"छाप(पड)लेले शब्द-17 !":
"धूमकेतू, काय त्याचा हेतू?":
"माझ्या आठवणींप्रमाणे, लहानपणी 'चांदोबा' सारख्या मासिकात किंवा इतरत्र धूमकेतू दिसणं म्हणजे संकटांची मालिका येणं, असं काहीतरी सांगितलं जायचं. परंतु आता विज्ञानामुळे विश्वाचा आकार अनंत आहे याची जाण जशी आली आहे, त्याचप्रमाणे आपली सूर्यमाला, पृथ्वी, त्यावरील आपणदेखील विश्वाच्या ह्या अवाढव्य फापटपसर्यापुढे नगण्य आहोत.
साहजिकच आपली सुखदुःखे आणि अडीअडचणी यांचा आपण बाऊ करता कामा नये, असाही समंजस विचार अशा बातम्यांवरून येऊ शकतो."
##############
"छाप(पड)लेले शब्द-21":
"जुनी पेन्शन योजना:बिनकामाचा कां हा, बोजा?:
सध्या जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करावी यासाठी आंदोलने चालू आहेत. काही राज्यांमध्ये ती योजना पुन्हा चालू देखील केली आहे. परंतु केंद्र सरकारने याबाबतीत योग्य भूमिका घेऊन ती योजना पुन्हा कार्यान्वित न करण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. कारण शासनाच्या तिजोरीवर त्याचा नाहक भार पडून शेवटी दिवाळखोरीची वेळ येऊ शकते.
दुसरे असे की, जोपर्यंत नोकरी आणि त्यानुसार दिलेले योगदान चालू आहे, तोपर्यंतच, त्याचा मोबदला त्याला मिळणं रास्त आहे. जो काही प्रॉव्हिडंट फंडाचा हिस्सा निवृत्तांना, सरकार किंवा शासनातर्फे देण्याची जबाबदारी आहे तितक्या रकमेवर सध्याच्या बँक व्याजाप्रमाणे जेवढे व्याज येईल, त्या प्रमाणात त्या कर्मचाऱ्याला पेन्शन देणे आपण समजू शकतो. परंतु सध्या ज्या तऱ्हेने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा बोजा उत्तरोत्तर वाढत आहे तो विचार करता ही योजना पुन्हा चालू करणे योग्य नव्हे. शिवाय अशा तऱ्हेची सवलत ईपीएस 95 या योजनेत जे अशासकीय कर्मचारी आहेत त्यांना अक्षरशः नगण्य असे दरमहा पेन्शन मिळते. असंघटित व खाजगी उद्योगांमध्ये निवृत्त झाल्यावर जी काही ग्रॅच्युइटी वा प्रॉव्हिडंट फंड ही देणे असतात, ती दिली जाऊन नंतर
त्यांना पेन्शन दिले जात नाही.
माझ्या आठवणीप्रमाणे मोफत
आरोग्यविषयक योजना ब्रिटनमध्ये शेवटी बंद करावी लागली. कारण शासकीय तिजोरीवर पडणारा नाहक भार.
एक प्रामाणिक कर्मचाऱी म्हणून आपण काम केले तर, आपण ठरलेला मोबदला घेणे योग्य आहे, पण ज्या सेवेतून आपण निवृत्त झालो, त्यामधून काम न करता दरमहा अशी अप्रस्तुुत आमदनीची अपेक्षा करणे, कितपत योग्य आहे? तेव्हा सार्वजनिक देेशहिताच्या दृष्टीने संबंधितांंनी योग्य तो विचार करून, आपली मागणी मागे घ्यावी. त्यातच अंतिमत: आपणा सर्वांचे आणि देशाचे हित आहे.
म.टा. मधील वाचकांचा पत्रव्यवहारात प्रसिद्ध झालेले हे पत्र व त्यातील मुद्दे म्हणूनच गांभीर्याने घेण्याजोगे आहेत.
धन्यवाद
सुधाकर नातू
#########
👍"छाप(पड)लेले शब्द-37 !":💐
👍"सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व!":👌
👍"एकोणिसाव्या शतकापूर्वीच्या काही शतकांमध्ये, महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव अशी संतांची मांदियाळी होऊन गेली. तिने "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !" अशी निरपेक्ष स्थितप्रज्ञ वृत्ती दिली, तशीच अध्यात्म व मोक्ष प्राप्तीसाठी करावयाची साधना देखील.
तर 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक थोर समाजसुधारक, राजकारणी आणि प्रतिभासंपन्न विचारवंत यांची मालिकाच येथे अवतरली. त्यांच्या असामान्य योगदानामुुळे, नव्या युगाची, स्वातंत्र्याची पहाट आपण पाहू शकलो. त्या साऱ्या थोरांंच्या मालिकेमध्ये अग्रणी शोभावेत असे, सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले कृतिशील नेतृत्व, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दिले. त्यांच्या वैविध्यपूर्ण कहाणी, सोबतच्या वृत्तात आहे.
अशी गुुणवंंत माणसे येथे होऊन गेली, म्हणून, आज आपण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे.":💐
###########
👍"छाप(पड)लेले शब्द-35 !":💐
👍 "स्नेहवन'- असामान्य प्रेरक प्रवास !":👌
👍"इथून तिथून सातत्याने नकारात्मक अशा घटना आणि बातम्या आपल्यासमोर येत असताना, अचानक या वृत्तातील स्नेहवन आणि ती स्थापन करणाऱ्या देशमाने दाम्पत्याची कहाणी वाचून आपले मन कौतुकाने भरून जाते.
आयटी कंपनीतील चांंगल्या पगाराची नोकरी सोडून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, आपल्या पत्नीच्या सहकार्याने शेतकरी मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीचे आणि विकासाचे व्रत अंगावर घेऊन ते यशस्वी पद्धतीने पार पाडणारे हे दाम्पत्य खरोखर सर्वांनी आदर्श ठेवावा असेच आहे.
अशी विलक्षण सेवाभावी, त्यागी माणसे जोपर्यंत समाजात आहेत, तोपर्यंत आपल्या आशेला वाव आहे.":💐
#########
👍"छाप(पड)लेले शब्द-3 !": 💐
"बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे रोग होत आहेत. त्यामध्ये डायबिटीस हा प्रामुख्याने आढळून येणारा आहे. अनियंत्रित खाणे पिणे, आणि डायबिटीज अशा विविध कारणांनी माणसाचे मूत्रपिंड पूर्ण क्षमतेने काम करेनाहीशी होतात. अशा वेळेला डायलिसिस हाच एक उपाय असतो.हा खर्चिक उपाय करूनही अखेरीस अशी वेळ येते की मूत्रपिंड कामच करत नाहीत अशा वेळेला मूत्रपिंड प्रत्यारोपण अनिवार्य असते. त्यासंबंधी उपयुक्त माहिती देणारा हा वृत्तांत सगळ्यांनी गांभीर्याने घेणे, गरजेचे आहे."
############
👍"छाप(पड)लेले शब्द-15 !":👌
💐"सावध व्हा ऐका पुढल्या हाका !":💐
☺️ "कालचक्र अव्याहत पुढे चालू आहे, चालूच राहणार आहे. त्याचप्रमाणे माणसाचे जीवनचक्र असेच अव्याहत पिढ्यानपिढ्या चालत राहणार आहे. मात्र गेल्या शतकात विज्ञानाच्या प्रगतीमुळे, तसेच आरोग्य विषयीच्या माणसांच्या अधिकाधिक सजगतेमुळे, माणसांचे आयुर्मान वेगाने वाढत आहे.. वाढतच राहणार आहे. त्याचे दुष्परिणाम आता प्रगत देशांमध्ये दिसायला लागले आहेत. विशेषतः जपानमध्ये तर चिंताजनक इतक्या संख्येमध्ये जेष्ठ नागरिक आढळतात. तीच कथा अनेक पाश्चात्य प्रगत देशांचीही.
वैयक्तिक स्वार्थ, अधिकाधिक व आत्मकेंद्री प्रव्रुत्ती वाढत चालल्यामुळे माणसांचे फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी लक्ष केंद्रित होत आहे. साहजिकच करिअर, आर्थिक संपत्ती आदि गोष्टींना प्रचंड महत्व आले आहे. त्याचा परिणाम जन्मदर घटत आहे, तर दुसरीकडे आयुर्मान वाढत आहे, अशी ही विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
स्वतःच्या हाताने आपापले उद्योग करता येणं, हे सर्वांना शक्य होत नाही. विशेषता जेष्ठांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. आर्थिक भार देखील अनेकांना इतरांवर टाकावा लागतो.
बहुसंख्य पुुढारलेेल्या देशांमध्ये काम करणारे हात आणि जेष्ठ नागरिक घरामध्येच हात चोळत बसलेले, यांचा विषम अशा संख्येतील परिणाम हळूहळू सर्वांच्याच लक्षात यायला लागला आहे. त्यासंबंधी विशेष प्रकाश टाकणारे हे वृत्त आपल्या सगळ्यांना हेच सांगत आहे की, 'प्रत्येकाने आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा नव्हे, ज्येष्ठांसाठी तर हे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे'.
म्हणूनच....
"सावध व्हा, ऐका पुढल्या हाका !":👌
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा