रविवार, ७ एप्रिल, २०२४
@चिंताजनक भकास विकास ?":😇
😇 "चिंताजनक भकास विकास ?":😇
🤣 "6 जानेवारीच्या महाराष्ट्र टाइम्स मधील वाढत्या बेरोजगारी संबंधीचा अग्रलेख, त्याच दिवशी 46 पानांचा वर्तमानपत्र नव्हे तर जाहिरात पत्र असलेला महाराष्ट्र टाइम्स आणि नंतर 7 जानेवारीच्या पुरवणीत तर 'कोट्याच्या फॅक्टरीतले काटे' हा डोळ्यात अंजन घालणारा, डाॅ श्रीराम गीत ह्यांचा लेख, असे एकापाठोपाठ वाचायला मिळाले आणि मन अक्षरश: व्यथीत झाले. ह्या तिन्ही गोष्टींमागे खूप काही दडलेले आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे असे वाटून गेले.
😇 "करा, बरं विचार ! ":😇
🤣 "चिंताजनक महागाई, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दयनीय स्थिती या ज्वलंत समस्यांपासून पळ काढून, इतर आभासी विषयांवर आधारित प्रचार करणे, हा संभाव्य धोक्यापासून पळण्याचा मार्ग असूू शकतो कां ?":🤣
स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थव्यवस्था मुक्त केल्याचा 1991 मधला क्रांतिकारी निर्णय, त्यामुळे उत्तरोत्तर झालेली भौतिक प्रगती निश्चितच डोळ्यात भरून येण्याजोगी. परंतु त्याचे आता दुष्परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवायला मिळत आहेत, असेच या तिन्ही गोष्टी सांगतात. त्या निर्णायक धोरणबदलानंतर जीवनशैली जीवनदृष्टी, जीवन तत्वज्ञान यामध्ये क्रांतिकारी बदल मुक्त अर्थव्यवस्थेनंतरच झाले. पैसा हेच सर्वस्व बनले आणि भौतिक ऐहिक प्रगती चंगळवाद उपभोगवाद वाढत गेले, हे सत्य नाकारता येणार नाही. पालकांच्या आपल्या मुलांसंबंधीच्या अपेक्षा वाढत गेल्या, त्यांच्यावर त्या लादल्या गेल्या आणि म्हणूनच कोट्याच्या फॅक्टरी सारखे तरुण मुलांच्या आत्महत्यांचे काटे समाजाला रुतायला लागले. राजकारणाचा तर संपूर्ण बाजार झालेला आपण बघतच आहोत. मानसिक स्वास्थ्य नष्ट तर नक्कीच झाले आहे, जीवघेण्या स्पर्धेपायी ताण-तणाव वाढतच आहेत. त्यामुळेच जगामध्ये आनंदी माणसांच्या वर्गवारीत आपल्या देशाचा 126 वा इतका खाली नंबर गेलेला आहे. हे कशाचे लक्षण आहे, याचा सखोल अभ्यास करायलाच हवा.
आर्थिक धोरणे मूलभूत यामागे कारणीभूत आहेत, श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहेत आणि 'नाही रे'वाले, हे 'आहे रे' वाल्यांपेक्षा प्रचंड गतीने वाढत आहेत. वाढत्या संख्येने माणसांना रोजगार देण्यापेक्षा, ऐंशी कोटी लोकसमूहाला पाच वर्ष फुकट जरुरीचे अन्नधान्य पुरवण्याची रेवडी कशाकरता दिली जात आहे? ह्याला कुठला विकास म्हणावयाचे? की निवडणुकीसाठी दिलेला लॉलीपॉप!
शिवाय समाजामध्ये आदर्श आहेेतच कुणाचे अन् कुठले? समाजातील माणसांची नैतिक बांधिलकी संंपूूर्ण नष्ट झाली आहे, हेही खरे. मी आणि माझे कुटुंब यांची फक्त प्रगती व्हावी कशाही प्रकारे आणि तीही लवकर या मनोवृत्तीमुळे माणसांची बेटे बनत चालली आहेत.
एकीकडे भौतिक प्रगती होत असताना नैतिक मूल्ये रसातळाला जाणे हे इष्ट नव्हे.
🤣 "आपल्या गुणांवर,योगदानांबद्दल प्रभावशाली बोलणे शक्य नसल्यामुळे, केवळ विरोधकांच्या चुकांवर सातत्याने
बोलणाऱ्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाहीत !":🤣
# पहिली समस्या या सगळ्या मागची म्हणजे वाढती लोकसंख्या. त्यामानाने जी उद्योग व्यवसायांची प्रगती योग्य पद्धतीने आणि दिशेने व्हायला हवी ती न होणे.
# वाढता भ्रष्टाचार, कारण त्यामागे ओरबाडून घेण्याची, पैसा हेच सर्वस्व मानण्याची प्रवृत्ती हेच होय.
# पालकांना मुलांना कसे वाढवावे याचे प्रशिक्षण तर द्यायला जावे आणि त्यांच्या बरोबर समुपदेशन करायला हवे अशी वेळ आली आहे, कारण लेखात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षा या अशा तरुण जीवांच्या आत्महत्या अधिक तर आहेतच, पण त्यांचा दूरगामी वाईट परिणाम नक्कीच होणार आहे.
# याशिवायही अनेक कारणे सद्यस्थितीतील भयावत बयावतेला कारणीभूत आहेत त्यांचा सखोल शोध घेऊन अभ्यास करायला हवा, उपाय वेगाने प्रत्यक्षात यावेत.
# विचारवंत, मानसोपचार तज्ञ, सुसंस्कृत राजकारणी आणि समाजातील आदर्श मान्यवर या साऱ्यांनी एकत्र येऊन समस्यांवर योग्य ते उपाय शोधून ते अमलात सत्वरतेने आणायला हवेत.
नाही तर....
विकास विकास असा ढोल जरी कितीही बडवत राहिला, तरी भवतालाचा मूलभूत गाभा किती भकास आहे याचेच हे सारे लक्षण आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल !:🤣
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा