शुक्रवार, २८ मे, २०२१

"कालसर्पयोग समाप्तीनंतर, पुढे काय?": !":

 "कालसर्पयोग समाप्तीनंतर, पुढे काय?": !":


कोरोनासारख्या महामारीला तोंड देण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय, वैयक्तिक दृष्ट्या तसेच सार्वजनिक दृष्ट्या आवश्यक आहेत, हे आता माहीत झाले आहे. वैयक्तिक दृष्ट्या, नेहमी बाहेर जाताना मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सतत शक्य होईल तेव्हा साबणाने हात धुणे आणि शक्यतोवर गरज असेल तरच घराबाहेर पडणे आणि गर्दी टाळणे, अशा तर्‍हेचे उपाय वैयक्तिक दृष्ट्या पाळणे गरजेचे झाले आहे. दुर्दैवाने आवश्यक निर्बंध पाळणे, ही बाब सर्वच क्षेत्रात, सर्व स्तरावर अंगिकारली जात नाही आणि त्यामुळेच बहुदा पहिली लाट ओसरल्यावर जणू काही सारे आकाश मोकळे झाले आहे, या भावनेने मुक्त संचार केला गेला, हेही एक कारण दुसरी लाट येण्यामागे होते.

असे असले तरी, पहिल्या लाटेच्या ओसरण्याचे वेळेलाच आपण संभाव्य असे हे महासंकट पुन्हा येऊ शकेल, याची जाण ठेवून सार्वजनिक स्तरावर आरोग्यव्यवस्था आमूलाग्र बदलणे आणि सक्षम आणि आदर्शवत करणे गरजेचे होते. परंतु झाले काय तर, पहिल्या लाटेमध्ये ज्या काही सार्वजनिक व्यवस्था केल्या गेल्या, त्या हळूहळू गुंडाळल्या गेल्या आणि सर्वात लसीकरणाकडे तर पूर्णच अक्षम्य दुर्लक्ष झाले, अनाठायी मोठेपणा मिळविण्याच्या आविर्भावात लाखो लशी परदेशात पाठविण्यात धन्यता मानली गेली.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आपण आतापर्यंत या क्षेत्राला काडीचेही महत्त्व दिले नव्हते आणि आपल्या आर्थिक बजेट मध्ये या व्यवस्थेसाठी त्यामानाने नगण्य अशी तरतूद असे, हीच गोष्ट अत्यावश्यक शैक्षणिक क्षेत्राचे बाबतीत. आता यापुढे श्वेतपत्रिका, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल अभ्यासपूर्ण अशा तऱ्हेचा आढावा घेऊन पुढे आणली पाहिजे. आदर्श उत्तम असे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही घटक असतील त्यांची सर्वांगीण अशी सक्षम व्यवस्था कधी, कशी करता येईल त्याचा एक मास्टर प्लॅन केला जावा आणि त्याची सत्वर अंमलबजावणी व्हावी. ही एक बाजू झाली.

दुसरी बाजू, कोरोनासारख्या महामारीवर, लाँकडाऊन हाच शक्यतोवर हातात असलेला उपाय प्रतिबंधक म्हणून असल्यामुळे व तो दुसऱ्या लाटेवेळी अधिक कठोरपणे पाळला जायला हवा होता. परंतु तिकडेही हलगर्जी, चालढकल झाली, राज्यांवर जबाबदारी टाकून हात झटकले गेले. त्या कसोटीच्या कालखंडात अनावश्यक अशा अनेक गोष्टींना- निवडणूक प्रचार व कुंभमेळा ह्यांना नको इतके प्राधान्य दिले गेले. त्याचा भयावह परिणाम आता आपण सहन करत आहोत.

अपरिहार्य अशा लाँकडाऊनमध्ये अर्थकारण हे
हात बांधून ठेवणारे कारण असते, यात वाद नाही. मात्र त्याकरता आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल घटकांसाठी केवळ मोफत धान्य देण्याशिवाय, एक वेगळीच उपाययोजना करायला हवी होती. ज्याप्रमाणे मागील शतकाच्या पूर्वार्धात 'ग्रेट डिप्रेशन'मध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर सार्वजनिक बांधकामे काढली जाऊन, त्यांत प्रचंड पैसा त्यात ओतण्यात आला. त्यामुळे त्यांचे अर्थचक्र, जे कुंठित झाले होते, ते पुनश्च व्यवस्थित मार्गावर आले. त्याचप्रमाणे आपल्या इथे लाँकडाऊनच्या काळात, ज्या 'नाही रे' वाल्यांचे पोट केवळ हातावर आहे अशा वर्गाला आवश्यक तेवढी रक्कम निर्वाह निधी म्हणून दरमहा सातत्याने तरी देणे गरजेचे होते. त्या करता वेळप्रसंगी जागतिक बँकेकडून वा 'आय एम एफ'कडून कितीही कर्ज जरी काढायला लागले तरी ते काढले जाणे हा मार्ग विचारात घ्यायला होता. इंधनाची बेसुमार भाववाढ हा एकमेव झटपट महसूल मिळवण्याचा मार्ग चोखाळल्यामुळे महागाई आवाक्यात राहिलेली नाही आणि जनतेच्या हालात त्यामुळे अधिक भर पडते आहे.

दरमहा निर्वाहनिधी वाटपाचे दृष्टीने कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे
लाँकडाऊन' जास्त काळ पर्यंत ठेवता येत नाही. तर दुसर्या बाजूला, गोंधळी लसीकरण मंदगतीने चाललेले, त्यामुळे आज अशी विचित्र परिस्थिती झाली आहे, ती म्हणजे 'कोरोना' महासंकटामध्ये आपली चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी स्थिती झाली आहे. ज्यावेळेला मुक्त अर्थव्यवस्था सुरु झाली तेव्हापासून आपली प्रचंड लोकसंख्या ही आपली एक जमेची बाजू होती. साऱ्या जगाला मार्केटिंगसाठी एक उत्तम अशी संधी, असे रूप असल्यामुळे, आपली प्रचंड लोकसंख्या ही आपली शक्ती होती. परंतु तीच शक्ती, आज आपल्या एका दुखऱ्या नसे सारखी झाली आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येचे लसीकरण करणे, त्याचप्रमाणे आरोग्यव्यवस्था पुरवणे, हे खरोखर कठीण असेच संकट किंवा आव्हान झाले आहे हे विसरता येत नाही.

"लसीकरणाची कथा आणि व्यथा !":

हल्ली कधी ना कधी, कुठे ना कुठे लसीकरण बंद असल्याचे ऐकायला येते, याकडे आपण गांभीर्याने बहुदा बघत नसू. परंतु ज्या वेळेला एखाद्या केंद्रावर लसीकरण संपूर्ण दिवस बंद असते, तेव्हा त्या केंद्रावर किती संभाव्य अशा व्यक्तींना लस दिली जाऊ शकली असती, याचा हिशोब जर केला तर, तसेच एकूण सर्वच देशभर अथवा राज्यभरच्या लसीकरण बंद असणाऱ्या सर्व केंद्रांवर ही अशी हुकलेली संधी किती हजारो
व्यक्तींसाठी होती याचा हिशोब जर केला तर लक्षात येईल की किती महाभयंकर संकट त्यामुळे त्या त्या दिवशी निर्माण होत असते.

कारण तेवढी माणसे संभाव्य कोरोना लागणीच्या शक्यतेच्या धोक्यात येऊ शकतात. त्यापैकी कुणालाही लागण झाली तर त्याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे केवळ एका दिवसाच्या लसीकरण चुकण्या मुळे किती नुकसान सबंध देशभरात होते याचा विचार व्हायला हवा. थोडा वास्तवतेचा अभ्यास केला तर, असं लक्षात येतं की लसीकरण चालू असलेले दिवस, हे न चालू असलेल्या दिवसांपेक्षा नेहमी कमीच आहेत ! त्यातून मोठा गाजावाजा करून भरपूर संख्येने लसीकरण केंद्रे निर्माण तर केली, शिवाय प्रसंगी २४ तास देखील लस देण्याची व्यवस्था करू अशी गर्जनाही झाली.

स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याप्रमाणे यश मिळवण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून अभ्यास करायला लागतो त्याचप्रमाणे या महा संकटावर विजय मिळविण्यासाठी एक एक दिवस आपल्याला जागृत राहून त्याप्रमाणे लस उपलब्ध व्हायला हवी प्रत्येक दिवशी याचा विचार गांभीर्याने करायला हवा.

परंतु ह्या खटाटोपाचा परिणाम किती भयानक झाला याचाही विचार करा. कारण इथे लसीकरणाची यंत्रणा आहे, पण दुर्दैवाने लसच नाही. म्हणजे नियोजनामध्ये दूरदृष्टी दाखवण्यात व लसीकरण योग्य तर्हेने राबविण्यात, आपण किती कमी पडलो ते कळून येईल. अर्थात एकंदर आपले सद्य कारभाराचे रूप बघितले तर चालसे कल्चर पूर्वी होते, तसेच आताही आहे.

सहाजिकच कदाचित कुणालाच ह्या दररोजच्या लसीकरण बंद घटनेकडे योग्य त्या शास्त्रीय व व्यावहारिक दृष्टीने बघताच येत नाही. कारभार जर असाच चालत राहिला तर आपली प्रगती तर दूरच, पण पिछेहाट होणे हे अपरिहार्य आहे. महामारीच्या संकटाची तीव्रता दूर होणे कठीण आहे.

यासाठीच कर्तव्य आणि उत्तरदायित्व याचा योग्य तो विचार करून यंत्रणेच्या, समाजाच्या प्रत्येक घटकाच्या बाबतीत ह्या दृष्टीने महत्त्व जाणून योग्य ती आमुलाग्र सुधारणा व्हायला हवी आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची वाटचाल हवी तरच काही आशेला वाव आहे.

धन्यवाद.
सुधाकर नातू

ता.क.
माझीही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी:
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":
माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा