूप जाहिरात करून मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढवला जातो आणि सुरुवातही बऱ्यापैकी उत्कंठावर्धक असते. परंतु कथेचा जीव इवलासा असल्यामुळे अखेरीस तिच्यामध्ये काहीना काही नको ती वळणे घेण्याचा प्रयत्न होतो. परंतु बहुशः असं आढळतं की, आवडती मालिका पाहता-पाहता नावडती होते.😢

☺️ सगळ्याच मालिका पहाणं कुणालाही अशक्य आहे. मी ज्या काही मालिका पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बाबतीतला माझा अनुभव या लेखामध्ये मी व्यक्त केला आहे. आपणही या दिशेने ज्या मालिका पहात असाल त्यांच्या बाबतीत 'आवडती होई नावडती'असा अनुभव तुम्हाला येतो कां, ते पडताळून जरूर पहा....😢😢

😊 "मन झाले खट्टू खट्टू !":😢
प्रत्येक मालिका जसजशी पुढे जाते तस तसे आपल्याला त्यामध्ये गुंतावेसे वाटते आणि अमुक एक घटना व्हावी अशी इच्छा निर्माण होत असते. "मन उडू उडू झालं" मध्ये इंद्रा आणि दीपिका यांचं जगावेगळ अतूट प्रेम एकदाच यशस्वी व्हावं आणि त्यांचा विवाह असंच नेम वाटत असतं. परंतु त्याची पूर्तता न करता लांबण लावत गेलं की, कंटाळा येतो ती मालिका पाहायचा. अशाच प्रकारचा अनुभव पुष्काळ मालिकांमध्ये येतो आणि आपण त्या मालिका बघायचे बंद करतो.

😊"तुझ्या माझ्या संसाराला, काही ही नको !":😢
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं यामध्ये एकुलती एक असलेली मुलगी १५ जणांच्या कुटुंबात सिद्धू या प्रियकरा बरोबर येते. त्यांचं एकदाचं काही ना काही करून मिलन व्हावं. मनं जुळावी असं वाटत असतं. परंतु वाटेल तसे फाटे फोडत गेल्यामुळे आपल्याला ही मालिकाही बघू नये असं वाटून जातं आणि मालिका बघणं बंद होतं.

☺️"नको तुझी माझी गांठ !":😢
"माझी तुझी रेशीम गांठ" मध्ये, यश जो गर्भश्रीमंत आहे उद्योगपतीचा नातू आहे, तो एक मुलगी असलेल्या कदाचित घटस्फोटित,नक्की माहीत नाही अशा नेहाच्या प्रेमात पडतो. हे पचवतो प्रेक्षक आणि केव्हा ना केव्हा तरी त्यांचा एकदाचा विवाह व्हावा आणि गंगेत घोडं आलं, असं व्हावं अशा अपेक्षेने मालिका पहात जातो. परंतु इथेही लांबण लावली जाते, विवाह झाल्यानंतरही काही करून मालिका पुढे न्यायचा प्रयत्न होतो, ते प्रेक्षकाला रुचत नाही मालिका पाहणे बंद करतो.

😊 "रंग माझा भंगला !":😢
"स्टार प्रवाह"वरील, "रंग माझा वेगळा" मध्ये अतिरेकी अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जुळ्या दोन मुलींमधली एक मुलगी आपली नाही असे डॉ कार्तिकने समजणे आणि त्याच्या आणि दीपामधला दुरावा वाढत जाणे, यामुळे ही मालिका देखील नकोशी होऊन जाते.

☺️ "मनातून उतरली सुंदरा !"😢
"सुंदर मनामध्ये भरली" मध्ये पोस्टमनची मुलगी लतिका आणि तिचा विचित्र योगायोगाने होणारा अभिमन्यूची विवाह आणि त्यानंतर त्यांच्यामधले हेवेदावे, दुरावे इथपर्यंत मालिका सुसह्य होते. परंतु त्यानंतर वाटेल तसे फाटे फोडत, मालिका चालूच ठेवली जाते आणि तेच ते चेहरे त्याच त्याच प्रकारच्या एकंदर उलथापालथी पाहून ही मालिकाही बाजूला पडते, पाहिली जात नाही.

😊 "जगावेगळी सोशिक सुंदरी !":😢
कौटुंबिक दबावामुळे नको असलेल्या खेडूत मुलीशी-'सुंदरी'शी लग्न झालेला, आदित्य आपल्या माँडर्न सुसवरुप प्रेयसीशी अनुशी गुपचूप पणे लग्न काय करतो आणि नंतर सुंदरीला त्याची ही भानगड लक्षात येईपर्यंत, प्रेक्षकांच्या एकंदर सहनशक्तीचा अंत होईल इतके लपंडाव संपल्यावर देखील अनु गर्भावती असल्यामुळे सुंदरी आदित्यचे हे बिंग काही केल्या कुणालाही सांगत नाही, हे असे उरफाटे चांगुलपण पटतच नाही. किती विचित्र सोशिकपणा सुंदरीचा, याला काही मर्यादा? खरोखर हे सारे जगावेगळे, न पटणारे आणि कदाचित मूर्खपणाचेही.
त्यामुळे ही मालिका देखील आवडतीची नावडती होऊन गेली.

😊 "जीव माझा कोपला !":😢
"जीव माझा गुंतला" मध्ये पत्रिकांचा गोंधळ आणि त्यामध्ये अंतरा आणि आणि मल्हारचा विवाह, त्यांचे एकमेकाना न आवडणे आणि जिने पत्रिकांचा हा गोंधळ करून मल्हारला मिळवायचा प्रयत्न केलेला असतो, त्या मोठ्या बहिणीचा एकंदर त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न, तिथपर्यंत मालिका रंगतदार होती. परंतु नंतर रिक्षावाली अंतरा आणि मल्हारची कूल कॅब यांच्या द्वंद्वात मालिका कशीही भरकटते. ही मालिका देखील पाहणं नकोसं वाटतं.

☺️ "तू आता नकोशी !":😢
"तू तेव्हा तशी" मध्ये चाळिशीला आलेला पट्टया आणि त्याला कॉलेज सोडल्यावर वीस वर्षांनी भेटणारी त्याच्या मनातली राणी, अनामिका यांची ओळख, मैत्री आणि हळूहळू प्रेमात रुपांतर त्यामध्ये त्याच्या वहिनीचा बिब्बा किंवा अनामिकाच्या आईचा खोडा, इथपर्यंत मालिका पाहणे सुसह्य होते. परंतु काही केल्या त्यांचा विवाह लांबत नेल्याने या मालिकेतला ही रस नाहीसा झाला.

😊 "काय शोधायचं इथे ?": 😢
"स्टार प्रवाह"वरील, 'स्वाभिमान' मधील पल्लवी आणि शांतनु ह्यांचे विलक्षण नाट्यमय चढ-उतार असणारे आयुष्य, त्यामध्ये प्रेमाच्या त्रिकोणाची तिसरी बाजू निहारिका येणे, इथपर्यंत ही मालिका बघावीशी वाटायची. पण नंतर जे काही गोंंधळ वाटेल तसे दाखवले गेले त्यामुळे मालिका कंटाळवाणी होत गेली. "स्वाभिमान, शोध अस्तित्वाचा" म्हणायच्या ऐवजी काय शोधायचं त्याच्यात, असं वाटून मालिका नकोशी झाली.

😊 "आता आई काही नको करू !":😢
"स्टार प्रवाह"वरील, दोन-तीन वर्ष गाजत असलेली "आई कुठे काय करते" मालिका तर अरुंधती आणि एक्सीडेंट मधून बरा झालेल्या आशुतोषचा एकदाचा विवाह व्हावा, इतपत वाटणे आणि तोपर्यंत मालिका पाहणे आवडीचे होते. परंतु त्यानंतर कुणालाही कसेही वागायला लावून मालिका भरकटतच चालली आहे आणि हे काय चाललय बाबा, आता आई काही नको करू असे सांगायची वेळ आलेली आहे.

☺️ " कसलं हे सुंदर घर !":😢
"सुंदर आमचं घर" यामध्ये काय सुंदर आहे, कुणास ठाऊक ! कारण बायकांचा छळ आणि कसंही करून ओढूनन ताणून मुंबईतल्या मुलीचा-काव्याचा राज पाटलांच्या मुलाशी विवाह इथपर्यंत मालिका पाहणे जमत होते. त्यामध्ये त्याच्या आधी ठरलेल्या वागदत्त वधूची आणि या मुंबईतल्या मुलीची स्पर्धा इथपर्यंत मालिका पाहिली कशीबशी गेली. परंतु त्यानंतर कशाला पाहिजे ही मालिका, असाच सगळा प्रकार चाललेला आहे.

😊 "उदंड जाहली ती वार्तापत्रे !":😢
जे मालिकांचं तेच कथाबाह्य कार्यक्रमांचे. कोणत्याही कलाक्रुतीचे प्रमोशन करण्यासाठी, सुरू झालेली मालिका किंवा कार्यक्रम ठुकरटवाडी आणि त्याचा सूत्रधार "चला हवा येऊ द्या" हा कार्यक्रम रंगतदार झाला काही वर्ष, पण आता भरकटत जाऊन तेच ते चेहरे आणि त्याच्यात हिडीस प्रकारचा, पुरुषाने बाईचे रूप हा विचित्र प्रकार यामुळे ही मालिका बंद व्हावी. हा कार्यक्रम पाहणे आता असह्य झाले आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी वरचा कार्यक्रम नक्कीच त्यामानाने दर्जेदार होता. परंतु त्याचाही अतिरेक होत चालला आहे आणि तेच ते चेहरे तशाच ठरीव प्रहसनांमुळे, लवकरच नकोसे वाटू लागेल. "बँड बाजा बारात" किंवा "किचन कल्लाकार" हे कार्यक्रमही तितकेसे रंग भरू शकलेले नाहीत. याला फक्त एक अपवाद म्हणजे भाऊजींचा चाललेला अठरा वर्षांचा "होम मिनिस्टर" हा कथाबाह्य कार्यक्रम, नंतर महामिनिस्टरने तर साऱ्या वहिनींचे आणि महिलांचे मन जिंकून घेतले.

थोडक्यात मालिका असोत वा कथाबाह्य कार्यक्रम असोत, एकंदर करमणूक प्रकार करण्याचा इंडियन बॉक्स वरील कार्यक्रमांचा दर्जा 'नांवा'प्रमाणेच खालावत चालला आहे !😢😢

😊"जुने ते सोने !":😢
बातम्यांच्या वाहिन्यांचाही तोच प्रकार आहे. सगळीकडे अर्ध्या अर्ध्या तासाने जवळजवळ त्याच त्याच दोन-चार घटना दाखवल्या जातात आणि दिवस कसातरी संपवला जातो. त्यामध्ये जाहिरातींचाही पाऊस असल्यामुळे ह्या वाहिन्यांवरील बातम्या पहाव्याशा वाटत नाहीत. त्यापेक्षा दूरदर्शन वरील रात्री साडेनऊच्या विश्वासार्ह बातम्या पाहिल्या, तरी पुरेसे, असेच चोखंदळ प्रेक्षकांना वाटते आहे. टीवीवरील कार्यक्रमांचा दर्जा पूर्ण खालावत चालला आहे हे निश्चित.

👍"आपण हे लक्षात घ्याच !::👌💐
मराठी साहित्यामध्ये अनेक उत्तम उत्तम कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटके आहेत त्यांच्यावर बेतलेल्या योग्य ती मर्यादा असणाऱ्या, अशा मालिका कां काढल्या जात नाहीत, याचे नवल वाटते आणि एकमेकांची कॉपी करणाऱ्या मालिकाच वेगवेगळ्या वाहिन्यांवर प्रेक्षकांच्या माथी मारल्या कां जातात कळत नाही. त्यामुळे मालिका टीव्ही बघणे हे डाउन मार्केट वाटू शकते आणि आम्ही टीवी मालिका बघतच नाही, हे सांगणे हे सुसंस्कृत असल्याचे काही जण भासवतात. परंतु टीव्हीच्या प्रत्यक्षदर्शी अशा शक्तीमुळे या माध्यमातून समाजोपयोगी असे भरपूर काही करण्यासारखे आहे, याची कोणाला जाणच नाही. केवळ जाहिरातींचा पाऊस आणि पाणी घालत पुढे पुढे नेलेल्या मालिका, यामुळे हे माध्यम संकटात केव्हाही येऊ शकते आणि त्याची जागा ओ टी टी वरील निश्चित मर्यादा असलेल्या शोजना प्राधान्य दिले जाऊ शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

धन्यवाद
सुधाकर नात

शुक्रवार, २४ जून, २०२२

#👍"शारदोत्सव !": #👍"नांवात काय आहे?":☺️

👍"शारदोत्सव !":👌

👍"नांवा'त काय आहे?":☺️

☺️ "पद्मगंधा"दिवाळी अंक'२० मी वाचत होतो. एक पान उघडलं आणि त्यामध्ये संपादक अरुण जाखडे यांची मुलाखत वाचायला मिळाली. त्यामध्ये त्यांना प्रश्न केला होता की, तुमच्या अंकाला तुम्ही "पद्मगंधा" हे नांव कसे दिले ? त्याचं त्यांनी उत्तर दिलं "कालिदासाच्या "शाकुंतल" नाटकामध्ये, शकुंतलेला 'पद्मगंधा' या नावाने संबोधले आहे, म्हणून मी ते नाव माझ्या अंकाला दिलं." 👌

👍हे वाचल्यावर मला आठवलं की माझी पत्नी, तिचं नाव मी केव्हा कसं ठेवलं आणि त्याचं पुढे काय झालं ! पुष्कळ वर्षांपूर्वी भुसावळ स्टेशनवर तिला पाहताक्षणीच ती आवडली, मला पसंत पडली आणि हीच आपली बायको असे गृहीत धरून मी पुढे प्रवासाला लागलो. रात्रीची वेळ होती आणि झोपायची तयारी ट्रेनमध्ये मी करत होतो. अशा वेळेला गाडी जात असताना आजूबाजूच्या परिसरातून निशिगंधाच्या फुलांचे सुगंध माझ्या भोवती दरवळले. त्या क्षणाला मी ठरवले की माझ्या बायकोचं नाव 'निशिगंधा' ठेवणार आणि झालंही तसच. पुढे विवाह झाल्यानंतर तांदुळात मी जे नाव लिहिलं ते 'निशिगंधा' ! 👌💐

😊 पण गंमत अशी की, त्यानंतर कधीही मी तिला या नावाने किंवा निशा वा गंधा असं म्हणत, बोलत नसे. तिचं पहिलं नाव जे होतं 'कुंदा' तेच तेव्हापासून आजतागायत माझ्या तोंडात बसलं आहे. म्हणजे फक्त 'निशिगंधा' नांव, नांव ठेवण्यापुरतच राहिलं !☺️

👍खरा किस्सा अजून पुढे आहे. नंतर एकदा कधीतरी आमच्या शेजारच्या मला म्हणाल्या "निशा" कुठे आहे?" मी त्यांना नकळल्यासारखं विचारलं कोण निशा?" त्यावर त्या म्हणाल्या "अहो तुमची बायको निशिगंधा !" तेव्हा मला जाणवलं की मी माझ्या बायकोचं नाव 'निशिगंधा' ठेवलं आहे. तर अशी नावांची गंमत असते. तुम्ही कोणतं नांव ठेवता, याच्यापेक्षा कोणतं नांव तुमच्या तोंडात येत जातं आणि सातत्याने उच्चारलं जातं, तेच शेवटी त्या व्यक्तीचे नांव होतं. माझ्यासारखाच काही व्यक्तींच्या अशाच कथा आहेत, बायकोला ठेवलं नांव एक आणि म्हणायचं मात्र पहिलंच माहेरचं, हीच तर गंमत आहे नावांची !💐

😊 पण माहेरचं नाव म्हणायचा कधीकधी घोटाळा कसा होतो, त्याचा एक किस्सा माझ्या एका मित्राचा आहे. त्याच्या बायकोच्या माहेरचं नाव सुनिता आणि त्याने ठेवलेलं नांव मात्र मनीषा. पण गंमत अशी झाली की, तिच्या पासपोर्टवर पहिलेच नाव 'सुनिता' हे चुकून टाकलं गेलं आणि तेच कायम राहिलं. त्यामुळे परदेशात गेल्यावर कागदोपत्री 'सुनिता' हेच नाव आणि म्हटलं जातं मात्र 'मनीषा' ! म्हणजे इथे उलटी गिनती सुरू झाल्यासारखं झालं. माहेरचं नांव 'सुनिता' कागदावरच राहिलं आणि प्रचलित नांव हे त्याने स्वतः ठेवलेलं 'मनीषा' हेच सर्वदूर झालं.👌

👍शेवटी प्रश्न हात उरतो की नवऱ्याला बायकोला नांव ठेवायची जी एकमेव संधी मिळते, तेव्हा तो जे नांव ठेवतो ते नंतर प्रचारात प्रचलित राहतच असं नाही, पहिलं माहेरचं नांव कदाचित कायम ज्याच्या त्याच्या तोंडी राहतं, हे कसं ?☺️

👍जाता जाता एक निरीक्षण असं की, हल्ली
"झी मराठी"वर 'महामिनिस्टर' हा लोकप्रिय कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये प्रत्येक वेळेला मंचावर
सहा सहा माऊलींच्या ओळखी करून दिल्या जातात, त्यांच्या गप्पांमधून. त्यामधून मला लक्षात आलं की, जवळ जवळ 99% महिलांचं माहेरचं आणि सासरचं नांवही तेच असतं. हे म्हणजे आताच्या पिढीला आपल्या बायकोला नांव ठेवायला जागा उरली नाही असंच म्हणायचं. शेवटी बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव आहे दुसरं काय !

👍विवाहानंतर बायकोचं नाव बदलायचं नाही ही जशी पद्धत आहे त्याच प्रमाणे काही जणी आपलं आडनाव लावत नाही ही आणि फक्त स्वतःचं नाव आणि कदाचित नवऱ्याचं नाव पुढे एवढीच ओळख ठेवतात जसं विमल नारायण, मोहिनी विनोद इ.इ.
अजून एक प्रकार म्हणजे आपलं नाव आडनाव आणि सासरचे आडनाव एवढच लावायचं जसं विजया साठे जोशी किंवा अरुंधती आपटे केळकर इ.इ. अगदी अलीकडचा प्रकार म्हणजे आपलं नाव आपल्या आईचं नाव नंतर वडिलांचं नंतर नवऱ्याचं बास जसं कमला सावित्री मनोहर अरविंद.. आडनाव बहुदा गायब. बदलत्या काळात ही सगळी सुधारणा स्त्रीमुक्ती त्या दृष्टीने अनुकूल आणि वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल.👌💐

👍होतो कुठे? नांवात काय आहे, हे शोधत आणि आलो कुठे, तर सध्याच्या जमान्यात जो तो एकमेकांना नांवे ठेवण्यात गर्क आहे. आपण मोठे शहाणे व इतर सगळे चुकीचे, त्यांचे दोष उघडायचे, वाटेल तशी त्यांना बिरुदे लावायची आणि त्यातच आनंद मानायचा, हाही एक अभिनव मस्तीचा प्रकार प्रसार माध्यमांच्या विस्तारामुळे नावाजलेला दिसतो.👌🎂

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, २२ जून, २०२२

👍"दैनंदिनीच्या पाऊलखुणा-२":👌

👍"दैनंदिनीच्या पाऊलखुणा-२":👌

💐आता ह्या अभिनव संकल्पनेचा पुढील भाग म्हणून, माझ्या २०१० ह्या वर्षाच्या डायरीतील ५ ते १२ जानेवारी ह्या दिवसांच्या नोंदी पुढे देत आहे:

# ५ जानेवारी २०१० मंगळवार

"जन्मदिन":
5 जानेवारी 1592 शहाजहानचा जन्म
5 जानेवारी 1913 नाटककार कादंबरीकार श्री ना पेंडसे यांचा जन्म
5 जानेवारी 1948 गायिका अभिनेत्री फैयाज यांचा जन्म
5 जानेवारी 1941 मन्सूर अली खान पतौडी ह्यांचा जन्म

"दिनविशेष":
5 जानेवारी 1924 महाडचे चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले
5 जानेवारी 1949 पंडित नेहरूंच्या हस्ते एनडीए खडकवासला केंद्राचे उदघाटन

"कल्पना"
* विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या पत्रिकांचा संग्रह बनवणे
* ज्योतिष विषयक पुस्तकांचा अभ्यास करणे

"संग्रहित जन्मपत्रिका":
विक्रमवीर सचिन तेंडुलकर सर दोराबजी टाटा नेल्सन मंडेला
--------------------------
# 6 जानेवारी २०१० बुधवार

"जन्मदिन":
6 जानेवारी 1962 अभिनेत्री बिंदिया गोस्वामीचा जन्म
6 जानेवारी 1925 विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म
6 जानेवारी 1959 अष्टपैलू क्रिकेट कर्णधार
कपिल देवचा जन्म

"दिनविशेष":
6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतले पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले. म्हणून हा पत्रकार दिन मानला जातो.

"विशेष नोंद"
भाग्यांक जन्मतारीखेचा /संपूर्ण जन्मतारीखेचा
एक-रवी दोन-चंद्र तीन-गुरू चार -हर्षल व राहू
पाच-बुध सहा-शुक्र सात-नेपच्यून आठ-शनी
नऊ-मंगळ
संपूर्ण जन्मतारखेची बेरीज होईल तो भाग्यांक समजावा.
जन्मतारीख जी असेल त्याप्रमाणे भाग्यांक समजावा.
---------------------------
# 7 जानेवारी २०१० गुरुवार

"जन्मदिन":
7 जानेवारी 1919 चंद्रकांत गोखले यांचा जन्म
7 जानेवारी 1928 विजय तेंडुलकर यांचा जन्म

"दिनविशेष":
7 जानेवारी 1610 गॅलिलिओने गुरु ग्रहाचा शोध लावला

"कल्पना":
जिच्याबद्दल उद्बोधक वाचलेले भावलेले असेल त्या व्यक्तीला आस्वादक पत्र पाठवणे

"विशेष नोंद":
* जॉर्डन चा राष्ट्रीय पक्षी ऊंट

* पुढील काही वर्षातील शनीचे राशीप्रवेश:
सप्टेंबर 2009 कन्या
नोव्हेंबर 2011 तुळ
मार्च 2014 व्रुश्चिक
जानेवारी 2017 धनु
जानेवारी 2020 मकर
एप्रिल 2022 कुंभ
मार्च 2025 मींन
मे 2027 मेष
आँगस्ट 2029 व्रुषभ
मे 2032 मिथून.
जुलै-2034 कर्क

-----------------------------
# 8 जानेवारी शुक्रवार

"जन्मदिन":
8 जानेवारी 1916 रामकृष्ण रामनारायण रुईया यांचा जन्म
8 जानेवारी नोबेल विजेते शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचा जन्म

"दिनविशेष":
8 जानेवारी 2015 महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून आगमन
8 जानेवारी 2001 खग्रास चंद्रग्रहण
8 जानेवारी अनिवासी भारतीय दिन

"विशेष नोंद":
* विशाखा दिवाळी अंक 2009 मधील दोन व्यक्तिरेखा संस्मरणीय वाटल्या:
^ बहुआयामी डॉक्टर गोपाळ लोणी हे संस्कृत पंडित चित्रकार गिर्यारोहक व चांगला सहृदय डॉक्टर माणूस
^ वेंकटेश्वर हॅचरीजचेसं डॉक्टर बी व्ही राव दुग्ध पालन व कुक्कुटपालन विषयाचे ज्ञान मिळवून अतिशय उत्कृष्ट असा दर्जाचा व्यवसाय निर्माण करणाऱ्या या माणसाचे जीवन चरित्र खरोखर प्रेरणादायी आणि थरारक वाटले
^ याव्यतिरिक्त उद्योजक अशा अनेक व्यक्तिरेखांची तोंड ओळख ह्या अंकामध्ये करून दिली आहे. -वालचंद/लालचंद हिराचंद, वसंतराव वैद्य,
विनय फडणीस बिर्ला घराणे, फिरोदिया व गोदरेज इत्यादी इत्यादी..
यांनी निर्माण केलेले उद्योगविश्व अनेक कुटुंबांचे पोषण करते तर झालेच, पण देशाच्या औद्योगिक आर्थिक प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरले. धडपड अविरत कष्ट ध्येयनिष्ठा व जीवनातील संधी हेरून त्यांचे सोने करणारी ही सारी मंडळी खरोखरच जगावेगळी. अशी माणसे अधून मधून निर्माण होत असतात म्हणूनच हे जग घडत राहते व पुढे जात राहते.
----------------------------
# नऊ जानेवारी शनिवार

"जन्मदिन":
नऊ जानेवारी 2004 कवी निस्सिम ईझिकेल यांचा जन्म
-----------------------------
# 10 जानेवारी रविवार

"जन्मदिन":
10 जानेवारी 1896 काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म
10 जानेवारी 1896 राजा केळकर संग्रहालयाचे दिनकर केळकर यांचा जन्म
10 जानेवारी 1900 माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा जन्म
10 जानेवारी 1901 इतिहास संशोधक ग.ह. खरे यांचा जन्म
10 जानेवारी 1963 अभिनेत्री निवेदिता जोशी चा जन्म

"दिनविशेष"
10 जानेवारी 1930 पहिल्या बाजीरावाने पुण्यामध्ये शनिवार वाड्याचे बांधकाम सुरू केले
10 जानेवारी 1940 युनोचे पहिले अधिवेशन लंडनला भरले
10 जानेवारी जागतिक हास्य दिन

"विशेष नोंद":
वामनराव पै यांचे मूलभूत विचार टिव्हीवर सकाळच्या आराधना कार्यक्रमात ऐकले:
"प्राचीन काळी मानव जंगलात राहायचा प्रकाश व अंधाराचा खेळ, निसर्गाचे प्रकोप व जनावरे सापांचा धोका यामुळे प्रथम भय निर्माण झाले व त्याच्यापासून मुक्तीसाठी परमेश्वर संकल्पनेची निर्मिती झाली. भय-भक्ती हा मार्ग हजारो वर्षे सुरू आहे.
-------------------------
# 11 जानेवारी सोमवार

"जन्मदिन":
11 जानेवारी 1859 लाँर्ड कर्झनचा जन्म
11 जानेवारी अठराशे 98 खांडेकर यांचा जन्म
11 जानेवारी 1928 पंडित अरविंद गजेंद्रगडकर यांचा जन्म
11जानेवारी अजित कडकडे यांचा जन्म
11 जानेवारी 1974 राहुल द्रविड यांचा जन्म
11 जानेवारी गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

"दिनविशेष":
11 जानेवारी 1955 नेपानगर येथे वृत्तपत्र कागदाची गिरणी सुरू.
-----------------------------
12 जानेवारी मंगळवार

"जन्मदिन":
12 जानेवारी 1900 भारतीय संस्कृती कोशकार पंडित महादेव शास्त्री जोशी यांचा जन्म
12 जानेवारी पंधराशे 98 राजमाता जिजाबाई यांचा जन्म
12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंदांचा जन्म
12 जानेवारी 1943 चित्रपट निर्मात्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा जन्म

"दिनविशेष":
"12 जानेवारी सतराशे आठ शाहू महाराजांचा साताऱ्यात राज्याभिषेक
12 जानेवारी 1992 कुमार गंधर्व यांचे निधन
12 जानेवारी 2005 अभिनेता अमरीश पुरींचे निधन

"कल्पना":
*आपले चांगले लेख पाठवणे.
* यश मिळवण्यासाठी ध्येय लक्ष निश्चित करा आपल्या मर्यादा ओळखा, टीकांकडे लक्ष देऊ नका लक्ष्यावर लक्ष केंद्रित करून, प्रयत्न करत रहा.
----------------------------

👍"जुने ते सोने" या न्यायाने या सगळ्या नोंदी, आपल्याला आवडतील आणि आपल्या माहीतीमध्ये भर पाडतील, असा मला विश्वास आहे.
आपल्या योग्य त्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू
# ५ जानेवारी मंगळवार

"जन्मदिन":
5 जानेवारी 1592 शहाजहानचा जन्म
5 जानेवारी 1913 नाटककार कादंबरीकार श्री ना पेंडसे यांचा जन्म
5 जानेवारी 1948 गायिका अभिनेत्री फैयाज यांचा जन्म
5 जानेवारी 1941 मन्सूर अली खान पतौडी ह्यांचा जन्म

"दिनविशेष":
5 जानेवारी 1924 महाडचे चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले
5 जानेवारी 1949 पंडित नेहरूंच्या हस्ते एनडीए खडकवासला केंद्राचे उदघाटन

"कल्पना"
* विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या पत्रिकांचा संग्रह बनवणे
* ज्योतिष विषयक पुस्तकांचा अभ्यास करणे

"संग्रहित जन्मपत्रिका":
विक्रमवीर सचिन तेंडुलकर सर दोराबजी टाटा नेल्सन मंडेला
---------------------------------------
# 6 जानेवारी बुधवार

"जन्मदिन":
6 जानेवारी 1962 अभिनेत्री बिंदिया गोस्वामीचा जन्म
6 जानेवारी 1925 विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म
6 जानेवारी 1959 अष्टपैलू क्रिकेट कर्णधार
कपिल देवचा जन्म

"दिनविशेष":
6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतले पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले. म्हणून हा पत्रकार दिन मानला जातो.

"विशेष नोंद"
भाग्यांक जन्मतारीखेचा /संपूर्ण जन्मतारीखेचा
एक-रवी दोन-चंद्र तीन-गुरू चार -हर्षल व राहू
पाच-बुध सहा-शुक्र सात-नेपच्यून आठ-शनी
नऊ-मंगळ
संपूर्ण जन्मतारखेची बेरीज होईल तो भाग्यांक समजावा.
जन्मतारीख जी असेल त्याप्रमाणे भाग्यांक समजावा.
------------------------------------------
# 7 जानेवारी गुरुवार

"जन्मदिन":
7 जानेवारी 1919 चंद्रकांत गोखले यांचा जन्म
7 जानेवारी 1928 विजय तेंडुलकर यांचा जन्म

"दिनविशेष":
7 जानेवारी 1610 गॅलिलिओने गुरु ग्रहाचा शोध लावला

"कल्पना":
जिच्याबद्दल उद्बोधक वाचलेले भावलेले असेल त्या व्यक्तीला आस्वादक पत्र पाठवणे

"विशेष नोंद":
* जॉर्डन चा राष्ट्रीय पक्षी ऊंट

* पुढील काही वर्षातील शनीचे राशीप्रवेश:
सप्टेंबर 2009 कन्या
नोव्हेंबर 2011 तुळ
मार्च 2014 व्रुश्चिक
जानेवारी 2017 धनु
जानेवारी 2020 मकर
एप्रिल 2022 कुंभ
मार्च 2025 मींन
मे 2027 मेष
आँगस्ट 2029 व्रुषभ
मे 2032 मिथून.
जुलै-2034 कर्क
( 👍ह्यावर आजची माहीती:
ज्या राशीत शनि असतो, ती रास व त्या राशीच्या मागची व पुढची रास अशा ३ राशींना शनिची साडेसाती असते. सध्या कुंभ राशीत शनी आहे म्हणून मकर कुंभ व मीन राशींना सध्या शनिची साडेसाती आहे.)
----------------------------------------------
# 8 जानेवारी शुक्रवार

"जन्मदिन":
8 जानेवारी 1916 रामकृष्ण रामनारायण रुईया यांचा जन्म
8 जानेवारी नोबेल विजेते शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचा जन्म

"दिनविशेष":
8 जानेवारी 2015 महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून आगमन
8 जानेवारी 2001 खग्रास चंद्रग्रहण
8 जानेवारी अनिवासी भारतीय दिन

"विशेष नोंद":
* विशाखा दिवाळी अंक 2009 मधील दोन व्यक्तिरेखा संस्मरणीय वाटल्या:
^ बहुआयामी डॉक्टर गोपाळ लोणी हे संस्कृत पंडित चित्रकार गिर्यारोहक व चांगला सहृदय डॉक्टर माणूस
^ वेंकटेश्वर हॅचरीजचेसं डॉक्टर बी व्ही राव दुग्ध पालन व कुक्कुटपालन विषयाचे ज्ञान मिळवून अतिशय उत्कृष्ट असा दर्जाचा व्यवसाय निर्माण करणाऱ्या या माणसाचे जीवन चरित्र खरोखर प्रेरणादायी आणि थरारक वाटले
^ याव्यतिरिक्त उद्योजक अशा अनेक व्यक्तिरेखांची तोंड ओळख ह्या अंकामध्ये करून दिली आहे. -वालचंद/लालचंद हिराचंद, वसंतराव वैद्य,
विनय फडणीस बिर्ला घराणे, फिरोदिया व गोदरेज इत्यादी इत्यादी..
यांनी निर्माण केलेले उद्योगविश्व अनेक कुटुंबांचे पोषण करते तर झालेच, पण देशाच्या औद्योगिक आर्थिक प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरले. धडपड अविरत कष्ट ध्येयनिष्ठा व जीवनातील संधी हेरून त्यांचे सोने करणारी ही सारी मंडळी खरोखरच जगावेगळी. अशी माणसे अधून मधून निर्माण होत असतात म्हणूनच हे जग घडत राहते व पुढे जात राहते.
-------------------------------------------
# नऊ जानेवारी शनिवार

"जन्मदिन":
नऊ जानेवारी 2004 कवी निस्सिम ईझिकेल यांचा जन्म
--------------------------------------------
# 10 जानेवारी रविवार

"जन्मदिन":
10 जानेवारी 1896 काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म
10 जानेवारी 1896 राजा केळकर संग्रहालयाचे दिनकर केळकर यांचा जन्म
10 जानेवारी 1900 माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा जन्म
10 जानेवारी 1901 इतिहास संशोधक ग.ह. खरे यांचा जन्म
10 जानेवारी 1963 अभिनेत्री निवेदिता जोशी चा जन्म

"दिनविशेष"
10 जानेवारी 1930 पहिल्या बाजीरावाने पुण्यामध्ये शनिवार वाड्याचे बांधकाम सुरू केले
10 जानेवारी 1940 युनोचे पहिले अधिवेशन लंडनला भरले
10 जानेवारी जागतिक हास्य दिन

"विशेष नोंद":
वामनराव पै यांचे मूलभूत विचार टिव्हीवर सकाळच्या आराधना कार्यक्रमात ऐकले:
"प्राचीन काळी मानव जंगलात राहायचा प्रकाश व अंधाराचा खेळ, निसर्गाचे प्रकोप व जनावरे सापांचा धोका यामुळे प्रथम भय निर्माण झाले व त्याच्यापासून मुक्तीसाठी परमेश्वर संकल्पनेची निर्मिती झाली. भय-भक्ती हा मार्ग हजारो वर्षे सुरू आहे.
---------------------------------------------
# 11 जानेवारी सोमवार

"जन्मदिन":
11 जानेवारी 1859 लाँर्ड कर्झनचा जन्म
11 जानेवारी अठराशे 98 खांडेकर यांचा जन्म
11 जानेवारी 1928 पंडित अरविंद गजेंद्रगडकर यांचा जन्म
11जानेवारी अजित कडकडे यांचा जन्म
11 जानेवारी 1974 राहुल द्रविड यांचा जन्म
11 जानेवारी गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

"दिनविशेष":
11 जानेवारी 1955 नेपानगर येथे वृत्तपत्र कागदाची गिरणी सुरू.
-----------------------------------------------
12 जानेवारी मंगळवार

"जन्मदिन":
12 जानेवारी 1900 भारतीय संस्कृती कोशकार पंडित महादेव शास्त्री जोशी यांचा जन्म
12 जानेवारी पंधराशे 98 राजमाता जिजाबाई यांचा जन्म
12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंदांचा जन्म
12 जानेवारी 1943 चित्रपट निर्मात्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा जन्म

"दिनविशेष":
"12 जानेवारी सतराशे आठ शाहू महाराजांचा साताऱ्यात राज्याभिषेक
12 जानेवारी 1992 कुमार गंधर्व यांचे निधन
12 जानेवारी 2005 अभिनेता अमरीश पुरींचे निधन

"कल्पना":
*आपले चांगले लेख पाठवणे.
* यश मिळवण्यासाठी ध्येय लक्ष निश्चित करा आपल्या मर्यादा ओळखा, टीकांकडे लक्ष देऊ नका लक्ष्यावर लक्ष केंद्रित करून, प्रयत्न करत रहा.
------------------------------------------------

👍"जुने ते सोने" या न्यायाने या सगळ्या नोंदी, आपल्याला आवडतील आणि आपल्या माहीतीमध्ये भर पाडतील, असा मला विश्वास आहे.
आपल्या योग्य त्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, १९ जून, २०२२

# 👍"आशय व माध्यमे !":😊 #

 👍"आशय व माध्यमे !":😊

☺️ आज-काल परवलीचा शब्द, आशय किंवा कन्टेन्ट हाच आहे. आपल्याला वैयक्तिक व व्यावसायिक वा इतर करमणूक आदिंसाठी जे व्यक्त करायचं आहे, ते कोणत्या माध्यमातून सादर केले जावे, हे जसे महत्वाचे आहे, त्याहीपेक्षा निश्चित काय सांगितले जाते, त्यामध्ये खरोखर उपयुक्त अथवा मनाला संपूर्ण समाधान देणारा आशय कोणता आहे, याला जास्त महत्व आहे. मग ते नाटक असो, चित्रपट मालिका, बातम्या, जाहिराती वा सोशल मिडीयावर या, प्रत्यक्ष भेटीतील परस्परसंवाद इ.इ. काहीही असलं, तरी महत्त्व शेवटी आशयाला, कन्टेन्टला, हे विसरता कामा नये.😊

👍जे व्यक्त करायचं, ते प्रथम मनामध्ये रूजून उगवायला लागतं विचारांच्या स्वरूपात. त्या विचारांचं रूपांतर चपखल शब्दात होणं अत्यावश्यक असतं. तरच आणि तरच जे सांगायचं ते समोरच्याला समजू व भावू शकेल आणि इथेच कदाचित प्रत्येकाच्या मर्यादा कामास येत असाव्यात. प्रत्येकाचा विचार करण्याच्या मार्ग, कुवत सारखी नसतो वा विचार करण्याचा जो आवाका असतो तो वेगवेगळा असतो.😊

☺️त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, विचारांना योग्य त्या शब्दात व्यक्त करणे, सगळ्यांना ते जमतंच असं नाही आणि त्यामुळेच आपल्यावर आदळणारा विविध माध्यमातील आशयांचा महापूरामधून, फक्त वेचक-वेधक असा मनाला भिडणारा आशय नेहमीच मर्यादितच असतो, हे ध्यानात येईल. काळाच्या ओघात टिकणारी अशी विविध माध्यमांमधील, अर्थपूर्ण आशयाची बेटं म्हणूनच आपल्याला प्रयत्नपूर्वक शोधावी लागतात. यशस्वी लोकप्रिय चित्रपट नाटक मालिका इतरही कोणताही अविष्कार प्रकार नेहमी अनिश्चित व कमीच असतात आणि उलट फ्लाँप वा अयशस्वी आविष्कार जास्तच आढळतात.😢

👍समोरासमोर भेटणे आणि व्यक्त होणे हा मूलभूत प्रकार, व्हिडिओद्वारे पाहणे आणि ऐकून मनामध्ये रुजवणे या प्रक्रिया, तर ध्वनिफितीद्वारे केवळ ऐकणे, समजणे आणि ते करत असताना आपल्याला फायदा असा की, आपण इतर काही क्रिया कर्म त्यावेळेला करू शकतो, तर शब्दांद्वारे लेखांमधून मजकूर व्यक्त होतो ते वाचनाद्वारे मनात ग्रहण केलं जातं. त्यामुळे या चारही प्रकारात सर्वात परिणामकारक माध्यम कोणते, या प्रश्नाला उत्तर देणे कठीण आहे. प्रत्येक माध्यमाच्या काही शक्तीस्थळे, त्याचप्रमाणे कमतरता देखील असतात. योग्य माध्यम योग्य त्या आशयाला प्रत्यक्ष भेटीत अत्यंत परिणामकारक ठरू शकते. परंतु आजच्या धावपळीच्या जगात ते नेहमी जमणे शक्य नसते. व्हिडिओ कॉल द्वारे होऊ शकते, परंतु प्रत्येकाच्या मर्यादांमुळे त्याची परीणामकता तितकी नसते. 😢

👍मला तरी अजून सार्वजनिकव्यक्त होण्यासाठी कोणते माध्यम उत्तम, ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर सापडलेलं नाही. त्यामुळेच मी व्यक्त करायचं ते व्हिडिओ, ऑडिओ, संदेश लेख यातून करताना निश्चितच धडपडत आहे. मला शोध आहे तो अचूक माध्यमाचा.
आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.💐💐

धन्यवाद
सुधाकर नातू


शनिवार, १८ जून, २०२२

👍💐"वाढदिवसांच्या शब्दखुणा !":👌💐🎂

 👍💐"वाढदिवसांच्या शब्दखुणा !":👌💐🎂


👍🎂रोज चहा पिण्याची वेळ ही माझ्यासाठी कधी मधी नवीन कल्पना घेऊन येते आणि माझ्या चळवळ्या स्वभावामुळे मी त्या कल्पना प्रत्यक्षात आणत आलो आहे.
आज माझा वाढदिवस, त्यामुळे तर माझा उत्साह द्विगुणित झाला आणि त्यामधूनच "वाढदिवसाचा मुक्तसंवाद" ही ध्वनिफीत तयार झाली.
ती येथे देत आहे, उघडा आणि जरूर ऐका. 💐

मागील काही वर्षांच्या वाढदिवसांचे मनोगत देखिल पुढे देत आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू
--------------------------
१६/६/२०१९
"अम्रुतमहोत्सवी मनोगत":

माझ्या वाढदिवसाचे निमित्ताने मला शुभेच्छा देणार्या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असाच क्रुपालोभ असू द्यावा.

आज माझ्या वयाची चक्क अम्रुतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण होऊन मी ७६ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. फादर्स डेचेही निमित्त साधून माझ्या मुलीच्या घरी आमरस पुरीच्या सुग्रास भोजनाने हा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस आनंदाने साजरा झाला.

विश्वास बसत नाही इतक्या गतीने ही सारी वर्षे गेली असे मला वाटत आहे. आपण एवढी मजल गाठू शकू, अशी मला कधी खात्री वाटली नव्हती किंवा मी तसा कुठल्याही प्रकारचा खास प्रयत्न केला नव्हता. यामागे नियतीचा कोणता तरी हेतू असावा.

जन्मानंतर जीवनामध्ये आमूलाग्र वळण देणारी एकमेव घटना जर कुठली असेल, तर ती म्हणजे विवाह. जोडीदाराच्या संगतीने तुमच्या तना-मनात एक क्रांतीकारी घुसळण सातत्याने होत राहते. मला वाटते की, कोणाही माणसाला जगण्याची प्रेरणा या जोडीच्या गोडी मधूनच मिळत जशी असावी, तद्वतच त्याच्या शारीरिक, मानसिक व भावनिक भवतालावर योग्यायोग्य परिणाम होत असावा.

म्हणूनच, एखाद्या चित्रपटात शोभेल, अशा चित्तथरारक रितीने माझ्या जीवनात आलेल्या माझ्या पत्नीचे ह्या दीर्घ वाटचालीत निश्चितच महत्वाचे योगदान आहे, असे मला वाटते. यास्तव तिचे खूप खूप आभार.

मात्र ह्या क्षणी, राहून राहून मनाला वाटते, जर आपण इतकी वर्षे जगणार आहोत, हे जर आधीच माहीत असते, तर आपल्याला आयुष्य, ह्याहूनही अधिक शहाणपणाने व समंजस सजगतेने जगता आले असते.

असो, Better late than never!

आता,चवीने जगत येणारा प्रत्येक दिवस 'माझा' बनवत जीवनानुभवाचे सार असेच भरभरून वाटत रहायचे, नाही कां?

आपला,
सुधाकर नातू
१६-६-२०१९

ता.क. विवाहीत व्यक्ती, अविवाहीतांपेक्षा अधिक काळ जगतात, हे सर्वश्रुत आहे. त्या पार्श्वभूमीवर, संसारातील जोडीदार एकमेकांच्या जीवनरेखेच्या कालमर्यादेवर किती, कसा व कां परिणाम करू शकतात ह्यावर सखोल वैज्ञानिक संशोधन होणे गरजेचे आहे, हे मला आजच्या निमित्ताने सुचवावेसे वाटते.
--------------------------
१६ /६/१८

माझ्या वाढदिवसाचे निमित्ताने मला शुभेच्छा देणार्या सर्वांचे मनापासून आभार. असाच क्रुपालोभ असू द्यावा. धन्यवाद.

आज माझ्या वयाची चक्क ७४ वर्षे पूर्ण होऊन मी महोत्सवी अशा ७५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ह्या क्षणी, राहून राहून मनाला वाटते, जर आपण इतकी वर्षे जगणार आहोत, हे जर आधीच माहीत असते, तर आपल्याला आयुष्य अधिक शहाणपणाने व समंजस सजगतेने जगता आले असते. असो, Better late than never!

सुधाकर नातू
---------------------------
New 'year' Resolutions, I do on my each birth day, every year for ages. But alas, I find the enthusiasm lasts only for few days and more often than not these get broken gradually. Still the habit continues with the hope blossoming in the mind year after year. It's all a human instinct and desire to make days ahead better, ideal than they were in the past. After all, 'Not failure, but low aim is a crime'. As long as inner urge for improvement exists, momentum of this habit would continue.
16june 2015

एक प्रतिसाद
Dear Sudhakar, Many happy returns of the day. The lady at home deserves to be also congratulated for keeping you in shape. God bless::LSG
-----------------------
Many thanks for good wishes for my Birth Day. It's the special day to look back at the time & experiences gone by and march forward with greater hope to face uncertainties of tomorrow, leaving behind the mistakes & wins and attempt to make life more meaningful & worthy.
16june 2012
--------------------------

मंगळवार, १४ जून, २०२२

👍"रंगांची दुनिया !":"मुक्तसंवाद: नव्या संकल्पनेचा !":💐

 👍"रंगांची दुनिया !":👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐

👍"मुक्तसंवाद: नव्या संकल्पनेचा !":💐

👍"मी युट्यूब वरील माझ्या moonsun grandson चँनेलसाठी जसे व्हिडिओ बनवतो, त्याचप्रमाणे अधून मधून माहितीपर, विचारप्रवर्तक ध्वनिफिती देखील बनवत असतो. त्या व्हाट्सअपवर शेअर करता येतात. मात्र फेसबुकवर जर आपल्याला एखादी ध्वनिफीत शेअर करायची असेल, तर प्रथम ती ध्वनिफीत "गुगल ड्रायव्ह"वर संग्रहित करून नंतर तिची लिंक शेअर करता येते व ती लिंक उघडली की, ती ध्वनिफीत ऐकता येते, असे माझ्या ध्यानात आले.

आज म्हणूनच माझ्या दोन निवडक ध्वनीफितींच्या लिंकस् पुढे देत आहे. त्या आपण जरुर उघडून ऐकाव्यात आणि जर आवडल्या तर शेअरही कराव्यात.💐💐

👍"द्रुष्टी, बनवते स्रुष्टी !":💐

https://drive.google.com/file/d/1atxTP6TuC1D83as6TBUT1SXrZl_ZNADj/view?usp=drivesdk

👍"नवनवे बदल, नवी आव्हाने !":👌

https://drive.google.com/file/d/11GQkS8A3XbkbkwVdLwzCbrxSvPbsyXvT/view?usp=drivesdk

😊 ही नवी संकल्पना तुम्हाला कशी वाटते ते जरूर प्रतिसादात कळवा जर तुम्हाला अशाच ध्वनिफिती ऐकायचा असतील तर तसा खूप सकारात्मक प्रतिसाद द्या. ☺️

धन्यवाद 

सुधाकर नातू

रविवार, १२ जून, २०२२

# 👍"शारदोत्सव !":# 💐"हमारी याद आएगी !"😢

 👍"शारदोत्सव !":👌💐

👍"वाचा, फुला आणि फुलवा !":😊
💐"हमारी याद आएगी !"😢

☺️ "प्रत्येकाचे वाचनाची पद्धत वेगळी असते, कोणाला कथा आवडतात, कोणाला कादंबऱ्या तर कोणाला कविता वा इतर साहित्य प्रकार प्रकर्षाने वाचावेसे वाटतात. माझा वाचनाचा पिंड असा आहे की, मला आत्मचरित्रं किंवा व्यक्तिचित्रं णि वैचारिक साहित्य जास्त आवडतं. नवीन माहिती, नवीन कल्पना थोडाफार इतिहास अशा तर्‍हेचे जे काही लेखन असतं त्यामध्ये मी रमतो. अशा प्रकारचं लेखन मला वाचायला फार आवडतं कारण त्यामध्ये आपल्याला देखील स्वतःला तावून-सुलाखून आरशात बघता येतं, विविध काळासंदर्भातील समस्त भवताल मनात अवलोकीला जातो. कथा मला तितक्या आवडत नाहीत, विनोदी लेखन वा तत्सम बाकीचे प्रकार आहे हे माझ्या दृष्टीने बाजूलाच पडतात.😊

👍"नियतकालिकातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमाचा घोषवारा दिलेला भाग मी आवर्जून वाचतो. कारण त्यामध्ये काय वाचावे व काय वाचू नये याची जाण येते. पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस जी भाषणे होतात, त्यातून त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य तर समजते परंतु ते आपल्याला रुचेल की नाही याचाही निर्णय घेता येतो. हा पुस्तक प्रकाशनाचा वृत्तांत म्हणजे एक प्रकारे त्या पुस्तकाची जाहिरात असते. तो वृत्तांत वाचकाच्या मनावर ठसला तर त्याला आपोआपच आपण हे पुस्तक मिळवावे आणि वाचावे असे वाटू शकते. सहाजिकच मी पुष्कळ वर्षे अशा प्रकाशनांच्या कार्यक्रमांना मुद्दामून हजेरी लावत असे. 😊

👍"रुची दिवाळी अंक'२१ यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा वृत्तांताने माझे लक्ष वेधून घेतले. "हमारी याद आएगी" ते श्री. कुमार सोहनी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होते. त्या वृत्तांतात सुरुवातीलाच चपखलपणे पुस्तकाची खास वैशिष्ट्ये मांडली आहेत: 
"कुमार सोहनी यांच्या आयुष्यात जी पाच कलावंत माणसं कारणपरत्वे आली होती आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचा ज्या पाच जणांबरोबर सहवास होता, त्या सर्वाचे त्यांचेशी सूर जुळले. मात्र तो प्रवास अर्धवट टाकून ही पाच माणसं निघून गेली कधीही न परतण्यासाठी. या पाच माणसांच्या सहवासाचा हा कलाप्रवास जो होता, तो जसा मनाच्या आरशात उमटला त्याचे चित्रण लेखकाने या पुस्तकात केलेलं आहे." पुस्तकाचे नांवही किती हृदयस्पर्शी आहे ! ही पाच माणसे म्हणजे मराठी कला विश्वातील दिग्गज मंडळी: डॉक्टर श्रीराम लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्र ल मयेकर, भक्ती बर्वे आणि रमेश भाटकर.

ही पाच नांवे वाचल्याबरोबर आपल्याही मनामध्ये या मंडळींच्या संपर्कात आपण त्यांच्या कलाविष्कार यामुळे कधी आलो होतो याची उजळणी आपोआपच होते आणि या माणसांबद्दलच्या आपल्या आदराच्या भावना अधिकच द्विगुणित होतात. त्या संदर्भात ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीणार्या श्री. पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पाच व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्ये अगदी अनुरूप शब्दात मांडली. "ती त्यांना पाच पिंपळपाने वाटतात, पुस्तकात जपून ठेवलेली, मात्र एकमेकांशी संबंध नाही. एका पानानंतर एकेक ठेवावं अशी ती आहेत. डॉक्टर लागू चिंतनशील तत्त्वचिंतक, लक्ष्मीकांत बेर्डे लोकाभिमुख हे आगळंवेगळं कॉम्बिनेशन आहे. लक्ष्मीकांत पूर्ण अँडिशन करणारा तर डॉक्टर लागू लेखकाची कंसातील वाक्यही प्रमाण मानणारे. भक्ती बर्वे मिश्कील आणि कायम तजेलदार अभिनेत्री, तर रमेश भाटकर यांसारखा 
कवीमनाचा संवेदनशील आणि हिरो म्हंटल्यावर जगाने टॉप अँगलनं बघणारा असा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जणु अग्निकुंड असलेले प्र ल मयेकर, एक जळजळीत व्यक्तिमत्व, असे हे पाच कलावंत.प्रलंबरोबर ट्युनिंग होणं, हे एखाद्या गवयाचं तानपुऱ्याची जसे ट्युनिंग होतं तसं व्हायला हवं." श्री. बेर्डे यांनी ही निरीक्षणे या पाच कलावंतांच्या बाबतीत मांडली, ती आपल्या मनात रुजून जातात.

असा, गेलेल्या माणसांबद्दलचा वृत्तांत वाचला की मन थोडं कसनुसं व व्यथित होतं. वाटतं की, अरे आत्ता आत्ता तर ही सारी माणसं आपल्यात होती, आपल्या भावविश्वाला अधिकाधिक समृद्ध करत होती, आगळेवेगळे अनुभव देत होती आणि समाधानाचे चार क्षण आपल्या पदरात टाकत होती. परंतु ती आता पुन्हा कधीही दिसणार नाहीत, ही भावना आपल्याला विषण्ण करते. 

खरंच माणूस जेव्हा असतो, तेव्हा तो आपण गृहीत धरतो, त्याचं अस्तित्च कदाचित आपण विसरूनही जातो. पण माणूस जेव्हा निजधामाला जातो, पहाता पहाता होत्याचा नव्हता होतो, तेव्हा एक प्रकारची पोकळी आपल्या मनात निर्माण होते. नंतर जेव्हा त्याचा पुन्हा आठव येतो, तेव्हा पटतं की, खरंच विख्यात नाटककार शेक्सपीयरने म्हटल्याप्रमाणे "जग ही रंगभूमी आहे", असं आपोआप वाटून जातं. अशी जातीवंत, मनस्वी कलावंत माणसं दुनियेच्या रंगमंचावर येतात आणि जातात, पण आपला कायमचा ठसा रसिक मनांवर उमटवून जातात. 

शेवटी "हमारी याद आएगी" एवढंच म्हणणं आपल्या हाती असतं.

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, १० जून, २०२२

#👍"रंगांची दुनिया": 👍"शारदोत्सव-आजचा दिवस माझा !: 👍"आजचा दिवस माझा !":

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....

👍"शारदोत्सव !":👌

👍"आजचा दिवस माझा !":💐

👍 "दररोज सकाळी, आज काय काय कामं करायची ह्याची नोंद घेण्यापेक्षा, काल नवीन काय समजले, आपण कोण कोणती कामं, पूर्ण केली त्याची, न चुकता नोंद ठेवणं, अधिक उपयुक्त असते. आपला वेळ आपण कसा वापरला हे त्यावरून समजून, सातत्याने आपल्यांत सुधारणा करण्याची प्रेरणा तर मिळतेच, पण त्याच बरोबर जी कामं झाली, त्यांची फळं व समाधानही मिळते. मी अशा तर्हेची नोंद गेली कित्येक वर्षे जवळजवळ दररोज घेतो.💐

👍"माझ्या कपाटातील खण आवरत असताना, माझ्या जुन्या डायऱ्या हातात आल्या. त्यातील बारा वर्षांपूर्वीची २०१० ची सहज डायरी उघडली आणि आणि मला वैविध्यपूर्ण रंजक माहितीचा जणु खजिनाच मी तारीखवार गोळा करत होतो हे ध्यानात आले. 

👍या डायरीचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीलाच कलकत्ता चेन्नई मुंबई आणि अर्थातच दिल्ली या चार महानगरांच्या संपूर्ण रस्त्यांचा नकाशा "सिटी गाईड" या रूपात दिला होता. कुणालाही त्या शहरात गेल्यावर त्याला मार्गदर्शक असेच हे नकाशे होत. असे आगळेवेगळे नकाशे मला इतर कुठल्याच दिनदर्शिका किंवा डायरी यांमध्ये आदळले नाहीत !

💐आता ह्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ म्हणून, २०१० ह्या वर्षाच्या डायरीतील पहिल्या चार दिवसांच्या माझ्या नोंदी पुढे देत आहे:

# १ जानेवारी २०१० शुक्रवार:

👍"जन्मदिन"- 

डॉक्टर रघुनाथ माशेलकर-१/१/१९४१

श्री नाना पाटेकर-१/१/१९५१

👍"स्मरणक्षण": 

*न्यू इंग्लिश स्कूल पुण्यात स्थापना 1 जानेवारी अठराशे ऐशी 

*महात्मा फुले ह्यांनी मुलींची शाळा स्थापली: भिडे वाडा पुणे येथे: 1 जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस.

*जमशेदजी टाटा यांनी नागपूरमध्ये एम्प्रेस मिल स्थापन केली: 1 जानेवारी अठराशे सत्त्यातर.

*पुण्यात कृषी विद्यालय सुरू 1 जानेवारी 1908. *किर्लोस्कर मासिकाचे संपादक शं.वा. किर्लोस्कर यांचे निधन 1 जानेवारी 1975.

*रिझर्व बँकेवर भारत सरकारची मालकी 1 जानेवारी 1949.

*डब्ल्यूटीओ ची स्थापना 1 जानेवारी 1995.

👍घटना विशेष: नववर्षाच्या शुभकामना-आदान प्रदान.

👍"नवीन कल्पना"-*Life Achievement Index:

प्रत्येक वाढदिवशी दरवर्षी आपल्या आयुष्यात आपण किती प्रमाणात यशस्वी झालो व योगदान केले त्याची वस्तुनिष्ठ परिस्थितीही दाखवणारा व त्याप्रमाणे सुधारणा करण्यासाठी दिशादर्शक अशी ही टक्केवारी

*Job Satisfaction Index: 

नोकरी-व्यवसायात आपल्याला मानसिक आर्थिक आणि सर्वसाधारण समाधान दाखवणारी टक्केवारी

*जन्मपत्रिका गोळा करुन अभ्यासणे^^^

("दररोज नामवंतांच्या मिळवलेल्या जन्मपत्रिका मांडणी.")

----------------------------

# २ जानेवारी २०१० शनिवार:

👍"स्मरणक्षण": *पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 2 जानेवारी 1885

-----------------------------

# ३ जानेवारी २०१० रविवार:

👍"जन्मदिन":

*सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१

* 3 जानेवारी १८४३जेजे हॉस्पिटलची पायाभरणी.

* 3 जानेवारी 1952 पहिली सार्वत्रिक निवडणूक संपन्न 

*3 जानेवारी 1950 नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे उद्घाटन.

👍"नवीन कल्पना": 

* विवाहासाठी पत्रिका जुळवितांना मंगळदोष गुणमेलनाशिवाय दोघांच्या चंद्र राशींचा परस्परसंबंध, तसेच लग्न आणि सप्तमेश यांचा संबंध, दोघांच्या महादशा यांची तपासणी लग्नेश सप्तमेश पंचमेश यांची तपासणी पत्रिकेतील षडाष्टक योगांची तपासणी अशा तऱ्हेने वर वधुच्या पत्रिकांचा विवाह जुळणी करताना अभ्यास करावा.

👍"विशेष नोंद": 

घरातील शांती समाधानासाठी "लघुरुद्र" केले जाते.

श्री शिवशंकराला मंत्रोपचारसहित दुधाचा अभिषेक करून एकशे एकवीस वेळा श्रीशंकराच्या उपासनेच्या मंत्रांचे आवर्तन सहा गुरुजींच्या समूहाने करायचे. अशा 121 आवर्तनाचे अकरा वेळा आवर्तन म्हणजे महारुद्र, असे अकरा वेळा महारुद्र म्हणजे अतिरुद्र. अशी माहिती गुरूजींकडून समजली.

----------------------------

# ४जानेवारी २०१० सोमवार:

👍"जन्मदिन":

*4 जानेवारी १८९८ लिपीचा जनक ब्रेल चा जन्म 

*4 जानेवारी १८१९ ब्रेल लिपीचा संशोधक ब्रेल यांचा जन्म 

*4 जानेवारी 1909 पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म 

*4 जानेवारी 1924 नाटककार विद्याधर गोखले यांचा जन्म 

*4 जानेवारी 1914 कवयित्री इंदिरा संत यांचा जन्म. 

👍"स्मरणक्षण":

* 4 जानेवारी जागतिक नेत्रदान दिन .

*4 जानेवारी चौदाशे त्र्याण्णव दर्यावर्दी कोलंबसाने जलपर्यटन सुरुवात केली.

*4 जानेवरी १८८१ केसरी वृत्तपत्राचा प्रारंभ.

*4 जानेवारी 1948 ब्रह्मदेशात प्रजासत्ताकाची स्थापना.

👍"विशेष नोंद":

'नवे वर्ष नवा संकल्प' हा कार्यक्रम "हॅलो सखी" सह्याद्री वाहिनीवर पाहिला, तो अत्यंत संस्मरणीय होता.

"संकल्पातून कर्म व त्यातून फळ निर्माण होते. आत्मविश्वास, आत्मसंवाद, आत्मावलोकन करून निश्चित असे संकल्प जरूर करावेत. ते प्रत्यक्षात आणताना सातत्याने सिंहावलोकन करावे. अभ्यासू वृत्तीने नित्य नवीन ज्ञान मिळवत राहावे आणि जीवनात विद्यार्थीवृत्ती अविरत ठेवावी.

संकल्प SMART असावेत.

S-Specific M-Measurable A-Actionable R-Reality T-Time Bound असावेत."

असे उद्बोधक विचार या कार्यक्रमातून आज मिळाले.

----------------------------

👌 सध्या या चार दिवसांच्या नोंदींचा आढावा आपण घ्यावा अधिक दिवसांच्या नोंदी दिल्या तर उचित ठरणार नाही ही कारण जसा हापूस आंबा कितीही गोड असला तरी विशिष्ट मर्यादेबाहेर आपण यांचा आस्वाद घेऊ शकत नाही.

"आजचा दिवस माझा !" असं प्रत्येक दिवशी वाटावं अशा या नोंदींचा आढावा या लेखमालेत मी घेणार आहे. आपल्याला ही संकल्पना नक्कीच आवडेल आणि कदाचित आपणही ती अंगीकाराल अशी आशा आहे. तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.

धन्यवाद 

सुधाकर नातू

मंगळवार, ७ जून, २०२२

👍"रंगांची दुनिया ! :👌 "शारदोत्सव-विमुक्ताफळे !":💐

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....

👍"शारदोत्सव-"विमुक्ताफळे !":💐

# "गौरवशाली इतिहासाचे नगारे पिटताना,
तसा पराक्रम व कर्तृत्व वर्तमानात आणण्यासाठी सर्वंकष योगदान देताना दिसले,
तरच त्याला काही अर्थ !"

#"काल"चा दिवस, "आज"च्यापेक्षा बरा होता, अशी वेळ "उद्या" ये😢ऊ नये!"

# "👍"केव्हा, कुठे व कुणाशी काय बोलायचं अथवा नाही बोलायचं हे तारतम्य पाळणं, नितांत गरजेचं आहे. व्यवहारात मात्र नेमकं उलटच घडतं अन् समस्या निर्माण होतात !"😢

# 👍 "प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. जे जे निवडतो, त्यातून इतरांना कुठलाही त्रास न होता,
आनंद व समाधान मिळाले, तर सारे भरून पावले !"👌

# 👍"सूक्ष्म निरीक्षण, माहितीची समतोल चिकीत्सा
ह्याजोडीला कल्पनाशक्तीमुळे, "शाश्वत वास्तववादी विचारसूत्रे" (Concepts) निर्माण होतात." 💐

# 😊 "ज्या "चष्म्यां"तून आपण पहातो,
तसे जग आपल्याला दिसते.
पण खरोखर "ते" तसे असतेच असे नाही !"👌

# 👍"आपले "Out of Box" संदेश असे हवेत,
की ज्यामुळे वाचकांच्या विचारविश्वाला चालना व स्वनिर्मितीची प्रेरणा मिळू शकेल."👌

# "कोणी सर्वगुणसंपन्न नसतो.
डोक्यावर घेतलेल्याचेही
दोष जाणवण्याची वेळ, त्याच्या गुणांच्या योगदानाची चिकित्सा होते, तेव्हां येते."👌


# 😊" हे जाहिरातीचे युग आहे. आपलेच टीमकी आपणच वाजवायचा सध्या जमाना आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जाल तिकडे जाहिरातीच जाहिराती दिसतात, वेगवेगळ्या रुपात वेगवेगळ्या माध्यमात ! म्हणजे रात्र थोडी आणि सोंगे फार असाच अनुभव सगळ्याच माध्यमात येतो ! कितीही उबग आला तरीही तुमची आमची कुणाचीच या जाहिरातींच्या मार्या व पासून सुटका नाही.....

😊 एका वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर दिसलेली.......
👍"एक पूर्ण पानभर रंगीत जाहिरात !":👌
😊 किटकांना दूर ठेवण्यासाठी कपड्यांवर वाळलेल्या मिरच्या वापरा.
😢 खोटाखोटा ताप आणण्यासाठी काखेत कांदे ठेवा.
☺️ जंतुनाशक म्हणून हळद लावा.
😊 ओठांचा ओलावा कायम राखण्यासाठी बेंबी मध्ये देशी तूप लावा.
👍 उदबत्ती स्टँड म्हणून केळे वापरा.
😊 डासांना पळवून लावण्यासाठी लिंबावर लवंगा चिकटवा.
☺️ भांडी घासण्यासाठी नारळाचा शेंडीचा वापर करा.
💐 मुरमे बरी करण्यासाठी लावा.
☺️ वाईट लोकांवर मारण्यासाठी टोमॅटो गोळा करून ठेवा.
😊 डोळे स्वच्छ करण्यासाठी संत्र्याचे साल पीळा.
👍 कपड्यांना कडक बनवण्यासाठी तांदूळ भिजवलेले पाणी वापरा.

👍(वरील सल्ले कितपत अचूक व उपयुक्त ह्याची खात्री काय? कोड्यात पडला असाल की ही जाहिरात कोणाची, कशाबद्दल....!!)
जाहिरातील प्रमाणेच सध्याचा जमाना ॲप आहे ऑनलाइन ॲप जिथे तिथे तुम्हाला भेटतील.

👍तर ही होती अँपचीच जाहिरात......
👍"डुंझो डेली" वरून किराणा ऑर्डर करा आणि निर्धास्त राहा !
👍"आदर्श भारतीय साठी आदर्श डिलिव्हरी सेवा !"

☺️"वरील जाहिरात बनविणार्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे !"👌😊💐

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, ६ जून, २०२२

# 👍"रंगांची दुनिया-कळत, नकळतच्या भेटीगाठी !"💐

 👍"रंगांची दुनिया-कळत नकळतच्या भेटीगाठी !":💐

"रंगांची दुनिया" हे मी प्रस्थापित केलेल्या फेसबुकवरील खाजगी समूहाचे शीर्षक मला एका नियतकालिकामधील माझ्याच
सदरावरून सुचले. ह्याच नावाचे सदर मी तेथे लिहीत असे. जवळजवळ चार दशके चित्रपट रंगभूमी टेलिव्हिजन, नाटक आणि सांस्कृतिक घडामोडी यांचा परामर्श घेणारे काहीना काही लेखन मी विविध मराठी नियतकालिकांमधून करत असे.

त्याची सुरुवात सुद्धा मोठ्या गमतीशीरपणे झाली होती. नागपूरहून नोकरीत मुंबईला बदली होऊन मी आल्यावर, अचानक मला कसे कुणास ठाऊक, "अरुंधती" नांवाच्या मासिकाचे संपादक-मला वाटतं श्री अनिरुद्ध फडणीस ह्यांचे पत्र आले. ("आई कुठे काय करते !" मालिकेतील पात्रांच्या नांवांचा गंमतीशीर योगायोग !) पत्रात विनंतीवजा सुचना होती "तुम्ही आता मुंबईत आहात, तर करमणूक क्षेत्रावर काही ना काही नियमित लिहित जा आमच्या मासिकासाठी !" आणि तिथून माझा या अनोख्या रंगांच्या दुनियेत प्रवास सुरू झाला. त्या पहिल्यावहिल्या सदराचे नांव होते "हा खेळ सावल्यांचा !" नंतर मी अनेक मासिकात लिहायला सुरुवात केल्यावर त्याला "रंगांची दुनिया" हे अधिक समर्पक नाव मला सुचले. कारण त्यामध्ये केवळ चित्रपटच नव्हे, तर कलाविष्कारांच्या सर्व क्षेत्रांचा समावेश होऊ शकतो.

या अशा तर्हेच्या लेखनाला प्राथमिक गरज होती, ती म्हणजे नाटक सिनेमा व मालिका पाहण्याची आणि अभिनेते व अभिनेत्री यांना भेटून त्यांच्या मुलाखती घेण्याची. या क्षेत्राचे मला अगदी शालेय जीवनापासून खूप आकर्षण असल्यामुळे, मी मोठ्या उत्साहाने हे काम करत असे. आता मागे वळून पाहताना, आज दिग्गज असलेल्यांच्या व माझ्या भेटीगांठी आठवतात आणि मन अचंबित होते. वाटते, इतक्या सार्यांना आपण प्रत्यक्ष कसे काय बरे भेटू शकलो ! या खास लेखमालिकेत मी अशाच विविध भेटीगाठींचा ऊहापोह करणार आहे. तुम्हाला तो मनोरंजक वाटेल अशी आशा आहे.

४ जून'२२ हा एक मोठा अविस्मरणीय दिवस होता. कारण त्यादिवशी "शिवाजी मंदिर" नाट्यगृहात मराठीतले जणू "अमिताभ बच्चन" असे ज्यांना म्हणू शकू त्या, श्री अशोक सराफ यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने, तसेच कलाक्षेत्रातील त्यांनी ५० वर्षे पूर्ण केल्याच्या मुहूर्तावर "अष्टविनायक" नाट्यसंस्थेतर्फे मध्यंतरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी अशोकजींचेच "अष्टविनायक" संस्थेतर्फे सादर केलेले "व्हँक्युम क्लिनर" हे नाटकही थाटामाटात हाऊसफुल गर्दीत सादर झाले. मला या समारंभाला प्रत्यक्ष जाता आले नाही याचा खेद वाटतो.

नंतर अचानक मोबाईवर मी सर्फिंग करत असताना, त्यांच्या ह्या अविस्मरणीय सत्कार सोहळ्याची चित्रफित देखील माझ्या नजरेत आली. ती पाहून मी जणु त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंदच घेतला. तिची लिंक मी पुढे देत आहे, तसेच "व्हँक्युम क्लिनर" नाटकाचा मी माझ्या ब्लॉगवरील लेखात उलगडलेल्या रसास्वादाची लिंकही देत आहे.

नटवर्य अशोक सराफ यांची मात्र प्रत्यक्ष मुलाखत एवढ्या चार दशकात मी कधीही घेऊ शकलो नाही, याचेही मला आश्चर्य वाटते. पण स्मृतीला थोडा अधिक त्रास देताना, मला त्यांची एक आठवण अचानक समोर आली. माझ्या आणि अशोक सराफ यांच्या बहुदा प्रत्यक्ष भेटीची आतापर्यंतची ती एकमेव वेळ होती. झालं असं की, माझ्या कॉलेज शिक्षणाच्या वेळची ही गोष्ट आहे, म्हणजे पुष्कळ दशके होऊन गेली आहेत. त्यावेळेला मी एका वक्तृत्व स्पर्धेनिमित्त कॉलेजचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एसटी मधून जात होतो. त्या वेळेला कर्मधर्मसंयोगाने बसमध्ये आमच्या शेजारी बाबुराव अर्नाळकर जे रहस्यकथा लेखनाचे सम्राट मानले जात, अशोक सराफ आणि इतर काही नामांकित मंडळी बाजूला बसली होती. सहाजिकच मी त्यांच्याबरोबर गप्पात सामील झालो.

पुढे अशी विचित्र गोष्ट घडली की प्रवासामध्ये, कुठे तरी मी माझे पैसे खर्च केले. नंतर म्हणून मला ध्यानात आले की, माझ्या जवळचे उरलेले पैसे आता मला नियोजित स्थानकावर उतरल्यावर पुरेसे नसणार. आता काय करावे, अशी मला चिंता वाटू लागली. माझ्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे बघून वा मी माझी परिस्थिती सांगितली असावी ह्यामुळे, अशोक सराफ यांनी मला वाटतं त्या वेळेला माझ्या गरजेचे पंधरा वीस रुपये काय असतील ते मला स्वतःहून देऊ केले. मी त्यांनाही सांगितले की मी तुम्हाला त्या वेळेला ते बँकेत काम करायचे, तिथे आणून देईन.

तेव्हा तसं मी बोललो खरा, परंतु बहुदा त्यानंतर मी ती गोष्ट विसरूनही गेलो आणि आणि मी ते पैसे नंतर कधी दिलेच नाहीत असं मला वाटतं. अर्थात ही जी काही भेट अवचित झाली, ती अशोक सराफ यांना आठवणं केवळ अशक्य आहे हेही खरं आहे. त्या वेळेला हा तरूण माणूस पुढे आपल्या अंगभूत कौशल्याने व निष्ठापूर्वक मेहनतीने करमणूक क्षेत्रात इतकी गरुडभरारी भविष्यात मारेल. रंगांच्या दुनियेतील सेलिब्रिटी भेटीगाठींचा सिलसिला, ह्या आठवणीमुळे अधिक रंगतदार बनेल, असं मला वाटलं म्हणून ह्या लेखमालेचा योगायोगाने असा प्रारंभ झाला.

## 👍श्री अशोक सराफांच्या सत्कार सोहळ्याची लिंक:

https://youtu.be/Cr0PgPK18bM

# # 👍👍"व्हँक्यम क्लिनर"नाटकाच्या रसास्वादाची लिंक:



धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
अशोकजींबरोबरच्या माझ्या बादरायण संबंधांचा एक आगळावेगळा योगायोग नंतर मला कळला, तो असा: त्यांची मेहुणी सौ मीनल परांजपेंची नणंद, माझ्या आतेचुलतभावाची पत्नी आहे ! असो.

शनिवार, ४ जून, २०२२

# 👍 "रंगांची दुनिया-'सुंठीवाचून खोकला गेला !":

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....

👍"सुंठीवाचून अखेर खोकला गेला !":👌

हल्ली रात्री ९ ते १० कुठल्याही मालिका निरर्थक असल्याने, त्या बघाव्या असे वाटत नाही. कसातरी टाईमपास केला जातो, किंवा त्यापूर्वीही कधी कधी मन लावून बघण्यासारखे काहीही नसतं. तरी आपण आपला टीवी पहात वेळ काढतो. 

नऊ वाजण्यापूर्वीचा अनुभव आज योगायोगाने तसाच आला "आई कुठे काय करते!" मध्ये अनघाला दिवस जाणे त्याला अभिने विरोध करणे किंवा आशुतोषची नाटकी लेक्चरबाजी असं काहीही होतं. तर "सुंदर आमचं घर" मध्ये तर रितेशच्या लग्नाचा अक्षरशा पोरखेळ चालू होता. आश्चर्य म्हणजे आवर्जून बघावी अशी "बॉस माझी लाडाची !" मालिका. तिलादेखील भाकडपणाची लागण लागली. बॉस राजू आणि तिचा डीलमधला नवरा आर्किटेक्ट मिहीर ह्यांच्या मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे नुसता हलकल्लोळ ! ईडियट बाँक्सवर केव्हा काय दाखवतील काही नेम नाही. कसा तरी वेळ मारून नेतात, दुसरं काय ! नवं खेळ म्हणजे, हे विवाह सोहळे ! त्यातील संगीत वा हळद किंवा असे मेहंदीचे कार्यक्रम बघायचे म्हणजे, खरोखर आपली आपण स्वतःला शिक्षा करून घेण्यासारखेच.

अशा भाकड वेळेला टीव्ही न पहाता, काहीतरी चांगल काम करायला हवं असं मला सहाजिकच वाटलं. अगदी अश्शीच वेळ काही वर्षांपूर्वी आली होती. तेव्हा मी काय केलं तर, वर्तमानपत्रातली वेगवेगळी वेधक कात्रणं, वा कुठे वाचलेलं चांगलं असं काढून ड्राँईंग बुकातील कोर्या पानांवर चिकटवायचं आणि त्यामुळे माझी दोन "गोल्डन लेझर बुकस्" तयार झाली. जवळजवळ वर्षभर तरी हा उपयुक्त खटाटोप मी करू शकलो. त्यातून माझ्या ब्लॉगवर मनाजोगतं, उपयुक्त लिहीण्यास मदत झाली.

आज परत तशीच वेळ आली असे वाटायला अजून एक कारण घडले: माझ्या ब्लॉगवरील लेखाला-"टेलिरंजन-काही ही हं !", पुढील प्रतिक्रिया आल्यामुळे ! तिथे जणू मल्र्लीनाथी केली की, 'तुम्ही कसा काय वेळ वाया घालवू शकता !':

"तुम्ही धन्य आहात. अशा फालतू मालिका रोज पाहून त्यावर परीक्षण लिहायचे!!! तुमच्या सहनशीलतेला त्रिवार वंदन!!!! 🤔🤔🤔

👍ह्यापायी, माझे अक्षरशः डोळे उघडले. वाटले की, खरंच आपण हे बरोबर करतो कां? ह्यावर खूप विचारमंथन केल्यानंतर माझ्याकडे ऑप्शनस् मिळाले :

# वाचन करणे, जवळ भरपूर दिवाळी अंक अजून वाचावयाचे आहेत, आपल्याकडे पुस्तके आहेत, ते सर्व वाचत राहणे, रात्री 'त्या' भाकड तासभर टीवी न पहाता, वाचायचं आणि त्याच्यातून आपल्याला चांगलंचुंगलं काय असेल, ते ध्यानात वा नोंदीत ठेवायचं.

# दुसरा पर्याय ज्योतिष सल्ला परत सुरु करावा. रात्री 'त्या' वेळेला पत्रिका अभ्यासाव्यात.

# तिसरा मुद्दा असा, मी बेफिकिरीपायी हल्ली अकाउंटस् नोंदी बघत नाही, इन्कम टॅक्स रिटर्नस् भरायच्या वेळेला त्यामुळे धावाधाव होते. आपले फायनान्शियल रेकॉर्डस् सगळे अचूक ठेवण्यासाठी, चिकित्सा करण्यासाठी 'तो' वेळ वापरावा.

# अजून एक पर्याय म्हणजे गेली चार दशके अनेक मराठी मासिकात नाटक-सिनेमा रंगभूमी चित्रपट यावर लिहीत आलो, त्याचे लेख बाईंड करून ठेवले आहेत. ते वाचायचे आणि त्यातील उत्तम ऐवज डिजिटल करायचा.

तेव्हा काय करावयाचे या संभ्रमात मी होतो. आता तरी तो रात्रीचा भाकड वेळ चांगल्यापैकी वापरला जावा, उगाचच मालिका बघायच्या नाहीत असं ठरवतोय, बघूया काय होते. असा विचार मनात येणे, ही चांगली गोष्ट आहे: आपण काहीतरी productive or meaningful करावे. याचा अर्थ नवनिर्मितीच्या दृष्टीने आपल्या मनाची दिशा राहणार आहे आणि हीच तर गंमत आहे जीवंतपणाची, तरुणपणाची आणि "प्रौढत्वी निज शैशव जपण्याची" !

या मनोगताचा शेवट मात्र मोठा मजेशीर आणि 

आश्चर्यजनक झाला ! कारण एवढे सारं लिहून झाल्यावर टीव्ही ऑन केला आणि पडद्यावर काय दिसावे ?:

 "कोण बनेगा करोडपती !":

६ जूनपासून 'सोनी' मराठीवर रात्री नऊ ते दहा" 

ही जाहिरात पाहायला मिळाली ! 

म्हणजे "सुंठीवाचून अखेर खोकला गेला !"

दुसरं काय !!

आणि आणि......

आजच्या भाकड वेळेत माझा हा लेखही लिहून झाला की ! "सोनेपे सुहागा" म्हणतात तसे झालं !

धन्यवाद

सुधाकर नातू