"पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
२७ आँक्टोबर'१९ ते २ नोव्हेंबर'१९:
प्रथम आगामी दिवाळी व नववर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे, प्रगतीपर व शांतीचे जावो ही सदिच्छा.
"रोमांचकारी घटना घडणार?":
मागील आठवड्यात, "पुढचं पाऊल" साप्ताहिक राशीभविष्यामध्ये मी, २१ ऑक्टोबरला होणाऱ्या चार ग्रहांच्या केंद्र योगांचे परिणाम, मोठी उलथापालथ होईल असे मांडले होते. अगदी त्याचाच अनुभव आता येत आहे आणि असे म्हणण्याची वेळ आली आहे की:
"हीच ती वेळ"
"हाच तो क्षण"
"अभी नही, तो कभी भी नही!"
ह्याच आठवड्यात देखिल, असेच दखल घेण्याजोगे तीन षडाष्टक आणि एक केंद्रयोग होत आहेत! त्यांचा परिणाम कोणकोणत्या नाट्यमय घटना घडवून आणतो, ते लवकरच दिसेल. हे तीन षडाष्टक म्हणजे २९ तारखेला मंगळाचा-नेपच्यूनशी, तर ३० तारखेला चंद्राचा हर्षल व राहूशी षडाष्टक योग; तर केंद्रयोग ३१ तारखेला चंद्र आणि नेपच्यूनचा, असे ते कुयोग आहेत.
बघु या काय काय रोमांचकारी घडते ते!
"एकमेकाद्वितीय अनुकूल गुणपद्धत":
अगदी आगळेवेगळे असे हे राशिभविष्य आहे. अशा अभिनव पद्धतीचे राशीभविष्य तुम्ही कुठेही कधी, वाचले वा पाहिले नसेल. कारण येथे आम्ही ज्योतिषाचा उपयोग ग्रह बदलानुसार प्रत्येक राशीला ग्रहांच्या शुभ दिवसाप्रमाणे अनुकूल गुण देऊन तुमच्या राशीच्या नशीबाला संख्यात्मक रूप दिले आहे.
जीवन म्हणजे बारा राशींच्या माणसांच्या नशीबाची जणु शर्यतच असते. नशीबाच्या परिक्षेत ग्रहबदलानुसार कुणाला किती अनुकूल गुण, कुणाचा, कोणता गट, ह्याच्या चर्च्या व गप्पा
आँफीस कँटीनमध्ये प्रवासांतल्या गप्पांमध्ये.....
आणि कुठे कुठे......
उत्तरोत्तर कुतूहल वाढवत लोकप्रिय होणारे हे साप्ताहिक राशीभविष्य!
"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":
स्पर्धात्मक जीवनात इतर राशीची माणसे कुठं होती व येत्या आठवड्यात त्यांचे नशीबाचे तुलनेत आपले काय स्थान आहे, ते सारे ह्या गुणांमुळे तुम्हाला समजू शकेल. त्या प्रमाणे तुम्ही आपले अपेक्षा व प्रयत्न विषयक, धोरण ठरवू शकता.
ह्यासाठी आम्ही म्हणतो:
"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":
"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":
येत्या आठवड्यातील प्रमुख ग्रहबदल: शुक्र २८ तारखेला तुळेतून व्रुश्चिक राशीत. तर चंद्राचा प्रवास कन्या, तुळा, व्रुश्चिक व धनु राशी असा होणार आहे.
ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात सुधारणा होत असल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच वाढ होणार असून, आघाडी कायम ठेवणारी कर्क रास व त्यामागोमाग तुळा व कुंभ राशी नशीबवान ठरतील.
उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.
१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":
२७ आँक्टोबर'१९ ते २ नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:
पहिला उत्तम गट: कर्क
दुसरा शुभ उजवा गट: तुळा, कुंभ
तिसरा मध्यम गट: व्रुश्चिक, कन्या, मेष व मीन
चौथा कष्टाचा डावा गट: मिथून, व्रुषभ, धनु व सिंह
पाचवा कटकटींचा तळाचा गट: मकर
२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":
आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)
चंद्र राशी अनुकूल गुण बारा राशीत
क्रमांक
१ मेष २६ ( २३ ) ६ ( ७ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात समाधानकारक स्थिती. नोकरीतील प्रगती व विरोध काबूत ठेवाल. आर्थिक जमाखर्च संभाळला जाईल. प्रवासात घाईगर्दी नको. कौटुंबिक वातावरण मात्र नरम गरम.
२ व्रुषभ २२ (२० ) ९ ( १० )
मागच्या आठवड्यापेक्षा गुण किंचीत वाढले. राशींच्या स्पर्धेत क्रमांकात एक पाऊल पुढे गेले. नोकरी व्यवसायात वरिष्ठांशी जुळवून घ्या व आर्थिक नियोजन करा. कौटुंबिक आजारपणे प्रवासात अडचणी.
३ मिथून २४ ( २४ ) ८ ( ६ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुण तितकेच पण इतर स्पर्धेत राशींना अधिक त्यामुळे क्रमांकात घसरण.
आर्थिक व्यवहारात गफलत होऊ शकेल, सावध रहा. नोकरी व्यवसायात धावपळ झाल्याने तब्येतीवर अनिष्ट परिणाम. जोडीदाराचा सहकार.
४ कर्क ४० ( ३८ ) १ ( १ )
मागच्या आठवड्यासारखीच आघाडी. नोकरीत प्रगती व अर्थव्यवहार आनंददायी. दूरचे प्रवास होतील व नवीन ओळखी लाभदायक. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे.
५ सिंह २२ ( २० ) ११ ( ११ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुण तसे इतरांच्या तुलनेत कमीच. स्पर्धेत अजून निराशाजनक स्थिती. नोकरी व्यवसायात वाढतील. आर्थिक ओढाताणीमुळे मानसिक चिंता. संततीच्यि तब्बेतीची काळजी घ्या.
६ कन्या २७ (२५ ) ५ ( ५ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात थोडी वाढ आपण स्पर्धेत प्रयत्न यशस्वी. नोकरीत व्यवसायात कामाचा बोजा सफाईने वेगळा कराल. अर्थार्जन सुधारेल. मात्र आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांकडे वेळीच लक्ष द्या.
७ तुळा ३० ( २८ ) २ ( २ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुणात वाढ, त्यामुळे क्रमांक तोच राखाल. तब्येतीत चांगली सुधारणा व उत्साहाने नोकरी व्यवसायात तुमच्यावरील महत्वाची जबाबदारी पार पाडाल. कौटुंबिक सुख समाधान.
८ व्रुश्चिक २७ ( २५ ) ४ ( ३ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढले खरे, पण वाढत्या स्पर्धेमुळे क्रमांकात एक पायरी खाली याल. नोकरी व्यवसायात अनुकूल घटना, त्यांचा लाभ घ्या. आर्थिक व्यवहार चोख होतील कौटुंबिक मंगल प्रसंग.
९ धनु २२ ( २१) १० ( ९ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत किंचीत वाढ परंतु क्रमांकात घसरण. नोकरीत बोलणी खावी लागतील, कसाबसा टिकाव धरू शकाल. आर्थिक चिंता व एकंदर मानसिक अस्वस्थता. प्रवास काळजीपूर्वक करा.
१० मकर १३ ( ११ ) १२ ( १२ )
मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढले तरी क्रमांक,
पुन्हा शेवटचा! कारण इतरांना अधिक सुलभ शुभ ग्रहमान. नोकरी व्यवसायात खुप धावपळ व कष्ट. प्रवासात एखादी अप्रिय घटना. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता
११ कुंभ २९ ( २५ ) ४ ( ४ )
मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात व क्रमांकात उत्तम सुधारणा. नोकरी व्यवसायात अर्थलाभ प्रमोशन तसेच यशदायी प्रवास. स्थावर विषयक प्रश्नी लाभ. कौटुंबिक खेळीमेळीचे वातावरण.
१२ मीन २५ ( २२ ) ७ ( ८)
मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात थोडी वाढ. नोकरीतील अडचणी खुबीने दूर केल्या तरी आर्थिक व्यवहारात नुकसान तब्येतीची हयगय नको. प्रवासात वादविवाद टाळा.
( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक
स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.
आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.
ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे. आपणही तिची माहिती इतरांना जरुर द्यावी.
दर शनिवारी, माझ्या ब्लॉगवर, ग्रहस्थितीनुसार आपल्या आगामी आठवड्याचे अनुकूल गुणांवर आधारित, हे अभिनव राशीभविष्य मी असेच आपल्या उपयोगासाठी मांडत जाणार आहे.
शिवाय you tube वरील
moonsun grandson
ह्या माझ्या चँनेलवर तसा विडीओही प्रदर्शित केला जाईल. त्याचा आवर्जून लाभ घ्या. तशी सवय लावून घ्या.
आता पुढील आठवड्यात माझा एक हाती काढलेला वार्षिक राशीभविष्य व इतर विविधरंगी साहित्याची मेजवानी असलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९-वर्ष तिसरे, मी प्रसिद्ध करणार आहे.
त्यातील अनोखी गोष्ट':
## हा अंक आपणास मिळाल्यानंतरच, अपेक्षित मानधन रू ७५/-फक्त आँनलाईन पेमेंटद्वारे करा...
क्रुपया आपला होकार प्रतिसादात वा मेसेंजरवर अथवा whatsapp 9820632655
तुमचे नांव गांव आणि ईमेल देऊन कळवावा.
तसेच वरील चँनेलवर राशीनिहाय संपूर्ण राशीभविष्याचे विडीओज् मी प्रकाशित करणार आहे... त्यांचा जरूर लाभ घ्या.
माझ्या ब्लॉगची लिंक आहे:
http//moonsungrandson.blogspot.com
ही लिंक नेहमी उघडा, शेअरही करा.....
धन्यवाद.
लेखक: प्रा. सुधाकर नातू
२५/१०/'१९
This week prediction not yet displayed
उत्तर द्याहटवा