👍👍👍👍💐💐
"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐
आज शुक्रवार. टेलिरंजन विषयक हा खुसखुशीत लेख सादर करत आहे.
💐"टेलिरंजन !":👌
👍"वाहता वाहे, 'मालिका'माई"!:💐
# 😢 "तुझं माझं जमेना !":😢
मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्रेन्डस् येत असतात. अलीकडच्या काळात जोडीदारांपैकी एकाला त्याच्या मनाविरुद्ध विवाह करायला लागल्यामुळे नाराजी आणि अर्थातच जोडीदारांमध्ये शत्रुत्व अथवा एकाच पुरुषाच्या दोन बायका असे ट्रेन्ड्स आपण पहात आलो. उदाहरण म्हणजे, 'जीव माझा गुंतला' मधील अशाच मनाविरुद्ध विवाहामुळे मल्हार आणि रिक्षावाली अंतरा या जोडप्यांमधील शत्रुत्व. दुसरे उदाहरण सन मराठीवरील "सुंदरी" मालिकेचं. मनाविरुद्ध आई-वडिलांच्या दबावामुळे व मेव्हण्याच्या आग्रहामुळे त्याला न आवडणाऱ्या खेडूत सुंदरीशी आदित्य विवाह करतो व नंतर तोच दुसरीकडे सुरेख आणि सुस्थितीत असलेल्या शहरी 'अनु'वर मनापासून प्रेम व गुपचूप लग्न करतो हे !
#👍 "अशी, ही लपवाछपवी !" :💐
आता एक वेगळीच बाजू मला त्या मालिकांमधून लक्षात आली आहे. ती म्हणजे आपल्याजवळ असलेली महत्त्वाची माहिती, योग्य त्या व्यक्तीपाशी न बोलता, मुद्दाम दडवून ठेवणे. अशी लपवाछपवी माहितीची आणि त्यामधून गैरसमज वितुष्ट किंवा असेच काही नको ते, नाट्यमय प्रसंग, असा हा ट्रेण्ड आहे असं मला वाटतं.
उदाहरण घ्यायचं झालं तर झीमराठीवरील "मन उडू उडू उडू जालं" या मालिकेचं घेता येईल. कर्तव्यदक्ष परंपरा पाळणाऱ्या प्रामाणिक देशपांडे सरांच्या तिन्ही मुली, आपल्या आई-वडिलांपासून काही ना काहीतरी माहिती दडवून ठेवतात, लपवून ठेवतात. त्याच प्रमाणे आपल्या आईबद्दल तिने चोरी केली आहे, हे लक्षात येऊनही दीपू वडिलांना ते सांगत नसते. त्यामुळे निर्माण होणारे घोळ पेचप्रसंग ताणतणाव. मोठी मुलगी दिदी हिला तर नयन व त्याच्या आई-वडिलांनी भयानक फसवलेले आहे आणि तिथेचे हाल हाल चालू आहेत. ते ती कोणाजवळ बोलत नाही, लपवून ठेवते.
मधली मुलगी, ताई तर कशी बनेल, आपले प्रेम दडवून ठेवते, पळून जाते, नंतर परत येते तेव्हा तिचा विवाह झालेला आहे, हे ती, तिचा नवरा कार्तिक आणि मोठा दीर 'इंद्रा'सुद्धा लपवून ठेवतात. म्हणूंन "अशी, ही लपवाछपवी !" असं नाव या मालिकेला द्यायला हरकत नाही.
दीपूची कमाल तशीच. ती प्रथम ताईचे प्रेम वडिलांपासून दडवते, नंतर आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो गुंड इंद्रा आहे व बाबा समजतात तसा हुशार सरळमार्गी आदर्श मुलगा नाही, हे लपवून ठेवते. तसेच ती देशपांडे सरांची मुलगी आहे हे 'इंद्रा'जी पासून लपवते. एवढेच नाही तर, 'इंद्रा'जीच्या मित्राला 'सत्तू'ला शपथ घालून ही गोष्ट 'इंद्रा'जीला न कळवण्याची शपथच घालते ! म्हणजे "लपवाछपवी" चे इथे किती प्रयोग या मालिकेमध्ये आपल्याला आढळून आले !
दुसरे उदाहरण: सुंदरीशी एक विवाह करून आदित्य दुसरीकडे सुरेख आणि सुस्थितीत असलेल्या शहरी अनुशी लग्न करतो, हे आई-वडिलांपासून लपवलेलं तसंच आपली बायको सुंदरीपासूनही लपवलेलं ! त्यामध्ये त्याचा मित्र कृष्णा हाही त्याला साथ देतो. म्हणजे लपवाछपवी आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य या मालिकेतही आढळते.
# 😊 "विसंगत वागणे":☺️
मराठी मालिकांमध्ये बहुदा पात्रं कधीही तर्कसंगत वागत नाहीत. सर्वसाधारण प्रसंगांमध्ये माणूस जो विचार करेल आणि जी कृती करेल असे अपेक्षित असेल, त्याच्या बरोबर उलट बहुतेकवेळा, निदान एक तरी पात्र उरफाटे वागताना दिसते आणि दुर्दैवाने ते महत्त्वाचे पात्र असते, ज्यामुळे कथानक पुढे पुढे जाऊ शकते.
# 💐"एंट्री नवीन पात्राची":💐
दुसरे निरीक्षण असे की, ज्या वेळेला एखादी मालिका आता पुढे काय करायचं काय दाखवायचं, हे न समजण्याइतकी रटाळ होते, तेव्हा एखादं नवीनच पात्र त्यात प्रवेश करते आणि कथानकाला वेडीवाकडी वळणे देत मालिका सुरू ठेवली जाऊन प्रेक्षकांचा अंत पाहिला जातो.
येनकेनप्रकारेण मालिकेचा खेळ अव्याहत चालू रहावा याकरता काही ना काही खूप या ही मंडळी करत असतात आणि आपल्याला ते अशी लपवाछपवी का करतात असा प्रश्न तर निर्माण होतोच पण हे वागणं बरं नव्हं असही ही मालिका पाहताना वाटतं आणि पात्रांचा रागही येतो
# 👌 "तोच तो खेळ, पुन्हा पुन्हा !": 💐
अजून एक दुसरा ट्रेन्ड किंवा ट्रिक मालिकांमध्ये असते ती म्हणजे प्रणय युगुलाची पूर्वीची दृश्येच पुन्हा पुन्हा प्रसंगी दाखवत राहणे. त्यातील एखादे पात्र विचारमग्न आहे आणि जुन्या आठवणी त्याला काढावयाच्या वाटतात आणि ते उमाळे उसासे, जुन्या दृश्यांच्या मार्यामधून दाखवले जातात. "मन उडू झालं" मधलं दीपू आणि इंद्राजी यांचे प्रणयाचे, जोडीचे खेळ किंवा "स्वाभिमान" मध्ये शांतनु आणि पल्लवी यांची जवळीक. वेळ काढूपणा आणि नवीन दृश्यांसाठी वेळ व श्रम वाचवणे, एपिसोड कसाही करून भरून काढणे, हा हेतू त्यामागे असावा. पण त्यापायी प्रेक्षकांचा संताप होतो, त्याचं कुणालाच काही नाही. जुने दृष्ये, जरूर कधीमधी अपवादाने जरूर दाखवावी, पण त्यामध्ये असे नको इतके सातत्य नसावे.
#👍 "जुन्या लोकप्रिय मालिका";💐
मराठी मालिका खूप लोकप्रिय होत्या. त्यांचा आढावा घ्यावा असे मनात आले आणि त्यावरून मी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अर्थात गुगल वरून काही मालिकांचा उपयुक्त घोषवारा गोळा केला. चोखंदळ रसिकांसाठी, मालिकेचे नांव, ती केव्हा सुरू झाली, आणि एकूण एपिसोड्स या क्रमाने ही मनोरंजक माहिती पुढे देत आहे:
अस्मिता पाच फेब्रुवारी14 468
अनुबंध 31 ऑगस्ट 2009 267
तुझ्यात जीव रंगला 1262
माझ्या नवऱ्याची बायको 1354
होम मिनिस्टर 1 सप्टेंबर 1999 सतरा वर्ष झाली. चार दिवस सासूचे नोवेंबर2001 3177 आभाळमाया 16 ऑगस्ट 1999 1182
अवघाची संसार 22 मे 2006 1169
असंभव 12 फेब्रुवारी 2007 774
एका लग्नाची दुसरी गोष्ट 16 जानेवारी 2012 ?
एका लग्नाची तिसरी गोष्ट 14ऑक्टोबर13 271 अरुंधती 10 नोव्हेंबर 11 162
उंच माझा झोका 5 मार्च 2012 432
धन्यवाद
सुधाकर नातू