👍"छाप(पड)लेले 👍"रंगांची दुनिया
👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐
"लोकमान्य फिल्ममेकर!":
👍" छोट्या पडद्यावरती "लोकमान्य" ही लोकमान्य टिळकांवरची मालिका उत्तरोत्तर विलक्षण लोकप्रिय होत चालली आहे. याच विषयावरच्या चित्रपटापेक्षा अगदी वेगळा अभिमानास्पद इतिहास त्यामधून उलगडला जात आहे.
अशा महत्त्वाच्या विषयावरती मालिका निर्माण करणारे श्री नितीन वैद्य, हे खरोखरच 'लोकमान्य फिल्म मेकर' आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि समाज प्रबोधनासाठी धडपडणाऱ्या कारकिर्दीचे यथातथ्य चित्र उभे करणारे हे वृत्त निश्चितच प्रेरणादायी ठरावे.":
##########.
👍"छाप(पड)लेले शब्द-23 !":💐
"ऐकावे ते नवलच !":
"रस्तोरस्ती वाहतूक कोंडी, ही तर सर्वच महानगरे, शहरे आणि आता कदाचित गावांमध्ये सुद्धा माणसांना त्रस्त करणारी गोष्ट झाली आहे. वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान अशा अनेक गोष्टी त्यामुळे सहन कराव्या लागतात. वाहतूक कोंडीवर मुंग्यांच्या शिस्तीचा कसा उपयोग करता येईल, यासंबंधीचे हे वृत्त म्हणूनच थक्क करणारे आहे. त्यातून काही सकारात्मक मार्ग सापडला, तर सोन्याहून पिवळे !"
##@#######@
👌 "छाप(पड)लेले शब्द-13 !":👌
👍" शारदोत्सव 'श्री पुं'ची 'सत्यकथा' !":👌
😊 "सालाबाद प्रमाणे वर्धा येथे लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. तेथे साहित्याचा जागर आणि मराठी भाषेच्या भवसागरात साहित्यप्रेमी रंंगून जाणार आहेत.
अशा वेळेला एक महत्त्वपूर्ण मन्वंतर, मराठी साहित्यामध्ये आपल्या जातीवंत संपादकीय कारकीर्दीमुळे घडवणारे श्री भागवत आणि त्यांच्या 'सत्यकथेेच्या' मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाणार आहे.
सत्यकथेतील निवडक कवितांचा संग्रह प्रकाशित होणार आहे, त्यासंबंधीचे हे वृत्त !":👌
###########
👍"छाप(पड)लेले शब्द-2 !:👌
👍"आठवणी दाटतात !": 💐
"बोलका चेहरा, डोक्यावर दाट कुरळे केस आणि दमदार आवाज या जोडीला धडाडी, नैसर्गिक सहजसुंदर अभिनय असे अतुलनीय मिश्रण असलेल्या, विनय आपटे यांच्या स्मृतीनिमित्त जो वृत्तांत महाराष्ट्र टाईम्स पुरवणीतआला, तो येथे द्यावासा वाटला.
विनय आपटेचे वडील आणि माझे वडील दोघेही रुईया कॉलेजमध्ये होते. माझे वडील अकाउंटंट तर विनय आपटेचे वडील पी टी फिजिकल ट्रेनिंग शिकवायचे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा कौटुंबिक परिचय होत गेला. ते कधी कधी आमच्या सायनच्या घरी देखील यायचे. त्यानंतर योगायोगाने विनय आणि माझी गाठ मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर, जेव्हा जेव्हा मी काही निमित्ताने किंवा माझा सहभाग असलेले काही कार्यक्रम रेकॉर्डिंग करायला जात असे, तेव्हा त्याची आणि माझी भेट व्हायची.
आत्मविश्वास असलेला आणि अत्यंत तडफदार उत्साही असा हा तरुण माझ्या मनावर खूप छाप पाडून गेला. त्याला पुण्यातील नामांकित रानडे वक्तृत्व स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते अत्यंत प्रभावी असे त्याचे वक्तृत्व होते.
जेेव्हा, मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये पब्लिसिटी डिपार्टमेंटमध्ये असताना, तेव्हा देखील काही व्यावसायिक निमित्ताने त्याची माझी थोडीफार भेेटगाठ होत गेली. त्याच्या दादरच्या डि एल वैद्य रोडवरील जाहिरात संस्थेमध्ये मी एकदा गेलोही होतो आणि तिथे तो त्यांच्या सहकार्यांबरोबर तो ज्या उत्साहाने काम करायचा तेही माझ्या चांगले लक्षात आहे.
पुुढे खूूप उशिराने झालेेली, त्याची माझी भेट ही कदाचित शेवटचीच ठरली, असे नंतर लक्षात आले. माझ्या मुलाकडे मी लंडनला 2011 मध्ये गेलो असताना, तिथे विख्यात अभिनेते निर्माते श्री महेश मांजरेकर यांनी आयोजित केलेला भव्य दिव्य कार्यक्रम Mifta मी पाहायला गेलो होतो, त्या वेळेला जी मांदियाळी कलाकारांची आली, त्यामध्ये विनयची माझी भेट झाली.
असा हा अत्यंत गुणवंत चतुरस्त्र कलाकार नंतर सात डिसेंबर 2013 रोजी निधन पावल्यावर खूप दुःख झाले. आता त्यांच्या स्मृतीनिमित्त जो कार्यक्रम त्यांच्या पत्नी सौ आपटे यांनी आयोजित केला, त्याच्या ह्या वृत्ताने, मला या सगळ्या आठवणी उलगडायला प्रवृत्त केले."
🙏🏼 🙏🏼🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼
"छाप पडलेले शब्द-24" :
"96 व्या साहित्य संमेलना नंतरचे कवित्व !":"अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी साहित्य संमेलन आयोजिले जाते. त्याकरता जनतेतर्फे देणगी रूपात निधी उभारण्याचे काम पुरेसे झाले नाही, इतकी वर्ष झाली तरी. परंतु नेहमीच शासनाकडून घसघशीत देणगी मिळावी, ही अपेक्षा मात्र ठेवली जाते. यावर्षी तर महाराष्ट्र शासनाकडून उदार अंतकरणाने घसघशीत दोन कोटी रुपये इतकी अनुदानाची रक्कम या संमेलनासाठी दिली गेली. परंतु त्यानंतर सोहळा तर दिसण्यापुुता पार पडला. मोठाले भव्य सुशोभित मंडपही उभारले गेले. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने नंंतर प्रकाशात आली, ती म्हणजे रसिक वाचकांचा त्या संमेलनाला पुुरेसा प्रतिसाद नव्हता. रिकामे मंडप किंवा रिकाम्या खुर्च्या बघण्याची वेळ आली. शिवाय मोठी देणगी मिळाल्यामुळे खर्चही तसाच आवाक्या बाहेर गेला असे वृत्तांवरून समजते.
पण सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे साहित्याचा जो दोन विभागांमुुळे विस्तार आणि प्रसार होतो, तो लेखक आणि प्रकाशक ह्या जोडगोळी शिवाय साहित्य वाचकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या दोन्हीही आवश्यक अशा समूहांना योग्य तो मानसन्मान व व्यवस्था मिळायला हवी. लेखकांचा बडेजाव केला जातो, मांडला जातो. परंतु प्रकाशक मात्र दुर्लक्षित राहतात अशी व्यथा या सोबतच्या वृत्तांत समजते.
ही खरोखर अयोग्य व चिंताजनक अशी गोष्ट आहे. अशा महत्त्वपूर्ण सोहळ्यात कुठल्याच प्रकारची अव्यवस्था होता कामा नये, याची दक्षता यापुढे तरी घेतली जावी. आगामी शतक महोत्सवी साहित्य संमेलनात, रसिक वाचक, लेखक आणि प्रकाशक तसेच आयोजक व शासन या सर्वांचा चांगला खेळीमेळीचा सहयोग अपेक्षित आहे. त्याप्रमाणे संबंधितांकडून आतापासूनच तयारी व्हायला हवी, असे सुचवावेसे वाटते.
धन्यवाद
सुधाकर नातू