गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 3":

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 3": "बिंब": मूळ संदेश: "आई कुठे काय करते" मालिकेत काही नव्यानं सांगण्यासारखं काहीही घडत नाही व तोच तोपणा आला आहे. ती बंद करणे श्रेयस्कर. "प्रतिबिंब किंवा प्रतिसाद": या संदेशाला उत्स्फूर्त अनेक प्रतिसाद आले त्यातील काही निवडक येथे सादर करीत आहोत: 1 बहुतेक सर्व मालिका अति लांबवून कंटाळवाण्या केल्या आहेत. 2 मालिकानांही आता भागांची मर्यादा घालयला हवी. एखाद प्राधीकरण नेमायला हवे 3 सर्वच्या सर्व मालिका छुपा अजेंडा म्हणून चालवल्या जात आहेत. 4 आम्ही एक सुद्धा मालिका बघत नाही, किती ही महिन्याने बघीतले तरी तिथेच फिरत aste 5 केबल कनेक्शन घेऊ नका बहुसंख्येने जर हे झाले तर होईल,मग जाहिराती कोण बघणार मग बंद होतील आपोआप,पण आधी केलेची पाहिजे 6 मालिका बघतच नाही हो आम्ही 7 केबलचे पैसे भरून आपण हा अन्याय का सहन करायचा? 8 ती मालिका आपल्या घरी कुणी बघत नाही पण चुकून कधी तो चॅनल लावला आणि दर्शन झालेच तरी एपिसोड लगेच कळून येतो कारण कुणी ना कुणी काहीतरी लफडे केलेले असते.. आता फक्त आप्पा आणि आजी यांचे बाहेर काही उद्योग दाखवले की मालिका बंद करतील बहुतेक.. त्या दोघांचे उद्योग pending आहेत आता.. किंवा अरुंधती ने तरी तिसरे लग्न करावे.. असाच कधीतरी चुकून चॅनल लावल्यावर कळेल.. 9 Bhikardi malika 10 पिंडे पिंडे मतीर्भिना:| 11 जवळपास सगळ्या मालिकांचे हेच झाले आहे. म्हणून तर ग्रूप काढलाय! 12 इतके दिवस चालणाऱ्या मालीकाच नकोत 14 Tya malike madhe day 1 pasun kahich sangnya sarkhe navte😂😂 15 प्रायोजकांनी स्पाँसर केलय तितके दिवस ते दाखवतील ते बघावच लागेल.बाकी श्रोत्यांच्या मताला काडीचीही किंमत नाही. 16 अजून आजी अप्पा यांचा divorce आणि सुलेखा ताईचं लग्न, नितीन च्या न दाखवलेल्या बायको बरोबर divorce. खूप खूप राहिलंय. 17 करा बंद. आमची काहीही हरकत नाही तुमचा टिव्ही तुमचा रिमोट.... 18 इतकी irrelevant serial चालली आहे. बघूच शकत नाही 19 Tich kai...saglya band kelya tari chalel. Pithachya girni sarkhe Dhalan dalat rahtat. Rojgar Hami yojna.. 20 म्हणजे आपण अजून बघताय? 21 ईशा सुधारली दाखवा आणि मालिका संपवा. एवढी मूर्ख मुलगी कुठे असेल? 22 You have option to stop watching. But if you wish to watch Madhurani then she is not working any other serial 23 😜😜अनेक आहेत अशा serials 24 बघूच नयेत त्यापेक्षा योगासन करा 25 बरोबर आहे. 26 नाव आई कुठे काय करते आणि त्या मध्ये तर सगळं आईच करतेय जे अशक्य आहे ते पण आई करताना दिसते 27 तुमच्या सहनशीलतेला दंडवत. किती अत्याचार सहन करता. आमच्यावर हे अत्याचार होत नाही कारण आमच्याकडे टि.व्ही च नाही..... 28 Don't waste your time in watching Marathi serials. Language, crime, Superstition are presented & we as most wise personal wasting our time as well as peace of mind. Read some books, it will give a stability & many more. ITS MY PERSONAL VIEW, U PEOPLE MAY NOT AGREE 🙏🏽 29 ती व अशा मालिका बघणे बंद करणे जास्त श्रेयस्कर! मनोरंजनाला अनेक पर्याय असतात! 30 त्या मालिकेत अरुंधती, अप्पासाहेब, यशगंधार, अनघा एवढीच पात्र आहेत की ज्यांचा आदर्श घ्यावा. बाकी सगळे अनादर्शक आहेत. त्यातही कांचन, ईशा, अभिषेक हे कधीही न सुधारणारे आहेत. त्यातही अनघा एवढी समजूतदार कोणी सापडणार नाही. आता कांचचा हत्ती स्वभाव ईशाने उचलला असावा. आरोही पण छान भूमिका आहे. यशगंधार सर्वांनाच आवडावा असाच आहे. मालिका संपवा नाहीतर त्यालाही बाधा होईल. 31 तुम्ही बघणे थांबवा, TRP घसरेलंआणि मालिकाआपोआप बंद होईल. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की, हीच मालिका नव्हे तर बहुतेक सर्व टीव्हीवरील मराठी मालिका या कशाही बरकटत चाललेल्या आहेत आणि हा प्रकार खरोखर कधी ना कधी थांबायला हवा. t20 सामन्याप्रमाणे मालिकादेखील 13 26 जास्तीत जास्त 52 इतक्याच भागांच्या असाव्यात. अर्थात हे कोण ऐकणार आणि कसं होणार हा ही प्रश्न आहेच. पण इतक्या भरघोस प्रतिसादाचा अर्थ एवढाच की, सुरुवातीच्या काळात जितके उत्तमोत्तम कार्यक्रम आणि मालिका दूरदर्शनच्या पडद्यावर येत होत्या, ते सारे आता पूर्ण बंद झाले आहेत आणि प्रगतीपेक्षा अधोगतीच वेगाने होत आहे. धन्यवाद सुधाकर नातू

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 2":

"बिंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 2": "बिंंब-मूळ संदेश": "MTNL चा बट्टयाबोळ करून टाकला आहे. बहुतेकांनी LL phone परत केले आहेत. दोन महिने माझाही LL फोन डेड होता, मी देखील परत दिला. ऑफिसेस रिकामी जवळ जवळ. आजच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणीत mtnl mb ची Sim cards 2 महिने न मिळाल्याने ग्राहकांचे किती हाल होत आहेत ती बातमी चिंताजनक आहे." नव्या policies कसल्या काढता, हे असे खाजगी सेवा देणार्या कंपन्यांचे भले करणारे उद्योग कशासाठी? "प्रतिबिंब": 1 अनंंत: बंद करायचे आहे. 2 सिद्धेश: MTNL चि सेवा चांगली कधी होती ? त्याला कायमच लोक Mera Telephone Nahi Lagta म्हणत आलेत लोक. 3 श्रीप्रसाद: अजून MTNL जीवंत आहे?? 4 सुधीर: उगीच प्रायव्हेटला दोष देवू नका.गेले काही वर्षे दिल्ली सरकार अखत्यारीतल्या कंपन्या घोडदौड करत आहेत.NTPC,ONGC,PFC,PTC,NHPC,SJVNL,Coal India,BHEL,Mazgaon dock,Cochin shipyard,HAL आणि काही!! 5 विजयदत्त: आम्ही एमटीएनएल चे भावंडं असलेल्या बिएसएनएल चे लॅंड लाईन वापरत होतो. सेवेच्या दर्जाला कंटाळून बंद केला. सरकारी आस्थापन असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांचे लोकांंना सेवा देणे हे आपल्या खासगी कामधंद्यातुन वेळ मिळाला तर करण्याचे काम होते. 6 उदय: माझं ट्रम्प चं म्हणजे mtnl चच कार्ड होत. पण त्याला mtnl च्या ऑफिस मधेच सिग्नल मिळतं नसे. (बोरिवली mtnl office) म्हणून इतर कार्डकडे वळावं लागलं. 7 विजयंता: दिल्ली ला आम्ही त्याला मेरा टेलिफोन नही लगता म्हणायचो.

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

"रंग-बेरंग !":

"रंग-बेरंग !": प्रत्येक कल्पना ही वेगळी असते, नवीन असते तसेच तिचे प्रयोजनही आगळे वेगळे असते. साहजिकच त्या कल्पनेचे मूर्त स्वरूप काय आहे, हे समजण्यासाठी त्याला शीर्षकही चपखल द्यावे अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणे आता माझ्या मनात, जे घडतं, जे वाचतो वा पहातो किंवा ऐकतो, आपण जे अनुभवतो त्यामधलं काळं गोरं किंवा खट्टा मीठा काय असू शकेल, याचा उहापोह करणारा ऐवज आपण लेखाच्या स्वरूपात सादर करावा, अशी कल्पना माझ्या मनात आली. बघता बघता पहिलं स्फूट तयार झाल्यावर त्याला नांवही अचूक असं मिळालं 'रंग-बेरंग' ते चपखल कां, ते तुम्हाला पुढील पहिल्या पुढील नोंदीवरून लक्षात येईल: # "अती तिथे माती !" एका नामवंत अभिनेत्याची धावपळ आणि त्यासाठी त्याने केलेले प्रवास व घेतलेले श्रम याचे वृत्त नुकतेच वाचायला मिळाले. सध्या गाजत असलेली एक टीवी मालिकेचे चित्रण, व्यावसायिक नाटकाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे प्रयोग आणि त्या जोडीला नव्या प्रायोगिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असे त्रिस्थळी कलाविष्काराचे क्षण खरोखर त्याचे कौतुक करावे असेच निश्चित होते. पण यश मिळत असतं त्या वेळेला, आपल्याला भान राहत नाही आणि आपण ते यश प्रसिद्धी आणि त्यातून होणारी आर्थिक समृद्धी यामागे धावत सुटतो. अर्थात कोणी किती धावायचे याचा विचार ज्याचा त्याने करावा असेच या वृत्तावरून वाटले. त्याचे कारणही तसेच होते, नुकताच तसा तरुण असलेल्या श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्याचे वृत्त ताजेच होते. त्यामुळे कुठे धावायचे, किती धावायचे याचे भान सर्वांनीच विशेषत: कलावंतांनी ठेवायला हवे असेच मनात आले, अखेरीस 'मॉडरेशन इज द की' हे सर्वांनी लक्षात ठेवले, तर चांगले. कारण नाही तर अति तेथे माती होऊ शकते. शेवटी यश आणि प्रसिद्धी ही कायम टिकत नाही ती क्षणभंगुर असते. म्हणूनच त्याची किती हाव ठेवायची आणि स्वतःला विसरून हे असे आपल्या शरीरारोग्याचे हाल करणाऱ्या किंवा हानी करणाऱ्या गोष्टींमध्ये किती गुंतायचे, हे ज्याने त्याने ठरवणे गरजेचे आहे ! # "कोण बरोबर कोण चूक !": त्याच पुरवणीत दुसरे एक वृत्त वाचले, तेही असेच मन व्यथित करणारे आणि संभ्रमात पाडणारे होते. मुंबईमध्ये आधीच हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे विविध प्रकारचे असे त्रास आणि रोग होत आहेत. त्यातून आता कोरोनाचा नव्या वेरियंटचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांचा आणि त्रासाचा आधीच त्यांना मनस्ताप होत आहे. अशा वेळेला वाढत्या कबुतरांच्या संख्येचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. भूतदया प्रेमी मंडळी मुंंबईत विविध ठिकाणी कबूतरखाने आहेत, तिथे कबुतरांना दाणे घालतात आणि त्यामुळे कशा समस्या निर्माण होताा, त्याचे ते वृत्त होते. कबूतर जेव्हा उडतात त्यावेळेला हवेमध्ये त्यांची विश्टा आणि पिसे उडून श्वसन विषयक रोग निर्माण होतात, हा सध्याचा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे दाणे घालणारे, काहीतरी पुण्याचे काम करतोय, म्हणून रंगात येतात, तर दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाल्यामुळे सारा बेरंग होत आहे. बिचारे प्रशासकीय अधिकारी, धावून धावून किती कुठे धावणार असाही तो प्रश्न आहे. शेवटी काय बरोबर, काय चूक याचे तारतम्य ज्याचे त्याने ठेवायला हवे, एवढेच म्हणावयाचे. पण हाही एक रंग बेरंगाचाच नमुना ! # "किती, ही भटकंती, कशासाठी ?": तिसरा मुद्दा जो नजरेसमोर आला, तो म्हणजे मुंबईकरांसारख्या शहरी मंडळींची भटकंती ! कोकणातले सगळे किनारे आणि गाव फुल्ल आहेत आणि मुंबई एक्स्प्रेस रोडवर पाच पाच, सहा किलोमीटरच्या रांगा लागून ट्रॅफिक जॅम आहे. अशा तऱ्हेच्या बातम्या आपल्याला बहुतेक वीकेंडला वाचायला मिळत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर खरंच वाटतं की, एवढा सोस कशाला ? सुखाचा जीव प्रवासामध्ये, जो प्रवास खरं म्हणजे तीन साडेतीन तासात होईल तो सहा आठ तास करत घाावाायचा? हे कशा करतात, त्याच्यापेक्षा एवढा आपण स्वतःचे ब्लॉक घेतले आहेत, ई एम आय भरतोय, तर उठ सूट अशी भटकंती करण्यापेक्षा, वीकेंडला आपल्या सुह्रुुदांबरोबर, निवडक मित्रांबरोबर एकत्र काळ घरातच मजेत घालवायला काय हरकत आहे? म्हणजे एकीकडे पण भटकंतीची रंगत तर हवी, पण त्यामुळे हा जो त्रासाचा मुद्दा आहे आणि उगाचच भटकत राहायचं दर वीकेंडला हे कितपत योग्य आहे ? तीच गोष्ट हॉटेलिंग बद्दल हल्ली झाली आहे. कुठल्याही शहरांमध्ये विशेषत: पुणे मुंबई येथे मंडळी वीकेंडला हॉटेलमध्ये जाऊन हजारो रुपये उडवतात. आता आरोग्याच्या दृष्टीने कुठे स्वयंपाक केला जातोय, कोणत्या अवस्थेत केला जातोय, काय स्वच्छता आहे कोण ते करतोय हे काही बघितलं जात नाही. पण क्षणिक आनंदासाठी आपण पैसे तर उडवतोच पण आपल्या आरोग्यावरही परिणाम करतो हे लक्षात कोण घेणार म्हणजे रंगबेरंगचा हा ही एक मुद्दा ! धन्यवाद सुधाकर नातू

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

"बिंब प्रतिबिंब-वैचारिक जुगलबंदी !":

"बिंब प्रतिबिंब-वैचारिक जुगलबंदी !": B: 😃🙋🏼‍♂️ *आज सर्व उपद्रवी, देशविघातक आणि गुंड प्रवृत्तीच्या , साधारण कुवतीच्या तथाकथित लोकप्रतिनिधींना त्यांच्या निंदनीय वागणुकीमुळे निलंबित केले गेल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात दर्जेदार कामकाज झाले आणि ते आत्ता पण चालु आहे. सादर केलेल्या सर्व विधायकांवर साधकबाधक चर्चा झाली, ज्या विरोधी सभासदांचे त्यांच्या सभ्य वर्तनामुळे निलंबन झालेले नाही त्यांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, आपल्या परीने सरकारला सुचना केल्या, सरकारने त्यांचे विचार शांतपणे ऐकून घेतले आणि त्यावर प्रत्यक्ष भेटुन विचारविनिमय करण्याचे आश्वासन दिले. देश आणि जनहितासाठी संसद कशी चालावी याचा आज प्रत्यय आला. जय भारत.* 👍🏽 A : जे होऊन गेले, जे होत आहे तसे आजतागायत वर्तन झाले नव्हते. साधे निवेदन करण्याचे टाळणे हा पळपुटेपणा होता. B: 👆🏾👆🏾👆🏾👆🏾 *राजीव गांधीच्या काळातली ही घटना आहे. ६३ खासदारांना त्यावेळी अध्यक्षांनी निलंबित केले होते. याहुन महान घटना म्हणजे १९७५ साली इंदिरा गांधींनी संपूर्ण विरोधकांना नुसते संसदेतुनच बाहेर काढले नव्हते तर त्यांना अनेक दिवस तुरुंगात टाकले होते. अपुऱ्या आणि चुकीच्या माहीतीच्या आधारे निष्कर्श काढु नयेत. सत्य कधी लपत नाही.* A : जवळ जवळ तशीच मानसिकता दिसत, तीच पुनरावृत्ती सध्या होत आहे. B: *यात पण परत अज्ञान आणि अपुरी माहीती दिसुन येते आहे. दोन्ही संसदेचे स्वामित्व आणि अधिकार दोन्ही अध्यक्षांचे असतात. म्हणुनच ओम बिडला यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली, निवेदन केले आणि जाच कमिटी स्थापन केली. गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नसतो. एव्हढे होऊन देखील गरज नसताना सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निवेदन केले. या प्रकरणी गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करण्याचे काहीच औचित्य नाही. चौकशी पुरी झाल्यावर संसदेत यावर सविस्तर चर्चा नक्कीच होईल आणि त्यावेळी हे सर्व विरोधक बाहेर पळुन जातील कारण निष्कर्ष चौकानेवाले असतील हे निश्चित, जरा धीर धरा.* B: *शाळेत बिघडलेले विद्यार्थी शिक्षकांपुढे त्यांच्या टेबला भोवती नाचून अर्वाच्च भाषेत घोषणा द्यायला लागले तर ते शिक्षक काय करतील? त्या बिघडलेल्या मुलांना वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे करतील, तेच इथे झाले आणि यापुढेही होईल याची आशा आहे. हे गुंड देशविकासासाठी कुठलेही योगदान देऊ शकत नाहीत, हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.* A : हे प्रतिपादन हास्यास्पद आहे. ज्या मंत्र्यांचा संबंध नाही, त्यांना पुढे करणे हा जबाबदारी टाळण्याचा अट्टाहास. अंगाशी शेकले की लपायचे हा प्रकार, सर्वोच्च दोन नेत्यांकडून नेहमी घडत आला आहे. A : घुसखोरीची घटना कां घडली, त्याची जबाबदारी टाळल्यावर दुसरे काय घडणार? येथे 'शिक्षकांनी संबंधित जबाबदार महाशयांना उत्तर द्यायला भाग पाडणे अपेक्षित होते. B: 🙋🏼‍♂️ गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. उद्या राष्ट्रपतींनी यावर निवेदन द्यावे अशीही मूर्ख मागणी होईल. या गुंडांचे तमाशे देशाने खुप पाहीले आणि सहन केले. यापुढे ते होणार नाही. सरकारचा आक्रमक पवित्रा पाहुन ही मंडळी आता बिथरली आहेत. त्यांनी आज पंतप्रधानांची भेट मागितली. पंतप्रधानांनी सर्व पक्षीय फ्लोअर मॅनेजरांबरोबर संवाद साधला. यातुन काय निष्पन्न होते ते बघायचे. A : केवळ आणि केवळ निरंकुश सत्तेसाठी विधिनिषेधशून्य राजकारण करणाऱ्यांचा निषेध करावा तितका थोडाच. B: शिक्षकांपुढे "जबाबदार महाशय" नव्हते तर बिघडलेले गुंड होते. तरीही सुसंस्कृत शिक्षकाने हात जोडून विनवुन पाहीले व शेवटी बडगा उचलला. खरेतर यांना मार्शलांच्या हस्ते उचलुन बाहेर टाकायला पाहीजे होते. संसदेचे रुल बुक आहे. सर्व त्यानुसारच चालते. थोडक्यात बिघडलेल्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली. जय हो. B: *देशविघातकांच्यावतीने निषेध करत रहावा, नैतिकतेच्या गप्पा मारत राहाव्यात, देशाला त्याकडे बघायला आता वेळ नाही आणि गरज पण नाही. जय हो.* 😂😂😂😂😂😂 B: *काँग्रेसचा सध्याचा महान तरुण नेता गेली काही वर्षे एका विशिष्ट उद्देशाने, आपल्या संरक्षक यंत्रणेला चुकवून, सातत्याने विदेशी जातो. जाॅर्ज सोरोस आणि कंपनी सारख्या भारतविरोधी बदमाषांशी हातमिळवणी करतो आणि हार्वर्ड, केंब्रिज सारख्या विद्यापीठातल्या डाव्या जहाल लोकांच्या मदतीने भारत विरोधी वक्तव्य करतो. यासंबंधीची जबाबदारी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण ते संसदेत नसल्याने गृहमंत्री त्यांच्यावतीने निवेदन करु शकतात. अशा देशविघातक अॅक्टीविटींवर निवेदन करण्याची मागणी या गुंड मंडळींनी सरकारकडे कधी केली आहे का? आपली तरी तशी इच्छा आहे का? आपल्याला ते आवश्यक वाटते का? याचे उत्तर कोणीही देणार नाही.* A : नैतिकतेला कस्पटासमान समान मानणारे, देशविघातक कोण हे ठरवणार, ह्यासारखा विनोद नाही. Remember When Character is Lost, everything is LOST B: 😂😂😂😂😂😂 नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी देशविघातकांची बाजु घेऊन कॅरॅक्टर की काय ते सांभाळत रहावे, जागृत झालेल्या देशाला त्याची आता पर्वा नाही, गरज पण नाही. आज संसदेत पास झालेल्या विधेयकांत देशविघातकांची आणि आतंकवाद्यांची पहिल्यांदाच व्याख्या करण्यात आली आहे. आता ही मंडळी कायद्याच्या कचाट्यातुन सुटणार नाहीत. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला असा कायदा करण्याचा सल्ला दिला होता. जय हो. 👍🏽😂 B: *आज देशांत "तेलगु देसम" "बिजु जनता दल " यासारखे भाजप विरोधी पक्ष आहेत. ते संसदेत पण आहेत. त्यांची अनेक मुद्यांवरची मते भाजपपेक्षा वेगळी आहेत. ती ते सर्वत्र खुलेपणाने मांडतात. सरकार त्यांच्या सुचना आवर्जून विचारात घेते. कारण " ते देशाच्या विभाजनाची योजना, इच्छा, कारस्थाने करत नाही ". त्यामुळे त्यांना कोणीही कधीही "देशविघातक " म्हणत नाही. हा फरक आहे. आजच्या संसदेतल्या चर्चेदरम्यान त्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते सविस्तरपणे मांडली. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा सरकारने सहज स्विकारल्या. डाॅ. सन्मित पात्रा या BJD च्या खासदाराने खुप वेगळी भुमिका मांडली. सरकार पक्षाने त्याचे खुल्या मनाने स्वागत केले, कौतुक केले. असे हे गुंड करु शकतात का? त्यांना १० मिनीटे मुद्देसुद भाषण पण करता येत नाही. असो. याचा विचार करुन आपली शक्ती आणि वेळ घालवायची गरज नाही.* 😂😂😂😂😂 A 😇 "आजच्या महाराष्ट्र टाइम्स 'संवाद' पुरवणीमध्ये, सध्या गाजत असलेल्या खासदारांच्या घाऊक निलंबनासंबंधीचे विडंबनात्मक स्फूट वाचण्यासारखे आहे आणि ते डोळ्यात अंजन घालणारे आहे, एकाधिकारशाही फार दूर नाही, हे ध्वनीत करणारे !": 😇 B 🙋🏼‍♂️ *वाह् वाह् मस्तच. निलंबित खासदारांपैकी काही उपद्रवी गुंड तुरुंगाच्या वाटेवर आहेत. मजा पहावी नाहीतर अश्रु ढाळावे. ज्यांना विडंबनात्मक लिहिण्यासाठी आणि ज्यांना ते वाचण्यासाठी फावला वेळ आहे त्यांनी आपले आत्ममनोरंजन करत राहावे. देशाला यांच्याकडे बघायला वेळ नाही आणि कारण पण नाही. देशात सर्वागिण बदलाचे वारे वाहातच राहणार आहेत. जय भारत!* 😂😂😂😂😂😂 🤗 अंध भक्तगण किती एकांगी, पूर्वग्रह दूषित द्रुष्टिकोन ठेवून त्यांच्या छुप्या मनसुब्यांची पाठराखण करतात, ते ह्यावरून ध्वनित होते आणि हेच देशाचे दुर्दैव आहे !" Ii इत्य अलम् ii 🤗🤗🤗🤗🤗

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

"राहू व केतूच्या पाप कर्तरी योगाचे परिणाम !:"

"राहू व केतूच्या पाप कर्तरी योगाचे परिणाम !:" राहू व केतू हे दोन अत्यंत अनिष्ट ग्रह आहेत, त्यांच्या एका बाजूला जर सर्व ग्रह पत्रिकेत असतील तर कालसर्पयोग होतो आणि त्याचे त्या व्यक्तीला त्रासदायक परिणाम होतात हे आपणास ज्ञात आहे. कोरोना काळातही अशा राहू केतूच्या अनिष्ट योगामुळे सबंध जगावर संकट कोसळल्याचे आपण अनुभवले आहे. असे हे राहू केतू मूळ पत्रिकेत कुठे आहेत, हे पाहून, सध्याच्या राहू केतूच्या पाप कर्तरी योगात कोणती दोन स्थानं येतात, त्याचे निदर्शन व काय परिणाम संभवू शकतात त्याचा खुलासा ह्या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे. "राहू व केतू हे दोन पापग्रह दर दीड वर्षांनी राशी बदल करतात, ते उलटे मागच्या राशीत जातात. जसे आता राहू मेेष राशीत व केतू तुळेत आहे. ते 28 नोव्हेंबर'23 रोजी अनुक्रमे मीन व कन्या राशीत प्रवेश करतील. अशा वेळेला कुंभ लग्नाच्या मूळ पत्रिकेमध्ये ज्यांच्या द्वादश स्थानात म्हणजे मकर राशीत केतू व षष्ठ स्थानात राहू कर्क राशीत असेल तर, त्या व्यक्तीच्या पत्रिकेत लग्नस्थान आणि सप्तम स्थान हे राहू व केतू यांच्या पापकर्तरी योगात येतील. ही दोन अत्यंत महत्त्वाची स्थाने आहेत, लग्नस्थान म्हणजे स्वतः, शरीरारोग्य मानसिक स्थिती तर लग्नस्थान म्हणजे जोडीदाराचे स्थान, वैवाहिक सौख्य भागीदारी विषयक फळे. साहजिकच या पापकर्तरी योगामुळे स्वतः त्या व्यक्तीला आणि त्याच्या जोडीदाराला त्रासदायक काळ, नुकसानकारक अशी फळे मिळण्याची शक्यता असू शकते. जन्मलग्न पत्रिकेमध्ये जर राहू आणि केतू यांच्या पुढच्या आणि मागच्या घरां मध्ये जर तूळ आणि मेष रास असेल तर अशा पत्रिकांमध्ये सध्याच्या परिस्थितीत राहू केतूचा पापकर्तरी योग होऊ शकतो आणि त्याचे त्या त्या स्थानांबद्दल अनिष्ट परिणाम मिळू शकतात. याच गोष्टीचा सखोल अभ्यास विविध पत्रिकांचा करून केला असता, असे लक्षात येते की ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये राहू आणि केतू , हे मिथुन आणि धनु अथवा सिंह आणि कुंभ या राशीत असतील तर फक्त त्यांनाच राहू केतूचा पापकर्तरी योग होईल, बाकी जर तसे नसेल तर त्यांना हा त्रास सहन करावा लागणार नाही. अर्थात त्यामुळे जी दोन स्थाने ह्या अनिष्ट पापकर्तरी कुयोगात येतात त्यानुसार त्या स्थानांचे कारकत्व असलेल्या गोष्टींची फळे क्लेशकारक संभवतील. तेव्हा प्रत्येकाने आपल्या जन्मलग्न पत्रिका तपासून पहाव्यात आणि जन्मलग्न कुंडली मध्ये राहू आणि केतू हे वरील प्रमाणे कुठे आहेत का? ते पहावे आणि तसे जर नसेल तर चिंता करायची कारण नाही. अजून एक उदाहरण: कर्क लग्न असून पत्रिकेमध्ये तेथेच केतू आणि राहू मकर राशीत असल्यामुळे द्वितीय स्थान व अष्टम स्थान पापकर्तरी योगात असतील.. ही दोन अत्यंत महत्त्वाची स्थाने असल्यामुळे स्वतः त्या व्यक्तीला कौटुंबिक सौख्य, आर्थिक स्थिती आणि अचानक अपघात आरोग्य समस्या नुकसान असा पाप कर्तरी योगाचा त्रास सहन करावा लागेल. यावरून असे लक्षात येईल, जन्मलग्न पत्रिकेला हा असा अनिष्ट योग राहू केतूचा होऊ शकतो. मात्र ती बाधीत दोन स्थाने प्रत्येक जन्मलग्नाला वेगळी असणार आहेत. धन्यवाद सुधाकर नातू

"बोल, अमोल !"

👍"बोल, अमोल !":👌 # 👍"दिशा आणि दशा, फक्त एका वेलांटीचा फरक ! पण तीच वेलांटी, बरोबर कां चूक ह्यावर परिणीती होणारी 'दशा' दयनीय की, वंदनीय हे ठरत असते !!":👌 #👍"प्राजक्ताची फुले !:👌 💐"शुभ प्रभाती, कोंबडा जसा न चुकता आरवतो, तसा सकाळी साडेसहा वाजता अस्मिता वाहिनी आकाशवाणी मुंबई वरील 'चिंतन' मी ऐकायला सुरुवात केल्यापासून, 'कल्पनेतल्या अकलेचे तारे' शब्दरूपात पकडत, जणु प्राजक्ताच्या लालचुटूक देठांचा पांढर्या शुभ्र फुलांचा स्वानंदाचा सडा सोशल मीडियावर विखुुरत जातो !":👌 #👍"नशा आणि नाश, फक्त एका कान्याची अदलाबदल ! पण किती अर्थपूूर्ण व समर्पक, घातक नशा अखेरीस नाश करते हे ध्यानात आणून देणारी !!":👌 #👍"तारतम्य व समजूतदारपणा ह्यांच्यामधील सीमारेषा धुसर असते. किंबहुना समजूतदारपणा हा तारतम्याकडे नेणारा मार्ग असतो. ह्यांच्या अभावी वादविवाद, मतभेद आणि अशांती संभवते !":👌 #👍"समजूतदारपणा आणि शहाणपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात खऱ्या पण थोडा फरक आहे समजूतदारपणा हा बहुत शहा संभाव्य किंवा प्राप्त परिस्थितीतील प्रतिकूलपणा किंवा प्रतिकूल परिणाम स्वीकारणे असते तर शहाणपणा संभाव्य परिस्थितीत प्रतिकूल परिणाम येऊच नये यासाठीचा घेतलेला पवित्रा असतो !!":👌 #👍"पहाटे तीन च्या आसपासच्या वेळेला अमृतवेळ कां म्हणतात, त्याचे कारण गवसले मला ! बहुदा त्याच सुमारास झोपेतून जाग येते आणि कशी कुणास ठाऊक, जीवनानुभवाच्या मुशीतून शाश्वत विचारलहरी उचंबळून येतात !":👌 #👍"स्मरण आणि विस्मरण यामध्ये धुुसर सीमारेषा असते. काल-परवा पाहिलेल्या मालिकेचे शीर्षक काही केल्या आठवत नाही, मात्र कित्येक वर्षांपूर्वीच्या शाळेतल्या दिवसांचे अनुभव मात्र ताजे होऊन लपकन समोर येतात. ह्याला काय म्हणायचं ?स्मरण आणि विस्मरण हे कालातीत असतं, काळावर अवलंबून नसतं हेच खरं !":👍 #👍"प्राजक्ताची फुले !:👌 👍"बोल, अमोल!":👌 👍"हवेहवेसे न वाटणे व नकोसे होणे ह्यांमध्ये फरक हा, की पहिल्यात भोगलेल्यामुळे विरक्ती, तर दुसर्यामागे त्यांच्यामुळे लाभलेली त्रुप्ती!":👌 👍"बोल, अमोल !":👌 👍"मॅनेजमेंट कोर्सला असताना मी ऐकले होते की, गृहिणी ह्या जगातील सर्वोत्तम मटेरियल मॅनेजर असतात, कारण त्यांना घरामध्ये कोणत्या गोष्टी केव्हा, कशा कुठून आणि किती किंमतीला घ्यायच्या, याचे उपजतच ज्ञान असते. त्याचप्रमाणे आपणही केव्हा, कुठे, काय कसे, कुणाशी बोलावयाचे किंवा नाही बोलावयाचे, याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे !":👌 👍"बोल मोल !":👌 👍"मराठी भाषा किती लवचिक तरीही किती समर्थ, किती सम्रुद्ध आहे ! शब्दातले एकच अक्षर जर बदलले, तर किती भिन्न अर्थ त्यामुळे निर्माण होतात!! बंड कंड दंड पुंड..... धींड खिंड धेंड खिंड..... पेंड...... शिवाय काही असांसदीय शब्दही!":👌 👍"सुुख पहाता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' अशी स्थिती निर्माण होण्याचे कारण Missing Tile Syndrome' हे होय. ते म्हणजे, जे 'देखणं ते न दिसणं' आणि 'जे खुपणं तेच बघणं' होय !":👌 👍"बोल, अमोल-!":👌 👍"पहाटे तीन च्या आसपासच्या वेळेला अमृतवेळ कां म्हणतात, त्याचे कारण गवसले मला ! बहुदा त्याच सुमारास झोपेतून जाग येते आणि कशी कुणास ठाऊक, जीवनानुभवाच्या मुशीतून शाश्वत विचारलहरी उचंबळून येतात !":👌 👍"बोल, अमोल!":👌 👍"आयुष्यात मनभावन क्षण मोजकेच येतात अन् ते तुमचे रोम रोम फुलवत आणि चित्त वृत्ती उजळवत प्रेरक उदात्ततेच्या महासागरात तुम्हाला चिंब चिंब करून जातात ! तो अनुभव अनोखा, न विसरण्याजोगा असतो. असे मनभावन क्षण येणे भाग्याचे !!":👌 धन्यवाद सुधाकर नातू

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

"मल्लीनाथी-2 !":

"मल्लीनाथी-2 !": ""ते" तसे, तर "हे" असेतसेच!: प्रादेशिक पक्ष असलेल्या, चंद्राबाबूंना आंध्रात, नंतर "केसीआर"ना तेलंगणात तसेच DMK वा AIDMK च्या नेत्यांना तामिळनाडूमध्ये अथवा नवीन पटनाईक ह्यांना ओरिसात जर स्वबळावर सत्ता मिळविता येते, तर मराठी मातीचा अभिमान बाळगत प्रारंभ केलेल्या, शिवसेनेला गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रात काही केल्या ते जमू नये, ह्यातच त्या पक्षाच्या स्वयंघोषित "स्वबळा"चा अंदाज यावा. गेले चार वर्षे त्यांना दुय्यम भूमिका स्विकारायला लागल्यापासून त्यांनी जो धरसोडीचा तमाशा मांडला आहे, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता रसातळाला जात आहे, हे वास्तव आहे. मागील खेपेस जसे मनसेचे पानीपत झाले, तसेच ह्यांचे आगामी निवडणूकीत होण्याचा रास्त धोका आहे. गुणवत्ता, धोरणांतील व प्रयत्नांतील सातत्य व सुसुत्रता, बदलत्या स्थितीबद्दलचा चाणाक्षपणा ह्या सार्यांचा सत्ताकारण हा मेळ व खेळ असतो. शेवटी पाणी, आपल्या ठराविक पातळीवरच येते, हा नैसर्गिक नियम आहे, असेच म्हणावयाचे !" (फेसबुक संदेश 5 वर्षांपूर्वी ) @ "यक्ष प्रश्न": अटीतटीच्या लढतीत भूषणावह विजय मिळविल्यानंतर, शीर्षस्थ पदासाठी होणारा जबर संघर्ष पाहून दु:ख करावे की, आपल्याकडे सक्षम नेत्रुत्वाची वाण बिलकुल नाही, ह्याचे समाधान मानावे?" # "चिरंतन": क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा, नसा नसांतूनी तो चंग करा, मना मनांतूनी ते प्रेम बहरा, चरा चरांतूनी हा नाद खरा! # 😄"तत्त्वज्ञानी योगी !":😄 👍"आपली कुणीच दखल घेत नाही, ना आपली कुणी आठवण काढतं, जणु आपल्याला बेदखल केल्यासारखं, इतरांनी किंवा आपल्या वर्तुळात असणाऱ्यांनी वागणं अशामुळे खंत करत राहणं स्वतःलाच दोष देत राहणं, मनाचा कमकुवतपणा होय. याचं कारण म्हणजे आपण समजूनच घेत नाही की, इतरांच्या भावविश्वाच्या भवतालांत आपले कुठलेच प्राधान्य नाही किंवा स्थान नाही हे ! तसे असले तरी नाऊमेद न होता, श्रेयस्कर हेच आहे की, आपण आपल्यातच गुंतून जाणं, रमणं आणि ते होण्यासाठी जे जे आपल्याला योग्य वाटतं, आवडतं, चांगलं जमतं ते ते मनापासून करत, आत्मसमाधान मिळवत आपल्याच भावविश्वात आपण विरघळत जाणं ! असं ज्यांना जमत, ते आणि तेच खरे तत्त्वज्ञानी योगी !!":👌 # 👍"ह्याला जीवन ऐसे नांव......"👍 💐मनाची द्विधा मनस्थिती पदोपदी होत असते, त्या त्या वेळेस घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे परिणाम वेगवेगळे होतात आणि आयुष्याला भिन्न वळणे संभवतात. म्हणूनच लहान वा महान थोर, प्रत्येकाचे आयुष्य हे कल्पिताहूनही अगम्य असे सुरस अन् चमत्कारिक असते..........💐 # # बदलते वास्तव हे आहे की, विविध भाषी, विविध धर्मी, विविध जाती जमाती, विविध संस्क्रुती अशा विविधतेने बनलेल्या आजच्या भारताला, एकांगी एककल्ली, दुही दुफळी-प्राधान्य पुरस्कर्ता आणि विरोधकच नको असलेला संकुचित व्रुत्तीचा मार्ग नको आहे. सर्वधर्मसमभाव सहिष्णुता व सगळ्यांना सामावून घेत सलोखा वाढवणारा, भावनिक प्रश्नांपेक्षा व्यावहारिक गरजपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा, मार्गच असणे अंतिमतः त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. धन्यवाद सुधाकर नातू

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

"Different Strokes !":

"Different Strokes !": # "A Worthy Monologue" : I happened to read in One Go,a wonderful book: 'Who Moved My Cheese' by Dr. Spencer Johnson, which my grandson had got as a reward as a winner in a contest. It's an amazing story to deal with the change in your Professional and Personal lives! It's an enlightening narration of four characters, who live in a 'Maze' and look for 'Cheese' to nourish them and make them happy. 'Maze' is the 'environment, you are in and the 'Cheese' is the 'Fruit' you want. The contents of the book show you: 'How to anticipate change'; 'Adapt to the change quickly'; 'Enjoy the change'and'Be ready to change quickly again and again'. The four characters in the story are: 'Sniff' who has a habit to notice Change; 'Scurry' who sees the change early and acts fast; 'Hem' Who denies and resists change and is comfortable where he is; and the last one is 'Haw' who sooner than latter,laughs at his mistakes and adapts to the change! After absorbing the essence of the book, you are compelled to find out who you, exactly are, from these four characters And final lesson learnt is : You must avoid to be a 'Hem'! Surely & definitely, It is A Must Read book for One and All. Pl. Go for it. # Lost Key: Almost every one is running an endless race, towards the 'Goal Post of Happiness and Contentment' but in vain. The result is that the Life Styles and Relationships have become mechanical and monotonous. Really an eye opener. This is due to more and more externalization, than much needed internalization of today's Life styles. Off and on, 'Introspection' about the external happenings and internal responses/reactions to them, is the 'Lost Key'! # 😃 "Inspiration & Motivation:😃 👍"The meanings of the two words, Inspiration and Motivation appear to be look a like but they do have a difference. While Inspiration is a force that triggers creative ideas, the Motivation is an inner urge to take actions to convert those ideas, into reality. Thus the Concept here in is an outcome of Inspiration and apt explaination of it, is the child of the Motivation !":👍 # I just read with interest an article on Vaidik Science in Kistreem Diwali issue'11 written by Mr.S.Kulkarni. It highlights our ancient treasure of Knowledge about the mysteries of the Universe. It also brings about the fact, what modern science is attempting to probe into, was already known to our Rushis, thousands of years ago. If interested, please do read the above article. # The creation of a new born !": The creation of a new born is the most astonishing work of the Nature and while mostly, all the new born, almost look similar, it's a puzzle, as time unfolds, how each one gets transformed into an adult, in an unique form, shape and body's operating systems. Further, the human body happens to be the most intricate, complex and very large Laboratory or a Factory, in the World. The Brain happens to be the CEO and Mind has a role of a Mentor, throughout one's Life. Unfortunately, in today’s rat race, no one has time to look at and to manage the intricacies and complexities of body's various operating systems, properly. No wonder, 'Health is Wealth' then remains a slogan, not to be followed and acted upon. One wakes up only when some ailment occurs, not otherwise. Many a times, it turns out to be too late. To manage the well-being of the Body and Mind is a full time, 24by7 job- an interesting and the most essential, critical job. All the management principles and practices need to be used consciously, for this task, First Learn in depth the basics of the operations of the Body Clock-the inputs-outputs' relationships and then adapt the principles of timely maintenance, moderation and of course the prevention. Please bear in mind, Neglect and Avoidance could prove you, very deer. Finally and honestly, these are the words from my own experience, that has witnessed till now, the situations of the brink of disaster, thrice, just due to shear Neglect and Avoidance. So, let’s All Wake up and Walk this Talk. Sudhakar Natu