शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

पुढचं पाऊल": अर्थात् "आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य: ३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९:


"पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९:

"विलक्षण विस्मयकारी आठवडा":
येत्या आठवड्यात बारा वर्षात एकदा होणारा असा एक महत्त्वाचा ग्रहबदल होत आहे. गुरु वृश्चिक राशी मधून, स्वग्रुही धनु राशीत जात आहे. ही जरी जमेची बाजू असली, तरी ह्या आठवड्यात ग्रहांचे अनेक षडाष्टक योग आणि केंद्र योग एकापाठोपाठ एक होणार आहेत. त्यामुळे हा आठवडा फार महत्त्वाचा आणि अनेक प्रकारच्या आश्चर्यजनक घटनांचा असू शकेल असा होरा मांडता येईल. आठ आणि नऊ ह्या तारखा य
ह्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कल्पना करता येणार नाही, असेही काही ह्या आठवड्यात घडू शकते.
बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!

"हा दैवाचा खेळच निराळा":
नशीब नशीब म्हणून काही असतं, ह्याची प्रचिती आता घडणाऱ्या अनेक नाट्यमय घटनांमुळे येत आहे. काल जे शिखरावर होते आणि जणु पुढेही आपणच शिखरावरच राहू, अशा वल्गना करत होते, त्यांना दैवाच्या एका फटकार्याने जमिनीवर तर आणले आहेच, परंतु ज्यांना ते चारीमुंड्या चीत करू असे मनसुबे होते, तेच अखेर या साऱ्या खेळाचे किंगमेकर ठरले आहेत!
हा नशिबाचाच भाग म्हणायचा नाही कां?

बदलत्या काळाचा महिमा पहा, ज्यांना आजपर्यंत वर्षानुवर्षे कधीही शक्य नव्हतं, ते त्यांचं स्वप्न पूर्ण होणार की काय, अशी परिस्थिती आज कधी नव्हे ते व्हायची फारच दाट शक्यता आहे.
म्हणूनच त्याच्यासाठी म्हणायला लागते की:

"हीच ती वेळ"
"हाच तो क्षण"
"अभी नही, तो कभी भी नही!"

"आगळे वेगळे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य":
"सुधा" डिजीटल दिवाळी अंक'१९:

ह्या सार्या पार्श्वभूमीवर, केवळ नशिबावर हवाला ठेवून पुढे जायचं की, आपल्या स्वकर्तृत्वावर भरोसा ठेवून, योग्य तऱ्हेने मार्ग काढत आपल्याला हवे असलेले समाधान मिळवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

त्या प्रश्नाचे उत्तर, ज्योतिषातील नियमांनुसार ग्रहबदलांप्रमाणे, प्रत्येक राशीला किती दिवस शुभ ह्यानुसार, अनुकूल गुण देऊन एकमेवाद्वितीय अशी राशिभविष्याची आम्ही पद्धत शोधली. ती चार दशकांची लोकप्रिय पद्धत , तुम्हाला अपेक्षा आणि प्रयत्न ह्यांची योग्य ती सांगड त्या त्या काळातील तुमच्या राशींच्या अनुकूल गुणांवरून दाखवू शकेल अशी ती संकल्पना आहे. तिचा अवलंब करून, आपल्या नशिबाचे सुकाणू स्वतःच्या हातात घ्या हे सांगते.
म्हणूनच आम्ही म्हणू शकतो की:
"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार"!

ह्या तर्हेचे संपूर्ण वार्षिक राशिभविष्य असलेला विविध साहित्याने नटलेला माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिकाने प्रयत्नपूर्वक काढलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९ नुकताच प्रकाशित झाला. राशीभविष्या व्यतिरिक्त उत्तमोत्तम विविधांगी साहित्याचा नजराणा ह्या अंकात आहे.

त्वरा करा,
अन् वेळ न दवडता 9820632655 ह्या whatsapp क्रमांकावर आजच आपली मागणी नोंदवा व अंक मिळवा. त्यानंतर ऑनलाइन त्याचे मानधन रुपये ७५/- कसे पाठवायचे तो संदेश तुम्हाला येईल.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":
येत्या आठवड्यातील प्रमुख ग्रहबदल: गुरू ४ तारखेला व्रुश्चिकेतून धनु राशीत तर ७ तारखेला बुध वक्री होऊन तुळा राशीत जाईल, तर चंद्राचा प्रवास मकर, कुंभ व मीन राशी असा होणार आहे.

ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात सुधारणा होत असल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच वाढ होणार असून, आघाडी कायम ठेवणार्या कर्क राशीची जागा आता मेष रास घेईल व त्यामागोमाग कुंभ राशी नशीबवान ठरेल. तर तुळा रास चांगलीच घसरणार आहे.

उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: मेष, कुंभ व कर्क

दुसरा शुभ उजवा गट: सिंह, कन्या, मिथून व मीन

तिसरा मध्यम गट: व्रुश्चिक, धनु व तुळा

चौथा कष्टाचा डावा गट: कोणीही नाही.

पाचवा कटकटींचा तळाचा गट: व्रुषभ व मकर

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          ३८ ( २६ )                    १ ( ६ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात आश्चर्यकारक स्थिती. नोकरीतील प्रगती व विरोध मोडून तुम्ही अधिकार व चांगली आर्थिक प्रगती कराल.. प्रवासात चांगल्या फायदेशीर ओळखी होतील. कौटुंबिक मंगल कार्याची शक्यता.

२ व्रुषभ       १५ (२२ )               ११ ( ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण झपाट्याने घसरले. राशींच्या स्पर्धेत क्रमांकात दोन पाऊले मागे ढकलले जाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांशी मतभेद त्यामुळे मनस्ताप. आर्थिक नियोजन कोलमडेल. कौटुंबिक आजारपणे व प्रवासात अडचणी.

३ मिथून    ३४ ( २४ )                       ४ ( ८ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण उत्तमपणे वाढतील. त्यामुळे आर्थिक व्यवहार मनाजोगते होऊ शकतील. नोकरी व्यवसायात फ
प्रगती व भरभराट झाल्याने तब्येत उत्साही राहील. जोडीदाराच्या मागण्या पूर्ण कराल.

४ कर्क          ३७ ( ४० )                    ३ ( १ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात घसरण. नोकरीत तुमच्या कल्पकतेने अर्थव्यवहार फायद्यात. दूरचे प्रवास संभाळून करा व नवीन ओळखी होतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे.

५ सिंह           ३२ ( २२ )               ५ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण भरघोस वाढले आहे त. स्पर्धेत चलती का नाम गाडी वेगाने पुढे नेत नोकरी व्यवसायात स्थिरता व समाधानकारक स्थिती. आर्थिक व्यवहार हुशारीने कराल. मानसिक चिंता दूर होतील. म्हणूनच तुम्ही मागील तळाच्या १२ क्रमांकावरुन चक्क ५व्या स्थानी उडी घेणार आहात. धावपळीत तब्बेतीची काळजी घ्या.

६ कन्या       ३१ (२७)                   ६ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात थोडी वाढ आपण स्पर्धेत प्रयत्न वाढवावे लागतील तरच नोकरीत व्यवसायात तुमची प्रतिमा व अर्थार्जन सुधारेल. मात्र आपल्या कुटुंबातील लहान मुलांकडे वेळीच लक्ष द्या.

७ तुळा         २६ ( ३०)                १० (  २ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात घसरण, शुभ ग्रहांचा फायदा इतर राशींना अधिक मिळाल्याने तुमचा क्रमांक घसरणार आहे. तब्येतीत बिघाड व नोकरी व्यवसायात मन लागणार नाही. तुमच्यावरील महत्वाची जबाबदारी पार पाडाणे जिकिरीचे. कौटुंबिक असमाधान.

८ व्रुश्चिक    २७ ( २७ )                   ८ ( ४ )

मागच्या आठवड्या इतकेच गुण. पण वाढत्या स्पर्धेमुळे क्रमांकात खुप खाली याल. नोकरी व्यवसायात प्रतिकूल घटना, वरिष्ठ नाराज. आर्थिक व्यवहारात गोंधळ होऊ शकतात. कौटुंबिक वादविवाद.

९ धनु        २६ ( २२ )                ९  (  १० )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत थोडीफार वाढ परंतु क्रमांकात घसरण कारण इतर राशीना ग्रहांच्या अनुकुलतेमुळे अधिक गुण. नोकरीत नको ती जबाबदारी पडेल. सहकार्यांची बोलणी खावी लागतील, कसाबसा टिकाव धरू शकाल. आर्थिक ओढाताणीमुळे मानसिक अस्वस्थता. प्रवास काळजीपूर्वक करा.

१० मकर       १२ ( १३)                 १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण किंचीत कमी परंतु प्रतिकूल ग्रहमानामुळे तळाचा क्रमांक! इतरांना अधिक सुलभ शुभ ग्रहमान असल्याने तुम्ही नाराज. नोकरी व्यवसायात चुकीमुळे नुकसान व वरिष्ठांची खप्पामर्जी. प्रवासात अडचणी विलंब कौटुंबिक वातावरणात चढ उतार. जोडीदाराचे मात्र सहाय्य मिळेल.

११ कुंभ       ३७ ( २९ )                २ ( ४ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात व क्रमांकात उत्तम सुधारणा. नोकरी व्यवसायात दुरचे प्रवास, आवडणारी जबाबदारी चांगली पार पाडाल. अर्थलाभ मनाजोगते. स्थावर विषयक प्रश्नी व्यवहार थोडे लांबणीवर पडतील. कौटुंबिक मंगल प्रसंग.

१२ मीन      २९ ( २५ )              ७ ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात थोडी वाढ. मात्र इतरांचीही स्थिती अधिक सुधारणार असल्याने तोच क्रमांक ह्याही आठवड्यात. नोकरीतील अडचणी वेळीच दूर करा. तरच आर्थिक व्यवहारात नुकसान टळू शकेल. तब्येतीवर ताण पडेल. संयमाने कौटुंबिक वादविवाद टाळा.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्या आठवड्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे. आपणही "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९ ची माहिती इतरांना जरुर द्यावी.

ह्या शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलला subdcribe करून राशीभविष्य व इतर व्यवहारोपयोगी विडीओज नेहमी पहा व त्यांचा आवर्जून लाभ घ्या.

आता पुढील आठवड्यात माझा एक हाती काढलेला वार्षिक राशीभविष्य व इतर विविधरंगी साहित्याची मेजवानी असलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९-वर्ष तिसरे, मी प्रसिद्ध करणार आहे.

माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या परिचय वर्तुळात जरूर शेअर करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू
३/११/'१९




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा