😊"अती तिथे माती-पुरे झाले हे गौरव सोहळे !"😢
☺️ "गेली दोन दशके आपण "झी मराठी"चे गौरव सोहळे पहात आलो आहोत. आता त्यात इतर वाहिन्या व अन्य माध्यमांचेही तसेच सन्मान/ पुरस्कार कार्यक्रम गाजावाजा करत उतरले आहेत. परंतु दुर्दैवाने ह्या सगळ्याच जल्लोषात, तोच तोपणा आलेला दिसतो. ठराविक पात्रांची सो काँल्ड विनोदी प्रहसने, तोच तो विविध गीत संगीत आधारित सेलिब्रिटींच्या न्रुत्यांंचा धांगडधिंगा, तशीच विविध मानांकने ते सन्मानचिन्हे प्रदानांची साचेबद्ध कवायत आणि प्रेक्षकवर्गातही नटून थटून आलेले तेच ते मिरवायला आलेले चेहरेमोहोरे, मोठ्या उसन्या आवेशानिशी साजरे केले जातात.पूर्वी ज्या उत्सुकतेने तमाम मराठी रसिक गौरव सोहोळ्याची आतूरतेने प्रतिक्षा करावयाची, ती धुंदी आता संपूर्ण नाहीशी झाल्याचे चित्र आहे. म्हणूनच वाटते कशाला इतके हवे हे कंटाळवाणे खेळखंडोबे !
सार्या प्रसारमाध्यमांनी एकत्र येऊन फक्त एकच गौरव सोहळा नव्या दमाने, नव्या आटोपशीर रुपांत साजरे करण्याचा कां विचार करू नये ?👍👌💐
सुधाकर नातू
ता.क.
👍"मी अक्षरशः काही मिनिटं झी मराठी वरील "मटा" गौरव सोहळा पाहिला आणि उबग आल्याने पोटतिडकीने वरील माझा संदेश प्रसारित केला. त्याला 'फेबु'वर पुष्कळ पाठिंबा देणारे प्रतिसाद आले. असे नीट विचारपूर्वक चपखल मुद्दे मांडणारे संदेशच ह्यापुढे प्रसारित केले पाहिजेत हा वस्तुपाठ मला त्यामुळे मिळाला.👌
😊 काही निवडक प्रतिसाद:
१ खरंच खूप तोच तो पणा आहे, कंटाळा येतो पाहून नाहीतरी रोजच्या सिरीयल मध्ये काय असते! पहिल्या दिवसापासून एक खलबत्ता किंवा एक खल बाई शेवटच्या दिवसापर्यंत कुटत रहातात,क्रूरतेचा कळस !
२ खरंतर सगळ्या मालिका भिकार च आहेत अन वर यांना कसले पुरस्कार देतात उलट लाथा घालायला हव्यात?
३ आम्ही असले कार्यक्रम कटाक्षाने टाळतो आणि कारण तुम्ही सांगितलेच आहे.
४ अहो हे त्या कलाकार मंडळींचे रोजगार हमी योजना उपक्रम आहेत.
५ तुम्ही हे.... "असले" कार्यक्रम बघता ???!!!!! धन्य आहे तुमची.
👍ह्याला माझे उत्तर: "अक्षरशः काही मिनिटं हा गौरव सोहळा पाहिला आणि उबग आल्याने पोटतिडकीने वरील माझा संदेश प्रसारित केला."
ह्यावर उत्तर:
"Sudhakar Natu आपण असं पोटतिडकीने लिहितो पण त्यांना काहीही फरक पडत नाही. उलट ते आपल्यालाच मूर्ख ठरवतात. हा सगळा प्रकार म्हणजे
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः |
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः ||"
६ दर्जा घसरला हे नक्कीच. सैराट आल्यापासून दुसरी गाणीच यांना सापडत नसावीत. झिंग झिंग ऐकून कंटाळा आलाय. हे गाणी आणि मंजुळे हे समीकरण झालंय. दुसरी गाणी शोधा.
७ दहा पर्यंत संपवायला हवा सोहळा, फार लांबतायत हे कार्यक्रम.
८ मी हा कार्यक्रम पाहीला नाही.
९ हिंदी गाण्यांवर नाच का करावे लागतात? मराठी गाणी ढीग पडली असताना??