शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

"बोल अमोल-201 to 220

👍"बोल,अमोल' 201 !":👌 😝" लोकशाहीमध्ये मतदार, मतांद्वारे सत्ता पालटू शकतात; तर राजेशाही, हुकूमशाही वा लष्करशाही क्रांती करून सत्ता बदल करता येतो, केला जातो. परंतु संसारामध्ये सुरुवातीचे गुलाबी दिवस गेले की, ज्या जोडीदाराच्या हातात सत्ता येते, ती सत्ता ब्रह्मदेवालाही नंतर आयुष्यभर पालटता येत नाही !":😝 👍"बोल,अमोल' 202,!":👌 💐"हितकर म्हणजे 'श्रेयस', तर सुखकर म्हणजे 'प्रेयस' माणूस नेहमी सोपा मार्ग म्हणून 'प्रेयस' अर्थात सुख देणारे निवडत असतो. पण काही व्यक्ती सारासार विचार करून जे जे 'श्रेयस' अर्थात हितकर आहे त्याचीच निवड करतात. अशा व्यक्तींना 'मेधावी' अर्थात विवेकबुद्धी आणि समाज हितकर दृष्टी असणारे म्हटले जाते. ज्या समाजात 'मेधावी' व्यक्तींचे प्रमाण अधिक तो सुसंस्कृत समाज !":💐 👍"बोल,अमोल' 203 !":👌 💐"आपण बदलू न शकणाऱ्या भूतकाळातील कटू आठवणींचे ओझे बाळगत, अनिश्चित भविष्यात काय घडेल याची चिंता करत जगण्यापेक्षा, हाती असलेल्या वर्तमानात जगणं शिकायला हवं आणि 'घडेल तेच पसंत' असं मानायला हवं ! वाह् क्या बात है !!":💐 👍"बोल,अमोल' 204 !":👌 💐"अतरंगी' हाच मुळी एक 'अतरंगी' शब्द आहे, असा शब्द की ज्यामधून आपल्या मनामध्ये त्या वेळच्या ज्या भावभावना व्यक्त करायच्या असतात, त्या अगदी ओतप्रोत भरलेला शब्द म्हणजे 'अतरंगी' शब्द ! उदाहरणार्थ: अफलातून, ओतप्रोत रुणुझुणु , ठेहराव, साठव, आठव, अघळपघळ, बरखुरदार, परिप्रेक्ष, भवताल, Maverick..... 'बोल अमोल' हा स्वनिर्मित विचारांचा खेळही जणु अतरंगीच !!":💐 👍"बोल,अमोल' 205 !":👌 💐"जे क्षेत्र निवडू, त्या क्षेत्रात आपल्या पंखात उत्तुंग भरारी घेण्याची ताकद हवी, आपली इच्छा हवी. तेथे प्रत्येक काम कसं चोख हवं, निष्ठेने करायला हवं, त्यामुळे प्रगती तर होईलच पण आत्मसमाधानही मिळेल!":💐 👍"बोल,अमोल' 206 !":👌 😇"गुपचूप चकवणारा चकवा !":😇 👍'प्रवासात खूप वेळा आपण रस्ता चुकतो, पुन्हा त्याच त्याच ठिकाणी सारखे येत राहतो आणि बाहेर कसे पडायचे ते कळतच नाही. मग ती गुंग होते, तो असतो चकवा. आयुष्यातही असेच गुपचूपपणे चकवणारे चकवे येतात त्यांचे भान ठेवा !":👍 👍"बोल,अमोल' 207 !":👌 💐" जिज्ञासू वृत्ती, प्रयोगशीलता, निरीक्षण शक्ती, भवतालाचे अचूक आकलन आणि कल्पक अशी दृष्टी यामधून निवडलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला कितीही अडथळे अपयश आले, तरी प्रत्यक्षात आणण्याचा अविरत ध्यास, हा अखेरीस उपयोगी शोधाचे कारण ठरू शकतो ! विख्यात शास्त्रज्ञ थॉमस एडिसन साक्षी आहेत !!":💐 👍"बोल,अमोल' 208 !":👌 💐"आयुष्यात आपल्याला 💐काय जमू शकतं यावर आपल्या आयुष्याचं भवितव्य ठरतं हे जरी खरं असलं तरी आयुष्याचा जमा खर्च काढताना आपल्याला काय काय जमू शकलं नाही, त्याचाही केव्हातरी लेखाजोखा घ्यावा. त्यातूनही तुम्हाला काहीतरी नवीन गवसतं....💐 कसं, ते आजमावण्यासाठी...... पुढील लिंक उघडा.... https://youtu.be/CFrqjTh8pdE?si=D86geM_FDJARoifW 👍"बोल, अमोल-209 !":👌 💐 "सगळीच माणसं विचार करतात विचार करू शकतात, परंतु त्यातील काहींना विचार व्यक्त करून ते इतरांना देत रहावेत असं वाटतं, ते लेखक किंवा कवी होतात ! नवे विचार, वेगळ्या वाटा आणि दिशा, अकल्पित अशा संकल्पना देणारी ही प्रतिभावान मंडळी समाजासाठी सांस्कृतिक जडणघडण करणारी असतात !":💐 👍"बोल, अमोल-210 !":👌 💐"मनाचे कोडे:"💐 "आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही. पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही !": शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे!":💐 👍"बोल, अमोल-211 !":👌 💐 "श्रावण माझी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे !":💐 (बालकवी) 👍"बोल, अमोल-212 !":👌 💐"बोलणार्याला जे बोलायचं आहे, ते ऐकणाऱ्याला ऐकायचं आहे कां, ते बोलणाऱ्याने आधी नीट तपासून घ्यावे, हा शहाणपणा !":💐 👍"बोल, अमोल-213 !":👌 💐"हलगर्जीपणा आणि धांदरटपणा या अवगुणांमुळे होतात, गोंधळात गोंधळ न निस्तरण्याजोगे ! त्या उलट नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा या गुणांमुळे सारे काही चोख, नांव न ठेवण्याजोगे ! दोन्हीपैकी आपण कसे आहोत, हे ज्याने त्याने तपासून बघावे हेच खरे आणि बरे !!":💐 👍"बोल, अमोल-214 !":👌 💐"बहर कहर नहर मोहर विहर.... खरंच मराठी भाषा किती लवचिक आणि अर्थपूर्ण आहे. कारण इथे केवळ एकच अक्षर बदलून वेगवेगळ्या अर्थाचे असे नवीन शब्द आपोआप तयार होतात. मला नाही वाटत, हे असं सामर्थ्य दुसऱ्या कुठल्या भाषेत असेल ! असं असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कां मिळत नाही ? हा प्रश्नच आहे नाही कां ??":💐 👍"बोल, अमोल-214 !":👌 💐"संगीत ही मानवाने मानवाला दिलेली एकमेवाद्वितीय आणि अलौकिक अशी देणगी आहे. म्हणूनच म्हटले आहे की, 'आवाजाची दुनिया जणु न्यारी' ! विश्वाची निर्मिती देखील ओंकार स्वरातून झाली असे मानले जाते !":💐 👍"बोल, अमोल-214 !":👌 😃 " मराठी भाषा मोठी गमतीशीर आहे! आता हे बघा: बे एके बे, बे दुणे चार, याचा अर्थ बे म्हणजे दुप्पट; असं असताना बे उपपद लावले की, जो नवा शब्द होतो तयार, तो विरोधाअर्थी कसा होतो ? हीच तर गंमत आहे मराठी भाषेची ! जसं: 'लगाम-बेलगाम' 'शुद्ध-बेशुद्ध' 'चव-बेचव' 'घर-बेघर' 'पर्वा-बेपर्वा...😃 👍"बोल, अमोल-216 !":👌 🤣"लाँ आँफ डिमीनिशिंग रिटर्नस्": एखादी 'गोष्ट' जरी खूप आवडली तरी, तिच्या जास्त 'वापरा'मुळे, ती हळूहळू नकोशी व्हावी ? नाही, नाही ! कसे? ते ह्या विडीओत पहा !":😇 👍"बोल, अमोल-217 !":👌 😀 "भावना आणि तर्क यांचे द्वंद माणसाच्या आयुष्यात सातत्याने प्रभाव पाडत असते. भावना अथवा तर्क ह्यामध्ये कुठेही अतिरेक होऊ नये, हे तारतम्य हवे. नाहीतर, माणसांमाणसांमधील परस्पर संबंध बिघडण्याची शक्यता असते. या दोन्हीमध्ये समतोल हेच शहाणपण !":😀 👍"बोल, अमोल-218 !":👌 🤣 "वास्तवाला सोडून नेहमी स्वप्नरंजन केले जाते, परंतु ते अखेरीस स्वतःची आत्मवंचनाच ठरू शकते ! सांप्रतच्या अनेक घटना हेच दर्शवतात की, 'विकसित' 'विकसित' हा कंठशोषच खरीखुरी आत्मवंचनाच होय !":🤣 👍"बोल, अमोल-219 !":👌 😇 "भावना आणि तर्क यामध्ये माणसाच्या जीवनात नेहमीच भावनेची सरशी होते, असे दिसते. असे कां व्हावे याचा अधिक शोध घेतला असता लक्षात येते की, मानवाच्या मेंदूमधील भावना नियंत्रित करणारे केंद्र उत्क्रांतीच्या वेळी प्रथम विकसित झाले. त्यानंतरच कित्येक हजारो वर्षानंतर तर्क अर्थात 'Rational Thinking 'नियंत्रित करणारे केंद्र विकसित झाले !":😇 👍"बोल, अमोल-220 !":👌 😃"Politically Correct हा शब्द त्या मागची भावना आणि विचार चपखलपणे व्यक्त करणारा ताकदवर शब्द आहे आणि त्याचा उपयोग राजकारणामध्ये सातत्याने होत असतो, करावा लागतो. विशेषता : सार्वजनिक जीवनामध्ये एखादे अचानक संकट वा चिंताजनक अपघात होतो, त्या वेळेला नेतृत्वाची कसोटी लागून, समाज माध्यमांमध्ये प्रतिसाद देताना तंतोतंत Politically Correct बोलावे लागते, तसे झाले नाही आणि नेतृत्वाने जर चामडी बचाव अशा तऱ्हेची प्रतिक्रिया व्यक्त केली, तर त्या नेतृत्वाचे हंसे तर होतेच, पण त्याच्या करिअरला देखील उतरती कळा लागू शकते !":😃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा