शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

‘सुधा’-दिवाळी अंक:2017:रंगांची दुनिया -नांदी’:


रंगांची दुनिया -नांदी’:
लेखक श्री. सुधाकर नातू माहिम, मुंबई १६

वेळेवर नाही, नांदी
मराठी नाटक कधीही वेळेवर सुरू होत नाही. तीन घंटा कधी होतात आणि आपण एवढा वेळ पैसा कष्ट घेऊन ज्यासाठी आलो ते नाटक कधी सुरू होतय, त्याची प्रतिक्षा शेकडो प्रेक्षक करत असतात. त्या पायी किती समुह-वेळ उत्पादकता विनाकारण वाया जात असते, त्याची कुणाला काय पर्वा! एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीचा र्हासच नव्हे कां? हा मुद्दा जरी बाजूला सारला तरी नाट्यसंस्थांनी आणि संबधित कलाकार आदि मंडळींनी नियमीतपणा, शिस्त वेळेचे मूल्य ध्यानांत कां घेवू नये, तसेच मायबाप रसिक प्रेक्षकांप्रतीचे कर्तव्य कां बरे विसरावे? एकट्या ललितकलादर्शचा आदर्श किती दिवस मिरवणार आणि विसरून जाणार?
‘सुबक’दुरूपयोग
सुबक अर्थात् सुनील बर्वे कलामंच ह्यांनी निवडक जुन्या अत्यंत लोकप्रिय नाटकांचे नामवंत कलाकारांना घेऊन अगदी मोजके प्रयोग करण्याचा घाट यशस्वीपणे राबविला. मात्र त्यासाठी तिकीटदर २५०/३०० रूपये इतका महागडा ठेवला. त्या करता अर्थशास्त्राची मदत घेवून, हे दर कसे योग्य आहेत हेही रसिकांच्या गळी उतरविले. प्रश्न असा आहे की, ह्या वाढीव तिकीटदरांचे अनुकरण कोणत्याही नाटकासाठी, आता सर्वांनीच करुन रसिकांवर कां बरे बोजा टाकावा. ह्या संदर्भातले जुने उदाहरण खरोखर कौतुकास्पद आहे, तेव्हा आश्चर्य वाटेल, पण सर्वात जास्त तिकीटदर फक्त २०रूपये होता, तो ते दर रू. २१ करायलाही नकार देऊन प्रवाहाविरूद्ध जावून रसिकांची कदर अट्टाहासाने करणारा एक रोखठोक शिस्तप्रिय विक्रमवीर नाट्यनिर्माता मराठी रंगभूमीवर वावरत होता. 

सुबक तर्फे सादर केलेली दर्जेदार नाटके तिकीटासाठी खर्च होणार्या पैशाचे पुरेपूर मोल देत असत. पण आता वाढीव दराने सादर होणारी, बहुतेक सुमार नाटके तसे मोल देतात कां हा एक प्रश्नच आहे. सुबकने   सुरू केलेल्या पायंड्याचा हा केवळ दुरूपयोग नव्हे कां? पण लक्षांत कोण घेतो? प्रेक्षकांची ऐशी की तैशी.
दिशाभूल करणारा प्रमोशनचा फंडा:
सध्याच्या मराठी नाटकांची प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणारी अवस्था व्यक्त करणारा सोशल मिडीयावरचा हा संदेश खुपच बोलका आहे:

आम्ही आत्ताच  " अमर फोटो स्टुडिओ " हे नाटक मध्यंतरात अर्धवट सोडून आलो . अतिशय टुकार नाटक आहे. सुरवातीपासूनच एका प्रसंगाचा दुसर्याशी काय संबंध आहे तेच समजत नव्हते.केंव्हा मध्यंतर होते आणि घरी जातो असेच वाटत होते.  गेल्यावेळचे " कोटी ५७ लाख " हे संजय मोने लिखित आणि अभिनित नाटकाबद्दल अपेक्षा होत्या पण त्या काही पुऱ्या झाल्या नाहीत.पण कमीत कमी ते नाटक शेवटपर्यंत पाहिले तरी . ह्या दोन्ही नाटकांच्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकात नाटकामधल्याच्या ओळखीच्या लोकांची पेरणी केली होती आणि फालतू संवाद आणि विनोदावर ते उगाच खोटे खोटे मोठ मोठ्याने हसून दाद देत होते. हे सर्व सहजच लक्षात येत होते कारण बाकी पूर्ण नाट्यगृहात शांताता होती. आज तर कमालच झाली एक लोकप्रिय अभिनेत्री, पहिल्या रांगेत बसली होती आणि नाटक सुरु होण्या अगोदर तीने तीच्या मागच्या रांगेतील आणि बाजूच्या रांगेतील खास बसवलेल्या सहकाऱ्यांना अमेय आला कि आपण सगळ्यानी मोठ्याने टाळ्या वाजवून हसायचे अशा सूचना दिल्या. त्याप्रमाणे सर्व चालू होते. 
हे सर्व फारच उद्वेगजनक होते. बाकी सर्व प्रेक्षक ह्या लोकांची हुल्लडबाजी ऐकायला येत नाहीत.”

नाटकाच्या प्रमोशनचा फंडा रसिकांची दिशाभूल करणाराच नव्हे कां?
'माझी आई, तिचा बाप' नाटक:
आकर्षक शिर्षक, बाकी सारे निरर्थक!

‘तो मी नव्हेच’, ‘अश्रुंची झाली फुले’’, घरात फुलला पारिजात’, ‘पुत्रकामेष्टि’ अशी एकाहून एक सरस कला, व्यवसाय आणि आशय-विषय ह्यांचा अर्थपूर्ण समन्वय साधणारी नाटके सादर करणार्या नाट्यसंपदाचेमाझी आई, तिचा बाप’ असे नांव असलेल्या नाटकाला जायचा पुण्यामध्ये योग आला. नांवावर नुसते जाऊन,  ही काही नवी भानगड वा लफडं असेल असा तर्क तर मुळीच करू नका. 
सायं. वाजता सुरू होणारे नाटक अर्ध्या तासाने सुरू झाले. कोथरूडच्या त्या नाट्यग्रुहात ना पंखे चालू ना वातानुकुलित व्यवस्था चालू; म्हणून की काय प्रेक्षाग्रुहातले एक दार चक्क उघडे ठेवले होते! तिकीटासाठी, चांगले ३००रू. मोजूनही ही स्थिती.
फिल्मी स्टाईल नाटक:
बरे नाटक तरी समाधान देणारे असावे, परंतु त्याही बाबतीत निराशाच पदरी पडली.गरजू आई बाप, मुलं दत्तक घेतात हे सर्वश्रूत आहे, पण अनाथ म्हणून वाढलेले एक दांपत्य-‘स्वरा’ आणिमधूर’, स्वराच्या आगळ्या वेगळ्या हट्टापायी, चक्क आई बापच दत्तक घ्यायचे ठरवितात. नवविवाहीत जोडप्याने वेळेवर मुल होण्यासंबंधी निर्णय घ्यायचा सोडून, असा आई वडील दत्तक घेण्याचा हट्ट धरणे मुलखावेगळेच! मराठी मालिकांत जसं मनाला येईल ते दाखवतात आणि त्यातील पात्रेही सामान्यपणे वागतील तसे वागता, भलतेच भरकटतात, तसलाच प्रकार इथे आहे. विषय चाकोरीबाहेरचा पण तो नेहमीच्या नाटकीपणाने-फिल्मी स्टाईलने हाताळला गेल्याने हे नाटक आमच्या मनाची तरी पकड घेऊ शकले नाही.

एकमेकांना कोणतीही कल्पना देतामधूर’ बँकेत काम करणार्या एका प्रौढ बाईला, आई म्हणून आणतो तरस्वरा’ बाप म्हणून एका प्रौढ ग्रहस्थांना आणते. ह्या घरांत आई म्हणून तिने घातलेल्या त्या अटी म्हणजे- ‘कोणीही वयस्क माणूस घरांत नको, मोठ्याने बोलणे चालणार नाही आणि घरांत मांसाहारी भोजन नको!’ ह्या दत्तक बाप होणार्याला बिलकूल पटणार्या असल्याने स्वरा अन् मधूरची होणारी त्रेधा तिरपीट पहिला अंक जरा तरी सुसह्र्य करते.
दुसरा अंक गोंधळाचा:
दुसरा अंक मात्र गोंधळाचा कसाही गडबडगुंडा करून, ओढून ताणून तुटणारी दोन टोके कशीबशी जुळवणाराच आहे.  ह्या दत्तक आई बापांचा भूतकाळ आणि त्यातील योगायोग अगदी फिल्मी भासतो. तो संवादांतून व्यक्त करण्यांत दत्तक आई झालेल्या स्मिताताई, त्यातील भावविवशता परिणामकारकतेने दाखवू शकत नाहीत, तसेच त्यांच्या कमालीच्या हळू खोल आवाजामुळे ते प्रेक्षकांना समजूही शकत नाही. दत्तक आई झालेल्या स्मिता जयकर पूर्णत: प्रभावहीन वाटतात. त्यामुळे ह्रया विषयाचे गांभीर्य प्रेक्षकांपुढे येत नाही. त्यातले त्यात हे तरुण दांपत्य-‘स्वरा(पूर्वी भावे) आणि मधूर (सचिन देशपांडे), नायक नायिकेच्या दमदार यथोचित आविष्कारामुळे नाटक अर्धवट सोडून जावेसे वाटत नाही इतकेच!
नवखा लेखक आणि उरलेले तीन वयस्क कलाकार निराशाच करतात. अनाथाश्रमाचे बद्रीअण्णा-उपेंद्र दाते एखादा वाघ पाठीमागे लागल्यासारखे संवादाची फैर सुसाट कळणार्या पद्धतीने सोडतात. तर दत्तक बाबा अण्णा-मोहन जोशी मालवणी बाज आणण्यांत कमी पडतात. त्यांचा केवळ मोठा आवाज सहज भासवणारा अभिनय करून ही व्यक्तिरेखा आवश्यक परिणाम साधत नाही. सहाजिकच शेवटी शेवटी, कधी एकदाचा हा खेळ खंडोबा थांबतो आणि आपण सुटतो असे रसिकांना वाटत रहाते.

हया तीन ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या अदाकारीचा अभ्यास, त्रयस्थ द्रुष्टिने करावा आणि योग्य त्या सुधारणा घडवण्याची आवश्यकता आहे. नाटकाची संहिता पुन्हा नव्याने लिहीली गेली आणि नाटकातील तीन ज्येष्ठ कलाकारांऐवजी नवीन योग्य ते कलाकार निवडले तरच हे नाटक रसिकांना त्यांनी मोजलेल्या दामाचे मोल पदरांत टाकू शकेल.
सारांश नाट्यसंपदेच्या दैदिप्यमान ईतिहासाला साजेसे एक सुमार नाटक एवढेच आम्ही म्हणतो.  हे म्हणजे, थोडक्यांत नांव मोठं, पण लक्षण खोटं असा प्रकार झाला.
उत्तम कलाक्रुतीची त्रिसुत्री:
चित्रपट नाटक ह्या सारखी कलाक्रुती सर्वोत्तम ठरण्यासाठी 'विचार-कला-व्यवसाय किंवा धंदा' ह्या तिघांचा योग्य तो समन्वय साधता आला पाहिजे. त्या निकषावर मराठी रंगभूमीने चित्रपटांच्या तुलनेत अधिक सरस कामगिरी केल्याचे दिसून येईल. त्रिगुणसुत्री यशस्वीपणे अनुसरणार्या  मराठी नाटकांची मालिका लांबलचक आहे, उदा: डाँ. तुम्हीसुद्धा? चारचौघी, पुत्रकामेष्टि, अश्रूंची झाली फुले, बेईमान, घरांत फुलला पारिजात, नटसम्राट, हिमालयाची सावली, दुसरा सामना पंखांना ओढ.पावलांची अश्वमेध अधांतर मला उत्तर हवय ....
'साखर खाल्लेला माणूस':
'
एक भातुकलीचा खेळ'

ह्या नाटकाचे नांवच हटके आहे आणि विचारांत पाडून प्रश्न निर्माण करणारे आहे:
›› साखर तर सर्वच जण खातात, मग हा असा वेगळा माणूस कोण?
›› साखर खाऊन थोडाच, डायबिटीस सगळ्यांनाच होतो?
›› असे जर असेल, तर चक्क दोन अंकी नाटक करण्याएवढी काय म्हणून अशी खास गोष्ट असेल?

तर 'साखर खाल्लेला माणूस' हे केवळ प्रशांत दामलेंसाठी पहावे असे नाटक आहे,
असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कारण नाटक पाहून झाल्यावर केवळ आणि केवळ रंगमंचावर प्रशांतच्या मनमोकळ्या वावरण्याने आणि दिलखुलास संवादफेकीने आपली दोन घटका करमणूक होते, एवढेच लक्षांत रहाते! नाटकाच्या कथानकाचा जीव अगदीच मामुली, म्हणजे चिमणी एवढा (कां मुंगीएवढा?) आहे. चिडचीड करणारा, ज्यांत त्यांत उणे दुणे काढणारा एक बाप त्याच्या तिरकस बोलण्यामुळे, आपल्या मुलीचा होऊ पहाणारा प्रेमविवाह मोडतो आणि शेवटी येन केन प्रकारेण गंगेत घोडे नहाते एवढेच!

मुळांतच हा बाप असा तिरसट असतो, म्हणून त्याला डायबेटीस होतो, कां डायबेटीसच्या शिरकावामुळे, त्याला असा राग राग येतो, हा 'कोंबडी आधी कां अंडे आधी', ह्यासारखा प्रश्न प्रेक्षकांना पडावा ही अपेक्षा दिसते. भावी जावई, एक डाँक्टर आणि त्याचा हा असा रागीट पेशंट ह्यांच्यात बापाचा-पेशंटचा राग रागच मधे येतो आणि अनपेक्षितपणे तो गायबही होतो, हे सारे एखाद्या भातुकलीच्या खेळातल्यासारखेच वाटते. इथे आई मुलगी ह्यांचे विशेष अस्तित्वच जाणवत नाही, इतके हे नाटक केवळ आणि केवळ बाप झालेल्या एका प्रशांतजीं  भोवतीच फिरत रहाते. त्यांची गायनाचीही हौस भागविण्याची इथे व्यवस्था केलेली आहे.

भावनांचा कल्लोळ, नात्यांचा गुंता अथवा घटनांचा गोंधळ, वा नवविचारांचा, समाजप्रबोधनाचा प्रसार किंवा इतिहासाची उजळणी, हयापैकी काहीही साधणारे हे नाटक नाही. वेळ जात नाही, पैसा जास्त झाला आहे अन् विरंगुळा हवा, म्हणून पहावे आणि झाले गेले विसरून जावे असा हा खेळ आहे. त्यामुळेच नाटक पाहून आल्यावर काहीच लक्षांत रहात नाही, फक्त मनावर कोरले जाते ते म्हणजे प्रशांतजींचे रंगभूमीवरचे प्रेम, त्यांची तीन दशकाहून अधिक वर्षांची रंगदेवतेची सेवा, त्यांची माय बाप प्रेक्षकांना भरभरून आनंद देण्यासाठीची कळकळ! म्हणूनच बहुदा विशेष काही दम नसलेले, जगावेगळे नांव असलेले हे नाटक गाजावाजा करत रंगभूमीवर आले, प्रयोगामागून हाऊस फुल्लचा बोर्ड मिरवत चालले आहे. रंगभूमीवर जीवापाड प्रेम करणार्या गुणी कलावंताला नाट्यरसिकांनी दिलेला बहुदा हा प्रसाद आहे!
रंगभूमीसंबंधी काही निरीक्षणे:
. मराठी नाटकं, एखाद दुसरा अपवाद वगळता कधीही वेळेवर सुरू होत नाहीत. त्यामुळे अनाठायी किती तरी समुह-वेळाचा अपव्यय होतो. प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परिक्षा अशी बिनदिक्कतपणे पहाणे सर्वथैव गैर नव्हे कां? म्हणून, .भा.नाट्यपरीषदेने सर्वच नाट्यनिर्मात्यांच्या सहकार्याने शिस्त वक्तशीरपणा आणण्याचा प्रयत्न करणे नितांत आवश्यक आहे.
. प्रत्येक नाट्यग्रुहांमधील ध्वनी यंत्रणा सुयोग्य दर्जाची आहे कां प्रेक्षाग्रुहातील शेवटच्या रांगेतील प्रेक्षकालाही रंगमंचावरील संवाद स्पष्टपणे ऐकू येतात कां, ह्याची खातरजमा सर्वच नाट्यग्रुहांच्या व्यवस्थापनाने नाट्यनिर्मात्यांनी करणे सक्तीचे केले पाहिजे.
. पुण्यामधील नाट्यप्रयोगांच्या दुपारी १२-३०, रात्री -३० ह्या वेळा अत्यंत गैरसोयीच्या आहेत. परंतु ह्याच वेळी जास्तीत जास्त प्रयोग होतात! सायंकाळची वाजताची नाट्यप्रयोग तसा सोयीची असूनही त्या वेळी अगदी अत्यल्प प्रयोग होतात. मुंबई प्रमाणेच सकाळी १०-३०, दुपारी रात्री८वाजता नाट्यप्रयोग पुण्यासही होणे गरजेचे आहे.            
वाडा चिरेबंदी': एकत्र कुटूंबातील भाऊबंदकी.
भर दुपारी कोथरूड पुण्याला /१५ वाजता, 'वाडा चिरेबंदी' नाटक पाहताना जो उद्वेग निर्माण झाला, त्याची फलश्रुती वरील तीन निरीक्षणांत झाली. हल्ली अगदी मोजकीच नवीन नाटके बाँक्स आँफीसवर समाधानकारक धंदा करत असल्याने, पूर्वी गाजलेल्या काही निवडक नाटकांचे प्रयोगच रंगभूमीला थोडाफार हात देत आहेत. हा 'वाडा'.. मात्र आम्हाला जास्त तापच देऊन गेला. नाटक पहाण्याची बसायची जागा १४व्या वा १५व्या रांगेत असल्याने रंगमंचावरील पात्रांचे संवाद, धड ऐकायला येत नव्हते. शिवाय नाटक मिणमिणत्या प्रकाशांतच अधिक, त्यामुळे तिथे काय घडतय, ते आपले तर्काने समजून घ्यायचे! त्यांत भर म्हणून दुपारच्या यथेच्छ भोजनामुळे डोळेही अधून मधून पेंगत होते. बदलत्या काळामुळे, विदर्भातील वतनदार एकत्र कुटूंबाच्या वाताहातीची आणि कुटूंबीयांमधील भाऊबंदकीची ही चार पाच दशकांपूर्वीची कहाणी, आजच्या एकविसाव्या शतकांत मनाला म्हणुनच बिल्कुल भिडली नाही. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि इतके मागची जागा असलेले अडनिड्यावेळेचे ह्मा नाटकाचे तिकीट काढले असे झाले. मी तरी, ह्या पुढे असे भर दुपारचे पुण्यांत नाटक पहायचे नाही, तसेच पहिल्या पाच रांगांतीलच तिकीट मिळाले तर आणि तरच नाटक पहायचे, असा निश्चय ह्या अनुभवामुळे केला आहे.
दुग्धशर्करा योग:
योगायोगाची तर आता कमालच झाली. एकापाठोपाठ एक अप्रतिम नाटक आणि अत्यंत मनोरंजक विनोदी चित्रपट पहायला मिळणे, हा दुग्धशर्करा योग नुकताच अनुभवास आला. निमित्त घडले, तेयु टर्न२’ हे नाटक आणिचि. आणि चि.सौ.कां’ हा चित्रपट पहाण्याचे! कर्मधर्म संयोग असा की, ह्या दोन्ही कलाक्रुतींमध्ये काही वेगळ्या वळणाच्या संकल्पना मांडल्या आहेत. एकाकी जीवन कंठणार्या जेष्ठ स्री पुरूषांचीसन सेट ईयर्स’ मधली सहजीवनाची आस गरज आणि विवाहेच्छूक तरुण तरूणीने विवाहापूर्वी एकमेकांची पारख करण्यासाठी अशरारी संबध राखत काही दिवसलिव् ईन् रिलेशनशिप’ ठेवण्याची संकल्पना. फरक इतकच की,‘यु टर्न२’ नाटकांत गंभीरपणे जेष्ठ जोडीने विवाह करताच आपल्या मर्जीनुसार एकत्र रहाणे मांडले आहे, तर चित्रपटातील एकाकी जेष्ठ जोडी निर्धास्तपणे विवाह करून मोकळी झाली आहे आणि इथे सर्व मामला विलक्षण हलका फुलका करत सुंदरपणे हाताळला गेला आहे.
मनोरंजनाचा यु टर्न:
अलिकडच्या काही दिवसांत सुमार दर्ज्याची मराठी नाटके पाहून पुन्हा एखाद्या नाटकाला जाण्याचा मी धसकाच घेतला होता. अचानकयु टर्न२’ नाटक पहाण्याचा योग आला आणि एक सुखद धक्काच बसला. नाटक पाहून, बाहुबली१ च्या धर्तीवर आलेले हेयु टर्न२’ तसेच यशस्वी होणार ह्याची खात्रीच पटली. 

धंदा, कला आणि विचार ह्या गुणत्रयींचे अनोखे मिश्रण ही मराठी रंगभूमीची खासियत यथार्थपणे सिद्ध करणारीयु टर्न२’ ही नाट्यक्रुती प्रेक्षकांना प्रारंभापासून अखेरपर्यंत अक्षरश: खुर्चीला खिळवून ठेवते. दोन प्रौढ स्री पुरुषानी विवाह करता तसेच सहचर म्हणून एकत्र रहाणे किती कठीण असते,ते वेधकपणे दाखविणारे हे नाटक उत्तरोत्तर रंगत जाते. ह्या जोडीच्या मुलांना, त्यांनी विवाह करणे बिल्कूल नामंजूर असते म्हणूनयु टर्न१’ मध्ये दुरावलेली ही दोघं, ‘यु टर्न२’ मध्ये य़ोगायोगाने पुन्हा एकत्र येतात आणि घडणार्या घटनांपायी  त्यांच्या मुलांना आता, दोघांनी विवाह केलाच पाहीजे असे वाटण्याची नाट्यमयता आपआपल्या भूमिका जगणार्या दोन्ही कलाकारांनी-डाँ.गिरीश ओक इला भाटे ह्यांनी अप्रतिमपणे उभी केली आहे. नाटकाचा परमोच्च्य बिंदू, अखेरीस नायक नायिका विवाह करण्यास राजी होतात की, तो करता, तसेच केवळ सहचर म्हणून रहातात हा संभ्रम यथोचितपणे रसिकांच्या मनांत रुजविण्याची किमया इथे आहे. द्रुक् श्राव्य माध्यमाचा उपयोग नाटकाचे कथानक पुढे नेण्याकरता, येथेही उत्तमपणे केला आहे. चुकता प्रत्येक नाट्यरसिकाने आवर्जून पाहीलेच पाहीजे असे हेयु टर्न२’ नाटक आहे. म्हणूनच संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन शुभेच्छा! ‘यु टर्न३’चे बिजारोपण ह्या नाटकाच्या अखेरीस अनाहूतपणे झालेले आहे असे माझे प्रामाणिक निरीक्षण आहे.
एक वेळ उपाशी राहून प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देणारा अभिनेता।
चंद्रकांत गोखले
जन्म - जानेवारी १९२१
मृत्यू - २० जुन २००८
।।परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील।।
।।अभिनयप्रवास।।
वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण
सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटके , त्याहीपेक्षा जास्त चित्रपटात काम।
।।पुरस्कार।।
विष्णुदास भावे गौरवपदक।
व्ही शांताराम पुरस्कार।
चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार।
नटश्रेष्ट नानासाहेब फाटक पुरस्कार।
छत्रपति शाहु महाराज पुरस्कार।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुरस्कार।।
।।देशसेवा।।
चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा करता प्रतिवर्षी एक लाख
रुपये वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी दिली। आज हा आकडा कमी वाटत
असला तरी चार दशकांपूर्वी तो एक कोटीप्रमाणे होता।
सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते एकवेळ जेवण करीत बसने किंवा 
पायी प्रवास करीत कितीही अडचणी आल्या
तरी मदत थांबविली नाही। या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण
आदरांजली
             








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा