'रंगांची दुनिया:छाया-प्रकाश':
लेखक श्री.
सुधाकर नातू
व्यावसायिक आणि समांतर सिनेमा
जो
पहात असताना, विचार करायला न लागता, कुणालाही समजू शकतो, तो व्यावसायिक सिनेमा; तर, जो पाहूनही फक्त विचार करूनच, काही मोजक्यांनाच समजू शकतो, तो समांतर सिनेमा, अशी म़ाझी तरी माझ्यापुरती समजूत आहे. समांतर रेषा जशा जगाच्या अंतापर्यंत एकमेकींना मिळत नाहीत, तद्वतच समांतर सिनेमा आणि सामान्य प्रेक्षक, ह्यांचे एकमेकांशी जुळत नाही. लोकशाही जशी, लोकांनी, लोकांसाठी लोकांकरवी, लोकांच्या हितासाठी चालविलेली राज्यव्यवस्था असते, तसाच, व्यावसायिक सिनेमा सर्व लोकांसाठी असतो; तर मग बहुदा, समांतर सिनेमा हा एकाधिकारशाहीचा द्योतक असावा, कारण तो जसा निर्मात्यांना अभिप्रेत असतो तसाच सर्वांनी समजावा असा आग्रह असतो. व्यावसायिक सिनेमांतील गुणवत्ता शोधायला सामान्य द्न्यान पुरेसे असते, मात्र मुळांतच समांतर सिनेमा समजणेच कठीण असल्याने, त्याची गुणवत्ता आजमावण्यासाठी खूपच डोके बहुदा चालवावे लागते!
'सुवर्ण कमळ' पुरस्कार
'कासव' ह्या मराठी चित्रपटाला सर्वोत्क्रुष्ट बोलपट म्हणून 'सुवर्ण कमळ' पुरस्कार मिळाला, ही एक विशेष अभिनंदनाची व आनंदाची गोष्ट आहे हे खरेच, पण मला नवल ह्याचे वाटते की, हा चित्रपट कधी प्रदर्शित झाला होता व तो किती दिवस चालला होता? असे पूर्वी पण झाले आहे. एक चित्रपट पुरस्कारानंतर प्रदर्शित झाला होता. मला वाटते, तो रत्नाकर मतकरींचा 'इन्व्हेसमेंट' हा होता
कळीचा
प्रश्न:
म्हणून कळीचा प्रश्न आहे की, असे पुरस्कार मिळवू शकणारे, चाकोरीबाहेरचे चित्रपट बनविणार्या मराठी निर्मात्यांना, तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चांगले वितरक कां मिळत नाहीत? दुसरे असे की अशी स्थिती फक्त मराठी चित्रपटांवरच कां येते? प्रबोधनाची सांगड मनोरंजनाबरोबर जेव्हां घालणे, अशा निर्मात्यांना जमेल तेव्हांच ही वितरक न मिळण्याची समस्या सुटू शकेल. शेवटी चित्रपट, हे माध्यम प्रेक्षकांसाठी असते आणि प्रबोधनही जर सद्य परिस्थितीनुसार केवळ निवडक व मोजक्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचले तर त्यांतून काय साध्य होणार वा काय मोठे परिवर्तन होणार? 'पुरस्कार मिळाला, म्हणजे भरून पावले', असे वाटणे ही आत्मवंचनाच नव्हे कां? जे "Classes" ला भावते, ते बहुश: "Masses" ला नावडते! म्हणून प्रश्न पडतो तो हा की, पुरस्कार "लोकमान्य" असावेत की नाही?

ह्यावर
एक करता येइल, ते म्हणजे जसे सरकार सिनेमा बनवण्यासाठी अनुदान देते. पुष्कळदा त्यासाठीच फालतू चित्रपट बनवले जातात . त्यापेक्षा सरकारने पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या वितरणा साठी काहीतरी ठोस व्यवस्था करावी .
अखेरीस हे सुचवावेसे वाटते की कोणताही चित्रपट तो प्रेक्षकांपर्यंत प्रदर्शित झाल्यावरच त्याचा पुरस्कारांसाठी विचार व्हावा. अर्थात् सार्वजनिक द्रुष्ट्या प्रदर्शित झालेल्याच कलाक्रुतींना पुरस्कार स्पर्धेंत प्रवेश मिळावा!

सहनशिलपणा
व घुसमट:
आपल्या अपेक्षा पुर्या झाल्या नाहीत वा जे जसे घडणे रास्त होते वा जे घडायला हवे असे आपल्याला मनापासून वाटते, ते तसे न घडता, भलतेच व आपल्या द्रुष्टीने अयोग्य असं घडते, तेव्हा आपल्याला पराकोटीचा मनस्ताप होतो, ताण तणाव अगदी असह्य होतो. असे मनाविरुद्धचे सहन करणे कधी कधी महाकर्मकठीण होऊन जाते आणि आपल्या सहनशक्तीचा अंत होतो. अशा वेळी आपल्या मनांतील खदखद व्यक्त करणेही जेव्हा शक्य नसते किंवा निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती बदलणे आपल्या आवाक्याबाहेरचे होते, तेव्हां आपल्या मनाची अक्षरश: घुसमट होते. वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनांत असे सहनशक्तिची परीक्षा पहाणारे आणि मनाचा कोंडमारा, घुसमट करणारे प्रसंग वा घटना घडतच असतात.
नांव सोनुबाई, पण हाती कथलाचा वाळा:
नुकतेच दोन संगीताचे विनामूल्य कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा योग आला. एक होता नाट्यसंगीताचा तर दुसरा जुन्या भावगीतांचा. खूप दिवसांनी हा असा छान योग आला होता. पण....तो अनुभव सहनशक्तीची परीक्षा पहाणाराच ठरला.
नाट्यसंगीताचा कार्यक्रम एका देवळाच्या आवारांत होता. वैभवशाली इतिहास असलेल्या, मराठी संगीत रंगभूमीवरील गाजलेल्या श्रवणीय गीतांचा सुमधुर नजराणा आपल्याला आता ऐकायला मिळणार, ह्मा भाबड्या आशेने तिथे आम्ही गेलो. पहातो, तो काय, तेथे बसण्याची व्यवस्था जरा विचित्रच होती. एक तर अर्ध्याहून अधिक प्रेक्षकांना मंचावरील गायक व वादक निवेदक दिसू शकत नव्हते आणि त्यांना विडीयो कँमेर्याद्वारे पडद्यावर तो पहाण्याची सोय होती. गंमत अशी की त्याच आवारात देऊळ असल्याने कार्यक्रम सुरू असताना देव दर्शनाला येणार्या जाणार्यांचा एक प्रकारे व्यत्ययही, प्रेक्षकांना सहन करायला लागत होता. पण तरीही कार्यक्रम संगीत श्रवण करण्याचा असल्याने रसिकांना अशा व्यत्ययाचा होणारा त्रास क्षम्य होता.
पण ह्या मंडळींनी एक दोन लोकप्रिय रचना सोडता, बाकी कधीही न ऐकलेली नाट्यगीते एकामागून एक ऐकविण्याचा सपाटाच सुरू ठेवला. निवेदक तर, प्रत्येक पद कुठल्या नाटकांतील आहे हे न सांगता प्राध्यापकी पोपटपंची करत राहिला. खरे म्हणजे गायक उत्तम गळा असणारे आणि वादकही तयारीचे होते. पण अनभिद्न्य गीते व नीरस निवेदन ह्यामुळे माझ्यासारख्या पुष्कळ रसिकांची घुसमट होऊन त्यांनी अखेर, बाहेरचा रस्ता पकडला. अशा तर्हेच्या विनामूल्य कार्यक्रमां प्रमाणेच, अगदी तिकीट लावून लोकप्रिय संगीतकार व गायकांच्याही खास कार्यक्रमांचे बाबतीतही, प्रसिद्ध गीतांऐवजी न ऐकलेलीच पुष्कळ पदे रसिकांच्या माथी मारली जातात असा निदान माझा तरी अनुभव आहे. येणार्या नवीन अल्बम मधील गाण्यांचाच प्रामुख्याने त्यांत समावेश असतो.
दुसरा भावगीतांचा कार्यक्रम चांगला वातानुकुलीत सभाग्रुहांत असूनही तिथेही अशीच निराशा पदरी आली, कारण तिथे ती अजरामर गीते गाणारे गायक कलाकार मात्र, सुमार तयारीचे व चांगला गळा नसलेले होते!

‘फिलौरी’: पदरी निराशाच
‘फिलौरी’ असे जरा हटके नांवाचा चित्रपट जरा वेगळा असेल आणि अनुष्का शर्मासारखी चतुरस्त्र अभिनेत्री त्यांत नायिका व निर्मातीची बाजू संभाळणारी असल्याने आम्ही तो चित्रपट पहायला गेलो. पण पदरी निराशाच आली. नायकाला मंगळ आहे म्हणून त्याचे आधी एका झाडाशी लग्न काय लावले जाते आणि नंतर त्या झाडांतून मागच्या जन्मांत आपल्या प्रियकराबरोबर मिलन न होऊ शकलेली तरुणी भूत बनून बाहेर काय येते, सारेच कल्पनेपलिकडले होते. वर्तमान आणि एक शतकापूर्वीचा काळ ह्यांचा सतत लपंडाव खेळला जात शेवट गोड होतो. पण सहज न उमजणारी भाषा आणि अनाकलनीय असे वातावरण ह्यामुळे माझी पत्नी जवळ जवळ सर्व वेळ चित्रपटग्रुहांत झोपीच गेली होती. मलाही पुष्कळ वेळ काय चाललंय ते कळत नव्हते. शेवट जेव्हां रहस्याचा उलगडा होतो आणि भूत रुपातील नायक नायिकेचे प्रेम सफल होते, तेव्हांच आधी जे जे काय घडत होते त्याचा कसाबसा अर्थ लागला. हल्ली हे हिंदी ऐवजी कुठल्या ना कुठल्या न समजणार्या बोलीभाषेलाच प्राधान्य देणार्या कलाक्रुतींचे फँड आलेले दिसते. अशा चित्रपटांत अनभिद्न्य वातावरण व तसेच डोक्यावरूध जाणारे संवाद ह्यामुळे सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षाच पाहिली जाते. फिलौरीला रंगून बोलपटासारखी अर्ध्यावरच उठून बाहेर जायची वेळ आमच्यावर आली नाही इतकेच!
अशा अनुभवांमुळे पेसा, कष्ट व वेळ खर्च करून दोन अडीच तास कुठलाही चित्रपट पहायला जाऊन आपल्याला खुर्चींत कारण नसताना जखडून घ्यायची भीती मात्र वाटू लागली आहे.

न भावणारा एक महा अनुभव:
‘रंगून' अपेक्षा गेल्या भंगून:
मला काय हवंय,ते मलाच कळत नाहीये.
मला काय म्हणायचय,ते मला वळत नाहीये.
मला काय बघायचय,तेच मला दिसत नाहीये.
मला काय ऐकायचय,ते सुर मला गवसत नाहीये. मला काय भावतय, ते मला भुलवत नाहीये. माझ्या मनाची ही अशी अमूर्त, अगम्य व अनिश्चित अवस्था, विशाल भारद्वाज ह्यांचा ‘रंगून' चित्रपट पाहिल्यावर झाली.

केवळ एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर बघून वा कुणी तरी (नाहक ?) कौतुक करणारे परिक्षण लिहीले आहे, म्हणून आपला अमूल्य वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून त्या चित्रपटाला जावू नये, असा धडा आम्हाला 'रंगून' ह्या बोलपटाने दिला. दुसर्या महायुद्धाच्या व भारतीय स्वातंत्र्यसंग्रामांतील नेताजी सुभाषचंद्रांच्या आझाद हिंद सेनेच्या, रोमहर्षक लढ्याच्या पार्श्वभूमीवरील, प्रेमाचा त्रिकोण असणारी, ही कलाक्रुती असावी अशी समजूत करून पहायला गेलो मात्र, पण आमच्या अपेक्षा पार पार भंगून गेल्या. हा एखादा चित्रपट पहातोय, कां माहितीपट आणि तोही कोणत्या भाषेतला तेच मुळी कळत नव्हते, त्यांत भर, खराब ध्वनीमुद्रणाची!
मध्यंतरापर्यंत बहुदा संग्रहित युद्धद्रुष्ये थोडीफार पहायला मिळाली. पण त्यानंतर स्टंट चित्रपटातील नायिका (कंगना रणावत) आणि तिचा एक संरक्षक (शाहीद कपूर) आगगाडीतून रंगूनला कां कशासाठी जातात, प्रवासांतच त्यांची अचानक, वाताहात होऊन, अखेर एक कैदी सैनिक व ही दोघं जंगलातील वादळ, बाँम्बस्फोट अशा अनेक संकटांना तोंड देत असलेली पहाणे ही एक शिक्षाच होती. शिवाय ही सारी मंडळी इंग्रजी कां हिंदी कां जपानी भाषा बोलत आहेत तेच समजत नव्हते. ट्रेनमधील इतर प्रवासी गायब, शेवटी फक्त हे तिघे कुठे खोपटात नंतर पावसाचा धुमाकू्ळ आणि त्या कैद्याची व संरक्षक सैनिकाची धुम:श्चक्री, नायिकेचे,व संरक्षक सैनिकाचे चिखलात लोळणे काय, दोघांमधील शारिरीक आकर्षण आणि एकमेकांना मिठ्या मारणे काय, सारेच विचित्र.
मध्यंतरानंतर नायिकेचा प्रियकर नायक (सैफ अली खान) कुठल्याशा पुलाच्या एका बाजूकडून अचानक ह्या दोघांना भेटतो काय, सारेच अतर्क्य! मध्यंतरापर्यंत आम्ही कसे बसे तग धरून होतो. पण नंतर लगेच ह्या स्टंट क्वीनचे सैनिकांचे मनोरंजनार्थ घोड्यावर बसून नाच गाणे, तेही बेसूर, चालू झाले मात्र, आमच्या सहनशक्तिचा अक्षरश: अंत झाला व कंटाळून, आम्ही जेव्हा चित्रपटग्रुहा बाहेर मोकळ्या हवेंत आलो, तेव्हा कुठे आमचा जीव भांड्यात पडला.
पहिल्याच आठवड्यात चौथ्या वा पाचव्या दिवशी जेमतेम 15/20 प्रेक्षकच हा बोलपट पहायला आलेले बघून, सुरवातीलाच आमच्या मनांतील पाल खरे म्हणजे, चुक चुकली होती. अखेर आजपर्यंत निराश होऊन चित्रपट पहाणे अर्धवटच सोडून देण्याचा, कटू अनुभव ह्या 'रंगून'ने आम्हाला दिला. अशी वेळ कुणावरही येवू नये आणि असे बेभरंवशाचे बोलपट प्रेक्षकांच्या माथी मारण्याची बुद्धि कुणाला होवू नये!
नाराज करणारा अनुभव: 'ऐ दिल, है मुष्किल' चित्रपट
असाच जवळ जवळ नाराज करणारा अनुभव काही दिवसांपूर्वी आला होता त्याचीही आठवण झाली. तो चित्रपट म्हणजे करण जोहर ह्यांचा, ऐश्वर्या राय, रणबीर कपूर अनुष्का शर्मा आणि शहारूख (किंग) खान असे दिग्गज कलाकार असलेला:
'ऐ दिल, है मुष्किल' चित्रपट
ह्यांतील एका मागोमाग जुळणारे झटपट प्रेम, लगेच प्रेमभंग म्हणजे विस्कळीत विविधतेचे अतर्क्य रूप आहे. बाहेरून आकर्षक नीट नेटके रंगीत रूपडे, पण अंतरंग मात्र विसरून जावे असेच केवळ वाटणारा हा चित्रपट नाही, तर कुठून व कां हा बघायला यायचा मूर्खपणा आपण केला असे मनावर बिंबवणारा हा बोलपट आहे.
केवळ मोठी नांवे असून भागत नाही, कारण चित्रपटांत नक्की, काय सांगायचय ते मनांत धरून ठेवावे अशा ताकदीचे वाटतच नाही.

हवा हवासा मजकूर, हा एखादा टीपकागद, जशी शाई मुरवून ठेवतो, तसा चित्रपट प्रेक्षकांना पकडून ठेवणारा असावा. हा मंत्र नेहमी ध्यानांत ठेवण्याजोगा आहे. त्यामुळे सार्वजनिक वेळेचा, श्रमांचा आणि पैशाचा अपव्यय टळू शकेल.
चि. व चि.सौ.कां': निखळ विनोदाचा एव्हरेस्ट
‘एलिझाबेथ एकादशी’ ह्या अर्थगर्भ आणि ह्रदयाला भिडणार्या यशस्वी बोलपटानंतर म़धुगंधा कुलकर्णी व परेश मोकाशी ह्या कलाकार दांपत्याचाच हा नवा कोरा चित्रपट असल्याने, तो सर्वांगसुंदर असणारच ही खात्री मनाशी धरून, आधुनिक सत्या व सावित्रीचा हा कारनामा बघायला आम्ही गेलो आणि चक्क निखळ विनोदाचा एव्हरेस्टच पादाक्रांत करण्याचा पराक्रम करूनच थिएटरच्या बाहेर पडलो. ‘व्हाईट लीली व नाईट’ रायडर नाटकातील विवाहापूर्वी एकत्र राहून एकमेकांना पारखण्याची संकल्पना इथे खुसखुशीतपणे उलगडली आहे. सोलर एनर्जीचा ध्यास घेतलेला सत्या हा सायंटीस्ट तरूण आणि सर्व प्रकारच्या प्राण्यांवर अक्षरश: प्राणापलिकडे प्रेम करणारी मनस्वी सावित्री लग्नापूर्वी महिनाभर एकत्र रहाण्याचा आगळा वेगळा खेळ खेळतात आणि त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांची होणारी घालमेल इथे धमाल उडवते. आयसिंग आँन द केक वाटावे असे साविच्या ७० वर्षांच्या बिनधास्त आजीचे ह्या वयात न शोभणारे प्रेमाचे थेर,अफलातून करामती मुळे त्या धुम धमालीत भर घालतात.
विलक्षण गतीने ही जगावेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही बरोबर घेऊन एखाद्या रोलर कोस्टर सारखी ट्वीस्ट घेत घेत, नांदा सौख्यभरे पर्यंत अखेर छानपणे कधी जाऊन पोहोचते, ते कळतच नाही.

इतक्या सा-या लग्नाच्या गोष्टी पाहील्या पण ही एका लग्नाची साईण्टिफिक गोष्ट बेहद्द आवडली. संपूर्ण सिनेमाची मांडणी अर्कचित्रात्मक आहे. अर्थात या अर्कचित्रांचा दर्जा आर.के. लक्ष्मणच्या तोडीचा आहे. जमिनीशी घट्ट नातं असलेला सहज निरागस विनोद की जो सहजपणे केला जाऊ शकत नाही तो लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या दांपत्याने यशस्वीरित्या साधला आहे. खूप खूप दिवसांनी, मला संपूर्ण सिनेमाभर इतका हसवणारा हा पहिलाच चित्रपट. इथे प्रत्येक पात्राचा-अगदी सावि व सत्याचे आई,बाबांपासून, साविच्या खट्याळ लहान भावापर्यंत सर्वांचा अभिनयही अर्कचित्रात्मक आहे. भावनात्मक प्रसंगात तो तर अधिकच नैसर्गिक वाटतो आणि त्यामुळे हा संपूर्ण सिनेमा हवाहवासा व आपला भासतो.
अशा सिनेमाचे संवाद लिहीणे कठीण काम होते. चुरचुरीत, प्रसंगानुरुप संवादांमुळे सिनेमा उथळ न होता,खूपच अर्थपूर्ण झाला आहे. आर.केंच्या अर्कचित्रातली भाषा संवादात सहज आली आहे. या सिनेमातले एकही पात्र अनावश्यक वाटत नाही. या सिनेमातली एकही घटना अकारण घडते आहे असे वाटत नाही. या सिनेमातली दोन गाणी स्वतंत्रपणे, सिनेमाच्या कथानकात सरमिसळलेली वाटतात. खरे म्हणजे बदलत्या गतीमान काळांत एकट्या पडणार्या ज्येष्ठांच्या दुसर्या सहजीवनाकडे अधिक डोळसपणे, संमजसपणे पहायला लावणारा आणि विवाहापूर्वी ‘लिव् ईन रिलेशनशिप’ची गरज अधोरेखीत करणारा हा एक चाकोरीबाहेरचा सिनेमा आहे. इतके होऊनही मेसेज देणारा प्रबोधन करणारा सिनेमा असूनही, तो तसा वाटत नाही. याचे श्रेय दिग्दर्शकाला द्यायला हवे, कारण आपल्याला काय सांगायचय ते प्रेक्षकांच्या नजरेतुन व्यक्त करण्यात तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे. झी सिनेमासारख्या मातब्बर वितरणाचा हातभार त्यामुळेच त्यांना मिळाला आहे. पुरस्कारांची खैरात होऊनही जे बोलपट वितरणांत गळफटल्याने प्रेक्षकांपर्यंत जाऊच न शकत नाहीत, त्यांच्या निर्मात्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही कलाक्रुती आहे.
सगळ्यांचाच अभिनय उत्तम. संपूर्ण सिनेमा नायक ललित प्रभाकर, आणि नायिका मृण्मयी गोडबोलेने भरलेला आहे, भारलेला आहे. तरीही इतर छोटी छोटी पात्रेही आपापल्या जागी मोठी वाटतात. ज्योती सुभाष आणि सतीश आळेकरही.
क' ची बाराखडी- 'काबिल'
एकता कपूर साठी, 'क' ची बाराखडी' जशी हिंदी मालिकांसाठी यशाचा मार्ग दाखवू शकली, त्याच बाराखडीतले हिंदी चित्रपट राकेश रोशनला असेच शुभफलदायी ठरले. शेवटी, सगळ्या बाराखड्या क पासूनच सुरु होतात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे, अशीच कां, केव्हा, कुठे, कोण, कसे, कधी अशा कारणांतूनच मिळतात ना!
तर ह्याच 'क' ची बाराखडी मधला-'काबिल' हा नवा बोलपट आंधळ्या जोडप्याच्या प्रेमाने सुरु होवून भीषण संकटांचा सामना करत, महा संघर्षाचे घाव झेलत सूडाच्या यशाकडे अचंबित करणार्या युक्तीने कसा जातो, हे खुबीने दाखवतो. व्हाँईस ओव्हर कलाकार असलेल्या आंधळ्या रोहन भटनागरची (ह्रतिक रोशन) प्रेमीका पत्नी सुप्रिया (यामी गौतम) हिच्यावर झालेल्या बलात्कारापायी तिने केलेल्या आत्महत्येला कारणीभूत असणार्या नराधमांना वैध मार्गाने शिक्षा करवून आणण्याचा रोहनचा प्रयत्न अयशस्वी होतो. हा आंधळा आपले काय वाईट करू शकणार ह्मा भ्रमांत असणार्या सर्वांनाच रोहन त्याच्यामधील आगळ्या वेगळ्या काबिलीयतचा युक्तीने उपयोग करून धडा कसा शिकवतो हे परीणामकारकतेने येथे दाखवले आहे.
आंधळ्यांना द्रुष्टि नसल्यामुळे किती त्रास होतो आणि म्हणूनच नेत्रदानाची अत्यावश्यकता आहे, हा संदेश जसा आपल्याला मिळतो, तसेच एक महत्वाचा धडा इथे मिळतो, तो म्हणजे प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती शक्ती किंवा उत्तम गुण असतो, ते ओळखायला शिकून तिचा उपयोग आयुष्यात आपली स्वप्ने पुरी करण्यासाठी होतो, हा! अन्याय सहन करू नका, त्याच्या विरूद्ध काबिल होवून सर्व शक्तीनिशी लढा!!
ह्रतिक रोशन किती देखणा, दमदार आहे हे तर इथे दिसतेच पण तो किती अफलातून न्रुत्यही करू शकतो आणि आपल्या सशक्त अभिनयाचे जोरावर आपल्या भूमिकेचे तो सोने कसे करतो ते ह्मा करमणूकप्रधान, उत्कंठावर्धक चित्रपटांत अनुभवता येते. कुठेही कधीही कंटाळा न आणत हा बोलपट, 'क' च्या बाराखडीला-'काबिल' कसा बनवतो ते सर्वांनी जरुर पहावे.

जोडी खासच लक्षांत रहाण्याजोगी!
‘प्रेक्षकांना काय हवे?’:
चित्रपट निर्मात्यांनी, फक्त स्वत:च्या द्रुष्टिने काय व्यक्त करायचे, त्याचाच विचार न करता, प्रेक्षकांना काय हवे, कसे हवे त्याचाही विचार करून आपली कलाक्रुती सादर करणे जरुरीचे आहे. मनोरंजन व आपली विचारसंकल्पना अशा तर्हेने गुंफावी, की समोरचा प्रेक्षक त्यांत पूर्णपणे गुंतला पाहिजे. त्या संदर्भांत 'Beauty lies in the eyes of
the beholder' ह्या म्हणीचा मतीतार्थ निर्मात्यानी नीट ध्यानांत ठेऊन चित्रपट सादर करावा.
आशयघन आणि चाकोरीबाहेरचे असे चित्रपट निर्माण करणारे, आपली कलाक्रुती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी वितरणाचा, प्रसिद्धीचा, विचार व प्रयत्न कधी, कसा किती करतात, ह्यावर त्यांनी प्रकाश टाकायला हवा. कदाचित् त्यांचे हे प्रयत्न 'कासवा'च्या गतीने होत असावेत. म्हणूनच, त्यांचे प्रयत्नांत त्याना कोणत्या, कशा किती कां अडचणी येतात, तेही समजणे जरूरीचे आहे. हुशार व अव्वल मुले जशी व्यावहारीक जीवनांत यशस्वी होतातच असे नाही, तद्वतच ही डोळस व प्रतिभावंत मंडळी चित्रपटाच्या व्यावसायिक कारभारांत मागे पडतात, अयशस्वी होतात. ज्या प्रेक्षकांसाठी बोलपट निर्माण होतो, त्यांच्या अंतरगांची, आवडी निवडीची जर कल्पनाच नसेल आणि ती जाणून घेण्याचे कष्ट न करता आपलाच मार्ग उत्तम आहे, असे समजून चालले, तर दुसरे काय होणार?
मराठी चित्रपटांचे स्थान:
सर्वोत्क्रुष्ट चित्रपट म्हणून सुवर्ण कमळ पुरस्कार आतापर्यंत २२ बंगाली, १३हिंदी, ११ मल्याळम् ६ कन्नड तर फक्त ५ वेळा मराठी चित्रपटांना मिळाला आहे. ह्यावरून आपल्याला बंगाली, हिंदी व मल्याळम् चित्रपटांच्या तुलनेंत किती लांबचा पल्ला गांठायचा आहे ते ध्यानांत येईल. तसेच १९५४ मध्ये सर्व प्रथम 'श्यामची आई' बोलपटाने सुवर्ण कमळ पटकवण्याचा बहुमान मिळवल्यानंतर गेल्या ६ दशकांत फक्त ४च मराठी बोलपटांना हा सन्मान मिळवता आला आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच प्रमाणा बाहेर स्वत:च स्वत:चा उदो उदो न करता, भानावर येऊन आपले पाय जमिनीवरच ठेवणे, हे शहाणपणाचे ठरेल.
उत्तम कलाक्रुतीची त्रिसुत्री:
चित्रपट व नाटक ह्या सारखी कलाक्रुती सर्वोत्तम ठरण्यासाठी 'विचार-कला-व्यवसाय किंवा धंदा' ह्या तिघांचा योग्य तो समन्वय साधता आला पाहिजे. त्या निकषावर मराठी रंगभूमीने चित्रपटांच्या तुलनेत अधिक सरस कामगिरी केल्याचे दिसून येईल. ही दोन्ही माध्यमे प्रेक्षकांसाठीच आहेत हे कसे विसरून चालेल? राष्ट्रीय पारितोषक मिळविणार्या 'वास्तुपुरुष', 'ख्वाडा', 'कोर्ट', 'अस्तु' 'धग' 'इन्व्हेसमेंट' सारखे चित्रपट किती, कसे व कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले? आता असा सन्मान मिळालेले 'कासव' आणि 'दशक्रीया' हे बोलपट बहुदा अजून वितरीतही झालेले नाहीत, ह्या सारखी विपरीत व नामुष्कीची गोष्ट कोणती?
'एडका' मंत्र:
प्रसिद्धी आणि विक्री व्यवहारांत एक उपयुक्त मंत्र आहे:AIDCA अर्थांत् 'एडका' मंत्र. येथे A=Awareness म्हणजे योग्य ती जाणीव व माहिती, I=Interest अर्थांत उत्सुकता D=Desire अर्थात् ओढ किंवा D=Distribution अर्थात् वितरण C=Conviction म्हणजे विश्वास वा पक्की खात्री आणि A=Action म्हणजे खरेदीची क्रुती चित्रपटाचे बाबतीत प्रेक्षकांकडून तिकीटे काढून चित्रपट बघायला जाणे. हाच मंत्र चांगले व अधिक वितरक मिळविण्यासाठीही उपयुक्त आहे. पुरस्कार मिळवू शकतील, असे बोलपट निर्माण करण्याची गुणवत्ता असणार्या निर्मात्यांसाठी हा मंत्र आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. तसे झाले तर आणि तरच त्यांच्या मेहनतीचे चिज होईल. त्या द्रुष्टीने विचार केला तर व्हेंटिलेटर हा अनेक पुरस्कार मिळविणारा चित्रपट निर्मात्यांचे कौतूक करावे तितके थोडेच आहे. जणु त्यांनी हा एडका मंत्र प्रत्यक्षांत यशस्वीपणे आणला!
थोडक्यांत, जे 'Classes' ना भावते, ते 'Masses' ना बहुदा रूचत नाही, तशीच ह्याचीच उलट बाजूही दुर्दैवाने खरी आहे. म्हणूनच पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट थिएटरमध्ये आले कधी आणि गेले कधी ते कळतही नाही! शेवटी मिळालेला पुरस्कार ही केवळ इतिहासांत दडून रहाणारी नोंद म्हणूनच उरते. ह्या सर्व मंथनाचा निर्माते आणि प्रेक्षकांनीही गांभिर्याने विचार करायला हवा असेच शेवटी आम्ही म्हणू शकतो.

Win_Win परिस्थिती:
पिंडे पिंडे मतिर्भीन:, हे म्हणतात ते खोटे नाही. प्रत्येक व्यक्ती अगदी वेगळी असते, तिच्या आवडी निवडी भिन्न असतात. कोणताही प्रेक्षक काही अपेक्षा ठेवून सिनेमा बघायला जातो आणि त्या जर पुर्या झाल्या नाहीत तर तो नाराज होतो.
पुरस्कार मिळवणार्या बोलपटांनाच वितरक मिळत नाहीत आणि अखेर कसा बसा तो सिनेमा थिएटर मध्ये दाखवला जात असताना हाऊस फुल न होता बहुदा एका आठवड्यांतच तिथून काढला जातो, ही एक गंभीर बाब आहे. जर तो सर्व भाषातील सिनेमांमधून सर्वोत्तम अशी गणता झालेली असताना प्रेक्षकांची गर्दी खेचू शकत नाही, ही सर्व संबंधितांनी विचार करण्याजोगी बाब नाही कां? जाणकार परीक्षकांना भासते की त्यांत उत्तम सारे आहे, परंतु बहुसंख्य जनतेला वाटते त्यांत काही दम नाही, ह्या विरोधाभासाला काय म्हणायचे? निवड चुकीची, की तशी निवड करणारे दर्दी परीक्षक चुकले? जेव्हां सर्वोत्तम म्हणून गणलेला सिनेमा, समस्त प्रेक्षकही डोक्यावर घेतील तेव्हांच खरी खुरी Win_Win परिस्थिती निर्माण झालेली म्हणावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा