शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४
"बोल अमोल -172 to 200 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-172 !":👌
💐"ह्या हृदयीचे, त्या हृदयी करू,
जाणिवांचा भवताल विस्तारू !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-173 !":👌
या संकल्पना एकमेकात बेमालूम गुंतलेल्या आहेत, त्या म्हणजे 'आंतरिक
सुख-समाधानाची परिसीमा' आणि तशा 'अलौकिक अनुभवाचा भवताल' होय. त्यांची प्राप्ती करण्यासाठीच तर सारी धडपड चालू असते !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-174 !":👌
💐"सगळ्यांसाठी वेळ समान असते. आपण वेळेचा उपयोग कसा करतो, त्यावर सारे अवलंबून असते. आपल्याला कोण किती वेळ देतो, तसेच आपण कोणाला किती वेळ देतो, ह्यापेक्षा आपण स्वतःला किती वेळ, केव्हा कसा देतो ह्यावर आयुष्यातील सुखदुःखे व यशापयश अवलंबून असते !":💐
👍"बोल, अमोल-175 !":👌
💐" जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्ट करायची तयारी असली की, यशाचे नवनवीन बुरुज पादाक्रांत करता येतात, मात्र जर त्याच बरोबर गर्व, अहंकार आणि आत्मस्तुतीची परिसीमा असली, तर होत्याचे नव्हते होऊ शकते !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-176 !":👌
💐असू द्यावे,
शब्द, फुलणाऱ्या कळीसारखे,
विचार, बहरणाऱ्या फुलासारखे,
उच्चार, ध्यानस्थ वृक्षासारखे,
आणि
आचार,
निष्कलंक स्फटिकासारखे !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-177 !":👌
💐" एका खांद्यावर सामानाची झोळी घेतली तर, एक हात अडकून राहतो व तो खांदा दुखू शकतो. पण पाठीवर घेता येण्याजोगी सॅॅक जर घेतली, तर दोन्ही हात मोकळे राहतात आणि कुठल्याच खांद्याला त्रास होत नाही, भार समसमान वाटला जातो.
तसंच संसाराचं आहे, दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना सांभाळत, घरच्या कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या अशाच वाटून घेतल्या, तर संसार गोडीचा होतो !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-178 !":👌
💐 "शारीरिक श्रमांमुळे शरीराला जितका थकवा येतो, त्यापेक्षा बौद्धिक श्रमांमुळे खूपच अधिक थकवा येतो. साहजिकच शारीरिक श्रमांच्या मोबदल्यापेक्षा, बौद्धिक श्रमांचा मोबदला कितीतरी पट अधिक असतो !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-179 !":👌
💐 "ईगो-Ego म्हणजे स्वतःबद्दल, स्वतःच्या कुवतीबद्दल अभिमान. तो मर्यादेत असेपर्यंत ठीक असते. पण त्याचा अतिरेक झाला, तर पाहता पाहता अनाठायी गर्व, अहंकार अशा पायऱ्या पार करत त्याचे रूपांतर 'आत्मस्तुतीमग्नते'त- Narcissistic होते.
शेवटी 'गर्वाचे घर खाली' न्यायाने ईगोचा फुगा फुटतो !":💐
[16/7, 7:33 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-180 !":👌
💐"आपली व्रत वैकल्ये, सणवार, शिस्त नियमन, समाजमन निकोप ठेवत
सांस्क्रुतिक संस्कार करणारी,
आरोग्याचे ऋतू बदलानुसार
भान ठेवणारी !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-181 !":👌
💐 " सर्व सृष्टी कार्य कारण भावावर मार्गक्रमणा करत असते, जे घडते त्यामागे काही ना काही कारण असते. विशेषतः वाईट गोष्टी घडण्यामागे जे मूळ कारण Root Cause असते ते शोधा, त्यावरून तसे घडू नये म्हणून प्रतिबंधक योजना आखा आणि त्याप्रमाणे काटेखोरपणे वागा !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-182 !":👌
💐 "नवनवीन कल्पना सुचणं हे भाग्याचं लक्षण, कारण त्यातीलच एखाद्या कल्पनेचे रूपांतर नवीन संधीमध्ये आणि त्यातून समाजोपयोगी अशा भरीव योगदानामध्ये होऊ शकतं. आर्किमिडीजचा सिद्धांत त्याला साक्षी आहे !":💐
[22/7, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-185 !":👌
💐"जीवन संग्रामात प्रत्येक जण स्वत:ला सिद्ध करायची धडपड करत असतो. पण काही मोजकेेच कर्तृत्ववान आपल्यातील विशिष्ट कौशल्यामुळे स्वतःला इतके सिद्ध करतात की, ते जगप्रसिद्ध होतात.
प्रसिद्धी मिळणे, म्हणजे आपल्याला परिचित नसलेल्यांनीही आपल्याला ओळखणे, तर सर्वसामान्यांना केवळ त्यांच्या परिचयातलेच ओळखतात !":💐
[23/7, 7:52 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 186 !":👌
😇 "न सुटणारे प्रश्न":😇
😇 "कालप्रवाहाच्या ओघात, घडामोडी
चांगल्यापेक्षा अधिकाधिक वाईटच
कां होतात?":😇
[24/7, 7:19 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 187 !":👌
😇 "कोणताही अर्थसंकल्प हा चित्रपटाप्रमाणे असतो. कारण चित्रपट जसा Hit होईल का Flop होईल हे कुणालाही कधीही सांगता आले नाही, तसेच अर्थसंकल्पाचेही आहे !":😇
[25/7, 7:46 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 188 !":👌
💐"निर्विकार निर्विचार काहीच न करता गप्पपणे एकाच जागी स्वस्थ बसणे किंवा पडून राहणे, आडवे पडून राहणे, पाच मिनिटेही अशक्य असते. परंतु काही जणांना सिद्धी प्राप्त केल्याप्रमाणे पुष्कळ काळपर्यंत तप केल्यासारखे बसता येते. ऋषीमुनी त्याचे उदाहरण आहे.
सर्वसामान्यांच्या मेंदूमधील विचार करण्याचे केंद्रातील न्युरल कनेक्शन्स सतत कार्यरत जागृत असतात, असे म्हणावयाचे !":💐
[26/7, 9:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 189 !":👌
😉"ज्याला त्याला वाटते, आपण वागतो तेच बरोबर. परंतु तसे जर असते, तर कुठेच कधीच कोणाचेही मतभेद, वादविवाद झालेच नसते. म्हणून प्रत्येकाने अधून मधून आपण जसे वागतो, तसे कां वागतो, त्याचे परिणाम काय होतील, हे आजमावावे !":😄
[27/7, 7:35 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 190 !":👌
"😩😩😩
पैशापेक्षा भावना व परंपराना आणि मूल्य महनीय मानणारा, मध्यम वर्ग समाजाला नवी दिशा देत राहिलेला असे.
परंंतु आज हा वर्ग हरवला तर नाही ना? अशी शंका वाटते आहे !":😷😷😷😢😢
[28/7, 7:49 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 191 !":👌
💐"आरसा माणसाच्या चेहऱ्याची प्रतिमा दाखवणारं साधन, तर माणसाचा चेहरा हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा स्वभावाचा आरसा ! साऱ्या जगाला ज्या डोळ्यांच्या नजरेतून माणूस पाहतो, ते डोळे हे माणसाचा स्वभाव आणि चेहरा प्रदर्शित करत असतात.
चेहऱ्याकडे पहा रोखून आणि चेहऱ्यावरील भावमुद्रा, तुम्हाला जाणवून देईल, ही व्यक्ती कशा स्वभावाची आहे ! फक्त त्यासाठी माणसं 'वाचायची' कला मात्र तुमच्या अंगी हवी !":💐
[29/7, 8:08 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 192 !":👌
😝" लोकशाहीमध्ये मतदार, मतांद्वारे सत्ता पालटू शकतात; तर राजेशाही, हुकूमशाही वा लष्करशाही क्रांती करून सत्ता बदल करता येतो, केला जातो. परंतु संसारामध्ये सुरुवातीचे गुलाबी दिवस गेले की, ज्या जोडीदाराच्या हातात सत्ता येते, ती सत्ता ब्रह्मदेवालाही नंतर आयुष्यभर पालटता येत नाही !":😝
[30/7, 8:12 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 193 !":👌
💐"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो !":💐
[31/7, 9:45 AM] Sudhakar Natu: 👍"बोल,अमोल' 195 !":👌
😇 "हे" 'असे', अन् "ते"ही 'तसे',
सांगा, आपले व्हायचे कसे?
त्यातून निवडायचे कसे, कसे?
जुळवतो, बापुडे कसेबसे!":😇
[2/8, 8:03 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 197 !":👌
💐 'घरत गणपती' हा सर्वांगसुंदर कौटुंबिक चित्रपट नुकताच पाहिला. एकत्र कुटुंबातील तीन पिढ्यांचे नातेसंबंध कडू गोड प्रसंगांची भावपूर्ण गुंफण होत असताना, उसवले जाणार की काय ही शंका श्री गणरायाच्या कृपेने सावरली कशी जाते, ते सहकुटुंब पाहण्यासारखे आहे !":💐
[3/8, 8:16 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 196 !":👌
💐"आपल्याला निसर्गचक्रापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. अनंत वर्ष ते बिनचूकपणे चालू आहे. सातत्य व समन्वय अशी अचूकता इथे दिसते. तसेच आपणही दररोजचा आपआपल्या सोयीनुसार दिनक्रम ठरवावा आणि तो दररोज अचूकपणे न चुकता सतत अंगिकारावा. Body clock अर्थात् शरिरचक्र व आपला दिनक्रम हयांची सांगड घातली जाईल व आपले आरोग्य चांगले राहील !":💐
[4/8, 8:04 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 198 !":👌
💐 "माणसाचं नशीब हे क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणासारखे किंवा गोलंदाजीसारखे असते. कोणता चेंडू कोणत्या क्षेत्ररक्षकाकडे कधी जाईल ते कळत नाही. तसंच कोणत्या गोलंदाजाला कोणत्या चेंडूवर विकेट मिळेल हेही सांंगणे कठीण असते. नशिबाचाही असाच अचानक लाभ कधी होईल, ते वर्तवणे कठीण असते !":💐
[5/8, 8:08 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 199 !":👌
🤣 "तंत्रज्ञान आणि माणसाची कल्पनाशक्ती यामुळे उत्तरोत्तर प्रगतीचे उंचच उंच इमले निर्माण झाले खरे, परंतु त्याबरोबरच ताण-तणावाचे वाढते मानसिक अनारोग्य देखील चिंताजनक वेगाने वाढत चालले आहे.
भौतिक विकासाची ही किंमत फारच महाग आहे !":🤣
[6/8, 9:00 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 200 !":👌
💐 "हाती घेतलेल्या कामाची जबाबदारी पूर्ण करून समाधान मिळवित रहाण्याची प्रव्रुत्तीच (Achievement Motivation) नवनवीन कार्य करण्याची अंत:प्रेरणा देत असते !":💐
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा