शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

"पुढचं पाऊल": अर्थात् "आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य: २४ नोव्हेंबर'१९ ते ३० नोव्हेंबर'१९ चे राशीभविष्य":


"पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
२४ नोव्हेंबर'१९ ते ३० नोव्हेंबर'१९:

अपेक्षा व प्रयत्न ह्यांची ग्रहस्थित्यंतरावरून काढलेल्या अनुकूल गुणांवर आधारित योग्य ती सांगड घालून जीवनांत समाधानाची दिशा दाखविणारे अभिनव साप्ताहिक राशीभविष्य!"

"हा, दैवाचा खेळच निराळा!":
जे कधी घडेल असे स्वप्नातही वाटत नव्हतं, जे पचवायलाही कठीण जावं, तसं
अवचितपणे मागच्या आठवड्यात घडून गेलं आहे. काही दिवसांपूर्वी जर कुणी जे घडलं आहे, ते वर्तवलं असतं तर, त्याला वेड्यातच काढले असते. मात्र त्यापूर्वी जे घडवायचा आटापिटा चालला होता, तेही स्विकारायला सोपं नव्हतंच.
आता ह्या निर्णायक आठवड्यात काय काय चित्र विचीत्र प्रताप पहायला लागणार, त्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

ह्या आठवड्यात २६ तारखेची अमावस्या ह्या 'बिन पैशाच्या तमाशाला' कोणते ठिगळ लावते कां व २८, ३० तारखेला काय होते ते महत्वाच्या आहे.

ह्या इतक्या दिवसांच्या घालमेल करत रहाणार्या परिस्थितीचं मूळ, २१ आँक्टोबरच्या सामुहिक निर्णयांचे फलीत हेच आहे. तेव्हां कुणालाही वाटले नसेल की, त्यामुळेच हे पुढचे महाभारत घडणार आहे. सहाजिकच सारासार विचार करता "पुनश्च श्रीगणेशा" होणे, हाच नकोसा, परंतु अत्यंत आवश्यक असा शहाणपणा ठरेल.

थोडक्यात 'हा दैवाचा खेळ निराळा'!

बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!

"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार"!:
ज्योतिषातील नियमांनुसार ग्रहबदलांप्रमाणे, प्रत्येक राशीला किती दिवस शुभ ह्यानुसार, अनुकूल गुण देऊन एकमेवाद्वितीय अशी राशिभविष्याची आम्ही पद्धत शोधली. ती चार दशकांची लोकप्रिय पद्धत प्रत्यक्षात उपयोगी ठरत आहे. अनुकूल गुण तुमच्या मनाला अपेक्षा व प्रयत्न ह्यांचा समतोल कसा साधायचा ते दाखवून तुमचा आत्मविश्वास व संयम वाढवू शकतील.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":
येत्या आठवड्यातील कोणतेही ग्रहबदल नाहीत, चंद्र तुळा, व्रुश्चिक, धनु राशी असा प्रवास करेल.

ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात विशेष बदल होत नसल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच स्थिती जवळ जवळ रहाणार असून, आघाडीवरील राशीची जागा आता कुंभ रास घेईल व त्यामागोमाग मिथून राशी नशीबवान ठरेल. तर मकर रास नेहमीप्रमाणे तळातच असणार आहे.

उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

२४ नोव्हेंबर'१९ ते ३० नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: कुंभ, मिथून,सिंह, मेष व धनु

दुसरा शुभ उजवा गट: कन्या, कर्क व मीन

तिसरा मध्यम गट: व्रुषभ व तुळा

चौथा कष्टाचा डावा गट: व्रुश्चिक व मकर

पाचवा कटकटींचा तळाचा गट: कोणीही नाही.

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          ३६ ( ३४ )            ४ ( ३ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत किंचीत वाढ, पण स्पर्धैमुळे क्रमांकात घसरण. नोकरीतील प्रगती मध्ये सहकारी अडचणीत आणू शकतील. सावध रहा. चांगली आर्थिक जमाखर्च योग्य तर्हेने हाताळाल. प्रवासात विलंब. प्रक्रुतीची काळजी घ्या. होतील. कौटुंबिक सुखसमाधानाचे दिवस.

२ व्रुषभ       ३० ( २६ )            ९ ( १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण थोडे वाढले परंतु स्पर्धा तीव्र असल्याने क्रमांक किंचीतच वधारला. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज त्यामुळे तुम्हाला मनस्ताप. स्थावरविषयक व्यवहार लांबणीवर टाका. कौटुंबिक समस्या हाताळाव्या लागतील. प्रवासात वाद वाढवू नका.

३ मिथून    ३८ ( ३४ )             २ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढले, त्यामुळे क्रमांकही वर गेला. आर्थिक व्यवहारात चांगला फायदा, नवीन खरेदी. नोकरी व्यवसाय मनाजोगता, त्यामुळे उत्साह वाढेल. प्रगती कराल. स्थावर प्रश्न मार्गी लागतील. तब्येत धावपळीमुळे नरम गरम. जोडीदाराचे सहकार्य.

४ कर्क          ३२ ( ३० )           ७ ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात किंचित वाढ पण क्रमांक तोच. नोकरीत नको त्या उचापती करू नका. संभाळून वागावे. अर्थव्यवहारात धोका पत्करू नका. प्रवासात कुणावर विश्वास ठेवू नका, नुकसानीचा धोका. मुलांच्या कौतुकाचे क्षण. कौटुंबिक आजारपणं.

५ सिंह           ३८ ( ३८ )          ३ ( १ )

मागच्या आठवड्या इतकेच. तरी स्पर्धेमुळे क्रमांकात घसरण. नोकरी व्यवसायात उत्साह वाढेल. आर्थिक निर्णय योग्य घ्याल. स्थावर समस्या सुटू शकेल. धावपळीत काळ जाईल. जोडीदाराचे सहकार्य. पण तब्येत संभाळा.

६ कन्या       ३३ ( ३३ )              ६ ( ६ )

मागच्या आठवड्यासारखेच गुण व क्रमांक! आपण स्पर्धेत त्याच जागी! नोकरीत व्यवसायात जबाबदारी पार पाडाल. मात्र आर्थिक व्यवहार संभाळून करा. संततीविषयक चिंता. प्रवास लाभदायक.

७ तुळा        ३० ( २८ )             १० (  ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात किंचीत वाढ. पण स्पर्धेमुळे असमाधानकारक पायरीवर.
आर्थिक व्यवहारात नुकसान वा फसवणूक. मानसिक चिंता वाढतील. नोकरी व्यवसायात नकोती कामे अंगावर पडून निभाव लागणे कठीण. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

८ व्रुश्चिक    २४ ( २४ )               ११ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण व क्रमांक तोच. घसरण. वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी व्यवसायात पिछेहाट, सहकारी अडथळे निर्माण करतील. आर्थिक व्यवहारात धोका पतकरू नका सावध व्यवहार करा. कौटुंबिक वावविवाद विकोपाला जाऊ शकतील.

९ धनु        ३६ ( ३४ )               ५ (  ४ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत थोडीफार वाढ त्यामुळे क्रमांक मात्र स्पर्धेमुळे मागचा. नोकरीतील जबाबदारी पार पाडताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, जुळवून घ्या. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर. मानसिक चिंता दूर होतील. कुटूंबातील वडिलधाऱ्या मंडळींकडून कौतुक.

१० मकर       २३ ( २० )                १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण थोडे वाढले. तुमचा तळाचा क्रमांक अजून काही चुकत नाही. आर्थिक ओढाताण. नोकरी व्यवसायात सहकार्यांच्या कारवाया, धावपळ. प्रवासात किरकोळ वाद. कौटुंबिक जीवनात संततीची काळजी कराल. संयम व श्रध्दा हाच आता आधार.

११ कुंभ       ४१ ( ३७ )            १ ( २ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात वाढ व स्पर्धेत अव्वल स्थान. नोकरी व्यवसायात तुमचे कौतुक व जबाबदारी चांगली पार पाडाल. प्रमोशन वा अर्थलाभ मनाजोगते. स्थावर विषयक चिंता दूर व्हाव्यात. कौटुंबिक मंगलप्रसंग.

१२ मीन      ३१( ३१ )              ८ ( ८ ) 

मागच्या आठवड्यापेक्षा गुण व क्रमांकात परिस्थिती तशीच. नोकरीतील सहकार्यांशी जुळवून घ्या, त्यांचे गैरसमज वेळीच दूर करा. आर्थिक व्यवहारात जास्त धोका नको. मानसिक अस्वस्थता वाढेल. संयमाने वागा. कौटुंबिक असमाधान.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्या आठवड्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे.

ह्या शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलला subdcribe करून राशीभविष्य व इतर व्यवहारोपयोगी विडीओज नेहमी पहा व त्यांचा आवर्जून लाभ घ्या.

माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या परिचय वर्तुळात जरूर शेअर करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९":
जाता जाता, एक खास साहित्यिक मेजवानीची भेट वाचकांसाठी आम्ही एकहाती निर्मिली आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

असेच अनुकूल गुणांवर आधारित मार्गदर्शक संपूर्ण वार्षिक राशिभविष्य असलेला विविध साहित्याने नटलेला माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिकाने प्रयत्नपूर्वक काढलेला ह्या डिजिटल अंकात राशीभविष्या व्यतिरिक्त उत्तमोत्तम विविधांगी साहित्याचा नजराणा आहे.

त्वरा करा,
अन् वेळ न दवडता 9820632655 ह्या whatsapp क्रमांकावर आजच आपली मागणी नोंदवा व अंक मिळवा. त्यानंतर ऑनलाइन त्याचे मानधन रुपये ७५/- कसे पाठवायचे तो संदेश तुम्हाला येईल.

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू
२४/११/'१९ सकाळी ८ वाजता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा