"चक्रव्यूहातील 'अभिमन्यू'चा सामना" ! :
"ह्याच त्या" वेळेची, आम्ही जन्मलग्नपत्रिका बनवली आहे.
"हीच ती वेळ" कोणती, ते वेगळं काही सांगायला नको.
अर्थात ही पत्रिका,
२८ नोव्हेंबर'१९ संध्याकाळी ६/४० मुंबई
या वेळेची आहे.
"रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग":
# पत्रिकेचे विश्लेषण करता असे लक्षात येते की,
ज्या पार्श्वभूमीवर "ह्या वेळे"चा योग आला, तो खरोखर अत्यंत संघर्षमय होता.
# पत्रिकेमध्ये कालसर्प योग आहे.
त्याच प्रमाणे धनु रास असून मूळ नक्षत्र आहे.
हे दोन्ही योग एकंदर परिस्थिती सोपी नसल्याचे तसेच अशक्यप्राय अशी आव्हाने समोर असण्याचे व अनेक प्रकारच्या विरोधाभासाचे चित्र आहे.
# पत्रिकेमध्ये धनस्थानी राहू असल्यामुळे आर्थिक घडी विस्कटलेली आणि ती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आटापिटा करावा लागेल.
# पत्रिकेचा लग्नेश शुक्र अष्टमात व चंद्रही अनिष्ट स्थानी अष्टमात. चंद्र अष्टमात असणे, ह्याला बालारिष्ट योग म्हणतात. अर्थातच पहिले काही महिने तारेवरची कसरत करताना अक्षरश
दमछाक होईल, असे म्हणता येईल.
# व्रुषभ लग्न, म्हणून शनीचा राजयोग असल्यामुळे, एकंदर परिस्थितीवर मात करण्यासाठी, योग्य ते बळ मिळू शकेल असे म्हणायचे. परंतु ही गोष्ट सोपी नाही.
# जमेची एकच एक बाजू म्हणजे, गुरु स्वगृही धनु राशीत, विचित्र परिस्थितीत सामना करण्यास सहाय्य करू शकेल.
# जोडीदार अथवा भागीदाराचे सप्तम स्थान व्रुश्चिक असून, ते मंगळाच्या अधिपत्याखाली आहे आणि मंगळ षष्ठात आहे. हा देखील योग भागीदारांशी परस्पर संबंध राखण्यात खरोखर जिकीरीचे ठरेल, असे दर्शविणारा आहे.
# एकंदरच जे सांप्रतचे वास्तव आहे, ते या पत्रिकेमध्ये प्रतिबिंबीत होत आहे, असे म्हणता येईल.
# एक फार मोठे शिवधनुष्य हाती घेतल्याचे ही पत्रिका निदर्शक आहे! ज्यांच्या नशिबी राजयोग आहे, त्यांना निखार्यांवरुन चालावेच लागते. ह्या साऱ्या प्रतिकूल भवतालाशी 'सामना' कसा केला जातो, ते पाहणे मोठे उत्कंठा पूर्ण असेल.
# परीक्षा कठीण आहे, "विद्यार्थी माँनेटर" देखील नवागत आहे. अशा वेळेला परीक्षेचा 'निकाल' काय लागेल, हे ज्याचे त्याने निदान करावे, एवढेच फक्त म्हणता येईल.
म्हणूनच शुभेच्छा देताना म्हणावेसे वाटते....
"शब्द जपून व शहाणपण वापरून,
जनताभिमुख व जनहितार्थ कारभार करा......
ऊतू नका, मातू नका, फितू नका........
एवढे केलेत, तर जनता व सत्ता तुम्हाला
नक्की आपलंसं करेल !...."
।। शुभम् भवतु।।
सुधाकर नातू,
२९/११/'१९

This week prediction ?
उत्तर द्याहटवा