रविवार, १९ मे, २०२४

परिक्षे'चा 'निकाल'!": "Beginning of the End?."

वाचा आणि विचार करा.. "परिक्षे'चा 'निकाल'!": "Beginning of the End?." कधी नव्हे ती एकदाची परीक्षा आता लौकरच संपणार. ह्या वेळेस एक बरे होते, परिक्षेसाठी 'सात पेपरां'मध्ये तयारी करायला भरपूर दिवसांचा वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची. जन्मानंतर म्रूत्यू जसा अटळ, तसंच ह्या परिक्षेनंतर 'निकाल-ही अटळच! आता हुरहुर, काळजी व धागधूग सुरू झाली. केव्हां एकदाचा तो निकालाचा दिवस येतो, अशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नव्हे, तर परीक्षकांच्या सुद्धा मनात खळबळ, रुखरुख सुरू आहे. ही परीक्षा खूपच आगळी वेगळी होती. विचारलेल्या प्रश्नांना सोडून, हुशार विद्यार्थ्यांनी काहीबाही उत्तरे देणेच पसंत केले, त्यात नको नको त्या शब्दात उखाळ्या पाखाळ्या अधिक होत्या. हुशार मुलांनी आणि त्यांच्या मॉनिटरनी वर्षभर अभ्यास सोडून अक्षरश: उनाडक्या केल्यामुळे त्यांच्यापाशी दुसरे काहीच उरले नव्हते. बिचारी मागच्या बाकावर बसणार्या तथाकथित ढ मुलांपैकी जे जे विषयाला धरून उत्तरे द्यायचे प्रयत्न करत होते, त्यांनाही आपल्या निकालाची खात्री नाही. खरोखर अशी परीक्षा, पूर्वी कधीही झाली नाही आणि पुढेही कधी होऊ नये. विषयांना धरुनच ह्या पुढे 'परिक्षा' रितसर होणेच, सगळ्यांच्या हिताचे आहे. शेवटी निकाल लागायचा तो लागेलच, परंतु तसा कोणताही 'निकाल' लागला, तरी शेवटी परीक्षकांचीच गोची होणार, हे उघड सत्य आहे! ###################### "भक्तीतून शक्ती?": भक्ती ही संपूर्णपणे वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे व असावी. परंतु तिचे जर प्रदर्शन मांडले गेले आणि त्यातून ते प्रदर्शन जर सार्वजनिक रित्या आधुनिक प्रसार माध्यमातून प्रसारित केले गेले तर, ते तितकेसे योग्य कां अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवायचे. मात्र अशा प्रकारची कृती केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी असू शकते हे मत, कदाचित खोडता येणार नाही. आपल्या जवळच्या सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करता येऊ शकते आणि त्याचा मुद्दामून उपयोग करणे हेही खरेच. परंतु तितकेसे रास्त असते कां? अर्थात् जेव्हा वैयक्तिक सामर्थ्य आणि स्वार्थ कसाही करुन साधण्याची प्रवृत्ती अंगात असेल, तेव्हा अशा प्रकारचे प्रदर्शन करणे भूषणावह आहे असेच समजून ते केले जाते. काळाचा महिमा दुसरं काय! परंतु परिस्थिती बदलू शकते आणि तेव्हां मागे वळून पहाताना तर, हे खेळ अखेर हास्यास्पदही ठरू शकतात, ह्याचे भान ठेवणे अत्यावश्यक होय. ###################### 👍"बोल, अमोल !":👌 "सध्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता लोकसेवक म्हणून राजकारणात मिळविण्यासाठी, CET वा NEET प्रमाणे केंद्रीय प्रवेश परीक्षा घेतली जावी आणि त्यामध्ये नीतिमत्ता, विश्वासार्हता, निष्ठा, निस्वार्थता आणि जनहितकारक सेवावृत्ती यांची तपासणी केली जावी. कुठल्याही शैक्षणिक कोर्सकरता अथवा शासकीय, खाजगी नोकरी करता जर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर समाजाचे, देशाचे भवितव्य घडवण्याची निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आपण देणार, त्यांचे चारित्र्य बावनकशी असलेच पाहिजे. तेच जाणण्यासाठी अशा केंद्रीय प्रवेश परीक्षेची अत्यावश्यकता आहे. तरच कदाचित राजकारणाला योग्य ते वळण मिळून विकास व प्रगती साधली जाईल. After all one must remember: "When Character is Lost, Everything is Lost !" ###################### अखेरचे हे भयावह वास्तव... 😂😂😂😂😂😂 1 अंध भक्तगण किती एकांगी, पूर्वग्रह दूषित द्रुष्टिकोन ठेवून त्यांच्या छुप्या मनसुब्यांची पाठराखण करतात, ते ह्यावरून ध्वनित होते आणि हेच देशाचे दुर्दैव आहे !" Ii इत्य अलम् ii 🤗🤗🤗🤗 2 देशांतर्गत जी मंडळी केवळ सत्तेसाठी धाकधपटशा दाखवून व इतर काही अनुचित माध्यमातून आपल्या विरोधकांना नमवून, आपल्या समवेत घेण्याचे राजकारण करतात, त्यांचे कसले व कां गोडवे गायचे? महाराष्ट्रातील उदाहरण अशोभनीय नव्हे काय? 🤗🤗🤗🤗🤗 ह्या सर्व मल्लिनाथीनंतर आपणास काय वाटते ?.... धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा