शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

"रोख, ठोक !":

 "रोख, ठोक !":

# "लोकसभेेत, विरोधकांनी, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता त्यांना संपूर्ण डावलून, इतरच जुने मुद्दे उगाळत बसणे हे कदाचित वेळ मारून देणारे असले, तरी ते योग्य कसे नसते, हे आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधील अग्रलेखाच्या वाचनातून ध्यानात यावे.

# ते' चांगले आहेत की नाहीत हा मुळी इथे प्रश्नच अप्रस्तुत आहे. केवळ त्यामुळे 'हे' धुतल्या तांदळासारखे ठरु शकत नाहीत. ते सिद्ध करावे अशी अपेक्षा आहे.

# जळी स्थळी पाषाणी, एकाच नेत्याने हजेरी लावायची हा हट्टाहास कशाकरता? आपल्या सहकाऱ्यांना देखील संधी देणे, कुठल्याही आदर्श नेत्याचे आद्य कर्तव्य असते,  तेच इथे कायम विसरले जात आलेले आहे. स्वप्रदर्शनाचा हा तमाशा अक्षरश: हास्यास्पद नव्हे कां?

वेगवेगळी उद्घाटने विकास कामांची देशाला अर्पण करण्याचे कार्यक्रम यासंबंधी जो नेता कायम आपली छबी पुढे आणण्याचा अट्टाहास करतो. स्वयंप्रदर्शनाचा देशामध्ये कोणाला इतका हव्यास आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यासंबंधी आपले मत काय आहे ?

# या सगळ्या प्रकारामुळे गेल्या आठ वर्षात केंद्रीय मंत्रिमंडळात खरोखर तीन चार व्यक्ती सोडल्या, तर बाकी कोण आहेत ते काय करतात याची खचितच देशवासियांना काही माहिती असेल !

# प्रत्येक व्यक्तीमध्ये कितीही गुण जरी असले तरी त्यामध्ये काही ना काही दोष असतातच असतात हे विसरून चालणार नाही. गुणांचे प्रदर्शन करताना अवगुण वा दोषांना झाकणे बरोबर नव्हे. तेही खुल्या दिलाने मान्य करणे संयुक्त ठरते. केवळ गुणांचे गुणगान करणारे म्हणूनच 'भक्त' या नावाने ओळखले जातात. सुबुद्ध समंजस नागरिकाने समतोल बुद्धीने कोणत्याही व्यक्तीचे नेत्याचे आकलन करणे आवश्यक असते नाहीतर तो केवळ आंधळा वेडेपणा असतो.

#  पर्याय नाही अशी अवस्था कधीमधी निर्माण होऊ शकते यात वाद नाही मात्र पर्याय म्हणजेच उपाय असे म्हणणे योग्य नव्हे कारण अशा वेळेला केवळ ती एक परिस्थितीवर करावी लागलेली तडजोड असते परिस्थिती केव्हा ना केव्हा तरी बदलते आणि पर्याय हमखास निर्माण होतो हा आजवरचा इतिहास आहे हे विसरून चालणार नाही.....

# "कात्रजचा घाट" दाखविणे, ही कौतुकास्पद मर्दुमकी नसून, ती एक शुद्ध दगाबाजी आहे. अशी दगाबाजी वारंवार करणाऱ्या मंडळींना "जाणते राजे" म्हणून गौरव करणे, हे शहाणपण नव्हे. जनता सुज्ञ असते त्यामुळे अशा दगाबाजांवर शेवटी आपल्याच गल्लीत आपले 'राजेपण' टिकवताना नाकीनऊ येते. अशा पाठीत खंजीर खूूपसणाऱ्या 'शूरवीरां'(?)मुळे, इतिहासात देशाचे किती नुकसान झाले, ते कधीही विसरता कामा नये.
# "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा