शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

‘सुधा’-दिवाळी अंक:2017: रंगांची दुनिया: शारदोत्सव:



रंगांची दुनिया: शारदोत्सव:
सुधाकर नातू

नापासांचीशाळा’:
आपल्या अवती भवती विविध क्षेत्रांतील अजोड कर्तुत्वाचे जोरावर लोकप्रियता यश मानमरातब मिळविणारी अनेक सेलिब्रिटी मंडळी वावरत असतात. त्यांच्या योगदानामुळे आपण नेहमी चकीत होत रहातो. आपल्याला सहाजिकच प्रश्न पडतो,'जे आपण साधू शकत नाही, ते ही मंडळी कसे बरे साधतात?' पण आपण हे विसरतो की त्यांच्यापैकी अनेकांनी अपयशाचे, नापास होण्याचे चटके सोसलेले असतात. मान खाली घालायला लावणार्या, बहुमुल्य वेळ श्रम पैसा वाया घालविणार्या नापाशीच्या तापदायक वाळवंटांतूनच ही गुणवंत मंडळी आपल्या कष्टांचे, जिद्दीचे जोरावर संकटांवर प्रतिकूल परीस्थितीवर मात करत आपली स्वप्ने खरी करतात. त्यांची ही वाटचाल आपल्याला कुठल्याही विद्यापीठांत मिळणारे अनेक धडे शिकवून जाते. आज हे असे विचार मनांत यायला कारण होते, अचानक मिळालेल्या एका अदभूत् पुस्तकाचे- 'नापास मुलांचे प्रगती पुस्तकाचे वाचन, श्री. अरूण शेवतेनी संपादित केलेल्या लेखांचा हा एक संस्मरणीय संग्रह आहे.

नापासांच्या गंमती जमती:
नापासांच्या ह्या शाळेतील आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत नसलेल्या गंमती जमती अशा आहेत:
› श्रीमती  किशोरी आमोणकर इंटरला नापास.
› तर चित्रपट महर्षी डाँ. व्ही शांताराम चाचणी परीक्षेत संस्क्रूतमध्ये नापास तर झाले होतेच, पुढे नोकरीच्या प्रयत्नांत पोस्टात कारकून परीक्षेत नापास होण्याचे दुर्भाग्य आले.
› डाँ. श्रीराम लागू तर  ४थीत नापास झाले होते. एवढेच काय तर शाळेतील एका नाटकांत प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करताना त्यांची पूर्ण भंबेरी उडून फजिती झाली होती!
› श्री बाबासाहेब पुरंदरे नेहमी गणितात नापास होत. त्यांना prelim मध्ये नापास झाल्यामुळे मँट्रिकला परीक्षेसाठीचा form द्यायला मुख्याध्यापक तयारच नव्हते. अखेर खूपच विनवण्या करून form त्यांनी मिळवलाच, पण मेहनत करून ते पासही झाले. त्यांना इतिहास, भूगोल खूप आवडायचे आणि नंतर त्यांनी ह्याच विषयावर झपाटून जाऊन, अद्वितीय ऐतिहासिक कार्य करत  रहाण्याची किमया स़ाधली!
› दादा कोंडके दर वर्षी गणितात नापास होत असत.                                        › तर मधु मंगेश कर्णिक ४थीत नापास.                                
› डाँ. अनिल अवचट प्री डिग्रीला एका विषयांत, तर नंतर  3rd-MBBS ला १ल्यांदा नापास.                                                 
› सुलेखनकार श्री. अच्युत पालव १०वीत नापास.                                
› आणि नवल म्हणजे, गझल सम्राट पद्मभूषण जगजित सिंग हे HMV जालंधर रेडिओच्या आँडेशन टेस्ट मध्ये नापास झाले होते.

दिग्गजांची 'नापाशी':
› आश्चर्याची बाब म्हणजे नेल्सन मंडेला LLB मध्ये वारंवार नापास झाले होते.
› विल्यम राँटजेन विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत नापास झाला खरा, पण त्यानेच नंतर नोबेल पारितोषकही मिळवले आणि त्याचा 'X Rays' चा शोध मानवतेला एक वरदान बनला आहे.
› सर आयझँक न्यूटन तर प्रथम एक सामान्य कुवतीचे विद्यार्थी होता आणि तो  शिष्यव्रुत्ती परीक्षेत नापास झाला होता. पण नवल पहा, त्यानेच गुरुत्वाकर्षणाचा अद्वितीय शोध लावला आणि निरीक्षण, प्रयोग सिद्धता अत्यावश्यक मानणार्या आधुनिक विद्न्यानाचा पाया रचला.
जेके रोलिंग शाळेत दहापैकी शून्य गुण- म्हणून तिला शिक्षिकेने मुलींच्या रांगेत बसवले. ह्याच मुलीने पुढे ',हँरी पाँटर' सारखे अजरामर पुस्तक लिहीले, ज्याच्या ४८तासात ३० लाख प्रती विकल्या गेल्र्या, ज्याचा जगातील ६१ भाषात आणि २००देशांमध्ये अनुवाद झाला अन् जणू इतिहास घडला.

हिमालया एवढा अभिनेता:
ज्याचा खर्जांतील धीर गंभीर आवाज आज अनेक वर्षे, करोडो रसिकांवर अधिराज्य करत आहे, तो सुपरस्टार अमिताभ पूर्वी आकाशवाणीच्या व्रुत्तनिवेदकाच्या परीक्षेंत नापास झाला होता. नंतर चित्रपटस्रुष्टितही, त्याला पहिली काही वर्षे अपयशामागून अपयश येत होते. मात्र त्याच्या वडिलांचा, अमिताभच्या गुणवत्तेबद्दल आत्मविश्वास होता, म्हणून ते त्याला लिहीतात:' तू जेव्हा आपली आत्मकथा लिहीशील, तेव्हा लोकांना माझ्या आत्मकथेचा विसर पडेल, असा मला विश्वास वाटतो.'  ह्यानंतर जे काही घडत गेले तो रोमहर्षक इतिहास सर्वांनाच माहीत आहे. आपल्या अंगभूत अभिव्यक्तीच्या विलक्षण कौशल्यामुळे, शिस्तबद्ध कार्यनिष्ठेच्या आणि हिंदी, इंग्रजी भाषेवरील असामान्य कष्टांचे जोरावर अमिताभ चार दशके यशाची शिखरामागून शिखरे पादाक्रांत करतोच आहे!
अन्नासाठी दाही दिशा:

नैराश्यापोटी संन्यास?: मारूती चितमपल्ली:
एकीकडे शिक्षणातील पास-नापासाचा असा लपंडाव आणि दुसरीकडे बिकट परिस्थितीचे उभे आडवे घाव अशी संघर्षमय कहाणी ह्या नापासांच्या शाळेतील तीन/चार जणांची आहे. त्यातील मारूती चितमपल्ली ह्यांची इंटरला मराठींत नापास झाल्यावर आलेल्या नैराश्यापोटी संन्यास घेण्यासाठी घरातून पळून जाणे अन् मग अन्नासाठी दाही दिशा वणवण करावी लागणे ही कहाणी लोकविलक्षणच! लौकरच जीवनावर पडलेले हे काळे सावट दूर होऊन, हाच अवलिया पुढे कीर्तिमंत पक्षी निरीक्षक झाला, सोलापूरच्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला. नुकताच त्यांना जीवन गौरव पुरस्कारही मिळाला.
श्रीकांत बोजेवार १२ला नापास:
श्रीकांत बोजेवार ह्यांना ना डाँक्टर ना इंजिनिअर होता आल्याने ते टीव्ही मेकँनिक बनून मुंबईला आले, नोकरी बेकारी प्रसंगी खिशांत पुरेसे पैसे नाहीत अशा अवस्थेतही यशस्वी झाल्याशिवाय गांवी परत जायचेच नाही ह्या जिद्दीने संघर्ष करत राहिले अन् अखेर एका संपूर्ण वेगळ्याच क्षेत्रांत-- पत्रकार म्हणून यशस्वी झाले, कारण हेच उशीराने संधी मिळालेले क्षेत्र त्यांच्या आवडीचे होते. ह्या बिकट वाटचालीत त्यांना अवचितपणे, दोन देव माणसांची साथ मिळाली. नियतीचा खेळ अगाध असेच म्हणावयाचे.
विदारक कहाणी: गणपत पाटील:
सगळ्यांत विदारक कहाणी गणपत पाटील ह्यांची आहे.  गणपत पाटील ६वीत नापासशालेय जीवनांत अपयशी ठरल्याने आणि घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने ह्मा माणसाने काय काय नोकर्या  उद्योग केले पहाः हाँटेलांत कप बशा विसळणे, वेटर म्हणून, खाणावळीत भांडी घासण्याची कामे, भल्या पहाटे पाव आणून पाव विकणे, फुलांच्या माळा विकणे, एवढेच काय तर चक्क गवंडी कामही ह्या कष्टाळू माणसाने केले. ह्या सगळ्या दरम्यान हौशी नट म्हणून मिळेल त्या समयी रंगभूमीवर कलाविष्कार करत रहाणेच अखेरीस नशिबाची कवाडे उघडण्यास कारणीभूत ठरले. तमाशातील नाच्या वा सोंगाड्या म्हणून संधी मिळाल्यावर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही अशा भूमिकांची त्यांची प्रदीर्घ कारकीर्द ह्या गुणी कलावंताने यशस्वी केली.
'तेरा' चा गुणाकार:                                                                                         
केसरी पाटील शाळेत गणितात अनेकदा आणि  BA च्या पहिल्या वर्षाला  नापास झाले. नंतर १० वर्षै क्रुषीशास्त्राचे शिक्षक आणि जीवनांत 'टर्निंग पाँईंट' ठरलेल्या पर्यटन क्षेत्रात वडील बंधू राजाभाऊंना सहाय्यक. ह्यानंतर वयाच्या ४९ व्या वर्षी पैशाचे पाठबळ नसताना त्यांनी स्वत:ची पर्यटन संस्था काढली. पहिल्या वहिल्या ट्रिपला केवळ १३ पर्यटक येऊनही नाऊमेद होता, त्यानी 'तोंडात साखर, डोक्यावर बर्फ' हे तत्व पाळून ह्याच१३चा सातत्याने गुणाकार करत ह्या क्षेत्रांत गेल्या तीन दशकांत हिमालया एवढे यश मिळविले. आज 'केसरी' हा नांवाप्रमाणेच पर्यटन क्षेत्रांतील लोकमान्य ब्रँड बनला आहे.
रविंद्र पिंगे: ‘वेळेचं महत्व वेळीच जाणा, वेळ उधळू नका’:
रविंद्र पिंगे मँट्रिकला एकदा नापास झाले होते. शासकीय नोकरीची यशस्वी कारकीर्द. प्रासादिक साध्या सोप्या भाषेत लेखन. ३५ पुस्तके प्रसिद्ध आणि त्यांच्या पुस्तकाना राज्य पुरस्कार मिळाले. त्यांचे प्रेरणादायी विचार असे:
दैवाने जे काही आणि जेवढं आपल्या ओंजळीत टाकलं, तेवढंच आपलं असतं. अधिकासाठी जीव पाखडायचा नाही,
नामवंत कवि बोरकरांचं एक कडवं आहे:
वळून बघता मागे, घडले तेच पसंत!
 अशी पोचपावती द्यायला मन वखवखशून्य असावं लागतं. ते कायम त्रुप्त असावं लागतं. शेक्सपियर सांगतो, ते कायम ध्यानी असावं--तारुण्याच्या गुर्मीत तुम्ही वेळेची उधळ माधळ करता. नंतर तोच तुम्हाला कुरतडून टाकतो. सारांश, ‘वेळेचं महत्व वेळीच जाणा, वेळ उधळू नका.’

‘I am The Best’:
शाहरूख खान चाचणी परीक्षेत हिंदीत नापास होत असे. पण जिद्द आणि आपलं आवडतं क्षेत्र निवडून त्यात मन लावून अपार कष्ट  घेत यश खेचून आणायचं, ते करताना आय अँम बेस्ट ह्मणताना लाजायचं नाही अशा द्रुढ निश्चयामुळेच तो आज सुपर डुपर स्टार बनला आहे!
स्मिता पाटीलही प्रथम न्यूज रीडर निवड परीक्षेत नापास झाली होती, पण तेव्हांच तिने अगदी कळकळीची विनवणी अजून फक्त एकच संधी परिक्षकांनी द्यावी अशी केली अन् आपल्या सुदैवाने ती मान्य झाली.                                                                                                     And Rest is well known history!

ह्या सम हाच!
देव आनंद स्क्रीन टेस्टमध्ये नापास झाला होता. त्याचे विषयीच्या ह्या पुस्तकातील पुढील वाक्य खूप खूप काही सांगून जातातः
‘पाखरं कधी व्रुद्ध होत नाहीत.
चांदण्या कधी थकत नाहीत.
चंद्र कधी रागाने लाल होत नाही.
समुद्राच्या लाटा फुटतात, पण मागे वळून बघत नाहीत!
देव कधी मागे वळून पाहत नाही. भूतकाळात रमण्याची त्याची व्रुत्ती नाही. तो दुःख कधी कुरवाळत बसत नाही. तो पुढे जात असतो, बदलत्या काळानुसार पावलं टाकत असतो.’

देव आनंदला एकदा नाटकाच्या तालमीत असमाधानकारक काम केल्याने बलराज सहानी ह्मानी तू कधीही यशस्वी अभिनेता होऊ शकणार नाहीस असे हिणवले होते. नंतर चित्रपटात काम मिळावे म्हणून देव एका निर्मात्याला भेटला. रूबाबदार व्यक्तिमत्वामुळे आपल्याला काम मिळणार कसे वाटून देव हंसला मात्र, त्याच्या दातातील फटी पाहून त्या निर्मात्यांने क्रुत्रिम दात बसवलास तरच तुला काम मिळेल अशी अट घातली होती. पण अर्थातच देवने ही संधी नाकारली अशी दातातली फट ठेऊनही मी निश्चित यश मिळवेन असे ठणकावून सांगितले.
And Rest is history!
देव आनंद सारखा हवा हवासा वाटणारा चिरतरूण चाँकलेट हिरो एकमेवाद्वितीयच ह्या सम हाच असा! देव जसे चिरंतन तरूणच असतात, तसेच नांव साजरे करणारा देव आनंद!

थोडक्यांत आपल्यातील गुण आपल्या मर्यादा ध्यानांत येणे खरोखर आपल्याला काय आवडते काय जमू शकेल हे ज्यांना जेव्हा कळते आणि त्याच क्षेत्रांत जे प्रतिकूल परिस्थितीची तमा बाळगता कष्ट उपसतात तेच कधी काळी नापास होऊनही जीवनांत विजयी होतात.
ज्या क्षणी, माझा हात वाचनालयांतील ह्याी पुस्तकावर पडला, तो क्षण खरोखर भाग्याचा, कारण त्यामुळेच मला जीवन संघर्षांतील अनेक कडू-गोड धडे अनुभवायला मिळाले. नापासांची शाळा, ही अशी जीवन-विद्या/गीता शिकवून गेली, अन् वाटले पुन्हा एकदा धडपडावे नापास होऊन!!
---------------------------------------------------------------------------------
'सय' लेखिका: सई परांजपे

माझे आजोळ कोकणातले एक निसर्गरम्य असे 'आंजर्ले, त्याला लागूनच 'मूर्डी' हे गांव. तेथील सुप्रसिद्ध सिनीअर रँगलर कै..पु. परांजप्यांच्या नातीचे-श्रीमती सई पराजपे ह्यांचे 'सय' हे पुस्तक जणू आपल्या गांववालीचे, म्हणून हातात घेतले. एका मनस्वी, जिद्दी प्रतिभावान कलावतीच्या रेडिओ, दूरदर्शन, रंगभूमी आणि चित्रपट अशा माध्यमांतील योगदानाच्या अवखळ मुशाफिरीचा हा मोकळा, ढाकळा आत्मसंवाद पहाता पहाता चक्क दोन दिवसात वाचूनसुद्धा झाला.

'
सय' म्हणजेआठवण’, पणआठवण’ शब्दात अनुभवांची जितकीसाठवण’ असते, त्यापेक्षा कितीतरी पटीने 'सय’  शब्द, आपल्या भूतकाळाच्या आंबट गोड आठवणी जागवतो. त्यातून लेखिकेचे नांव 'सई', 'सय' शब्दाशी अनुरूप जवळीक साधणारे! वरील चारही माध्ममातील, रथी महारथी आप आपल्या गुणदोष़ांनिशी 'सय' मध्ये अवतरले आहेत. इथे, 'पपीहा'सारख्या चित्रपटाकरता घनदाट रानावनांतील उभी आडवी सैर करण्याची जिद्द आहे, तशीच 'दिशा' ह्या कामगार जगतावरील चित्रपटाकरता परळ, लालबाग सारख्या गिरणगावातील 'खोली' अनुभवण्याची पराकाष्ठा;  ह्या गुणवंत निर्मातीची आपल्या निवडलेल्या क्षेत्रातील Total Commitment दिसते.

कोणत्याही गाजलेल्या नाटक वा चित्रपटाच्या कथेचा गोषवारा, पुनश्च कळणे, गंमतीचे असते, त्यांत त्या कलाक्रुतीच्या कथाबीजापासून मूळ धरून, अंतिम फलनिष्पत्तीची साद्यंत कहाणी समजणे, हा एक आनंदाचा ठेवा होतो. त्याही पुढे जाऊन, त्या कलाक्रुतीच्या जडण घडणींत सामिल असणार्यांच्या निवडीचे, त्यांच्या सोबतचे आंबट गोड अनुभव उमगणे, ही तर जणू 'अंदरकी बात' समजणे असते. त्यातून जर आपणही त्या कलाक्रुतीचे कधी ना कधी, आस्वादक प्रेक्षक राहिलो असलो, तर पुन:प्रत्ययाचा अदभूत् अनुभव, जणू जीवा-शिवाची गांठ घालून जाणारा होतो. 'सय' ह्या कलाजीवनाबद्दलच्या आत्मसंवादाचे सार हा असा असीम आत्मानंदाचा अनुभव वाचकाला देणे हा आहे.

‘बिकट वाट, वहिवाट’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘सख्खे शेजारी’, ‘सोयरीक’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘जास्वंदी’, ‘धिक् ताम’, ‘मोगरा फुलला’ अशां सारखी नाटके, तसेचस्पर्श’चष्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘पपीहा’, ‘दिशा’ आणिसाज’ सारख्या चाकोरी बाहेरच्या चित्रपटांविषयीची, जीवन कहाणी हातचे काही राखता इथे सईबाईनी मांडली आहे.

बालरंगभूमी, आकाशवाणी-सहज म्हणून जाऊन पहिल्याच आँडेशन नंतर ताबडतोब निवेदिका म्हणून निवड, मराठी, हिंदी रंगभूमी आणि अर्थातच हिंदी चित्रपट अशा विवि माध्यमांमध्ये, आपल्या असामान्य कर्तुत्वाने चमकणार्या सई परांजपे ह्यांचे कौतूक करावे, तितके थोडेच आहे.

विविधांगी अनुभवांचा हा शोभादर्शक इतका रोचक आणि बोधक आहे की, तो शब्दांत सांगणे खरंच कठीण आहे. आंबा जसा नुसता गोड आहे, हे फक्त सांगून भागत नाही, तर तो आपण स्वत: खाऊन, त्याचे माधुर्य अनुभवायचे असते; त्याच प्रमाणे 'सय' लागण्याकरीता, ज्याने त्याने, हे पुस्तकच वाचून त्रुप्तीचा आनंद मिळवणे, उत्तम.

ज्याला Icing on the Cake म्हणतात, त्याप्रमाणे छोट्या सईच्या बालपणींच्या अवखळ, खट्याळ आठवणींसोबत स्वत:चे वेगळेपण बिनधास्तपणे जपणार्या, कर्तबगार मातोश्री शकुंतलाबाई परांजपे ह्यांचे तत्वनिष्ठ, संपन्न व्यक्तिमत्वाचा लखलखीत ठसा 'सय' मध्ये सहजतेने अवतरला आहे.

ह्या सगळ्या छान खटाटोपात महत्वाची एक त्रुटी मात्र राहून गेली आहे. विविध कलाक्रुती विषयक घटना, घडा मोडींसंबधी तारीख वार संदर्भ इथे बिल्कूल नाही. तसेच त्यांच्या प्रत्येक कलाक्रुतीची प्रथम एकूण प्रयोग योगदान करणार्यांची साद्यंत सुची इथे नाही. ह्यामुळे हे आत्मनिवेदन काहीसे विस्कळीत भासते. अर्थात लेखिकेने ह्या अशा आकडेवारीच्या इतिहासा संबंधी तिची वेयक्तिक असमर्थता प्रांजळपणे मान्य केली आहे आणि तो तिचा मोठेपणाच होय. माझी ही सुचना केवळ माध्यमांच्या इतिहासासाठीचा एक दस्तावेज म्हणून सय हे पुस्तक असावे ह्यासाठी आहे. पुढील आव्रुत्ती अधिक अर्थपूर्ण व्हावी ह्या प्रामाणिक कळकळीपोटी मांडलेली आहे.

'नटखट नट-खट मोहन जोशी':
एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी!
--–👌--------------👌--------------👌---------
नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली. अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते. 

गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे.
अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. .भा.नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर थक्क करणारी आहे. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत. काही लहान-मोठ्यांच्या मोठेपणाच्या जशा गोष्टी येथे आहेत, तसेच काही 'दिग्गजां' च्या 'छोटेपणा'चे जोशींना आलेले अनुभवही धक्का देणारे आहेत.

ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो.
कुठेही कंटाळा येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.                                                                

हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी  त्यांचे शुभचिंतन.

अचूक निदान' तर आरोग्य प्रदान:

नुकतेच डाँ. रवी बापट लिखीत 'अचूक निदान' हे पुस्तक हाती आले अन् ते वाचता वाचता, प्रथम आठवले की,ह्याच पुस्तकाच्या  प्रकाशनसमारंभासाठी मला डाँ.साहेबांनी आमंत्रण देताना 'त्यामध्ये माझाही उल्लेख आहे' असे सांगितले होते ते! काही कारणाने मी मात्र त्या समारंभाला जावू शकलो नव्हतो. सहाजिकच मोठ्या उत्सुकतेने व उत्साहाने मी पुस्तक वाचले. 

कोणताही आजार बरा करण्यासाठी, त्याचे अगदी अचूक निदान होणे किती नितांत गरजेचे असते, ते प्रत्यक्ष अनुभवांतील विविध उदाहरणांचा दाखला देवून, ह्मा वाचनीय पुस्तकांत प्रभावीपणे मांडले गेले आहे. रोग्याबरोबरचा दुखण्यासंबधीचा, त्याच्या मनाचा मागोवा घेत, केलेला मनमोकळा संवाद, नंतर त्याची आमूलाग्र शारिरीक तपासणी आणि शेवटी गरजे प्रमाणे चांचण्या करणे ह्या क्रमाने, सुयोग्य उपचार-निदान पद्धत सध्याच्या आरोग्यक्षेत्राच्या व्यापारीकरणांत कशी डावलली जाते आहे, त्याचेही विषण्ण करणारे चित्रण येथे आहे. ही अचूक निदान करणारी रीतच सातत्याने वापरून डॉ. बापटांनी, नाना तर्हेच्या दुर्धर व्याधीग्रस्तांना कसे बरे केले ते येथे समजते.

माणसाच्या शरीररचनेची गुंतागुंत आणि सर्वपरिचित दुखण्यांची कारणे व उपचार ह्यांचेही धडे वाचकाला पुस्तकातून मिळतात. 'Hit and Miss चा लपंडाव' करत रोग्याची प्रयोगशाळा बनवणार्या आजच्या जमान्यांत, डॉ. रवी बापटांसारखे अत्यंत प्रामाणिक, ध्येयवादी, सेवाभावी आणि निष्णात धन्वंतरीचे अनुभवाचे हे बोल खरोखर सर्वांनीच वाचावेत असेच आहेत. उगाच नाही केवळ तीन महिन्यांत 'अचूक निदान' पुस्तकाच्या तीन आव्रुत्त्या निघाल्या!

सरते शेवटी, एक रोगी म्हणून नव्हे तर, एक हौशी ज्योतिषी मित्र म्हणून, माझा यथोचित उल्लेख मला पुस्तकात, अखेर १५७ व्या पानावर सापडला! सुखद धक्का बसून, माझे मन भरून आले. अखेरीस म्हणावेसे वाटते की, 'सर्वसाधारणपणे कोणीही डाँक्टर, माणसाच्या वर्तमानांतील दुरावस्थेचे अचूक निदान करण्याचा प्रयत्न करत, त्याला योग्य ते उपचार करत, बरे करण्यासाठी झगडतो, तर ज्योतिषी माणसाचे भूत, वर्तमान जाणत भविष्यातील अवस्थेचेही चित्र यथामती त्याच्यापुढे उभं करण्याचा प्रयत्न करतो'.
'झिममा': एक रोमहषॅक अनुभव

'झिममा' हे श्रीमती विजया मेहतांचे आत्मकथन महणजे मराठी रंभूमीचा गेल़या / दशकांचा रोमहषॅक इतिहासच आहे. बाईंची असामान्य गुणवत्ता, रंगभूमीवरील अतूट निष्ठा सखोल अभ्यास, अथक परिश्रमांची तयारी, ध्येय साध्य करणयाचा आत्मविश्वास हया जोडीला मार्गदर्शनासाठी लाभलेले श्रेष्ठ गुरू हयामुले, तयांनी रंगभूमीला दिलेले योगदान खरोखऱच अद्वितीय आहे! हा सारा जीवनपट एखादया चल चित्रपटासारखा उलगडत जातो. एकाच व्यक्तिचया जीवनात इतके सारे अविस्मरणीय,चित्तथरारक आणि अद्वितीय घड़ू शकते, एकाहून एक इतकी श्रेष्ठ ज्येष्ठ माणसे संधी येऊ शकतातं, अभिनय आणि दिग्दशॅनांतील इतकी शिखरे पार होतात, हयाचे खरोखऱच आश्चर्य वाटते. वाचकाला बरोबर घेऊन जाणारी साधी सोपी ओघवती भाषा अाणि निवेदन हयामुले, एकदा हे पुस्तक वाचायला घेतले की कधी संपते तेही कलतही नाही. हा वाचनानुभव पुनःप्रत्ययाचा आनंद देता देता, आपलयालाही, काही ना काही असामान्य योगदान देणयाची प्रेरणा मिलते.
'झिममा' हा एक सांघिक,सांगितीक लयीचा,उत्साह ऊर्जा वाढविणारा खेल आहे: जीवन हा देखिल एक 'झिममा' आहे,हयाची पुनः पुनः आठवण करून देणारे हे पुस्तक आपणही ज़रूर वाचावे.

'संवाद संवादकांशी'
ख्याती मिलवलेले निवेदक,मुलाखतकार अशा २२ दिग्गजांचया मुलाखती घेऊन 'संवाद संवादकांशी' हे पुस्तक डाॅ अशोक चिटणीस शुभा चिटणीस हयानी लिहील्े आहे. ते खरोखर वाचनीय जसे आहे, तसेच मनोरंजक मार्ग दशॅकही आहे.सुधीर गाडगील,प्रदीप भिडे,भाऊ मराठे,मंगला खाडीलकर,वासंती वतॅक,उत्तरा मोने,प्रा.नुलकर अशा विविध गुणवंत संवादकांचा वैशिष्टयपूणॅ परिचय येथे करून दिलेला आहे. संस्मरणीय प्रसंगांची माहिती आणि ही माणसे कर्तृत्वाची गरूडभरारी कशी मारू शकली, तयाची मनोरंजक मेजवानी हया पुस्तकांत आहे.
हया बरोबरच हया मान्यवरांची वैयक्तीक कौटूंबिक निवडक माहिती,निवेदकांनी मुलाखती घेतलेलया celibrity ची विविध अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांची उजलणी, मनमनांतील सुखक्षण जागविणारी आहे.
गुणवंत कसे घडत जातात,ते यश, प्रसिद्धी मिलविणयामागे किती कष्ट घेतात,अडचणी आह्वानांना तोंड देत, संधींचे सोने कसे करतात, ते हया पुस्तकामुले उमजते. आपले विशेष गुण, तसेच मर्यादा जे जाणतात आपलया छंदाला आवडीला जे व्यावसायिक रूप देवू शकतात, तेच अखेर अर्थपूणॅ योगदान देवू शकतातं हेच हया वाचनात समजले: जमले तर तुम्हीही हा आनंद आजमावा.


सुधाकर नातू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा