रविवार, १९ मे, २०२४
@बिंब-प्रतिबिंब:"प्रतीक्षा अवताराची !":👌 "
बिंब:
👍"प्रतीक्षा अवताराची !":👌
"सध्या राजकारणाचा चिखल झाल्याने, मतदान न करणे हा निर्णय मला योग्य वाटतो, कारण दोन्हीही बाजू विश्वासार्ह नाहीत. ह्यामुळे मी मतदानास गैरहजर राहण्याचे ठरवले आहे. NOTA चा देेखिल अंतिम अर्थ तोच होतो.
जोपर्यंत चारित्र्यवान निष्ठावान समाजहितैषी, निस्वार्थी माणसेच राजकारणात जरूर ती CET सारखी परीक्षा देऊन येत नाहीत, तोपर्यंत तसे घडवून आणणार्या विभूतीची- जणू दहाव्या कलंकी अवताराची आपल्याला प्रतिक्षा करावी लागेल !":
PLEASE REMEMBER:
'When Character is Lost,
Everything is Lost !'
//प्रतिबिंब
CET सारखी परिक्षा राजकारणात येणे अवघडच. जगात कुठेही तसे होत नसते.
मत वाया घालवून काहीच साध्य नाही. त्याउलट NOTA टक्केवारी नोंद झाल्यास, चिखलात राहणाऱ्यांना देखील मंथन करावेच लागेल.
//बिंब:
कुुठेेही होत नाही, असे नकारात्मक विचार कशाला करायचे?
कोणत्याही नवीन संकल्पना या आधी अशाच कठीण वाटतात, एडिसनचे उदाहरण मनात ठेवा, हजारो प्रयोगांनंतर तो विजेच्या दिव्याचा शोध लावण्यात यशस्वी झाला. अश्मयुगापासून आजतागायत जी प्रगती होत गेली, तिचा विचार करा कठीण काहीच नसते. स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे हे आज ना उद्या तरी कुुणाकडूून घडतेच घडते.
सर्व जनमानसाने या संकल्पनेचा जर मनापासून पाठपुरावा केला, तर योग्य ते घटनात्मक बदल घडून ते प्रत्यक्षातही येऊ शकेल. तसे झाले, तर भारतातील लोकशाही ही जगातली सर्वोत्तम आदर्श लोकशाही ठरेल.
//प्रतिबिंब:
आपले मत वाया घालवून, घरी बसून, प्रार्थना करून म्हणजेच सहभाग न घेता काही साध्य होत नसल्याचे टिळक, सावरकर, चाफेकर, गोखले, रानडे आणि हेडगेवार इत्यादी इसमांनी वाट दाखवली आहे.
// निष्क्रिय न बनता मी संकल्पना दिली आहे आपल्या प्रतिपादनामुळेच असे असेच विभूती अवतार निर्माण होतील हे सिद्ध होते
//प्रतिबिंब:
नकारात्मक नसून हा वास्तववादी विचार आहे. काही शतकांहून अधिक फ्रेंच, नंतर ब्रिटिश तसेच पुढे अमेरिकन घटनेत देखील ह्याचा विचार नाही. ह्या देशातील तसेच भारतीय रजघटनेच्या दिग्गज तज्ज्ञांनी चिंतन करूनही किंवा खुद्द टिळक, रानडे आणि हेडगेवार अश्या मंडळींना आवश्यक वाटले नाही त्यावर हट्ट धरून मत फक्त वाया जाईल. मत देणे आणि CET हे दोन वेगळे विचार आहेत.
//बिंब:
राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि गुंडगिरी अपेक्षित असेल तर बोलणेच खुंटले. आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर अशा तऱ्हेचे गेम चेंजर बदल घडवावे लागतील.
अखेरचा सवाल:
राजकारण हा बिन भांडवली, कुठल्याही प्रकारची अर्हता असण्याची आवश्यकता नसलेला, सगळ्यात फायदेशीर धंदा बनला आहे, हे दुर्दैव नव्हे कां?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा