"घडतंय, बिघडवतंय?":
"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!"
असं म्हटलं जातं, परंतु आताचा जमाना हा उलटा पालटीचा असल्याने "बोले तैसा न चाले" मंडळींच्या कारनाम्यांचा असलेला दिसत आहे!
अर्थात त्या कारनाम्यांपायी सध्या नाट्यमय व विपरीत घडतंय, त्याला गेल्या पंधरवड्यातील विविध ग्रहांचे षडाष्टक वा केंद्रयोगही असू शकतात कां?
ह्या प्रश्नाचे उत्तर, आमच्या ब्लॉगवर
"पुढचं पाऊल" साप्ताहिक राशीभविष्यांत मिळेल कसे ते पहा! आम्ही लिहिले अन् तसतसं जणु घडतंय की काय ह्याची प्रचिती कशी येते, ते तुमचे तुम्हीच ठरवा:
( ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com )
१ "पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९:
"विलक्षण विस्मयकारी आठवडा":
येत्या आठवड्यात बारा वर्षात एकदा होणारा असा एक महत्त्वाचा ग्रहबदल होत आहे. गुरु वृश्चिक राशी मधून, स्वग्रुही धनु राशीत जात आहे. ही जरी जमेची बाजू असली, तरी ह्या आठवड्यात ग्रहांचे अनेक षडाष्टक योग आणि केंद्र योग एकापाठोपाठ एक होणार आहेत. त्यामुळे हा आठवडा फार महत्त्वाचा आणि अनेक प्रकारच्या आश्चर्यजनक घटनांचा असू शकेल असा होरा मांडता येईल. आठ आणि नऊ ह्या तारखा
ह्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कल्पना करता येणार नाही, असेही काही ह्या आठवड्यात घडू शकते.
बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!
"हा दैवाचा खेळच निराळा":
नशीब नशीब म्हणून काही असतं, ह्याची प्रचिती आता घडणाऱ्या अनेक नाट्यमय घटनांमुळे येत आहे. काल जे शिखरावर होते आणि जणु पुढेही आपणच शिखरावरच राहू, अशा वल्गना करत होते, त्यांना दैवाच्या एका फटकार्याने जमिनीवर तर आणले आहेच, परंतु ज्यांना ते चारीमुंड्या चीत करू असे मनसुबे होते, तेच अखेर या साऱ्या खेळाचे किंगमेकर ठरले आहेत!
हा नशिबाचाच भाग म्हणायचा नाही कां?
बदलत्या काळाचा महिमा पहा, ज्यांना आजपर्यंत वर्षानुवर्षे कधीही शक्य नव्हतं, ते त्यांचं स्वप्न पूर्ण होणार की काय, अशी परिस्थिती आज कधी नव्हे ते व्हायची फारच दाट शक्यता आहे.
---------------------------
२. "पुढचं पाऊल":

२७ आँक्टोबर'१९ ते २ नोव्हेंबर'१९:
"रोमांचकारी घटना घडणार?":
मागील आठवड्यात, "पुढचं पाऊल" साप्ताहिक राशीभविष्यामध्ये मी, २१ ऑक्टोबरला होणाऱ्या चार ग्रहांच्या केंद्र योगांचे परिणाम, मोठी उलथापालथ होईल असे मांडले होते. अगदी त्याचाच अनुभव आता येत आहे आणि असे म्हणण्याची वेळ आली आहे की:
"हीच ती वेळ"
"हाच तो क्षण"
"अभी नही, तो कभी भी नही!"
ह्याच आठवड्यात देखिल, असेच दखल घेण्याजोगे तीन षडाष्टक आणि एक केंद्रयोग होत आहेत! त्यांचा परिणाम कोणकोणत्या नाट्यमय घटना घडवून आणतो, ते लवकरच दिसेल. हे तीन षडाष्टक म्हणजे २९ तारखेला मंगळाचा-नेपच्यूनशी, तर ३० तारखेला चंद्राचा हर्षल व राहूशी षडाष्टक योग; तर केंद्रयोग ३१ तारखेला चंद्र आणि नेपच्यूनचा, असे ते कुयोग आहेत.
--------------------------
३. "पुढचं पाऊल":
२० आँक्टोबर ते २६ आँक्टोबर'१९ चे आगळेवेगळे साप्ताहिक राशीभविष्य!"ः
ह्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे २१ तारखेला होणारे चार अनिष्ट केंद्रयोगः
रवि-चंद्र, चंद्र-बुध, मंगळ-राहू आणि मंगळ-केतू. उलथापालथ घडविणारे हे चमत्कारिक कुयोग...
---------------------------
सारांश काय तर.......
ह्या पुढे व ८ /९ नोव्हेंबरला अजून काय काय घडतंय ते पहाणं फक्त आपल्या हातात आहे!
धन्यवाद
सुधाकर नातू
७/११/'१९ दुपारी १२ वाजता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा