गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४
"स्वरानंद 61 to 66 !":
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-61 !":👌
नेहमीप्रमाणे 3 सुमधूर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या लिंकस् उघडा...
1 " हम है राही प्यार के...
https://youtu.be/MlhN9r11GME?si=pdyZ0F4j8JbC6SVh
2 " किसी ने मुझको बनाके अपना.......
https://youtu.be/FnuV5_qCjsE?si=rOabjao89BfEsgLo
3 " तेरी प्यारी सुरत को किसी की नजर ....
https://youtu.be/BiWqgA5srHM?si=QqlRFPM735JlMTo0
धन्यवाद
सुधाकर नातू
#########
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-62 !":👌
जुन्या जमान्यातील विख्यात गायिका शमशाद बेगम ह्यांच्या सुमधूर स्वरातील 3 गीते ऐकण्यासाठी त्यांच्या लिंकस् उघडा...
1 " सैयां दिल मे आना रे.....
https://youtu.be/TGRLVmpvxmI?si=K7RTuW3eAQihsNDa
2 " अभी आर कभी पार....
https://youtu.be/CdYrP8C30pc?si=BED6UB_HL7R2xInW
3 " कजरा मोहब्बत वाला...... https://youtu.be/tHSEtDVM3Qo?si=Gj_8u9J-PRctUpCq
धन्यवाद
सुधाकर नातू
######
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-63 !":👌
3 सुमधुर नाट्यगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 छोटी सी है दुनिया.....
https://youtu.be/iK0tbEJxZXE?si=2mcz4A6FQZnE1pwJ
2 मन रे तुही बता दे..
https://youtu.be/xKJefA9bfWs?si=49w7v6zroE9cwLqh
3 हम थे जिनके सहारे....
https://youtu.be/XOVUZsk8wto?si=DzvryiHoCFDDXSMf
धन्यवाद
सुधाकर नातू
##@####
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-64 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1अपलम चपलम चपलाई रे...
https://youtu.be/QqouGx8l3vc?si=3IDdCo2PmYEhnl_Z
2 सुनते थे नाम जिनका...
https://youtu.be/VE-TnmqAIcQ?si=vsJdCRcgpR7eMf71
3 दूर कोई गाये...
https://youtu.be/0A9YWtOGQOQ?si=TTE7-7MkA8K45AxW
धन्यवाद
सुधाकर नातू
####################
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-66 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 अरे हुुस्न चला ऐसी चाल....
https://youtu.be/DCH3M0uSloA?si=_25myKpHf37pN2Dq
2 जब से तुम्हे देखा....
https://youtu.be/kVC18wa7Z2s?si=vxnzmhTYhRmAfX6U
3 ऐ मेरे दिल कही और चल...
https://youtu.be/1B9sm1HHAlQ?si=lAyzWz3UOo0fNRot
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
‐------
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४
"बोल अमोल-201 to 220
👍"बोल,अमोल' 201 !":👌
😝" लोकशाहीमध्ये मतदार, मतांद्वारे सत्ता पालटू शकतात; तर राजेशाही, हुकूमशाही वा लष्करशाही क्रांती करून सत्ता बदल करता येतो, केला जातो. परंतु संसारामध्ये सुरुवातीचे गुलाबी दिवस गेले की, ज्या जोडीदाराच्या हातात सत्ता येते, ती सत्ता ब्रह्मदेवालाही नंतर आयुष्यभर पालटता येत नाही !":😝
👍"बोल,अमोल' 202,!":👌
💐"हितकर म्हणजे 'श्रेयस', तर सुखकर म्हणजे 'प्रेयस' माणूस नेहमी सोपा मार्ग म्हणून 'प्रेयस' अर्थात सुख देणारे निवडत असतो. पण काही व्यक्ती सारासार विचार करून जे जे 'श्रेयस' अर्थात हितकर आहे त्याचीच निवड करतात. अशा व्यक्तींना 'मेधावी' अर्थात विवेकबुद्धी आणि समाज हितकर दृष्टी असणारे म्हटले जाते. ज्या समाजात 'मेधावी' व्यक्तींचे प्रमाण अधिक तो सुसंस्कृत समाज !":💐
👍"बोल,अमोल' 203 !":👌
💐"आपण बदलू न शकणाऱ्या भूतकाळातील कटू आठवणींचे ओझे बाळगत, अनिश्चित भविष्यात काय घडेल याची चिंता करत जगण्यापेक्षा, हाती असलेल्या वर्तमानात जगणं शिकायला हवं आणि 'घडेल तेच पसंत'
असं मानायला हवं !
वाह् क्या बात है !!":💐
👍"बोल,अमोल' 204 !":👌
💐"अतरंगी' हाच मुळी एक 'अतरंगी' शब्द आहे, असा शब्द की ज्यामधून आपल्या मनामध्ये त्या वेळच्या ज्या भावभावना व्यक्त करायच्या असतात, त्या अगदी ओतप्रोत भरलेला शब्द म्हणजे 'अतरंगी' शब्द !
उदाहरणार्थ: अफलातून, ओतप्रोत
रुणुझुणु , ठेहराव, साठव, आठव,
अघळपघळ, बरखुरदार, परिप्रेक्ष, भवताल,
Maverick.....
'बोल अमोल' हा स्वनिर्मित विचारांचा खेळही जणु अतरंगीच !!":💐
👍"बोल,अमोल' 205 !":👌
💐"जे क्षेत्र निवडू, त्या क्षेत्रात आपल्या पंखात उत्तुंग भरारी घेण्याची ताकद हवी, आपली इच्छा हवी. तेथे प्रत्येक काम कसं चोख हवं, निष्ठेने करायला हवं, त्यामुळे प्रगती तर होईलच पण आत्मसमाधानही मिळेल!":💐
👍"बोल,अमोल' 206 !":👌
😇"गुपचूप चकवणारा चकवा !":😇
👍'प्रवासात खूप वेळा आपण रस्ता चुकतो, पुन्हा त्याच त्याच ठिकाणी सारखे येत राहतो आणि बाहेर कसे पडायचे ते कळतच नाही. मग ती गुंग होते, तो असतो चकवा.
आयुष्यातही असेच गुपचूपपणे चकवणारे चकवे येतात त्यांचे भान ठेवा !":👍
👍"बोल,अमोल' 207 !":👌
💐" जिज्ञासू वृत्ती, प्रयोगशीलता, निरीक्षण शक्ती, भवतालाचे अचूक आकलन आणि कल्पक अशी दृष्टी यामधून निवडलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला कितीही अडथळे अपयश आले, तरी प्रत्यक्षात आणण्याचा अविरत ध्यास, हा अखेरीस उपयोगी शोधाचे कारण ठरू शकतो ! विख्यात शास्त्रज्ञ थॉमस एडिसन साक्षी आहेत !!":💐
👍"बोल,अमोल' 208 !":👌
💐"आयुष्यात आपल्याला 💐काय जमू शकतं यावर आपल्या आयुष्याचं भवितव्य ठरतं हे जरी खरं असलं तरी आयुष्याचा जमा खर्च काढताना आपल्याला काय काय जमू शकलं नाही, त्याचाही केव्हातरी लेखाजोखा घ्यावा. त्यातूनही तुम्हाला काहीतरी नवीन गवसतं....💐
कसं, ते आजमावण्यासाठी......
पुढील लिंक उघडा....
https://youtu.be/CFrqjTh8pdE?si=D86geM_FDJARoifW
👍"बोल, अमोल-209 !":👌
💐 "सगळीच माणसं विचार करतात विचार करू शकतात, परंतु त्यातील काहींना विचार व्यक्त करून ते इतरांना देत रहावेत असं वाटतं, ते लेखक किंवा कवी होतात ! नवे विचार, वेगळ्या वाटा आणि दिशा, अकल्पित अशा संकल्पना देणारी ही प्रतिभावान मंडळी समाजासाठी सांस्कृतिक जडणघडण करणारी असतात !":💐
👍"बोल, अमोल-210 !":👌
💐"मनाचे कोडे:"💐
"आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही.
पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही !":
शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे!":💐
👍"बोल, अमोल-211 !":👌
💐 "श्रावण माझी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे !":💐
(बालकवी)
👍"बोल, अमोल-212 !":👌
💐"बोलणार्याला जे बोलायचं आहे,
ते ऐकणाऱ्याला ऐकायचं आहे कां,
ते बोलणाऱ्याने आधी नीट तपासून घ्यावे, हा शहाणपणा !":💐
👍"बोल, अमोल-213 !":👌
💐"हलगर्जीपणा आणि धांदरटपणा या अवगुणांमुळे होतात, गोंधळात गोंधळ न निस्तरण्याजोगे ! त्या उलट नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा या गुणांमुळे सारे काही चोख, नांव न ठेवण्याजोगे ! दोन्हीपैकी आपण कसे आहोत, हे ज्याने त्याने तपासून बघावे हेच खरे आणि बरे !!":💐
👍"बोल, अमोल-214 !":👌
💐"बहर कहर नहर मोहर विहर....
खरंच मराठी भाषा किती लवचिक आणि अर्थपूर्ण आहे. कारण इथे केवळ एकच अक्षर बदलून वेगवेगळ्या अर्थाचे असे नवीन शब्द आपोआप तयार होतात. मला नाही वाटत, हे असं सामर्थ्य दुसऱ्या कुठल्या भाषेत असेल !
असं असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कां मिळत नाही ?
हा प्रश्नच आहे नाही कां ??":💐
👍"बोल, अमोल-214 !":👌
💐"संगीत ही मानवाने मानवाला दिलेली एकमेवाद्वितीय आणि अलौकिक अशी देणगी आहे. म्हणूनच म्हटले आहे की, 'आवाजाची दुनिया जणु न्यारी' ! विश्वाची निर्मिती देखील ओंकार स्वरातून झाली असे मानले जाते !":💐
👍"बोल, अमोल-214 !":👌
😃 " मराठी भाषा मोठी गमतीशीर आहे! आता हे बघा: बे एके बे, बे दुणे चार, याचा अर्थ बे म्हणजे दुप्पट; असं असताना बे उपपद लावले की, जो नवा शब्द होतो तयार, तो विरोधाअर्थी कसा होतो ?
हीच तर गंमत आहे मराठी भाषेची !
जसं:
'लगाम-बेलगाम' 'शुद्ध-बेशुद्ध'
'चव-बेचव' 'घर-बेघर' 'पर्वा-बेपर्वा...😃
👍"बोल, अमोल-216 !":👌
🤣"लाँ आँफ डिमीनिशिंग रिटर्नस्":
एखादी 'गोष्ट' जरी खूप आवडली तरी,
तिच्या जास्त 'वापरा'मुळे,
ती हळूहळू नकोशी व्हावी ?
नाही, नाही ! कसे? ते ह्या विडीओत पहा !":😇
👍"बोल, अमोल-217 !":👌
😀 "भावना आणि तर्क यांचे द्वंद माणसाच्या आयुष्यात सातत्याने प्रभाव पाडत असते. भावना अथवा तर्क ह्यामध्ये कुठेही अतिरेक होऊ नये, हे तारतम्य हवे. नाहीतर, माणसांमाणसांमधील परस्पर संबंध बिघडण्याची शक्यता असते. या दोन्हीमध्ये समतोल हेच शहाणपण !":😀
👍"बोल, अमोल-218 !":👌
🤣 "वास्तवाला सोडून नेहमी स्वप्नरंजन केले जाते, परंतु ते अखेरीस स्वतःची आत्मवंचनाच ठरू शकते ! सांप्रतच्या अनेक घटना हेच दर्शवतात की, 'विकसित' 'विकसित' हा कंठशोषच खरीखुरी आत्मवंचनाच होय !":🤣
👍"बोल, अमोल-219 !":👌
😇 "भावना आणि तर्क यामध्ये माणसाच्या जीवनात नेहमीच भावनेची सरशी होते, असे दिसते. असे कां व्हावे याचा अधिक शोध घेतला असता लक्षात येते की, मानवाच्या मेंदूमधील भावना नियंत्रित करणारे केंद्र उत्क्रांतीच्या वेळी प्रथम विकसित झाले. त्यानंतरच कित्येक हजारो वर्षानंतर तर्क अर्थात 'Rational Thinking 'नियंत्रित करणारे केंद्र विकसित झाले !":😇
👍"बोल, अमोल-220 !":👌
😃"Politically Correct हा शब्द त्या मागची भावना आणि विचार चपखलपणे व्यक्त करणारा ताकदवर शब्द आहे आणि त्याचा उपयोग राजकारणामध्ये सातत्याने होत असतो, करावा लागतो. विशेषता : सार्वजनिक जीवनामध्ये एखादे अचानक संकट वा चिंताजनक अपघात होतो, त्या वेळेला नेतृत्वाची कसोटी लागून,
समाज माध्यमांमध्ये प्रतिसाद देताना तंतोतंत Politically Correct
बोलावे लागते, तसे झाले नाही आणि नेतृत्वाने जर चामडी बचाव अशा तऱ्हेची प्रतिक्रिया व्यक्त केली, तर त्या नेतृत्वाचे हंसे तर होतेच, पण त्याच्या करिअरला देखील उतरती कळा लागू शकते !":😃
"बोल अमोल -172 to 200 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-172 !":👌
💐"ह्या हृदयीचे, त्या हृदयी करू,
जाणिवांचा भवताल विस्तारू !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-173 !":👌
या संकल्पना एकमेकात बेमालूम गुंतलेल्या आहेत, त्या म्हणजे 'आंतरिक
सुख-समाधानाची परिसीमा' आणि तशा 'अलौकिक अनुभवाचा भवताल' होय. त्यांची प्राप्ती करण्यासाठीच तर सारी धडपड चालू असते !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-174 !":👌
💐"सगळ्यांसाठी वेळ समान असते. आपण वेळेचा उपयोग कसा करतो, त्यावर सारे अवलंबून असते. आपल्याला कोण किती वेळ देतो, तसेच आपण कोणाला किती वेळ देतो, ह्यापेक्षा आपण स्वतःला किती वेळ, केव्हा कसा देतो ह्यावर आयुष्यातील सुखदुःखे व यशापयश अवलंबून असते !":💐
👍"बोल, अमोल-175 !":👌
💐" जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्ट करायची तयारी असली की, यशाचे नवनवीन बुरुज पादाक्रांत करता येतात, मात्र जर त्याच बरोबर गर्व, अहंकार आणि आत्मस्तुतीची परिसीमा असली, तर होत्याचे नव्हते होऊ शकते !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-176 !":👌
💐असू द्यावे,
शब्द, फुलणाऱ्या कळीसारखे,
विचार, बहरणाऱ्या फुलासारखे,
उच्चार, ध्यानस्थ वृक्षासारखे,
आणि
आचार,
निष्कलंक स्फटिकासारखे !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-177 !":👌
💐" एका खांद्यावर सामानाची झोळी घेतली तर, एक हात अडकून राहतो व तो खांदा दुखू शकतो. पण पाठीवर घेता येण्याजोगी सॅॅक जर घेतली, तर दोन्ही हात मोकळे राहतात आणि कुठल्याच खांद्याला त्रास होत नाही, भार समसमान वाटला जातो.
तसंच संसाराचं आहे, दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना सांभाळत, घरच्या कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या अशाच वाटून घेतल्या, तर संसार गोडीचा होतो !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-178 !":👌
💐 "शारीरिक श्रमांमुळे शरीराला जितका थकवा येतो, त्यापेक्षा बौद्धिक श्रमांमुळे खूपच अधिक थकवा येतो. साहजिकच शारीरिक श्रमांच्या मोबदल्यापेक्षा, बौद्धिक श्रमांचा मोबदला कितीतरी पट अधिक असतो !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-179 !":👌
💐 "ईगो-Ego म्हणजे स्वतःबद्दल, स्वतःच्या कुवतीबद्दल अभिमान. तो मर्यादेत असेपर्यंत ठीक असते. पण त्याचा अतिरेक झाला, तर पाहता पाहता अनाठायी गर्व, अहंकार अशा पायऱ्या पार करत त्याचे रूपांतर 'आत्मस्तुतीमग्नते'त- Narcissistic होते.
शेवटी 'गर्वाचे घर खाली' न्यायाने ईगोचा फुगा फुटतो !":💐
[16/7, 7:33 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-180 !":👌
💐"आपली व्रत वैकल्ये, सणवार, शिस्त नियमन, समाजमन निकोप ठेवत
सांस्क्रुतिक संस्कार करणारी,
आरोग्याचे ऋतू बदलानुसार
भान ठेवणारी !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-181 !":👌
💐 " सर्व सृष्टी कार्य कारण भावावर मार्गक्रमणा करत असते, जे घडते त्यामागे काही ना काही कारण असते. विशेषतः वाईट गोष्टी घडण्यामागे जे मूळ कारण Root Cause असते ते शोधा, त्यावरून तसे घडू नये म्हणून प्रतिबंधक योजना आखा आणि त्याप्रमाणे काटेखोरपणे वागा !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-182 !":👌
💐 "नवनवीन कल्पना सुचणं हे भाग्याचं लक्षण, कारण त्यातीलच एखाद्या कल्पनेचे रूपांतर नवीन संधीमध्ये आणि त्यातून समाजोपयोगी अशा भरीव योगदानामध्ये होऊ शकतं. आर्किमिडीजचा सिद्धांत त्याला साक्षी आहे !":💐
[22/7, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-185 !":👌
💐"जीवन संग्रामात प्रत्येक जण स्वत:ला सिद्ध करायची धडपड करत असतो. पण काही मोजकेेच कर्तृत्ववान आपल्यातील विशिष्ट कौशल्यामुळे स्वतःला इतके सिद्ध करतात की, ते जगप्रसिद्ध होतात.
प्रसिद्धी मिळणे, म्हणजे आपल्याला परिचित नसलेल्यांनीही आपल्याला ओळखणे, तर सर्वसामान्यांना केवळ त्यांच्या परिचयातलेच ओळखतात !":💐
[23/7, 7:52 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 186 !":👌
😇 "न सुटणारे प्रश्न":😇
😇 "कालप्रवाहाच्या ओघात, घडामोडी
चांगल्यापेक्षा अधिकाधिक वाईटच
कां होतात?":😇
[24/7, 7:19 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 187 !":👌
😇 "कोणताही अर्थसंकल्प हा चित्रपटाप्रमाणे असतो. कारण चित्रपट जसा Hit होईल का Flop होईल हे कुणालाही कधीही सांगता आले नाही, तसेच अर्थसंकल्पाचेही आहे !":😇
[25/7, 7:46 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 188 !":👌
💐"निर्विकार निर्विचार काहीच न करता गप्पपणे एकाच जागी स्वस्थ बसणे किंवा पडून राहणे, आडवे पडून राहणे, पाच मिनिटेही अशक्य असते. परंतु काही जणांना सिद्धी प्राप्त केल्याप्रमाणे पुष्कळ काळपर्यंत तप केल्यासारखे बसता येते. ऋषीमुनी त्याचे उदाहरण आहे.
सर्वसामान्यांच्या मेंदूमधील विचार करण्याचे केंद्रातील न्युरल कनेक्शन्स सतत कार्यरत जागृत असतात, असे म्हणावयाचे !":💐
[26/7, 9:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 189 !":👌
😉"ज्याला त्याला वाटते, आपण वागतो तेच बरोबर. परंतु तसे जर असते, तर कुठेच कधीच कोणाचेही मतभेद, वादविवाद झालेच नसते. म्हणून प्रत्येकाने अधून मधून आपण जसे वागतो, तसे कां वागतो, त्याचे परिणाम काय होतील, हे आजमावावे !":😄
[27/7, 7:35 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 190 !":👌
"😩😩😩
पैशापेक्षा भावना व परंपराना आणि मूल्य महनीय मानणारा, मध्यम वर्ग समाजाला नवी दिशा देत राहिलेला असे.
परंंतु आज हा वर्ग हरवला तर नाही ना? अशी शंका वाटते आहे !":😷😷😷😢😢
[28/7, 7:49 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 191 !":👌
💐"आरसा माणसाच्या चेहऱ्याची प्रतिमा दाखवणारं साधन, तर माणसाचा चेहरा हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा स्वभावाचा आरसा ! साऱ्या जगाला ज्या डोळ्यांच्या नजरेतून माणूस पाहतो, ते डोळे हे माणसाचा स्वभाव आणि चेहरा प्रदर्शित करत असतात.
चेहऱ्याकडे पहा रोखून आणि चेहऱ्यावरील भावमुद्रा, तुम्हाला जाणवून देईल, ही व्यक्ती कशा स्वभावाची आहे ! फक्त त्यासाठी माणसं 'वाचायची' कला मात्र तुमच्या अंगी हवी !":💐
[29/7, 8:08 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 192 !":👌
😝" लोकशाहीमध्ये मतदार, मतांद्वारे सत्ता पालटू शकतात; तर राजेशाही, हुकूमशाही वा लष्करशाही क्रांती करून सत्ता बदल करता येतो, केला जातो. परंतु संसारामध्ये सुरुवातीचे गुलाबी दिवस गेले की, ज्या जोडीदाराच्या हातात सत्ता येते, ती सत्ता ब्रह्मदेवालाही नंतर आयुष्यभर पालटता येत नाही !":😝
[30/7, 8:12 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 193 !":👌
💐"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो !":💐
[31/7, 9:45 AM] Sudhakar Natu: 👍"बोल,अमोल' 195 !":👌
😇 "हे" 'असे', अन् "ते"ही 'तसे',
सांगा, आपले व्हायचे कसे?
त्यातून निवडायचे कसे, कसे?
जुळवतो, बापुडे कसेबसे!":😇
[2/8, 8:03 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 197 !":👌
💐 'घरत गणपती' हा सर्वांगसुंदर कौटुंबिक चित्रपट नुकताच पाहिला. एकत्र कुटुंबातील तीन पिढ्यांचे नातेसंबंध कडू गोड प्रसंगांची भावपूर्ण गुंफण होत असताना, उसवले जाणार की काय ही शंका श्री गणरायाच्या कृपेने सावरली कशी जाते, ते सहकुटुंब पाहण्यासारखे आहे !":💐
[3/8, 8:16 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 196 !":👌
💐"आपल्याला निसर्गचक्रापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. अनंत वर्ष ते बिनचूकपणे चालू आहे. सातत्य व समन्वय अशी अचूकता इथे दिसते. तसेच आपणही दररोजचा आपआपल्या सोयीनुसार दिनक्रम ठरवावा आणि तो दररोज अचूकपणे न चुकता सतत अंगिकारावा. Body clock अर्थात् शरिरचक्र व आपला दिनक्रम हयांची सांगड घातली जाईल व आपले आरोग्य चांगले राहील !":💐
[4/8, 8:04 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 198 !":👌
💐 "माणसाचं नशीब हे क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणासारखे किंवा गोलंदाजीसारखे असते. कोणता चेंडू कोणत्या क्षेत्ररक्षकाकडे कधी जाईल ते कळत नाही. तसंच कोणत्या गोलंदाजाला कोणत्या चेंडूवर विकेट मिळेल हेही सांंगणे कठीण असते. नशिबाचाही असाच अचानक लाभ कधी होईल, ते वर्तवणे कठीण असते !":💐
[5/8, 8:08 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 199 !":👌
🤣 "तंत्रज्ञान आणि माणसाची कल्पनाशक्ती यामुळे उत्तरोत्तर प्रगतीचे उंचच उंच इमले निर्माण झाले खरे, परंतु त्याबरोबरच ताण-तणावाचे वाढते मानसिक अनारोग्य देखील चिंताजनक वेगाने वाढत चालले आहे.
भौतिक विकासाची ही किंमत फारच महाग आहे !":🤣
[6/8, 9:00 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 200 !":👌
💐 "हाती घेतलेल्या कामाची जबाबदारी पूर्ण करून समाधान मिळवित रहाण्याची प्रव्रुत्तीच (Achievement Motivation) नवनवीन कार्य करण्याची अंत:प्रेरणा देत असते !":💐
मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४
" छाप(पड)लेले शब्द-E1 to 5 !":
👍"छाप (पड)लेले शब्द-E1 !":👌
💐"ह्रदयप्रत्यारोपण-'अश्रूंची झाली फुले !":💐
👍"एकीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खेडोपाडीचे तुम्हालाही लाज वाटावी असे चित्र समोर असताना मुंबईच्या KEM इस्पितळातील हृदय प्रत्यारोपणासारखी विक्रमी करामत जेव्हा होते, तेव्हा
'अश्रूंची झाली फुले !' असेच म्हणावेसे वाटते.
गेल्या 50/60 वर्षांमध्ये आरोग्यविषयक आणि तंत्रज्ञानविषयक जी गरुडभरारी घेतली जात आहे आणि संशोधनात्मक अनेकानेक किमया साध्य केल्या जात आहेत, त्यामुळे माणसांचे आयुर्मान जे केवळ 40 च्या आत घरात होते, ते आता 70 पर्यंत जाऊन पोहोचले आहे ही खरोखर भूषणावर गोष्ट आहे ! नवनवीन अशी मशीनस् आणि त्यांच्या वापराचे असामान्य कौशल्य प्राप्त करणारी डॉक्टर मंडळी, यामुळे विविध प्रकारची ऑपरेशन्स ही कोणालाही एकेकाळी बुचकळ्यात पाडू शकतील अशी होत आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे हे हृदयप्रत्यारोपण होय.
अवयवदानाचा सिलसिला मात्र अजून म्हणावा तितका वेग घेताना दिसत नाही, हेच या सोबतच्या वृत्तावरून मात्र समजते. कोणी एकेकाळी केवळ आय बँक म्हंणजे नेत्रदान हेच फक्त माहीत होते. त्या प्रकारे अनेक जण नेत्रदान करतही असत आणि अंधांना दृष्टी मिळत असे. पण आता एकेक ऐकावे असे नवलच घडत आहे, किडनी ट्रान्सप्लांट हा त्यातील एक अत्यंत वाढीला जाणारा असा प्रकार, त्या पाठोपाठ लंगड्या माणसांना कृत्रिम पाय जयपूर फुटाच्या रूपाने प्राप्त झाल्यामुळे लंगडेपण दूर झाले आहे. तसेच गोष्ट हात वा हाताची बोट वगैरे अशा प्रकारचे प्रत्यारोपण घडत आहे. एवढेच काय पण यकृताचेही प्रत्यारोपण करणे आता शक्य झाले आहे. पण माणसाचे हृदय म्हणजे त्याला जीव की प्राण असे वाटू शकणारा अवयव. ह्या हृदयप्रत्यारोपणामध्ये साहजिकच ज्या व्यक्तीचे ह्रदय, मृतावस्थेनंतर दिले, त्याचे नातेवाईक कौतुकास प्राप्त आहेत. ज्यांना मिळाले हे हृदय त्या व्यक्तीला तर नवीन जीवनदान मिळाले, हीच तर 'अश्रूंची झाली फुले' ची कहाणी आहे. अंधाऱ्या काळोखाच्या बोगद्या नंतर प्रकाशाला वाव आहे हेच या आधुनिक 'दधीची'ने दाखवून दिले आहे.
वैद्दकीय क्षेत्रात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहणार आहे आणि एकीकडे माणसांचे आयुष्य वाढत जाऊन, त्यांना सर्व प्रकारचे कृत्रिम अवयव कदाचित बाजारात मिळू शकतील अशी कल्पना आपण करू शकतो. जसे आपण टीव्ही माॅडेल बदलतो, प्रेशर कुकर नवीन आणतो, पंखे बदलतो त्याप्रमाणे माणसं आपल्याला हवा तो अवयव बाजारातून कदाचित घेऊ शकतील ! तो बसवण्याचे तंत्रज्ञान कौशल्य उपलब्धही होईल, अशी आपण आशा करू शकतो, हेच ह्या वृत्ताचे फलित म्हणावे लागेल. विश्वामित्राने जशी प्रतिसृष्टी निर्माण केली, त्याप्रमाणे आता माणूस कदाचित ते साध्य करू शकेल.
KEM मधील डॉक्टर आणि त्यांच्या समूहाला ह्या यशस्वी हृदयप्रत्यारोपणाच्या कामगिरीबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद तर द्यायला हवेत व त्यांचे शतशः अभिनंदन देखील करायला हवे !":👌
####@####@
👍"छाप (पड)लेले शब्द-2 E !":👌
💐" मुंबईतील 'नावलौकिक' मिळवणाऱ्या 'पाऊलखुणा' !":💐
👍" मुंबई शहर हे आज जसे आहे, तसे पूर्वी नव्हते. ते म्हणजे सात बेटांचे समूह असलेले होते. प्रथम पोर्तुगीजांचे असलेले हे शहर नंतर ब्रिटिशांना आंदण म्हणून राजपुत्राच्या विवाहानिमित्त मिळाले.
मुंबईच्या रस्त्यांना जो इतिहास आहे, त्यामधील 'नावलौकिक' मिळवलेल्या 'पाऊल'खुणांचा मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा लेखाजोखा महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीमध्ये नियमाने घेतला जातो, तो निश्चितच वाचनीय असतो.
अशाच काही निवडक 'पाऊल'खुणांचे दर्शन आणि ते रस्ते ज्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत त्या कर्तृत्ववान माणसांच्या, मुंबईसाठीच्या योगदानाबद्दल विस्ताराने माहिती, सोबतच्या वृत्तांमध्ये दिली आहे. आमच्या सारख्या मुंबईमध्ये सारे आयुष्य गेलेल्या व्यक्तींसाठी, तर ही माहिती पुन्हा प्रत्ययाचा आनंद देणारी अशीच आहे.
हा असा स्तुत्य उपक्रम सादर करणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !":👌
######
👍"छाप (पड)लेले शब्द-3E !":👍
💐" सेवाभावी चांगुलपणाची परिसीमा !":💐
👍"स्वार्थ हाच परमार्थ आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाचेच भले कसे होईल यामध्ये रममाण असणारा सध्याचा एकंदर माहोल ! माणुसकीचे वाळवंट करणाऱ्या
या वैराण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोबतच्या कहाणीमध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये आश्चर्यजनक असे चढ-उतार येऊनही एका विशिष्ट ध्येयाने स्वतःचे, पत्नीचे शिक्षण अनेक अडचणी येऊनही हे जोडपे ऐहिक उन्नती करते व स्वतःपलीकडे जाऊन सातत्याने समाजासाठी जे असामान्य सेवाभावी योगदान देते बघितले की मन थक्क होते.
'महा-अनुभव' जुलै24 मासिकातील श्रीमती वृषाली जोगळेकर यांनी डॉक्टर नितीन नायक आणि त्यांच्या पत्नी यांच्या विषयी, ही सोबतची कहाणी सादर केली आहे. कृतिशील आणि सेवाभावी अशा या दाम्पत्याचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
सगळीकडे निराशाजनक वातावरण असताना, ओअँसीस सारखी ही कहाणी संपूर्ण वाचल्यानंतर आपल्याला धन्य धन्य करणार यात नवल नाही !":👍
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
#######
"छाप (पड)लेले शब्द E-4 !"
" कोंडमारा करणारी रस्ते वाहतूक !"
मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्याने प्रवास करणे हे किती दयनीय आणि त्रासदायक झाले आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मडगार्ड टू मडगार्ड अशा तऱ्हेने गाड्या एकमेकांना भिडलेल्या, त्यात टू व्हीलर, थ्री व्हीलर यांची भाऊगर्दी आणि बेशिस्तीने चालणारे पादचारी, अशा अवस्थेत कोणत्याही चालकाने गाडी कशी चालवायची, हा एक खरोखर गहन प्रश्न आहे.
रस्त्यात पडलेले खड्डे, कुठल्याही गल्लीबोळात दोन्ही बाजूला पार्किंग केलेली वाहने आणि कुठेही कुठल्याही दिशेने मनमानीपणे वेळ पडली तर सिग्नल तोडून जाणारे दुचाकीस्वार, त्याशिवाय 'हीट & रन' च्या वाढत्या केसेस यामुळे सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे हे सत्य आहे. दुर्दैवाने कोणत्याही प्रकारची ठोस कृती केली जात नाही आणि 'जाने दो चालसे कल्चर' वर्षानुवर्षे चालू आहे.
पूर्वी ज्या प्रवासाला पंधरा मिनिटे लागायची, त्याला आता रस्त्याने जी काही कोंडी होते त्यामुळे कधी कधी पाऊण तास एक तास ही लागू शकतो. गंभीर आजारी माणूस असला, तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना काय ताण-तणाव निर्माण होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी.
सोबतच्या वृत्तामध्ये वाहने वाढली आणि एकंदर धोरण कोलमडले याचे वृत्त आहे. जी मुंबई शहराची अवस्था त्याहून कदाचित अधिक त्रासदायक इतर शहरांच्याही रस्ते वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा ! याला विकास म्हणायचे? याला नियोजन म्हणायचे ? दुर्दैव असे की कुणालाच त्याचे काहीही वाटत नाही.
जिथे फूटपाथ वर फेरीवाले नाहीत, तिथेही फुटपाथवरून न चालता रस्त्यावरून चालणारे नागरिक, तसेच सिग्नल जिथे आहे तिथेच खरं म्हणजे रस्ता क्रॉस करणे अत्यावश्यक आहे. परंतु आपल्या इथे कोणीही कुठेही केव्हाही रस्ता क्रॉस करतो. त्यामुळे वाहन चालकाची त्रेधातिरपीट न झाली तरच नवल ! प्रगत देशात किती काटेखोरपणे सारे कायदे पाळले जातात आणि नागरीकही शिस्तीने वागून त्यांना साथ कशी देतात ते आता वेगळी सांगायची गरज नाही.
सुरुवात प्रथम नागरिकांपासून सुरू झाली पाहिजे, त्याचप्रमाणे टू व्हीलर चालवणारे यांनी अधिक जबाबदारीने आणि शिस्त पाळून प्रवास केला पाहिजे. चार चाकीवाला कुठे चुकला, सिग्नल मोडला व इतर काही, तर त्याला जशी दंडाची शिक्षा होते, त्याचप्रमाणे शिस्त न पाळणाऱ्या पादचार्यांवरही आणि टू व्हीलर वाल्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
नागरिकशास्त्र फक्त शाळेत विकून नंतर विसरले जाते हे देखील एक दुर्दैवच. साहजिकच घरातून बाहेर पडलेला सुखरूप घरी येईल की नाही याची चिंता सर्वांनाच होत असते. ही परिस्थिती खरोखर आणीबाणीची आहे. वेळीच त्यावर काही ना काहीतरी ठोस कृती केलीच पाहिजे. वेळ पडल्यास जसे 'घरगुती गॅस' वर
पुरवठ्याबद्दल नियंत्रण आहे, त्याचप्रमाणे नव्या वाहनांची परवानगी देतानाही नियंत्रण ठेवले गेले तरच काही सुधारणा होण्याची आशा आहे.
#######
👍"छाप (पड)लेले शब्द-5E !":👌
👍"कालाय तस्मै नमः !
"कथा कुणाची व्यथा कुणा!":👌
कोणे काळी मुंबईमध्ये सकाळी प्रत्येक घरोघरी जवळच्या 'आरे दूध केंद्रां-वर जाण्याची लगबग असे, प्रत्येकाजवळ त्यासाठी एक धातूचा बिल्ला तो म्हणजे जणू त्याचे दुधासाठीचे रेशन कार्ड असे. हे कार्ड दाखवून सीलबंद दुधाच्या बाटल्या असलेल्या घेऊन प्रत्येकजण घरी जात असतात. ह्या बाटल्या सीलबंद असल्यामुळे भेसळी ची शक्यताही नसे आणि शुद्ध दुधाचा पुरवठा 'होल' आणि 'टोंड' अशी नांवे असलेला केला जात असे. बाटल्यांचा अजून एक उपयोग असा असेल की त्यामध्ये सत्यनारायणाच्या वेळी केळीचे खांब सुलभतेने ठेवता येत असत.
अर्थात तेव्हाही पूर्व व पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणच्या गुरांच्या गोठ्यां/तबेल्यांमधून खाजगीरीत्या दूध पुरवठा करणारेही होते. पण लवकरच white revolution ची क्रांती दुधाचा पुरवठा जणू महासागरासारखा करणारे गुजरात मधील 'अमूल' रुपी प्रकल्प उभे राहिले, तसेच महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर विविध जिल्ह्यांमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी दूध पुरवठा करणाऱ्या 'वारणा' 'गोकुळ' 'चितळे' इत्यादी संस्था निर्माण झाल्या. पाहता पाहता मुंबईच्या आरे कॉलनीमधून दूध पुरवठा करण्याला ओहोटी लागली आणि आता तर जवळजवळ ती बंद झाल्यासारखी जमा आहे.
काळ कसा बदलतो त्याचे हे चित्र आहे. या साऱ्याचा परिणाम गुरांचे गोठे अथवा तबेले असणाऱ्यांवर अर्थातच कसा झाला ते उलगडून दाखवणारे सोबतचे वृत्त आहे. सारा आर्थिक दृष्ट्या व्यवहारच आंतबट्ट्याचा होऊ लागल्यामुळे हे तबेले जवळजवळ बंद झाले आहेत किंवा त्यांना मुंबई बाहेर नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शेवटी स्वच्छता, जमिनीच्या गगनभेदी किंमती, पर्यावरणावरील परिणाम आणि आर्थिक गणित या साऱ्याच्या दुष्परिणामांची ही दुर्दैवी कहाणी आहे.
शेवटी,
'कालाय तस्मै म:' आणि
'कथा कोणाची व्यथा कुणा !'
असेच म्हणावयाचे दुसरे काय ?
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
🤣" घडू नये ते घडतंय!":🤣
🤣" घडू नये ते घडतंय!":🤣
😇 "वर्तमानपत्र वाचतो तो किंवा दूरदर्शन वर बातम्या पाहत असतो पण पण दुर्दैव असे पुष्कळ वेळा गुन्हेगारी, अयोग्य अशा तर्हेची वर्तणूक, फसवणूक वा घोटाळे अशाच बातम्या सातत्याने पाहायला वाचायला ऐकायला मिळतात. या लेखात अशाच काही निवडक वा बातम्यांचा आणि त्यामागच्या विचित्र अशा वास्तवतेचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे.
नीतिमत्ता पूर्णपणे ढासळत चाललेली आहे आणि साहजिकच समाज आपली पूर्वापार आलेली आदर्श अभिमानास्पद संस्कृती विसरत चालला आहे याचा खेद वाटतो.
# ही वर्तमानपत्रातील एक बातमी वाचनात आली: "स्वतःच्या वाहनांना दुसऱ्याच वाहनांच्या नेम प्लेटस् लावून, वहाने चालवणारे, कित्येक महाभाग, वाहतुकीचे नियम बिनदिक्कतपणे मोडतात. त्यामुळे वाहतूक विभागातर्फे फोटो काढून ई चलान भलत्याच वाहन चालक मालकाकडे जाते आणि त्यामुळे
"कथा कुणाची व्यथा कुणा !"
अशाप्रकारचा असा प्रकार होऊन, निरपराध वाहन मालकांना नाहक भुर्दंड, त्रास आणि नसत्या संकटाला तोंड द्यावे लागते." असा त्या बातमीचा सारांश.
हे असे होत रहाणे, याचा अर्थ माणसांची नैतिकता ढासळते आहे, "आपल्यामुळे दुसऱ्याचे भले जरी झाले नाही, तरी नुकसान होऊ नये" हा साधा सर्वसाधारण सार्वजनिक जीवनाचा नियम पाळताना जसं दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्या चुकीची किंमत, दुसऱ्याने दिली तर चालेल, असा निर्लज्जपणा या मंडळींकडे असतो असेच म्हणावे लागेल.
ही गुन्हेगारी पद्धतीची मानसिकता कशी येते, हे कोडे आहे. थोडे पैसे वाचवण्यासाठी आणि हवी तशी वाहनं, चुकीचे नियम न पाळता चालवायची उर्मी, यापायी हा सावळा गोंधळ होतो. उगाचच निरपराध वाहन मालकांना खेटे घालावे लागतात, किंवा दंड कारण नसताना भरायला लागतो. त्यासंबंधीची तक्रार निवारण व्यवस्थाही तितकी कार्यक्षम नाही, असेही या बातमीत म्हटले आहे. कुठून कुठे चाललो आपण? असंच म्हणावं लागेल. वाहन असणारी ही मंडळी एक प्रकारे 'आहे रे'वालेच आणि त्यांना अशी दुर्बुद्धी दुसऱ्याची नेम प्लेट लावण्याची व्हावी याला कलियुग म्हणायचे दुसरं काय ?
# मोबाईलवरती करामती करून अनभिज्ञ, अजाण अशा नागरिकांना कुठलीतरी लिंक उघडायला लावायची, ओटीपी घ्यायचा आणि आणि बँक खात्यातून भली मोठी रक्कम काढून त्यांचे नुकसान करायचे अशा तऱ्हेचे ऑनलाइन आर्थिक गुन्हेगारीच्या बातम्या आपण सातत्याने ऐकत वाचत असतो. ही कुठली मानसिकता? ही सुद्धा चोरीच नव्हे कां? काम न करता, ऐदीपणाने फसवणूक करून, पैसे मिळवायचे, हे उद्योग कोण करते? त्यांच्यावर कशा तर्हेचे संस्कार त्यांच्या पालकांनी केले? असे वाटते. येनकेनप्रकारेण झटपट श्रीमंती मिळवणे, ही प्रवृत्ती वाढत चालली आहे आणि ती भयावह आहे, असेच यावरून म्हणायचे !
# ऑनलाइन विवाहजुळणीच्या साईटस् हा आधुनिक विवाह जुळवण्याचा प्रकार कधी कधी अनेक निरपराध निष्पाप तरुणींच्या अंगाशी येतो. अशा तऱ्हेचे फसवणुकीचे अनेक अपराध बातम्यांमधून आपण वाचतो. खोटेनाटे माहितीचे आवरणाखाली आर्थिक फसवणूक कधीकधी केली जाते. तर विवाह न करून फसवणूक होऊ शकते अथवा शारीरिक संबंध ठेवले जाऊन आयुष्याचे अभागी अश्राप तरूणींचे मातेरे होते. पूर्वी ओळखीमध्ये विवाह केले जायचे किंवा पंचक्रोशीतीलच स्थळ निवडले जायचे. पण आता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण कुठून नको तिकडे चाललो आहोत, हेच या अशा बातम्यांवरून आपल्याला ध्यानी येते. त्यापायी जशी फसलेल्या मुलींबद्दल करुणा वाटते, त्याचप्रमाणे अशी नालायकपणाची नीच कृत्ये करणाऱ्या नराधमांना, जबर शिक्षा वेळीच झाली पाहिजे असेच मनात वाटते. शेवटी पुढे या सगळ्या प्रकारांचे काय होते, ते कधीच आपल्याला नंतर कळत नाही, हे दुर्दैव !
# कुठल्याही क्षेत्रात निष्ठेने कर्तव्यपूर्ती ही आपली अत्यावश्यक जबाबदारी आहे, हेच सध्या विसरले जाते. हक्कांबद्दल मात्र हिरहिरीने आंदोलने किंवा इतर मार्ग अवलंबिले जातात. पण आपल्यावर जी जबाबदारी आहे, ती चोखपणे पार पडणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. असे वाटायला लावणारी एक बातमी वाचनात आली. 'मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील ग्रंथालयात योग्य ती व्यवस्था न केल्यामुळे व तितकी बारकाईने कामे न केल्यामुळे दुर्मिळ ग्रंथ वाळवी खात पडले आहेत' अशा तऱ्हेची ती बातमी होती. शिक्षणाच्या मंदिरात जर पुस्तकांची ही अवस्था आणि तशी ती अवस्था करणारे बेभरवशाचे बेमुर्वतखोर कर्मचारी आणि एकंदरच सडत चाललेली यंत्रणा, बहुदा वेगवेगळ्या ठिकाणीही आपल्याला अनुभवास येते. पगारवाढ हवी, सुट्ट्या हव्यात पण त्याप्रमाणे आपली कर्तव्ये पार पडणे मात्र दुर्लक्षित व्हावे, या मानसिकतेला काय म्हणावे?
शेवटी या सगळ्या बातम्या आपल्याला व्यथीत करतात, पण आपण सामान्यजन हतबल असतो.
# "चिंताजनक सद्दस्थिती":
एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता अशा चक्रव्यूहात शास्वत विकास पुरता अडकला आहे. जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होणार हे निश्चित.
सिस्टिम वा यंत्रणा आणि माणसांची मानसिकता बदलणे केवळ अशक्य असते समाजाचा हा जो ऱ्हास दिवसेंदिवस वेगाने होत आहे तो कुठे घेऊन जाणार हा यक्ष प्रश्न आ वासून आपल्या सर्वांसमोर उभा आहे एवढेच म्हणावयाचे !":😇
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)